Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5691

म्हणूनच गावस्करांनी आपल्या मुलाला वेस्ट इंडिजच्या ‘या’ महान खेळाडूचे नाव दिले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकेकाळी मैदानावर वेस्ट इंडिज संघाकडून क्रिकेट खेळलेला भारतीय वंशाच्या रोहन कन्हाईने कॅरेबियन संघाकडून ७९ कसोटी, ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६ हजार २२७ धावा केल्या. त्याने एकूण १५ शतके तसेच २८ अर्धशतके केली. गावस्कर हे रोहन कन्हाईचे इतके चाहते होते की त्यांनी आपल्या मुलाचे नावही त्यांच्या नावावर ठेवले.

आता ४४ वर्षानंतर सुनील गावस्कर यांनी आपल्या मुलाला या कॅरिबियन दिग्गजाचे नाव देण्यामागील कारण सांगितले आहे. रोहन कन्हईने गावस्कर याना कॅरेबियन भूमीवर उत्तम कामगिरी करण्यास प्रेरित केले. रोहन गावस्कर याचा जन्म २० फेब्रुवारी १९७६ रोजी कानपूर येथे झाला होता. त्याने भारताकडून ११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ११ एकदिवसीय सामन्यात रोहनने १५१ धावा केल्या आणि १ विकेट घेतला.

एका कार्यक्रमात बोलताना सुनील गावस्कर यांनी आपल्या कारकीर्दीत एका फलंदाजाद्वारे आपण प्रेरित असल्याचे उघड केले. तो त्या दिग्‍गजामुळे इतका प्रेरित झाला होता की, त्याने आपल्या मुलाचे नाव त्याच्याच नावावरून ठेवले. गावस्कर यांनी याबाबत खुलासा केला की, जेव्हा तो फलंदाजी करीत होता तेव्हा रोहन त्याच्या कानात बोलून त्याला शतकी खेळी करण्यास प्रोत्साहित करत असे.

१९७१ ची मालिका आठवताना गावस्कर म्हणाले की,’ जेव्हा त्याने मालिकेतील एका सामन्यात खराब शॉट खेळला तेव्हा त्यावेळी रोहन त्याच्याकडे आला आणि कानात म्हणाला की, तुला शतकी खेळी करायची नाहीये का ?. ओव्हर संपल्यावर रोहन पुढच्या षटकात स्लिपच्या दिशेने जाताना आपल्याला फलंदाजीकडे लक्ष देण्यास सांगायचा. तूला शतक बनवायचे नाहीये का? तुझं काय चुकतय ? गावसकर म्हणाले की, रोहन विरोधी संघात होता, मात्र त्यावेळी त्याने कधीही मला टोमणे मारले नाहीत. मी फक्त शतक झळकवावे ही त्याची इच्छा होती. त्या संपूर्ण मालिकेत गावस्करने तीन शतके आणि एक दुहेरी शतक झळकावले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत, अशाप्रकारे असतील नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची मागणी वाढते आहे. त्याच वेळी, क्रूड ऑइलची किंमतही प्रति बॅरल ४० डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर ६०-६० पैशांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान, गेल्या ८० दिवसात तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नव्हता. मात्र मागच्या वेळी १६ मार्च रोजी इंधनाच्या किंमती बदलल्या गेल्या होत्या .

लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढ-उतारांना राज्य सरकार जबाबदार आहेत. खरं तर राज्यांचा महसूल वाढवण्यासाठी व्हॅट किंवा उपकरात वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली. लॉकडाऊन दरम्यान रोख रकमेच्या संकटाने झटत असलेल्या बहुतेक राज्य सरकारांनी इंधनावर कर लावून त्यांची आवश्यकता पूर्ण केली.

मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात १० रुपये आणि डिझेलवर १३ रुपये प्रतिलिटर वाढ केली होती. या वाढीनंतरही दोन्ही इंधनांच्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. वास्तविक, ही उत्पादन शुल्कात झालेली वाढ कच्च्या तेलाच्या कमी किंमतींसह समायोजित केली गेली. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधील बदल हे कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे ठरविले जातात. कारण आपण आपल्या गरजेच्या सुमारे ८० टक्के क्रूड ऑइल आयात करतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमती या प्रति बॅरल गेल्या तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये कच्चे तेल हे प्रति बॅरल ३० डॉलरच्या खाली गेले होते. मात्र २०१९ च्या अखेरिस वेळेपेक्षा अजूनही कच्च्या तेलाची किंमत कमी आहे. एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणीही निम्मी झाली होती. प्रत्यक्षात लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने तसेच कार्यालये बंद पडली होती. त्याच वेळी, लोकानाही घराबाहेर न जाण्याच्या निर्बंधामुळे रस्त्यावर वाहने फिरकत नव्हती.

इंडियन ऑईलच्या म्हणण्यानुसार एप्रिल २०२० मध्ये पेट्रोलियम उत्पादनांची मागणी ही ४६ टक्क्यांनी घटली आहे. एप्रिल २०१९ च्या तुलनेत या काळात पेट्रोलचे ६१ टक्के, डिझेलचे ५६.७ टक्के आणि एटीएफच्या विक्रीत ९१.५ टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यात सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत पेट्रोलियम उत्पादनांची मागणी सुधारली. मात्र, मे २०१९ च्या तुलनेत पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाची मागणी ३८.९ टक्के कमी होती. तसेच आता देशभरातील मॉल आणि बाजार सुरू झाल्याने इंधनाची मागणी वाढेल अशी आशा व्यक्त होते आहे.

राष्ट्रीय राजधानीपेक्षा गुरुग्राममधील पेट्रोल डिझेलचे दर कमी आहेत. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत ७१.८६ आणि डिझेलची किंमत ६९.९९ रुपये प्रतिलिटर आहे. त्याचबरोबर, राजधानीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये पेट्रोल ७१.६८ रुपये आणि डिझेल ६३.६५ रुपयांना विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल ७८.९१ रुपये तर डिझेल ६८.७९ रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल ७६.०७ रुपये आणि डिझेल ६८.७४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गुगल फोटोंवर पिक्चर्स ट्रान्सफर करण्यासाठी फेसबुकने लाँच केले नवीन टूल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेसबुकचे गुगल फोटो ट्रान्सफर टूल आता जागतिक स्तरावरील प्रत्येकासाठी उपलब्ध झाले आहे. २०१८ मध्ये सुरुवात केल्या गेलेल्या या कार्यक्रमामध्ये फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि ट्विटर यांचा देखील समावेश होता. हे टूल युझर्सचे आपल्या फेसबुक अकाउंटवरील सर्व फोटो तसेच व्हिडिओंच्या कॉपी तयार करते आणि त्या लिंक केलेल्या गुगल फोटोजमध्ये ट्रान्सफर करण्यास परवानगी देते. युझर्सना एका सर्व्हिसकडून दुसर्‍या सर्व्हिसमध्ये सहजपणे आपला डेटा ट्रान्सफर करता यावा यासाठीची कल्पना आहे.

“आता युझर्स आपल्या Your Facebook Information या फेसबुकच्या सेटिंग्जमध्ये हे नवीन टूल अ‍ॅकसिस करू शकतात आणि इथेच आपण आपली सर्व माहिती देखील डाउनलोड देखील करू शकतात. आपली गोपनीयता आणि सुरक्षितता राखणे हेच आमचे पहिले प्राधान्य असेल आणि म्हणून ट्रान्सफर केलेला सर्व डेटा हा एन्क्रिप्ट केला जाईल आणि त्याचे ट्रान्सफर सुरू होण्यापूर्वी लोकांना त्यांचा पासवर्ड टाकण्यास सांगितले जाईल, ”असे कंपनीने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

गुगल फोटोमध्ये फेसबुक फोटो आणि व्हिडिओ ट्रान्सफर करण्यासाठी, युझर्सना पहिले आपल्या फेसबुक सेटिंग्जमध्ये “Your Facebook Information” वर जावे लागेल. त्यानंतर ‘Transfer a Copy of Your Photos or Videos’ हा पर्याय निवडा आणि फेसबुक पासवर्ड टाकून आपल्या अकाउंटचे व्हेरिफिकेशन करा. त्यानंतर आपण हे नवीन टूल वापरू शकाल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

उघड्या गटारीत पडलेल्या गर्भवती म्हशीला जीवनदान

सांगली प्रतिनिधी | सांगलीच्या शंभर फुटी रोडवरील भोबे गटारीत गर्भवती म्हैस पडल्याची माहिती समजताच महापालिका अग्निशामक विभाग आणि अ‍ॅनिमल राहतने धाव घेत अथक प्रयत्न करून या म्हशीला बाहेर काढत जीवनदान दिले. आज दुपारच्या सुमारास हि घटना घडली.

अनिल दानके यांची ही म्हैस गटारीकडेचे गवत चरत असताना उघड्या गटारीत पडली. यावेळी तेथील काही नागरिकांनी ही घटना लगेच सांगली अग्निशमन विभागाला कळवली. यानंतर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे हे आपल्या अग्निशमन जवानासह घटना घडलेल्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी म्हशीला वर घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले पण ती म्हैस गर्भवती असल्याने अग्निशमन विभागाला अडचन निर्माण होत होती.

यावेळी अ‍ॅनिमल राहतच्या कोस्तुभ पोळ यांना घटना कळवली. यावेळी सर्व रेस्क्यू टीमसुद्धा घटनास्थळी बचाव साहित्यासहित दाखल झाली. यावेळी क्रेनच्या साहाय्याने म्हैस गर्भवती असल्याने तिला कोणती ही इजा न करता अग्निशामक विभाग आणि अनिमल राहत यांच्या टीमने सुखरूप बाहेर काढत जीवदनदान दिले. याचे नागरिकांनी कौतुक केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यपालनियुक्त विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ नावाची चर्चा

सांगली प्रतिनिधी | आगामी राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादीकडून सांगली जिल्ह्यातून माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.  राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांची निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातून सांगली जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावेळी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नावाची प्राधान्याने जोरदार चर्चा सुरू आहे. सदाशिवराव पाटील यांचे वडील लोकनेते हणमंतराव पाटील हे शरद पवार यांचे जवळचे सहकारी होते. त्यांनी पवार यांच्या भूमिकेची सातत्याने पाठराखण केली होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सदाशिवराव पाटील यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र कालांतराने जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणानुसार ते कॉंग्रेसमध्ये गेले.

13 फेब्रुवारी रोजी सांगलीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीररित्या प्रवेश करून आगामी राजकीय वाटचाल सुरु ठेवली आहे. पक्षप्रवेशावेळीच सदाभाऊंना राष्ट्रवादीच्या कोट्यातून महत्वाचे आणि मानाचे पद मिळण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत होते. त्यांचे समर्थक तसे सांगत होते. पण, अद्याप तरी तशी संधी मिळालेली नाही. परंतु ती संधी आगामी विधानपरिषद सदस्यांच्या नेमणुका होताना मिळेल, असा विश्र्वास त्यांच्या समर्थकातून व्यक्त होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कुत्र्याला दुचाकीला बांधून नेले फरपटत; आदित्य ठाकरेंकडून प्रकरणाची गंभीर दखल

औरंगाबाद प्रतिनिधी | दोन विकृतांनी कुत्र्याला दुचाकीला बांधून दूर पर्यंत फरफटत नेल्याचे प्रकार घडला आहे. हे कृत्य एका व्हायरल व्हिडिओतुन समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जून रोजी दुपारी चार वाजता तिरुपती वॉशिंग सेंटर अजबनगर येथे हा प्रकार घडला. याची एका एनजीओने दखल घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पाच जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास दोन आरोपींनी दुचाकीला कुत्रा बांधला रस्त्याने दुचाकी सुरुवातीला हळू चालवली. परंतु नंतर जोरात पळविली. कुत्रा पाठीमागे फरफटत राहिला.. कुत्रा फरफटत असल्याचे लक्षात आल्यानंतरही दुचाकीस्वारांनी क्रूरपणे त्याला तसेच सोडले. त्याच वेळी तिथे उपस्थित नागरिकांनी त्याचा व्हिडिओ बनविला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही त्याची गंभीर दखल घेतली आहे. हा व्हिडिओ औरंगाबादचा असल्याचे समजल्यानंतर त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना हा विडिओ पाठवून ट्विट करीत हळहळ व्यक्त करून कारवाईचे आदेश दिले. पालकमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतल्यानंतर सामाजिक संस्था समोर आल्या. त्यांनी तक्रार दिल्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम अकरा व भादवि कलम 34 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! हर्सूल कारागृहात एकाच दिवशी सापडले कोरोनाचे 29 रुग्ण

औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहात एकाच दिवशी 29 जणांचे स्वाब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळावर बंदी असताना हर्सूलमध्ये शारीरिक अंतर न पाळता ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता इथे कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवल्याची चर्चा सुरू आहे.

आज सकाळी 90 जणांचे स्वाब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये हर्सूल कारागृहातिल 29 जणांचा समावेश आहे. असे आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या बाबत अधिक माहितीसाठी हर्सूल कारागृहाचे पोलीस अधीक्षक हिरालाल जाधव यांच्याची अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कारागृहातील पॉझिटिव्ह आलेले 29 रुग्ण हे कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आहेत की मग बंदिवान कैदी आहेत ? हे स्पष्ट होऊ शकले नाही.

25 मे रोजी हर्सूल कारागृहात एकही कोरोना रुग्ण नाही. असे अधीक्षक जाधव यांनी माध्यमांना सांगितले होते. त्याच दिवशी ईद च्या निमित्ताने शेकडो बंदिवान, कैद्यांनी कारागृहात ईदची सामूहिक नमाज अदा केली होती. या दरम्यान एकाच्याही तोंडाला मास्क, रुमाल नव्हते. तर शारीरिक अंतर पाळले गेले नव्हते. त्यामुळे हर्सूल कारागृहाचा निष्काळजीपणा समोर आला होता. मात्र त्या घटनेच्या अवघ्या 10 दिवसानंतर एवढ्या मोठ्या संख्येने कारागृहात कोरोनारुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळेच कोरोनाचा संसर्ग पसरला असल्याची चर्चा सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांत मान्सुन येणार

मुंबई | मान्सूनचं भारताच्या दक्षिणपश्चिम भागात आगमन झालं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा भाग, आंध्रप्रदेशचा काही हिस्सा, बंगालचा उपसागर या भागांमध्ये मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय ईशान्य भारतातही पावसाला सुरुवात झाली आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणीय परिस्थिती मात्र काही अंशी पूर्ववत होत असून महाराष्ट्रातही येत्या २ ते ३ दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये थंडगार वाऱ्यांसहित पावसाच्या हलक्या सरी रविवारी सकाळपासून कोसळल्याचं पाहायला मिळालं. देशातील कमाल तापमानाची नोंद ही ३६ डिग्री सेल्सिअस असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितलं.

पश्चिम हिमालयात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांचा परिणाम भारतातील काही भागांवर होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शेतकर्‍याने पिकवला २५ किलो गांजा; १ लाखाची झाडे पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |

तासगाव तालुक्यातील ढवळी येथे उसाच्या शेतात पिकलेली २५ किलो गांजाची झाडे तासगाव पोलिसांनी जप्त केली आहेत. या गांजाच्या शेती प्रकरणी ढवळी येथील दिलीप आनंदा बोबडे यास ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत तासगाव पोलिसात मिळालेली अधिक माहिती अशी – ढवळी येथे दिलीप बोबडे यांची उसाची शेती आहे. याच शेतीत त्याने दहा ते बारा गांजाची झाडे लावलेली होती. ही झाडे सहा ते सात फूट उंचीची होती. याबाबत तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ढवळी येथे छापा मारून उसाच्या शेतातील गांजाची झाडे जप्त केली.

एक लाख 26 हजार 145 रुपये किमतीची 25 किलो गांजाची झाडे तासगाव पोलिसांकडून जप्त करण्यात आली. याप्रकरणी बोबडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अंगुरी भाभी Big Boss 14 मध्ये सहभागी होणार? अभिनेत्रीने घेतला ‘हा’ निर्णय  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कलर्स मराठीवरील सर्वाधिक टीआरपी असणारा तसेच अनेक वळणे घेणारा शो म्हणजे बिग बॉस होय. यावर्षी या शो मध्ये स्पर्धकांची यादी करायला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. त्यांनी ‘नागिन 3’ फेम सुरभी ज्योती सोबत बोलणे केले आहे. सुरभि ज्योती या एकता कपूर यांच्या शो मध्ये बेला ची भूमिका केली होती. सुरभि ज्योती नंतर आणखी एक टीव्ही अभिनेत्री हसीना यांचे नाव बिग बॉस १४ साठी घेण्यात आले आहे. ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेतील अंगुरी भाभी ची भूमिका करणाऱ्या शुभांगी अत्रेंचे नाव ही घेतले जात आहे.

https://www.instagram.com/p/BFJ_cTAmvMe/?utm_source=ig_web_copy_link

शुभांगी अत्रे यांचे नाव घेतले असले तरी त्यांनी या शोमध्ये येण्यास फारसा उत्साह दाखविलेला नाही. त्या आता सध्या एका मालिकेत एक महत्वाची भूमिका करत आहेत. ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत शिल्पा शिंदे यांच्या जागी त्यांनी काम केले होते. एका वादानंतर शिल्पा शिंदे यांनी हा शो सोडण्याचे ठरविले होते व ती भूमिका शुभांगी अत्रे ना मिळाली होती.

शुभांगी अत्रेंच्या उत्तम सादरीकरणानंतर लोक शिल्पा शिंदेंना विसरून गेले. नंतर निर्मात्यांनीही शुभांगी ने शिल्पाची कमी पूर्ण केली असे सांगितले होते. ‘भाभी जी घर पर हैं’ हा शो छोट्या शहरांमध्ये खूप पसंतीस उतरला आहे. म्हणूनच बिग बॉस १४ मध्ये त्यांना घेण्याची इच्छा निर्मात्यांची आहे. जर त्या या शोमध्ये आल्या तर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक खेचून आणतील मात्र अद्याप तरी तसे काही दिसत नाही आहे.

https://www.instagram.com/p/BoqVGhRhxJ7/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/ByaywjcB48g/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BkFfL9qh7eL/?utm_source=ig_web_copy_link

https://www.instagram.com/p/BJ2j4a1h4aW/?utm_source=ig_web_copy_link