Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 5243

औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई! मुंबईहून विक्रीसाठी आणले व जात असलेले चरस आणि एम.डी ड्रग्स जप्त

auranagabad crime

औरंगाबाद प्रतिनिधी | मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एम.डी. नावाचा ड्रग्स आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी आज पंचवटी चौकातून जप्त केले आहे.हा ड्रग्स शहरात विक्रीसाठी आणला जात असावा अशी शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केली आहे. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद , असिक अली मुसा कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी मुंबईचे असल्याचं पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी सांगितलं आहे.

याप्रकरणी अधिक माहिती सांगताना पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे म्हणाले,”आज सकाळी स्कॉर्पिओ वाहनातून अमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती आमचे सहकारी रोडे साहेब व पीएसआय भोसले साहेब यांना मिळताच पोलिसांनी पूर्ण स्टाफच्या मदतीने पंचवटी चौकात सापळा रचून ती चारचाकी वाहन महिंद्रा स्कॉर्पिओ (नंबर MH 20 AK 02 ) थांबवली व त्या गाडीची झडती घेतली असता त्या मध्ये (एम.डी.) मेफोड्रोन नावाचे ड्रग्स च्या 13 पुड्या व चरस नावाचे अमली पदार्थ 25 ग्रॅम च्या दहा पुड्या आढळून आल्या आहे.”

काळ्या बाजारात या ड्रग्स ची सुमारे 80 ते एक लाख रुपये किंमत असावी असा अंदाज आहे.या प्रकरणी दोन्ही आरोपी सहित एक वाहन पोलिसांनी जप्त केली आहे.वेदांत नगर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

WhatsApp तुमचे बँक खातेही रिकामे करू शकते, SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना व्हॉट्सअॅप फ्रॉडबाबत (WhatsApp Fraud) अलर्ट केले आहे. SBI ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार आता बनावट व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांची बँक अकाउंट रिकामे करीत आहेत. SBI च्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपवर केलेली ही छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यात अडथळा आणू शकते. वास्तविक, सायबर गुन्हेगार हे कॉल करून किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेज करून आपल्या बँक खात्यातून पैसे उडवू शकतात. SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील पोस्टमध्ये WhatsApp Scam विषयी डीटेल्स शेअर केले आहे.

सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक कशी करतात?
SBI ने असा इशारा दिला आहे की, सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेजद्वारे ग्राहकांशी संपर्क साधतात. ही फसवणूक करण्यासाठी ते ग्राहकांना त्यांनी लॉटरी किंवा बक्षीसे जिंकली आहेत असे सांगतात. यानंतर, ते ग्राहकांना फेक SBI क्रमांकावर कॉल करण्यास सांगतात. हे सायबर गुन्हेगार ग्राहकांना सांगतात की, बक्षीसाचे पैसे मिळविण्यासाठी आपल्या बँकेची डीटेल्स शेअर करणे अनिवार्य आहे.

SBI लॉटरी योजना किंवा लकी ड्रॉ चालवित नाही
ते ग्राहकांना आश्वासन देतात की, केवळ या डीटेल्सच्या माध्यमातून पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. SBI ने आपल्या ग्राहकांना स्पष्टपणे सांगितले आहे की, बँक कोणतीही लॉटरी योजना किंवा लकी ड्रॉ चालवित नाही. किंवा बँक कोणत्याही प्रकारचे गिफ्ट देत नाही. म्हणूनच ग्राहकांना या बनावट कॉलवर किंवा व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर अवलंबून राहू नका.

बँक फोनवर डीटेल्स विचारत नाही
SBI ने आपल्या ग्राहकांना सांगितले की, बँक कधीही ग्राहकांना कॉल करत नाही आणि त्यांच्या बँक खात्याच्या पर्सनल डीटेल्स विचारत नाहीत. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती जर व्हॉट्सअॅप कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे तसेच फोन व ईमेलद्वारे अशी माहिती विचारत असतील तर तत्काळ सावध राहा. कदाचित आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असेल.

SBI ने सर्व ग्राहकांना अशा फसवणूकीपासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी लोकांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला SBI ने ग्राहकांना ईमेल फिशिंगबाबत सावध राहण्यास सांगितले होते.

आपल्याला फसवणूक टाळायची असल्यास ‘या’ पद्धतींचे अवलंब करा

> कोणाबरोबरही तुमचे बँक डीटेल्स, पिन कोड किंवा पासवर्ड शेअर करू नका. कोणालाही आपला ID कार्ड फोटो, क्रेडिट कार्ड किंवा सेंसिटिव डॉक्यूमेंट देऊ नका.

> सार्वजनिक Wi-Fi वर आपले नेटबँकिंग अकाउंट लॉग इन करू नका. हॅकरने नेटवर्कला इनफेक्टेड केल्याची आणि आपली पर्सनल डिटेल्स हॅक होण्याची शक्यता आहे.

> अनावश्यक लिंक्स, इमेज, GIFs इत्यादीवर क्लिक करणे टाळा.

> जर कोणी तुमच्याकडून वैयक्तिक माहिती विचारत असेल आणि लॉटरी वगैरे बद्दल बोलत असेल तर बँकेशी संपर्क साधा. बँक कर्मचारी आपल्याला कधीही OTP किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करत असेल तर आम्ही.. ; राऊतांचा कंगनाला सूचक इशारा

मुंबई । मुंबईतील जुहू येथील कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आलं असून बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी आपण बाजू मांडणार असून कोणी महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही असा इशाराही दिला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “मी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एका सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक आहे. आम्हाला हे बाळकडू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्वांनी दिलं आहे. जर कोणी महाराष्ट्राची बदनामी करत असेल, आमच्या नेत्यावर चिखलफेक करत असेल तर उसळून उठलं पाहिजे. आम्ही काही षंढासारखे बसून राहणार नाही”.

“उद्धव ठाकरे यांचीही तीच भूमिका आहे. मी महाराष्ट्राची भूमिका मांडली म्हणजे शिवसेनेची भूमिका मांडली. व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करु नका, केली तर आम्ही उसळून उठू,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार – संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष पूर्ण करणार, असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला पूर्णविराम बसला आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात होती.परंतु संजय राऊत यांनी या सर्व शक्यतेणा आता पूर्णविराम दिला आहे. तसेच निवडणुका कधी घ्यायच्या हे निवडणूक आयुक्त ठरवतात, चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणूक आयोगाने एखादी जबाबदारी दिली असेल तर माहित नाही, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलाना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, राजकीय पक्षात संवाद असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजप मधील महत्त्वाचे नेते आहेत. आणि त्यांच्याकडे ज्या अर्थाने बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.  त्यावरून राष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचं कार्य वाढत आहे. राज्यापुढे अनेक प्रश्न असतात, अशावेळी राजकीय पक्षात संवाद असला पाहिजे, असा हा संवाद होता, या भेटीनंतर कुणीही नाराज होत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत मी नक्की घेणार आहे. मी यापूर्वी पवार साहेबांची मुलाखत घेतली होती. तसेच मी राहुल गांधी आणि अमित शहा यांनाही मुलाखती साठी विनंती करणार आहे असेही संजय राऊत म्हणाले.

बिहार निवडणुकीबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. बिहारमध्ये शिवसेना कायम काही जागा लढवत असते, तेथील शिवसेना उमेदवारांना चांगला प्रतिसाद उमेदवारांचा मिळत असेल, तर ते योग्य आहे, कारण अनेक कार्य़कर्ते वर्षानुवर्ष तेथे शिवसेनेसाठी काम करतायत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

आता चेकद्वारे पेमेंट करण्याचा मार्ग बदलणार, 1 जानेवारीपासून लागू होणार RBI चा नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी एक नवीन सिस्टम आणत आहे. RBI ने त्याचे नाव ‘Positive Pay System’ असे ठेवले आहे. त्याअंतर्गत चेक पेमेंटद्वारे 50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम भरल्यावर काही महत्त्वाच्या माहितीची पुष्टी करावी लागेल. मात्र, या सुविधेचा लाभ घेणार आहे की नाही हे खातेधारकावर अवलंबून असेल. परंतु बँका चेकद्वारे 5 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम भरण्यासाठी ही सुविधा अनिवार्य करेल अशी शक्यता आहे.

Positive Pay System कसे काम करेल?
Positive Pay System अंतर्गत जो चेक देईल त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, पैसे देणारी व्यक्ती (Payee) व पेमेंटची रक्कम इत्यादीविषयी पुन्हा माहिती द्यावी लागेल. चेक देणारी व्यक्ती SMS, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती देऊ शकते.

यानंतर, चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची उलट तपासणी केली जाईल. त्यात काही दोष आढळल्यास त्यास ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’ (CTS – Cheque Truncation System) च्या सहाय्याने ड्रॉ बँक (ज्या बँकेत चेक पेमेंट करायचे आहे) आणि प्रेझेटिंग बँक (ज्या बँकेतून चेक देण्यात आला आहे) त्यावर चिन्हांकित करून माहिती दिली जाईल. अशा परिस्थितीत आवश्यक ती पावले उचलली जातील असे RBI ने म्हटले आहे. त्याच प्रकारे, आणखीही बरेच काही आहेत.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) Positive Pay System साठी CTS मध्ये एक नवीन सुविधा विकसित करेल. यानंतर ती सर्व बँकांना उपलब्ध करुन दिली जाईल.

लोकांना जागरूक करण्यावर भर
रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की, 1 जानेवारी 2021 पासून ही Positive Pay System लागू केली जाईल. यासह लोकांना या फिचर विषयी लोकांना माहिती देण्यासाठी पुरेशी जागरूकता वाढविण्याचा सल्ला बँकांना देण्यात आला आहे. बँका SMS अलर्टद्वारे, शाखा, एटीएम, वेबसाइट्स आणि इंटरनेट बँकिंगद्वारे हे करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

कोरोनानंतर आणखी एका विषाणूचा धोका; ICMRकडून सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली । कोरोना नावाच्या विषाणूने घातलेला धुडगूस आजही कायम आहे. चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोनाने साऱ्या जगाच्याच नाकीनऊ आणले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. आजही दिवसाला एक लाखाच्या आसपास रुग्ण देशात सापडत आहेत. या महामारीने झालेले आर्थिक नुकसान दुरगामी आहे. मात्र अशातच आता नव्या व्हायरसचा शोध लागला आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी कॅट क्यू व्हायरस (CQV) नावाचा एक विषाणू शोधून काढला आहे. या विषाणूमध्ये देशात रोगाचा प्रसार करण्याची क्षमता आहे. तसेच, हे विषाणू आर्थ्रोपॉड-जनित विषाणूंच्या श्रेणीमध्ये येतात. ते कुलेक्स नावाच्या डासांच्या व्यतिरिक्त डुकरांमध्ये देखील आढळतात. वृत्तानुसार, चीन आणि व्हिएतनाममधील लोक मोठ्या प्रमाणावर या सीक्यूव्ही विषाणूमुळे पीडित असल्याचे आढळले आहे. भारतात सुद्धा सीसीक्यूपासून होणारा रोग पसरण्याची शक्यता आहे.

भारतात दोन लोकांच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीक्यूव्ही आयजीजी अँटीबॉडीज आढळले आहेत. आयसीएमआरच्या वैद्यकीय जर्नल आयजेएमआरच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही नमुने कर्नाटकात २०१४ आणि २०१७ मध्ये घेण्यात आले होते. आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की, जर हा विषाणूचा प्रसार झाला तर सार्वजनिक आरोग्यावर संकट उद्भवू शकते. दोन्ही व्यक्तींच्या सीरम नमुन्यांमध्ये अँटी-सीसीक्यू आयजीजी अँटीबॉडीज सापडल्यावर डासांमधील सीक्यूव्हीच्या रेप्लिकेशन म्हणजेच संख्या वाढविण्याच्या क्षमतेची तपासणी करण्यात आली. संशोधकांच्या मते, हे सूचित करते की, भारतात सीक्यूव्ही-जनित रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बचावात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांना सीरमच्या नमुन्यांची तपासणी आणि चाचणी करणे आवश्यक आहे.

सीक्यूव्ही विषाणूचे प्राथमिक होस्ट डुक्कर आहेत आणि याचा प्रसार करणाऱ्या डासांमुळे लक्षात येते की, भारतात ऑर्थोबुनिया विषाणू गंभीर आरोग्याच्या संकटाला कारणीभूत ठरू शकते, असे आयसीएमआरच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. आयसीएमआरने सांगितले की, मानवी सीरम नमुन्यांमध्ये अँटी सीव्हीसी आढळल्यानंतर भारतातील डासांमधील त्याचे वागणे समजण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रजातींचे परीक्षण केले गेले. या तपासणीत असे दिसून आले आहे की, भारतात आढळणारे डास विषाणूच्या प्रति संवेदनशील आहेत आणि सहज संक्रमित होऊ शकतात. हे डास इतर डुकरांना आणि मानवांमध्ये देखील संसर्ग पसरवू शकतात.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, सीक्यूव्हीसाठी मॉलिक्युलर आणि सेरोलॉजिकल तपासणी विकसित करण्याची आवश्यकता आहे. लोकांव्यतिरिक्त डुकरांची तपासणी आणि डासांमधील याचे रेप्लिकेशन देखील तपासणी आवश्यकता आहे. असे यासाठी केले पाहिजे की, जेणेकरून संकट गंभीर होण्यापूर्वी आवश्यक तयारी केली जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

कृषी कायद्यांना राज्य सरकारचा विरोध; अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरु

मुंबई । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना महाराष्ट्रात विरोध दर्शवला आहे. केंद्राच्या कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार कृषी कायद्यांविषयीचे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी विषयक कायदे संसदेत मंजूर होण्याआधी केंद्र सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यादेश जारी केले होते. हे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने १० ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान केंद्र सरकारने या अध्यादेशाचे नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात कायद्यात रुपांतर केले आहे. मात्र हे कायदे राज्यात लागू न करण्याची भूमिका महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतली आहे. तर शिवसेनेचाही या कायद्यांना विरोध आहे.

त्यामुळेच १० ऑगस्ट रोजी अध्यादेश लागू करण्याबाबत जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या स्तरावर सुरू आहे. येत्या एक दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

जमिनीच्या मशागतीसाठी उपयुक्त रोटावेटरची देखभाल कसे करायचे जाणून घेऊया 

Rotavater

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली सर्वच क्षेत्रात बऱ्याचशा कामांची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा शेतीचे बरीचशी कामे यंत्राच्या साह्याने केले जातात. काही यंत्र बैलचलीत काही स्वयंचलित आणि ट्रॅक्‍टरचलित यंत्रांचा यामध्ये समावेश आहे.  ट्रॅक्टर चलीत यंत्रांमध्ये रोटावेटर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. जमिनीची नांगरट केल्यानंतर निघालेली ढेकूळ फोडण्यासाठी रोटावेटरचा वापर होतो हे सर्वांनाच ज्ञात आहे. रोटावेटरचा वापर केल्याने जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते.याचा उपयोग बऱ्याचदा केला जातो मात्र त्याची देखभाल केली जात नाही , आज रोटावेटरच्या देखभालीसंदर्भात जाणून घेऊया.

रोटावेटरच्या सर्व फिरणाऱ्या भागांना वंगण द्यावे व सर्वे ग्रीसिंग पॉईंट्स ग्रीस लावावे. गिअर बॉक्समधील वंगन ऑइलची पातळी तपासावी आणि ते कमी असल्यास त्यात योग्य ग्रेडचे ऑइल घालावे. ऑइल  संपले असल्यास ते बदलावे. रोटावेटरची पाती सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पाती वाकडी किंवा मोडली असल्यास गरजेनुसार ती बदलावीत किंवा दुरुस्त करावी. चेन पॉकेट व चेन केसमधील तेल तपासावे आणि साडेचारशे तास वापरल्यावर तेल बदलावे. चेनचा ताण योग्य स्थितीत ठेवावा. रोटावेटर वापरण्यापूर्वी त्याची सर्व नट बोल्ट घट्ट आवळावीत.

रोटावेटरचा वापर करण्यापूर्वी काही प्राथमिक तपासण्या करून घ्याव्यात. जसे की, पोलादी पाते व मुख्य चौकटीचे नट बोल्ट तपासून घट्ट करावेत. गिअर बॉक्समधील तेलाची पातळी तपासून आवश्यक असल्यास तेल टाकावे. तेल टाकीच्या तळाशी असलेल्या लेव्हल काठीच्या साह्याने तपासून ऑइलची पातळी योग्य प्रमाणात तपासून तेलाची पातळी योग्य प्रमाणात ठेवावी ठेवावी.  नेहमी पुरेशी अतिरिक्त पाती व शिफारस केलेले नट बोल्ट ट्रॅक्टर सोबत दिलेल्या अवजारांच्या पेटीत आहेत याची खात्री करून घ्यावी. रोटावेटर ट्रॅक्टरला जोडताना सर्व लिंक्स व्यवस्थित जोडल्या गेल्या आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी.

तसेच प्रत्यक्ष शेतात काम सुरू असतानाही काही काळजी घ्यावी  लागते. रोटावेटर शेतात वापरताना अथवा वाहतुकीच्या वेळी तो १० ते १५ सेंटिमीटर पेक्षा सहसा जास्त उचलू नये.कारण पीटीओ शाफ्ट व कार्डेन शाफ्ट यामधील कोण ती संशोधनपेक्षा जास्त असता कामा नये. पात्यांचा फिरण्याचा वेग पीटीओच्या वेगावर आधारित असल्याने एक्सलेटर वाढवून तो आवश्यक तेवढा ठेवावा. माती कोरडी व काहीशी टणक असेल तर मात्र पहिल्या लो गियरमध्ये ट्रॅक्टर चालवावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं राम मंदिराचं श्रेय, मोदींबाबत केलं ‘हे’ धक्कादायक विधान

नवी दिल्ली ।  अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या योगदानावरून मोदींवर निशाणा साधला आहे.

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काहीही योगदान नाही. सरकारमध्ये असताना त्यांनी यासंदर्भात असं कोणतही काम केलेलं नाही, असं सांगत स्वामी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींना राम मंदिराचं श्रेय दिलं आहे. टीव्ही ९ भारतवर्ष वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी धक्कादायक विधान केलं आहे.

“पंतप्रधानांचं यामध्ये कोणतंही योगदान नाही. राम मंदिर प्रकरणात सर्व चर्चा आम्ही लोकांनी केली आहे. सरकारच्या वतीनं त्यांनी असं कोणतंही काम केलेलं नाही, जे मला माहिती आहे किंवा ज्यामुळे म्हणू शकतो की, निर्णय आला. मूळात ज्यांनी यात काम केलं आहे, त्यांचं मी नावं घेतलं आहे. यात पहिलं नावं राजीव गांधी यांचं आहे,” असं स्वामी म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील आमदाराच्या घरावर पोलिसांची धाड; अलिशान मोटारी, किमती वस्तू जप्त

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे । पुण्यातील एका आमदाराच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे. एका सहकारी बॅंकेसंदर्भातील घोटाळ्याबाबत हे छापे असल्याचे सांगण्यात आले. यावर पोलिस लवकरच अधिकृत माहिती देतील, असे स्पष्ट करण्यात आले.

याआधी एका सहकारी बॅंकेतील तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी सदर आमदारावर आमदारावर गुन्हे दाखल झालेले आहेत. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीस जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार आहेत. ही धाड संपत्ती जप्त करण्यासाठी झाली की प्रकरणाच्या तपासासाठी झाले, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

पोलिसांच्या या धाडीत संबंधित आमदाराच्या आलिशान गाड्या, किमती वस्तू यावर जप्ती आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही जणांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. यात पुणे जिल्हा परिषदेचा माजी पदाधिकारी असलेल्या नेत्याचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. या बँकेचे रिझर्व्ह बँकेने 2018-19 चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.