जिथे हिंदू नाहीत तिथे धर्मनिरपेक्षता नाही – कंगना रनौत 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई ।  काश्मीर मध्ये सोमवारी हिंदू सरपंच अजय पंडित यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यावर देशभरातून अनेक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेता अनुपम खेर आणि क्रिकेटर सुरेश रैना नंतर आता अभिनेत्री कंगना रनौत ही या विषयावर बोलली आहे. नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिद्ध असणारी कंगनाने या  व्हिडीओत देखील आपले परखड मत मांडले आहे.  या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करीत असताना अजय पंडित यांचे बलिदान व्यर्थ जाता काम नये असे ती म्हणाली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम वरून शेअर केलेल्या व्हिडिओत जिथे हिंदू नाहीत तिथे धरणमनिरपेक्षता नाही असे विधान केले आहे.

स्वतःला बुद्धिजीवी  तसेच देशातील कलाकार लोक अनेकदा हातात बोर्ड घेऊन, मेणबत्त्या, दगड घेऊन निषेध करताना दिसतात. ते  रस्त्यावर येतात तो मुद्दा आंतरराष्ट्रीय करतात.  मुद्द्याच्या मागे जिहादी कारण असेल तरच ते हे करतात. एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तेव्हा हे जिहादी अजेंड्यावाले लोक धर्मनिरपेक्षतेच्या चामडीखाली लपून बसतात. असे ती म्हणाली. तसेच मुळात काश्मीर मध्ये इस्लाम कसा आला. याबद्दल तिने माहिती दिली. आणि जो धर्म अणूरेणूवर देखील प्रेम करायला शिकवतो त्याला तुम्ही धर्मनिरपेक्षता म्हणता का? असा प्रश्नही विचारला. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या व्हिडिओत निवेदन केले आहे. की त्यांनी हिंदूंना पुन्हा काश्मीर मध्ये वसवावे.

https://www.instagram.com/p/CBQFFbEg7_c/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिने पंडितांना त्यांच्या काश्मीर मध्ये पार्ट नेले जावे, त्यांच्या जमिनी त्यांना परत दिल्या जाव्यात आणि त्यांना तिथे पुन्हा वसविले जावे अशी विनंती केली आहे. या व्हिडिओत ती म्हणाली इतिहास साक्ष आहे, जिथे हिंदू नाहीत तिथे धर्मनिरपेक्षता नाही. १९८९ मध्ये मोठ्या प्रमाणातील दहशतवादी घटनांमुळे हिंदूंनी काश्मीरमधून पलायन केले होते. त्यांनी जम्मू जवळच्या आश्रय शिबिरांमध्ये निवारा घेतला होता. आता मोठ्या प्रमाणात हे  पंडित इथेच आहेत. अगदी मोजकेच पंडित काश्मीर मध्ये शिल्लक आहेत. त्यांचीही हत्या केली जात आहे. याबाबत आता निषेध व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment