Friday, January 2, 2026
Home Blog Page 5670

कोरोना रुग्णांना जनावरांची वागणूक; सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्यांना सुनावले खडे बोल

नवी दिल्ली । कोरोना रुग्णांना मिळणारा उपचाराचा दर्जा आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची लावण्यात येणारी विल्हेवाट याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्यांना खडसावलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस पाठवली आहे. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे.

राजधानी दिल्लीत कोरोनाच्या चाचणींची संख्या कमी झाल्याचा मुद्दा यावेळी न्यायालयाने मांडला. कोरोना रुग्णांवरील उपचार आणि कोरोनाबाधितांच्या मृतदेहांची होणारी हेळसांड याप्रकरणी सुनावणी करत न्यायमूर्ती संजय किशन कौल, एम.आर.शाह आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठानं गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारचा खडे बोल सुनावले.

मृतांपेक्षाही आम्हाला जे जिवंत आहेत त्यांची जास्त काळजी आहे. रुग्णालयांची अवस्था पहा. वॉर्डमध्ये मृतदेह पडलेले आहेत. मुंबईत १६ ते १७ हजार चाचण्या होत असताना दिल्लीत ही संख्या ७ हजारांवर आली आहे. प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा समोर आणला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी यावेळी काही राज्यांमध्ये मृतदेह कचऱ्याच्या डब्यात सापडल्याचा मुद्दा मांडला. त्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात आहे अशा शब्दांत न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी परिस्थिती मांडली.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीदेखील यावेळी रुग्णांसोबत मृतदेह ठेवले जात असून काही ठिकाणी दोरीच्या सहाय्याने मृतदेह ओढण्यात आल्याचं उदाहरण दिलं. यावर न्यायमूर्ती शाह यांनी मग तुम्ही काय केलं आहे ? असा सवाल विचारला. तसेच मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासंबंधी १५ मार्च रोजी केंद्र सरकारने नियमावली दिलेली असताना त्याचं पालन होत नाही आहे. नातेवाईकांना रुग्णाच्या मृत्यूची माहिती दिली जात नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.

दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत असताना चाचण्यांची संख्या कमी का केली जात आहे ? चाचण्या न करणे हा पर्याय नाही. चाचण्या वाढवणे हे राज्यांचं कर्तव्य आहे, जेणेकरुन लोकांना राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती मिळेल, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.न्यायमूर्ती भूषण यांनी चाचणी करण्याची विनंती करणाऱ्यांना नाकारलं जाऊ शकत नाही असं सांगताना चाचणी प्रक्रिया सोपी केली जावी यावर भर देण्यास सांगितलं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

मान्सूनसोबत कोरोनाचा धोकाही वाढणार? जाणुन घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात कोरोनाव्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कोरोनाने संक्रमित रूग्णांची संख्या ही ३ लाखांचा टप्पा ओलांडणार असे दिसून येते आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या जोरदार आगमनामुळे लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. हवामान तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जवळजवळ संपूर्ण देशात मान्सून आला आहे. केरळमध्ये मान्सूनने जोरदार धडक मारली असून आता तो उत्तरेकडे सरकला आहे.

मान्सूनच्या या आगमनामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल फिव्हर सारख्या अनेक आजारांचा धोकाही वाढलेला आहे. अशा परिस्थितीत, ही चिंतेची बाब आहे की, व्हायरल फिव्हर आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाही आहे आणि म्हणूनच कोरोनाचा हा संसर्ग अधिक वेगाने वाढू शकतो. मान्सूनमुळे लोकांमध्ये कोणत्या प्रकारची भीती निर्माण झाली आहे, यासंबंधी काही प्रश्नांची उत्तरे आम्ही देत ​​आहोत.

हवामानाचा कोरोना विषाणूवर काही परिणाम होतो का ?
कोरोनावर हवामानाचा परिणाम अद्यापपर्यंत तरी झालेल्या कोणत्याही संशोधनात दिसून आलेला नाही. पूर्वी अशा अनेक बातम्या आल्या होत्या की, उन्हाळ्यात कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागतो, परंतु तसे काही दिसून आलेले नाही.

पावसाबरोबर कोरोना विषाणू नष्ट होणार ?
कोरोना विषाणूवर पावसाचा कोणताही परिणाम होणार नाही आहे. येथे समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोरोना हा हवेत नाही आहे. जर तुम्हाला कोरोना टाळायचा असेल तर यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे वारंवार हात धुण्याची सवय लावणे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे.

हा विषाणू बराच काळ आपल्या घरात राहू शकतो?
कोरोना विषाणू आपल्या घरात कोणत्याही वस्तूवर किंवा फरशीवर बर्‍याच दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो. अशा वेळी, फरशी पुन्हा पुन्हा साफ करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत घराच्या खिडक्या आणि दारे उघडी ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून घराच्या आत ताजी हवा येऊ शकेल.

पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे ?
पावसाळ्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता वाढू शकते. अशा परिस्थितीत घरातही चप्पल घालण्याचा प्रयत्न करा. घरातील चप्पल आणि बाहेरची चप्पल वेगवेगळ्या ठेवा. चप्पल बाहेरच काढून पाय धुवून मगच घरात या. वेळोवेळी फरशी स्वच्छ ठेवा तसेच दारे आणि खिडक्या उघडी ठेवण्याचा प्रयत्न करा.

पावसाळ्यात कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असते ?
तज्ञ म्हणतात की पावसाचा हंगाम हा आजारपणाचा देखील हंगाम असतो. या हंगामात, बॅक्टेरियाच्या विषाणूची संख्या वेगाने वाढते. अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, व्हायरल फिव्हर सारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. या हंगामात रोग प्रतिकारशक्ती यंत्रणेला अधिक काम करावे लागते. या हंगामात रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गाची शक्यता देखील वाढते.

पावसात रेनकोट आणि मास्क ओले झाल्यास काय करावे ?
कोरोनाचा विषाणू बराच काळ कपड्यांवर तसाच राहू शकेल. अशा परिस्थितीत, रेनकोट ज्या प्रकारे कपडे धुतले जातात त्याचप्रकारे धुणे आवश्यक आहे. मास्कच्या बाबतीत बोलायचे, जर ते ओले झाले असेल तर लगेचच काढून टाकले गेले पाहिजे. पावसाच्या पाण्यामुळेच नव्हे तर कित्येक वेळा आपल्या तोंडाद्वारेही मास्क ओला होतो. अशा परिस्थितीत ते त्वरित काढून टाकले पाहिजे आणि दुसरा मास्क वापरला पाहिजे.

आर्द्रता वाढली की कोरोनाचे काय होईल ?
पाऊसाच्या या हंगामात होणाऱ्या आर्द्रतेबाबत अनेक तज्ञांची मते भिन्न आहेत. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार वाढत्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू हा आणखी धोकादायक होईल. तर काही तज्ञ म्हणतात की या आर्द्रतेमुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल. खोकला आणि शिंकताना पाण्याचे थेंब बाहेर पडतात. हवेतील आर्द्रतेमुळे हे थेंब वाढतात आणि खाली पडतात. त्यामुळे याचा शरीरावर परिणाम देखील कमी होतो.

पावसाळ्यात एसी लावणे किती सुरक्षित आहे ?
पावसाळ्यात घरामध्ये एसी चालविली जाऊ शकते, मात्र घरात जास्त मेंबर्स असतील तर ते टाळले पाहिजे. तसेच, जेथे सेंट्रल एसी आहे, तेथे तो वापरू नये. सेंट्रल एसीमधून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे.

पावसाळ्यात आपण एसी बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास केला पाहिजे का ?
पावसाळ्यात एसीमध्ये न थांबणे चांगले. जर कोणताही संक्रमित रुग्ण बस किंवा ट्रेनमध्ये उपस्थित असेल तर यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो, परंतु जर तुम्ही नॉन एसी बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तरीही संसर्ग होण्याची शक्यता असतेच पण एसीपेक्षा खूपच कमी.

पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?
पावसाळ्यात या बॅक्टरीयांचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपण जीवनसत्त्वे, ए, बी, सी, डी, लोह आणि जस्त असलेले फळ खावे. त्याबरोबर जेवणात लोणचे, लिंबू, गाजर, संत्री, डाळिंब, अक्रोड, बदाम, शेंगदाणे, लसूण आणि पालक ठेवा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कृष्णा हॉस्पिटलमधून 7 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण 7 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 177 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पाटण तालुक्यातील नवसरी येथील 60 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, नवसरवाडी येथील 22 वर्षीय युवक, 25 वर्षीय युवक, तामिनी येथील 25 वर्षीय पुरुष, कालेवाडी येथील 21 वर्षीय युवक आणि शिरवळ पोलीस स्टेशन येथील 30 वर्षीय पुरुष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, राजू देशमुख, डॉ. सुजाता कानेटकर, डॉ. व्ही. सी. पाटील यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

शिरवळ येथील पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त

शिरवळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 30 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याला नाकाबंदीच्या निमित्ताने ड्युटीवर असताना कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू असते. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे आणि पोलिस दलातील अधिकारी व माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या धीरामुळे मी या कोरोनाच्या संकटावर यशस्वीपणे मात करू शकलो, असे उद्गार या पोलिस कर्मचाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धनंजय मुंडे हे फायटर; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल – राजेश टोपे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरना अहवाल पोझिटिव्ह आला आहे. याबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही पुष्टी दिली आहे. मुंडे हे कोरोना पोझिटिव्ह आलेले आहेत. त्यांचे दोन रिपोर्ट केलेले. त्यातील एक रिपोर्ट पोझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह आला. ब्रिच कँडीमध्ये एडमिट करणार आहोत. ते तसे फायटर आहेत. त्यामुळे ते लवकरच कोरोनावर मात करतील असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.

धनंजय मुंडे हे बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीला होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापण कार्यक्रमालाही होते. मात्र सर्व बैठकी सोशल डिस्टंसिंग ठेऊनच झालेल्या आहेत. अजित दादांच्या कडक शिस्तिमुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही सोशल डिस्टंसिंग ठेवले जाते. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. जर कोणाला तशी लक्षणे जाणवली तर त्याची चाचणी घेण्यात येईल अशी माहितीही टोपे यांनी दिली.

आमचा वर्धापण दिनाचा कार्यक्रमही पाच मिनिटांचाच झाला. तसेच झेडावंदनाच्या कार्यक्रमालाही सोशल डिस्टंसिंग ठेवण्यात आलेले होते. असे टोपे यांनी सांगितले. तसेच धनंजय मुंडे यांचा कुक, पीए, ड्रायव्हर यांना प्रथम कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्यामुळे मुंडे यांना कोरोना झाला असावा अशी शक्यता राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यातील कंटेन्मेंट झोनबाबत राजेश टोपेंनी केंद्राला केली ‘ही’ मागणी

मुंबई । महाराष्ट्रातील ४ हजार कंटेन्मेंट झोनमध्ये अंदाजे १ कोटी लोक अडकून आहेत. शिवाय यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांवर मोठा भार पडत आहे. प्रशासन आणि पोलिसांवरील भार कमी करण्यासाठी कंटेन्मेंट झोनचा कालावधी १४ दिवसांवर आणावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. राज्यचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही मागणी केली. राज्यामध्ये कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी काल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल तसेच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कंटेन्मेंट झोनबाबत केंद्राकडे ही मागणी केली.

कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर त्या भागातील व्यवहार २८ दिवस बंद ठेवले जातात. बंद काटेकोरपणे पाळला जाण्यासाठी पोलिस तैनात. मात्र, पोलिसांना आराम मिळावा, त्याचा वापर अन्यत्र होण्यासाठी कंटेन्मेंट झोनचा कालावधी २८ दिवसांवरून १४ दिवस करण्यात यावा अशी मागणी राजेश टोपेंनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना केली. याचबरोबर मुंबईमध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचारी, खासगी रुग्णालयातील कर्मचारी तसेच शासकीय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा (लोकल सेवा) सुरू करण्याची मागणीही राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे यावेळी केली.

सरकारच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील ४ हजार कंटेन्मेंट झोनमध्ये एक कोटी लोकसंख्या अडकून आहे. एकट्या मुंबईतच ७९८ कंटेन्मेंट झोन आहेत, ज्यात ४२ लाख लोक अडकून आहेत. केंद्राच्या नियमावलीनुसार एखादा भाग कंटेन्मेंट झोन जाहीर केल्यास २८ दिवस कडक निर्बंध पाळावे लागतात.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोणताही फ्लॅट, घर किंवा इमारत कंटेन्मेंट झोन जाहीर केला जातो, तेव्हा तो भाग करोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर आधारित १४ दिवसांसाठी प्रतिबंधित भाग असतो. पण एखादी चाळ किंवा झोपडपट्टी असा उच्च लोकसंख्या घनतेचा मोठा भाग प्रतिबंधित केला जातो, तेव्हा त्याला कंटेन्मेंट झोन म्हणतात. या भागात जीवनावश्यक वस्तू वगळता कुणालाही जाण्याची किंवा येण्याची परवानगी नसते आणि २८ दिवसांसाठी हे क्षेत्र प्रतिबंधित असतं.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत होती. मात्र आज ही वाढ रोखली गेली आहे. सोने आणि चांदी दोन्हींच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. सकाळी १० च्या आसपास मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX)मध्ये सोन्याचा दर ४७ हजार ०८२ रुपय प्रती १० ग्रॅम वर आला. गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याचा भाव ८०० रुपयांनी तेजीत होता.

रुपयाची किंमत घसरला असल्याने त्याचा परिणाम दरावर झाला असल्याचे माहितगारांनी सांगितले. सराफा बाजारात देखील आज सोन्याच्या किंमतीत १० रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. मुंबई २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ११० रुपये झाला आहे. गुरुवारी तो ४६ हजार १०० रुपये होता. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ४७ हजार ११० रुपये झाला आहे. त्यात आज १० रुपयांची वाढ झाली. चांदीसुद्धा १० रुपयांनी महागली आहे. चांदीचा भाव किलोला ४८ हजार ५१० रुपये झाला आहे. गुरुवारी चांदीचा भाव ४८, हजार ५०० रुपये होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत काहीच बदल झालेला नाही. अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने तसेच रुपया घसरल्याने विदेशी बाजारपेठेत सोन्याचा दर १ हजार ७२७.२४ डॉलर इतका होता. तर चांदीचे दर ०.४ टक्क्यांनी घसरले आहेत ते १७.६४ डॉलर झाले आहेत.  मार्च महिन्यापासून विदेशी बाजारपेठेत सोन्याच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अस्वलाच्या पिलांना कुऱ्हाडीने मारले; चिडलेल्या अस्वलीने दोघांना केले जंगलातच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत असते. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ती आपल्या मुलांचा जीव वाचावीत असते. सर्व प्राणिमात्रांमध्ये हेच प्रेम असते. अनेकदा सिनेमांमध्ये प्राणी आपल्या आप्तजनांच्या मृत्यूचा बदला घेताना दाखविले जातात. असेच काहीसे भासावे अशी एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. आपल्या पिलांच्या मृत्यूने क्रोधीत झालेल्या अस्वलाच्या मादीने शिवारात हल्ला करून दोघांचा जीव घेतल्याची घटना घडली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाडी शिवारात ही घटना घडली आहे. जंगलात गेलेल्या दोन माणसांवर या मादीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या घटनास्थळापासून काही अंतरावर अस्वलाच्या दोन पिलांवर कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याचे आढळून आले आहे. यावरून या पिलांच्या आईने बदला घेण्यासाठी हा हल्ला केला असेल असा अंदाज लावला जात आहे. अशोक मोतीराम गवते वय वर्षे ५२ आणि माना बंडू गवते वय वर्षे ४२ असे या दोन मृत व्यक्तींचे नाव आहे.

या हल्ल्यात दोन्ही इसमांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीचा चेहरा पूर्णतः बिघडला असल्याचे समोर आले आहे.  जवळच अस्वलाच्या ८ महिन्याच्या २० पिलांचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी आकोट व्याघ्र प्रकल्पामध्ये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अस्वलांच्या पिलांची हत्या करून त्यांच्या नखांची तस्करी केली जाते कदाचित यामुळेच या पिलांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जुलै-ऑगस्टमध्येही क्रिकेट बंदच! टीम इंडियाचे ‘हे’ आगामी २ दौरे रद्द

मुंबई । कोरोना संसर्गाचा धोका पाहता टीम इंडिया श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार नसल्याचे आज (शुक्रवारी) BCCIने जाहीर केले. भारतीय क्रिकेट टीम २४ जून जूनपासून श्रीलंका दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी २० मालिका खेळणार होता. तर त्यानंतर २२ ऑगस्टपासून नियोजित असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता. हे दोन्ही दौरे लांबणीवर टाकण्यात येतील अशी शक्यता आधी व्यक्त करण्यात येत होती. पण आता BCCI ने हे दोनही दौरे थेट रद्द केले आहेत. BCCI च्या निर्णयामुळे जुलै-ऑगस्टमध्येही क्रिकेट बंद राहणार असल्यानं क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान, BCCI ने १७ मे रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, मैदानातील परिस्थिती क्रिकेटसाठी अनुकूल आणि सुरक्षित झाल्यानंतरच वार्षिक कराराअंतर्गत बांधिल असलेल्या खेळाडूंसाठी BCCI क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करेल. BCCI आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेट पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यासाठी कटिबद्ध आहे, परंतु केंद्र व राज्य सरकार तसेच इतर संबंधित संस्थांनी करोन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना धोकादायक ठरणार्‍या कोणताही निर्णय BCCI घेणार नाही, असे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

भारत-नेपाळ सीमेवर तणाव; नेपाळकडून अंदाधुंद गोळीबार, १ ठार

नवी दिल्ली । सीमावादावरून भारत आणि नेपाळ दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीतच बिहारमधील भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. भारत नेपाळ सीमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून हा गोळीबार करण्यात आला.
ही घटना नारायणपूर आणि लालबन्दी सीमा भागात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सीतामढीमधील पिपरा परसाईन पंचायतीच्या जानकी नगर सीमेवर काही जण शेतात काम करत होते. त्याचवेळी नेपाळच्या दिशेहून अंधाधुंद गोळीबार सुरू करण्यात आला. यादरम्यान एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. दरम्यान, दोघांना उपचारासाठी सीतामढीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच घटनास्थळी स्थानिक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारीही रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

भारत-नेपाळ सीमेवर तणावाचं कारण काय?
गेल्या काही दिवसांपूर्वी नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. नेपाळने नवीन नकाशा जारी केला असून त्यात लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भारतीय प्रदेश नेपाळमध्ये दाखवले आहेत. नकाशामधील या बदलांना नेपाळच्या संसदेची मान्यता आवश्यकता आहे. त्यासाठी नेपाळच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. “नेपाळच्या नकाशामध्ये बदल करण्याला सर्वपक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा बदल कायम राहणार आहे” असं नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनी म्हटलं होतं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला होता. दरम्यान, लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग भारताचा भाग असल्याचे भारतानं स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

३ महिने EMI भरू नका सांगता पण त्यावर व्याज कसे काय घेताय?; सुप्रीम कोर्टाचा केंद्र, RBI ला सवाल

नवी दिल्ली । कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने या काळात अनेकांचे उत्पन्न बंद झाले आहे. अनेक उद्योगधंदे बंद आहे. तर अनेकांच्या हाताला काम नाही. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)  कर्जाचे हफ्ते (EMI) ३१ ऑगस्टपर्यंत न भरण्याची मुभा दिली आहे. मात्र बँकांनी कर्जाचे हफ्ते पुढे ढकलण्याची मुभा दिली असली तरी त्यावरील व्याज मात्र वसूल केले जाणार आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.याचिकेत बँकांनी हफ्ते माफ करण्यात आलेल्या काळात व्याजदेखील माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने तीन महिने कर्जाचा हप्ता भरु नका सांगता आणि व्याज घेता, हे कसे काय, असा सवाल उपस्थित केला. न्यायमूर्ती जे अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.

न्यायमूर्तींनी सुनावणीवेळी वित्त मंत्रालय आणि आरबीआयला विचारणा केली की, जर तुम्ही ३ महिन्यांसाठी कर्ज माफ केले आहे तर मग तुम्ही त्यावर व्याज कसे काय घेऊ शकता, असा सवाल उपस्थित केला. ही आमची काळजी आहे. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी आपल्याला यासंबंधी आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करावी लागेल असे सांगितले. SBIच्यावतीने न्यायालयात बाजू मांडणारे वरिष्ठ वकील रोहतगी यांनीही आरबीआयशी चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने १७ जूनपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.

 

दरम्यान, आरबीआयने व्याज माफ केले तर बँकांना खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, सांगितले आहे. बँकांवर दोन लाख कोटींचा बोजा वाढेल, असे म्हटले आहे. तसे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला सादर केले आहे. दरम्यान, २५ मार्च रोजी आरबीयने कर्जाचे हफ्ते न भरण्यासाठी तीन महिन्यांची मुभा देल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २२ जून रोजी आणखी तीन महिन्यांसाठी ही सवलत जाहीर करत ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in