Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5690

राहुल गांधींचा शायराना अंदाज, हा ‘शेर’ म्हणत अमित शहांना हाणला टोला

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करताना एक विधान केले होते. त्यावरुन राहुल गांधींनी अमित शाह यांना लक्ष्य केले आहे.

‘भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे’ असे विधान अमित शाह यांनी बिहारमधील डिजीटल सभेला संबोधित करताना केले होते. अमित शाह यांचे हे विधान टि्वटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे.

”सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,
दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।”

हा शेर ट्विटवर शेअर करत राहुल यांनी अमित शहांना चिमटा काढला. दरम्यान, लडाख भागातील चीन बरोबर सुरु असलेल्या सीमा वादाच्या दोन्ही बाजुंनी चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढण्याचे ठरवले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मोदी सरकार देतेय स्वस्तात सोने; समजून घ्या कसा कमवायचा नफा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सॉव्हरेन सोन्याच्या बाँडच्या पुढील सीरीजविषयीची माहिती दिली आहे. आरबीआयने यासाठी प्रति ग्रॅम ४,६७७ रुपये निश्चित केले आहेत. सॉव्हरेन गोल्ड बाँड २०२०-२१ ची तिसरी सीरीज आजपासून सुरु होत आहे. १२ जूनपर्यंत गुंतवणूकदारांना या योजनेत सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय बँकेने एप्रिलमध्येच जाहीर केले होते की, या योजनेंतर्गत सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना ६ वेळा गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. आरबीआय हे केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करेल. अशा परिस्थितीत तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही मोठा नफा कमवू शकता. सरकारची ही योजना काय आहे? जाणून घेउयात.

ही योजना नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती. याचा उद्देश सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे तसेच सोन्याच्या खरेदीसाठी वापरण्यात येणारी घरगुती बचत ही आर्थिक बचतीत हस्तांतरित करणे ही आहे. घरात सोनं खरेदी करण्याऐवजी जर तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही करदेखील वाचवू शकाल.

यांना सवलत मिळेल
आरबीआयने म्हटले आहे की, ऑनलाइन अर्ज करणारे आणि पैसे देणार्‍या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळेल. अशा गुंतवणूकदारांना एक ग्रॅम सोन्याची खरेदी करण्यासाठी ४,६२७ रुपये मोजावे लागतील. चला तर मग या योजनेची खास वैशिष्ट्ये आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेऊयात.

सोने खरेदी करण्याची मर्यादा किती आहे
एका आर्थिक वर्षात एक व्यक्ती किमान १ ग्रॅम आणि जास्तीत जास्त ४ किलो किंमतीचे बॉन्ड खरेदी करू शकते. मात्र एखाद्या, ट्रस्टसाठीची खरेदीची कमाल मर्यादा ही २० किलो इतकी आहे.

२.५ टक्के रिटर्नची हमी
सरकारच्या या योजनेमध्ये सोन्यातील तेजीचा फायदा मिळू शकतो. यात वर्षाकाठी २.५ टक्के व्याजही मिळते. हा व्याज दर ६ महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाईल. यामध्ये एकूण भांडवलाच्या मॅच्युरिटीवर अंतिम व्याज दिले जाते. मॅच्युरिटीचा कालावधी हा ८ वर्षे आहे, मात्र ५ वर्ष, ६ वर्षे आणि ७ वर्षांचा पर्याय देखील उपलब्ध आहे. सोन्याचा बाजारभाव खाली आला तर यात भांडवलाचे नुकसान होण्याची शक्यताही असते.

कुठे खरेदी करावी?
आपण हे सोन्याचे बाँड ऑनलाइन खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त ही बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), एनएसई आणि बीएसई सारख्या निवडक पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंजद्वारे देखील याची विक्री केली जाईल.

पुढील बाँड कधी जारी होईल?
चौथी सीरीज: ६ जुलै ते १० जुलै सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. त्याचा हप्ता १४ जुलै रोजी जाहीर केला जाईल.
पाचवी सीरीज: ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. त्याचा हप्ता ११ ऑगस्ट रोजीजाहीर केला जाईल.
सहावी सीरीज: ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. त्याचा हप्ता ८ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जगभरात कोरोनाचा कहर सुरुच; जवळपास ४ लाख लोकांचा मृत्यू

मुंबई । चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेला कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. वुहान शहरापासून जगभरात प्रसार झालेल्या कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात मृतांची संख्या जवळपास ४ लाखांपर्यंत पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जगभरातील 3,99,642 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका अव्वल आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत आतापर्यंत 1.07 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर, कोरोनामुळे 40,000 पेक्षा जास्त मृत्यू झालेला ब्रिटन दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत इटलीमध्ये 33000, ब्राझीलमध्ये 32000, फ्रान्समध्ये 29000, स्पेनमधील 27000, मेक्सिकोमधील 11000 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याव्यतिरिक्त, बेल्जियममध्ये 9500, जर्मनीमध्ये 8600, इराणमध्ये 8000 आणि कॅनडामध्ये 7500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे आतापर्यंत जगातील 68,89,889 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या जवळपास 19 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्याचबरोबर ब्राझीलमध्ये 5.84 लाखांहून अधिक, रशियामध्ये 3.3 लाख, ब्रिटनमध्ये 2.8 लाख, स्पेनमधील 2.4 लाख आणि इटलीमध्ये 2.33 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पेरूमध्ये 1.79 लाख, तुर्कीमध्ये 1.67 लाख आणि इराणमध्ये 1.60 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

भारतात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे 6642 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची 2,36,657 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने देशात लॉकडाउन लागू केले. दोन महिन्यांहून अधिक काळानंतर लॉकडाऊन शिथिल केले जात आहे. पण कोरोनावर ब्रेक झाल्यासारखे दिसत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत बोर्डानं दिलं स्पष्टीकरण; म्हणाले..

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारणपणे हे निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीला लागतात मात्र, यंदा लॉकडाऊनलमुळे दहावी-बारावीचे निकाल रखडले आहेत.गेल्या आठवडाभरापासून दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियावर अनेक निकालासंदर्भात बातम्या प्रकाशित होत आहेत. त्यासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. अद्याप निकालाची तारीख ठरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी निकालाच्या कोणत्याही तारखांवर विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.

दरम्यान, यावर्षी सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची तर सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. गेल्यावर्षी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल ८ जून तर बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदा निकाल जाहीर होण्यास थोडा उशीर होणार आहे. दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत प्रसारमाध्यमांत अनेक कयास लावले जात आहेत. यावर राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी निकालाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

श्रमिक रेल्वेत जन्मले ३७ बालक, कोणाचं नाव ठेवलं ‘करुणा’ तर कोणाचं ‘लॉकडाऊन’

मुंबई । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं. मात्र, इतर राज्यांमध्ये कामासाठी गेलेले लाखों मजूर आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे त्यांना गावी परतण्याशिवाय पर्याय उरला नाही. अशा वर्गासाठी भारतीय रेल्वेने स्पेशल रेल्वे सुरु केल्या. ज्यामध्ये प्रवास करताना ३६ बालकांचा जन्म झाल्याची माहिती पुढे आली आहे. या दरम्यान जन्मलेल्या मुलांची नावे देखील खूप मनोरंजक ठेवली जात आहेत. कोणी आपल्या मुलीचे नाव करुणा ठेवले आहे तर कोणी लॉकडाऊन यादव.

छत्तीसगडच्या धरमपुरा येथे राहणाऱ्या करुणाचे वडील राजेंद्र यादव यांनी वृत्तसंस्था पीटीआयला माहिती दिली की, त्यांनी आपल्या मुलीचे नाव करुणा ठेवले आहे. करुणा म्हणजे दया. ते म्हणाले की, ‘अनेकांनी मला कोरोना हे नावं सूचवले. पण ज्या व्हायरसमुळे लोकांचा जीव जात आहे ते नाव मी कसे देऊ?’. करुणाचा जन्म देश जेव्हा कोरोनाशी लढत आहे. त्या दरम्यान झाला.

श्रमिक स्पेशल ट्रेनने मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या रिना यांनी देखील आपल्या मुलाचे नाव लॉकडाउन यादव ठेवले आहे. जेणेकरून ज्या वेळी त्याने जन्म घेतला त्या कठीण काळाची आठवण कायम राहील. ते म्हणाले की, ‘त्याचा जन्म एका अत्यंत कठीण परिस्थितीत झाला. म्हणून आम्हाला त्याचे नाव लॉकडाऊन यादव ठेवायचे होते.

ममता यादव ही आणखी एक महिला आहे जी ८ मे रोजी जामनगर-मुजफ्फरपूर श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये चढली. बिहारच्या छपरा जिल्ह्यात जेव्हा तिने मुलाला जन्म दिला तेव्हा तिची आई तिच्याबरोबर असावी अशी तिची इच्छा होती. पण आपल्या स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी तिने आपल्या मुलाला हातात घेतलं. ममताच्या डिलिव्हरी वेळी इतर प्रवासी डब्यातून बाहेर निघून गेले आणि डब्याचं रुपांतर एका डिलिव्हरी रूममध्ये झालं. डॉक्टर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी अशा अनेक मातांना मदत केली. या विशेष गाड्यांमध्ये बऱ्याच गर्भवती महिलांनी प्रवासादरम्यान इतर प्रवाशांच्या मदतीने बाळांना जन्म दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इम्रान खानला सिंथिया रिचीसोबत सेक्स करायची इच्छा होती; टीव्ही हाॅस्टचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांच्या खाजगी आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विवाह आणि घटस्फोटाविषयीच्या बर्‍याच कथा प्रसिद्ध आहेत. आता एका पाकिस्तानी टीव्ही होस्टने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. होस्ट अली सलीम यांनी असा दावा केला आहे की, इम्रान खानला अमेरिकन महिला सिंथिया डी रिचीसोबत सेक्स करण्याची इच्छा होती. सिंथिया ही ब्लॉगर आहे आणि तिने दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या अनेक माजी मंत्र्यांवर लैंगिक छळ आणि बलात्काराचा आरोप केला आहे.

इम्रान खानवर गंभीर आरोप
या टीव्ही होस्ट अली सलीमच्या म्हणण्यानुसार तो सिंथियाच्या अगदी जवळचा होता आणि त्याने तिच्याबरोबर एकरूम शेअर केली होती. दरम्यान, सिंथियाने एकदा त्यांना सांगितले की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सिन्थियाबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे. मात्र, अलीने सिंथियाचे हे आरोप फेटाळून लावले, ज्यात तिने असे म्हटले आहे की पाकिस्तानचे मंत्री रहमान मलिक यांनी तिच्यावर बलात्कार केला.

‘पाकिस्तानी मंत्री बलात्कार करत असत’
सिंथियाने शुक्रवारी फेसबुक लाइव्ह केले होते. ज्यामध्ये तिने माजी गृहमंत्री असलेले रेहमान मलिक यांनी २०११ मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यवरही लैंगिक छळा केल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी बेनझीर भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) सत्तेत होती. तिने या घटनेची माहिती पाकिस्तानमधील अमेरिकी दूतावासाला दिली होती, असे सिंथियाने म्हटले आहे. परंतु याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. माजी पंतप्रधान गिलानी यांनी सिन्थियाचा हा आरोप फेटाळून लावला आहे.

सिंथिया कोण आहे?
सिंथियाला पाकिस्तान फारच आवडले होते. ती सुमारे १० वर्षे पाकिस्तानात राहिली. ती स्वत: एक साहसी, चित्रपट निर्माती असल्याचा दावा करते. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्यांशी तिचे चांगले आणि घनिष्ट संबंध होते. पण नंतर या नात्यात कटुता आली. पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंटवरून पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्यांबद्दलचे वादग्रस्त फोटोही ती शेअर करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘तुंबाड’फेम अभिनेता सोहम शहाच्या घरात चोरी, हातावरील टॅटूने पकडला गेला चोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक सोहम शाह याच्या घरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मात्र, चोरट्यांनाही लगेचच पकडण्यात आले आहे. चोरट्यांना पकडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. चोरांना पकडल्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्वीट करून त्याविषयीची माहिती दिली. प्रत्यक्षात चोरीच्या घटनेनंतर सोहम शहा यांनीजवळच्याच जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. सोहम शहा यांच्याकडून मिळलेय माहितीचा आधार घेऊन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास केला. सीसीटीव्हीमध्ये पाहिले गेलेले हे दोन चोर शहा यांच्या इमारतीत शिरताना आणि बाहेर पडताना दिसत होते.

दोन्ही चोरट्यांनी त्यांच्या चेहर्‍यांवर मास्क घातले होते, मात्र त्यातील एका चोरट्याच्या डाव्या हातावर “मलिका” नावाचा टॅटू काढलेला होता. या टॅटूच्या आधारे पोलिसांनी विलेपार्ले येथील इंदिरा नगर येथून आरोपी प्रेम लंगनाथान देवेंद्र (वय २६) याला अटक केली. २६ मे रोजी शहा यांच्या घरातून २ सेल फोन आणि ३०००ची रोख रक्कम चोरून आरोपी फरार झाला होता. या आरोपींकडून पोलिसांनी पैसे आणि मोबाइल जप्त केले आहेत.

 

सोहम शाह हे आपल्या ‘सिमरन’, ‘तुंबाड,’ ‘शिप ऑफ थेसीस’ या चित्रपटांसाठी ओळखले जातात. तो सहसा आनंद गांधींसह चित्रपट करतो. त्याचा ‘तलवार’ हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला. त्यात त्याने ‘इरफान खान’ सोबत काम केले होते. मात्र यातील दुसरा आरोपी असलेला सुरेश प्रभू याचा पोलिस शोध घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

कोविड चाचण्यांत भाजपशासित राज्यांची कामगिरी वाईट;दिल्लीमध्ये होतायत सर्वाधिक चाचण्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी कोविडच्या तपासण्यांमध्ये दिल्ली हे राज्य खराब कामगिरी करत असल्याची टीका केली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात सर्वाधिक चाचण्या करण्यामध्ये दिल्ली हे राज्य आघाडीवर असल्याचं चित्र समोर आलं आहे. दर दहा लाख लोकसंख्येमागे दिल्लीत सर्वाधिक ११ हजार १२४ तपासण्या होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. महाराष्ट्रमध्ये दर दहा लाखांमागे ४०४६ तर कर्नाटकमध्ये दर दहा लाख लोकांमागे ५०५० तपासण्या होत असल्याचं समोर आलं आहे.

भाजप आणि मित्रपक्षांची सरकारं असलेल्या ठिकाणी कोरोना तापसण्यांची संख्या ही नगण्य असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये बिहार, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. बिहारमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे होणाऱ्या तपासण्याचं प्रमाण केवळ ६१८ आहे, तर मध्यप्रदेशमध्ये २२०४ आणि गुजरातमध्ये ३३१२ इतकं आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये ५ लाखांहून अधिक तपासण्या झाल्या असून याठिकाणी कोरोना नियंत्रणासाठी अत्याधुनिक उपचारांच्या पद्धतीचा वापरही सुरु झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ऑस्ट्रेलियामध्ये 100 फूट लांब शार्कच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील न्यू साउथ वेल्सच्या किनाऱ्यावर रविवारी एका १०० फूट लांबीच्या शार्कने एका ६० वर्षीय सर्फरवर हल्ला केला ज्यामध्ये सर्फरचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, तेथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी या सर्फरला मदत करण्यासाठी आणि शार्कशी लढण्याचा प्रयत्न केला. या जखमी व्यक्तीला साऊथ किंग्जक्लिफमधील सॉल्ट बीच किनाऱ्यावर आणण्यात आले. मात्र, काही तासांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

समुद्रकिनारे २४ तासांसाठी बंद
या घटनेनंतर लोकांना शार्कच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी जवळच्या समुद्रकिनार्‍यावरुन जलतरणपटू आणि सर्फर यांना काढले गेले. तसेच आजूबाजूचे सर्व समुद्रकिनारे हे २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत.

शार्कने यापूर्वीही एका २३ वर्षीय व्यक्तीची शिकार केली होती
गेल्या जानेवारीत पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीच्या एस्प्रेन्सजवळ एका डायवरचा याचप्रकारे मृत्यू झाला होता. एप्रिलमध्येही एका शार्कने ग्रेट बॅरियर रीफवर एका २३ वर्षीय वन्यजीव कर्मचाऱ्याची शिकार केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अरविंद बनसोडची आत्महत्या नाही तर खूनच; राष्ट्रवादीच्या संशयित कार्यकर्त्यांवर गृहमंत्री कारवाई करणार?

विशेष प्रतिनिधी | नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमरकर यास वाचविण्यासाठी हत्येच्या प्रकरणाला राजकीय दबावापोटी आत्महत्येचे प्रकरण म्हणून मिटविण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यासंदर्भातील आपली अधिकृत भूमिका त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आणि मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहाराद्वारे मांडली आहे.

नक्की प्रकरण काय? – २७ मे रोजी थडीपवनी येथे अरविंद बनसोड आणि त्याचे दोन सहकारी बँकेत पैसे काढायला गेले होते. एचपी गॅस एजन्सीचा नंबर हवा म्हणून बनसोड यांचा सहकारी एजन्सीच्या बोर्डाचा फोटो काढत होता. फोटो काढतांना ‘फोटो का काढतो?’ म्हणून एजन्सीतील गुंडांनी त्यांचा मोबाईल हिसकावला. मोबाईल घेण्यासाठी अरविंद आत गेला, तर तिथे एजन्सीचा मालक मिथलेश उमरकर बसलेला होता. त्याने अरविंदला जातिवाचक शिवीगाळ केली. शिवाय जीवे मारण्याची धमकी देत गुंडांसोबत मिळुन मारहाण केली. अरविंद मोबाईल मागत राहिला आणि उमरकर आणि त्याचे गुंड त्याला मारत राहिले. अरविंद बाहेर आला आणि सहकाऱ्यांना येथून जा म्हणाला, त्याचे सहकारी थोडे बाजूला गेले. अरविंद पुन्हा गेला, मोबाईल द्या म्हणाला, त्यांनी यावेळी दोन्हीही मोबाईल घेतले आणि परत अरविंदला मारहाण केली. अरविंद परतला नाही म्हणून थोड्यावेळाने सहकारी तेथे गेले, तर अरविंद जवळच्या गॅस एजन्सीच्या पायरीवर निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या शेजारी कीटकनाशकाची बाटली पडलेलीही दिसून आली. घटनास्थळी लोक जमा झाले म्हणून आरोपी मिथलेश उमरकर अरविंदला गाडीत टाकून दवाखान्यात घेऊन गेला आणि औषधसुद्धा सोबत नेलं, पुन्हा गाडीत त्याच्यासोबत काय झालं ते कोणालाच माहीत नाही.

प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? – अरविंद बनसोडने विष पिऊन आपले जीवन संपवेल यावर अरविंदचे सहकारी मित्र व भाऊ यांचा विश्वास नाही. पूर्ण प्रकरण संशयास्पद असतांना तसेच अरविंदची हत्या करण्यात आली असल्याची दाट शक्यता दिसत असतांना पोलसांनी आत्महत्या म्हणून नोंद केली आहे. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या अरविंदची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती व संपूर्ण परिवाराचा तो सांभाळकर्ता होता. अरविंद स्पर्धापरिक्षेची तयारी करत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून गोरगरीब जनतेचे कामही तो करायचा. एक दलित कार्यकर्ता व्यवस्थेला प्रश्न का विचारतो ? या रागातून त्याची सुनियोजित कट करून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप अरविंदच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आला आहे.

राजकीय हस्तक्षेप कसा? – आरोपीचे वडील बंडोपंत उमरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत, तर आरोपी राष्ट्रवादीचा युवा नेता पंचायत समिती सदस्य आहे. आरोपी मिथिलेश उमरकर हा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निकटवर्तीय असल्याचे समजते. त्यामुळे आरोपीस वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव टाकुन प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत असे बोलले जात आहे. या प्रकरणात किरकोळ ३०६, ३४ कलमाअंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातच दलित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल, तर ही बाब फार चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष देऊन पुढे नमूद केलेल्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात येत आहे.

प्रमुख मागण्या –

१) जातिवाचक शिवीगाळ व सार्वजनिक ठिकाणी अवहेलना करण्याबाबत “अट्रॉसिटी (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९)” अंतर्गत गुन्हा दाखल करने.

२) ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करणे.

३) कोणत्याही कल्पनेशिवाय कुटुंबीयांना न सांगता, घटनास्थळी हजर असलेले मित्र ‘गजानन राऊत’ ह्याला गाडीत येण्यास मज्जाव करून एकट्या ‘अरविंद बनसोड’ला हॉस्पिटल घेऊन गेले. याबाबतही पोलिसांनी सखोल चौकशी करावी व एकट्या असलेल्या अरविंदशी गाडीत नेमका काय प्रकार घडला याचासुद्धा संपूर्ण तापस करून सत्य उघडकीस आणावे.

४) आरोपी मिथिलेश उमरकरसोबत मारहाण व सहकार्य करणारे मित्र यांचा सुद्धा शोध घेऊन सहआरोपी म्हणून करवाई करावी.

५) मृत अरविंद यांच्या सोबतीला असलेले मित्र ‘गजानन राऊत’ प्रत्यक्षदर्शी असल्याने त्यांना बयान नोंदविणे कायदेशीर बंधनकारक आहे.

६) पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत व एक सदस्याला सरकारी नोकरी दिली पाहिजे, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे.

७) आरोपी ‘मिथिलेश ऊर्फ मयूर बंडोपंत उमरकर’ याचे पंचायत समिती सदस्यपद रद्द करावे.

८) स्थानिक जलालखेडा पोलिस स्टेशनची भूमिका संशयास्पद असून राजकीय पार्श्वभूमीचा प्रभाव असल्याने सुरुवातीला तक्रार नोंदविण्यास नकार व आठवडा होऊन सुद्धा संबंधित आरोपींची साधी विचारपूस/अटक न केल्याने संबंधीत ठाणेदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.

या केसच्या संदर्भात, ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अधिकारी आणि नागपूर पोलीस अधीक्षक(SP) यांच्याशी बोलून चौकशी केली. नागपूर पोलीस अधीक्षक(SP) यांना विनंती केली की, तपास अधिकारी योग्य नाही, व सदर केसचा तपास दुसऱ्या चौकशी अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, या मागणीला पोलीस अधीक्षक (SP) यांनी होकार दिला आहे. पीडित कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहोत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने यात लक्ष घालून पीडितांना न्याय द्यावा असं मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांची यासंदर्भातील फेसबुक पोस्ट –