‘ते कराचीचं नंतर बघू, आधी पाकव्याप्त काश्मीर तर भारतात आणा!’ संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई । “आधी पाकिस्तानने बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीचं (Karachi) नंतर बघू” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) निशाणा साधला. कराची एक दिवस भारताचा भाग होईल, असं फडणवीस म्हणाले होते.

काही दिवसापूर्वी मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर ‘कराची स्वीट्स’ हे नाव बदला, असा इशारा शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्र्यातील दुकान मालकाला दिल्यानंतर वादाला तोंड फुटलं. संजय राऊत यांनी तात्काळ ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ‘निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,’ असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया देत शिवसेनेला चिमटा काढला होता.

“आम्ही ‘अखंड भारत’ संकल्पनेवर विश्वास ठेवतो. कराचीही एक दिवस भारताचा भाग होईल” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला होता. फडणवीसांच्या वक्तव्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की आधी पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग पुन्हा भारतात आणा. कराचीचं आपण नंतर बघू. (Sanjay Raut takes dig at Devendra Fadnavis who said Karachi will be a part of India one day)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like