Saturday, December 20, 2025
Home Blog Page 5052

चंद्रकांत पाटलांना लाजलज्जा आहे का? ‘या’ धनगर समाजाच्या नेत्याने केली सडकून टीका

Chandrakant Patil
Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनगर मतदारांना भुलवण्यासाठी शुद्ध थापा मारण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी ‘एसटी- बी’ प्रवर्ग केल्याचे पाटील सांगत आहेत. पाटील हे पराकोटीचे खोटे बोलत असल्याने त्यांना लाजलज्जा आहे कां, असा प्रश्न पडतो, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील हे मतदारांना संभ्रमित करणारी माहीती देत असल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त विधानाची सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे, ते विधान पाटील यांनी पुण्यात भाजप ओबीसी सेलच्या कार्यक्रमात केले आहे. धनगर आरक्षणाचा संबंध जोडून बोलताना पाटील यांनी काहींसाठी ‘मुर्ख’ हे संबोधन वापरले आहे. या पार्श्वभुमीवर धनगर समाजाला वस्तुस्थिती समजावी म्हणून आम्ही ही भुमिका मांडत आहोत.

पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देतो असे म्हणून 2014 ला भाजप सरकार सत्तेवर आले. प्रत्यक्षात पाच वर्षे समाजाला खेळवण्यापलीकडे त्यांनी काही केले नाही. उलट समाजात बोगस आंदोलने उभी करून समाजाचे नुकसान केले. उच्च न्यायालयात धनगर व धनगड एकच आहेत, असे एफिडेव्हेट दिल्याचे समाजाला खोटे सांगितले. प्रत्यक्षात एफिडेव्हेटमध्ये वेगळाच मजकूर लिहला. ही फसवणूक कमी की काय म्हणून चंद्रकांत पाटील सपशेल खोटी माहिती पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने सांगत आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी ‘एसटी- बी’ प्रवर्गाची व्यवस्था केल्याचे सांगितले. वस्तुत: अशी कोणतीही व्यवस्था फडणवीसांनी केल्याचे महाराष्ट्राल माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यासंबंधाने कधी बोललेले नाहीत. राज्य सरकारच्या बैठकीत कुठे हा विषय आलेला नाही. त्यासंबंधाने एकही शासकीय कागदपत्र उपलब्ध नाही. ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनातरी माहित कां, अशी शंका यावी, असे पाटील यांचे विधान आहे. फडणवीस यांनी ही व्यवस्था केली होती तर धनगरांना आरक्षण कां मिळाले नाही? आणि अशी व्यवस्था केल्याचे फडणविसांनी फक्त चंद्रकांत पाटलांनाच सांगितले कां? याचे स्पष्टीकरण भाजप व फडणवीसांनी आता दिले पाहिजे. भाजपकडून सातत्याने धनगर समाजाची दिशाभुल केली जात आहे. चंद्रकांत पाटील हे तर कहरच करत आहेत. पुर्णपणे खोटी माहिती देवून ते समाजाची चेष्टा करत आहेत. त्याशिवाय ते आचारसंहितेचा भंगही करत आहेत. आम्ही त्यासंबंधी तक्रारही दाखल करणार आहोत, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

भाजप प्रत्येक निवडणुकीत धनगर समाजाला भुलवणारी वक्तव्ये करत आहे. त्यामुळे आता भाजपने धनगर आरक्षणप्रश्नी आपली नेमकी भुमिका स्पष्ट करावी. भाजप नेते मधुकर पिचड यांची भुमिका काय आहे, हेही भाजपने जाहीर करावे, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

भाजपाला सोडचिट्ठी दिलेल्या जयसिंगराव गायकवाडांनी बांधलं हातावर घड्याळ; NCP मध्ये केला प्रवेश

मुंबई । भाजपला सोडचिट्ठी दिलेले मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पटली यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड (Jaisingrao Gaikwad) भाजपमधून बाहेर पडले होते.

मराठवाड्यातील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून जयसिंगराव गायकवाड यांची ओळख आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजपच्या तिकीटावर जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. परंतु भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी मागे घेतलीच, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली होती.

बऱ्याच वर्षांपासून पक्षनेतृत्त्वाकडून माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मला आमदारकी किंवा खासदारकी नको होती. मला केवळ पक्ष मजबूत करण्यासाठी काम करायचे होते. जवळपास गेल्या 10 वर्षांपासून मी नेतृत्त्वाकडे याबाबत मागणी करत होतो. अनेकवेळा वरिष्ठ नेत्यांना ई-मेलद्वारे पत्रव्यवहार केले, फोन केले. मात्र, तरीही पक्षाने आपल्याला संधी दिली नाही. सातत्याने होणाऱ्या या उपेक्षेला कंटाळूनच आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी स्पष्ट केले होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

काँग्रेसमधील तरुण नेतृत्व भाजपकडे आले, तर त्यांना घेऊन सरकार स्थापन करू!- चंद्रकांत पाटील

मुंबई । काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला पक्षात भवितव्य नाही, असं वाटायला लागलं आहे. त्यातून ते भाजपकडे आले तर आम्ही घेणार आणि सरकार स्थापन करणार, आम्ही नकार द्यायला भजन मंडळी नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. मात्र महाराष्ट्रात कुठल्याही पक्षातून आपल्याकडे अद्याप कोणीही आलेलं नसल्याचा खुलासाही चंद्रकांतदादांनी केला.

“काशीस जावे नित्य वदावे” या उक्तीनुसार बोलत राहायचं, काशीला कधी जायला मिळेल, माहिती नाही. तसं सरकार पडणार, भाजप येणार, हे म्हणण्यात काय अडचण आहे, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्या दृष्टीने आम्ही कोणतीही पावलं टाकत नाही. सरकार पाडण्याच्या फंदात आम्ही पडत नाही, ती आमची संस्कृती नाही. मग तुम्ही विचाराल मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये काय घडलं? तर, काँग्रेसमधील तरुण नेतृत्वाला पक्षात भवितव्य नाही असं वाटायला लागलं आहे. त्यातून ते भाजपकडे आले तर आम्ही काय भजन मंडळी नाही, आम्ही काय कोणाला घेत नाही, असं म्हणणार नाही. आम्ही त्यांना घेणार आणि सरकार स्थापन करणार. पण महाराष्ट्रात अजून कोणी आलेलं नाही” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या छापेमारीबाबत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ”तुम्ही काही केलं नसेल, तर चिंतेचं कारण नाही, निश्चिंत राहा, ईडी काय तयार करणार आहे का?” असा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला. (Chandrakant Patil talks On Maha Vikas Aghadi Government)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

‘ईडी’चा छापा हा कुणाच्याही घरावर पडू शकतो अगदी माझ्याही; रावसाहेब दानवेंनी सेनेचे आरोप धुडकावले

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. सदर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. मात्र, भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. उद्या माझ्याही घरावर पडू शकतो. आपण स्वच्छ असल्यास घाबरायचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.

आपण स्वच्छ आल्यास ईडीला घाबरायचे कारण नाही. प्रताप सरनाईक स्वच्छ असतील तर त्यांनी ईडीला घाबरायचे कारण नाही. छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. माझ्याही घरावर छापा पडला तर मी स्वच्छ असेल तर घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. सरनाईक यांच्या घरावर मारण्यात आलेला छापा हे केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यावर दानवे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. (ED raids)

सरकार येणार याचं नियोजन कसं सांगू?
येत्या दोन महिन्यात राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा दानवे यांनी काल केला होता. त्याबाबत त्यांना विचारण्यात आले असता दोन महिन्यात सरकार येईल. पण सरकार कसं येईल याचं नियोजन तुम्हाला कसं सांगू?, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

कोरोनावरील लस कधी येणार?? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तेथील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील रणनीती जाणून घेतली. यावेळी उपस्थित असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविरोधातील रणनीती आणि लसीकरणाबाबतची आपली भूमिका मांडली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनावरील लसीबाबत मोठे विधान केले आहे.

आजच्या बैठकीला उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावरील लसीबाबत हे विधान केले. मोदी म्हणाले की, कोरोनावरील लस कधीपर्यंत येईल हे याची वेळ आम्ही निश्चित करू शकत नाही. तर ही बाब पूर्णपणे शास्त्रज्ञांच्या हातात आहे. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा. हयगय करू नका, असंही त्यांनी सांगितलं. काही लोक याबाबत राजकारण करत आहेत. मात्र अशा लोकांना राजकारण करण्यापासून रोखता येणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि पुढील उपाययोजनांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत – राणेंची टीका

Rane and Sarnaik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. या वादात आता भाजप नेते नारायण राणे यांनी उडी मारली आहे. “प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत,” असं म्हणत नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला.

नारायण राणे म्हणाले, “यावर मी काही सांगणार नाही. कायदेशीर गोष्टींवर आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. न्यायालयानं दिलेले निर्णय, ईडी, सीबीआय यांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत. माध्यमांनी आधी त्यांची माहिती घ्यावी, ईडीचा झापा योग्य अयोग्य हे सांगावं मग आम्ही प्रतिक्रिया देऊ”.

आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही – संजय राऊत

काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. “आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या,” असं जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

‘सरनाईक, वायकर फक्त मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. मनी लॉड्रिंग प्रकरणाच्या दिशेनं ईडीनं ही छापेमारी सुरु केली आहे. सरनाईक यांच्या दोन्ही पुत्रांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आमदार नितेश राणे यांनीहीसंधी साधत सरनाईकांवर झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.(MLA Nitesh Rane and Nilesh Rane make serious allegations against Chief Minister Uddhav Thackeray)

“मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचं भुयारी गटार कलानगरकडे जातं. ईडीचा तपास अजून खोलवर झाला तर बरोबर कलानगरमध्ये पोहोचतील. चुकीचं काही झालं असेल म्हणूनच ईडीने कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक आणि रविंद्र वायकर हा एक मुखवटा झाला. त्याचा मागचा कलाकार जो आहे तो कलानगरमध्ये बसला आहे”, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेवर जोरदार प्रहार केलाय. “ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं विद्यापीठ आहे. बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार ठाणे शहर आणि जिल्ह्यात चालतात. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत”, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

सरनाईक काही साधू संत नाहीत- नारायण राणे
जप खासदार नारायण राणे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, मात्र सरनाईक काय साधू संत नाहीत, असा टोला राणेंना लगावला. “कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचं नसतं. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ” असंम्हणाले.

किरीट सोमय्यांकडून कारवाईचं समर्थन
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा खोटी कमा केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले. मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई नको, असं म्हणणं योग्य नाही, ही चुकीची लोकशाही होणार. म्हणून लोकशाहीत फुल होमवर्कसह कारवाई होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडलं, यात कोणती मर्दानगी ?; दरेकरांचा राऊतांना सवाल

Raut and Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, ही नामर्दांगी आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली होती. राऊतांच्या या विधानाला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. घरी नसताना एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडलं, यात कोणती मर्दानगी? असा थेट सवाल दरेकरांनी संजय राऊत यांना केला आहे.

“प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी”,असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना… सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?”, असा सवाल दरेकरांनी केला आहे

काय म्हणाले होते संजय राऊत

“गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय या यंत्रणा गुलाम, आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तरी आम्ही पर्वा करत नाही. आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करु नका”, असा घणाघात संजय राऊतांनी भाजपवर केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

विराट वाईट नाही, पण रोहित अधिक चांगला कर्णधार; गौतम गंभीरचा शेरा

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर महत्वाची टिप्पणी केली आहे. ”विराट कोहली (Virat Kohli)वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) अधिक चांगला कर्णधार ठरला असता’, असं मत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या गुणवत्तेत खूप मोठा फरक आहे. आयपीएलमधील दोघांच्या कर्णधारपदाच्या कामगिरीचा विचार केला पाहिजे, असंही गंभीरने म्हटलंय. (Team India Captain)

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सच्या खात्यात आयपीएलची ५ जेतेपदं आहेत. तर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप एकदाही जेतेपद मिळवता आलेलं नाही. २०१६ सालच्या आयपीएलमध्ये उपविजेतेपद हीच बंगळुरूच्या संघाची आजवरची सर्वोत्तम कामगिरी राहीली आहे.

”आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर आपण जर भारतीय संघाची निवड करतो. मग संघाचा कर्णधार आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर का निवडला जाऊ नये?”, असा सवाल गंभीरने उपस्थित केला. गंभीरच्या या टिप्पणीसोबत भारतीय क्रिकेट वर्तुळात टीम इंडियाच्या नैतृत्वबदला बाबत गेल्या काही दिवसापासून दबक्या स्वरूपात चर्चा सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, अटक करायची असेल तर करा ; संजय राऊतांचं जाहीर आव्हान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. ईडीच्या कारवाई नंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यानी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल संताप व्यक्त केला आहे. “आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या,” असं जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

“प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई गेली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे अस संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

यापूर्वी छगन भुजबळ यांनीही भाजपवर साधला निशाणा

ईडी हे केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं झाल्याचं दिसतंय.ईडीची कारवाई ही ऑपरेशन लोटस चाच भाग असू शकत .विरोधकांची तोंड दाबण्यासाठीच भाजप कडुन संस्थानचा वापर होतोय अस मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं. तसेच कोणतंही आणि कितीही दडपण आणलं गेलं तरीही एक लक्षात ठेवा, हे महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष आणि त्यापुढेही सुरळीत चालणार अस छगन भुजबळ यांनी म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’