Thursday, December 18, 2025
Home Blog Page 5223

अंडी खाण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते का ? जाणून घेऊया

Eggs

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सध्या देशभर ज कोरोनाचे संकट वाढते आहे. या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रत्येकजण विशेष प्रयत्न करताना दिसत आहे त्याचपद्धतीने आपल्या आहारात वेगवेगळे बदल केले जात आहेत. अनेक जण आहारात अंड्यांचा समावेश करत आहेत. त्यामुळे अंडी आपले रोगप्रतिकार शक्ती वाढते कि नाही हे जाणून घेऊया

अंड्यामध्ये प्रोटीन चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यालोकांपर्यंत सगळ्यांना अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. अंड्यांमध्ये फक्त प्रोटीन नसते तर त्यामध्ये व्हिटॅमिन डी , कॅल्शियम, आणि इतर पोषक घटक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. अंडी आपली त्वचा, स्किन, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जास्त मदत करते. याचा आहारात समावेश केल्याने आपले केस मजबूत होतात तसेच आपली हाडे बळकट होण्यास मदत होते. अनेक लोकांच्या कडून ऐकले गेले असेल कि , ज्या लोकांना कोरोना झाला होता त्या लोकांना अंडी खायला दिली जात होती. म्हणजे कोरोनाच्या काळात अंडी खाणे जास्त महत्वाचे आहे.

अंड्यामध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चे प्रोटीन आणि सेलेनियम, व्हिटॅमिन ए तसेच व्हिटॅमिन बी चा सुद्धा समावेश असतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी कमी दीड ते दोन अंडी खाल्ली जावीत. शरीराला इन्फेकशन पासून बचाव करण्यासाठी सुद्धा अंड्याचा फायदा होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

धक्कादायक !! राज्यात ‘या’ वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर ३८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्र व राज्य सरकारनं लॉकडाउन शिथिल केल्यानंतर राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे सुरूवातीच्या काळात ४० ते ६० वयोगटातील रुग्णांची अधिक होती. मात्र, अनलॉकनंतर ती कमी होऊन दुसऱ्या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

केंद्रानं व राज्यानं लॉकडाउन शिथिल केल्यानंतर महाराष्ट्रात ३१ ते ४० वयोगटातील करोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. सध्या राज्यात याच वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ३१ ते ४० वयोगटातील रुग्णसंख्या २१.३४ टक्के आहे. राज्य वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या माहितीप्रमाणे ४ जून रोजी या वयोगटातील रुग्णसंख्या २०.५४ टक्के इतकी होती. त्यानंतर ती वाढत गेली.

३१ ते ४० वयोगटानंतर राज्यात ४१ ते ५० वयोगटातील रुग्णांची संख्येचा क्रमांक लागतो. या वयोगटातील रुग्णसंख्या १७.९ टक्के इतकी आहे. तर ५१ ते ६० या वयोगटातील रुग्णांचं प्रमाण १५.९५ टक्के इतकं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

अजिंक्य रहाणे चेन्नईकडून सलामीला खेळणार ?? ; जाणून घ्या कसं

rahane and dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आत्तापर्यंत चेन्नई सुपर किंग्स ची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक राहिली नाही.तीन वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नईला अजूनही सलामीच्या जोडी डोकेदुखी ठरत आहे. भरवशाचा मुरली विजय सलग अपयशी ठरला.परंतु अशातच चेन्नईसाठी एक मोठी संधी देखील चालून आली आहे. त्यांनी जर ही संधी साधली तर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे चेन्नई कडून सलामीला खेळू शकतो….तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर हो हे शक्य आहे.

आयपीएलच्या नव्या नियमानुसार, IPL 2020 मध्यंतरानंतर Mid Season Transferला सुरुवात होईल आणि त्यानुसार संघ त्यांना हवा त्या खेळाडूंची देवाण-घेवाण करू शकतील. पण त्या खेळाडूंनी फक्त दोन-तीनच सामने खेळले असावे असा नियम आहे. त्यामुळे CSK सलामीसाठी पर्याय म्हणून अजिंक्यचा विचार करू शकतील.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतले. त्यामुळे शिखर धवन सोबत तो दिल्लीच्या डावाची सुरुवात करेल, असा अंदाज लावला गेला. पण, चार सामन्यानंतरही रहाणेला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेलं नाही. दिल्लीनं तीन विजयासह सध्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पृथ्वी शॉ, शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिस, रिषभ पंत चांगल्या फॉर्मात आहेत. अशात दिल्ली त्यांचा विजयी संघ बदलण्याची शक्यता फार कमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

डास चावल्याने होतात ‘हे’ चार जीवघेणे आजार

mosquito bites

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतीय वातावरण हे अनेक वेळा डास आणि त्यांच्या प्रजनन यासाठी अनुकूल वातावरण आहे. हे डाग हे आपल्या शरीराला चावले त्यानंतर कधी कधी आपणाला जेवघेणे आजार होण्याची दाट शक्यता असते. डासांपासून बचाव होण्यासाठी अनेक वेळा विशेष प्रयन्त केले जातात. डास वाढतात त्यापाठीमागे कारण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात झालेले बदल आणि पाण्याच्या जास्त वापर , दुर्गंधी यामुळे डास वाढतात.

मलेरिया—-

मलेरिया एका विशिष्ठ वायरस मुळे होतो. त्याचे नाव प्लेसमोडियाम असे आहे. संक्रमित डासांच्या आपल्या शरीराला चावण्याने वायरस शरीरात प्रवेश होतो. ताप, थंडी डोकेदुखी, उलटी घाम अश्या समस्या निर्माण होतात.

डेंगू—

डास चावल्याने डेंगू हा आजार होतो. या आजरांचा प्रसार हा एडिस नावाच्या डासांच्या मदिमार्फत होतो. या आजारामुळे ताप ,थंडी, अंगदुखी अश्या समस्या निर्माण होतात.

चिकणगुणिया—-

चिकणगुणिया हा आजार एडिस आजरांचा धोका निर्माण होतात. याची साधारण लक्षणे म्हणजे डोकेदुखी , उलटी, अंगदुखी, त्वचेवर चट्टे पडणे अशी असतात. या आजारामध्ये प्रतिकार क्षमता खूप कमी होते.

झिका ताप—-

झिका ताप हा झिका वायरस मुळे होतो. हा वायरस हा झिका डासांमुळे सुद्धा होतो. त्वचेवर चट्टे येणे, खाज, अंगदुखी, खाज अश्या समस्या निर्माण होतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

कोट्यावधी रुपयांचा तब्बल 1 हजार किलो गांजा पोलिसांकडून जप्त

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कंटेनर मधून वाहतुक केली जात असलेला 1 हजार किलो गांजा आज तेलंगणा पोलिसांनी पकडला. यावेळी दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याचा मुख्य सुत्रधार कोण याचा शोध पोलिस घेत आहेत. जप्त केलेल्या गांजाची किंमत 1.3 कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील रंगा रेड्डी जिल्ह्यात एक कंटेनर गाजाची वाहतुल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी सापळा रचून कंटेनरला अडवले. कंटेनरची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 1 हजार किलो गांजा सापडला. या गांजाची किंम्मत 1.3 कोटी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, गांजाची वाहतुक नक्की कोठे चालली होती हे अद्याप समजू शकलेले नाही. गांजा वाहतुकीची संपुर्ण साखळी कार्यरत असून याचा म्होरक्या कोण याचा शोध तेलंगणा पोलिस घेत आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असून यामुळे अवैध्य धंद्यांना चांगलीच चपराल बसली आहे.

महाबळेश्वरच्या वेण्णालेकमध्ये माजी नगराध्यक्षाच्या पतीची आत्महत्या

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद

महाबळेश्वर येथील वेण्णालेकमध्ये महाबळेश्वर नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष यांचे पती दिपक कांदळकर यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. या घटनेने महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. महाबळेश्वर ट्रेकरचे जवान यांच्या मदतीने शोधकार्य सुरु आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर नगरपापलीकेच्या माजी नगराध्यक्ष सौ कांदळकर यांचे पती दिपक कांदळकर यांनी वेण्णालेकच्या बाहेर आपले जॅकेट व चप्पल काढुन वेण्णालेकमध्ये उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. कांदळकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

दरम्यान, घटनास्थळी महाबळेश्वर ट्रकरचे जवान दाखल झाले आहेत. वेण्णा लेक परिसरात शोधकार्य सुरु आहे. कांदळकर यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नसून पुढील तपास सातारा पोलिस करत आहेत.

ब्रिटनमधील एका व्यक्तीने एक चाक असलेल्या सायकलवरून केला संपूर्ण जगाचा प्रवास

हॅलो महाराष्ट्र । प्रत्येक माणसाचे एक स्वप्न असते कि आपण संपूर्ण जग फिरावे आणि आपल्या आवडत्या ठिकाणांना भेटी द्याव्यात, परंतु त्यासाठी जर कोणी आपल्याला सायकल दिली तर कदाचित आपले स्वप्न क्षणभंगुर होईल. पण ब्रिटनमध्ये मात्र एका युवकाने हे करून दाखवले आहे. कदाचित हा युवक इतरांपेक्षा वेगळाच असेल कारण त्याने संपूर्ण जग फिरण्यासाठी एक सायकल निवडली आणि ती देखील फक्त एकच चाक असणारी.

 उन्होंने यात्रा के दौरान अपने साथ जरूरत सामान के तौर पर 36 इंच की निंबस ओरेकल यूनिसाइकिल से जुड़े पैनियर में एक तंबू, सो बैगिंग, स्टोव, कुछ खाने का सामान रखा था. उन्होंने यह यात्रा बिना किसी सहायता व समर्थन के पूरी कर ली. एड ने इस सफर के फोटो सोशल साइट्स पर भी पोस्ट किए हैं. इसमें कई देशों के खास स्थानों पर फोटो लिए गए हैं, जिनमें एड प्रैट नजर आ रहे हैं. इन देशों में गए प्रैट अपनी साइकिल से दक्षिण एशिया और यूरोप 20 से ज्यादा देशो में गए थे. (फोटो सौ. फेसबुक- Ed Pratt)

या युवकाने एक चाक असणाऱ्या सायकलवर तीन वर्षात संपूर्ण जगाचा प्रवास केला. इतकेच नाही त्याने या प्रवास दरम्यान चॅरिटी साठी अडीच कोटी रुपये देखील जमवले. 19 वर्षीय एड प्रॅट मार्च 2015 मध्ये टाउटन येथील सॉमरसेट येथून आपल्या प्रवासास सुरुवात केली होती. या एक चाक वाल्या सायकलवरून त्याने 21000 मैलाचा प्रवास केला आहे.

 इस युवक ने एक पहिए वाली साइकिल से तीन साल में पूरी दुनिया का चक्कर लगा लिया. यही नहीं इस दौरान उन्होंने एक चैरिटी के लिए ढाई करोड़ रुपये से ज्यादा का दान भी जुटाया. दरअसल, एड प्रैट ने 19 साल की उम्र में मार्च 2015 में टाउटन स्थित समरसेट से यात्रा शुरु की थी. एक पहिए वाली साइकिल पर उनकी ये यात्रा 21000 मील की थी. (फोटो सौ. फेसबुक- Ed Pratt)

तो प्रवास करीत असताना आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू म्हणून एड्ने एक 36 इंच निंबस ओरॅकल युनिसायकलीशी जोडलेला एक तंबू, सो बॅगिंग, स्टोव्ह, काही खाद्यपदार्थांसारख्या वस्तू घेतल्या. त्याने हा प्रवास कोणाचीही मदत आणि समर्थन न घेता पूर्ण केला आहे. एडने सोशल साइट्सवर या प्रवासाचे फोटोही देखील पोस्ट केलेले आहेत. अनेक देशांच्या खास ठिकाणांवर त्याने हे फोटो घेतलेले आहेत. आपल्या सायकल वरून एड्ने दक्षिण एशिया आणि युरोप मधील 20 पेक्षा जास्त देशांना भेट दिली.

 बीते शुक्रवार को एड ने समरसेट के चैरिटी हेडक्वार्टर में अपनी यात्रा समाप्त की. जहां उनके दोस्तों, परिवार और चाहने वालों ने उनका स्वागत किया. एड के माता-पिता के मुताबिक, एड ने दुनियाभर में घूमने के लिए स्कूल छोड़ दिया. वो बताते हैं कि एड को चेलेंजिंग और एडवेंचर वाली चीजें बहुत पसंद हैं. (फोटो सौ. फेसबुक- Ed Pratt)

गेल्या शुक्रवारी एडने आपल्या सॉमरसेट येथील चॅरिटी हेडक्वार्टरमध्ये आपली यात्रा समाप्त केली. यावेळी त्याचे मित्र, फॅमिलीने त्याचे स्वागत केले. एडच्या आई-वडिलांने सांगितले की, संपूर्ण जग फिरण्यासाठी एडने शाळा सोडली. त्यांनी सांगितले कि एडला चॅलेंजिंग आणि एडवेंचर करायला खूपच आवडते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

थरारक! पुण्यात भरदिवसा वृद्धावर गोळीबार; हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

पुणे । पुणे पोलीस आयुक्त कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर, भरदिवसा एका वृद्ध व्यक्तीवर गोळीबार झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वृद्ध व्यक्तीला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजेश कनाबर (वय६३) असे मृत वृद्ध व्यक्तीचे नाव होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक राजेश कनाबर यांचा बाणेर येथील जागेवरून एक वादा होता. त्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. सुनावणी झाल्यावर, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयपासून काही अंतरावर असलेल्या एसबीआय बँकेच्या बाहेरील फुटपाथवरून ते जात होते. त्याचवेळी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मागून पळत आलेल्या २ हल्लेखोरांनी काही समजण्याच्या आतमध्ये त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागून कनाबर खाली कोसळल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

जखमी राजेश कनाबर यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्याना त्यांचा मृत्यू झाला. या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसाकडून सांगण्यात आले आहे. पुणे शहरात मागील काही दिवसात खून आणि चोरीच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर काही जणांनी सपासप वर करून त्याचा निर्घृण खून केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Festival Special Trains साठी रेल्वे आकारणार 30% जास्त भाडे, चालविल्या जाणार 100 हून जास्त Trains

Railway

हॅलो महाराष्ट्र । भारतीय रेल्वे कोरोना संकटा दरम्यानच्या परिस्थितीत दररोज काहीतरी नवीन प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. या अनुक्रमे रेल्वे दुर्गा पूजा, दीपावली आणि छठ पूजेच्यावेळी असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी 100 पासून जास्त फेस्टिवल स्‍पेशल ट्रेन्स (Festival Special Trains) चालवणार आहे. भारतीय रेल्वेच्या मते पर्यटन, या स्‍पेशल ट्रेन्स नवरात्रि (Navaratri) दरम्यान 20 ऑक्टोबरपासून दिपावली आणि छठपूजे नंतर 30 नोव्हेंबरपर्यंत चालावल्या जातील. मात्र, रेल्वे या फेस्टिवल स्‍पेशल ट्रेन्समध्ये प्रवास करणाऱ्यांकडून जास्तीचे भाडे वसूल करणार आहे.

बिझि रूट्ससाठी फेस्टिवल स्‍पेशल ट्रेन्सची बनवली जात आहे लिस्‍ट
रेल्वे देशातील वेगळ्या आणि महत्त्वाच्या रूट्स (बिझी राउट्स) वर या फेस्टिवल स्‍पेशल ट्रेन्स चालवण्यासाठी लिस्‍ट तयार करत आहे. सूत्रांनुसार, रेल्वे या आठवड्याच्या शेवटी या स्‍पेशल ट्रेन्सची घोषणा देखील करेल. या फेस्टिवल स्‍पेशल ट्रेन्सचे भाडे 30 टक्क्यांहून जास्त असेल. प्रत्येक दिवशी दररोज 12 ट्रेन्स चालविल्या जातील. परंतु कोरोना संकट (Coronavirus Crisis) दरम्यान मागणीनुसार ट्रेन्स हळू हळू सुरु केल्या जात आहेत.

सणांमुळे अनेक ट्रेनचे बुकिंग पूर्ण झाले आहे
भारतीय रेल्वे यावेळी 400 स्पेशल ट्रेन्स चालवित आहेत. सणांमुळे ट्रेनची मागणी वाढत आहे. अनेक रूटसवर ट्रेनचे बुकिंग पूर्ण झाले आहे. अशा प्रकारे सणांमुळे रेल्वे अनेक रूट्सवर ही फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन्स चालवित आहेत. या ट्रेन्सची संख्या मागणी नुसार 100 च्या वर देखील असू शकते. नुकतेच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ वीके यादव याची सांगितले कि, सणांमुळे रेल्वे 200 पेक्षा स्‍पेशल ट्रेन्स चालवतील. तसेच मागणी नुसार या ट्रेन्सची संख्या देखील वाढविली जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

‘दलित अत्याचारांविरुद्ध नेहमी मूग गिळून बसणाऱ्या राऊतांनी आम्हाला शिकवू नये’; आठवलेंची टीका

मुंबई । दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये असा जोरदार टोला रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावला आहे. संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे असं म्हणता आठवले यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले.

रामदास आठवले म्हणाले की, संजय राऊत यांनी संसदेत खासदार म्हणून ही दलित अत्याचार प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला नाही. दलितांच्या प्रश्नांवर दलित लढत असतात पण दलितांच्या प्रश्नांसाठी सवर्ण पुढाऱ्यांनी कधी लढा उभारला आहे का? दलितांचे मतदान हवे आहे पण दलितांवरील अत्याचाराचा साधा निषेध तरी यापूर्वी कधी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षनेत्यांनी केला आहे का? असा सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.

संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मी नटींच्या घोळक्यात नसतो, मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरसच्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला. आंदोलन केले. लखनऊला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो. हाथरसला भेट देण्यास जाताना तेथील जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून रोखले होते. त्यामुळे मी 2 ऑक्टोबरला हाथरस जाऊ शकलो नाही आता मात्र उद्याच हाथरसला जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार अहे असा खुलासा आठवले यांनी केला.

तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कलावंतांची कदर करणारे नेते होते. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळे एखाद्या अभिनेत्री महिलेवर अतिप्रसंगचा एवढा अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही. कलाकार अभिनेत्री यांना महिला म्हणून सन्मान न देता त्यांना जाहीर अपशब्द वापरले आहेत. त्यातून कलाकारांचा सन्मान करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्या भूमिकेला हरताळ फासण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. कंगना राणौत प्रकरणात आम्ही कधीही संजय राऊत यांच्यावर टीका केली नाही ते आमच्यावर टीका करीत असले तरी त्यातून मी त्यांच्यावर नाराज नाही. ते माझे मित्र आहेत.

पायल घोष ही अभिनेत्री महिला तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत भूमिका मांडते. ती अभिनेत्री असली तरी महिला आहे त्यातून आम्ही तिची बाजू घेतली संजय राऊत यांनी तिची बाजू घेतली का? जिथे जिथे महिलांवर दलितांवर अत्याचार होतात तिथे तिथे आम्ही त्या त्या महिलेची बाजू घेत आलो आहोत. दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत पण संजय राऊत हे कधी सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत असा आरोप रामदास आठवलेंनी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.