Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5264

SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क, जर लक्ष दिले नाही तर होऊ शकते मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढत आहेत. फसवणूक करणारे लोक अनेक नवनवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या फसवणूकीचा बळी बनवत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India) सतत लोकांना सावध करत आहे. या क्रमवारीत SBI ने गुरुवारी या फसनवूक करणाऱ्या लोकांच्या नव्या मार्गाविषयीही माहिती दिली आहे. तसेच SBI ने असेही सांगितले आहे की, जर आपण अशा प्रकारे त्यांना बळी पडलय नंतर काय करायला पाहिजे आणि आपल्या कमावलेल्या पैसे या गुंडांनी साफ करू नये म्हणुन आपण काय केले पाहिजे याची माहिती घ्या.

SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क केले आणि सांगितले आहे की,” फेक ई-मेल आमच्या ग्राहकांना पाठविण्यात येत आहेत. SBI या ईमेलशी संबंधित नाही. अशा परिस्थितीत आपण असे ई-मेल उघडणे टाळावे. SBI ने आपल्या ग्राहकांना असे कोणतेही मेल पाठवले नसल्याचेही सांगितले आहे.

बँकिंग सेवेसाठी अधिकृत पोर्टल वापरा
SBI ने म्हटले आहे की, ‘SBI च्या नावावर असे कोणतेही मेल आल्यास आम्हांला त्वरित कळवा. SBI नेही आपल्या ट्विटमध्ये एक लिंक दिली आहे. ही लिंक राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलची (National Cyber Crime Reporting Portal) आहे. या पोर्टलवर फ्रॉडस्टर्सकडून असा ई-मेल प्राप्त झाल्याबद्दल आपण तक्रार नोंदवू शकता. यानंतर, राष्ट्रीय सायबर सेल याबाबतीत आवश्यक ती कारवाई करेल. या ट्विटमध्ये SBI ने आपल्या इंटरनेट बँकिंगला (SBI Internet Banking) लिंकही दिलेली आहे. SBI ऑनलाइन बँकिंग सेवा वापरणारे ग्राहक या पोर्टलद्वारे एसबीआय बँकिंग सेवेचा (SBI Banking Service) लाभ घेऊ शकतात. कोणत्याही बँकिंग सेवेचा लाभ हा केवळ अधिकृत पोर्टलद्वारे घ्या असेही SBI ने यावेळी सांगितले आहे. आपण असे न केल्यास, आपण बँकिंगच्या फसवणूकीचा शिकार होऊ शकता.’

नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल हे केंद्र सरकार द्वारे चालविण्यात येणारे पोर्टल आहे, जिथे आपण सायबर क्राइम संबंधित तक्रारी दाखल करू शकता. या पोर्टलवर महिला आणि मुलांवरील कोणत्याही सायबर गुन्ह्याविरूद्ध तक्रार नोंदविली जाऊ शकते.

या सरकारी पोर्टलवर तक्रार दाखल करण्याचे दोन पर्याय आहेत. पहिल्या पर्यायाखाली मुले किंवा स्त्रिया कोणत्याही सायबर क्राइमविरूद्ध तक्रार देऊ शकतात. दुसर्‍या पर्यायात इतर सर्व प्रकारच्या सायबर क्राइमचा रिपोर्ट दिला जाऊ शकतो. यामध्ये बँकिंग फसवणूकीच्या बाबतीत तुम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल.

सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार कशी नोंदवायची ?
या दुसर्‍या पर्यायातून तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला तुमचे नाव, लॉगइन आयडी, मोबाइल नंबर आणि ओटीपी टाकावे लागतील. आपण नवीन युझर असाल तर पहिले या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. नवीन युझर म्हणून नोंदणी करण्यासाठी, आपल्याला आपला मोबाइल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर आपल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठविला जाईल. ओटीपी सबमिट केल्यानंतर नोंदणीचे काम पूर्ण होईल. यानंतर, आपण आपली तक्रार नोंदविण्यात सक्षम व्हाल. हे काम अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

बारा राशींची परिभाषा मांडणारा “आलंय माझ्या राशीला” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपट नगरी | पृथ्वीतलावरच्या प्रत्येक स्त्री पुरुषाची स्वत:ची रास असतेच. मग ती कोणतीही असेल. इंग्रजीमधे त्याला Zodiac signs असंही म्हणतात. तर अशा एकुण बारा राशी. प्रत्येक व्यक्तीची रास वेगळी. या राशीनुसार प्रत्येकाचा स्वभावही वेगळा. काम वेगळं, वागणं, बोलणं, चालणं, समजणं, उमजणं हेसुद्धा निराळं. कळू लागण्याच्या वयात नाही म्हटलं तरी प्रत्येकाने कधी ना कधी वर्तमानपत्रांमध्ये स्वत:चं राशिभविष्य वाचलेलं असतच. यात काहीजण रोज पाहणारे असतात तर काहीजण सवडीनुसार लक्ष देणारे..आपल्या जगण्याची गोळाबेरीज राशीवर अवलंबून आहे असं मानणारे हे सगळे श्रद्धाळू लोक. रास पाहण्याची उत्सुकता ही अनेक जणांच्या सकाळच्या दिनक्रमाचा भाग बनलेली असते. मानवी मनाच्या याच वेगळेपणाची दखल घेणारा बिगबजेट मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

राशींची उत्सुकता जपणारा, त्या उत्सुकतेला अभ्यासाच्या, कुतुहलाच्या आणि विज्ञानाच्या आधारे सांधणारा – ‘आलंय माझ्या राशीला’ हा मराठी बिगबजेट चित्रपट बारा राशींच्या कथांवर आधारीत आहे. पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देत सुप्रसिद्ध ज्योतिषी, ‘आनंदी वास्तुकार आनंद पिंपळकर यांनी हा चित्रपट दर्शकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात आणि एकंदरीत पाहता जगातच चित्रपट बनवणारे पहिले ज्योतिषी म्हणून आनंद पिंपळकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट हे मनोरंजनासोबत प्रबोधनाचं माध्यम असल्यानेच समाजासाठी उपयुक्त असा विषय घेऊन पिंपळकर यांनी चित्रपट निर्मितीत आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे.

एकूण बारा कथा असलेल्या “आलंय माझ्या राशीला” या चित्रपटात प्रत्येक राशीची एक वेगळी मज्जा मांडण्यात आली आहे. यातील बारा कथा एका मुख्य कथेला जोडण्यात आल्या असून आशयप्रधान चित्रपटाची निर्मिती करण्याचा आनंद यानिमित्ताने घेता आला असं आनंद पिंपळकर यांनी नमूद केलं. या चित्रपटातील विषय हे सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत काळजाला हात घालणारे आहेत. शहरीकरण, स्त्री-पुरुष नातेसंबंध, शेतकऱ्यांचे प्रश्न, मानवी मनोवृत्ती अशा प्रकारच्या संवेदनशील विषयांवर चित्रपट आपल्याला अंतर्मुख करेल असा विश्वास पिंपळकर यांनी व्यक्त केला आहे.

अभिनेते चिन्मय मांडलेकर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून त्यांच्यासोबतच अलका कुबल, मोहन जोशी, अतुल परचुरे, उषा नाईक, निर्मिती सावंत, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, मंगेश देसाई, दिगंबर नाईक, प्रसाद ओक, जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌ यांच्याही या चित्रपटात कसदार भूमिका आहेत. अभिनेते प्रणव पिंपळकर हे या चित्रपटातून आपलं मनोरंजन क्षेत्रातील पदार्पण करताना दिसून येतील. आपल्या पहिल्याच चित्रपटाचं जराही दडपण न घेता प्रणवने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. दैनंदिन जीवनात बहुतांश व्यक्तींना ज्योतिष आणि भविष्याबद्दल उत्सुकता असते. ज्योतिषविषयक हेच ज्ञान त्या व्यक्तीला हसत खेळत आणि चित्रपटाच्या माध्यमातुन मिळाले तर तो/ती व्यक्ती चित्रपटातील व्यक्तिरेखेमध्ये स्वत:ला पाहु शकते. चित्रपटात सहभागी कलाकारांनी प्रत्येकी एका राशीचं प्रतिनिधित्व केलं असून ही केमिस्ट्री झकास जुळून आल्याचं पिंपळकर यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

या चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी केलं आहे. चित्रपटाच्या एका मुख्य कथेभोवती बारा उपकथा जोडण्याचं जिकिरीचं आणि कल्पकतेचं काम लेखक हेमंत एदलाबादकर यांनी जीव ओतून केलं आहे. या लिखाणाला तितक्याच ताकदीने दिग्दर्शनाची जोड अजित शिरोळे यांनी दिली आहे. या सर्व बारा कथांचे निरुपण वेळोवेळी आनंद पिंपळकर स्वत: करणार आहेत.
चित्रपटात एकुण चार गाणी असून त्यामधील तीन मिनिटांच्या एका गाण्यात बारा राशींचा उल्लेख आला आहे. बारा राशींचे स्वभाव आणि वैशिष्ट्य एका गाण्यात खुबीने मांडण्याचं काम गीतकार कौतुक शिरोडकर यांनी सहजतेनं केलं आहे. मुग्धा कर्‍हाडे यांनी आपल्या मधुर आवाजात हे गाणं गायलं आहे.

प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकुर यांनी या चित्रपटातील साईबाबांच्या आरतीचं लिखाण केलं आहे. अभय इनामदार यांनीही एक गाणं लिहिलं आहे. चित्रपटातील सर्व गाण्यांना चैतन्य आडकर व प्रवीण कुंवर यांनी संगीत दिलं आहे. अजय अतुल यांनी संगीतविषयक मार्गदर्शन केलं असून अजय गोगावले यांच्या आवाजातील गाणंही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी हिंदीत ‘वॉट्स युवर राशी’ नावाचा सिनेमा आला होता. पण त्यामधे राशींबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. राशींवर एकपात्री प्रयोग करणारेही भरपुर आहेत. पण या विषयावर मराठीत पहिल्यांदाच भव्य चित्रपट तयार झाला आहे. प्रसिद्ध ज्योतिषी आनंद पिंपळकर यांनी वृत्तपत्र, टिव्ही, रेडिओ, एफएम या माध्यमातुन आत्तापर्यंत लोकांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या ‘आनंदी वास्तु’ या लाईव्ह कार्यक्रमाचे आत्तापर्यंत 800 भाग प्रसारित झाले आहेत. 68 पुस्तकांच्या लिखाणाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या पिंपळकर यांनी नव्याने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं असून या प्रवासात सर्व रसिक मंडळींनी सोबत रहावं, प्रोत्साहन द्यावं असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना संकटाची व्याप्ती कमी झाल्यानंतर जेव्हा चित्रपटगृह उघडतील तेव्हा “आलंय माझ्या राशीला” हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रभरातील लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल.
मराठीतील या आगळ्या-वेगळ्या धाटणीतल्या चित्रपटास हॅलो महाराष्ट्रकडून भरपूर शुभेच्छा..!!

लेखक – विकी पिसाळ
9762511636

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

संतुलित आहार शरीरासाठी का आहे आवश्यक ? चला जाणून घेऊया संतुलित आहाराविषयी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा आपल्या शरीरात नवीन नवीन समस्या निर्माण होतात. कामाच्या धावपळीमुळे अनेक जणांना योग्य वेळी योग्य आहार घेणे शक्य होत नाही. यामध्ये सर्वात पुढे या महिला असतात. त्याच्या कामाच्या वेळा चुकल्या कि आपोआप जेवणाच्या वेळा चुकतात. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हृदयविकारास अनेक घटक कारणीभूत असतात. संतुलित आहार राखणे निरोगी हृदययासाठी गरजेचे असते. हृदयविकार आटोक्यात ठेवण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत तुम्हाला कायमस्वरुपी बदल करावे लागतात.

आहार घेतांना कोणत्याही एका माध्यमाचा आहार घेतला गेला नाही पाहिजे. आहार हा चोफेर असावा. आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या सर्व जीवनसत्वाचा समावेश हा आपल्या आहारात असायला पाहिजे. आहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते, तेव्हा त्यातून अधिक प्रमाणात उष्मांक मिळतो. ते योग्य प्रमाणात वापरले गेले नाहीत तर शरीरात साठविले जातात . त्या काळात फॅट चे प्रमाण वाढते. आणि वजन जास्त दिसते. त्यामुळे चरबी, रक्तदाब वाढतो. त्यातून हृदयविकार असणाऱ्यांना अधिक त्रास होतो. त्यामुळे स्निग्ध पदार्थ टाळणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. यासाठी योग्य आहार ठेवावा.

काय असावा आहार

दररोज आहारात एकच पदार्थ असले तरी ते सारखे सारखे खाऊ वाटत नाही. भात, पोळी, भाकरी आदी योग्य प्रमाणात असावे. फळे, भाज्या आणि पालेभाज्या भरपूर प्रमाणात घ्याव्यात. तेलकट पदार्थ अतिशय कमी प्रमाणात असावेत. स्निग्ध पदार्थ जर खाण्याचे प्रमाण वाढले तर त्याचा समावेश रक्तात होतो. त्यावेळी रक्तवाहिन्यांच्या त्वचेखाली त्याचे थर साचतात. परिणामी रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. कधी कधी मांसाहार करावा पण त्याचे प्रमाण मात्र कमी ठेवावे .

आठवड्यातून दोन ते तीनवेळा मासे खाल्ले तर चालतात. मासे हे शरीरासाठी सर्वात चांगले आहेत. दूध, दुधाचे पदार्थ याचे सेवन कमी करावे. काही प्रमाणात सुकामेवा घ्यावा. आहारात कडधान्य याचा समावेश केला जावा. शिजविलेल्या पदार्थांपेक्षा उकडलेले, वाफविलेले पदार्थ घ्यावेत. सोयाबीन आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

मोठी बातमी! राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

ठाणे । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळामधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागणी झाली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी शिंदे यांनी कोरोनाची टेस्ट केली होती त्यानंतर आजच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

यापूर्वी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर, एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर कोरोनाची टेस्ट केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा शिंदे मतदारसंघात फिरत होते. तसंच, भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते. इमारत कोसळ्याचे वृत्त कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. भिवंडी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची ही त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली होती. दरम्यान, मंगळवारी झालेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेतही एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. त्यामुळं सततच्या संपर्कामुळं शिंदेंना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

वांग्याचे सदाहरित वाण उत्पादन देईल ४४० ते ४८० क्विंटल उत्पादन               

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उंच ठिकाणावरील काही क्षेत्रे सोडता  देशात अनेक ठिकाणी भाज्यांमध्ये वांग्याच्या सदाहरित वाणाचे पीक घेतले जाते. या शेतीमध्ये प्रगत वाणाची भूमिका महत्वपूर्ण असते. ज्याच्या साहाय्याने वर्षभर याची शेती करता येउ शकते. ज्यामुळे चवही बदलत नाही आणि उत्पादनही चांगले मिळते. या वाणाचे संशोधन बिहार कृषी विश्वविद्यालय यांनी २०१९ मध्ये केले होते. या वाणाची हिवाळ्यासोबत उन्हाळ्यातही शेती करता येते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वाणाचे पीक ४२ अंश तापमानात ही घेता येते. या वाणाचे नाव म्हणूनच सदाहरित वाण असे ठेवण्यात आले आहे.

देशातील एकूण भाजीपाला वापराच्या ९% भाजीचे उत्पादन हे बिहार राज्यात होते. वैज्ञानिकांनी शोधलेल्या नवीन वांग्याच्या वाणाचा रंग हिरवा आहे. एका वांग्याचे वजन साधारण ८५ ते ८८ ग्राम असते. या वाणाच्या एका झाडाला २३ ते २६ फळे लागतात. सध्या अस्तित्वात असणाऱ्या एकूण वाणांच्या तुलनेत या वाणाचे उत्पादन बरेच अधिक आहे. उन्हाळ्याच्या काळात याचे उत्पादन साधारण २७० क्विंटल प्रति हेक्टर घेता येऊ शकते.  तर हिवाळ्यात याचे उत्पादन ४४० ते ४८० क्विंटल प्रति हेक्टर घेता येते.

वैज्ञानिकांच्या मते वांग्याचे हे वाण सर्व क्षेत्रातील सर्व परिस्थितीमध्ये सक्षम आहे. या वाणाचे बियाणे देखील कमी आहेत आणि याची चवही इतर वाणांच्या तुलनेत अधिक चांगली आहे. तसेच हे वाण अँटीऑक्सीडेंटनी समृद्ध आहे. यातून शरीराला अतिरिक्त व्हिटॅमिन मिळू शकतात असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

मोदी सरकारच्या कामगार विधेयकांना संघ परिवाराकडून विरोध; भारतीय मजदूर संघ आंदोलनाच्या पावित्र्यात

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने काल कामगार विधेयकं मंजूर केली. एकीकडे शेती विधेयकांना काँग्रेस आणि इतर पक्षांचा विरोध असताना, थेट संघ परिवारातून कामगार विधेयकांवरुन विरोध झाला आहे. ही विधेयकं उद्योजक आणि प्रशासनाच्या बाजूने असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसंच कामगार विधेयकांमुळे देशाची औद्योगिक शांतता भंग होईल असं म्हणत मोदी सरकारला घरचा आहेरही दिला आहे.

भारतीय मजदूर संघ जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराचा एक अविभाज्य अंग आहे, त्याने विधेयके आणताना स्थायी समितीच्या शिफारसी सरकारने ऐकल्या नसल्याचं सांगितलं आहे. याशिवाय भारतीय मजदूर संघाने येत्या ऑक्टोबर महिन्यातील 2, 3 आणि 4 तारखेला राष्ट्रीय संमेलनात पुढचं पाऊल काय असावे यावर चर्चा करणार असल्याचेही पत्रक काढले आहे. दरम्यान, कामगार विधेयकांना विरोध करत भारतीय मजदूर संघाने थेट मोदी सरकारला आव्हान दिल्यामुळे, खरंच संघ परिवारातील दोन घटक एकमेकांसमोर उभे ठाकणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.कामगार

कामगार विधेयकातील विवादित तरतुदी
१) यापुढे 300 पेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या कंपन्या सरकारच्या अनुमतीशिवाय कर्मचाऱ्यांची संख्या कमी करु शकतात, किंवा कंपनी बंद करु शकतात. याआधी ही मर्यादा 100 पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपन्यांसाठी होती.
२) त्यामुळे हायर अँड फायर ही संस्कृती बळावेल अशी भीती.
३)यापुढे कंपन्यांना जास्तीत जास्त कर्मचारी कॉन्ट्रॅक्टवर ठेवता येतील याची मुभा.
४)हे कॉन्ट्रॅक्ट कितीही वेळा, कितीही कालावधीसाठी वाढवले जाऊ शकतात. शिवाय सगळ्यात गंभीर म्हणजे आतापर्यंत एखाद्या कायमस्वरुपी कर्मचाऱ्याला कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी म्हणून रुपांतरित करण्याची मुभा नव्हती, ती मोकळीक या नव्या विधेयकाने दिली आहे.
५)महिलांचे कामाचे तास हे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंतच असतील. सातनंतर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही संपूर्णपणे कंपनीची असेल.
६)शिवाय यापुढे संप करण्यासाठी कामगार संघटनांना किमान दोन महिने संप करावा लागणार आहे. शिवाय कामगार संघटनांच्या रजिस्ट्रेशनमध्ये सु्द्धा सरकारने जाचक अटी टाकल्या आहेत.

नवीन कामगार विधियेकाचे फायदे
१)संघटित आणि असंघटित या दोन्ही क्षेत्रातल्या कामगारांना काही नव्या प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळेल.
२)सर्व कामगारांना त्यांचं नियुक्ती पत्र देणं, त्यांचं वेतन डिजिटल पद्धतीने करणं अनिवार्य असेल.
३)वर्षातून एकवेळा कामगारांची आरोग्य चाचणी करुन घेणं कंपन्यांना बंधनकारक असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

भ्रामरी प्राणायम आरोग्यास आहे उपयुक्त ; चला जाणून घेऊया भ्रामरी प्राणायमाचे जबरदस्त फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपण दररोज प्राणायाम आणि ध्यान केल्याने शरीरात खूप बदल होतात. भ्रमरी प्राणायाम हे तुमच्या मनाला एका क्षणात शांत करण्यात अत्यंत प्रभावी साधन आहे. मनात असलेल्या अनेक गोष्टी शांत पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मनाची चिंता , निराशा, काळजी आणि क्रोधापासून सुटका मिळवण्याकरिता हा एक सर्वोत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. त्यामुळे अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा प्रकार खूप चांगला आहे. घर किंवा इतर ठिकाणी कुठेही सराव करता येण्याजोगे आणि स्वतःला तणावमुक्त करण्याचा एक झटपट पर्याय आहे.

भ्रामरी प्राणायामाचा सराव कसा करावा-

–एका शांत, हवेशीर कोपऱ्यात डोळे बंद करून ताठ बसावे.
— चेहऱ्यावर मंद हास्य ठेवावे
–तुमची तर्जनी तुमच्या कानांवर ठेवा. तुमचा कान आणि गाल यांच्या मध्ये एक कुर्चा असतो. तुमच्या तर्जनीना या कुर्च्यावर ठेवा
–.एक दिर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, कुर्चावर किंचित दबाव द्या. भुंग्याचा तार स्वरात आवाज काढीत असताना, तुम्ही कुर्चाला दबलेले ठेवू शकता किंवा तुमच्या बोटाने दाब देणे आणि बंद करणे अशी क्रिया करीत राहा.
— चांगल्या परिणामांकरिता एकदम वरच्या स्वरात आवाज काढणे हे चांगले राहील..
–पुन्हा श्वास घ्या आणि हा संच ६-७ वेळा करावा.
–तुमचे डोळे थोड्या वेळासाठी बंद ठेवा. भ्रमरी प्राणायामाचा सराव तुम्ही झोपून किंवा उजव्या कुशीवर झोपून करू शकता. झोपून प्राणायामाचा सराव करीत असताना, केवळ भुणभुणण्याचा आवाज करा आणि कानावर तर्जनी ठेवण्याची तितकी अवश्यकता नाही. भ्रमरी प्राणायामचा सराव तुम्ही दररोज दिवसातून ३-४ वेळा करू शकता.
–या प्राणायामातील उच्छ्वासाचा आवाज हा भुंग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण भुणभुणण्याप्रमाणे असतो, यावरून त्याचे असे नाव पडले आहे.

भ्रामरी प्राणायामाचे फायदे- 

–एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते.
–आत्मविश्वास निर्माण होतो
-रक्तदाब कमी करण्यात मदत करत.
— हा प्राणायाम रिकाम्या पोटीच करावा.
–मानसिक ताण, संताप आणि अस्वस्थता यापासून लवकर सुटक मिळते.
–उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांकरिता हे अतिशय परिणामकारक आहे .
— किंचित डोकेदुखी होत असेल तर त्यापासून आराम मिळतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

कोलकात्या विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आपला पहिला विजय साजरा केला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं 6 षटकारांसह 80 धावांची जबरदस्त खेळी केली. रोहितनं आयपीएल कारकीर्दीत 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो आजवरचा चौथा फलंदाज ठरला. याआधी ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि महेंद्रसिंग धोनीनं आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.

सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर क्रमांक लागतो तो ख्रिस गेलचा. गेलने 326 षटकार लगावले आहेत. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स 214 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर तर एमएस धोनी 212 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता रोहित शर्मा 201 षटकारांसह चौथ्या स्थानी आहे.

कोलकाता विरुद्ध रोहित शर्मा पुन्हा एकदा त्याच्या आक्रमक मूड मध्ये दिसला.रोहितने 6 षटकारांसह 80 धावांची जबरदस्त खेळी केली. रोहितच्या खेळीने मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.तसेच आयपीएल मधील पहिला विजय मिळवून मुंबईने आपली घोडदौड सुरू केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

शर्तभंग प्रकरणी पुरोहित नमस्तेचा करार रद्द करावा ; आॅल इंडिया पँथर सेनेचा पाचगणी नगरपालिकेसमोर घंटानाद

सातारा प्रतिनिधी | पाचगणीच्या उच्चभ्रु शाॅपिंग सेंटरमधील पुरोहीत नमस्ते या भाडेपट्टा गाळ्यात भाडेपट्ट्याचा शर्तभंग करत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन “पुरोहीत नमस्ते” च्या मालकाचा भाडेपट्टा करार रद्द व्हावा या मागणीसाठी पाचगणी नगरपालिकेसमोर “आॅल इंडीया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करत पाचगणी नगरपालिकेचा परिसर दणाणून सोडला.

धनदांडग्यांवर कारवाई झाली पाहिजे, मुख्याधिकारी होश मे आओ, पुरोहीत नमस्तेचा भाडेपट्टा करार रद्द करा अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. पाचगणी या इंग्रजांनी शोधलेल्या शहरामध्ये बहुतांशी मालमत्ता या भाडेपट्ट्यावर आहेत. या ठिकाणी पुरोहित नमस्तेच्या मालकांनी बेकायदेशीररित्या अंतर्गत डागडुजीचे काम केले आहे.

पाचगणीतील नगरपालिका हद्दीमध्ये फायनल प्लाॅट नंबर १८० व फायनल प्लाॅट नंबर १८२ या भाडेपट्टा भुखंडावर पाचगणी नगरपालिकेने सन १९८८ ला वाणिज्य संकुल मंजूर करुन घेतले आहे. या वाणिज्य संकुलातील दुकान गाळ्याची लांबी आणि रुंदी ठरवून दिली आहे. नगररचना विभाग पुणे व सातारा यांनी परवानगी देताना गाळ्यामध्ये कोणताही बदल करु नये अशी अट भाडेकरूंना घातली आहे. मात्र पाचगणीत भाडेपट्टा वाणिज्य संकुलातील धारकच मालक झाले आहेत. प्रशासनाचा वचक राहीला नसल्याने राजकीय दबाव व नगरपालिकेतील अधिकारी हाताशी धरत पाचगणीतील भाडेपट्टा शाॅपिंग सेंटरमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे.

पँथर सेनेने याविषयी आवाज उठवत घंटानाद आंदोलन केलं. यावेळी पाचगणी पोलिसांकडून यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आहारात ‘किवी’ फळाच्या सेवनाने होतात जबरदस्त फायदे …

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपली प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर अनेक फळाचा समावेश हा आपल्या आहारात करायला पाहिजे. फळांमुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आजारी रुग्णाला किवी हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची ताकद असते. तसेच अनेक रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी झाल्या असता त्यांना या फळाच्या सेवनाने त्याच्या प्लेटलेट्स भरून काढले जाते.

या फळामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. हे असे फळ आहे कि, याचा उपयोग पावसाळ्यातील आजारापासून वाचवण्यासाठी उपयोग केला जातो. पावसाळ्यात अनेक रोगांचा धोका असतो. तसेच अनेक संसर्गजन्य आजार यामुळे आपले आरोग्य धोक्यात जाऊ शकते. या फळापासून शरीराला आवश्यक असणारे पोषक द्रव्य हे एकाच वेळी प्राप्त होतात. डॉक्टर सुद्धा हे फळ न चुकता खाण्याचा सल्ला पावसाळ्याच्या दिवसात देतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास या फळाचा वापर केला जातो.

किवीच्या फळांमुळे शरीरातील प्लेटलेट वाढण्यास मदत होते. या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा आजार पसरतो. या आजारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरातल्या प्लेटलेट्स कमी होतात. त्यावेळी या फळाचा आहारात समावेश केल्याने मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्स वाढायला सुरुवात होते.

कोवीमुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. किवीचा रस हा जर ज्या लोकांना अस्थमा आहे. त्या लोकांनी घेतला तर त्याचा जास्त लाभ मिळतो. अस्थमाच्या लोकांची श्वसन क्रिया सुधारण्यास मदत होते. फुफुसांमधील अन्य आजारांना सुद्धा याचा फायदा होतो.

कोवीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तुमची रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्याचे काम हे किवीचे एक फळ करते. किवीमध्ये लोहाचे प्रमाण असते. त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम हे किवीचे एक फळ करते.

रक्तवाहिन्यांतील रक्त दाब कमी करण्याचे काम हे किवी करते. उच्च रक्तदाब तसेच शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी करण्याचे काम सुद्धा किवी करते.

डोळे चांगले ठेवते. या फळाचा रस जर आपला प्यालो तर त्यामुळे दृष्टी चांगली राहते. तसेच इतर जो त्रास डोळ्यांना होतो ते होण्याचे प्रमाण कमी होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’