Saturday, December 20, 2025
Home Blog Page 5054

Gold Price Today: लग्नसराईत सोने झाले स्वस्त, चांदीचे दरही आले खाली

नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या भावात आज भारतीय बाजारात मोठी घसरण झाली आहे. लॉकडाऊनमुळे जगातील बर्‍याच भागांत सोन्या-चांदीच्या किंमती वाढताना दिसून आल्या. पण कोरोना लसच्या बातमीनंतर बाजारात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याचांदीच्या किंमतींवर झाला. गेल्या 2 दिवसांत सोन्याचे दर 1200 रुपयांनी घसरले, तर चांदीचे दर कमी झाले. MCX वरील सोन्याचा वायदा आज 0.9 टक्क्यांनी घसरला, तर चांदी 550 रुपये म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून तो 59,980 रुपये प्रतिकिलोवर आली.

स्पॉट सोन्याचे भाव 0.6 टक्क्यांनी घसरून 1826.47 डॉलर प्रति औंस झाले. जुलैनंतर सोन्याची ही नीचांकी पातळी आहे. त्याचप्रमाणे चांदी 1.1 टक्क्यांनी घसरली आणि प्लॅटिनममध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ झाली.

कोरोना लसीशी संबंधित खुशखबरीनंतर जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. परवडणारी कोरोना लस बनवण्याच्या प्रगतीमुळे जागतिक आर्थिक रिकव्हरीची आशा निर्माण झाली असल्याने आशियाई शेअर बाजार आज बहुतेक उच्च पातळीवर आहेत. अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी सोमवारी कोविड -१९ या लसीविषयी सांगितले की, ते ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या भागीदारीने विकसित करीत आहे, जी आतापर्यन्त 90% प्रभावी ठरली आहे. ही लस इतर कंपन्यांपेक्षा खूपच स्वस्त आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात (Gold international price) सोन्या-चांदीच्या किंमतींवर बराच दबाव आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या डिलीव्हरीसाठी सोन्याचे भाव सुमारे 7 डॉलर ने कमी होऊन 1898 डॉलरच्या पातळीवर होते. त्याचप्रमाणे चांदीत डिसेंबरच्या तुलनेत 24.35 डॉलरची घसरण झाली (Silver international price) .

सणासुदीच्या हंगामात मागणी वाढेल
सणासुदीच्या हंगामात मागणी वाढेल जागतिक स्तराच्या अनुषंगाने सोन्याच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अमेरिकन डॉलरची वाढ आणि बाजारातील सामान्य जोखीम समज यांच्या आधारे सोन्याच्या किंमतीत घट होण्याची विश्लेषकांची अपेक्षा आहे. सणासुदीच्या हंगामात भारतात सोन्याची मागणी वाढेल, अशी अपेक्षा विश्लेषकांनी व्यक्त केली. चलनवाढ आणि चलन घसरणाऱ्या विरोधात हेज म्हणून व्यापकपणे पाहिले गेल्याने सोन्याला व्यापक प्रेरणा असलेल्या उपायांवर परिणाम होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

’30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद आहे म्हणता, तर एवढं होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का?’- ओवैसी

हैद्राबाद । एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. जर तुम्ही 30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढं सर्व होईपर्यंत काय करत होते?, झोपा काढत होते का? असा खणखणीत सवाल ओवैसींनी केला आहे. सोमवारी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

“मतदार यादीमध्ये 30 हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यावेळी काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? 30 ते 40 हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचं काम त्यांचं नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी” असं आव्हान ओवैसी यांनी दिलं आहे.असदुद्दीन ओवैसी यांनी “द्वेष निर्माण करणं हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. हा वाद हैदराबाद आणि भाग्यनगरमध्ये आहे. आता कोण जिंकणार हे तुम्हीच ठरवणार आहात” असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी लव जिहाद प्रकरणावरून असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. ओवैसी यांनी लव जिहादवरून भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. “विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम 14 आणि 21 चं उल्लंघन होणार आहे. त्यांनी संविधानाचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार करणं आता काम करणार नाही. बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करत आहे” असं ओवैसी यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

पेट्रोल डिझेलमुळे सर्वसामान्यांवरचा वाढत आहे ताण, सलग 5 दिवस महागले

नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ सुरू केली आहे. आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेल महाग झाले आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलमध्ये 6 पैसे आणि डिझेलमध्ये 16 पैसे प्रतिलिटर वाढ झाली. यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 81.59 रुपये आणि डिझेलची किंमत 71.41 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली. या आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजाराने चांगले संकेत दिले, मात्र नंतर त्यात चढ-उतार दिसून आले. व्यापार संपल्यानंतर सेन्सेक्स 194.90 अंकांनी वाढून 44,077.15 वर बंद झाला. चला तर मग इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किती वाढ झाली हे जाणून घेऊयात .

दररोज 6 वाजता किंमत बदलते

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या. 

> दिल्ली पेट्रोल 81.59 रुपये आणि डिझेल 71.41 रुपये प्रतिलिटर आहे.

> मुंबई पेट्रोलची किंमत 88.29 रुपये आणि डिझेल 77.90 रुपये प्रतिलिटर आहे.

> कोलकाता पेट्रोल 83.15 रुपये तर डिझेल 74.98 रुपये प्रतिलिटर आहे.

> चेन्नई पेट्रोल 84.64 रुपये आणि डिझेल 76.88 रुपये प्रतिलिटर आहे.

> नोएडा पेट्रोल 82.04 रुपये तर डिझेल 71.86 रुपये प्रतिलिटर आहे.

> लखनऊ पेट्रोल 81.96आणि डिझेल 71.80 रुपये प्रतिलिटर आहे.

> पटना पेट्रोल 84.20 आणि डिझेल 76.94 रुपये प्रतिलिटर आहे.

> चंडीगड पेट्रोल 78.56 रुपये आणि डिझेल 71.16 रुपये प्रतिलिटर आहे.

यापूर्वी 1 सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या किंमती वाढविण्यात आल्या. 10 सप्टेंबरपर्यंत ते कायम राहिले आणि त्यानंतर पेट्रोलचे दर रखडले. मागील महिन्यापर्यंत जे 1 रुपया 19 पैसे होते. त्याचवेळी 25 जुलैला दिल्लीत डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 31 जुलै रोजी दिल्ली सरकारने त्यावर व्हॅट कमी केला, त्यानंतर ते प्रति लिटर 8.38 रुपयांनी स्वस्त झाले. 3 ऑगस्टपासून थांबल्यानंतर, नंतर त्याची किंमत एकतर कमी केली गेली किंवा त्याची किंमत स्थिर राहिली. यामुळे डिझेल 3.10 प्रति लिटर अधिक स्वस्त झाले.

अशा प्रकारे, आपण नवीनतम दर जाणून घेऊ शकता

तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर कसे माहित होतील (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईल ग्राहक RSP असे लिहून 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘आपला तो बाब्या अन दुसऱ्याचं ते कार्ट, करोडोची संपत्ती तरी, भाजपवाल्यांची चौकशी का नाही?’ ईडीच्या छापेमारीवर काँग्रेस आक्रमक

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक  आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गेल्या 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का?, असा सवाल करत ईडीने टाकलेला छाप्यापाठीमागे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. (Congress Sachin Sawant on ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

“विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप असे घाणेरडे डाव खेळतंय. लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?”, असे सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

”भाजप हीन पातळीचं राजकारण करणारा पक्ष आहे. लोकांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. ज्यांना निवडून दिलंय ते लोकशाहीवर घाला घालत आहेत. द्वेष बुद्धीने छापे टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. गेल्या 6 वर्षात एकाही भाजप नेत्यावर ईडीने छापा का टाकला नाही? त्यांना का नोटीस नाही?”, असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले.

“सुशांतप्रकरणात ईडी कशी आली? त्याचा पैसा चोरीचा, मनी लाँड्रिंगचा होता का? भाजपचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजप जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबई बँक घोटाळा, विजय गावित यांच्यावर घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आणि नंतर त्यांनाच गंगाजल टाकून पवित्र करुन भाजपमध्ये प्रवेश दिले”, अशी टीका सावंत यांनी केली.“भाजपचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे आहेत. त्यांचा डोळा सत्तेकडे लागला आहे. या सगळ्या धाडी आणि छापेमारी सगळं चाललं आहे ते सत्तेसाठी आहे. देशात सर्वत्र अशा धाडी टाकल्या, तोच पॅटर्न महाराष्ट्रात वापरत आहे”, असं सचिन सावंत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीची छापेमारी; सेनेचे इतरही नेत्यांवर नजर

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) आणि पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळी जवळपास ८ च्या सुमारास ईडीची तीन पथकं तपासासाठी पोहोचली. त्यांनी आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे दोन पुत्र आणि त्यांच्या कार्यालयात तपास सुरू केला. सरनाईक पिता पुत्र देशाबाहेर असल्याचं समजतं. सरनाईक यांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना ईडीनं बोलावलं आहे. शिवसेनेच्या इतर काही नेत्यांनादेखील ईडीकडून नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचं समजतं.

प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

या प्रकरणी अद्याप शिवसेनेकडून कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिवसेना नेते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतं. मात्र ही कारवाई राजकीय स्वरूपची असून ती सूडबुद्धीनं सुरू असल्याचा सूर पक्षात आहे. अर्णब गोस्वामी, कंगना राणौत प्रकरणात सरनाईक यांनी अतिशय आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची चर्चा शिवसेनेत आहे. (ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील ; दानवेंच्या ‘त्या’ विधानाला राऊतांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut and Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. रावसाहेब दानवे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीचं सरकार देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार असून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील असा टोलाही त्यांनी लगावला.

राऊत म्हणाले की, “हे सरकार चार वर्ष पूर्ण करेल. एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि चार वर्ष पूर्ण करेल. निराश झाल्यानेच तसंच सर्व प्रयत्न फसल्याने विरोधी पक्षातील नेते असं वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्रातील जनता या सरकारसोबत आहे. संपूर्ण देशातील मजबूत सरकार महाराष्ट्रात आहे”. तीन दिवसांचं सरकार जे केलं होतं त्याची आज पुण्यतिथी आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

“तीन दिवसाच्या सरकारचा एक प्रयोग झाला होता त्याची आज पुण्यतिथी आहे. आता हे तीन महिन्यात करणार असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहण्यातच यांची चार वर्ष निघून जातील,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “उद्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य काम करत आहे. तीन पक्षांचं सरकार असूनही भक्कम आहे. देशातील सर्वात स्थिर आणि मजबूत सरकार महाविकास आघाडीचं आहे,” असं ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

नांदेडमध्ये लोकशाहीची ऐशी-तैशी; उपसरपंचपदाचा लिलाव करत साडे १० लाखात विक्री

नांदेड । नांदेडमध्ये सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकशाही व्यवस्थेची ऐशी-तैशी करणारा प्रकार या व्हिडिओमध्ये घडताना दिसत आहे. नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वी सरपंच आणि उपसरपंचपदाचा जाहीर लिलाव करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुदखेड तालुक्यातील महाटी गावातील हा व्हिडीओ असून यात गावातील उपसरपंचपदासाठी चक्क बोली लावण्यात आली आहे.

महाटी या गावातील सरपंचपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे उपसरपंचपद आपल्या ताब्यात राहावे यासाठी काही धन दांडग्यानी ही बोली लावली आहे. त्यात उपसरपंचपदाची साडे १० लाखाला विक्री झाली आहे. गावात वीट भट्ट्या आणि रेतीचा व्यवसाय तेजीत असून त्यात रग्गड कमाई होते. त्यासाठी हा लिलाव करण्यात आला आहे. (Nanded Gram Panchayat Election auction for Up Sarpanch Post)

गावचे पुढारी निवडण्यासाठी लोकशाहीत मतदानाचा अधिकार गावकऱ्यांना असतो. मात्र गावातील इरसाल पुढारी लोकशाहीचे लोणचे बनवून तिला तोंडी लावताना दिसत आहेत. त्यातून गावातील पुढारी पदाचा थेट लिलाव केला जातं आहे. या लिलावातून आलेल्या पैशातून गावातील शाळा डिजीटल करणार असल्याचे गोंडस कारण स्थानिक सांगत आहेत. पण अशा लिलावाच्या पैशातून बनलेल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी काय आदर्श घेतील याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे अशाप्रकारे लिलाव करणाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

महाटी गावाचे मोल
गोदावरी नदीच्या समृद्ध काठावर महाटी गाव वसलेले आहे. नांदेडपासून जवळच असलेल्या या गावाचा एकेकाळी मुख्य व्यवसाय हा शेती होता. मात्र आता या गावात गोदावरी नदीची मुबलक माती उपलब्ध असल्याने असंख्य वीटभट्ट्या तयार झाल्या आहेत. तसेच गोदावरी नदीपात्रातून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या दोन्ही व्यवसायातून कोट्यावधींची उलाढाल होत असल्याने गावात पैशाचे झरे वाहत आहेत. त्यातूनच गावातील पुढारीपणाचा थेट लिलाव करण्याचे धाडस या गावात झालं आहे. (Nanded Gram Panchayat Election auction for Up Sarpanch Post)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर ; मनसेची जळजळीत टीका

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुपारीबाज पक्ष असल्याची जहरी टीका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली होती. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची जळजळीत टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना झाल्याचा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे.

शिवसेनेनं हिंदुंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता आणणार असं सांगितलं होतं. पण आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत बसले आहेत, अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचा जीव महापालिका रुपी पोपटामध्ये अडकला आहे. आज ‘कृष्णकुंज’चं महत्व वाढल्यामुळेच शिवसेनेच्या पोटात दुखत आहे”, अशी खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे.

नक्की काय म्हणाले होते अनिल परब ?

“सुपारी घेतल्याशिवाय मनसे कोणतंही काम करू शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे, अशा शब्दात अनिल परब यांनी मनसेवर टीका केली आहे. ज्या भाजप नेत्यांना लोकसभा नुवडणुकीत ‘लाव रे तो व्हडिओ’ दाखवून उघडं नागडं केलं. त्यांच्यासोबतच उघडे झोपले की काय परिस्थिती होते ते पुढे दिसेल”, असा हल्लाबोल अनिल परब यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

अमित शाहांनी आदिवासींच्या घरी खाल्लेलं जेवण फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवलेलं ; ममता बॅनर्जींचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यातील वाद काही नवा नाही. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजन केले. मात्र यावरून आता ममता बॅनर्जी यांनी हल्लाबोल केला आहे. आदिवासी कुटुंबासोबत शहा यांनी केलेलं भोजन म्हणजे फक्त दिखावा असल्याचा आरोप ममता यांनी केला.

अमित शहा यांच्यासाठी तयार करण्यात आलेलं जेवण हे फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवण्यात आलं होतं” असा दावा त्यांनी केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ममता यांनी हे पदार्थ ब्राह्मण आचाऱ्याकडून बनवून घेण्यात आल्याचाही दावा केला.तसेच शहा यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याऐवजी दुसऱ्याच पुतळ्याला हार घातला. नंतर हा पुतळा एका शिकाऱ्याचे असल्याचे समोर आलं होतं अशी आठवण देखील ममतांनी स्थानिकांना करुन दिली आहे.

अमित शाह हे ५ नोव्हेंबर रोजी बांकुडामध्ये पोहचले तेव्हा त्यांनी आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण केलं. जमीनवर पंगतीमध्ये बसून जेवतानाचा अमित शाह यांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर पाहायला मिळाले. चतुर्दिही गावामध्ये राहणाऱ्चया विभीषण हंसदा यांच्या घरी शाह यांनी केळीच्या पानावर शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला. जे फोटो समोर आले त्यामध्ये अमित शाह यांनी वरण, भात, पोळी आणि भाज्यांचा आस्वाद घेतल्याचे पहायला मिळाले. यावेळी अमित शाह यांच्यासोबत त्यावेळी पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय तसेच प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषही होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

दररोज सुकामेवा हे मिक्स स्वरूपात कश्या पद्धतीने खावे

dry fruits

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या दररोज च्या आहारात काही प्रमाणात सुका मेवा खाल्ला जावा. कारण सुकामेवा खाण्याने आपल्या आरोग्यास जबरदस्त फायदे होतात. अनेक आजारानावर मात करण्यासाठी सुकामेवा हा काही प्रमाणात का होईना खाल्ला पाहिजे. सुकामेवा यापासून प्रोटिन्स मिळतात. तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुका मेवा जास्त फायदेशीर आहे. जाणून घेऊया कश्या पद्धतीने मिक्स करून खाणे आरोग्यास फायदेमंद आहे.

पिस्ता आणि खजूर एकत्र —-

— आपल्या सकाळच्या वेळेत मध्ये ३ ते ४ पिस्ते आणि खजूर टाकून आपण याचे सेवन करू शकता.
— आपण हेदुधात मिसळून खाऊ शकता.
— आपण हे कच्च्या रूपात देखील खाऊ शकता आणि सॅलडच्या रूपात देखील घेऊ शकता.

अंजीर आणि जर्दाळू —

पोट आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. हे आपल्या त्वचेला पेशींच्या नुकसानापासून वाचवत आणि सुरकुत्यांना कमी करतं. ताजे जर्दाळू कमी कॅलरीच्या स्नेक्सचे आरोग्यदायी विकल्प आहेत आणि व्हिटॅमिन बी ६ ने समृद्ध असतात. हे चयापचय वाढविण्यास आणि रक्त पेशी वाढवायला मदत करते तसेच हाडांना आणि हिरड्याना मजबूत ठेवण्यासाठी अंजीर आणि जर्दाळू याचे मिक्स करून खाल्ले जावे. आपण अंजीर आणि जर्दाळू एकत्ररित्या ओट्स मध्ये मिसळून खाऊ शकता.

बदाम आणि बेदाणे —

बदाम हे बुद्धीच्या वाढीसाठी जास्त महत्वपूर्ण भूमिका बजावते. बेदाणे बद्धकोष्ठता दूर करते आणि हे दोन्ही आपल्या पचनसंस्थेला व्यवस्थित राखण्यासाठी फायदेशीर असतं. ज्या लोकांना बीपी चा जास्त प्रमाणात त्रास आहे . त्या लोकांनी बदाम हे खाल्ले जावे. बदाम पासून शरीराला जास्त प्रमाणात कॅलरीज मिळतात. सकाळी सकाळी लहान मुलांना काही बदाम देणे फायदेमंद राहते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’