Friday, December 19, 2025
Home Blog Page 4913

कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर आयोजित; असा घ्या लाभ

Krushna Hospital Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सन २०२० मध्ये सर्व जगात कोरोनाने थैमान घातले. संपूर्ण जगात उलथापालथ झाली. २०२१ च्या सुरवातीला या आजाराला सध्या तरी उतरती कळा सुरू झाली आहे. तसेच लवकरच लस येण्याची आशा आहे. पण या कोरोनाच्या काळात जगभरात कॅन्सरच्या रूग्णांना मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या काळात काहींनी निदान करण्याचे टाळले. तर काहींनी उपचार घेतले नाही अथवा उपचार पूर्ण करू शकले नाहीत. यामुळे अचानकपणे कर्करोग रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे दिसून आले आहे.

आज भारतात मृत्यूचे दुसरे कारण म्हणजे कॅन्सर. दरवर्षी कॅन्सरचे १० लाख नवीन रूग्ण आढळतात आणि त्यामुळे ४ लाख मृत्यू होतात. जगात सर्वाधिक तोंडाच्या व घशाच्या कॅन्सरचे रूग्ण भारतात आहेत. कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्या २५ वर्षापासून कर्करोग विभाग कार्यरत आहे. सन १९९६ मध्ये सातारा जिल्ह्यात प्रथमच व पश्चिम महाराष्ट्रात मिरजनंतर कराड येथे स्वतंत्र कर्करोग विभाग कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरू झाला. आज या विभागात दररोज जवळपास १०० रूग्ण उपचार घेतात. मागील २० वर्षात जवळपास ३० हजार हून अधिक रूग्णांनी येथे उपचार घेतलेले आहेत. सर्वाधिक रूग्ण तपासणारे व सर्वाधिक रेडिएशन किमोथेरपी देणारे दक्षिण महाराष्ट्रातील हे एकमेव रूग्णालय आहे. येथे पूर्णवेळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थांमधून प्रशिक्षित कॅन्सर सर्जन, रेडिएशन व किमोथेरपी तज्ज्ञ उपलब्ध आहेत. तसेच स्तन कर्करोगासाठी स्वतंत्र विभाग आहे. पॅलिएटीव्ह केअरसाठी पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव संस्था मान्यताप्राप्त आहे. हा विभाग टाटा हॉस्पिटलच्या नॅशनल कॅन्सर ग्रीड शी संलग्न आहे. येथे महात्मा फुले जीवनदायी योजना, पोलिस आरोग्य कल्याण योजना, मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी इत्यादी योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते.

याशिवाय कृष्णा हॉस्पिटलतर्फे विविध ठिकाणी कर्करोग निदान व उपचार शिबीरे भरविली जातात. तसेच विविध जनजागृती अभियानेही चालविली जातात. याच अनुषंगाने दरवर्षी ४ फेब्रुवारीला कृष्णा हॉस्पिटलतर्फे जागतिक कर्करोक दिनानिमित्त विविध राबविले जातात.

या दिनाचे औचित्य साधून यावर्षी दि. ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान कर्करोग विभागातर्फे भव्य मोफत कर्करोग शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीराला भारतीय कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञांची संघटना आणि गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक (गोकर्मा) या संघटनेनी मान्यता दिली आहे. यामध्ये देशभरातील उच्च वैद्यकीय संस्थांमधील सुमारे २० हून अधिक कर्करोग तज्ज्ञ कृष्णा हॉस्पिटलमध्ये स्वत: उपस्थित राहून मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. या शिबीरासाठी कर्करोगावरील तज्ज्ञांच्या जागतिक पातळीवरील संघटना असणाऱ्या यु.आय.सी.सी.चे अध्यक्ष तथा मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे संचालक व टाटा हॉस्पिटलचे माची संचालक डॉ. अनिल डिक्रुज, भारतीय कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अर्नब गुप्ता (कोलकता), मुंबईतील एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे सहाय्यक संचालक डॉ. धैर्यशील सावंत, ब्रिज कॅन्डी व जसलोक हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. अमिश दलाल, बेंगलोर येथील मणिपाल हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. सोमशेखर, टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. प्रथमेश पै, गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शेखर साळकर, हुबळी येथील कर्नाटक कॅन्सर थेरपी व रिसर्च इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. बी. आर. पाटील, रेडॉन कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. संजीव कुलगोड, बेंगलोये येथील मेक्झिलोफेसिअल सर्जन डॉ. सत्यजीत दंडगी, शिमोगा येथील कॅन्सर सर्जन डॉ. रमेश हे ख्यातनाम कॅन्सर तज्ज्ञ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कॅन्सर सर्जनचाही यात समावेश असणार आहेत. शिबीरातील शस्त्रक्रिया डॉ. शेखर साळकर (गोवा) व डॉ. शरद देसाई (मिरज) यांच्या निर्देशानुसार होणार आहेत.

या शिबीराचा लाभ घेण्यासाठी कॅन्सरग्रस्त रूग्णांनी २५ जानेवारी अखेर कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोंदणी करणे गरजेचे असून, नोंदणीसाठी येताना रूग्णांनी आपले सर्व जुने रिपोर्टस् घेऊन यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विहीरीत पडलेल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यानेही उडी मारली,आणि पुढे…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पिण्याचे पाणी भरायला गेलेल्या पत्नीचा विहिरीत पाय घसरल्याने तिला वाचवायला गेलेल्या पतीचा देखील मृत्यू झाला. बळसाणे येथे या नव दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळला आहे.

रब्बी हंगाम सुरु असल्याने शेतकरी लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे (वय 27) हे पत्नी अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे (वय 22) यांच्या सह शेताची काम उरकत होते. यादरम्यान, पती लक्ष्मण यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पत्नी अंजू या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेल्या. पाणी काढत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या. हे पहाताच लक्ष्मण यांनी पत्नी अंजूला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली.

परंतु, विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघेही जण तळाला गेल्याने नव दाम्पत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली. येथील सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्यासह गावकरी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

औरंगाबाद की संभाजीनगर ?? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका ; म्हणाले की …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडली आहे. औरंगाबादच्या नामकरण संभाजीनगर करण्याला शिवसेना आग्रही असताना काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवार म्हणाले, राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. तीन पक्षांचे सरकार चालवताना काही वेळेला एखादा विषय निर्माण होत असतो. पण त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढता येतो. औरंगाबादच्या नामांतराबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि योग्य तो मार्ग काढतील, असं ते म्हणाले

वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्याला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत पवारांना विचारले असता, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुणी भावनिक मुद्दे काढत असतात. कुणी विकासाबद्दल बोलत असतात तर कुणी नामकराणाचे मुद्दे काढत असतात. राज्यात गेल्या 60 वर्षात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. कोण औरंगाबादबद्दल बोलतंय, कोण नगरबद्दल तर कोण पुण्याबद्दल बोलतंय. प्रत्येकाला आपली मागणी रेटण्याचा अधिकार आहे, असेही ते म्हणाले.

अधिकाराचा वापर कसा करायचा याचा निर्णय ज्याचा त्याने चिंतन करून घ्यायचा असतो, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच विकासाला प्राधान्य दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विकासावर भर दिला आहे. आम्हीही याच भूमिकेचं समर्थन करत असतो, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

शिवसेनेला घेरणारा अजून जन्माला यायचायं! आमदार अंबादास दानवे यांचा भाजपाला इशारा

औरंगाबाद प्रतिनिधी | भाजपची मुंबईत एक बैठक झाली. आणि त्या बैठकीत शिवसेनेला विविध मुद्यांवरून घेणार्याची चर्चा झाली. मात्र शिवसेनेला घेरणारा अजून जन्माला यायचा आहे. हे भाजपने लक्षात ठेवावे असे मत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे. औरंगाबादमध्ये गेल्या 32 वर्षात शिवसेनेनं अनेक कामे केली आहेत. हे जनतेच्या लक्षात आहे. अस मतही त्यांनी व्यक्त केलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने हे औरंगाबाद शहर फुलल आहे. आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे इथली शिवसेना मजबूत झाली असून शिवसेनेला घेरण्याची शक्ती कोणीही दाखवू शकत नाही. ज्या ज्या वेळी हिंदुत्त्वाला अडीअडचणी निर्माण झाल्या त्या त्या वेळी शिवसेना आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरली आहे हे शिवसेनेने संभाजीनगरला वारंवार दाखवून दिले आहे.

औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाला शिवसेना 32 वर्षा पासून लढा देत आहे. नामकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना कायम आग्रही आहे. विमानतळ नामकरणा साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. एक वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळाने प्रस्ताव करून केंद्राकडे पाठवला होता. पण याबद्दल भारतीय जनता पक्षाला अजूनही जाग येत नाही.

विकासाचा मुद्दा घेतला तर मागील 32वर्षा पासून संभाजीनगर हे आशिया खंडातील वेगाने वाढणार शहर आहे. अडीच लाख कामगार येथील उद्योगावर जगतोय. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना येतेय. या शहरात छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असेल , डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर असेल, प्राणी संग्रहालय असेल अशी अनेक कामे शिवसेनेने संभाजीनगर मध्ये केली आहेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर देखील कोणाला तोंड उघडता येणार नाही . हे शहर सुपर संभाजीनगर करण्याचा विडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने उचलला आहे. कुणी घेरण्याचा प्रयत्न केल्यास त्यास आम्ही पाणी पाजनार असा इशारा देखील त्यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

खेळता खेळता बालकांनी खाल्ल्या चंद्रज्योतीच्या बिया; 18 जणांची प्रकृती गंभीर, दोघे बेशुद्ध

अमरावती प्रतिनिधी | जिल्हातील अचलपूर तालुक्यात चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १८ बालकांची प्रकृती बिघडली आहे. अचलपूर तालुक्यातील कुंभी वाघोली येथे आज दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना घडल आहे.

तालुक्यातील कुंबी वाघोली येथील मुले या गावा शेजारी दुपारच्या वेळेला खेळत होती. खेळता-खेळता गावाशेजारी असलेल्या चंद्रज्योतीच्या झाडाखाली पडलेल्या चंद्रज्योतीच्या बिया त्यांनी खाल्ल्याची माहीती आहे. दोन ते बारा वर्षाची एकुण 18 मुलांना उलटी व मळमळ होत असल्याने कही मुलं जागेवरच कोसळली ही बाब गावातील काही लोकांच्या लक्षात येताच त्या मुलांना पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

परंतु तेथील तेथे प्रकृती आणखी खालावली असल्याने त्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय हलवीन्यात आले. दोन मुले अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे. जि. प. शिक्षीका संध्याताई तायडे या शिक्षिकेच्या मदतीने गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

खवळलेल्या समुद्रात महिला जात होती वाहून; इतक्यात…(Video)

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आपण सोशल मीडियावर रोज अनेक नवनविन व्हिडीओ पाहत असतो. त्यातील काही व्हिडिओ हे अंगावर शहारे आणणारे असतात. त्यामुळे अनेक वेळा पाहिले जातात.आणि खूप व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खवळलेल्या समुद्रात महिला वाहून जात असताना तिला वाचवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हवाई बेटाच्या उत्तरेकडील वाहू हा समुद्रकिनारा पूर्वीपासूनच धोकादायक म्हणून कुख्यात आहे. इथं जवळजवळ वर्षभर चवताळलेल्या हिंस्त्र प्राण्यासारखा समुद्र घोंघावत असतो. त्यामुळं इथं सतत अपघात होत राहतात.

https://www.instagram.com/p/CJferABABdg/

मिल्की राईट हा आपल्या पत्नीसोबत वाहू इथं, हवाईच्या उत्तर किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद लुटत होता. त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून या घटनेचे दोन व्हीडिओ शेअर केलेत. राईट सांगतो, आजही तो जेव्हा हे व्हीडीओ पाहतो तेव्हा त्याच्या अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

‘त्या’ बलात्कार पीडितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत ; केले ‘हे’ मोठे विधान

औरंगाबाद प्रतिनिधी | बलात्कार संदर्भात मी माझे निवेदन न्यायालयातच सांगणार आहे. असा पीडितेचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारीत झाल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आता पोलिसाकडे लवकरच जबाब नोंदविणार आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांच्याविरुद्ध 29 वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात 26 डिसेंबर रोजी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईत शिक्षक म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने जवळीक साधून कारमध्ये 14 नोव्हेंबर रोजी रात्री हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत आरोपी हा सत्ताधारी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे आरोपीला तातडीने अटक न करता गुन्ह्याचा तपास सुरू केला.

मेहबूब शेख यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन तक्रारीत नमूद तारखेला ते औरंगाबाद शहरात नव्हते असे सांगून आपल्या विरुद्ध तक्रार देणाऱ्या महिलेला ओळखत नसल्याचे म्हटले होते. असे असले तरी आरोपी महबूब शेख यांचा जबाब पोलिसाकडून नोंदविण्यात येणार आहे. याकरिता लवकरच पोलिसाकडून महबूब शेख यांना हजर राहण्यास संदर्भात नोटीस बजावली जाऊ शकते. मात्र कधी बोलावणार याविषयी अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. दरम्यान बलात्कार पीडितेने बलात्कार संदर्भात मी माझे निवेदन आता न्यायालयातच सांगणार आहे असा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित केला. त्यामुळे पोलिसांसमोरील पेच वाढले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

खळबळजनक !! प्रेमीयुगुलाची चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; तोंडाला बांधायच्या स्कार्फने घेतला गळफास

Couple sucide

सोलापूर प्रतिनिधी | जिल्ह्यातील मोहोळ शहरातील बी.पी.एड. महाविद्यालयाच्या आवारात प्रेमीयुगुलांनी चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तोंडाला बांधायच्या स्कार्फने प्रियकर प्रियसीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रेमीयुगलांनी घेतलेल्या या गळफासामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे. याबाबत पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

मोहोळ शहरातील बी.पी.एड. महाविद्यालयाच्या आवारात एका जोडप्याने गळफास घेतला. ही माहिती परिसरातील काही नागरिकांना समजली. या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा या प्रेमीयुगुलांनी स्कार्फच्या साहाय्याने दोघांनी एकत्र गळफास घेतल्याचे दिसले.

पोलिसांनी या दोघांनाही फासावरून खाली उतरवले. व उत्तरिय तपासणीसाठी रुग्णलायत हलवले आहे. प्रेमसंबंधला घरच्यांनी नकार दिला असल्याने त्यांनी आत्महत्या केली. असा अंदाज व्यक्त केला जात. मात्र तरीही ही आत्महत्या का केली हे अजून स्पष्ट झाले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

जयंत पाटील यांनी गायले पुतण्याच्या लग्नात गाणे; पहा व्हिडिओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जलसंपदामंत्री जयंत पाटील हे संगीतप्रेमी असल्याची गोष्ट सर्वपरिचीत असली तरी त्यांच्या गायकीची कल्पना कोणाला नव्हती. कोल्हापूर येथे पुतण्याच्या लग्नसोहळ्यापूर्वी रंगलेल्या हळदीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी किशोर कुमार यांचे एक गाणे गाऊन याची झलक दिली.

‘बुद्धा मिल गया’ या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले ‘रात कली एक ख्वॉब में आई’ हे गाणे त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये ‘ संगीत संध्या’ कार्यक्रम आयोजित केला होता. मैफील रंगल्यानंतर आप्तेष्टांनी जयंतरावांना एखादे आवडीचे गाणे सादर करण्यास सांगितले.

त्यावेळी अंतरा व कडवे आठवत असलेले किशोर कुमार यांचे गीत त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यांचा हा व्हिडिओ आप्तेष्टांसह समर्थक, कार्यकर्त्यांनी व्हायरल केला. त्याला अनेकांनी दाद दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

… म्हणून सोनू सूद विरोधात तक्रार ; राम कदमांनी केला ‘हा’ गंभीर दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहामजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याचा आरोप सोनू सूद वर मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान भाजप नेते राम कदम यांनी यावरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

कोरोना संकटाच्या काळात सोनू सूद यांनी गरीब मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मदत केली. हे काम महाविकास आघा़डी सरकारनं करायलं हवं होतं. मात्र, ही गोष्ट सरकारला आवडली नाही,त्यामुळे बदल्याच्या भावनेतून कंगना रणौत आणि आता सोनू सूद यांच्याविरोधात कारवाई करण्यात येतीय, असं राम कदम म्हणाले. महाविकास आघाडी सरकार किती जणांचे आवाज दाबणर असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.

नक्की काय आहे प्रकरण –

प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जुहू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबई महापालिकेने जुहू पोलिसांकडे तक्रार करुन सोनू सूद विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’