Friday, January 2, 2026
Home Blog Page 5671

१५ जूननंतर पुन्हा संचारबंदी? जाणुन घ्या व्हायरल मेसेज मागचे सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. संचारबंदीचे नियम शिथिल केल्यापासून देशात आणि राज्यातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा देशात कडक संचारबंदी जाहीर होईल का अशी भीती नागरिकांमध्ये असतानाच व्हाट्स अप तसेच सोशल मिडीयावर एक मेसेच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये १५ जूननंतर संचारबंदी पुन्हा लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे सत्य नसून अफवा असल्याचा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे.

या व्हायरल मेसेजमुळे अनेक नागरिक संभ्रमात आहेत तसेच चिंताग्रस्त झाले आहेत. अनेकांनी ट्रेन तसेच विमानाची तिकिटे बुक केली आहेत. पुन्हा संचारबंदी जाहीर होऊन पुन्हा वाहतूक बंद होणार असल्याच्या या मेसेजमुळे हे नागरिक त्रस्त झाले आहेत. ’15 जून के बाद फिर से हो सकता है संपूर्ण लॉकडाउन. गृह मंत्रालय ने दिये संकेत, ट्रेन और हवाई सफर पर लगेगा. ब्रेक कोरोना की बढ़ती रफ्तार के बाद लिया गया फैसला ‘ अशाप्रकारचा हा मेसेज आहे. मात्र हा मेसेच अफवा असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही आहे.

 

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबी ने हा मेसेच खोटा असल्याचे सांगितले आहे.  त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी लोकांना अशा खोट्या मेसेजपासून सावध राहन्यासाचे आवाहन ही केले आहे. यावरून १५ जूननंतर पुन्हा संचारबंदी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मुंबई पोलिसांची गस्त झाली हायटेक; पोलिसांच्या ताफ्यात ‘सेगवे’ सामील

मुंबई । पोलीस दलासाठी उपयुक्त अशा ‘सेगवे’चे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते येथे झाले. मुंबई पोलिसांनी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. या नवीन सेवेमुळे मुंबई पोलीस अधिक गतिमान झाले आहेत, असे अनिल देशमुख यांनी सांगितलं. या उद्घाटनावेळी आमदार रोहित पवार मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त दक्षिण विभाग निशिथ मिश्रा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलिसाच्या मास्कला माईक लावण्यात येणार आहे. याद्वारे लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितते संदर्भात सूचना देऊ शकतील, तसेच त्यांच्या मदतीला पब्लिक अड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोन देखील आहेत. त्याचाही उपयोग होऊ शकेल, असे देशमुख यावेळी म्हणाले.

मरिन ड्राईव्ह येथे ५० सेगवेचे उद्घाटन करण्यात आले. यातील १० सेगवे हे वरळीसाठी तर ५ नरिमन पॉइंटसाठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे ‘सेग वे’ देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्राचे पोलीस दल हे जागतिक पोलिसिंग स्टॅंडर्ड नुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा साधन सामग्रीने भक्कम करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. त्यानुसार या सेग वे चे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी नागरिकांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या हे चिंतेचे कारण बनली आहे. त्याबरोबर राज्यातील अफवाचे पीक देखील एक गंभीर विषय बनला आहे. मध्यंतरी एकदा मुख्यमंत्री गरज पडली तर पुन्हा संचारबंदी जाहीर करावी लागेल असे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा विपर्यास करीत काहींनी पुन्हा संचारबंदीच्या अफवा पसरवल्या आहेत.  याबद्दल खुलासा करत अद्याप पुन्हा संचारबंदी जाहीर केलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे. तसेच कुठेही गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

गेले दोन-अडीच महिने संचारबंदीनंतर राज्यात आता मिशन बिगिन अगेन द्वारे संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. हळूहळू राज्यातील कामकाज सुरु करण्यात आले आहे. ३० जूनपर्यंत पाचव्या टप्प्यातील संचारबंदी राहणार असली तर राज्यातील व्यवहार सुरु झाले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडून काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक आहेत. नागरिकांना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. या अफवेनंतर मुख्यामंत्री कार्यालयातून कुठेही गर्दी करू नका, आणि शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा असे आवाहनही करण्यात आले आहे.

 

आपला करोनाविरुद्धचा लढा अद्याप संपलेला नाही, तो सुरूच असून सतर्क राहून घाई-गडबड आणि गर्दी न करता आपल्याला सार्वजनिक ठिकाणी वावरावे लागेल. सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असं लक्षात आलं तर नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले होते. “आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावं लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावलं टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेलं नाही. अजूनही लढा संपलेला नाही. करोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही,” असेही ते म्हणाले होते. याचा गैरफायदा काहींनी घेतल्याचे दिसून येते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राज्यात पुन्हा लॉकडाऊनच्या वृत्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात..

मुंबई । महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की, कुठेही गर्दी करू नका. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियातून पसरलं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

SBI नंतर ‘या’ बँकेने कमी केले होम लोनचे व्याज दर; आजपासून EMI होणार कमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (एचडीएफसी) शुक्रवारी १२ जूनपासून आपला रिटेल प्राइम लेंडिंग रेट हा २० बेस पॉइंटने कमी केला आहे. या वजावटीनंतर हा दर १६.२० % करण्यात आला आहे. या दरात कपात केल्याने एचडीएफसीच्या सध्याचे सर्व रिटेल होम लोन आणि होम-नॉन लोन ग्राहकांना याचा थेट फायदा होईल.

असे असतील नवीन व्याज दर
प्राइम लेन्डिंग रेट हा तो दर आहे ज्याद्वारे व्यावसायिक बँका त्यांच्या सर्वात विश्वासार्ह आणि क्रेडिट योग्य ग्राहकांना कर्जे देतात. या व्याजदरात २० बीपीएस कपात झाल्यानंतर आता एचडीएफसीचे नवीन व्याज दर हे ७.५-८.५% च्या दरम्यान असतील.

एसबीआयने कर्ज कमी केल्यानंतर हा निर्णय घेतला गेला
हे पाऊल स्टेट बँक ऑफ इंडियाकडे बघून उचलण्यात आले आहे. एसबीआयने एमसीएलआरमध्ये सलग १३वी कपात जाहीर केली आहे. यामुळे एसबीआयचे कर्ज आणखी स्वस्त होईल. यावेळी बँकेने एमसीएलआरमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गृहकर्ज घेतलेल्या लोकांना याचा फायदा होईल, असे बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

एसबीआयकडे आता ७% एमसीएलआर आहे
बँकेने जारी केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एमसीएलआर एक वर्षाच्या कालावधीसाठी ७.२५ टक्क्यांवरून ७ टक्के इतका करण्यात आलेला आहे. १० जूनपासून या नवीन निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. स्टेट बँकेने यापूर्वीच बाह्य बेंचमार्क लिंक्ड लेन्डिंग रेट (ईबीआर) तसेच रेपो रेट लिंक्ड लेन्डिंग रेट (आरएलएलआर) यांमध्ये ०.४० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने ईबीआरला ७.०५ टक्क्यांवरून वर्षाकाठी ६.६५ टक्क्यांवर आणले आहे, तर रेपो दराशी जोडलेले व्याज दर हे ६.६५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आणले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करा, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

मुंबई । मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल सेवा) सुरू करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

काल राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली.

याचबरोबर कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर त्या भागातील व्यवहार २८ दिवस बंद ठेवले जातात. बंद काटेकोरपणे पाळला जाण्यासाठी पोलिस तैनात. मात्र, पोलिसांना आराम मिळावा, त्याचा वापर अन्यत्र होण्यासाठी हा कालावधी १४ दिवस करण्याची मागणीही राजेश टोपे यांनी केंद्राकडे यावेळी केली .

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा करण्याचे म्हटले होते. त्याबाबत केंद्राकडे मागणी करण्यात येईल, असेही नमुद केले होते. दरम्यान, कोरोना व्यतिरिक्त अन्य जे आजार आहेत क्षयरोग, पावसाळ्यात होणारे आजार, मलेरिया, डेंग्यू याच्या नियंत्रणासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी लोकांनी स्वयंशिस्त पाळावी. मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हात स्वच्छ धुवावेत आदी बाबी कटाक्षाने पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

EPFOने पेन्शन धारकांना दिला ‘हा’ मोठा दिलासा, ६५ लाख लोकांना मिळणार थेट लाभ

नवी दिल्ली । निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन मिळवण्यासाठी हयात (life certification) असल्याचा दाखला द्यावा लागतो. याला जीवन प्रमाणपत्र म्हणतात. ईपीएफओने (EPFO) देशभरात पेन्शन घेणाऱ्या ६५ लाख लोकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. आता यापुढे निवृत्तीवेतनधारक त्यांच्या घराजवळील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये त्यांचे जीवन पुरावे बनवाता येणार आहेत त्यामुळं उतरत्या वयातील पेन्शन धारकांना यामुळं दिलासा मिळणार आहे. EPFO ही कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचार्‍यांच्या सामाजिक सुरक्षेची काळजी घेणारी संस्था आहे.

केवळ कॉमन सर्व्हिस सेंटर नव्हे तर ईपीएफओच्या (EPFO ) प्रादेशिक केंद्रावर पेन्शन धारकांना जीवन प्रमाणपत्र दिले जाऊ शकते. देशभरात १२५ प्रादेशिक केंद्रे आहेत. असे ११७ जिल्हे आहेत जिथे जिल्हास्तरीय ईपीएफओ कार्यालय आहे, तेथेही हे काम करता येईल. याशिवाय पेन्शन मिळणाऱ्या बँकेतही हे काम करता येणार आहे. देशभरात ३.६५ लाख सामान्य सेवा केंद्रे आहेत.

ईपीएफओने त्यांच्याशी करार केला आहे. त्यांची कागदपत्रे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली जातील. हे जीवन प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध मानले जाईल. पेन्शन कामगार वर्षाच्या कोणत्याही वेळी हे प्रमाणपत्र सादर करू शकतात. यापूर्वी हा नियम होता की प्रत्येकाने नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करावे. मात्र ज्यांना जुने प्रमाणपत्र जमा करायचे आहे त्यांच्यासाठी शेवटची तारीख नोव्हेंबरपर्यंत असेल.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

कोरोना संकट काळात RBI कडून या बँकेवर कारवाई; ग्राहकांना खात्यावरुन पैसे काढण्यास मनाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती पाहता आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सहा महिन्यांकरिता या बँकेतील नवीन कर्ज तसेच ठेवी स्वीकारणे बंद केले आहे. आरबीआयने ११ जून रोजी याबाबतची माहिती दिली आहे. आरबीआयने सांगितले की, पीपल्स सहकारी बँक सहकारी बँकेतून पैसे काढण्याची सुविधा त्या बँकेतील कोणत्याही ठेवीदारास मिळणार नाही.

पीपल्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर आली आहेत ही निर्बंध- आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की, १० जून २०२० रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर बँक रिझर्व्ह बँकेच्या लेखी परवानगीशिवाय या बँकेला आता कोणतेही नवीन कर्ज देणे तसेच जुन्या थकबाकीचे नूतनीकरण करता येणार नाही. याशिवाय बँक आता कोणतीही नवीन गुंतवणूक करू शकणार नाही किंवा नवीन ठेवी स्वीकारु शकणार नाही. तसेच रिझर्व्ह बँकेने या सहकारी बँकेला आपल्या कोणत्याही मालमत्तेची विक्री,त्याचे हस्तांतरण किंवा त्याची विल्हेवाट लावण्यास मनाई केलेली आहे.

केंद्रीय बँकेने म्हटले आहे की, विशेषत: सर्व बचत खाते किंवा चालू खाते किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रक्कम यावेळी काढू दिली जाऊ शकणार नाही. या सूचना १० जून रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत लागू राहतील आणि त्यांची समीक्षा केल्या जातील. मात्र, या सहकारी बँकेचे बँकिंग लायसन्स रद्द झाले ही अफवा पसरू देऊ नये, असे देखील रिझर्व्ह बँकेने यावेळी स्पष्ट केलेले आहे. आपली आर्थिक स्थिती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत बँक या लागू केलेल्या निर्बंधांसह आपला बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल.

मे महिन्यात रद्द झाला आणखी एका बँकेचे लायसन्स – आरबीआयने मे महिन्यात महाराष्ट्रातील सीकेपी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. महाराष्ट्रातील या सहकारी बँकेवरील आर्थिक अडचणींमुळे आरबीआयने हा निर्णय घेतला. ३० एप्रिलपासून आरबीआयने या बँकेची सर्व कामे थांबविली आणि गुंतवणूकदारांचा निर्णय वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला हा निर्णय घ्यावा लागला. आर्थिक अस्थिरतेच्या आधारे आरबीआयने या बँकेचे लायसन्स रद्द केले आहे. सध्या बँका ह्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत असून आर्थिक पेचप्रसंगातून जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘या’ कारणामुळं मोटरस्पोर्ट सोडून ‘ती’ बनली पॉर्नस्टार

मेलबर्न । मोटरस्पोर्ट मधून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या रिनी ग्रेसीने तिच्या आयुष्याला ३६० अंशाच्या कोनात कलाटणी दिली. मोटरस्पोर्ट सोडून रिनी ग्रेसी चक्क पॉर्न इंडस्ट्रीकडे वळली आहे. २०१५ साली रिनी ग्रेसी V-8 सुपरकार डुनलॉप सीरिजमध्ये भाग घेणारी १४ वर्षातली पहिलीच पूर्ण वेळ महिला स्पर्धक बनली होती. मात्र, काही वर्षांनंतर मोटरस्पोर्टमधला खराब फॉर्म आणि यातून कमी पैसे मिळत असल्यामुळे रिनी ग्रेसी पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला. रिनी ग्रेसीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपण मोटरस्पोर्ट सोडून पॉर्न इंडस्ट्रीकडे का वळलो? याचं कारण सांगितलं आहे. ‘पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येऊन मला २ महिन्यांचा काळही झाला नाही, पण या कालावधीमध्ये मी बरेच पैसे कमावले. २ महिन्यांनंतर माझी कमाई ६ अंकांमध्ये असेल. यामध्ये मला यश मिळालं आहे,’ असं रिनी ग्रेसी म्हणाली.

‘मी हे काम करत असल्यामुळे कोणी मला वाईट समजत असेल, तुमच्या या बोलण्यामुळे मला दु:ख होईल किंवा मी यामुळे काळजी करेन, असं तुम्हाला वाटत असेल, तर तो तुमचा गैरसमज आहे. हे काम करताना जोपर्यंत मला संकोच वाटत नाही किंवा जोपर्यंत या कामात मला समाधान मिळतं, तोपर्यंत मी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये राहणार,’ अशी प्रतिक्रिया रिनी ग्रेसीने या व्हिडिओमधून दिली आहे.लोकांकडून होत असलेल्या टीकेलाही रिनी ग्रेसीने प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्या भविष्याचा विचार करताना, मी माझ्या इतिहासाला मध्ये कशाला आणू? फक्त पैशासाठी एखाद्या अनोळख्या व्यक्तीला स्पर्श करणं माझ्यासाठी गरजेचं नाही,’ असं वक्तव्य रिनीने केलं.

ऑस्ट्रेलियातलं वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार रिनी ग्रेसीला तिच्या नव्या कारकिर्दीतून आर्थिक स्थैर्य मिळालं आहे. रिनी ग्रेसीला तिचे फोटो आणि व्हिडिओ विकून २५ हजार डॉलर (१८.८ लाख रुपये) प्रत्येक आठवड्याला मिळाल्याचं या वृत्तात म्हणलं आहे. ‘एवढ्या पैशांचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. या सगळ्याचा मी आनंद घेत आहे. माझे फोटो मी विकते आणि लोकं मला टिप देतात. ३० वर्षांसाठी घेतलेलं घरासाठीचं कर्ज मी १२ महिन्यांमध्येच फेडून टाकणार आहे,’ असं रिनी ग्रेसीने सांगितलं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

ओक्लाहोमा येथून पुन्हा एकदा निवडणुक रॅली सुरु करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओक्लाहोमा या राज्यातून आपली निवडणूक प्रचार रॅली पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर ते टेक्सास, फ्लोरिडा, अ‍ॅरिझोना आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांत आपला मोर्चा वळवतील. कोरोना या जागतिक साथीच्या विषाणूमुळे गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी आपल्या निवडणूक सभा तहकूब केल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. विरोधी पक्ष डेमॉक्रॅटिक पक्षाचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन हे त्यांचे मुख्य विरोधक आहेत.

व्हाईट हाऊस येथे त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “आम्ही आता आपल्या सभा पुन्हा सुरू करणार आहोत. गेल्या काही सभांमध्ये आम्हांला जबरदस्त पाठींबा मिळालेला आहे. ” ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही आमच्या प्रचार रॅली आता पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. आम्ही ओक्लाहोमा येथील टुल्सा येथून प्रारंभ करू. ओक्लाहोमा हे एक सुंदर ठिकाण आहे. “ट्रम्प पुढे म्हणाले,” आम्ही फ्लोरिडालाही जाणार आहोत, टेक्सास तसेच फ्लोरिडामध्ये मोठ्या रॅली काढणार आहोत. या सर्व रॅली खूपच मोठ्या असतील. त्यानंतर आम्ही अ‍ॅरिझोनाला जाऊ आणि जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा आम्ही उत्तर कॅरोलिना येथे जाऊ. “

अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प हे त्यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सर्वात जास्त गर्दी खेचणारे नेते आहेत आणि आतापर्यंत त्यांनी आपला प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या बिडेन यांच्यापेक्षा जास्त गर्दी आपल्या सभांना जमविली आहे. व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी झालेल्या संभाषणावेळी ट्रम्प यांनी उत्तर कॅरोलिनाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर यांच्यावरही टीका केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑगस्टमध्ये उत्तर कॅरोलिनामध्ये आपली राष्ट्रीय परिषद आयोजित करीत आहे.

ते म्हणाले की,” कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या वेळी उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर हे राज्य पुन्हा उघडण्यास खूपच उशीर करत आहेत.” ट्रम्प असेही म्हणाले की,” अनेक राज्यांना या परिषदेचे आयोजन करावेसे वाटते, त्यातील प्रमुख टेक्सास, जॉर्जिया आणि फ्लोरिडा ही राज्य आहेत.” एका मोठ्या निधी उभारणीच्या कार्यक्रमासंदर्भात अध्यक्ष ट्रम्प हे टेक्सासमधील डलास येथे जाणार आहेत. त्यांची शेवटची निवडणूक सभा हा २ मार्च रोजी शार्लोटमध्ये झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.