Saturday, December 20, 2025
Home Blog Page 5276

एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प का बसले आहेत ?? सामनातून भाजपला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सरकारविरुद्ध शेतकरी असं एकंदर चित्र गडद होत आहे. यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागलं आहे. असं असतानाच कंगनानं या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करत एका नव्या वादाला तोंड फोडलं होत. त्यावर आता शिवसेना मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली असून भाजपवर ही निशाणा साधण्यात आलाय.

आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत. पाशवी बहुमत, जोर जबरदस्तीच्या दंडेलीवर हे विधेयक मंजूर करून घेतले. पण पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात या विधेयकाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी त्यांनी चक्काजाम केला आहे. हे सर्व संयमाने आणि शांततेने सुरू असताना शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधणे हे कसले लक्षण मानावे?’ असा सवाल सेनेनं उपस्थितीत केला.

शेतकऱ्यांवर लाठीमार केला, गुन्हे दाखल केले हा तर अतिरेकच म्हणावा लागेल. ‘बाबर’ सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता; पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरविले. आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय?’ असा थेट सवाल करत सेनेनं भाजपला फटकारले आहे.

‘चाय डिप्लोमसी’ करु पाहणाऱ्या राज्यसभा उपासभापतींचे पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक; म्हणाले..

नवी दिल्ली । राज्यसभेतील निलंबित आठ खासदारांकडून संसद परिसरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या खासदारांनी काल रात्रभर हे आंदोलन सुरूच ठेवल्यानंतर आज सकाळी उपसभापती हरिवंश यांनी स्वतः या खासदरांना चहा दिला. उपसभापतींच्या कृतीबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे. ही कृती हरिवंश नारायण सिंह यांची महानता आणि उदारता दाखवून देणारी आहे. लोकशाहीसाठी यापेक्षा चांगला संदेश काय असू शकतो. मी त्यांचे अभिनंदन करु इच्छितो. अनेक वर्षांपूर्वी बिहारनेच जगाला लोकशाहीचा संदेश दिला. आज त्याच बिहारच्या भूमीतील हरिवंश नारायण सिंह लोकशाहीचे प्रतिनिधी झाले आहेत. ही आनंदाची आणि प्रेरणादायी गोष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रविवारी राज्यसभेत दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती. त्यांनी कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येत गोंधळ घातला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसेच माईकही उखाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांना निलंबित केले होते. तत्पूर्वी विरोधकांनी उपसभापतींविरोधात अविश्वास ठरावही मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यंकय्या नायडू यांनी हे नियमाविरोधात असल्याचे सांगत ही मागणी फेटाळून लावली.

दरम्यान, कृषी विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आठ खासदारांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित सर्व सत्रांसाठी सोमवारी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे राज्यसभेत सोमवारीही गदारोळ झाला. त्यामुळे कामकाजाविना सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर निलंबित खासदार संसदेच्या आवारात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत आहेत. रात्रभर आंदोलन करणार आणि निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करत राहणार, असं निलंबित खासदारांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

भाडेपट्टा शर्तभंग करणाऱ्या “नमस्ते पुरोहीत”चा करार रद्द करण्याची मागणी; पाचगणी नगरपालिकेसमोर घंटानाद आंदोलन

सातारा । नगरपालिकेने वेळोवेळी हॉटेल “नमस्ते पुरोहित “च्या मालकाला भाडेपट्टा वाणिज्य संकुलात गाळ्याच्या वाढीव आणि बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रारी देऊनसुद्धा शर्तभंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. “नमस्ते पुरोहीत”चा भाडेपट्टा करार रद्द करावा या मागणीकडे पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे नगरपालिकेच्या भाडेपट्टा मालमत्तेत भाडेपट्टा गाळ्यात अनधिकृत बांधकामाला पाठीशी घातलं जाण्याचा आरोप होत आहे. यामध्ये मोठी आर्थिक अपहार झाल्याचाही संशय व्यक्त केला जात असून याविरोधात आवाज उठवण्यासाठी 24 सप्टेंबर रोजी पाचगणी नगरपरिषदेच्या गेटसमोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे यांनी दिला आहे.

पाचगणी या इंग्रजांनी शोधलेल्या शहरांमध्ये बहुतांश मालमत्ता या भाडेपट्ट्यावर आहेत. पाचगणी नगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या या शॉपिंग सेंटरमध्ये “पुरोहीत नमस्ते” या भाडेपट्टा गाळ्याच्या भाडेपट्टा धारकाने अनधिकृतपणे किचन व गाळ्याच्या आतील बाजूस डागडुजीची परवनागी न घेता अंतर्गत बांधकाम केले आहे. एकूण काय, तर शॉपिंग सेंटरच्या भाडेपट्टा मालमत्तेत भाडेधारक “पुरोहीत नमस्ते”च्या मालकांनी शर्तभंग केला आहे.

पाचगणीतील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये फायनल प्लाॅट नंबर १८० व १८२ या भाडेपट्टा भुखंडावर पाचगणी नगरपालिकेने सन १९८८ ला वाणिज्य संकुल मजुर करुन घेतले आहे. या वाणिज्य संकुलातील दुकान गाळ्याची लांबी आणि रुंदी ठरवून देण्यात आली आहे. नगररचना विभाग पुणे व सातारा यांनी परवानगी देताना गाळ्यामध्ये कोणताही बदल करु नये अशी सूचना दिली आहे. शिवाय भाडेपट्टा मालमत्तेत बदल न करण्याची अटही घातली आहे. असं असतानाही पाचगणीत भाडेपट्टा वाणिज्य संकुलातील धारकच मालक झाले आहेत. या भाडेकरूंवर प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने राजकीय दबाव वापरत आणि नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरत पाचगणीतील भाडेपट्टा शाॅपिंग सेंटरमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे. शॉपिंग सेंटर हे नगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असल्यानेच हा कारभार सुरु असल्याचं बोललं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

UGC ने जाहीर केले शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक; सुट्ट्यांमध्य केली मोठी कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष हे १ नोव्हेंबर २०२० ते २९ ऑगस्ट २०२१ असे असणार असल्याचे या वेळापत्रकातून स्पष्ट होते आहे. या वर्षांमध्ये दिवाळी आणि उन्हाळयाच्या सुट्ट्याही कमी करण्यात आल्या आहेत. दरवर्षी जून- जुलै च्या दरम्यान सुरु होणारे शैक्षणिक वर्ष यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता विद्यापीठ आयोगाने वेळापत्रक जाहीर केले असून १ नोव्हेंबर पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे.

यापूर्वी आयोगाने मार्गदर्शक सूचनांची सूची जाहीर केली होती. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्याची अंमलबजावणी करणे शक्य झाले नव्हते. आता जाहीर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ नोव्हेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होईल. पहिले सत्र हे १ नोव्हेंबर २०२० ते ४ एप्रिल २०२१ असे असणार आहे. आणि दुसरे सत्र ५ एप्रिल ते २९ ऑगस्ट २०२१ असे असणार आहे.

३० ऑक्टोबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, १ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष वर्ग सुरु करणे अशा सूचनांसहित वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी १ मार्च ते ७ मार्च या कालावधीत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर ८ मार्च ते २७ मार्च या कालावधीत परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २७ मार्च ते ४ एप्रिल अशी पहिल्या सत्रासाठीची सुट्टी असेल. ५ एप्रिल पासून दुसरे सत्र सुरु होईल. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट पर्यंत परीक्षेच्या तयारीसाठी सुट्टी दिली जाईल. ९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत दुसऱ्या सत्राच्या परीक्षा होतील आणि ३० ऑगस्ट पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यात येईल. असे या वेळापत्रकात सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राज्यसभेचे ‘ते’ निलंबित खासदार संसदेच्या प्रांगणात आंदोलन सुरुच ठेवणार; आता उपसभापतीही करणार उपवास

नवी दिल्ली । निलंबित करण्यात आलेले राज्यसभेचे खासदार कारवाईविरोधात आंदोलन करत आहेत. चक्क संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर रात्र काढत ता खासदारांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान या खासदारांसाठी सकाळी चहा घेऊन जाणारे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हेदेखील आता उपवास करणार आहेत. आज सकाळी उपसभापतींनी खासदारांना चहा नेऊन दिल्याने काहीतरी सकारात्मक घडेल, अशी आशा होती. मात्र, निलंबित खासदारांनी आपण आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनीही आपण एक दिवसाचा उपवास करणार असल्याचे जाहीर केले.

तसेच हरिवंश नारायण सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी रविवारी राज्यसभेत झालेल्या गोंधळाविषयी खंत व्यक्त केली आहे. निलंबित खासदारांनी संसदेत लोकशाहीचे वस्त्रहरण केले. २० सप्टेंबरला राज्यसभेत खासदारांनी केलेल्या वर्तनामुळे संसदेची प्रतिमा मलीन झाली आहे. लोकशाहीच्या नावाखाली हिंसक आंदोलन करण्यात आले. उपसभापतींना भयभीत करण्यात आले, तसेच संसदेच्या नियमांचे उल्लंघनही करण्यात आले, असे हरिवंश नारायण सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

राज्यसभेत रविवारी दोन वादग्रस्त कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. तेव्हा सभागृहाची सूत्रे उपसभापती हरिवंश नारायण यांच्याकडे होती. विरोधकांचा कृषी विधेयकांवर आवाजी मतदान घेण्याचा निर्णयाला विरोध होता. मात्र, तरीही हे या विधेयकावर उपसभापती हरिवंश नारायण यांनि आवाजी मतदान घेत ही विधियके मंजूर केली. यादरम्यान, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येत गोंधळ घातला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसेच माईकही उखाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यसभेतील वातावरण प्रचंड तापले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन

सातारा । मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज सकाळी सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथंच आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली. आशालता यांच्यासह काळूबाईच्या सेटवर काम करणाऱ्या २७ जणांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. यांच्यामार्फत करोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

अभिनय कारकीर्द
मूळच्या गोव्याच्या असलेल्या आशालता यांनी कोकणी व मराठी चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी विविध भाषांतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. छोट्या पडद्यावरील अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. त्यानंतर ‘गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपटसृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. आशालताताईंनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. ह्या शिक्षणाचा त्यांना अभिनय क्षेत्रातही उपयोग झाला होता. संगीत विषयावर आधारीत ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

कराड शहर पोलिसांकडून चोरीच्या 7 दुचाकी जप्त, 4 जण ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी गाडी चोरी झाल्याची घटना घडली होती. त्याचा तपास चालू असताना गोपनीय खबऱ्याकडून चोरी झालेल्या गाडीची माहीती मिळाली.

खबऱ्यांकडून माहीती मिळाल्यानंतर एकाला ताब्यात घेतल्यानंतर आणखी तीन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. तसेच या चौघांकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरीची गाडी विकण्यासाठी आरोपींच्याकडून शक्कल लढविली जात होती. गुन्ह्यातील आरोपी अनिकेत वाघमारे यांच्या मालकीच्या दुचाकीची नंबर प्लेट चोरीच्या दुचाकींना लावून त्या गाडीची कागदपत्रे गाडी खरेदी करणाऱ्या खरेदीदाराला दाखवून विश्वास संपादन केला जात होता.

चारही आरोपी मित्र असून चैनीसाठी व दैनंदिन गरजांसाठी दुचाकी चोरी करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. चोरीच्या घटनेतील चारही आरोपी कराड तालुक्यातील उंब्रज या गावच्या परिसरातील आहेत. सपोनि राहूल वरूटे, अमित बाबर यांच्यासह कराड शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

पिस्टल विक्री करण्यास आलेला जेरबंद; ढेबेवाडी फाट्यावर एलसीबीची कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील ढेबेवाडी फाट्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी पिस्टल विक्री करणार्‍यास आलेल्या एकास शिताफीने जेरबंद करून त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल व चार मॅगझीन आणि 30 जीवंत काडतूस हस्तगत केली. शुभम प्रकाश ढवळे, वय 27 रा. दत्त हाऊसींग सोसायटी, आगाशिवनगर कराड असे संशयीताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, कराड येथील ढेबेवाडी फाटा येथे एकजण गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीस येणार असल्याची खात्रीशीर माहिती सातारा एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या सुचनेनुसार तात्काळ ढेबेवाडी फाटा येथे एलसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी एक इसम संशयीतरित्या फिरताना अढळून आला. त्याचा संशय आल्याने त्यास पथकाने हटकले असता त्याने हुलकावणी देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यास पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व पॅन्टीच्या खिशात जिवंत काडतूस तसेच त्याचे हातातील पिशवीमध्ये आणखी एक गावठी बनावटीचे पिस्टल असे एकूण दोन गावठी बनावटीचे पिस्टल, चार मॅगझीन, तीस जिवंत काडतूस व एक मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 37 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, स.फौ. पृथ्वीराज घोरपडे, पोहवा विनोद गायकवाड, पोना मोहन नाचण, शरद येवले, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, पोशि मयुर देशमूख, मोहसिन मोमीन, चापोना संजय जाधव यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Public Transport चा वापर करण्यास अजूनही घाबरत आहेत लोकं, 74% कर्मचार्‍यांना हवे आहे Work from Home

हॅलो महाराष्ट्र । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे हजारो नवीन पॉझिटिव्ह केसेस दररोज समोर येत आहेत. यामुळे लोकांच्या मनात संसर्ग होण्याची भीतीही दररोज वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की, लोक कुठेही बाहेर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास धजावत नाहीत. बहुतेक कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये जायचे नाहीये. ते घरूनच काम करण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (Assocham) आणि कंसल्टिंग फर्म प्रिमस पार्टनर्स (Primus Partners) यांनी केलेल्या सर्वेक्षणात 74 टक्के लोकांनी घरूनच काम सुरू ठेवण्याचा आग्रह धरला आहे.

लॉकडाऊनमध्ये 79% कर्मचारी घरूनच काम करत आहेत
एका सर्वेक्षण अहवालानुसार, तीन चतुर्थांश लोकांना एकतर वर्क फ्रॉम होम हवे आहे किंवा फ्लेक्सिबल वर्किंग ऑवर्स (flexible working hours) सारख्या सुविधा हव्या आहेत. हे संयुक्त सर्वेक्षण देशातील आठ महानगर आणि मोठ्या शहरांमध्ये करण्यात आले. यामध्ये दिल्ली, मुंबई, बेंगलुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद आणि पुणे यांचा समावेश आहे. अहवालानुसार, लॉकडाऊन दरम्यान 79 टक्के कर्मचारी घरीच राहिले आणि त्यांनी ऑफिसचे काम पूर्ण केले. लॉकडाउन हटविल्यानंतर आणि टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही 74 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम (WFH) च्या बाजूने आहेत. त्यांना भीती आहे की ऑफिसला जात असताना त्यांना कोरोना विषाणूची लागण होईल आणि ज्यामुळे त्यांच्या कुटुंबालाही धोका असू शकेल.

या संयुक्त सर्व्हेच्या अहवालानुसार 26 टक्के लोक लॉकडाऊननंतर घरातूनच 100 टक्के वर्क फ्रॉम होम करण्यास अनुकूल आहेत. त्याचबरोबर, 56 टक्के लोक असे म्हणतात की, वर्क फ्रॉम होमची पॉलिसी अंशतः अंमलात आणली जावि. मात्र, असेही 26 टक्के लोक आहेत ज्यांना आता ऑफिस सुरू करावे अशी इच्छा आहे. त्यांना त्यांचे काम ऑफिसमध्येच करायचे आहे. लॉकडाऊन दरम्यान 79 टक्के लोकांनी वर्क फ्रॉम होम केले, तर 11 टक्के रजेवर राहिले आणि 10 टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये गेले. या अहवालानुसार कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होम फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे त्यांचे ऑफिसचे भाडे, विजेचे बिल, पिक-ड्रॉप खर्च वाचला.

स्वच्छतेवर भर दिल्यास प्रवाश्यांचा विश्वास वाढेल
प्रिमस पार्टनर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक निलय वर्मा म्हणाल्या की,’ शहरांमध्ये अधिकाधिक कार्यालयीन कर्मचारी होम किंवा फ्लेक्झिबल वर्किंग आवर (FWH) कडून वर्कला पसंती देत ​​आहेत. शहरांवरील सार्वजनिक वाहतुकीमध्ये या संकटावर मात करण्यासाठी मोठे बदल करावे लागतील. लोकांचा समज बदलण्यासाठी आणि त्यांची भीती दूर करण्यासाठी ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्सनी स्वच्छता या विषयाकडे बरेच लक्ष दिले पाहिजे. प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. सामाजिक अंतरासाठी वाहनांमध्ये विशेष व्यवस्था करावी लागेल. या मानकांचा अवलंब केल्यावरच सार्वजनिक वाहनांमधील प्रवाशांच्या कमी संख्येने वसूल होणे शक्य आहे.

कॉन्टॅक्टलेस टिकेटिंग सुरू करण्याची चांगली संधी
प्रिमस पार्टनर्सचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि सह-संस्थापक देवरूप धार म्हणाले की,’ या जागतिक महामारीमुळे सर्व उद्योग मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. सध्याच्या वातावरणात, प्रत्येक क्षेत्राला तांत्रिक समाधानाचा वापर करण्यास भाग पाडले गेले आहे. सार्वजनिक वाहतूक यापेक्षा वेगळी नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट अथॉरिटीज आणि सरकारने कॉन्टॅक्टलेस तिकिटिंग आणि डिजिटल पेमेंट सिस्टम सुरू करण्याची ही चांगली संधी आहे. या अल्पावधीतच सार्वजनिक वाहतुकीवर प्रवाश्यांचा विश्वास वाढेल. तसेच, डिजिटल इंडिया मोहिमेलाही याचा दीर्घकाळ फायदा होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

“कंपनीविरुध्द तक्रार करणे म्हणजे सूड नाही”: नारायण मूर्ती

हॅलो महाराष्ट्र । जर व्हिसल ब्लोअर व्यक्तीने योग्य ते पुरावे देऊन आपले दावे मांडले तर त्याचा सूड म्हणून विचार केला जाऊ नये. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायणमूर्ती यांनी हे सांगितले आहे. 21 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय व्यवस्थापन संघटनेच्या 47 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनात नारायणमूर्ती म्हणाले, “जर कोणी पुराव्यांसह व्हिसल ब्लोअर बॉसचा मुद्दा मांडत असेल तर कंपनीने त्याला पूर्ण सुरक्षा द्यावी.”

जर व्हिसल ब्लोअर पारदर्शकपणे तक्रार करत असेल तर कंपनीच्या बोर्डाने कंपनीची प्रतिष्ठा वाचविली पाहिजे आणि आपली कर्तव्ये पार पडली पाहिजे. कंपनी बोर्डाचे हे एक महत्त्वपूर्ण कार्य आहे.

ते म्हणाले की,’मध्यम किंवा निम्न स्तरावरील कर्मचार्‍यांविरोधात कोणतीही तक्रार आल्यास त्यासाठी अंतर्गत समिती नेमली पाहिजे. त्यामध्ये आरोपींशी संपर्कात नसतील अशा सिनिअर कर्मचार्‍यांचा समावेश असावा आणि त्यांनी केलेले दावे तपासण्यासाठी हे पुरेसे आहे.

बोर्ड स्वतः निर्णय घेऊ शकत नाही
ते पुढे म्हणाले की जर अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कार्यकारी संचालकांसह इतर कोणत्याही बोर्डाच्या सदस्यांविरोधात तक्रार आल्यास बहुतेक मंडळे विद्यमान नियम कायद्याच्या आधारे स्वतःच याची तपासणी करतात … ही कल्पना योग्य नाही कारण जज, ज्युरी आणि अभियुक्त होऊ शकत नाही.

इन्फोसिसमध्ये अशी प्रकरणे समोर आली आहेत
2018 मध्ये इन्फोसिसच्या कॉर्पोरेट कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून एका व्हिसल ब्लोअरने सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्यावर अनेक आरोप केले होते. मागील मंडळाने केलेल्या चुकीच्या कामांना लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निलेकणी यांच्यावर होता. तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीला तक्रारदाराने एक पत्रही लिहिलेले होते.

यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये एका व्हिस्लो ब्लोअरने सीईओ सलील पारेख आणि सीएफओ निलंजन रॉय यांच्यावरही अकाउंटिंग अनियमिततेचा आरोप केला होता. देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या आयटी कंपनीने यानंतर सविस्तर अहवाल जाहीर केला. ऑडिट कमिटीच्या तपासणीनंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यानंतर कंपनीला क्लिनचिट देण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.