Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5692

संचारबंदीच्या काळात विकले तब्बल २० टन अंजीर; अभियंता तरुणाने केली १३ लाखांची कमाई

पुणे । संचारबंदीच्या काळात इतरांसोबत शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकाची विक्री झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या परिस्थीतीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर येथील समीर डोंबे या अभियंता तरुणाने मात केली आहे. बी ई मेकॅनिकल पदवीधर असणाऱ्या समीरने अंजिर शेतीत प्रयोग केला आहे. यात त्याला यशही मिळाले आहे. त्याने २० टन अंजिराची विक्री करत सुमारे १३ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.

समीरने काही माल पॅकिंग केला व पुण्याच्या सोसायटीमध्ये विकला, तर काही माल हा मॉलमध्ये (जे मॉल अत्यावश्यक सेवा देत सुरु होते, व तेथे फळ भाज्यांचे मार्केट सुरु होते) माल पॅकिंग करुन विकला. यासोबत आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी गावातील ३५ ते ४० शेतकऱ्यांना अंजिराची बाजारपेठही उपलब्ध करून दिली आहे. विक्री न झालेल्या अंजीरावर प्रक्रिया करून त्यापासून जाम बनविण्याची कंपनी त्यांनी सुरु केली आहे. त्यातून त्यांनी अडीच ते तीन टन अंजिरापासून जाम बनविला आहे. पुण्याजवळील दौंड तालुक्यातील खोर या छोट्या गावातील समीर डोंबे या युवकाचा इंजिनीअर ते कृषी क्षेत्रातील उद्योजक असा कौतुकास्पद प्रवास आहे. समीर डोंबे यांनी आपल्या वडिलोपार्जित घेतल्या जाणाऱ्या ‘अंजीर’ शेतीच्या उत्पादनात आधुनिकतेची कास धरत नाविन्यपूर्ण बदल केले आणि अंजीराचा स्वतःचा ‘पवित्रक’ हा ब्रॅन्ड निर्माण केला. आता याचं बदलाच्या जोरावर अंजीराच्या बाजारपेठेत समीर यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.

खोर हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील डोंगराळ प्रदेशातील गाव आहे मात्र पाण्याची इथे पाण्याची कमतरता आहे. कमी पाण्यावर अंजीराचे उत्पादन घेणे तसे कठीणच. पाण्याचे नियोजन करून शेतकरी गावात सुमारे 250 एकरावर अंजिर घेतात. इंजिनिअरिंग करून शेतीकडे वळत त्याने एक चांगला आदर्श सर्वांसमोर घातला आहे. शासनाच्या आर्थिक मदतीने 40 दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करून ‘डोंबे पाटील’ नावाने अंजीर प्रोसेसिंग युनिट सुरू केले. त्याद्वारे अंजीर जाम आणि अंजीर जेली हे उत्पादन बनविले. समीर डोंबे यांच्या या प्रयत्नांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सुपरस्टार रजनीकांतची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह? पोस्टनंतर अभिनेता झाला ट्रोल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा देशात मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या ऍक्शन सिनेमांमुळे ते सर्वांच्या गळ्याचे ताईत बनले आहेत. त्यांच्या हटके अंदाजामुळे अनेकांना ते खूप आकर्षक वाटतात. काही लोक तर त्यांना देव मानतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल जर काही नकारात्मक समोर आले तर त्यांचे चाहते संतापतात. अशीच एक घटना समोर आली आहे. अभिनेता रोहित रॉय याने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये रजनीकांत यांना कोरोना झाल्याचे त्याने म्हंटले आहे. त्याच्या या पोस्टनंतर रजनीकांत यांच्या चाहत्यांनी रोहित रॉय ना चांगलेच ट्रोल केले आहे.

एरवी रजनीकांत यांच्यावर अनेक विनोद व्हायरल होत असतात. त्याचा आनंदही सगळे घेतात. अभिनेता रोहित रॉय याने अशाच मजेशीर अंदाजात ही पोस्ट केली होती. ज्यात त्याने लिहिले होते. की ‘रजनीकांत यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. आता कोरोनाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.’ त्याने विनोदी ढंगात ही पोस्ट केली होती. या तणावपूर्ण वातावरणाला थोडे हलकेफुलके करण्यासाठी ही पोस्ट केल्याचे तो म्हणाला. मात्र हा विनोद रजनीकांत यांच्या चाहत्यांना आवडलेला दिसला नाही.

https://www.instagram.com/p/CA9cNqShyuv/  

चाहत्यांकडून हा विनोद असंवेदनशील असल्याची भावना व्यक्त होत असून त्यांनी रोहित रॉयला ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर रोहितनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ट्रोलर्सला उत्तर देत रोहितने सर्वांना शांत व्हायला सांगितले. हा केवळ एक विनोद आहे असे त्याने सांगितले. मी टिपिकल रजनी स्टाईलने विनोद केला होता. यातून कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मी केवळ थोडे हसवण्याचा प्रयत्न  करत होतो. प्रतिक्रिया देण्याआधी समोरच्या व्यक्तीचा हेतू पाहणं हे देखील महत्त्वाचं असल्याचं तो म्हणाला.

नायजेरियाचे मानवाधिकार कार्यकर्ते मुबारक बाला अचानक गायब, तपासासाठी ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनलचे आवाहन

थर्ड अँगल | प्रश्न विचारलेले कुठल्याच धर्माला आवडत नाही. जगाच्या पाठीवरील कुठलाही धर्म, कुठलाही देश याला अपवाद नाही. सामान्यतः फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर असे प्रश्न विचारले की धर्मांधांकडून शिवीगाळ होणे, धमक्या येणे आता जवळपास रोजचेच झाले आहे. पण नायजेरियातील मानवाधिकार‌ ‌कार्यकर्ते‌ मुबारक बाला यांच्या वाट्याला धर्मांधांच्या शिव्या आणि धमक्या यांच्यासोबतच आणखीही बरंच काही येत आहे.

नायजेरियातील सुपरिचित ‌मानवाधिकार‌ ‌कार्यकर्ते‌ ‌व‌ ‌Humanist‌ ‌Association‌ ‌of‌ ‌Nigeria‌ ‌चे‌ ‌अध्यक्ष‌ ‌मुबारक‌ ‌बाला‌ ‌ ‌ ‌सध्या‌ ‌कुठे‌ ‌आहेत‌ ‌?‌ ‌कसे‌ ‌आहेत‌ ‌?‌ ‌याविषयी‌ ‌कोणालाही ‌कसलीही ‌माहिती‌ ‌नाही ‌आहे.‌ ‌बाला यांचा नेमका गुन्हा काय? नेहमीप्रमाणे एप्रिल महिन्यातही बाला यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली. शेकडो‌ ‌वर्षांची‌ ‌परंपरा‌ ‌असलेला‌ ‌धार्मिक‌ ‌श्रद्धा‌ ‌बाला‌ ‌यांच्या‌‌ या‌ ‌एक‌ ‌फेसबुक‌ ‌पोस्टने‌ ‌हादरल्या‌ ‌असाव्यात‌ ‌म्हणून‌ ‌केवळ‌ ‌एका‌ ‌फेसबुक‌ ‌पोस्ट‌ साठी‌ ‌तेथील‌ ‌लोक‌ ‌त्यांना‌ ‌जीवे‌ ‌मारण्याच्या‌ ‌धमक्या‌ ‌देत‌ ‌आहेत.‌

२७‌ ‌एप्रिल‌ ‌२०२०‌ ‌ला‌ ‌एक‌ ‌लॉ‌ ‌फर्म‌ ‌एस.‌ ‌एस.‌ ‌उमर‌ ‌अँड‌ ‌को‌. ने ‌बाला‌ ‌यांच्यावर ‌कलम‌ ‌२६(१)‌ ‌नुसार‌ ‌गुन्हा‌ ‌दाखल‌ ‌केला.‌ २८‌ ‌एप्रिल‌ ‌२०२०‌ ‌ला‌ ‌अचानक‌ ‌मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांच्या‌ ‌घरी‌ ‌कानो‌ ‌राज्याचे‌ ‌काही‌ ‌पोलीस‌ ‌आले व त्यांना घेऊन गेले. ‌त्या‌ ‌पोलिसांजवळ‌ ‌कुठलेही‌ ‌वॉरंट‌ ‌नव्हते,‌ ‌ते पोलीस गणवेशात सुद्धा नव्हते.‌  कदुना‌ ‌राज्याच्या‌ ‌पोलीस‌ कमिशनरांनी ‌दिलेल्या‌ ‌माहितीनुसार‌ ‌काही‌ ‌दिवस‌ ‌कदुना‌ ‌पोलिसांच्या‌ ‌ताब्यात‌ ‌असलेल्या ‌बाला‌ ‌यांना नंतर‌ ‌कानो‌ ‌पोलिसांच्या‌ ‌ताब्यात‌ ‌देण्यात‌ ‌आले.‌ ‌पण‌ ‌कानो‌ ‌पोलिसांनी‌ ‌बाला‌ ‌त्यांच्या‌ ‌ताब्यात‌ ‌असण्याची‌ ‌कोणतीही‌ ‌पुष्टी‌ ‌दिली‌ ‌नाही‌ ‌असे बाला यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. फेसबुक पोस्टद्वारे बाला यांनी आमच्या‌ ‌धार्मिक‌ ‌भावना‌ ‌दुखावल्याचे‌ ‌आरोप‌ ‌त्यांनी‌ ‌ केला‌ ‌आहे.‌ ‌पण बाला‌ ‌यांना‌ ‌झालेली‌ ‌अटक‌ ‌ही‌ ‌या‌ ‌कलमाखाली‌ ‌झाली‌ ‌आहे‌ ‌का‌ ‌?‌ ‌याविषयी‌ ‌पण‌ ‌कुठलीच‌ ‌माहिती‌ ‌उपलब्ध‌ ‌करून‌ ‌देण्यात‌ ‌आली‌ ‌नाही‌.

नायजेरियाच्या‌ ‌संविधानानुसार‌ ‌कुठल्याही‌ ‌अटकेनंतर‌ ‌२४‌ ‌तासांच्या ‌आत‌ ‌अटकेची‌ ‌कारणे ‌लेखी‌ ‌स्वरूपात‌ ‌देणे‌ ‌बंधनकारक‌ ‌आहे.‌ ‌ या‌ ‌प्रकरणाची‌ ‌गंभीरता‌ ‌तेव्हा अधिक‌ ‌वाढते‌ ‌जेव्हा‌ ‌या‌ ‌धमक्या‌ ‌देण्यामध्ये‌ ‌खुद्द‌ ‌पोलीस‌ ‌कार्यालयातील‌ ‌लोकच‌ ‌सहभागी‌ ‌असतात.‌ ‌सहारा‌ ‌रिपोर्टर्स‌ने‌ ‌दिलेल्या‌ ‌माहितीनुसार‌ ‌बाऊची‌ ‌राज्य‌ ‌पोलिसातील‌ ‌एक‌ ‌सार्जंट‌ ‌स्वतः‌ ‌मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांना‌ ‌धमक्या‌ ‌देत‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पोलीस‌ ‌अधिकाऱ्याचं ‌फेसबुक‌ वर‌ ‌एक‌ ‌फेक‌ ‌अकाउंट‌ ‌आहे‌ ‌व‌ ‌या‌ ‌अकाउंट‌ द्वारे‌ ‌तो‌ ‌सतत‌ ‌द्वेषपूर्ण‌ ‌व‌ ‌धार्मिक‌ ‌तेढ‌ ‌वाढविणारे‌ ‌मेसेज‌ ‌पसरवित ‌असतो.‌ ‌मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांचे‌ ‌फेसबुक‌ ‌अकाउंट‌ ‌बंद‌ ‌करावे‌ ‌म्हणून‌ ‌एक‌ ‌ऑनलाईन‌ ‌याचिका‌ ‌पण‌ ‌Change.org‌ ‌या‌ ‌वेबसाईट‌ ‌वर‌  ‌दाखल‌ ‌करण्यात‌ ‌आली‌ ‌होती‌ .‌ ‌या‌ ‌याचिकेवर‌ ‌१७०००‌ ‌जणांनी‌ ‌सह्या ‌केल्या‌ ‌होत्या‌ ‌हे‌ ‌विशेष.‌ ‌अर्थातच‌ काही काळानंतर ‌Change.org‌ ‌नी‌ ‌ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी याचिका‌ ‌रद्द‌ ‌केली.‌ ‌बाला यांच्यावर ‌धर्मांध चांगलेच भडकले आहेत, ज्या‌ ‌पोलीस‌ ‌स्टेशन‌ मध्ये‌ ‌बाला‌ ‌असतील‌ ‌ते‌ ‌पोलीस‌ ‌स्टेशन‌ ‌जाळून‌ ‌टाकू‌ ‌असे‌ ‌म्हणण्यापर्यंत‌ त्यांची ‌मजल‌ ‌गेली‌ ‌आहे.‌ ‌

मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांच्याविषयी‌ ‌थोडेसे – ‌ ‌मुबारक‌ ‌बाला‌ ‌यांचा‌ ‌जन्म‌ ‌नायजेरियातील‌ ‌कानो‌ ‌राज्यात‌ ‌१९८४‌ ‌साली‌  झाला.‌ ‌ते‌ ‌एक‌ ‌केमिकल‌ ‌इंजिनिअर‌ ‌आहेत.‌ ‌
त्यांचे‌ ‌नाव‌  मानवाधिकार‌ ‌चळवळीत‌ ‌चांगलेच‌ ‌परिचित‌ ‌आहे.‌ ‌याशिवाय‌ ‌Humanist‌ ‌Association‌ ‌of‌ ‌Nigeria‌ ‌या‌ ‌संघटनेचे‌ ‌ते‌ ‌अध्यक्ष‌ ‌आहेत‌. ‌याआधी २०१४ मध्ये बाला यांना जबरदस्ती एका हॉस्पिटलच्या मनोरुग्ण विभागात उपचारांसाठी ठेवण्यात आले. बाला यांना अश्या उपचाराची गरज आहे असे सरकारला वाटण्यामागचे कारण होते, त्यांचे “नास्तिकत्व”. आणि बाला यांनी जेव्हा उघडपणे अशी नास्तिक असण्याची भूमिका घेतली तेव्हा त्यांना त्याची कठोरात कठोर शिक्षा मिळावी म्हणून सर्वात जास्त प्रयत्न केलेत ते खुद्द बाला यांच्या वडिलांनी. योगायोगाने ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना मनोरुग्ण ठरवून ठेवण्यात आले होते त्या हॉस्पिटलमध्ये पुढील काही दिवसांत संप झाला. या संपामुळे बऱ्याच रुग्णांची तिथून सुटका करण्यात आली. या सुटका झालेल्यांमध्ये मुबारक बाला यांचीही सुटका झाली आणि ते पुढच्या त्रासातून वाचले.

नायजेरियातील धर्म-स्वातंत्र्याची सद्यस्थिती – नायजेरियातील जवळपास ५०% लोक मुस्लिम, ४०% ख्रिस्ती आणि १०% आदिवासी किंवा इतर धर्मांचे आहेत. तिथे निधर्मी लोकांना बऱ्याच अडचणींना समोर जावे लागते. याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे तेथील नास्तिक व निधर्मी संघटनांना नोंदणी करून कायदेशीर स्वरूप मिळावे यासाठीच १७ वर्षे संघर्ष करावा लागला. नास्तिक हे असे अल्पसंख्याक आहेत की ज्यांचे शोषण फक्त घराबाहेरच होते असे नाही तर ते बहुतेकदा  घरातूनच सुरु होते. ‘धर्मत्याग’ व ‘ईशनिंदा’ या दोन्ही गोष्टी तिथे कायद्याने निषिद्ध आहेत व त्यांसाठी असलेली शिक्षा ही मृत्यदंडाची आहे.

वस्तुतः नायजेरिया हा देश धर्मनिरपेक्ष आहे. देश म्हणून नायजेरियाचा कुठलाही असा अधिकृत धर्म नसला तरी तेथील संविधान राज्यांना स्वतःचे शरिया न्यायालय चालविण्याचे अधिकार देतो. त्यामुळे काही राज्यांमध्ये नागरिकांवर शरियाचे पालन बंधनकारक आहे तर काही राज्यांमध्ये ते ऐच्छिक आहे. त्यातही परत प्रत्येक राज्य वेगवेगळ्या प्रमाणात आणि विविध प्रकारे या कायद्याची अंमलबजावणी करते. राज्यांतील शरिया न्यायालयांना ईशनिंदेसाठी कितीही कठोर अगदी देहदंडाची शिक्षा देण्याचे स्वातंत्र्य आहे. असे असले तरी नायजेरियाच्या संविधानाचे सेक्शन ३८ आणि ३९ नागरिकांना विचारांचे, अभिव्यक्तीचे आणि धार्मिक स्वातंत्र्य देते.
ज्या कानो राज्यात मुबारक बाला यांच्यावर खटला चालण्याची शक्यता आहे, त्या राज्याचा या बाबतील परिस्थिती काही फार आशादायक नाही.

 ‌२०१६ मध्ये याच राज्यातील शरिया न्यायालयाने एका मौलवीला व त्यांच्या ५ अनुयायांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. ईशनिंदेची फाशीची शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ होती. जगभरातील देशांमध्ये उत्तोरोत्तर वाढत जाणाऱ्या धार्मिक उन्मादाची ही एक प्रकारे खूणच आहे. बरं अश्या धर्माने प्रदूषित न्याय  व्यवस्थेतून तुम्ही कसेबसे वाचला तरी धर्माधांच्या तावडीतून तुमची सुटका होईलच असे काही नाही. २०१६ मध्ये एका ख्रिश्चन महिलेला ईशनिंदेच्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यावरही धर्मांधांनी तिची हत्या याच कानो राज्यात केली आहे.

या अश्या परिस्थितीत Humanist‌ ‌International‌ ‌चे नायजेरियातील व जगभरातील कार्यकर्ते मुबारक बाला यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी ‌मुबारक बाला यांच्या संदर्भात‌ ‌नायजेरियन सरकारकडे  काही‌ ‌मागण्या‌ ‌केल्या‌ ‌आहेत.

‌१)‌ ‌बाला‌ ‌यांच्या‌ ‌सद्यस्थितीविषयी‌ ‌सरकारने‌ ताबडतोब ‌माहिती‌ ‌द्यावी.‌
जर‌ ‌पहिल्या‌ ‌२४‌ ‌तासांत‌ ‌त्यांच्यावर‌ ‌कुठलाही‌ ‌गुन्हा‌ ‌दाखल‌ ‌झाला‌ ‌नसेल,‌ ‌तर‌ ‌त्यांना‌ ‌ताबोडतोब‌ ‌सोडून‌ ‌देण्यात‌ ‌यावे.‌
‌ ‌
२)‌ ‌बाला‌ ‌यांना‌ ‌थेट‌ ‌आणि‌ मोफत‌ ‌‌कायदेशीर‌ ‌साहाय्य‌ ‌उपलब्ध‌ ‌करुन‌ ‌देण्यात‌ ‌यावे.‌

३)‌ ‌तुरुंगात‌ ‌असतांना‌ बाला‌ ‌यांच्या‌ ‌आरोग्याची‌ ‌व‌ ‌सुरक्षिततेची‌ ‌संपुर्ण‌ ‌हमी ‌सरकारने‌ ‌द्यावी.‌ ‌खासकरून‌ ‌आता‌ ‌जेव्हा‌ ‌की‌ ‌बाला‌ ‌यांना‌ ‌तुरुंगात‌ ‌असल्याने‌ ‌कोरोना‌‌च्या‌ ‌संसर्गाचा‌ ‌अधिक‌ ‌धोका‌ ‌संभवतो.‌
‌ ‌
४)‌ ‌बाला‌ ‌यांच्यावर‌ ‌जर‌ ‌खटला‌ ‌चालणार‌ ‌असेल‌ ‌तर‌ ‌तो‌ ‌लागोस‌ ‌किंवा‌ ‌तश्या‌ ‌एखाद्या‌ ‌तटस्थ‌ ‌राज्यात‌ ‌चालविण्यात‌ ‌यावा‌ ‌जेणेकरून‌ ‌तो‌ ‌निष्पक्षरीत्या‌ ‌चालवला जाईल ‌व‌ योग्य ‌न्याय‌ ‌होईल.‌

Humanist‌ ‌International‌ ने‌  मुबारक बाला यांच्यासाठी शक्य त्या सर्व प्रकारे आवाज उठवण्याचे  आवाहन जगभरातील सर्व मानवतावादी, विवेकवादी लोकांना केले आहे.

प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9028242656/9561190500

अनुष्काचा ‘हा’ फोटो पाहून विराटची उडाली विकेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनुष्का शर्मा सोशल मीडियावर सतत कार्यरत असते. संचारबंदीच्या काळात तिने विराट कोहलीचे जे व्हिडीओ टाकले होते. ते चांगलेच व्हायरल झाले. तिचा सोशल मीडियावरील चाहतावर्गही मोठा आहे. तिच्या फोटोना चाहत्यांची वाहवा मिळत असतेच. मात्र प्रत्यक्ष विराट कोहलीनेही तिच्या एका फोटोवर काही शब्दच न सुचल्याने इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनाही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर लाखो लाईक्स मिळाल्या आहेत.

संचारबंदीमुळे बहुधा सर्वच जण घरी आहेत. मग बॉलिवूड सेलिब्रिटी किंवा क्रिकेट सेलिब्रिटी यांच्यापैकी कुणाचेच काम सुरु नसल्याने हे व्यस्त असणारे लोकही घरी आहेत. या काळात सातत्याने काही सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत.  अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे दोघे त्यांच्या चाहत्यांचे आवडते आहेत. या दोघांची जोडी ही त्यांच्यातील प्रेम आणि केमिस्ट्रीमुळे चांगलीच प्रसिद्ध आहे. दोघांमधील प्रेम विविध कार्यक्रमांमधून दिसत असते.

https://www.instagram.com/p/CBFS57mJYDA/?utm_source=ig_web_copy_link

आज अनुष्काने जो फोटो टाकला आहे. त्यामध्ये ती घरातील एका अशा कोपऱ्यात बसली आहे. जिथे सूर्यप्रकाश येतो आहे. या फोटोसोबत तिने, “मी तुला सांगितले होते, घरातल्या सूर्यप्रकाशाच्या जागा माहिती झाल्या आहेत.” तिचा हा फोटो पाहून विराट कोहलीची विकेट उडाली आहे. त्याने इमोजी टाकून प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्का शर्मा ही एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रब ने बना दी जोडी या सिनेमातून तिने पदार्पण केले होते. पीके, ये दिल है मुश्किल अशा गाजलेल्या सिनेमांमधून काम केले आहे.

बिहारमध्ये अवतरली कोरोना देवी? महिला करतायत पूजा; जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत देशात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात आहे. भारतातही त्याचे मोठ्या प्रमाणात संक्रमण सुरु आहे. देशात प्रशासनाच्या वतीने संक्रमणास अटकाव घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना बाधित रुग्ण संख्या २ लाखाच्या वर गेली आहे. शास्त्रज्ञ जीवाचे रान करून लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.  या सगळ्या वातावरणात बिहारमध्ये कोरोना देवी अवतरली आहे. या अफवेमुळे बिहार, उत्तर प्रदेश येथील महिलांनी या देवीचे पूजन करण्यास सुरुवात केली आहे. या अंधश्रद्धांना बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान ही अफवा छत्तीसगड, हरयाणापर्यंत जाऊन पोहोचली आहे. आणि येथील बायका आपापल्या पद्धतीने पूजा करत आहेत. याबाबत एक दणकट पसरवण्यात आली आहे. तसेच या देवीचा वारही ठरविण्यात आला आहे. सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी देवीची पूजा केली जात आहे. . या अंधश्रद्धेच्या अफवांवर विश्वास ठेऊन फरीदाबादमधील बसंतपूर कॉलनीत राहणाऱ्या महिला यमुना किनारी पूजेसाठी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. Covid -१९ असा विषाणू असल्याने शेवटचा अंक ९ आहे म्हणून देवीला ९ गोष्टी अर्पण केल्या जात आहेत. यामध्ये ९ फुले, नऊ पेढे वा लाडू, नऊ धूप किंवा अगरबत्ती, नऊ दिवे अर्पण केल्याचे सांगितले जात आहे.

एका शेतात काही महिला काम करत होत्या तेव्हा शेतात चरणाऱ्या गायीने महिलेचे रुप घेतले. भीतीने घाबरणाऱ्या महिलांना थांबवत तिने त्यांना मी कोरोना देवी आहे. माझी पूजा केल्यास तुमच्या घरी कोणाला कोरोना संसर्ग होणार नाही असा दृष्टांत दिला असे सांगितले जात आहे. दरम्यान अशी कोणतीही पूजा करून कोरोना जाणार नाही. कोरोना पासून बचावासाठी सामाजिक अलगाव तसेच विलगीकरण आवश्यकत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अशा भ्रामक अंधश्रद्धांना बळी पडू नये असे आवाहनही केले जात आहे.

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. शुक्रवारी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत २० रु ने घसरण झाली आहे. यामुळे एक तोळा सोन्याचा भाव ४७,२६८ रुपये झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जगाच्या बाजारातील घसरणीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण होते आहे. दरम्यान शुक्रवारी चांदीच्या किमतीत ५४ रुपयांची वाढ झाली आहे. आता १ किलो चांदीची किंमत ४९,५८४ झाली आहे. गुरुवारी चांदीची किंमत ४९,५३० होती.

 २४ करत सोन्याचा सध्याचा भाव २०रु प्रति १० ग्रॅम ने घसरला आहे. सोन्याच्या वायदा भावातही घसरण होताना दिसत आहे. ५ ऑगस्ट २०२० च्या वायदा भावात शुक्रवारी ७६२ रुपयाची घसरण झाली आहे. प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४५,९३४ राहिला आहे. ३ जुलै २०२० च्या चांदीचा वायदा भाव १,१२४ रुपयाने घसरला आहे. चांदीचा भाव ४७,६८७ रु प्रति किलो झाला आहे.

जागतिक बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतीत घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग च्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचा जागतिक वायदा भाव ३२.५० डॉलरच्या घसरणीने १,६९४ डॉलर प्रति औंस झाला होता. सोन्याचा सध्याचा जागतिक दर २६.१० डॉलर ने घसरला आहे. त्याचा भाव १,६८७.९१ प्रति औंस झाला होता. चांदीचा जागतिक वायदा भाव शुक्रवारी संध्याकाळी ०.५४ डॉलर च्या घसरणीने १७.५२ डॉलर प्रति औंस झाला होता. सध्याचा चांदीचा जागतिक भाव ०.२९ डॉलर च्या घसरणीने १७.४२ प्रति औंस झाला आहे.

कराड तालुक्यातील 2 महिलांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६२२ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या सोळा नमुन्यापैकी कराड तालुक्यातील तुळसण येथील 65 वर्षीय महिला व केसे येथील 32 वर्षीय महिला या दोन महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित 14 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

वाई तालुक्यातील  पसरणी  येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 75 वर्षीय पुरुषाचा मुत्यू झाला असून  मृत्यूपश्चात नमुना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे. वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 13 ग्रामीण रुग्णालय वाई येथील 80, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथील 45, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 32 व रायगाव येथील 41 असे 211 अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहितीही डॉ गडीकर यांनी दिली.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकुन कोरोना बाधितांची संख्या अाता ६२२ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत २६ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत ३०३ जणांनी कोरोनावर मात केली असून २९३ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई | प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या आसपास लागणारे दहावी आणि बारावीचे निकाल या वर्षी राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पुढे गेला आहे.राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाती घेण्यात येवून दहावीच्या ४० ते ४५ टक्के तर बारावीच्या ६५ टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या असल्याने यंदा दहावीचा निकाल २० ते ३० जुलैपर्यंत तर बारावीचा निकाल ५ ते १४ जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीच्या परीक्षेच्या अंतिम पेपरच्या कालावधीत राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला मात्र राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक शास्त्र पेपर-२ म्हणजेच भूगोल या विषयाचे गुण हे विद्यार्थ्याने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून,त्याचे रुपांतर परीक्षा रद्द करण्यात आलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये किती गुण मिळतात त्या गुणांची सरासरी लक्षात घेऊन भूगोलच्या पेपरला गुण दिले जाणार आहेत.यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर इतर कोणताही शेरा नसेल, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते.१५ जूनपासून शाळा सुरु करता येतील का, प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी विशेषकरून ग्रामीण भागातील शाळा मोकळ्या मैदानात दोन-तीन सत्रात भरवणे शक्य आहे का, यावर आज बैठक आयोजित करण्यात आली होती. शाळा कधीपासून सुरु होतील हे सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १४ मेपासून उत्तरपत्रिका तपासणीला आला वेग आला असून,आतापर्यंत बारावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची पैकी सुमारे ६० टक्के तर दहावीच्या एकूण उत्तरपत्रिकांची पैकी ४० टक्के उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे.मुंबई, पुणे, सोलापूरसह अन्य भागांमध्ये संसर्ग वाढत असल्याने त्या ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू झाले आहे.त्यामुळे बारावीचा निकाल सर्वप्रथम १४ जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल ३० जुलैपर्यंत जाहीर होईल असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून अकरावीची प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली जाईल; काही फेऱ्या कमी करून ऑगस्टअखेर प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.जून महिन्यातील कोरोनाची स्थिती पाहून दुपारी किव्हा सकाळच्या सत्रात बारावीचे वर्ग १५ जूनपासून सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे. आगामी वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम परीक्षेपूर्वी पूर्ण व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर १ ते १५ सप्टेंबर दरम्यान या विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू करण्याचेही नियोजन आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Video:’त्या’ चिमुकलीचा रडतानाचा व्हिडिओ पाहून उद्धव ठाकरेंनी केला तिला स्वतःहून फोन, म्हणाले..

पुणे । पुण्यातील विश्रांतवाडीतील विश्रांत सोसायटीत रहाणारे शिंदे कुटुंबांना सध्या सुखद धक्का बसलांय. अंशिका शिंदे या तीन वर्षाच्या लहान मुलीचा एक व्हिडीयो व्हायरल झाला. या व्हिडीयोत तीने लाँकडाऊन दरम्यान आईने सांगितलेल्या सुचनांचं उल्लंघन केलं. त्यानंतर तीच्या आईने तीला सुचनांचं पालन करण्यासाठी दम दिला होता. त्यावेळी छोट्या अंशिंकाने रडत आपण पुन्हा अशी चूक करणार नाही असं सांगितलं.

मात्र माय लेकींच्या या संस्कार शिकवणीत अंशिकाच्या आईने अंशिकाला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय सुचना केल्यात आणि त्यांचं कसं पालन करायचं याची आठवण करून दिली. यावेळी छोट्या अंशिकाने आपण मोदींचं आणि उद्धव काकांचं एैकणार असं सांगितलं. तसेच आपल्याला उद्धव काका खूप आवडतात असंही तीने आपल्या आईला सांगितलं. छोट्या अंशिकाचा हा व्हिडीयो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंतही पोहचला.

त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या छोट्या चहातीला फोन करून सुखद धक्का देत दिलासा दिला. आणि आई-बाबांच्या सुचनांचं पालनही करायला सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वसामान्य नागरिकांशी कसं विश्वासाचं नातं जुळलंय हेच या व्हिडीयो आणि आँडियो क्लिपवरून दिसून येतं. (‘जगात भारी’ महाराष्ट्र घडवण्यासाठी मुख्यमंत्री सज्ज)

https://www.facebook.com/watch/?v=537051436989399

सोशल मीडियावर ही गोष्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. आएएनएस आणि सीव्होटर्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालात उद्धव ठाकरे हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. आपल्या वाट्याला आलेलं जनतेचं हे प्रेम पाहता त्यांनी सर्वांचेच सहृदय आभार मानले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यात कोरोना टेस्टचा दर निश्चित होणार- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाच्या संशयित रुग्णांकडून कोरोनाची चाचणी करण्यासाठी मनमानीपणे शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती कोरोना चाचणीचा दर ठरवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील लॅब पूर्णक्षमतेने वापरण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी राज्य शासनाने राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी हे सदस्य आहेत. तर आरोग्य सेवा संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयसीएमआरने आरटी-पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या ४४ शासकीय आणि ३६ खासगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणीची मान्यता दिली आहे. शासकीय प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या निशुल्क केल्या जात आहेत. खासगी प्रयोगशाळांसाठी आयसीएमआरने ४५०० रुपये इतकी दर निश्चिती केली होती. याकाळात तपासणी चाचण्यांसाठी आवश्यक असणारे किटस् परदेशातून आयात करावे लागत होते. मात्र आता असे किटस् देशातच तयार होत आहेत आणि उपलब्ध देखील आहेत. त्यामुळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी वाटाघाटी करून कोरोना तपासणी दर निश्चित करण्याबाबत आयसीएमआरने कळवले आहे.

ही समिती सर्व जिल्ह्यातील आयसीएमआर मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळांशी कोरोना चाचण्यांच्या दर निश्चीती बाबत वाटाघाटी करून सात दिवसात दर निश्चित करतील. जिल्हानिहाय निश्चित केलेले दर ही समिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल त्याआधारे जिल्हाधिकारी दर निश्चितीसाठी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित जिल्ह्यांसाठी दर निश्चिती करतील. जिल्हाधिकारी निविदा प्रक्रिया पूर्ण करून दर निश्चिती होईपर्यंत या समितीने त्या जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या दरानुसार संबंधित प्रयोगशाळेला शुल्क आकारता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”