Friday, December 19, 2025
Home Blog Page 5222

सिनेमाची थिएटर होणार पुन्हा हाउसफुल! मात्र, ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

मुंबई । केंद्र सरकारने अनलॉक ५ (Unlock 5) अंतर्गत देशातील चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनामुळे सरकारने यासाठी काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत याबद्दलची माहिती दिली. त्यानुसार आता चित्रपटगृहांचे मालक आणि प्रेक्षकांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. (SOPs for cinema halls )

चित्रपटगृहांना केंद्राने घातले हे नियम:
१)चित्रपटगृहाच्या एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्केच जागांवर प्रेक्षकांना मुभा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे उर्वरित जागा रिक्त ठेवाव्या लागणार.
२)प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे एकमेकांच्या बाजूला बसता येणार नाही. प्रत्येक प्रेक्षकामध्ये एका आसनाचे अंतर राखणे अनिवार्य
३)रिकाम्या आसनांवर ‘Not to be occupied’ स्टिकर लावणे बंधनकारक.
४)चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असेल.
५)चित्रपटगृहात हात धुण्यासाठी आणि हँड सॅनिटायझर्सची व्यवस्था असणे अनिवार्य असेल.
६)चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना आरोग्य सेतू ऍप वापरण्याचा सल्ला द्यावा.
७)चित्रपटगृहात येण्यापूर्वी प्रेक्षकांचे थर्मल स्कॅनिंग करावे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रेक्षकांनाच आतमध्ये प्रवेश द्यावा.

मात्र, कोरोनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीवर ओढावलेली अवकळा पाहता देशभरातील चित्रपटगृहांचा व्यवसाय पूर्वीच्या जोमानेच चालणार का, याबाबत शंका आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने बॉलिवूडचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, मर्यादित प्रेक्षकसंख्येचा विचार करता संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक सध्याच्या घडीला आपले चित्रपट प्रदर्शित करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याशिवाय, मर्यादित प्रेक्षकसंख्येमुळे मल्टिप्लेक्सेसकडून तिकिटांच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर प्रेक्षक या सगळ्याला कशाप्रकारे प्रतिसाद देणार, यावरच पुढील समीकरणे अवलंबून असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

पेंशनबाबत शासनाचा मोठा निर्णय, सरकारने आता ‘या’ अटी केल्या बंद; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत संरक्षण कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने 1 ऑक्टोबर 2019 पासून वर्धित कौटुंबिक पेन्शन (Enhanced Ordinary family Pension- EOFP) ची किमान सेवा आवश्यकता रद्द केली आहे. संरक्षण मंत्रालयाने या बाबतची माहिती दिली आहे.

याआधी संरक्षण कर्मचार्‍यांच्या कुटूंबाला EOFP देण्यासाठी 7 वर्ष अविरत सेवा देण्याचा नियम होता. पण आता ही गरज दूर केली गेली आहे. EOFP मध्ये वाढ झाली आहे तर सशस्त्र सेना कर्मचार्‍यांच्या मागील पगाराच्या 50% आहे, तर Ordinary Family Pension (OFP) कर्मचार्‍यांच्या मागील पगाराच्या 30% आहे.

मंत्रालयाने आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, EOFP संरक्षण कर्मचार्‍यांच्या मागील पगाराच्या 50 टक्के आहे आणि सेवेदरम्यान कर्मचार्‍यांच्या मृत्यूच्या तारखेपासून 10 वर्षांसाठी देण्यात आले आहे. ते म्हणाले की, अनिवार्य 7 वर्षांची सेवा संपविण्याची मुदत 1 ऑक्टोबर 2019 पासून लागू होईल.

मंत्रालयाने आपल्या नोटमध्ये नमूद केले आहे की जर कर्मचार्‍याचा नोकरी सोडल्यानंतर, रिटायरमेंट नंतर मृत्यू झाला असेल तर त्याच्या मृत्यूच्या तारखेपासून 7 वर्षे किंवा कर्मचारी 67 वर्षे होईपर्यंत जे काही पहिले होईल तो पर्यंत EOFP दिले जाते.

याशिवाय मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, कर्मचार्‍याचा 1 ऑक्टोबर 2019 पूर्वी 10 वर्षात मृत्यू झाला. सलग 7 वर्षे काम करण्यापूर्वी. त्याच्या कुटुंबियांना आता EOFP मिळणे सुरूच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

एका महिन्यात 3 रुपयांनी स्वस्त झाले डिझेल, आज नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । गेल्या एक महिन्याचा कालावधी पाहिल्यास सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या किंमतीत लक्षणीय घट केली आहे. 3 ऑगस्टपासून त्याची किंमतीत एकतर कपात केली गेली किंवा ती स्थिर राहिली. त्यातूनच एका महिन्यात डिझेल प्रतिलिटर 3.10 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आज तेल कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 81.06 रुपयांवर स्थिर आहे. त्याचबरोबर, एक लिटर डिझेलची किंमत 70.46 रुपये आहे.

सप्टेंबरमध्ये पेट्रोल 1.02 रुपयांनी झाले स्वस्त
ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यात आज पेट्रोलच्या दरात निरंतर वाढ झाली. राजधानी दिल्लीतच पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 16 आठवड्यांमध्ये एकूण 1 रुपये 65 पैशांची वाढ झाली. तथापि, यामध्ये काही काळ घट देखील झाली आहे. 21 सप्टेंबरपर्यंत तो प्रतिलिटर अंदाजे 1.02 रुपयांनी कमी झाला आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या.
दिल्ली पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 70.46 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.74 आणि डिझेलची किंमत 76.86 रुपये आहे.
कोलकाता पेट्रोल 82.59 रुपये तर डिझेल प्रति लिटर 73.99 रुपये आहे.
चेन्नई पेट्रोल 84.14 रुपये तर डिझेलची किंमत 75.95 रुपये प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 81.58 रुपये आणि डिझेल 70.00 रुपये प्रति लिटर आहे.
लखनौ पेट्रोल 81.48 रुपये आणि डिझेल 70.91 रुपये प्रति लिटर आहे.
पटना पेट्रोल 73.73 रुपये तर डिझेल 76.10 रुपये प्रति लिटर आहे.
चंदीगड पेट्रोल 77.99 रुपये आणि डिझेल 70.17 रुपये प्रति लिटर आहे

अशाप्रकारे, दररोज पेट्रोल-डिझेलची किंमत तपासा
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील माहित होऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP स्पेस पेट्रोल पंप कोड लिहून 9292992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राज्यात १५ वर्ष जुन्या रिक्षांना लागणार ब्रेक! राज्य परिवहन विभागाचा निर्णय

मुंबई । राज्यातील राज्य परिवहन विभागानं रिक्षांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यात रिक्षांची वयोमर्यांदा १५ वर्षे करण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतला आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा २० वर्षे इतकी होती. मुंबई एमएमआर परिसरात ही वयोमर्यादा २० वर्षांवरून १५ वर्षांवर आणण्यात आली असून इतर भागांमध्ये ती टॅक्सींप्रमाणे करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. २४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या बैठकी दरम्यान या निर्णयाला मंजूरी देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

माजी आयएएस अधिकारी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींच्या आधारावर राज्य परिवहन प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. २०१७ मध्ये खटुआ समितीनं महाराष्ट्र सरकारला यासंदर्भातील आपला अहवाल सोपवला होता. त्यापैकी रिक्षांची वयोमर्यादा कमी करण्यासह अनेक महत्त्वाच्या शिफारसी स्वीकारण्यात आल्या आहेत.

काय आहे नवा निर्णय?
नव्या निर्णयानुसार १ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई एमएमआर परिसरात १५ वर्षांपेक्षा जुन्या रिक्षा चालवण्यास बंदी असेल. तर उर्वरित महाराष्ट्रात १ ऑगस्ट २०२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. २०१३ पूर्वी राज्यात टॅक्सींसाठी वयोमर्यादेचं बंधन घालण्यात आलं असलं तरी रिक्षांसाठी मात्र बंधन नव्हतं. राज्यात सध्या १० लाखांपेक्षा अधिक रिक्षा रस्त्यांवर धावत आहेत. यापूर्वी हकीम समितीनं केलेल्या शिफारसींच्या आधारावर १ ऑगस्ट २०१३ पासून राज्य परिवहन प्राधिकरणानं रिक्षा आणि टॅक्सींची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापूर्वी राज्यात रिक्षांसाठी कोणत्याही वयोमर्यादेचं बंधन नव्हतं. तर दुसरीकडे राज्य परिवहन प्राधिकरणानं राज्यातील टॅक्सींना २५ वर्षांच्या वयोमर्यादेचं बंधन घातलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

सोयाबीन पिकाला राज्य शासनाने दिला ३८८० रुपये हमी भाव; १५ ऑक्टोबरपासून खरेदी केंद्र सुरु होणार

मुंबई । राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाच्या काढणी आणि मळणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. अशा वेळी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य शासनानं यावर्षी सोयाबीनसाठीचा हमी भाव जाहीर केला आहे. राज्य शासन सोयाबीन पिकाला यावर्षी ३८८० रुपये हमी भाव देणार असल्याचे राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील सांगितलं आहे. याशिवाय १५ ऑक्टोबरपासून खरेदी केंद्र सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
बाळासाहेब पाटील यांनी ट्विटरवर एक याबाबत माहिती दिली आहे. यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला असून काही भागात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. राज्यातील सोयाबीन पिकाची काढणी आणि मळणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळं राज्य शासनाने राज्य शासनाने सोयाबीन पिकाला यावर्षी ३८८० रुपये हमी भाव जाहीर केला आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून राज्यात खरेदी केंद्र सुरु होतील. शेतकऱ्यांनी शासनाच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनच सोयाबीनची विक्री करावी असं आवाहन बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केलं आहे.

दरम्यान, काही शेतकरी सोयाबीन विक्रीची घाई करत आहेत. बरेच जण खासगी व्यापाराला आपला सोयाबीन विकत आहेत. राज्यात अजूनही काही भागात पाऊस असून त्यामुळं दाण्यात ओलं कायम राहत असल्याने सोयाबीनची गुणवत्ता घसरत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी घाई न करता. येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या शासनाच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनचं सोयाबीनची विक्री करावी असं आवाहन बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Breaking | ‘या’ बड्या क्रिकेटपटूच अपघातात निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज नजीब तारकाईचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले. अफगाणिस्तानच्या या 29 वर्षीय सलामीच्या फलंदाजाला शुक्रवारी जलालाबादमध्ये रस्ता ओलांडताना एका कारने धडक दिली आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन ही बातमी जाहीर केली. “एसीबी आणि अफगाणिस्तान क्रिकेट लव्हिंग नेशनने आक्रमक सलामीवीर फलंदाजांच्या अत्यंत गंभीर मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहोत आणि नाजीब तारकाईने दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला! अल्लाह त्याच्यावर दया दाखवो.” ,असं ट्वीट केले.

नजीब तारकईने अफगाणिस्तान साठी 12 टी -20 आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. 2014 T-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने बांगलादेश विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते.

नागपूरातील २ तरुणींना मध्यप्रदेशात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; सलग ३ महिने झाला अत्याचार

नागपूर । दिवसेंदिवस महिला संबंधीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. देशातील कुठल्याकुठल्या भागातून अनेक महिलांवरील शोषणाच्या घटना घडत आहेत. नागपूरातील दोन तरुणींना मध्यप्रदेशातील टिकमगढ येथे विकल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशातून दोन्ही तरुणींची सुटका केली असून या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या दोन तरुणी भांडे विक्री चा काम करायचा. आकाश नावाच्या व्यक्तीने त्या दोघींना मध्यप्रदेशात या व्यवसायाला संधी असून चांगला मोबदला मिळेल असा अमिश दाखविला. त्यामुळे दोन्ही तरुणी साडे तीन महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील टिकमगढ ला गेल्या. मात्र, तिथे आकाशने दोघींना टोळीतील इतर सदस्यांच्या मदतीने १ लाख ९० हजार रुपयात एका वयस्कर माणसाला विकले. दोन्ही तरुणींचे बळजबरीने लग्न लावले गेले, आणि त्यानंतर दोघींना मारहाण आणि शारीरिक शोषणाचा क्रम सुरू झाला.

दरम्यान, परराज्यातील दोन तरुणींना टिकमगढला आणून त्यांच्यावर अत्याचार केले जात असल्याचा बोभाटा त्या गावात झाला आणि माहिती मध्यप्रदेश पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांनी दोन्ही तरुणींना ताब्यात घेत नागपूरात संपर्क साधले आणि हे सर्व प्रकार उघडकीस आले. दोन्ही तरुणींना नागपूरात आणण्यात आले असून नागपूर पोलिसांनी या प्रकरणी आकाशला अटक केली आहे. तर टोळीतील इतरांचा शोध घेतला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

षडयंत्र! सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी उघडले गेले ८० हजार फेक अकाऊंटस्

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्याकाळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून, त्यात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममधून पोस्ट शेअर करण्यात आलेली ही फेक अकाऊंटस् फक्त भारतातीलच नाही. तर इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स आदी देशातूनही या पोस्ट करण्यात आल्या आहेत. “आम्ही परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant, #sushantsinghrajput, #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचं काम आम्ही करत आहोत,” असं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलं.

“कोविडच्या संकटात ८४ पोलिसांचा मृत्यू झाला. ६ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची बाधा झाली, असं असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी, खच्चीकरण करण्यासाठी ही मोहीम चालवली गेली. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असं मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

हाॅटेल व लाॅज सुरु : टेबललँन्डची घोडेसवारी बंद का? टेबललँन्ड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद

शासनाने हाँटेल, लाँज, रेस्टॉरंट आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.परंतु गेली सात महिन्यांपासून बंद असलेला पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली नाही.यामुळे घोडे व व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन व्यवसाय सुरू करणार असल्याचे निवेदन टेबललँन्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे,उपाध्यक्ष नामदेव चोपडे यांनी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना दिले.

गेली सात महिन्यांपासून पर्यटन व्यवसाय बंद असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या टेबललँन्ड पठारावरील सुमारे ६०० लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने मंगळवार दि.६ सप्टेंबर पासून व्यवसाय सुरु करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.अशा आशयाचे निवेदन आज सकाळी १२ च्या सुमारास मुख्याधिकारी यांना देण्यात आले.सकाळी साडेदहा पासूनच टेबललँन्ड नाक्यावर व्यावसायिक एकत्र येत होते. पावने बाराच्या सुमारास सर्व व्यावसायिक नगरपालिका कार्यालयासमोर एकत्र आले. पालिका कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकांच्या पाच प्रतिनिधी यांनी कार्यालयात जाऊन निवेदन सादर करण्याची विनंती केली परंतु आम्ही आत येणार नाही.

मुख्याधिकाऱ्यानी गेटवर यावे हा पवित्रा घेतला. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी गेटवर येऊन निवेदन स्विकारले व व्यावसायिकांच्या भावना समजून घेतल्या. व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांना विनंती करणार असल्याचे अश्वासन दिले. कायदेशीर परवानगीने व्यवसाय सुरू करावा अशी विनंती केली. सुधाकर बगाडे म्हणाले आम्ही या आगोदर दोन वेळा आपणास निवेदन दिले होते.परंतु आपल्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही.व्यवसाय बंद असल्याने गंभीर परस्थिती निर्माण झाली आहे.शासनाने आम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अन्यथा आम्ही उद्या सुरू करण्यात येणारे सर्व व्यवसाय एक दिवस पुढे ढकलत आहोत.कोणताही अनुसूचित प्रकार घडल्यास अथवा शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला शासन सर्वस्वी जबाबदार राहील. असे निवेदनात नमूद केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

….आणि अश्विनने मांकडिंग न करता फिंचला फक्त वॉर्निंग दिली

Ashwin Mankading

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीचा गोलंदाज आर अश्विनला फिंच विरोधात मांकडिंग (Mankading) करण्याची संधी होती, मात्र त्यानं तसे केले नाही. केवळ फिंचला ताकिद दिली. याला कारण असे आहे की, अश्विनचे कोच रिकी पॉंटिंग यांनी त्याच्यावर मांकडिंग न करण्याचे आधीच स्पष्ट केले होते.

या सामन्यात अश्विन गोलंदाजी करताना  फिंच क्रिझ पुढे आल्याचे अश्विनने पाहिले आणि थांबला मात्र त्याने फिंचला बाद केले नाही. अश्विनकडे नॉनस्ट्राइकर एंडवर उभ्या असलेल्या फिंचला बाद करण्याची संधी होती. मात्र त्याने तसे केले नाही. उलट अश्विन स्टम्पजवळ उभा राहून हसू लागला. त्यानंतर फिंचला बाद न करता अश्विन पुन्हा गोलंदाजी करायला गेला.

 

अश्विनवर रिकी पॉटिंगचा दबाव

आयपीएल सुरू होण्याआधी अशी चर्चा होती की पॉटिंग आणि अश्विन यांच्यात मांकडिंगवरून वाद झाला होता. पॉंटिंगचे म्हणणे होते ती, फलंदाजाला ताकिद दिली पाहिजे, मात्र त्याला मांकडिंग करू नये. त्यामुळे पॉटिंगने अश्विनला असे न करण्यास सांगितले होते. त्यामुळे या सामन्यात अश्विननं कोचचे ऐकत फिंचला ताकिद दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’