Saturday, December 20, 2025
Home Blog Page 5057

‘महाराष्ट्र केसरी’चा थरार जानेवारी किंवा फेब्रुवारीत? शरद पवार करतायत पाठपुरावा

कोल्हापूर । सध्या कोरोना महामारिमुळे सर्व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बंद असताना कुस्तीपटूंसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. कुस्ती क्षेत्रातील मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि प्रायोजक देखील सकारात्मक आहेत. स्पर्धा आयोजनाबाबत शासनाची परवानगी मिळावी, यासाठी परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे. जानेवारी अथवा फेब्रुवारी २०२१ ला स्पर्धा होतील असे संकेत आहेत.

कोरोनामुळं बंद असलेल्या सर्व राज्यस्तरीय स्पर्धा पूर्ववत सुरू करण्यासाठी महासंघ आणि परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्फत राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. शासनाने अनुकुलता दर्शवली तर त्यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्पर्धा घेण्यासाठी परिषद तयार आहे. ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा. यासाठी परिषदने भारतीय कुस्ती महासंघाचे माध्यमातून केंद्र शासनाकडे मागणी केली आहे. यासाठी महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषणसिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे पत्रकात सांगितले आहे.

ऑनलाईन स्पर्धा प्रवेशिका
परिषदेची अधिकृत वेबसाईट कार्यन्वित झाली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व स्पर्धेच्या प्रवेशिका ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक शहर जिल्हा तालिम संघाने सुचवलेले एक वेबसाईट मॅनेजर दोन सोशल मीडिया प्रतिनिधीची नियुक्ती परिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध मैदानासाठी परिषदे मार्फत मोफत अधिकृत पंच
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुस्ती मैदानांसाठी अधिकृत पंच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे मार्फत मोफत देण्यात येतील जेणेकरून पैलवानांना होणारी दुखापत रोखता येईल व भविष्यातील हानी टळेत. तसेच फेसबूक व यूट्यूब पेज वरून हे मैदान मोफत लाईव्ह दाखविण्यात येईल. तसेच परिषदेच्या कायदेशीर बाबीसाठी कुस्ती क्षेत्रातील वकिलांचे कायदेशीर सल्लागार समितीचे पॅनेल गठीत करण्याचा ठराव देखील सर्वानुमते घेण्यात आला. मुलांच्या राज्यस्तरीय अजिक्यपद स्पर्धेप्रमाणे वरिष्ट गट महिला 15,17,20,23 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा देखील प्रायोजकाच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय यावेळी झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

बनावट GST विरोधात सरकारचा पुढाकार, आता रजिस्ट्रेशनच्या वेळी आवश्यक असेल हे डॉक्युमेंट

नवी दिल्ली । GST बाबत आज (GST Fraud) अनेक प्रकारचे घोटाळे समोर येत आहेत, त्यांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर नियम लागू करण्याची योजना तयार केली आहे.

बनावट कंपन्यांद्वारे इनपुट क्रेडिट टॅक्सचा दावा रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य कर अधिका-यांनी तात्काळ फोटो आणि बायोमेट्रिक्सचा वापर करून ऑनलाइन नोंदणी सुचविली आहे. जीएसटी कौन्सिलच्या कायदा समितीने दोन दिवस चाललेल्या बैठकी नंतर काही कडक नियम सुचवले आहेत.

या नवीन जीएसटी नोंदणी प्रक्रियेमध्ये आधार आणि आधार सारखी कागदपत्रे आवश्यक असतील. या व्यतिरिक्त जुन्या जीएसटीधारकांकडून जोखीमदार करदात्यांना कडक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये फसवणूक करणार्‍यांविरोधात वॉरंट काढण्यासाठी कायदा बनवण्याची सूचनाही देण्यात आली.

गेल्या दहा दिवसांत जीएसटी इंटेलिजेंसचे महासंचालक देशभरात जीएसटीचा भंग करणार्‍यांविरूद्ध मोहीम राबवित आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत 48 लोकांना अटकही करण्यात आली आहे, ज्यात एक महिला आणि तीन सनदी लेखापाल यांचा समावेश आहे. या फसवणूकीच्या 2385 कंपन्यांविरूद्ध आतापर्यंत 648 गुन्हे दाखल झाले आहेत.

वित्त मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, कायदा समितीने असे सुचवले आहे की, वस्तू व सेवा कर (GST) मधील नवीन नोंदणीसाठी आधार सारखी प्रक्रिया अवलंबली जाऊ शकते, ज्याअंतर्गत त्वरित फोटो आणि बायोमेट्रिकसह कागदपत्रांच्या पडताळणीसह नवीन नोंदणी केल्या जाऊ शकतात. अशा सुविधा बँका, टपाल कार्यालये आणि जीएसटी सेवा केंद्रांमध्ये प्रदान करता येतील.

जीएसके पासपोर्ट सेवा केंद्राच्या धर्तीवर नवीन नोंदणी सुविधा देऊ शकेल, असे एका सूत्राने सांगितले. या व्यतिरिक्त, नोंदणीच्या वेळी आधार प्रमाणीकरणाची निवड न करणाऱ्या रजिस्ट्रारना दोन विश्वसनीय करदात्यांकडून शिफारसपत्रे द्यावी लागू शकतात.

या व्यतिरिक्त कायदा समितीने आपल्या सूचनांसह म्हटले आहे की, एकीकडे जीएसटीमुळे फसवणूकी रोखण्यात मदत होईल, तर दुसरीकडे व्यवसाय करण्याच्या सोयीवर कोणताही परिणाम होणार नाही. याशिवाय जीएसटीच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ केली जाईल आणि परतावादेखील सहज मिळेल. जीएसटी प्रक्रियेत देखरेख वाढविण्याची सूचना समितीने केली आहे.

समितीने जीएसटी नोंदणीसाठी आणखी जागा समाविष्ट करण्याचे सुचविले आहे. त्याअंतर्गत बँका, टपाल कार्यालये आणि जीएसटी सेवा केंद्रांवर आधारद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचेही सांगण्यात आले आहे. या ठिकाणी आधार प्रमाणे बायोमेट्रिक माहितीच्या आधारे थेट फोटोद्वारे जीएसटी नोंदणीची एक सिस्टिम असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अजित पवार?? -प्रकाश आंबेडकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थकित वीज बिलांच्या प्रश्नांवरुन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार हे एकदा स्पष्ट करा असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.  “महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून चुका कबूल केल्या आहेत. आमच्याकडून काही चुका घडलेल्या आहेत. त्यामुळे दुरुस्ती करावी. 50 टक्के वीजबिल माफ कराण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार परस्पर सवलत नाकारतात. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही प्रश्न विचारतो, महाराष्ट्राचा खरा मुख्यमंत्री कोण? याचा खुलासा करा”, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडक यांनी केला.

अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? त्याचा खुलासा केला तर अधिक चांगलं होईल. अन्यथा वीजबिल भरु नका. वीजबिल विरोधात आम्ही आंदोलन सुरु केलं आहे, ते आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र करु, असा इशारा आम्ही सरकारला देत आहोत”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

“महावितरणाचे अधिकारी चुका कबुल करत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडिंगचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्या कंत्राटाला स्थगिती देण्यात आली नव्हती. पण त्यांना मीटर रिडींग घेण्यापासून बंदी करण्यात आली. त्यामुळे मीटरचं रिडींग कन्सोलिटेडरित्या ठरवण्यात आलं. कन्सोलिटेड युनीट ठरला की तुमचा स्लॅब बदलला”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

योग्यवेळी बोलेन, पण सपाटून बोलेन ; मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा सूचक इशारा

udayanraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून मिटलेला नाही. यावरून राज्यभर वातावरण तापलेल आहे. त्यात आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय करत आहे हे मी पाहतोय. सरकारच्या भूमिकेवर मी योग्यवेळी बोलेन पण सपाटून बोलेन ,असा सूचक इशारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

उदयनराजेंनी मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बांदा मराठा समाज मंडळाच्यावतीने त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यता आलं. माजी सरपंच सावळाराम सावंत यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर राजाराम सावंत आणि उदयनराजे यांच्यात अर्धातास चर्चा झाली.

यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी हा इशारा दिला. मी फक्त योग्यवेळेची वाट पाहत आहे. योग्यवेळ येताच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे पुन्हा आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, बांदा मराठा समाज मंडळाचे कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

WhatsAppशी संबंधित समोर आला नवीन फ्रॉड; WhatsApp OTP Scam पासून करा असा बचाव

नवी दिल्ली । विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र सध्या हे हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित नवनवीन फ्रॉड केले जात आहेत. सध्या एका नव्या प्रकारचा स्कॅम हा व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने एखादा मित्रचं आपलं अकाऊंट हॅक करू शकतो. WhatsApp OTP स्कॅम म्हणजे नेमकं काय? आणि यापासून कसा बचाव करायचा हे जाणून घेऊया. व्हॉट्सअ‍ॅप ओटीपी स्कॅममध्ये स्कॅमर सर्वप्रथम युजर्सना त्याच्याच एका मित्राच्या नावाने मेसेज पाठवतात. तसेच तुमचा मित्र अडचणीत असल्याचं त्यामध्ये सांगितलं जातं. अनेकदा हॅकर्स मित्रांच्या नंबरवरूनच मेसेज करतात.

WhatsApp OTP Scam म्हणजे नेमकं काय?
हॅकर्सच्या जाळ्यात अडकून मेसेजला रिप्लाय केल्यास हॅकर्सकडून आणखी एक मेसेज पाठवला जातो. त्यानंतर OTP विचारला जाईल. चुकून हा मेसेज तुम्हाला पाठवला असं सांगून हॅकर तोच मेसेच पुन्हा त्याला फॉरवर्ड करायला सांगेल. मात्र यामागचं खरं कारण म्हणजे हे मुद्दाम OTPच्या माध्यमातून युजर्सचं अकाऊंट हॅक करण्यासाठी करण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्सनी सावध राहणं गरजेचं आहे.

ओटीपी सांगितल्यास तुमच्या नंबरच्या मदतीने हॅकरच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू होईल. कारण WhatsApp नव्या डिव्हाईसमध्ये सुरू करण्यासाठी फक्त एका OTPची गरज असते. तो हॅकरने युजर्सकडून मागितलेला असतो. याचाच गैरफायदा घेऊन हॅकर्स आपल्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून पैसे मागू शकतात अथवा त्यांना ब्लॅकमेल करण्यासारखे फ्रॉड करतात.

असा करा फ्रॉडपासून बचाव
WhatsApp OTP Scamपासून बचाव करता येऊ शकतो. फ्रॉडपासून बचाव करायचा असल्यास कोणासोबत कधीच आपला OTP शेअर करू नका. WhatsApp मध्ये टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन करा. तसेच ओटीपीसोबतच आणखी एका कोडची आवश्यकता असते. जो फक्त युजर्सकडेच असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक मेसेजपासून सावध राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

‘ते कराचीचं नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर तर भारतात आणा!’ संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई । “आधी पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीचं (Karachi) नंतर बघू” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला. कराची एक दिवस भारताचा भाग होईल, असं फडणवीस म्हणाले होते.

काही दिवसापूर्वी मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर ‘कराची स्वीट्स’ हे नाव बदला, असा इशारा शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्र्यातील दुकान मालकाला दिल्यानंतर वादाला तोंड फुटलं. संजय राऊत यांनी तात्काळ ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,’ असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया देत शिवसेनेला चिमटा काढला होता.

“आम्ही ‘अखंड भारत’ संकल्पनेवर विश्वास ठेवतो. कराचीही एक दिवस भारताचा भाग होईल” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला होता. फडणवीसांच्या वक्तव्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की आधी पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग पुन्हा भारतात आणा. कराचीचं आपण नंतर बघू. (Sanjay Raut takes dig at Devendra Fadnavis who said Karachi will be a part of India one day)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

फक्त ४ खासदार निवडून आणणारा लोकनेता, मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणाल? पडळकरांचा टोमणा

सांगली । ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) उपस्थित केला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदर निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे.

पदवीधरची निवडणूक ही भ्रष्टाचाराविरोधातील आणि प्रखर जातीयवाद्यांच्या विरोधातील आहे. या टग्यांच्या सरकारच्या विरोधातील ही निवडणूक आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.(Gopichand Padalkar Criticize On Sharad Pawar Issue)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

कचऱ्यापासून गॅस बनवण्यासाठी सरकार खर्च करणार 2 लाख कोटी रुपये, याचा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार

नवी दिल्ली । आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय (Ministry of Petroleum and Natural Gas) देशात आर्थिक आणि स्वच्छ इंधन देण्यासाठी विशेष उपक्रमांवर काम करत आहे. या उपक्रमांतर्गत 2 लाख कोटी खर्च करून देशभरात 5 हजार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट्स (CBG Plants) उभारण्याची तयारी सुरु आहे. सन 2023-24 पर्यंत या वनस्पतींमध्ये पिकाच्या कचर्‍याच्या सहाय्याने इंधन तयार केले जाईल. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातील आर्थिक आणि स्वच्छ वाहतुकीच्या इंधनासाठी अदानी गॅस (Adani Gas) आणि टोरेंट गॅस (Torrent Gas) बरोबर करार झाला आहे. या कंपन्या 900 कॉम्प्रेस्ड बायो गॅस प्लांट्स स्थापित करतील.

केंद्र सरकारच्या शाश्वत वैकल्पिक आर्थिक परिवहन (SATAT) उपक्रमांतर्गत 2023-24 पर्यंत देशभरात 5,000 CBG प्लांट्स उभे केले जातील. या माध्यमातून एकूण 15 मिलियन टन उत्पादन लक्ष्य ठेवण्यात आल्याचे अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे.

1500 CBG प्लांट्सचे काम सुरू आहे
धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘आम्ही SATAT साठी एक स्पष्ट रोडमॅप तयार केला आहे. 600 CBG प्लांट्ससाठी यापूर्वीच लेटर ऑफ इंटेंट जारी केले गेले आहे. यासह 900 गॅस प्लांट्ससाठी सह-स्वाक्षर्‍याचे पत्रही केले आहे. सध्या एकूण 1,500 CBG प्लांट्स विविध टप्प्यात आहेत. ते पुढे म्हणाले की, या 900 CBG प्लांट्समध्ये एकूण 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक तयार आहे. तसेच एकूण 5,000 हजार CBG प्लांट्सवर सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कचर्‍यापासून गॅस तयार केला जाईल
या CBG प्लांटमध्ये तयार होणारा गॅस ऑटोमोबाईलमध्ये इंधन म्हणून वापरला जाईल. बायो फ्युएलमध्ये देशातील इंधन आयात बिल कमी करण्याची क्षमता आहे. SATAT उपक्रमाद्वारे नगरपालिका तसेच वन व कृषी क्षेत्राच्या कचर्‍याच्या सहाय्याने गॅस तयार केला जाईल. यामध्ये, पशुसंवर्धन आणि सागरी कचरा देखील गॅस तयार करण्यासाठी वापरला जाईल.

खरं तर, परिवहन क्षेत्रासाठी पर्यायी आणि स्वच्छ इंधन तयार करण्यासाठी आणि CBG ची उपलब्धता वाढवण्यासाठी 1 ऑक्टोबर 2018 रोजी भारत सरकारतर्फे SATAT चा पुढाकार घेण्यात आला होता. 2023-24 पर्यंत 5 हजार CBG प्लांट्स उभारण्याचे या योजनेचे उद्दीष्ट आहे. सामंजस्य करारावर स्वाक्षरी करुन सरकारचा स्वच्छ उर्जा उपक्रम ही एक मोठी कामगिरी ठरेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आता घरबसल्या मागवा color voter ID, यासाठी येईल 30 रुपये खर्च

नवी दिल्ली । आपल्यालाही जर कलर वोटर आयडी कार्ड (color voter ID Card) मिळवायचा असेल तर आपण आता तो सहजपणे तयार करू शकता… आपल्याला याची चिंता करण्याची अजिबात गरज नाही. निवडणूक आयोगाने कलरफुल आणि प्लास्टिक मतदार ओळखपत्र दिले आहेत. आपण या कार्डसाठी आपण थेट घरूनच अर्ज करू शकता. ते आकारानेही लहान असून त्याच्या छपाईची गुणवत्ताही चांगली आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 30 रुपये खर्च करावे लागतील. आपण ते कसे बनवू शकता हे जाणून घेउयात –

या वेबसाइटला भेट द्यावी लागेल
आता कॉम्प्युटरच्या मदतीने घरबसल्या आपले नवीन ओळखपत्र तयार करण्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. यासाठी आपल्याला निवडणूक आयोगाची वेबसाइट http://www.nvsp.in वर भेट द्यावी लागेल.

Age proof साठी ‘ही’ कागदपत्रे द्यावी लागतील
Age proof साठी आपण जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate), हायस्कूल मार्कशीट, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स (DL) किंवा आधार कार्ड कॉपी अपलोड करू शकता.

अ‍ॅड्रेस प्रूफसाठी हा कागदपत्र वापरा
याशिवाय तुम्ही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक, पोस्ट ऑफिस पास बुक, रेशनकार्ड, भाडे करार, वीज बिल, पत्त्याच्या पुराव्यांसाठी पाण्याचे बिल देखील वापरू शकता.

या प्रक्रियेद्वारे आपण बनवू शकाल-
1. आपल्या राज्य निवडणूक आयोगाची वेबसाइट www.ceodelhi.gov.in वर जा
2. Registration color PVC Voter ID वर क्लिक करा
3. विनंती केलेली माहिती भरा आणि सबमिट करा
4. आपल्या डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक व्हेरिफिकेशन कोड येईल
5. यानंतर तुमचा नवीन मतदार ओळखपत्र तुमच्या घरी मेलच्या माध्यमातून पोचविला जाईल.
6. ही प्रक्रिया 45 ते 60 दिवस घेईल.

महिनाभर लागतो
संपूर्ण प्रक्रिया आणि सर्व माहिती दिल्यानंतर आपल्या क्षेत्रातील बीएलओ (Booth level officer) निवडणूक आयोगाकडून आपल्या घरी येतील. यानंतर, आपले डॉक्युमेंट व्हेरिफाय केले जाईल. यानंतर, बीएलओ आपला अहवाल सादर करेल आणि एका महिन्याच्या आत आपले नवीन रंगाचे प्लास्टिक मतदार ओळखपत्र आपल्या घरी येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.