Monday, December 15, 2025
Home Blog Page 5241

धक्कादायक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाचा सुरू आहे. कराड तालुक्यातील ओंड येथे दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने तिने गळफास घेऊन जीवन संपवले. या धक्कादायक घटनेने कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, साक्षी आबासो पोळ ( रा.ओंड ता.कराड जि.सातारा. वय 15 ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ओंड येथील पोळ कुटूंबाची परिस्थिती हालाखीची आहे. साक्षी पोळ ही इयत्ता दहावीत शिक्षण घेते. साक्षीचे वडिल आबासो बाळकू पोळ  यांचा 2007 साली मृत्यू झाला आहे. वडिलांचे छत्र हरपल्यापासून आई स्वाती पोळ या साक्षी व तिच्या भावासह कष्ट करून उदरनिर्वाह करतात. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. शाळांचे शिक्षक हे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.साक्षीकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल नव्हता. त्यामुळे ती नैराश्यात होती.

मोबाईल नसल्याने तिला अभ्यास करता येत नव्हता. मंगळवारी दुपारी आई कामानिमित्त बाहेर गेली असताना साक्षीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. कराड ग्रामीण पोलीस  घटनास्थळी भेट देऊन चौकशी करत आहेत.

Navratri 2020 : कोरोना काळातील नवरात्रोत्सवासाठी राज्य शासनाची नियमावली जाहीर, ‘हे’ आहेत नियम

मुंबई । कोरोना महामारीमुळं यावर्षीचे सर्वच सण-उत्सव गर्दी टाळत सध्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. अशातच (Navratri 2020) नवरात्रोत्सवासाठी आता लगबग सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं उत्साह काहीसा कमी असला तरीही, आदिशक्तीच्या आगमनासाठी सारे उत्सुक आहेत. या परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात रहावा यासाठी गणेशोत्सवाप्रमाणंच नवरात्रोत्सवासाठीही राज्याच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या नव्या नियमावलीमुसार सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी देवीच्या मूर्तीची उंची मर्यादा ४ फूट, तर घरगुती मूर्तींसाठी ही मर्यादा २ फूट इतकी करण्यात आली आहे. शिवाय यंदाच्या नवरात्रौत्सवात दांडिया किंवा गरब्याच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच कोरोनासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

अशी आहे नवरात्रोत्सवासाठीची नियमावली
– सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी महापालिका/ स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक.

  • कोरोनाची परिस्थिती पाहता न्यायालय, महापालिका आणि स्थानिक प्रशासनानं मंडपासाठी आखलेल्या नियमांचं पालन करणं अनिवार्य.

  • यंदाचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करणं अपेक्षित असल्यामुळं सार्वजनिक आणि घरगुती नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीची सजावट तशीच असावी.

  • सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसाठी देवीच्या मूर्तीची उंची मर्यादा ४ फूट, तर घरगुती मूर्तींसाठी ही मर्यादा २ फूट इतकी करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

मागील ६ वर्षांत भारतीय लष्कराने खरेदी केला ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत-चीनमध्ये तणाव आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा तणाव सुरू आहे. तर पाकिस्तानकडून सीमेवर सतत गोळीबार सुरू आहे. अशा तणावाच्या परिस्थितीत लष्कराचा महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातून भारतीय लष्कराने ऑर्डीनन्स फॅक्टरीच्या निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यावरून संताप व्यक्त केला आहे. गेल्या ६ वर्षात सरकारी आयुध निर्माणीकडून ( ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड ) जो ९६० कोटींचा निकृष्ट दर्जाचा दारुगोळा खरेदी केला आहे, तेवढ्या निधीत लष्कराला जवळपास १०० तोफा मिळाल्या असत्या. हा दावा लष्कराअंतर्गत केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.

हा अहवाल संरक्षण मंत्रालयाला देण्यात आला आहे. २०१४ ते २०२० या कालावधीत निकृष्ट दर्जाचा दारुगोळा खरेदी करण्यात आला आहे. या दारुगोळ्याची किंमत जवळपास ९६० कोटींवर पोहोचली आहे. याच निधीत 150 MM या मध्यम पल्ल्याच्या तोफा लष्कराला उपलब्ध होऊ शकल्या असत्या. ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्ड (OFB) संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या जगातील सर्वात जुन्या सरकारी ऑर्डीनन्स प्रोडक्शन युनिट पैकी एक आहे. त्याअंतर्गत सैन्यासाठी दारुगोळा तयार केला जातो. यावर लष्कराने टीका केली आहे. त्रुटी आढळून आलेल्या उत्पादनांमध्ये 23-एमएम एअर डिफेन्स शेल, तोफगोळे, 125 मिमी रणगाड्यांच्या तोफगोळ्यांसह वेगवेगळ्या कॅलिबरच्या गोळ्यांचा समावेश आहे. निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यामुळे केवळ पैसाच नाही तर अनेक घटनांमध्ये मानवी नुकसानही झाले आहे.

निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यामुळे होणाऱ्या घटना आणि मानवी हानी या आठवड्या एक अशा सरासरीने घडत आहेत. असा दावा लष्कराच्या या अहवालात करण्यात आला आहे. २०१४ पासून निकृष्ट दर्जाच्या दारुगोळ्यामुळे ४०३ घटना घडल्या आहेत. या घटनांचे प्रमाण कमी झाले असले तरी ते चिंताजनक आहे, असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले ?? ; शरद पवारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूतप्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विचारला आहे. शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सुशांतप्रकरणी सीबीआयवर निशाणा साधला आहे. सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे अन्य ठिकाणी वळत आहे, असे पवार म्हणाले

‘सुशांतच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचं काम मुंबई पोलीस करत होते. पण मुंबई पोलीस हे काम करतील, यावर केंद्र सरकारला विश्वास नसावा. त्यामुळे त्यांनी वेगळी एजन्सी नेमली. मात्र या एजन्सीने काय दिवे लावले, ते आम्हाला दिसले नाहीत. त्याचा प्रकाश काही बघायला मिळाला नाही. आता ते सगळं भलतीकडेच चाललं आहे,’ असं म्हणत शरद पवार यांनी सीबीआय तपासावर टीका केली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी राहिली बाजूला आणि दुसऱ्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या संस्था दुसरीकडे लक्ष वळवत आहे की काय? अशी शंका निर्माण होत आहे’, असंही पवार म्हणाले.जवळपास तीन महिने होत आले तरी या प्रकरणात सीबीआयला अजून काहीच सापडले नाही. या उलट हा तपास आत वेगळ्याच दिशेत जात असल्याचे, शरद पवार यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

अवघ्या चोविसाव्या वर्षी घेतले टेरेसगार्डनवर विविध भाज्या, मसाले आणि फुलांचे पीक 

anubhav sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्याच्या काळात अनेकजण टेरेस गार्डन, किचन गार्डन तसेच विविध प्रकारच्या गार्डनिंग कडे वळलेले पाहायला मिळतात. तरुण पिढीही मोठ्या प्रमाणात यात रस घेताना दिसून येते आहे. उत्तर प्रदेश मधील रायबरेली जिल्ह्यात राहणाऱ्या एका २४ वर्षाच्या मुलानेही आपली ही आवड जपत टेरेस गार्डन फुलविले आहे. अनुभव शर्मा असे त्याचे नाव आहे. तो सध्या पदवी घेऊन बँकेच्या परीक्षांची तयारी करतो आहे. आणि गार्डनिंगची आवडही जपतो आहे. लहान पणापासूनच झाडे लावण्याकडे त्यांचा कल चांगला असल्या कारणाने त्यांनी टेरेसवर विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली.

२०१५ सालापासून त्यांनी आपल्या टेरेसवर आपली छोटी शेती फुलवायला सुरुवात केली होती. आज या शेतीत जवळपास ३०० हुन अधिक झाडे आहेत. सुरुवातीला साध्या गार्डनिंग पासून त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू शेतीत रूपांतर केले. आता त्यांच्या या शेतीत भाज्या, औषधी वनस्पती, फळे आणि मसाले उगविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांना एक मिश्र बाग बनवायची आहे असेही ते सांगतात.

अनुभव म्हणतात, “गार्डनिंग करण्यासाठी कोणताही ऋतू उपयुक्त असतो. फक्त त्याची सुरुवात होणे गरजेचे असते.” ते आपला सकाळ आणि संध्याकाळ असा दोन्ही वेळ त्यांच्या गार्डन मध्ये घालवितात. आपल्या अभ्यासातही यामुळे फायदा होत असल्याचे सांगत असताना यामुळे मानसिक तणाव ही दूर होतो असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

आठवलेंचा एक आमदार, एक खासदार तरी आहे का? NDAमध्ये सामील होणाच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला

पंढरपूर । केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना NDA मध्ये सहभागी  होण्याची ऑफर दिली होती. जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांनी राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं असा सल्ला आठवले यांनी पवारांना दिला होता. त्यावर ”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एक आमदार किंवा एक खासदार तरी आहे का? त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही असं सांगत पवारांनी आठवलेंच्या ऑफरची खिल्ली उडवली. आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर पवार पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक आबा साळुंखे उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना एनडीएत सामील होण्याच्या सल्ल्यावर पवार म्हणाले,”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एक आमदार नाही किंवा एकही खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही.” असं टोला त्यांनी यावेळी लगावला. याशिवाय फडणवीस-राऊत भेटीबाबत पवार यांनी सांगितलं कि, ”खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आठवलेंची पवारांना ऑफर तरी काय होती?
”राजकीय वर्तुळातील आरोप- प्रत्यारोप आणि भूमिका पाहता आमची दोस्ती अशी आहे की त्यांना तिकडे आणि मला इकडे करमत नाही, तर पवारांनीच इथं यावं.तसं झाल्यास पवारांना पुढे मोठं पद मिळू शकतं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला मित्र मिळू शकतो,” असं वक्तव्य करत आठवलेंनी सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. ”जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांना राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं. शिवसेनेसोबत राहण्यात काहीच फायदा नाहीये” असं आठवले यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

सातारा जिल्ह्यात उद्यापासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु – जिल्हाधिकारी शेखर सिंह

shekhar singh

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात उद्या पासून ऑनलाईन बेड व्यवस्थापन सुरु होईल अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. यामुळे आता कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत याची माहिती रुग्णांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. रेमडीसीव्हर इंजेक्शन आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महत्वपूर्ण निवेदन केले यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यात रेमडेसिवीर औषधाची असलेली टंचाई दूर होणार असून हे औषध सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत उपलब्ध होण्यासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांना उपचारासाठी वेळेत बेड मिळावा यासाठी मंगळवार दि.29 पासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेबसाईट सुरू करण्यात येत आहे. बेडची उपलब्धता आणि बेडचे व्यवस्थापन एका क्लिकवर कळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1079601739165588/

सातारा जिल्ह्यात बेडची उपलब्धता व त्याच्या व्यवस्थापनाबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना होत्या. बेड व्यवस्थापनाची माहिती प्रशासनाच्या 1077 या हेल्पलाईनवरूनही माहिती देण्याचा प्रयत्न सुरू होता.ही माहिती मिळावी यासाठी लिंक व वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून या covid19satara.in लिंक द्वारे रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होणार आहे. काही अडचण आली तर टोल फ्री क्रमांक 1077 हा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडूनचं सोडवून घ्यावा – शरद पवार (Video)

पंढरपूर । छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयन राजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजानी मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न भाजपा कडूनच सोडवून घ्यावा असे कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक आबा साळुंखे उपस्थित होते.

मराठा आरक्षांवर विचारलेल्या विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, ”दोन्ही छत्रपती हे राज्यसभेत आहेत. हे दोघेही भाजपच्या मदतीने राज्यसभेत आले. उदयनराजेंची निवड भाजपने केली. आणि संभाजीराजेंनी निवड राष्ट्रपतींनी केली. ती ही पंतप्रधानांच्या सांगण्यावरून म्हणजेच नरेंद्र मोदींच्या. त्यामुळं आमच्या दृष्टीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्या पाठीशी केंद्रातील सत्ताधारी पक्ष आहे. त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवून घेण्यास मदत होईल. त्यामुळं दोन्ही छत्रपतींनी यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना एनडीएत सामील होण्याच्या सल्ल्यावर पवार म्हणाले,”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही.” असं टोला त्यांनी यावेळी लगावला. याशिवाय फडणवीस-राऊत भेटीबाबत पवार यांनी सांगितलं कि, ”खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्था अभिनेता सुशांतसिंग रजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या. मात्र, त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. कृषी विधेयक येण्यापूर्वीही शेतकऱ्यांना त्यांचा मालक इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहे मात्र याचा नेतृत्व कोणी एकटा न करता शेतकरी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

कराडकरांसाठी अभिमानाची गोष्ट! कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 2 हजार कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

krushna hospital

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 2000 हून अधिक कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्ज देण्यात आला असून, येथे कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण झाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 32 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा आज 2006 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे 18 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आज कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण करत 2006 इतका टप्पा गाठला.

आज 32 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्च देण्यात आला. कोरोनामुक्तीची ही लढाई जिंकलेल्या रूग्णांचा सत्कार कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, योगेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

कृष्णा हॉस्पिटलने केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली आहे. महाराष्ट्रात कुठल्याही खाजगी रूग्णालयात कोरोनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोफत उपचार कुठेही दिले गेलेले नाहीत. शिवाय इथे मृत्यूचे प्रमाणदेखील खूप कमी आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सातारा जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे, अशी प्रतिक्रिया कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये रेठरे बुद्रुक येथील 73 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 25 पुरुष, रेठरे हरणाक्ष वाळवा येथील 58 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पिटल येथील 25 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 36 वर्षीय पुरुष, वाठार येथील 49 वर्षीय पुरुष, 85 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 35 वर्षीय महिला, महारूगडेवाडी येथील 28 वर्षीय महिला, आगशिवनगर येथील 56 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 55 वर्षीय पुरुष, कराड येथील 71 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 81 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 23 वर्षीय महिला, नेर्ले वाळवा येथील 60 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, विरवडे येथील 67 वर्षीय पुरुष, आसू फलटण येथील 43 वर्षीय पुरुष, आटके येथील 58 वर्षीय महिला, सैदापूर येथील 54 वर्षीय पुरुष, बोरगाव वाळवा येथील 75 वर्षीय महिला, विद्यानगर येथील 18 वर्षीय मुलगा, शिरवडे येथील 63 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

E-Challan संदर्भात केंद्राने बदलले नियम! आता रस्त्यावर थांबून कागदपत्रांची केली जाणार नाही तपासणी, नवीन नियम जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) अलीकडेच केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये अनेक बदल केले. केंद्राद्वारे अधिसूचित केलेले हे नवीन मोटार वाहन नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात येत आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, आयटी सर्व्हिसेस आणि इलेक्ट्रॉनिक मॉनिटरींग (E-Monitoring) च्या माध्यमातून देशभरात वाहतुकीचे नियम चांगल्या प्रकारे लागू करता येतील. या नवीन नियमांनुसार, आता फक्त कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कोणतेही वाहन रस्त्यावर थांबवता येणार नाही. याद्वारे, लोकांना आता रस्त्यावर थांबवून कागदपत्रे तपासायचा त्रास आणि पेचातून मुक्त होतील.

आता तपासणीसाठी फिजिकल डॉक्‍युमेंट्सची मागणी केली जाणार नाही
या नवीन नियमांनुसार, कोणत्याही वाहनाचे डॉक्‍युमेंट्स कमी किंवा अपूर्ण असतील तर डॉक्‍युमेंट्स त्याच्या रजिस्‍ट्रेशन नंबरद्वारे ई-व्हेरिफिकेशन केली जातील आणि ई-चलान (E-Challan) पाठविले जाईल. म्हणजेच आता वाहने तपासण्यासाठी फिजिकल डॉक्‍युमेंट्सची मागणी केली जाणार नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की जर वाहनांच्या डॉक्‍युमेंट्सची फिजिकल तपासणी केली गेली नाही तर मग वाहनाचे कोणतेही डॉक्‍युमेंट्स एक्‍सपायर झाले आहे कि नाही हे आपल्याला कसे समजेल?

ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल पोर्टलवर नोंदविली जाईल
मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की लाइसेंसिंग अथॉरिटीकडून अपात्र किंवा निरस्त ड्रायव्हिंग लायसन्सची (Driving License) डिटेल पोर्टलमध्ये नोंदविली जाईल, जो वेळोवेळी अपडेट केले जाईल. हे अपडेट केले गेलेल्या डेटा पोर्टलवर दिसून येईल. डॉक्‍युमेंट्सची माहिती अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे वैध असल्याचे आढळल्यास फिजिकल डॉक्‍युमेंट्सची तपासणी करण्याची मागणी केली जाणार नाही. यात ड्रायव्हरने उल्लंघन केल्याची प्रकरणे देखील समाविष्ट असतील ज्यामध्ये डॉक्‍युमेंट्स ताब्यात घ्यावे लागते.

आपल्या वाहनांच्या डॉक्‍युमेंट्स इलेक्‍ट्रॉनिकली मेंटेन करा
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, आता वाहन मालकांना रस्त्यावर थांबण्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आपली डॉक्‍युमेंट्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवणे आवश्यक असेल. जर आपल्याला सोप्या भाषेत समजायचे असेल तर वाहन संबंधित लायसन्स, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट्स यासारख्या आवश्यक डॉक्‍युमेंट्सची पूर्तता सरकारी वेब पोर्टलवर करता येईल. कंपाऊंडिंग, इंम्पाउंडिंग, एन्डोर्समेंट, लायसन्स सस्पेंशन आणि रिव्होकेशन, रजिस्ट्रेशन आणि ई-चलान जारी करणे देखील इलेक्ट्रॉनिक पोर्टलद्वारे शक्य होईल.

अशा वाहनचालकांच्या वागण्यावर वाहतूक विभाग नजर ठेवेल
वाहतूक विभाग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंद ठेवेल. याद्वारे ड्रायव्हरच्या वागण्यावरही नजर ठेवता येईल. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, पोर्टलवरील रद्द केलेला किंवा अपात्र वाहन चालविण्याचा लायसन्सची नोंद वेळोवेळी अपडेट केली जाईल. यामुळे अधिकाऱ्यांना ड्रायव्हरच्या वागण्यावर लक्ष ठेवण्यास मदत होईल. नियमांनुसार, वाहनाशी संबंधित कोणत्याही डॉक्‍युमेंट्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफाय केले गेले असेल तर पोलिस अधिकारी त्याची फिजिकल कॉपी विचारू शकत नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.