Friday, December 19, 2025
Home Blog Page 5252

Happy Bdy Lata Didi : जेव्हा गानसम्राज्ञी लतादीदींवर झाला होता विषप्रयोग

मुंबई । भारतरत्न, गानसम्राज्ञीलता मंगेशकर यांचा आज ९१ वा वाढदिवस. २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. भारतात नव्हे तर सीमेपारही लता दीदींना ‘गानकोकिळा’ म्हणून गौरविलं जातं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अनेक वर्षे आपल्या आवाजाने चाहत्यांना निखळ आनंद दिला आहे. ज्या आवाजावर आज जग असिम प्रेम करतं हा आवाज बंद करण्याचा एकदा प्रयत्न करण्यात आला आहे. लता दिदींनीच एकदा खुलासा केला होता की, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा खुलासा त्यांनी स्वतः केला होता. प्रसिद्ध कवियित्री आणि हिंदी साहित्यकार पद्मा सचदेव यांच्या पुस्तकात ‘ऐसा कहां से लाऊं’ यामध्ये याचा खुलासा केला आहे. लता दीदी सांगितल्याप्रमाणे, ही घटना घडली होती 1962 साली जेव्हा त्या 33 वर्षांच्या होत्या. एका दिवशी त्या झोपून उठल्या तेव्हा त्यांच्या पोटात अचानक दुखू लागलं. यानंतर त्यांना उलट्या झाल्या त्याचा रंग काहीसा हिरवा होता. त्यांचा त्रास एवढा वाढला की त्यांना एका जागेवरून हलताही येत नव्हतं. घरात उपस्थित असलेल्या मंडळींनी तात्काळ डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले पण त्यानंतर तीन दिवस लता दीदी मृत्यूशी झुंज देत होत्या.

वैद्यकीय चाचणीत लता दीदीं वर विषप्रयोग झाल्याचे समोर आलं होत. त्यांना स्लो पॉयझन दिलं गेलं होत. जेवणातून हे स्लो पॉयझन देण्यात आलं होतं. या विषामुळे माझ्या आवाजावर परिणाम झाला. त्या खूप अशक्त झाल्या होत्या. तीन महिने त्यांना अंथरूणात रहावं लागलं होतं. या घटनेनंतर बहिण उषा मंगेशकर यांनी दीदींच्या खाण्याची संपूर्ण जबाबदारी स्विकारीली होती. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर लता मंगेशकर यांच्या घरी जेवण करणार महाराज पळून गेले. त्याने आपला पगार न घेताच कोणतीही माहिती न देता घर सोडलं. जेवण करणारे हे महाराज या अगोदर इतर बॉलिवूडशी संबंधीत मंडळींकडे जेवण करत असे.

पद्मा सचदेव यांनी लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे की, या घटनेनंतर लता दीदी खूप अशक्त झाल्या. तीन महिने सक्तीचा आराम करावा लागला. घशाला इतका त्रास होत असे की खूप काळजी घ्यायला लागली. लता दीदी तीन महिने फक्त थंड सूप घेत असतं. या घटनेनंतर त्यांना ‘२० साल बाद’चे गाणे रेकॉर्ड करायचे होते. ‘२० साल बाद’साठी त्यांनी एक गाणे गायले ‘कहीं दीप जले कहीं दिल’. या गाण्याचे संगीतकार श्री रामचंद्र यांनीही आपल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. मात्र, आजपर्यंत विषप्रयोगाचा उलगडा झालेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा! राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार

 लातूर । नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस अनेक जिल्ह्यात झालाय. परिणामी अतिवृष्टी आणि पुरामुळे लाखो हेक्टर पिकांचेही नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानीचा आढावा घेऊन सरकार लवकरच मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातला निर्णय घेईल असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी लातूर, नांदेड आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचा धावता दौरा केला. यावेळी ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनही त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच या दौऱ्यात त्यांनी हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद येथील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावाही घेतला.

पंचनामे करून राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करेलच पण विमा कंपन्यांनाही मदती संदर्भात निर्देश दिले आहेत. तसेच राज्याचा परिस्थतीची माहिती केंद्र सरकारलाही देण्यात आली असून केंद्र सरकारलाही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली जाणार असल्याचे दादा भुसे यांनी यावेळी स्पष्ट केलं. बऱ्याच शेतकरी बांधवांचे नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. आणि त्याचा गोषवारा मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल. येणाऱ्या काळात मदतही शेतकऱ्यांना केली जाईल. विमा कंपन्यांना मदतीचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाकडेही मदतीसाठी अहवाल पाठवला जाईल विनंती केली जाईल. आताच्या घडीला नेमकं किती नुकसान झालं याची माहिती घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकार निर्णय करेल असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

वेगाने वजन कमी कारण्यासाठी घ्या लेमन टी

lemon tea

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेकांना वजन कमी करणे हि त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असते. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे उपाय करत असतात. त्यामध्ये अनेक बाहेरच्या औषधी प्रॉडक्ट चा पण समावेश करतात. पण कधी कधी याचा परिणाम आरोग्यावर होतो. तर कधी त्याच्यापासून अनेक तोटे सुद्धा निर्माण होतात. खूप वेळा आपले शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा करायला हवा. असे म्हंटल जात. त्याच पद्धतीने आपल्या आहारात सुद्धा अनेक बदल करायला हवेत. अनेक वेळा सकाळी सकाळी अनेकांना चहा पिण्याची खूप सवय असते. त्या वेळी जर तुम्ही कोरा चहा किंवा लेमन चहा पिला तर त्याचे अनेक फायदे शरीरासाठी असणार आहे. त्याचे फायदे आज आपण पाहणार आहोत.

लेमन टी चे असणारे फायदे

आपल्याला माहित आहे कि, लिंबामध्ये जास्त व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातून चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. तसेच तुमच्या शरीरातले वजन दिवसेंदिवस वाढत असेल तर त्यासाठी लेमन टी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही प्रमाणात तरी घायला पाहिजे. लेमन टी मुले वजन कमी होते. दररोज घेताना पोटात काही नसताना हे पेय घ्यावे.

एशियन जर्नल ऑफ होम सायन्स च्या संशोधनानुसार व्हिटॅमिन सी हे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करते. व्हिटॅमिन सी हे चरबी ला बर्न करण्यास मदत करते. तसेच व्हिटॅमिन सी च्या रूपाने मिळणाऱ्या लिंबूमधून ऑक्सिडेशन चे प्रमाण जास्त असते. अनेक वेळा डॉक्टर सुद्धा स्वतः लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. तसेच सकाळच्या वेळेत लेमन टी घेतलं पाहिजे.
पाण्यात या गोष्टी मिसळून अंघोळ केल्याने शरीरासाठी होतो हा फायदा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अंघोळ करताना आपण नेहमी अश्या कोणत्या गोष्टी वापरात नाही. आयुर्वेदाच्या दृष्टीने जर आंघॊळ करताना काही घरगुती वस्तू वापरल्या तर त्याचा फायदा हा आपल्याला जास्त प्रमाणात होतो. अनेक त्वचेचे आजार हे दररोज अंघोळ केल्याने कमी होतात. आपली अंगाची त्वचा हा स्वच्छ नसेल तर अनेक वेळा आपल्याला पुरळ येणे, अंगाला खाज सुटणे अश्या अनेक गोष्टींपासून आपला बचाव होतो. दररोज अंघोळ केल्याने आपले मन प्रसन्न राहते. तसेच शरीरात असणारा थकवा दूर होण्यास मदत होते. कोणत्या वस्तूंचा वापर हा अंघोळ करताना करावा. हे जाणून घेऊया .

तुरटी आणि मोठे मीठ

गरम पाण्यात काही प्रमाणात तुरटी चे खडे आणि मीठ याचे काही खडे टाकावेत. त्यानंतर हे मिश्रण पूर्ण झाल्यानंतर ते पाणी अंघोळीसाठी वापरावे. हे पाणी जर अंघोळ साठी वापरले तर तुमचे रक्तभिसरण क्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. या पाण्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो. आणि स्नायू मजबूत होतात.

बेकिंग सोडा

दररोज अंघोळ करण्यापूर्वी एक चमचा बेकिंग सोडा टाका. अंघोळ करण्यापूर्वी पाच मिनिटे हे तसेच पाण्यात टाकून ठेवा. त्याने शरीरातील विषारी टॉक्सिन दूर होण्यास मदत होते.

ग्रीन टी

ग्रीन टी हा पिण्यासाठी चांगला नाही तर त्याने अंघोळ करण्यासाठी सुद्धा चांगली आहे. ग्रीन टी पिल्याने आपल्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी मदत होते. तसेच ग्रीन टी चा वापर जर अंघोळीच्या पाण्यात वापर केला तर अँटिऑक्सिडंट हा गुणधर्म असतो. त्यामुळे शरीराची रॊगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

कडुलिंबाची पाने

अंघोळीच्या पाण्यात जर कडुलिंबाचे काही पाने वापरली तर आपले स्नायू बळकट होतात. तसेच इतर रोगांपासून आपला बचाव होतो.आपली हाडे बळकट होतात. कडुलिंबाच्या पानात अनेक आयुर्वेदिक घटक आहेत. हि पाने अनेक वेगवेगळ्या आजरांवर गुणकारी ठरतात.

कपूर

अंघोळीच्या पाण्यात जर कपूर टाकून स्नान केले तर डोकेदुखीचा आजार हा पूर्णतः नष्ट होतो. मळमळ होणे या आजरापासून सुटका मिळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

जाणून घ्या वयानुसार दिवसभरात किती पावले चालली पाहिजेत

walking

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपले शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर दररोज नित्यनियमाने व्यायाम करणे गरजचे आहे. त्यासाठी सकस आहाराबरोबर योग्य पद्धतीचा व्यायाम पण केला गेला पाहिजे. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे. नियमित पणे चालणे केल्यास वजन पण कमी होते. शरीर निरोगी राहते. अनेक वेळा जास्त माणसांना जास्त वयाच्या चालणे हे त्याच्या आरोग्यासाठी चांगली गोष्ट नसते. कारण जेवढे वय वाढेल तेवढे धाप लागण्याचा धोका हा सर्वात जास्त असतो. त्यामुळे जाणून घेऊया कि , वयानुसार किती चालले गेले पाहिजे.

-वय ६ ते १७ वर्षे असल्यास कमीत कमी १५ हजार पावले चालणे गरजचे आहे.

-मुलींमध्ये हे प्रमाण कमीत कमी १२ हजार पावले असावेत.

–१८ ते ४० वर्षापर्यंत च्या वयातील लोकांनी कमीत कमी १२ हजार पावले दररोज चालली गेली पाहिजे.

–महिलांनी सुद्धा ११ ते १२ हजार पावले चालली गेली पाहिजेत.

-५० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या लोकांनी कमीत कमी ११ हजार पावले चालली पाहिजेत.

  • ५० ते ६० वर्षे वय असणाऱ्या व्यक्तींनी कमीत कमी १०ह हजार पावले चालली गेली पाहिजेत.

-वय वर्ष ६० असेल तर त्या लोकांनी फक्त ८ हजार पावले चालले गेले पाहिजेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

#CoupleChallenge: भारतीय चाहत्याने हॉलिवूड अभिनेत्रीसह शेअर केला फोटो, मिळाले सरप्राइज

हॅलो महाराष्ट्र । कपल आणि सिंगल चॅलेंज हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका व्यक्तीचे भाग्य उजळले आहे. वास्तविक, लोक आजकाल सोशल मीडियावर आपल्या जोडीदारासह फोटो शेअर करत आहेत. दरम्यान, जे अविवाहित आहेत त्यांना अडचणी येत आहेत. मात्र, या व्यक्तीने त्याचेही निराकरण केले. ट्विटरवर आकाश नावाच्या युझरने कपल चॅलेंज स्वीकारताना आपल्या आवडत्या हॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा फोटो शेअर केला. आकाशने आपली आवडती हॉलिवूड अभिनेत्री अलेक्झांड्रा डॅडारियो हीचा फोटो फोटोशॉपच्या साहाय्याने एडिट करून शेअर केला आहे.

फोटोमध्ये आकाश मास्कमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये त्याने अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री अलेक्झांड्रा डॅडारियो हिला फोटोशॉपच्या सहाय्याने शेतात मध्यभागी ठेवले आहे. तो फोटो फोटोशॉप्ड आहे, मात्र आकाशामधील क्रिएटिविटी जबरदस्त आहे. या फोटोसह त्याने मजेदार कॅप्शनही दिले आहे. आकाशने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “जळणारे म्हणतील की हा फोटो फोटोशॉप्ड आहे.” ही पोस्ट इतकी मजेदार आहे की,’या अभिनेत्रीने स्वतः ही पोस्ट पाहिली आणि रीट्वीट करताना कमेंट देखील केली. अलेक्झांड्राने हा फोटो रिट्विट करताच आकाशची पोस्ट ट्विटरवर व्हायरल झाली. लोकांनी या पोस्टला खूप लाईक्स केले आणि त्याच्या क्रिएटिविटीचे कौतुक केले.

अलेक्झांड्रा ही सर्वात सुंदर अभिनेत्री आहे
आकाशच्या ट्विटवर पुन्हा ट्विट करत अमेरिकन अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “खरोखरच हा एक मजेदार आठवडा होता.” अभिनेत्रीने हे ट्विट करताच त्याच्या ट्विटला हजारो लाईक्स आणि री-ट्वीट्स मिळू लागल्या. आतापर्यंत 1 लाख 36 हजाराहून अधिक लोकांना हे पोस्ट आवडले आहे. या व्यतिरिक्त 16 हजाराहून अधिक लोकांनी रीट्वीट केले आहे. अलेक्झांड्रा डॅडारियो ही जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये मोजली जाते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता एकाच बँक खात्यावर मिळतील 3 डेबिट कार्ड; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । देशातील सर्व बँका आपल्या ग्राहकांना एका खात्यासाठी एकच एटीएम-डेबिट कार्ड (ATM/Debit Card) देतात. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ही सिस्टम पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. PNB च्या अधिकृत वेबसाईटवर ग्राहकांना ‘अॅडऑन कार्ड’ आणि ‘अॅडऑन अकाउंट’ या दोन सुविधांविषयी माहिती देण्यात आली आहे. या सुविधांअंतर्गत ग्राहक एकाच डेबिट कार्डासह तीन वेगवेगळ्या बँक खात्यांना लिंक करू शकतात. त्याच वेळी एकाच बँक खात्यावर तीन डेबिट कार्ड देखील घेता येतील.

अॅडऑन डेबिट कार्ड फक्त जवळच्या नातेवाईकांनाच दिले जाईल
PNB च्या मते, तीन डेबिट कार्ड ग्राहकांच्या सोयीसाठी ठेवून अॅडऑन कार्ड सुविधेअंतर्गत बँक खात्यावर घेता येतील. त्याच वेळी अॅडऑन अकाऊंट या सुविधेअंतर्गत डेबिट कार्डावर तीन खात्यांना लिंक करता येईल. अॅडऑन कार्ड या सुविधेअंतर्गत, ग्राहक आपल्या बँक खात्यावर स्वत: साठी जारी केलेल्या डेबिट कार्ड व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांसाठी 2 अॅडऑन कार्ड घेऊ शकतात. यामध्ये केवळ पालक, जोडीदार किंवा मुले यांचा समावेश असेल. या कार्डांच्या मदतीने, मुख्य खात्यातून पैसे काढता येतील.

PNB एटीएमवर तिन्ही खात्यातून व्यवहार करता येतील
तीन बँक खात्यांना डेबिट कार्डशी जोडण्याची सुविधा मर्यादित आहे. या सुविधेअंतर्गत, कार्ड देताना फक्त तीन बँक खाती एका कार्डवर जोडली जाऊ शकतात. त्यातील एक मुख्य खाते असेल तर दोन इतर खाती असतील. PNB च्या अधिकृत वेबसाइटनुसार डेबिट कार्डच्या माध्यमातून या तीनपैकी कोणत्याही खात्यातून व्यवहार करता येतील. मात्र, ही सुविधा केवळ PNB च्या एटीएमवरच उपलब्ध असेल. दुसर्‍या बँकेचा PNB वापरल्यास मुख्य खात्यातूनच व्यवहार केले जातील. त्याच वेळी, बँक खाती PNB च्या कोणत्याही CBS शाखेत असू शकतात, परंतु तिन्ही खाती एकाच व्यक्तीच्या नावे असावीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

जाणून घेऊया सीताफळ लागवड आणि छाटणीचे तंत्र 

custard apple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतातील आंध्र प्रदेश कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सिताफळाची लागवड केली जाते. महाराष्ट्र सिताफळाच्या लागवडीत प्रथम क्रमांकावर आहे.  महाराष्ट्रामध्ये  जळगाव, दौलताबाद, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, यवतमाळ, वर्धा इत्यादी भागात सिताफळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सिताफळाचे औषधे आणि आयुर्वेदिक गुणधर्म मोलाचे आहेत. औषध कंपन्यांमध्ये कडवट औषध निर्माण करण्यासाठी सिताफळाच्या पानांचा वापर केला जातो. सिताफळाच्या बियांपासून तेल निर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो.  सीताफळाची भुकटी देखील आईस्क्रीम तयार करण्यासाठी वापरली जाते. आपण सीताफळाच्या लागवडीचे तसेच छाटणीचे तंत्र याबद्दल जाणून घेऊया.

सिताफळाच्या वाढीसाठी कोरडे व उष्ण हवामान फार उपयुक्त असते.  महाराष्ट्राचे हवामान हे सीताफळ लागवडीसाठी फार उपयुक्त आहे. सीताफळ जेव्हा मोहराच्या काळात असते तेव्हा कोरडी हवा असणे फार आवश्यक असते, पावसाळा सुरू झाल्याशिवाय सीताफळाला फळधारणा होत नाही. जास्त थंडी व अति धुके या पिकाला अपायकारक असू शकते. अगदी खडकाळ जमिनीपासून ते माळरानामध्ये सिताफळाचे झाड वाढू शकते. जशी माळरानांवर सिताफळाची वाढ होते अगदी शेवाळ युक्त जमिनीतही सिताफळाची वाढ चांगली होते. तसेच गाळ मिश्रीत, लाल जमिनीत सिताफळाची वाढ चांगल्या प्रकारे होते. मात्र काळी, पाणी साठवून ठेवणारी जमीन या फळ झाडाला अयोग्य ठरते.

सीताफळाच्या लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात ०.६० बाय०.६० बाय आकाराचे खड्डे जमिनीचा मगदूर पाहून खोदावेत. ते पाच बाय पाच मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत. म्हणजे या अंतराने खड्डे केल्यास एक हेक्टर मध्ये ४०० झाडे बसतात आणि लागवड ४ बाय ४ मीटर वर केल्यास ५० टक्के अधिक झाडे बसतात.  चांगल्या प्रकारचे शेणखत, सिंगल सुपर फास्फेट, पोयटा माती सह पावसाळ्यापूर्वी खड्डे भरून घ्यावेत. बांगडी पद्धतीने थायमेट १० जि वापरावे. यासाठी हेक्टरी  अर्धा टन शेणखत, २०० किलो सिंगल सुपर फास्फेट ची हेक्टरी आवश्यकता असते. अशाप्रकारे खड्डे भरल्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये पावसाळ्यात झाडांची लागवड सुरू करावी.

चांगले उत्पन्न येण्यासाठी पावसाळा सुरू झाला की सीताफळाच्या झाडाला दोन-तीन पाठवा चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत देणे फायदेशीर ठरते. लागवडीनंतर साधारणतः तीन वर्षापर्यंत पहिल्या वर्षी १२५ ग्राम नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी खताचा, दुसऱ्या वर्षी अडीचशे ग्रॅम नत्र, अडीचशे ग्राम स्फुरद, १२५ ग्रॅम पालाश कधी खतांचा, तिसऱ्या वर्षी ३७५ ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५० ग्रॅम पालाश यांचा पुरवठा करणे योग्य ठरते. आणि पुढील पाच वर्षापर्यंत प्रत्येक झाडाला पाच ते सात पाट्या शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया देणे योग्य ठरते. तशी सीताफळाच्या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. जेव्हा फळे पक्व होण्याची वेळ असते, तेव्हा एक दोन वेळेस पाणी द्यावे म्हणजे फळांचा आकार व दर्जा वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाण्याचा ताण जास्त पडला तर १५ते २० दिवसांनी पाणी द्यावे. निव्वळ पावसाच्या पाण्यावरही चांगले उत्पन्न देऊ शकते. परंतु पहिल्या तीन-चार वर्षात जर पुरेसे पाणी दिले तर झाडांची वाढ चांगली होते.

सिताफळाची लागवड केल्यानंतर जर काही रोपे मेली तर एक महिन्याच्या आत नांग्या भरून घ्याव्यात. सीताफळाची बाग ही नेहमी तणमुक्त असणे आवश्यक असते. रोपे लहान असताना पावसाने ताण पडला तर अधूनमधून पाणी देत राहावे. झाडाची वाढ जोमाने होण्याकरिता व चांगले फळ मिळण्याकरिता छाटणी करणे आवश्यक असते. त्यासाठी झाडावरील अनावश्यक फांद्या काढून टाकाव्या लागतात. कोणत्याही फळ पिकामध्ये छाटणीला फार महत्व असते. जर छाटणी केली नाही तर त्याची उत्पन्न क्षमता कमी होते. त्याच्यामुळे झाडाला व्यवस्थित आकार पण येतो व त्यामुळे बागेमधील आंतरमशागतीची कामे चांगल्या पद्धतीने करता येतात. साधारणता झाडाची पानगळ झाल्यानंतर छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर लगेच बुरशीनाशकांची फवारणी करणे कधीही योग्य ठरते. साधारणतः पहिली छाटणी ही बहराचे पाणी सुरू करण्यापूर्वी १५ ते २० दिवस अगोदर केले जाते. जानेवारी ते मे मध्ये उन्हाळी बारा साठी पाणी सुरू करण्यात येते. जून २५ ते २७  नंतर झाडांना फळे असताना दुसरी छाटणी करावी. त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसांनी झाडाला नवीन पालवी फुटते व त्यातूनच नवीन फुलांची निर्मिती होते. सदरची फळे नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात काढणीस येतात, एका झाडापासून दोनवेळा फळे घेणे शक्‍य असते. फळे साधारणतः सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विरळणी करताना चांगल्या आकारमानाची देखणी फळे ठेवावीत बारीक,  रोगग्रस्त व वेळ वाकडी फळे विरळणी करून काढून घ्यावेत.  अशाप्रकारे सीताफळाची तंत्रज्ञान शुद्ध लागवड केली तर चांगले उत्पन्न मिळून आर्थिक फायदा होऊ शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

भारतीय प्रोफेशनल्‍ससाठी मोठी बातमी! H-1B च्या प्रशिक्षणासाठी अमेरिका करणार 15 कोटी डॉलर्सचा खर्च

हॅलो महाराष्ट्र । अमेरिकेने मध्यम ते हाय स्किलवाल्या (Skilled) नोकऱ्यां साठी (H1-B Jobs) प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 15 कोटी डॉलर्स खर्च करणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रही (IT Sector) समाविष्ट आहे, ज्यात हजारो भारतीय व्यावसायिक काम करतात. हे माहिती असू द्या की, H1-B एक (Non-Immigrant VISA) आहे.

अमेरिकन कंपन्या दरवर्षी हजारो भारतीयांची नेमणूक करतात
एच 1-बी व्हिसा अंतर्गत अमेरिकन कंपन्यांना विशेष तांत्रिक तज्ञांच्या पदांवर परदेशी प्रोफेशनल्‍स नियुक्त करण्याची परवानगी आहे. या व्हिसाद्वारे तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या दरवर्षी भारतासारख्या देशातून हजारो कर्मचार्‍यांची नेमणूक करतात. अमेरिकेच्या कामगार विभागाने याबाबत म्हटले आहे की, या एच -1 बी वर्कफोर्स ग्रांट प्रोग्रामचा उपयोग प्रामुख्याने तंत्रज्ञान, Cyber Security, Manufacturing, Transportation अशा क्षेत्रात केला जाईल.

या कार्यक्रमांतर्गत नव्या पिढीतील कामगारांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे
अमेरिकेच्या कामगार विभागाने सांगितले की, या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यमान कर्मचार्‍यांना तसेच नवीन पिढीतील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जाईल. याद्वारे भविष्यासाठी मनुष्यबळ तयार होईल. विभागाने म्हटले आहे की, “केवळ कोरोना विषाणूच्या साथीने श्रम बाजारावर परिणाम झाला नाही, परंतु यामुळे अनेक शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना आणि मालकांना आपल्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण कसे द्यावे याचा विचार करावा लागला आहे.” या कार्यक्रमांतर्गत, विभाग रोजगार आणि प्रशिक्षण प्रशासन इंटीग्रेटेड लेबर सिस्‍टमला प्रोत्साहित करण्यासाठी वित्तपुरवठा आणि संसाधनांचा तर्कसंगत करेल.

ऑनलाईन प्रशिक्षणांतर्गत आवश्यक असलेली कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल
या अनुदानासाठी अर्ज करणार्‍यांना Innovative training strategies द्वारे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे लागेल, असे विभाग सांगत आहे. यात ऑनलाइन आणि इतर तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण समाविष्ट आहे. स्थानिक सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) अंतर्गत, अर्जदारांनी त्यांच्या समुदायातील कर्मचार्‍यांना आवश्यक ते कौशल्य प्रशिक्षण दिले पाहिजे. ज्यामध्ये या महत्त्वाच्या क्षेत्रातील एच -1 बी पोस्टसाठी मध्यम ते उच्च कौशल्य असलेले सामील असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

जाणून घ्या डाळींब तडकण्याची कारणे 

pomegranate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्रातील काही भागातील विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी डाळींब पीक तसे वरदान ठरले आहे. मात्र या शेतीतही  मर रोग,  तेलकट डाग रोग, फळ तडकणे  यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. फळ तडकणे हे केवळ एकाच कारणामुळे न होता त्याची अनेक कारणे आहेत. पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन, चुकीच्या जमिनीची निवड,  हमवामानातील बदल, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे तसेच हलक्या जमिनीत नांगरटीच्या तासात रोपांची लागवड, जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १२ टक्केपेक्षा जास्त असणे आणि हवेतील तापमान व आर्द्रतेत  रात्री व दिवसातील तापमानात तफावत अशा कारणांमुळे फळे तडकतात. अहमदनगर, सांगली, सोलापूर, आणि नाशिक भागातल्या डाळिंब बाग मोठ्या प्रमाणात घेतली जाते. दरम्यान या बागांवर तेलकट चट्टे आणि फळे तडकण्याचे विकार अधिक जाणवत असतात.

फळे तडकू नयेत किंवा डाळिंबला भेगा पडू नयेत यासाठी उपाय योजना केल्या जातात यामध्ये डाळिंबासाठी मध्यम, निचऱ्याची जमीन निवडणे, रोपांची लागवड ही  २ बाय २ बाय २ फुट लांबी रुंदी खोलीचे खड्डे घेऊन त्यामध्ये  माती  २ घमेले कुडलेले शेणखत  दीड  किलो सुपर फॉस्फेट ५० ग्रॅम फोरे यांचे मिश्रण करुन खड्डे भरुन रोपांची लागवड करणे, माती परीक्षणसाठी  प्रतिनिधिक स्वरुपाचा खड्डा घेऊन प्रत्येक एक फुटातील मातीचा पहिला थर, दुसरा  थर आणि तिसऱ्या फुटात माती असल्यास तिसरा थर अशा थराप्रमाणे माती घेऊन त्याचे प्रयोगशाळेत तपासणी करुन घेणे असे उपाय केले जातात.

यासोबतच डाळींब पिकाची लागवड करत असताना माती परीक्षण अहवालाप्रमाणे  सामू हा ६.५ ते ८.० पर्यंत असावा.  विद्युत वाहकता ही ०.५० डेसीसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असावी तसेच मुक्त चुनखडीचे प्रमाण सर्व थरात १२ टक्क्यापेक्षा कमी असावे. माती परीक्षणावरुन डाळिंबास शिफारस केल्याप्रमाणे  पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत ४ ते ५ घमेले तसेच ६२५ ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद आणि २५० ग्रॅम पालाश प्रति वर्ष प्रति झाडास ताण संपल्यानंतर पहिले पाणी देण्यापुर्वी द्यावे  व उर्वरितत नत्राची मात्रा दोन समान हप्त्यात विभागून द्यावी.पहिली मात्रा ताण संपल्यानंतर बेसल डोसच्या वेळी  व उर्वरित मात्रा बहारानंतर ४५  दिवसांननी आळे पद्धतीने  द्यावी. जमिनीत मुक्त चुनखडीचे  प्रमाण ५ टक्के पेक्षा  कमी असल्यास स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे द्यावे, म्हणजे या खताद्वारे स्फुरदाव्यतिरिक्त कॅल्शियमचा पुरवठा झाडांना होतो तसेच मॅग्नेशिअम  सल्फेटचा वापर प्रति झाड २५ ग्रॅम प्रमाणे करावा. असे सुचविले जाते.

सुक्ष्म अन्न द्रव्ये  लोह, किंवा बोरॉनची कमतरता असल्यास सुक्ष्म अन्न द्रव्ये स्लरी द्वारे एकरी २०० लिटर पाण्यामध्ये २५ किलो ताजे शेण ५ लिटर गोमूत्र ५ किलो फेरस सल्फेट ५ किलो झिंक सल्फेट २ किलो बोरिक अॅसिड एकत्र आठवाडाभर सातव्या दिवशी झाडांना  स्लरी द्यावी. फुले  येण्यापुर्वी ५० टक्के फुले असताना झाडावर फुले मायक्रो ग्रेड -खख द्रवरुप सुक्ष्म अन्न द्रव्ये ग्रेडची  फरवाणी करावी. बागेत आच्छादनाचा वापर केल्यास तापमान व आद्रेतेवर नियंत्रण राहते. जमिनीच्या पोतानुसार पाण्याचे नियोजने करावे. ठिंबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर करावा. पाण्याचा नियंत्रित वापर करावा, डाळिंबास जास्त  पाण्याचा वापर करु नये. तांबड्या, हलक्या जमिनीत कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्यास बोरॉनची फवारणी फुले आल्यावर व फळे लिंबाच्या आकाराची  असताना करावी.  फळांची फुगवण तसेच रंग चव चांगली  येण्यासाठी  फळ पक्कतेच्या  काळात पोटॅशिअम शोनाईट २ किलो २०० लिटर पाण्यातून ठिबक द्वारे  किंवा  फवारणीद्वारे १५ दिवसाच्या  अंतराने २ ते ३ वेळा द्यावे. या सर्व गोष्टी केल्यास डाळींब तडकण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

आता भारताचे ‘हे’ पाऊल चीनवर पडेल भारी! वस्त्रोद्योग क्षेत्रात मेगा मार्केटींग रणनीतीवर सुरू झाले काम

हॅलो महाराष्ट्र । लडाखच्या गालवान खोऱ्यातून हा वाद सुरू झाल्यानंतर भारत एकामागून एक अशी पावले उचलत आहे, जे चीनसाठी भारी पडत आहे. अनेक बड्या प्रोजेक्ट्समध्ये भाग घेतल्यानंतर भारताने अनेक चिनी अॅप्सवर बंदी आणण्यास सुरवात केली. त्याचबरोबर सणासुदीच्या हंगामात स्थानिक व्यापारीदेखील चीनचा माल न विकता जोरदार धक्का देत आहेत. आता केंद्र सरकारने चीनला दुसर्‍या क्षेत्रात पराभूत करण्याच्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात (Textile Sector) चीनकडून होणारी आयात थांबविण्यासाठी आणि स्थानिक उत्पादनांना जगभरातील बाजारपेठेत आणण्यासाठी सरकारने मेगा विपणन रणनीतीवर (Mega Marketing Strategy) काम सुरू केले आहे.

जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी प्रोडक्‍ट्सची निवड केली गेली आहेत
स्थानिक वस्त्रोद्योग उत्पादनांना जागतिक बाजारात नेण्यासाठी केंद्र सरकारने काही उत्पादनांची निवड केली आहे. यासह घरगुती उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ (Financial Support) देण्याच्या तयारीदेखील सुरू आहेत. या क्षेत्राच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना नोकर्‍या (Job Creation) देण्याची देखील सरकारची इच्छा आहे. देशात कापड उत्पादनांसाठी संपूर्ण क्षमता असूनही सन 2019-20 मध्ये सुमारे 2538 मिलियन डॉलरची केवळ चीनमधून आयात केली गेली. हे थांबविण्यासाठी आता केंद्राने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे.

स्थानिक उत्पादनांच्या मार्केटिंग साठी केंद्र नवीन पध्दत स्वीकारेल
देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी स्थानिक उत्पादनांची निर्यात वाढविण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच नवीन मार्केटिंगच्या गणितांवर देखील काम सुरू झाले आहे. जीएफएक्स आऊट मॅन मेड फॅब्रिक्सचे उत्पादन वाढविण्यासह गारमेंट्स आणि होम टेक्सटाईल उत्पादनांचे नवीन पद्धतीने मार्केटिंग केले जाईल. रग, बेडशीट, टेबल क्लॉथ, टॉवेल्स, हातमागच्या मार्केटिंग साठीही नवीन पध्दत अवलंबण्याचा विचार केंद्र करीत आहे. वास्तविक, या उद्योगाने जगभरातील लोकांच्या चीनविरोधी वृत्तीचा फायदा घेण्याचा सल्ला सरकारला दिला आहे.

ड्यूटी टाळण्यासाठी कंपन्यांना मुक्त व्यापार करारामध्ये गती वाढवायची आहे
अमेरिका, तैवान, इस्त्राईल, जपान, युरोप आणि आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यातीचे धोरण विकसित केले जात आहे. सरकारकडून मुक्त व्यापार कराराला गती देण्यात यावी अशी कंपन्यांची इच्छा आहे जेणेकरुन भारतीय उत्पादन शुल्क वाढू शकेल. वस्त्रोद्योग मंत्रालय पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मोडवर इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क योजनेला नवीन गती देणार आहे, ज्यामध्ये कंपन्यांना थेट इन्फ्रा सपोर्ट मिळेल. ड्युटी क्रेडिट म्हणून सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 7,398 कोटी रुपये जाहीर केले आहेत. या क्षेत्रातील 1 कोटी रोजगार वाचवणे आणि नवीन रोजगार निर्मिती करणे हे सरकारसमोर आव्हान आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.