Friday, December 19, 2025
Home Blog Page 5251

पत्नीला मारहाण करणाऱ्या मध्य प्रदेशातील IPS अधिकाऱ्याला केलं सेवेतून बडतर्फ; व्हिडिओ झाला होता व्हायरल

भोपाळ । मध्य प्रदेशाचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा आपल्या पत्नीला मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. धक्कादायक म्हणजे शर्मा यांना प्रेय़सीसोबत त्यांच्या पत्नीने रंगेहाथ पकडल्याने ही मारहाण केल्याचे कबूल केले होते. दरम्यान, पुरषोत्तम शर्मा यांना सेवेतून मुक्त करत त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

पत्नीने प्रेयसीसोबत पकडल्याने भडकलेल्या आयपीएस शर्मा यांनी घरी येत पत्नीवर हल्ला केला. तिचा गळा काखोटीत धरून तिला जमिनीवर पाडले आणि जोरदार हातबुक्के लगावले. शर्मा यांच्या घरात तैनात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीला यातून सोडविले. यावर पुरुषोत्तम शर्मा यांच्या मुलाने त्यांची तक्रार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली असून वडिलांवर कारवाईची मागणी केली होती. शर्मा यांच्या पत्नीने बचावासाठी त्यांच्यावर कात्रीने वार केले होते.

शर्मा यांच्या मुलाने वडीलांचा या कृत्याचा हा व्हिडीओ गृह मंत्री नरोत्तम मिश्रा, डीजीपी आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांना पाठविला होता. मात्र, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले होते. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाईही झालेली नव्हती. मुख्यमंत्र्यांनाही हा व्हिडीओ पाठविण्यात आल्याने या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, पुरषोत्तम शर्मा यांना सेवेतून मुक्त करत त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

https://twitter.com/DesiPoliticks/status/1310492044809428996?s=20

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”. 

SBIच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 30 सप्टेंबर रोजी Debit-Credit Card वरील ‘या’ सेवा होणार बंद; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना एक विशेष मेसेज पाठविला आहे. यामध्ये ग्राहकांना असे सांगितले गेले आहे की, 30 सप्टेंबर 2020 पासून त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील (Debit-Credit Card) काही सेवा बंद केल्या जात आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या नव्या नियमांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे बँकेने म्हटले आहे. या सेवा आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आताया कार्डावर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी सुरू ठेवायची असेल तर आपल्या कार्ड क्रमांकाचे शेवटचे चार अंक लिहून INTL नंतर 5676791 वर मेसेज पाठवावा असे बँकेने म्हटले आहे. कार्डधारकांच्या नियमात RBI ने काय बदल केलेले आहेत ते जाणून घ्या.

जानेवारी 2020 मध्येच लागू होणार होते नियम, मात्र कोविड -19 मुळे पुढे ढकलण्यात आले
RBI 30 सप्टेंबर 2020 पासून डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नियम बदलत आहे. जर आपणही डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरत असाल तर आपल्याला याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे झालेली विलक्षण परिस्थिती लक्षात घेता हे कार्ड लागू करणार्‍यांना नियम लागू करण्यासाठी RBIने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. यापूर्वी हे नियम जानेवारी 2020 मध्ये अंमलात येणार होते, परंतु ते मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आले. मात्र नंतर, कोविड -19 मुळे ते पुढे ढकलले गेले आणि आता ते 30 सप्टेंबरपासून लागू केले जात आहेत.

व्यवहाराला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांना स्वत: ची नोंदणी करावी लागेल
RBI च्या नवीन नियमांनुसार ग्राहकांना आंतरराष्ट्रीय, ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस कार्ड व्यवहारांसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागेल. म्हणजेच ग्राहकांना ही सेवा आवश्यक असल्यासच मिळेल. जर आपल्याला सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर ग्राहकांना आता त्यासाठी अर्ज करावा लागेल. रिझर्व्ह बॅंकेने बँकांना सांगितले आहे की, डेबिट आणि क्रेडिट कार्ड देताना ग्राहकांना घरगुती ट्रान्सझॅक्शन करण्यास परवानगी द्यावी. हे स्पष्ट आहे की, जर आता गरज नसेल तर एटीएम मशीनमधून पैसे काढणे आणि पीओएस टर्मिनलवर खरेदीसाठी परदेशी ट्रान्सझॅक्शन्सना परवानगी देऊ नका.

आता ग्राहक कधीही त्याच्या ट्रान्सझॅक्शनची लिमिट बदलू शकतो
सध्याच्या कार्डांसाठी, जारीकर्ता त्यांच्या जोखीम समजानुसार निर्णय घेऊ शकतात. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर, आता हे तुम्हाला ठरवायचे आहे की, तुम्हाला तुमच्या देशांतर्गत ट्रान्सझॅक्शन पाहिजे की तुमच्या कार्डावर आंतरराष्ट्रीय ट्रान्सझॅक्शन. आता कोणती सेवा एक्टिवेट करावी आणि कोणती डीएक्टिवेट करावी हे ग्राहक ठरवेल. ग्राहक 24 तास आणि सात दिवसांत केव्हाही त्याच्या ट्रान्सझॅक्शनचे लिमिटही बदलू शकतो. दुसऱ्या शब्दांत, आता आपण मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीन, आयव्हीआरद्वारे कधीही ट्रान्सझॅक्शनची लिमिटवर जाऊन आपले एटीएम कार्ड सेट करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

लग्नाचे आमिष दाखवून कॉलेज तरूणीचे लैंगिक शोषण

sexual abuse

औरंगाबाद प्रतिनिधी | लग्नाचे आमिष दाखवून कॉलेज तरुणाने काॅलेज तरूणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील जवखेडा येथे हा प्रकार घडला आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर एका तरूणाने १७ वर्षीय तरूणीचे लैंगिक शोषण केले. अक्षय ज्ञानेश्वर इंगळे असे तरूणीचे लैंगिक शोषण करणार्‍या आरोपीचे नाव आहे.

पीडित तरूणी व अक्षय इंगळे हे दोघे फुलंब्री तालुक्यातील जवखेडा येथे असलेल्या शिवछत्रपती ज्युनिअर महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी पीडित तरूणीसोबत अक्षय इंगळेची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबधात झाल्यानंतर अक्षय इंगळे याने नोव्हेबर २०१९ ते पेâब्रुवारी २०२० या काळात विविध ठिकाणी नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. पीडितेने लग्नासाठी तकादा लावल्यावर अक्षय इंगळे याने लग्न करण्यास नकार देत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, पीडित तरूणीच्या तक्रारीवरून अक्षय इंगळे याच्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अश्लेषा पाटील करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठी घोषणा, आता Processing Fees शिवाय कमी व्याजदरावर उपलब्ध होणार Loan

हॅलो महाराष्ट्र । सणासुदीच्या या हंगामात ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने आपल्या रिटेल ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. देशाच्या सर्वात मोठ्या बँकेने आज जाहीर केले आहे की YONO मार्फत कार, सोने, घर किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. कार लोनसाठी (SBI Car Loan) अर्ज करणाऱ्या ग्राहकांना किमान 7.5% दराने कर्ज मिळेल. यासह निवडक मॉडेल्सवर त्यांना 100 टक्के ऑन-रोड फायनान्स देण्याची सुविधादेखील देण्यात येणार आहे.

होम लोनसाठी स्पेशल फेस्टिव ऑफर्स
SBI ने गृह खरेदीदारांसाठी होम लोनसाठी स्पेशल फेस्टिव ऑफर जाहीर केली आहे. अप्रुव्ड प्रोजेक्ट्समध्ये घरे खरेदी करणार्‍या ग्राहकांना एसबीआय होम लोनवर (SBI Home Loan) कोणतीही प्रोसेसिंग फीस (Zero Processing Fees) द्यावी लागणार नाही. तसेच ही बँक चांगला क्रेडिट स्कोअर (Credit Score) आणि लोन अमाउंट असलेल्या ग्राहकांना व्याज दरामध्ये 0.10 टक्के विशेष सवलत देत आहे. हे ग्राहकांनी SBI च्या योनो अॅपद्वारे अर्ज केल्यास त्यांना विशेष 0.5 टक्के सूट मिळेल.

गोल्ड लोन घेणार्‍या ग्राहकांना खास ऑफर
SBI ने गोल्ड लोन (SBI Gold Loan) घेणाऱ्या ग्राहकांसाठी देखील ऑफर जाहीर केल्या आहेत. अशा ग्राहकांना किमान 7.5 टक्के व्याज दरावर 36 महिन्यांसाठी गोल्ड लोनची परतफेड करण्याची सुविधा असेल. सध्याच्या संकटात ग्राहकांना परवडणारी कर्जाची उपलब्धता पाहता SBI 9.6 टक्के दराने पर्सनल लोन ऑफर (SBI Personal Loan Offer) देत आहे.

YONO APP वर प्री-अप्रुव्ड पेपरलेस लोनची सुविधा
डि​जिटल बँकिंगची वाढती उपयुक्तता आणि मागणी लक्षात घेता SBI ने YONO APP युझर्ससाठी ऑफर देखील जाहीर केली आहेत. योनो अॅप द्वारे या ग्राहकांना इन-प्रिंसिपल अप्रुवलच्या आधारे कार लोन आणि गोल्ड लोनसाठी अर्ज करण्याची संधी मिळाली आहे.

प्री-अप्रुव्ड लोनसाठी पात्रता कशी तपासायची?
SBI ग्राहकांना केवळ 4 क्लिकमध्ये योनो अॅपद्वारे प्री-अप्रुव्ड पेपरलेस पर्सनल लोन मिळेल. यासाठी, ग्राहकांनी पहिले त्यांची पात्रता तपासली पाहिजे. प्री-अप्रुव्ड लोनसाठी पात्रता तपासण्यासाठी ग्राहकांना मेसेज बॉक्समध्ये PAPL <space> <last 4 digits of SBI a/c no.> टाइप करून 567676 वर एसएमएस पाठविणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राज्यातील विविध ठिकाणच्या धरणक्षेत्रात पाणीसाठ्यांमध्ये वाढ 

Dams

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील मध्यम आणि मोठ्या मिळून एकूण ३२६७ प्रकल्पांमध्ये ११११ टीएमसी म्हणजेच ७६.९८ पाणीसाठा झाला आहे.  जून जुलै अखेर पुरेसा पाऊस न झाल्याने यंदा धरणे भरतील का नाही याची चिंता सतावत असताना धरणांचा पाणीसाठा वाढल्याने दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे  धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मराठवाड्यातील  धरणांमध्ये वर्षभर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा झाला असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

जून आणि जुलैमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. घाटमाथ्यावर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. विदर्भातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. ऑगस्टमध्ये बहुतांशी ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरुन वाहत होते. परिणामी धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली.  सध्या राज्यातील धरणांमध्ये  ७६.९८ टक्के  पाणीसाठी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १३ टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे.  गेल्यावर्षी सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणांमध्ये  कमी प्रमाणात पाणीसाठा झाला होता. मात्र ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे धरणे भरली , यामुळे उन्हाळ्यात तुलनेने कमी प्रमाणात पाणीटंचाई भासली होती

गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यांतील सर्व धरणांमध्ये  मिळून ६३.९८ टक्के पाणीसाठा होता.  चालू वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश धरणांमध्ये तलुनेने चांगला पाणीसाठा झाला आहे. मराठावाड्यातही जुन,जुलै महिन्यात पाऊस कमी झाला होता, पण ऑगस्टमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली. मराठवाड्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये  मिळून सध्या ६३ टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्यावर्षी  या कालावधीत मराठावाड्यातील प्रकल्पांमध्ये  अवघा २९.८९ टक्के पाणीसाठा होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

गॅंगस्टरला मुंबईहून घेऊन जात असताना UP पोलिसांची गाडी पलटी; गॅंगस्टर जागीच ठार

गुना । उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या बहुचर्चित गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. एका वाँटेड गँगस्टरला मुंबईतून अटक करुन उत्तर प्रदेशला नेत असताना वाटेत मध्य प्रदेशमध्ये युपी पोलिसांची कार अचानक पलटी झाली. या अपघातात सदर गँगस्टर जागीच ठार झाला तर काही पोलीसही जखमी झाले.अपघातात ठार झालेल्या गॅंगस्टरचे नाव फिरोज अली उर्फ शामी असे होते. कमालीची बाब म्हणजे, गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरच्या वेळी सुद्धा त्याला अटक करून घेऊन जात असताना वाटेतच उत्तर प्रदेश पोलिसांची कार पलटी झाली होती.

लखनऊ पोलिसांच्या टीमने शनिवारी फिरोज अलीला नालासोपारा येथील झोपडपट्टीतून अटक केली होती. पोलीस त्याला कारने उत्तर प्रदेशला नेत असताना, मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात पोलिसांची कार पलटी झाली. त्यामध्ये फिरोज अलीचा मृत्यू झाला. या अपघातात तीन पोलीसही जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग २६ वर अपघाताची ही घटना घडली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, या घटनेने गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलिस हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलीस मध्य प्रदेशातून अटक करुन, उत्तर प्रदेशला घेऊन येत असताना अशाच प्रकारे वाहन पलटी झाले होते. त्यानंतर तिथून पळण्याचा प्रयत्न करणारा विकास दुबे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

मोफत रेशन घेण्यासाठी यापुढे रेशनकार्डची गरज भासणार नाही, सरकारने बदलले यासाठीचे नियम

Reshan Card List Maharashtra

हॅलो महाराष्ट्र । रेशन कार्डला आधार लिंक करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. मोदी सरकार या दिशेने काम करत आहे. एकदा आधारशी लिंक केल्यानंतर ग्राहकांना रेशन दुकानांवर रेशनकार्ड बाळगण्याची गरज भासणार नाही. रेशनकार्ड क्रमांकासह दुकानदार धान्याचा वाटा ग्राहकांना देईल. लॉकडाउनची अंमलबजावणी केल्यानंतर केंद्र सरकारने रेशनकार्ड नसलेल्या अशा लाभार्थ्यांना मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती. दिल्लीसह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या आदेशाचे अनुसरण करीत रेशनचे विनामूल्य वितरण करीत आहेत. ही योजना पहिले तीन महिन्यांसाठी लागू केली गेली, परंतु नंतर केंद्र सरकारने त्यास नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. Reshan Card List Maharashtra

रेशन घेण्यासाठी अधिक रेशनकार्डची आवश्यकता नाही
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘ज्या लोकांकडे रेशनकार्ड नाही, असे असूनही त्या लोकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळी दिली जात आहेत, परंतु सरकारची ही योजना केवळ नोव्हेंबरपर्यंतच आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यानंतरही ज्या लोकांना रेशनकार्ड आधारशी जोडले गेले आहे त्यांना रेशन कार्ड नसतानाही रेशन मिळणार आहे.

पंतप्रधान मोदींनी 30 जून 2020 रोजी देशाला संबोधित केलेल्या भाषणात, देशातील सण आणि आगामी काळात होणाऱ्या उत्सवांचा विचार करता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKY) पुढील 5 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. याअंतर्गत, देशातील 80 कोटीहून अधिक NFSA लाभार्थी दरमहा पात्रतेव्यतिरिक्त प्रत्येक कुटुंबाला 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि 1 किलो हरभरा प्रदान करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्यानं गर्लफ्रेंडवर गोळी झाडून रस्त्यात दिले फेकून

नवी दिल्ली । एका पोलीस अधिकाऱ्यानं गर्लफ्रेंडवर गोळी झाडून तिला रस्त्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीच्या अलीपूर भागात ही धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आयएएनएसने दिले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती आता स्थिर असल्या मिळत आहे.

जखमी महिला आणि आरोपी दोघेही परस्परांना ओळखतात. वर्षभरापासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते असे सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यातील जखमी महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप दाहिया यांनी आपल्यावर गोळी झाडली असल्याचे तिने सांगितले. संदीप दाहिया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

दाहिया हे दिल्लीतील लाहोर गेट येथील पोलीस ठाण्यात तैनात आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार दाहिया यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु होता. ते पत्नीपासून विभक्त होण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

डिझेल सलग दुसर्‍या दिवशी झाले स्वस्त, पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । मागणी कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही क्रूड तेलाच्या किंमती खाली येत आहे. त्याचा फायदा सर्वसामान्यांनाही होताना दिसतो. मात्र, हा लाभ अंशतः मानला जाईल परंतु पूर्ण नाही. वस्तुतः आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या पद्धतीने कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे त्या प्रमाणात देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेल च्या किंमतीत कपात केली नाही. दरम्यान तेल कंपन्यांनी सलग अनेक दिवस पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र, आज सलग दुसर्‍या दिवशी वेगवेगळ्या शहरांमध्ये डिझेल स्वस्त झाले आहे.

सप्टेंबरमध्ये 1.02 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल
ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यात आज पेट्रोलच्या दरात निरंतर वाढ झाली. राजधानी दिल्लीतच पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 16 आठवड्यांमध्ये एकूण 1 रुपये 65 पैशांची वाढ झाली. मात्र, काही काळ ते देखील कमी झाले आहे. 21 सप्टेंबरपर्यंत ते प्रतिलिटर अंदाजे 1.02 रुपयांनी कमी झाले आहे.

बऱ्याच दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजही वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोलचे दर स्थिर आहेत. आज चेन्नईत पेट्रोलची किंमत 84.14 रुपये, दिल्लीत 81.06 रुपये, कोलकातामध्ये 82.59 रुपये आणि मुंबईत 87.74 रुपये आहे.

सोमवारी डिझेलची किंमत किती आहे?
आज सलग दुसर्‍या दिवशी झालेल्या कपातीनंतर चेन्नईत डिझेलची नवीन किंमत प्रतिलिटर 76.27 रुपये झाली आहे. डिझेल आज 13 पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. राजधानी दिल्लीत आज डिझेलच्या दरात प्रतिलिटर 14 पैशांची घसरण झाली आहे, त्यानंतर नवीन किंमत 70.80 रुपये प्रति लिटरवर आली आहे.

कोलकातामध्येही डिझेलचे दर आज 14 पैशांनी खाली आले आहेत. यानंतर कोलकातामध्ये डिझेलची किंमत प्रतिलिटर 74.32 रुपये झाली आहे. त्याचबरोबर आज मुंबईतील लोकांना डिझेल आघाडीवर किरकोळ दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज डिझेल 14 पैशांनी स्वस्त होऊन 77.22 रुपये प्रति लिटर झाले आहे. सलग दोन दिवस डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर कालही अशीच घट दिसून आली. म्हणजेच दोन दिवसांतच या शहरांमध्ये डिझेलच्या दरात प्रति लिटर 28 ते 30 पैशांची घट झाली आहे.

अशा प्रकारे आपल्या शहरातील आजचे दर तपासा
पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दर कसे माहित होतील. इंडियन ऑईल ग्राहक RSP वर सिटी कोड लिहून 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात तर बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि त्यास 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत कळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

शिवसेना आमदाराच्या मुलीचे थेट पंतप्रधान मोदींना खरपूस पत्र; शेतकरी विधेयकावरुन म्हणाली…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवडयाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. मात्र, यानंतर देशभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. शेतकरी रस्त्यावर उतरून या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत.

महाराष्ट्रातही मोदी सरकारच्या या कृषी कायद्यांना शेतकरी विरोध करत आहे. उद्योगपत्यांना लाभ मिळवा यासाठी शेतकऱ्याचे शोषण करणारे हे कायदे मोदी सरकारने आणल्याचे शेतकरी म्हणत आहे. तर राज्यातील भाजप वगळता इतर राजकीय नेतेही या कृषी कायद्याला विरोध करता आहेत. अशातच आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांनी शेतकरी विधेयकाला विरोध करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडे बोल सूनवणारे खुले पत्र लिहिले आहे

काय म्हणाली आकांक्षा पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रात..

आदरणीय पंतप्रधान
सप्रेम नमस्कार,

हाडे आणि मांस वेगळे करून जसे व्यायामाचे नियम बनवता येत नाही, तसेच शेती आणि शेतकरी यांना वेगळे करून भारतमातेच्या भांगातील हिरवळीचे नियम तरी कसे बनतील? काल-परवा तुमच्या सरकारने ३ विधयेके पारित केली. त्यांची नावे जेवढी मोठी आहेत तेवढा त्याचा फायदा आम्हाला मिळेल कि नाही यात शंका आहे. तुम्ही नेहमी म्हणता भारतीय शेतकऱ्याचा प्रवास हा “कृषक ते कृषीद्योजक ” असा करायचा आहे पण प्रत्यक्षात मात्र असे काहीच होताना दिसत नाही या उलट शेतीत येणारी उद्योजकता माती नासवत आहे आणि परिणामी बैलगाड्या पेक्षा चारचाकी गाड्या जास्त वाढत आहे. १ एकरातील पिवळ्या दगडाला केव्हा १ तोळे सोन्याच्या हिशोबाने पाहिले जाणार ? जर अशी उद्योजकता येणार असेल तर भारतीय शेतीला पुन्हा ब्रिटीशकालीन शेतीचे रूप येईल.

आपल्या देशात कोटीत घोटाळा केलेल्यांना बाहेर देशात राहण्याचे स्वतंत्र आहे. पण देशात राहून देशाच पोट भरणाऱ्याला कर्ज घेण्याची चोरी! संविधानिक दृष्ट्या शेतकरी हा प्रवर्ग मागास जरी नसला तरी मोबदला आणि सोयीच्या बाबीत मागासच आहे. आमच्याच दारी अन्न पिकून आम्हीच अन्नाविना कित्येकदा उपाशी आहोत. दैनंदिन गरजा आमची ध्येय आणि स्वप्ने बनत आहे. आधी लेकरू पाटी वाचून शिक्षणापासून वंचित राहायचं आता नेट वाचून राहतंय त्यात पाउस आला तरी घर गळत आणि नाही आला तर पिक जळत आम्ही सरकारी कार्यालयात जाव तर पंचनाम्या पेक्षा पंचायती जादा आणि लाभार्थी योजनाचा पैसा पण भेटत नाही. आधीच रस्त्यावर आलेलो आम्ही, झेंडे घेऊन रस्त्यावर उतरावं तर कायद्याच्या उल्लंघनाचे बळी. साहेब निवडणुकीसाठी आम्ही आपल्यासाठी अग्रक्रमी आहोत पण निवडणुकीनंतर क्रमवारीत पण नाही!

कायद्याच्या दृष्टीने २७१ जागा हे बहुमत जरी असले तरी १४.५ कोटी शेतकरी सुद्धा ह्या बहुमताचा भाग आहे हा विचार तुम्ही करायला हवा होता. तुमच्या अशा कितीएक निर्णयामुळे गळ्यातील सुती उपरण्याची जागा सुती दोरी घेत आहे. सावकारापुढे उभ राहील तर अपमानित होऊन निदान दोन पैसे तरी मिळतात पण सरकारपुढ उभ राहील तर सोमवारी सुद्धा सोमवार उजाडण्याची वाट पहावी लागते ह्या सगळ्यामुळ इथ छकुलीला घेऊन शेजारच्या गावात जत्रेला जाता येत नाही दुसऱ्या राज्यात माल विकायला जाणार कस? तुम्ही म्हणता आता बाजार समिती सोडून बाहेर सुद्धा माल विकता येईल तुम्ही सांगाल तो भाव मिळेल पण आमचा पोशाख बघून आमची किंमत ठरवणारी हि भांडवलशाही व्यवस्था आम्ही सांगु त्या किमतीला माल घेईल? साहेब आपल्या देशात सत्विकेपेक्षा चटपटीत गोष्टीला जास्त मागणी आहे आणि हे कष्टाच्या बाबतीत पण सारखाच लागू होत.

पंतप्रधान ह्या पदाकडे सारा देश मानाचे पद म्हणून पाहतो पण आम्ही ह्याकडे जबाबदारी आणि दायीत्वाचे पद म्हणून पण पाहतो. आपली नाळ सुद्धा एका शेतकरी कुटुंबातली आहे आपल्या व्यक्तिमत्वाच्या निर्मितीत संघर्षाला खुप मोठे स्थान आहे असे आपण सांगता तोच संघर्ष अशा कायद्यांमुळे आमचा अजीवन भाग बनत आहे. हे जर असेच चालू राहिले तर २०२२ पर्यंत “शेतकरी उत्पन्न” दुप्पट नाही होणार पण “शेतकरी आत्महत्या” मात्र नक्की दुप्पट होतील. पांढरी दिसणारी प्रत्तेक गोष्ट साखर नसते ते मिठ पण असू शकते हे तुम्हाला लवकरच ध्यानात येईल अशी अशा करते आणि निदान उत्तराच्या पत्रात तरी न्याय द्याल अशी अशा करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.