फक्त ४ खासदार निवडून आणणारा लोकनेता, मग ३०३ खासदार निवडून देणाऱ्या मोदींना काय म्हणाल? पडळकरांचा टोमणा

सांगली । ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) उपस्थित केला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदर निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे.

पदवीधरची निवडणूक ही भ्रष्टाचाराविरोधातील आणि प्रखर जातीयवाद्यांच्या विरोधातील आहे. या टग्यांच्या सरकारच्या विरोधातील ही निवडणूक आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.(Gopichand Padalkar Criticize On Sharad Pawar Issue)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like