Saturday, December 20, 2025
Home Blog Page 5053

फडणवीसांचे संजय राऊतांना ‘वचन’; ‘त्या’ १०० लोकांची यादी द्या! त्यांच्यावर कारवाई होईल!

sanjay raut and devendra fadanvis

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी दिलं. त्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाष्य केलं. ‘राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्याली. त्यांच्यावर कारवाई होईल हा माझा शब्द आहे,’ असं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadanvis over ED Raids residence of Shivsena MLA pratap Sarnaik)

काही चुकीचं केलं नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही पुरावे असतील म्हणून ईडीनं कारवाई केली असेल. काही ठोस पुरावे हाती असल्याशिवाय ईडी कारवाई करत नाही, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले. दरम्यान, सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीने छापे टाकल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यानंतर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही- संजय राऊत
कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका संजय राऊत केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अचानक का वाढल्या, याचा कोरोना लसीशी कसा संबंध आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढू लागले आहेत. मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 6 पैसे आणि डिझेलमध्ये 16 पैसे प्रतिलिटर वाढ करण्याची घोषणा केली. यानंतर आता दिल्लीत पेट्रोलची किंमत 81.59 रुपये प्रतिलिटर झाली आहे आणि डिझेलची किंमत 71.41 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे. पेट्रोल-डिझेलच्या या अनियमित किंमती का वाढू लागल्या आहेत, असा प्रश्न पडतो. तज्ञ म्हणतात की, लवकरच येण्याच्या आशेने कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर कोरोनाची लस पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला बाजारात आली तर आर्थिक रिकव्हरी वेगवान होईल. त्यामुळे कच्च्या तेलाची मागणी वाढेल. म्हणूनच कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूडचे दर 9 महिन्यांच्या सर्वोच्च काळांपर्यंत पोहोचले आहेत.

मंगळवारी ब्रेंट क्रूड फ्यूचर्स 3 सेंट किंवा 0.1% वाढून 46 डॉलर दराने प्रति बॅरल झाला, तर यू.एस. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड 11 सेंट अर्थात 0.3% वाढून 43.17 डॉलर प्रति बॅरल झाला. मागील आठवड्यात दोन्ही बेंचमार्कमध्ये सुमारे 5% वाढ झाली होती. सोमवारी त्यामध्ये सुमारे 2% वाढ झाली आहे.

स्थानिक वायदा बाजाराचे कच्चे तेल एमसीएक्स 36 किंवा 1.13 टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल 3231 रुपयांवर होता. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाने सोमवारी सांगितले की, कंपनीची कोविड लस 90% पर्यंत प्रभावी असल्याचे आढळले आहे. ही लस साथीचा रोग रोखण्यासाठी एक उत्तम शस्त्र असल्याचे सिद्ध होऊ शकते. हे स्वस्त देखील आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर कसे असतात: पेट्रोलच्या किंमतीतील वाटा काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तरपणे सांगत आहोतः आपण ज्या किंमतीला पेट्रोल पंपवरून पेट्रोल खरेदी करतो. त्याची सुमारे 48 टक्के बेस प्राईस आहे. यानंतर बेस प्राईस वर एक्साईज ड्युटी, सेल्स टॅक्स आणि कस्टम ड्युटी आकारली जाते. इंधनाची बेस प्राईस किती आहे? तेलाच्या बेस प्राईसमध्ये क्रूड तेलाची किंमत, प्रोसेसिंग चार्ज आणि कच्चे तेल रीफाइन करणाऱ्या रिफायनरीजचा चार्ज समाविष्ट आहे.

पेट्रोलचे दर कसे ठरवले जातात? GST मध्ये आतापर्यंत इंधनाचा समावेश झालेला नाही. यामुळे यावर एक्साईज ड्युटी आणि व्हॅटदेखील लागू आहे. केंद्र सरकार पेट्रोल विक्रीवर उत्पादन शुल्क आकारते, तर राज्य सरकार व्हॅट आकारते. पेट्रोल आणि डिझेलची किंमत ही ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम) पेट्रोल पंपला दिलेल्या दरानंतर टॅक्स आणि त्यांचे कमिशन जोडल्यानंतर होणारी रक्कम आहे. तुम्हाला किती टॅक्स द्यावा लागतो ? जर आपण आता सरासरी प्रमाणावर बोललो तर सरकार डिझेलवर 66 टक्के आणि पेट्रोलवर 100 टक्क्यांहून अधिक आकारणी करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘ईडी’ एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय!- संजय राऊत

sanjay raut

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut Attacked on Bjp over ED Raids residence of Shivsena MLA pratap Sarnaik)

”कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे,” असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्या मंत्री, आमदारांच्या घराबाहेर ईडीनं कार्यालयं थाटली, तरीही आम्ही घाबरत नाही. ईडी एखाद्या राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय, अशी टीका राऊत यांनी केली.

ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देतो. ईडीनं त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी, असं थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं

काँग्रेसचा सवाल
काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल करत ईडीने टाकलेला छाप्यापाठीमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. “विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?”, असे सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

कोरोना लसीकरणासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची स्थापना केल्याची माहिती दिली आहे.

‘कोरोना लसीबाबत सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाल यांच्याशी सातत्यानं बोलणं सुरु आहे. महाराष्ट्रात लसीकरण कशाप्रकारे करावं, लसीचं वितरण यासंदर्भात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या राजदूतांसह सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. 100 देशांच्या राजदूतांच्या दौऱ्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 100 देशांचे राजदूत 27 नोव्हेंबरला पुण्यात दाखल होतील. त्याबाबत प्रशासनाला दौरा प्राप्त झाला आहे. तर 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा भाग- छगन भुजबळ

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रकरणी भुजबळांनी भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा (BJP Operation Lotus)भाग असू शकते, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.

“गेल्या काळात मी भाजपविरोधात बोललो तर माझ्या अंगावर केस टाकली. विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवारसाहेबांना ईडीने नोटीस दिली. लोकांना आता माहिती झालंय की भाजपविरोधात कुणी बोललं तर त्यांना त्रास देण्यासाठी संस्थांचा वापर होतो. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी भाजपकडून संस्थांचा वापर होतोय”, असा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.

“अर्णव गोस्वामी प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण तसंच कंगनाच्या प्रकरणात सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपविरोधात जो आक्रमकपणे बोलतो त्याला विविध मार्गाने त्रास दिला जातो. सरनाईकांवरील कारवाईचा मला अंदाज होता. जसं वाटलं तसंच घडलं”, असं भुजबळ म्हणाले. “भुजबळ भाजविरोधात जास्त बोलले की छापेमारी आणि केसेस, पवारसाहेबांनी निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली तर नोटीस, अशी दडपशाही भाजपने केली. भाजपला जरी ही दडपशाही वाटत नसली तरी लोकशाहीच्या दृष्टीने ही दडपशाहीच आहे. भाजपच्या एकाही नेत्याला का बरं ईडीची नोटीस गेली नाही?”, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.

“ईडी, सीबीआय हे भाजपचे बाहुले आहेत. भाजपने संस्थांना हाताशी धरुन सत्तांतराचा कितीही प्रयत्न करु देत महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष पूर्ण करणारच आणि फक्त 5 वर्षाचा कार्यकाळ नाही तर पुढील निवडणुकीत देखील महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Chhagan Bhujbal Attacked on Bjp over ED Raids residence of Shivsena MLA pratap Sarnaik)

काँग्रेसचा हल्लाबोल
काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल करत ईडीने टाकलेला छाप्यापाठीमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. “विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?”, असे सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

 भाजपचा पलटवार
“प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्याची माहिती ईडीचे प्रवक्ते देतील.. काँग्रेसच्या काळात सीबीआय पोपट होता. कायद्याला धाब्यावर बसवून काँग्रेसने काम केलं. भाजपच्या काळात यंत्रणेला स्वातंत्र्य आहे. नियमाप्रमाणे संस्था काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेसला ही धास्ती वाटणं साहजिक आहे”, असं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला दिलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

आपल्या नवऱ्याचा पगार किती आहे याची माहिती पत्नी घेऊ शकते, कायद्याने दिला आहे ‘हा’ अधिकार*

नवी दिल्ली । विवाहित असल्याने प्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्याच्या पगाराबद्दल माहिती जाणून घेण्याचा हक्क असतो. खासकरुन पोटगी मिळावी या उद्देशाने ती अशी माहिती घेऊ शकते. जर पत्नीची इच्छा असेल तर ती माहितीच्या अधिकारातूनही याबाबद्दलची माहिती मिळवू शकते. मध्य प्रदेश उच्च न्यायालय 2018 च्या आदेशानुसार पत्नी म्हणून विवाहित महिलेला आपल्या नवऱ्याचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे.

फायनान्शिअल प्लॅनरची देखील घेऊ शकता मदत – एक विवाहित स्त्री असल्याने, स्वतःला आणि आपल्या मुलांसाठी खाणे, कपडे घालणे, जगणे आणि इतर मूलभूत गोष्टींचा महिलेस कायदेशीर हक्क आहे. अशा परिस्थितीत पत्नीला यासाठी आपल्या नवऱ्याकडे भीक मागण्याची गरज नाही कारण तिला कायद्याने हा अधिकार दिला आहे. याबद्दल पत्नी आपल्या पतीशी बोलू शकते. ती स्पष्ट करु शकते की, जर काही अप्रिय घडले तर ही माहिती आवश्यक आहे. जर नवरा हे करण्यास तयार नसेल तर तो मध्यस्थ किंवा फायनान्शिअल प्लॅनरची देखील मदत घेऊ शकतो. ते त्यांना पती-पत्नीमध्ये आर्थिक समस्या जाणून घेण्याचे महत्त्व सांगू शकतात.

आरटीआयद्वारेही तुम्हाला मिळू शकते माहिती – गुरुवारी केंद्रीय माहिती आयोगाने एका खटल्याची सुनावणी करताना हे सांगितले. या खटल्याची सुनावणी सुरू असताना माहिती आयोगाने माहिती न देण्याचा आदेश नाकारला. यासह जोधपूरच्या प्राप्तिकर विभागला महिलेला नवऱ्याच्या पगाराबद्दल 15 दिवसांत तपशील देण्यास सांगितले. कमिशनने सांगितले की, पत्नीला नवऱ्याच्या एकूण उत्पन्नाविषयी आणि करपात्र उत्पन्नाविषयी जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. यासह माहिती आयोगानेही अशी माहिती थर्ड पार्टीला दिली जाऊ शकत नाही आणि ती माहितीच्या अधिकारात येत नाही, असा युक्तिवादही नाकारला.

जोधपूर येथील महिला रहमत बानो यांच्या अपिलावर सुनावणी करताना माहिती आयोगाने हा आदेश दिला. यापूर्वी, माहिती आयोगाने असे म्हटले आहे की, सरकारी कर्मचार्‍यांच्या पत्नींना आपल्या नवऱ्याला किती पगार मिळतो हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. इतकेच नाही तर पतीला किती पगार मिळतो याची देखील तिला माहिती असायला हवी आणि नुसार ही माहिती सार्वजनिक केली जाऊ शकते.

वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीचाही हक्क असतो – कोर्टाने मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये बरोबरीचा अधिकार देखील दिला आहे. सुधारित हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत मुलींनाही मुलांसारखाच वाटा मिळेल, असे कोर्टाने स्पष्ट केले. कोर्टाचे म्हणणे आहे की, मुलगी विवाहित आहे की नाही त्याने काही फरक पडत नाही. ती मालमत्तेत समान वाटा घेऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकार नाकर्तेपणा दाखवत आहे, आम्ही विरोधी पक्षात काम करत आहोत. मात्र, तीन पक्षांची अनैसर्गिक आघाडी असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी हे सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आगामी काळात मनसेला सोबत घेणार नसल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरभाष्य केले. चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया फडनवीसांनी दिली. तसेच राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं खुलं आव्हानही दिलं आहे. शिवेसना खासदार संजय राऊत टीका करण्याशिवाय दुसरं काय करणार, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षकमतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अवकाळी पाऊसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मदत, निसर्ग चक्रीवादळ, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीची कारवाई, निसर्ग चक्रीवादळ आणि वाढीव वीजबिलांवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

शेअर बाजाराचा विक्रम सुरूच आहेः निफ्टीने पहिल्यांदाच ओलांडला 13000 चा आकडा, आपल्याही आहे पैसे मिळवण्याची चांगली संधी

नवी दिल्ली । कोरोना लसविषयी सातत्याने चांगली बातमी आल्यामुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये खरेदीचे वातावरण आहे. याचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून येत आहे. एनएसईचा 50 समभागांचा निर्देशांक असलेल्या निफ्टीने पहिल्यांदाच 13000 ची पातळी ओलांडली. त्याचबरोबर बीएसईचा -30 समभाग असलेला सेन्सेक्स निर्देशांक 350 अंकांनी वाढून नवीन विक्रम पातळीवर 44,419 वर पोहोचला. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी वाढ दिसून येत आहे. या कारणास्तव जगभरातील गुंतवणूकदार भारतीय बाजारात गुंतवणूक करीत आहेत. येत्या काही दिवसांत शेअर बाजार नव्या उंचीवर जाऊ शकेल.

सुरुवातीच्या व्यवसायादरम्यान गुंतवणूकदारांनी 1.13 लाख कोटी रुपये कमावले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्याच वेळी, कोरोना विषाणूंवर अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस प्रभावी आहे या वृत्तामुळे सोन्या-चांदीमध्ये तीव्र घट झाली आहे. कॉमेक्स वर सोने 4 महिन्यांच्या आपल्या नीचांकावर पोहोचले आहे. देशांतर्गत बाजारात त्याचे दर 50 हजाराच्या खाली आले आहेत. चांदीची सुमारे 2.5 टक्के घट झाली आहे.

गुंतवणूकदारांनी आता काय करावे ?
जगातील सर्वात मोठे ब्रोकरेज हाऊस सीएलएसएने L&T च्या समभागांची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉकवर 1400 रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते म्हणतात की, मोठ्या इन्फ्रा प्रोजेक्टवर त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. या व्यतिरिक्त तिसर्‍या तिमाहीत कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. दुसर्‍या सहामाहीत पाइपलाइनमध्ये 6 लाख कोटींचे ऑर्डर प्राप्त झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘शुरुवात तुमने की है, ख़त्म हम करेंगे!’ ईडीच्या ‘त्या’ कारवाईवर संजय राऊतांचे भाजपला चॅलेंज

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या ठाणे आणि मुंबईतील निवासस्थानी आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाचने (ED) केलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. त्यानंतर या कारवाईविरोधात शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. कितीही प्रयत्न केला तरी हे महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. तुम्ही सुरुवात केली असेत तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.

प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे (BJP) महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला. (Shivsena MP Sanjay Raut on ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचे ( ED ) अधिकारी पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्या कार्यालयांमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. सध्या प्रताप सरनाईक आणि त्यांचे दोन्ही पुत्र परदेशात आहेत. त्यांनीदेखील या माहितीला दुजोरीला दिला आहे. पण ईडी कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोहोचली आहे, याचा तपशील आपल्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’