Friday, December 19, 2025
Home Blog Page 4912

शिवसेनेचा भाजपला धोबीपछाड ; नाशिक मधील ‘या’ दोन नेत्यांनी हाती बांधले शिवबंधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक मध्ये शिवसेनेने भाजपला धोबीपछाड दिला असून भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी भाजपा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं यावेळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

राऊत म्हणाले, “नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांची असणार आहे. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्यावतीनं या दोघांचं शिवसेनेच्या परिवारात मनापासून स्वागत करतो. नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे.” शिवसेनेचा हा कुठलाही मास्टर प्लान नाही तर आता प्रवाह बदलोय, हवा बदलतेय अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस हे तीन दिवसानंतर नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी आज भाजपला धक्का बसला आहे. गिते व बागुल यांच्या पक्षांतरानंतर नाशिकमधील स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार असून भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनल्यानंतर, एलन मस्कने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, पाहून आपणही चकित व्हाल

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. गुरुवारी त्यांनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार स्पेसएक्स आणि टेस्लाच्या संस्थापकाकडे आता एकूण 195 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मस्कच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, त्यांची कंपनी टेस्ला अपेक्षेनुसार कामगिरी करत नव्हती आणि त्याला आपली कंपनी विकायची होती. मात्र, आता त्याच कंपनीमुळे गुरुवारी मस्कने हे स्थान मिळवले आहे. गुरुवारी व्यापारादरम्यान टेस्लाच्या शेअर्समध्ये 8.8 टक्क्यांनी वाढ झाली.

‘टेस्ला ओनर्स ऑफ सिलिकॉन व्हॅली’ हँडलवरून एक ट्विट आले आहे, ज्याने ट्विटरवर एलन मस्कबद्दलची ही बातमी शेअर केली आहे. या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “एलन मस्क आता 195 अब्ज डॉलर्सची संपत्ती मिळवून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.” या ट्वीटचा संदर्भ घेत मस्कने लिहिले की, “हाऊ स्ट्रेंज”

https://twitter.com/teslaownersSV/status/1347201514930991105?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347204459147902978%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

यानंतर, पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “ठीक आहे, पुन्हा कामावर …”

https://twitter.com/elonmusk/status/1347204459147902978?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347204606414131200%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

एलन मस्कच्या या ट्विटवर लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला.

https://twitter.com/romafades/status/1347244085355147265?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347244085355147265%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

 

https://twitter.com/TobyH2020/status/1347235714237423616?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347235714237423616%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

 

https://twitter.com/Phoenix_tc_/status/1347240630221729794?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347240630221729794%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

https://twitter.com/BeingSmeet1012/status/1347416968203104256?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347416968203104256%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Felon-musk-reply-after-becoming-worlds-richest-person-know-what-he-said-ndav-3407723.html

2020 मध्ये टेस्लाच्या शेअर्सने 743 टक्क्यांनी उडी घेतली
वास्तविक, मस्कच्या मालमत्तेत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समधील प्रचंड वाढ. 2020 मध्ये कंपनीने लग प्रॉफिट मिळवल्याने तसेच S&P 500 इंडेक्स मध्ये सामील झाल्यानंतर टेस्लाचे शेअर्स 743 टक्क्यांनी वाढले आहेत.

https://t.co/wqE1O4IF3v?amp=1

मस्कच्या मालमत्तेवर आर्थिक मंदी किंवा कोरोना महामारीचा कोणताही परिणाम होणार नाही
नोव्हेंबर 2020 मध्ये, बिल गेट्स यांना मागे टाकून एलन मस्क जगातील दुसर्‍या श्रीमंत माणसाच्या खुर्चीवर बसला होता. त्यावेळी त्यांच्याकडे 128 $ अब्ज डॉलर्सची संपत्ती होती. गेल्या 12 महिन्यांत, एलन मस्कची संपत्ती 150 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त (सुमारे 11 लाख कोटी) वाढली आहे. आर्थिक मंदी किंवा कोरोना विषाणूच्या साथीमुळे मस्कच्या मालमत्तेवरही कोणताही परिणाम झालेला नाही.

https://t.co/jOiVSDb2wh?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

पेट्रोलचे दर प्रति लिटर 5 रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात, आजचे दर तपासा

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी सुमारे एक महिन्यानंतर दररोज इंधन दरवाढीचा आढावा पुन्हा सुरू केला. काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 23 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली आहे. शुक्रवारी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या पेट्रोलच्या किंमतींवर मोठा दिलासा आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या उच्च दरांवर सवलत देण्याची शिफारस पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारला केली आहे. अबकारी शुल्कात कपात करून जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो असे मंत्रालयाने नुकतेच म्हटले आहे.

पेट्रोलचे दर प्रति लिटर 5 रुपयांनी कमी होऊ शकतात
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळामध्ये पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात 50 टक्क्यांनी वाढ झाली तरी पेट्रोलची किंमत प्रति लिटर 5 रुपयांनी कमी होऊ शकते. लॉकडाऊन दरम्यान सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची वाढ केली. उत्पादन शुल्कात कपात केल्यास ग्राहकांना पूर्ण लाभ देण्यासाठी राज्यांनाही सहकार्य करावे लागेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

आपला शहराचा दर तपासा

> दिल्ली पेट्रोल प्रतिलिटर 84.20 रुपये आणि डिझेल 74.38 रुपये प्रतिलिटर आहे.
> नोएडा पेट्रोल 84.06 रुपये तर डिझेल 74.82 रुपये प्रति लिटर आहे.
> लखनऊ पेट्रोल 83.98 रुपये तर डिझेल 74.74 रुपये प्रतिलिटर आहे.
> पटना पेट्रोल 86.75 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 79.51 रुपये आहे.

>मुंबई पेट्रोल 90.83 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 81.07 रुपये आहे.

>चेन्नई  पेट्रोल 86.96 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 79.72 रुपये आहे.
> चंडीगड पेट्रोल 86.51 रुपये तर डिझेल 79.26 रुपये प्रतिलिटर आहे.

> कोलकाता पेट्रोल 85.68 रुपये तर डिझेल 77.97 रुपये प्रतिलिटर आहे.

> गुरुग्राम पेट्रोल 82.39 रुपये तर डिझेल 74.97 रुपये प्रतिलिटर आहे.

https://t.co/7lCGIKXk5l?amp=1

दररोज 6 वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

https://t.co/mDHsZYnPlK?amp=1

अशा प्रकारे, आपण नवीन दर जाणून घेऊ शकता
तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर कसे माहित होतील (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईल ग्राहक RSP असे लिहून 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकता.

https://t.co/wqCYyN1klE?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

खळबळजनक !! धावत्या लक्झरी बसने घेतला पेट ; शॉर्टसर्किटने लागली आग ?

Burning Bus

परभणी  प्रतिनिधी । गजानन घुंबरे 

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात रस्त्यावरून जात असलेल्या एका लक्झरी बसने ८ जानेवारी रोजी सकाळी अचानक पेट घेतल्याची घटना घडली असून यामध्ये मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुठलीही मनुष्यहानी झाली नाही .

जिंतूर तालुक्यातील चारठाणा गावा जवळ सेलू जिंतूर या रस्त्यावर सकाळी लक्झरी बस ला आग लागून बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे .लागलेली आग एवढी भीषण होती की अवघ्या काही वेळा मध्ये संपूर्ण बसने पेट घेतला होता .सुदैवाने या बस मध्ये प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना इजा झालेली नाही .घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आगीचे लोट पाहायला मिळाले .बसला लागलेल्या आगीमुळे रस्त्यावर वाहतूक थोड्यावेळासाठी थांबले होती .दरम्यान आग विझवण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने बस जळून खाक झाली आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार – केशव उपाध्ये यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे, अशा शब्दांत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर घणाघात केला आहे. एकामागून अनेक ट्विट करत त्यांनी आपली भूमिका मांडली.

उपाध्ये म्हणाले, “न्यायालयाकडून सरकारमधील विविध मंत्र्यांना व राज्य सरकारला विविध प्रकरणात गेले वर्षभर थपडा मिळत आहेत. तसेच जनतेला राज्यातील आघाडी सरकारकडून मिळत असलेल्या आश्वासनाच्या थापा पहात असतां हे आघाडीचे सरकार जनतेसाठी आपडो सरकार नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले आहे”.

न्यायालयाने दिलेल्या थापडाची संख्या मग ती मंत्र्यावर असो की विविध प्रकरणावर ती वाढतच आहे. कालच विजय वड्डेवारीवार यांचा पासपोर्ट खोटी माहिती दिली म्हणून जप्त केला गेला. अन्य एक मंत्री यशोमती ठाकूर यांना झालेली शिक्षा, नियमबाह्य पध्दतीने परवानग्या दिल्या म्हणून वर्षा गायकवाड यांचा निर्णय बेकायदेशी ठरविण्याचा काल आलेला निर्णय ताजा आहे.

एकीकडे कंत्राटदाराना खैरात, बिल्डरांना मलिदा आणि जनतेला मात्र फक्त थापा हे सरकार देत आहे. भरमसाठ वीजबिलात वारेमाप सवलत देण्याच्या थापा, शेतकऱ्यांना मदतीच्या थापा, कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू ही एक थाप, पीक वीमा कंपन्याच्या अटी शेतकऱी धार्जिण्या करू, मुंबईकरांना मालमत्ताकरात सवलतीच्या थापा अशा अनेक थापा सरकार जनतेला देत असून याची संख्याही मोठी आहे. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारची ओळख ही थापाडे सरकार हीच झाली आहे, अशा तिखट शब्दांत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

विरुष्काला मुलगा होणार की मुलगी ?? ; ज्योतिषांनी केली ‘ही’ भविष्यवाणी

virat anushka

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील नेहमी चर्चेत असणाऱ्या काही कपल मधील प्रसिद्ध असलेले क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर त्यांनी ही गुड न्युज दिल्यानंतर विरुष्काला मुलगा होणार की मुलगी अशी चर्चादेखील चाहत्यांमध्ये रंगतांना पाहायला मिळते. त्यातच एका ज्योतिषाने विरुष्काला मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं आहे. ‘इंडिया. कॉम’च्या वृत्तात याविषयी नमूद करण्यात आलं आहे.

प्रसिद्ध ज्योतिष पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी विरुष्काला मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं आहे. पंडित जगन्नाथ गुरुजी यांच्या नुसार, विरुष्काला एक गोंडस मुलगी होणार आहे. या चिमुकलीमुळे त्यांच्या जीवनातील आनंद द्विगुणित होणार आहे. तसंच या दोघांचा चेहरा वाचल्यावर त्यांना मुलगी होणार असल्याचं दिसून येत आहे. ही मुलगी वडिलांसाठी एका राजकन्येप्रमाणे असेल,तर आईची लाडकी असेल.

दरम्यान, अनुष्का तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे. या काळातदेखील ती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. मध्यंतरी तिचा ट्रेडमीलवर चालताना व शीर्षासन करतानाचा फोटो, व्हिडीओ व्हायरल झाला होता. विरुष्काने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आई-बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

CMO कडून पुन्हा एकदा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर ; महाविकासआघाडीत तणाव वाढणार ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही असताना काँग्रेसने मात्र तीव्र विरोध केला आहे. यावरून महाविकास आघाडी मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या @CMOMaharashtra या अधिकृत ट्वीटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असतानाच आज पुन्हा एकदा याच ट्वीटर हँडलवर संभाजीनगर असा उल्लेख करत ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटमुळे शिवसेना विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवर बुधवारी सर्वप्रथम औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाच्या इमेजवर हा उल्लेख होता. ‘संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस मान्यता’ असे या इमेजवर नमूद करण्यात आले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनच आक्षेप नोंदवला होता. ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया’, असे थोरात यांनी नमूद केले होते. असे असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवर आज पुन्हा एकदा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

खूप राग येतोय?? पहा रागाला आवर घालण्याच्या काही सोप्या टिप्स

anger

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । प्रत्येकाला राग हा येतच असतो. पण तो राग योग्य वेळी आणि योग्य कारणाला व्यक्त करता आला पाहिजे. कधी कधी जास्त प्रमाणात राग येतो. आपली चूक नसेल आणि जर समोरच्याची चूक असेल तर राग हा येतोच पण राग हा लगेच बाहेर आला तर अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले गेलेलं असते. पण त्यानंतर आपल्याला कोणतीच गोष्ट निस्तरता येत नाही. कि त्याची जाऊन माफी पण मागू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीबाबत राग व्यक्त करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

— कोणतेही गोष्ट सहन करण्याची वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे.

— पण माणसे वेळ जाऊ देत नाहीत लगेच भडकून आपल्या मनातील भावना व्यक्त करून बसतात.

— रागामुळे अनेकांची आयुष्य उध्वस्त झालेली पहिली असतील.

— राग हा अनेक आजरांना आमंत्रण देण्याचे काम करते.

— आपण संयमी आणि आनंदी राहिले पाहिजे.

.— राग व्यक्त करण्यापूर्वी त्याच्या परिणामांविषयी माहिती करून घेतलेली बरी.

— राग हा कोणापाशी व्यक्त करावा हे समजले पाहिजे.

— आपल्या इमोशन्स बरोबर इतरांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.

— काळजी, भीती, चीड, द्वेष, चंचलता, दुःख, त्रास आणि वैताग अशा सगळ्या दुय्यम भावना रागात होऊ शकतात..

— कोणाच्या वाचून कोणाचे अडणार नाही हि भावना ठेवणे बंद करा.

— नेहमी सकारात्मक विचार करा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

मेंढपाळासमोरच दोन बिबट्यांनी ठार केल्या दोन मेंढ्या; कराड शहरापासून अवघ्या 2 किमी अंतरावरील घटना

leopards

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात बिबट्या जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच केवळ दीड किलोमीटर अंतरात आज दोन बिबट्यांनी हल्ला करून मेंढपाळासमोरच दोन मेंढ्या ठार केल्या. तर श्वानासह एक मेंढी गायब केली. जखिणवाडी ता. कराड येथील वाघुरदरा नावाच्या शिवारात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान पाळीव प्राण्यांवर भरदिवसा हल्ला होत असल्यामुळे जखिणवाडी विभागात बिबट्याची दहशत कायम आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, आगाशिव डोंगर पायथ्याला जखिणवाडी गावापासून कांही आंतरावर वाघुरदरा नावाचा शिवार आहे. या शिवारात नितीन तुकाराम पाटील यांचे शेत आहे. पाटील यांच्या शेतात जखिणवाडी येथील राजेंद्र भिकू येडगे हे मेंढरांचा कळप चारायला घेऊन जातात. असतो. नेहमीप्रमाणे आज येडगे मेंढ्या चारत असताना अचानक पाळीव श्वान भुंकत असल्याचे निदर्शनास आले. येडगे त्या दाशेने गेले असता दोन बिबट्यांनी श्वानासह मेंढरांवर हल्ला चढवला होता. क्षणार्धात दोन मेंढ्यांच्या नरड्याचा चवा घेऊन ठार केल्याचे निदर्शनास आले.

एकाने एक मेंढी तर दुसऱ्याने श्वान घेऊन डोंगरात धुम ठोकली. यावेळी नरड्याचा चावा घेतल्याने गंभीर जखमी झाली होती. दोन बिबट्यांना पाहून येडगे यांनी घाबरून गावात फोन केला. गावातील ग्रामस्थांनी घटनेची खबर येडगे यांनी खबर वनविभागाला दिली. वनविभागाचे वनपाल ए. पी. सवाखंडे , वनरक्षक रमेश जाधवर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमी मेंढीवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले उपचार सुरू असताना सायंकाळी ती मेढीही ठार झाली. मेंढपाळासमोरच बिबट्याने हल्ला केल्याने गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिसरात बिबट्याचा सततचा वावर असल्यामूळे आगाशिव डोंगर पायथ्याच्या गावात बिबट्याची दहशत कायम आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’