Monday, December 29, 2025
Home Blog Page 5723

कोरोनामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, अन्यथा – रोहीत पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  आज कोरोनाने विळखा घातला आहे. मोठमोठे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत देशाची अर्थव्यवस्था संतुलित राहणे कठीण आहे. संचारबंदीच्या काळात ती ढासळली आहेच. पण पुढचे बरेच दिवस ती व्यवस्थित मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे लोकांच्या भुकेचा प्रश्न निर्माण होतो आहे या परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा विचार गरीब करणार नाहीत. परिस्थितीमुळे नाईलाजास्तव अनेकांना शिक्षणाला मुकावे लागेल अशी शक्यता आहे. अशा परिस्थितीत या शिक्षणाला  मुकणाऱ्या मुलांना शोधून त्यांना प्रवाहात आणले पाहिजे असे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून सांगितले आहे. तसे आवाहनही त्यांनी केले आहे.

अमेरिकेसारखा देशही या साथीमुळे हादरला आहे मग आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता याचा फटका मोठं असणार आहे. परिणामी बेरोजगारी, आरोग्य, शिक्षणहेप्रश्नऐरणीवरचे आहेत.आधीच शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण आपल्याकडं खूप मोठं आहे. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे हे प्रमाण आणखी वाढण्याचा धोका आहे. यातूनच गरीब, दारीद्रेरेषेखालील लोक व अकुशल कामगार यांची संख्या प्रचंड वाढेल. त्यामुळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्या मुलांना शोधून पुन्हा मूळ प्रवाहात आणण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. कारण आज एखादं मूल शिक्षणापासून वंचित राहिलं तर त्याचा परिणाम दिसून यायला पंधरा वर्षांचा कालावधी लागतो. तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या हक्काचं शिक्षण मिळालं पाहिजे. असे आवाहन त्यांनी आपल्या फेसबुक व ट्विटर च्या अकॉउंटवरून केले आहे.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल करण्यासाठी भविष्याचा विचार करून माहिती तंत्रज्ञानाधारीत आराखडा बनवण्याची गरज आहे. जेणेकरून घरबसल्या परवडणारं ऑनलाइन शिक्षण घेण्याचा पर्यायही खुला होऊ शकेल. असा पर्याय त्यांनी सुचविला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेवटी, “शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा पाया असतो. शिक्षणाचं प्रमाण जेवढं वाढेल तेवढं आपल्याकडे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल आणि जेवढं जास्त कुशल मनुष्यबळ निर्माण होईल तेवढी जास्त वेगाने अर्थव्यवस्था प्रगती करेल. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार यांनी शिक्षण क्षेत्रातील अनुभवी मंडळी, तज्ज्ञ, संस्था चालक या सर्वांना विश्वासात घेऊन त्यादृष्टीने पावले उचलावीत.” असे आवाहन केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

केंद्राकडून देशातील ‘ही’ १२ शहरे सोडून इतर भागातील लॉकडाउन उठवला जाऊ शकतो

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून लवकरच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सरकारने नेमलेल्या दोन समित्यांनी यापूर्वीच ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढवू नये, अशी शिफारस सरकारला आहे. त्यामुळे केंद्राकडून देशातील १२ शहरे सोडून इतर ठिकाणचे निर्बंध उठवण्यात येणार असल्याचे कळते. ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, १ जूनपासून देशातील बहुतांश ठिकाणी लॉकडाऊन उठवण्यात येईल. परिस्थिती पाहून हॉटेल, मॉल्स आणि रेस्टॉरन्ट देखील १ जूनपासून उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तर हॉटस्पॉट असलेल्या शहरांतील निर्बंध आत्तापेक्षाही कठोर करण्यात येतील.

लॉकडाऊन कायम राहणाऱ्या शहरांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, इंदोर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवलूरम यांचा समावेश आहे. गुरुवारी वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर गृह मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी नव्या गाईडलाईन्स संदर्भात चर्चाही केली. ३१ मे रोजी येत्या १५ दिवसांसाठी लागू करण्यात येणारे दिशानिर्देश जाहीर केले जाऊ शकतात. रविवारी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही बाबी स्पष्ट करू शकतात.

हॉटेल्स आणि मॉल उघडण्याचाही विचार
लॉकडाऊन उठवण्यात येणाऱ्या शहारांमध्ये १ जूनपासून हॉटेल्स, मॉल आणि रेस्टॉरंटसही उघडण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे देशातील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, मुंबईसारख्या हॉटस्पॉट असलेल्या शहरांत तुर्तास हॉटेल्सचा वापर पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राहण्यासाठी केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘८०० बळी न घेता मुरलीधरनला निवृत्ती देण्याची इच्छा नव्हती’ – संगकारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने मुथय्या मुरलीधरन बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. संगकारा म्हणाला की,’ मुरलीधरनला २०१० च्या भारताविरुद्धच्या कसोटीनंतर निवृत्ती घ्यायची इच्छा होती पण मुरलीधरनने ८०० बळी न घेता कसोटी कारकीर्द संपवावी अशी संगकाराची इच्छा नव्हती.

जुलै २०१० मध्ये भारताविरुद्ध आपली शेवटची कसोटी सुरू होण्यापूर्वी संगकाराने मुरलीधरनशी केलेली चर्चा आठवली. संगकाराने सांगितले की ‘ त्यावेळी मुरली ७९२ विकेट्सवर होता. मात्र तो म्हणाला की,’ भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर मला खेळायची इच्छा नाही.’

संगकाराने खुलासा केला की, त्याने आणि निवडकर्त्यांनी मुरलीधरनला आणखी दोन सामने खेळण्याची ऑफर दिली होती. पण या अनुभवी ऑफ स्पिनरने त्याला नकार दिला. नंतर मुरलीधरन म्हणाला की, तो गॅले कसोटीतच ८०० बळी पूर्ण करेल आणि संघाला या सामन्याच्या विजयाने मालिकेची सुरूवाट करण्यास मदत करेल.’

मुरलीधरनने आपला शब्द पाळला. त्याने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ३ बळी घेत १० गडी राखून हा सामना श्रीलंकेला जिंकून दिला. मुरलीधरननेही त्यावेळी आपला ८०० बळींचा टप्पादेखील पार केला.

“८०० बळी मिळवण्यापासून तो केवळ ८ बळी दूर होता. मुरली म्हणाला की,’ भारताविरुद्धच्या मालिकेतच मला निवृत्ती घ्यायची आहे. त्यावेळी मी कर्णधार होतो.” संगकाराने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आर अश्विनशी संवाद साधताना सांगितले,’ मी निवडकर्त्यांबरोबर मीटिंग घेतली आणि म्हणालो,” पहिल्या कसोटीनंतर त्याला निवृत्ती घ्यायची आहे. मात्र हे होणार नाही. त्याने ८०० विकेट घेतल्यानंतरच त्याने निवृत्त होण्याचे सर्वांनी मान्य केले. त्यामुळे आम्ही मुरलीला मीटिंगमध्ये बोलाविले. “

संगकाराने पुढे सांगितले, “मी त्याला म्हणालो की ,’मुरली, आम्हांला माहिती आहे कि तुला आव्हानांची आवड आहे. पण जरा याचा विचार कर. जर तू जवळ गेलास आणि तुला ८०० बळी मिळू शकले नाहीत तर ते फार वाईट असेल. तू पुढील कसोटी खेळू शकतोस. नंतर जर तुला थकवा जाणवत असेल तर दुसर्‍या कसोटीत विश्रांती घेतल्यानंतर तू तिसर्‍या कसोटीसाठी परत संघात येऊ शकतोस किंवा आपण हे २ कसोटी सामने वगळू आणि पुढील मालिकेत तू परत येऊ शकतोस. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आता मोबाईल नंबर १० नव्हे ११ अंकांचा असेल; ‘हे’ आहे कारण

मुंबई । आता आपल्या हातात असलेल्या स्मार्ट फोनमधील सिम कार्डचा नंबर १० अंकांवरून लवकरच ११ अंकांचा होणार आहे. यासाठी सरकारने देखील एक पाऊल पुढे टाकलं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (TRAI) ने शुक्रवारी देशात ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरात आणण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. त्या दिशेने काम देखील सुरू करण्यात आलं आहे. ट्रायच्या सांगण्यानुसार १० अंकांच्या मोबाईल नंबरचे रूपांतर ११ अंकांमध्ये करण्यात आलं तर देशात जास्त नंबर सक्रिय करण्यास मदत होईल.

मोबाईल नंबर १० ऐवजी ११ अंकी करण्यामागचं कारण तरी काय?
जर मोबाईल नंबर १० ऐवजी ११ अंकांचा करण्यात आला तर देशात मोबाईल नंबरची उपवब्धता वाढेल. ट्रायच्या या निर्णयावर जर का शिक्कामोर्तब करण्यात आला तर मोबाईल नंबरचा सुरवातीचा अंक ९ असेल. तर एकूण १० अब्ज मोबाइल नंबर देशात तयार करण्यात सक्षम होतील. असं ट्रायकडून सांगण्यात येत आहे. नियामकाने असेही सुचवले की लँड लाईनवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी मोबाईल क्रमांकापूर्वी शून्य असणे आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त नवीन राष्ट्रीय क्रमांकाची योजना सुचविण्यात आली आहे.

याचसोबत ट्रायने डोंगलसाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक १० अंकी वरून १३ अंकांपर्यंत वाढवण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे लवकरच आपला १० अंकी मोबाइल नंबर ११ अंकांचा होणार आहे. उल्लेख विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत मोबाइल फोन ग्राहकांची वाढती संख्या पाहता ट्राय गेल्या काही वर्षांपासून या प्रस्तावावर विचार करत आहे. दरम्यान देशात लवकरच लागू करण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

चिंताजनक! राज्यात मागील २४ तासांत ११४ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई । करोनाविरोधातील लढ्यात अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलाला कोरोनाने विळखा घातला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांच्या प्रमाणात वाढ होत असून यात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. लॉकडाउन लागू झाल्यापासून राज्यातील पोलीस दलावर प्रचंड ताण आहे. पोलिसांवर सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीसह करोनाला रोखण्याचं आव्हान असताना विषाणूचा घट्ट विळखा बसला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ११४ पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा या करोना विषाणूनं बळी घेतला आहे.

राज्यातील एकूण कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या आता २,३२५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा काल, शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलीस दलातील मृत्यूची संख्या १६ झाली आहे. करोनामुक्त झालेल्या पोलिसांची एकूण संख्या ९७० एवढी आहे.

दरम्यान, राज्यात फक्त पोलिसांसाठी विशेष रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. करोनाविरोधात लढा देणाऱ्या राज्यातील पोलिसांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्देश दिले आहेत. पोलिसांसाठी विशेष रुग्णालय असावे ही सूचना योग्य वाटते. त्यादृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली आहे. तसेच यासंदर्भातील अडचणींसाठी सनियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून ही  माहिती दिली आहे. सोबत त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर अशी विभागवार जिल्ह्यातील सनियंत्रण अधिकाऱ्यांची यादीही त्यांनी जोडली आहे. यामध्ये त्यांचे फोन नंबर उपलब्ध असल्याने आता पालकांना थेट आपल्या तक्रारी या अधिकाऱ्यांना सांगता येणार आहेत. बहुतेक सनियंत्रण अधिकारी हे प्राथमिक व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी आहेत. त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील माहिती असणारे तज्ञ् अधिकारी पालकांच्या तक्रारींचे निवारण करतील अशा आशा पालकांना आहेत.

दरम्यान शाळा सुरु करण्यासंबंधीचा निर्णय अद्याप झाला नसला तरी कोरोनाचे संकट गेल्याशिवाय शाळा सुरु होण्याच्या शक्यता नाहीत. पण शासन विदयार्थ्यांच्या शिक्षणात कोणताच खंड पडू नये म्हणून इतर मार्गानी शिक्षण सुरु ठेवण्याचे प्रयत्न करीत आहे. राज्य शिक्षक परिषदेकडून शासनाला एक प्रारूप आराखडाही सादर करण्यात आला आहे. लवकरच शासन त्याबाबत निर्णय घेईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

तापाचं औषध घेणाऱ्या ग्राहकांची नोंद ठेवण्याचे मेडिकलला केंद्र सरकारचे आदेश

नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी सरकार नागरिकांना वारंवार कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देत आहेत. मात्र अनेक रुग्ण ताप, सर्दी, खोकला याकरिता मेडिकलवरून थेट औषधे घेऊन जातात. हे लक्षात घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही राज्यांतील औषधविक्रेत्यांना ताप, सर्दी, खोकला वा तत्सम औषधे विकत घेणाऱ्या रुग्णांनी दिलेली माहिती संकलित करण्याचे सूचित केले आहे. तेलंगण, आंध्र प्रदेश, बिहार तसेच ओडिशामध्ये या दृष्टीने माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्रामध्ये अशी माहिती ठेवण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही राज्यांमध्ये ताप, सर्दी किंवा अशा प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांकडून डॉक्टरकडे न जाता परस्पर तापाची औषधे दुकानांतून घेतली जातात. ताप तसेच इतर लक्षणांसाठी अनेक रुग्ण थेट औषधे घेऊन जातात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये हे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. रुग्णाने किती दिवसांपूर्वी औषध नेले होते, कोणता त्रास होत असल्यामुळे हे औषध घेण्यात आले, याचीही माहिती फार्मासिस्टना मिळत असते.

या माहितीवरून एखाद्या भागामध्ये केवळ ताप वा सर्दी, खोकल्यासाठी औषधे नेण्याचा कल अधिक आहे का, याचीही पाहणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये अद्याप असे निर्देश देण्यात आले नाहीत, असे औषध विक्रेत्यांच्या संघटना सदस्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोरोनाच्या उपचार पद्धतीमध्ये देण्यात येणाऱ्या औषधांची माहिती रोज अपडेट करावी लागते. त्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडून विचारणा केली जाते. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन तसेच सर्दी-खोकला-ताप या आजारांसह इतर श्वसनविकारासाठी देण्यात येणाऱ्या औषधांच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती दैनदिन स्वरूपात देण्यात येते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अमिरिकेने तोडले WHO सोबतचे सर्व संबंध; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

वॉशिंग्टन । जागतिक आरोग्य संघटनेवर(WHO) चीनचं संपूर्णपणे नियंत्रण आहे, असा आरोप करत, या संघटनेसोबत अमेरिकेचे असलेले सर्व संबंध तोडत आहोत, अशी घोषणा अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. WHO कोरोना विषाणूला सुरुवातीच्या स्तरावरच रोखण्यात अपयशी ठरली आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी संघटनेतून बाहेर पडताना केला केला. कोरोना महामारीवरून याआधीही ट्रम्प यांनी संघटनेवर अनेक आरोप केले आहेत.

जगभरात कोरोना विषाणूमुळं झालेल्या मृत्यूंना जागतिक आरोग्य संघटना आणि चीनला दोषी ठरवलं आहे. वर्षाला केवळ ४० दशलक्ष डॉलर इतकी मदत देत असतानाही WHO वर चीनचं संपूर्णपणे नियंत्रण आहे. दुसरीकडे अमेरिका त्या तुलनेत वर्षाला ४५ कोटी डॉलरची मदत देत आहे. तरीही संघटना आवश्यक सुधारणा करण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळं आज आम्ही या संघटनेसोबत असलेले संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेत आहोत, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेचा रोखण्यात आलेला निधी आता जगातील इतर आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे, असं सांगतानाच, ट्रम्प यांनी चीनविरोधात घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांची यावेळी घोषणा केली. कोरोना चीनचा वुहान व्हायरस असल्याचं यावेळी ट्रम्प म्हणाले. चीननं हा वुहान व्हायरस जगभरात फैलावला. त्यामुळं जागतिक महामारीचं संकट कोसळलं. या व्हायरसनं एक लाखाहून अधिक अमेरिकी नागरिकांचा बळी घेतला. संपूर्ण जगभरात लाखो नागरिकांचा या व्हायरसनं जीव घेतला, असं ट्रम्प म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सांगली जिल्ह्यात मध्य रात्री नवीन ८ कोरोनाग्रस्त; नेर्ली येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्ह्यातील जनतेला शुक्रवार हा दिलासादायक गेला असतानाच मध्य रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. मुंबई आणि परिसरातून आलेल्या तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. कडेगाव तालुक्यातील नेर्ली इथल्या ५७ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा आज पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात सद्य स्थितीत ५१ कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असून जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हि आता १०९ वर जाऊन पोहोचली आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पर राज्यासह अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रवासी दाखल होत आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरण्याची लक्षणे आढळून असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मुंबईतून आलेल्या प्रवाशांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी एक ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र मध्य रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई आणि परिसरतुन आलेल्या तब्बल आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा हादरून गेला आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी हि गेल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. जत तालुक्यातील औंढी येथील ५५ वर्षाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव आला आहे .सदर व्यक्ती १६ मे रोजी मुंबईहून आलेली आहे . खानापूर तालुक्यातील कारंजे येथील ३० वर्षिय पुरुष कोरोणा बाधित झाला असून सदर व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली आहे. नेर्ली येथील कोरोणा पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा २८ वर्षिय मुलगाही कोरोणा बाधित झाला आहे. शिराळा तालुक्यातील रेड येथील पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा निकटवर्तीय २० वर्षीय तरुण नातेवाईक कोरोणा बाधित झाला आहे. शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील कोरोणा बाधित व्यक्तीची निकटवर्तीय ५२ वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी येथील २८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित झाला आहे. कडेगाव तालुक्यातील आंबेगाव येथील कोरोना बाधित झालेल्या रुग्णाची बारा वर्षीय मुलगी तसेच नऊ वर्षीय मुलगा ही कोरोना बाधित झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

तसेच कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील 57 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना मधुमेह होता. सदर व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली होती. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज आखेर मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

Sangli

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

पुणे । राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर जून महिन्यात मुलांच्या शाळा सुरु होणार का? त्यांचे वर्ग कसे भरणार? असे बरेच प्रश्न विद्यार्थी, पालक, शिक्षक याना पडले होते. या विषयावर सातत्याने चर्चा सुरु होत्या. आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत. १ जुलैपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा विचार करी आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

शाळा कधी सुरु होणार? या संदर्भात नगरसेविका अश्विनी कदम यांनी अजित पवार यांना संपर्क केला असता त्यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहून जून महिन्यात शाळा सुरु केल्या जाणार नाहीत अशी चर्चा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. १ जुलैपासून शाळा सूर करण्याचा विचार आहे मात्र अद्याप निर्णय झाला नाही. जरी १ जुलै ला शाळा सुरु झाल्या तरी पहिले काही दिवस बुडण्याची शक्यता आहे. म्हणून मुलांच्या ख्रिसमस, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी करून दिवस भरून काढण्याची चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान शाळा सुरु करण्यावर चर्चा झाल्या आहेत. अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. विविध पातळ्यांवर त्यांचे काम सुरु आहे. मात्र जूनमध्ये शाळा सुरु झाल्यातर आम्ही मुलांना शाळेत कसे पाठवायचे हा प्रश्न पालकापुढे होता. त्याचे निराकरण झाले असून १५ जुलैपर्यंतही शाळा सुरु होतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.