Monday, December 29, 2025
Home Blog Page 5722

लाॅकडाउन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता – रोहित पवार

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे देशात मागील दोन महिन्यांपासून देशात संचारबंदी राबविण्यात आली आहे. यादरम्यान उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रमुख शहरामध्ये संचारबंदी आहे. पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत प्रभावी घसरण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारसोबत राज्य सरकार संचारबंदीचे नियम शिथिल करण्यावर विचार करत आहेत. हळूहळू ते शिथिल केलेही जात आहेत. मात्र नियम शिथिल केल्यावर रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आपण पाहिला आहे. संचारबंदी उठवली तर रुग्णसंख्या लक्षणीय संख्येत वाढेल अशी भीती राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. पण यातून सुवर्णमध्य काढला पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.

आपल्या ट्विटर अकॉउंट वरून पवार यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, “काही विकसित देशांमध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतर केसेसचं प्रमाण वाढलं. त्याप्रमाणे आपल्याकडेही लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर केसेस वाढल्या आहेत. लॉक डाऊन उठवल्यानंतर तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याला सामोरं जाण्याचीही तयारी आपल्याला ठेवावी लागेल.” देशातील पाचव्या टप्प्यातील संचारबंदी आता सुरु होते आहे. त्यामुळे त्यांनी लोकांना सावधगिरीने वावरण्यासाठी असे ट्विट केले आहे. अर्थव्यवस्था हा देखील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे पुढे संचारबंदी चालू ठेवणे हाही फारसा उत्तम पर्याय नाही आहे. त्यामुळे नियम शिथिल करण्याची गरज आहे.

 

याबरोबरच कोरोनाचा धोका असणाऱ्या लोकांची काळजी घेण्याबाबत ते म्हणाले, “देशांत सर्वाधिक टेस्ट महाराष्ट्रात होत असल्या तरी येत्या काळात त्यात वाढ करावी लागेल. आरोग्याच्या काळजीसोबतच अर्थकारणाचाही विचार करुन दोन्हींचा सुवर्णमध्य साधावा लागेल. शिवाय ५५ वर्षांपुढील नागरिक, गर्भवती, लहान मुलं व आजारी व्यक्ती यांना गर्दीपासून दूर ठेवावं लागेल.” भविष्यात कोरोनाशी सर्वाना घराबाहेर पडून, सामाजिक अलगावचे सर्व नियम पाळून लढा द्यावा लागणार आहे. पण यासोबत काळजी आणि सावधगिरी बाळगणे तितकेच गरजेचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

शाळेच्या ‘फी’ संबंधी तक्रार करायची आहे? ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क

मुंबई । लॉकडाऊन काळात तुमच्या पाल्यांची शाळा जर शुल्कासाठी तुमच्यावर दबाव आणत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. शिक्षण विभागाने यासाठी एक यादीच जाहीर केली आहे आणि नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. युवा सेनेने शिक्षण विभागाकडे पालकांसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी केली होती. जेणेकरून या हेल्पलाइनवर पालक शुल्काविषयीच्या तक्रारी नोंदवू शकतील.

शाळा फी भरण्यासाठी दबाव आणत असेल किंवा शुल्कवाढ करत असेल तर कोणाकडे तक्रार करायची हे पालकांना कळत नव्हते. लॉकडाऊन असल्यामुळे शिक्षण विभागाची कार्यालयेदेखील बंद आहेत. म्हणूनच शुक्रवारी शिक्षण विभागाने एक यादी जाहीर केली यात राज्यभरातील ३७ जिल्ह्यांतील ८७ नोडल अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. शुल्कासंबंधी कोणतीही तक्रार या नोडल अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे. ही यादी लवकरच शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शाळेच्या ‘फी’संबंधी तक्रार करण्यासाठी खालील क्रमांकावर साधा संपर्क

मुंबई 

maharashtra times

पुणे, कोल्हापूर 

maharashtra times

औरंगाबाद, लातूर

maharashtra times

कोल्हापूर, नाशिक

maharashtra times

अमरावती

maharashtra times

नागपूर

maharashtra times

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशभरात मागील २४ तासात ७९६४ जणांना कोरोनाची बाधा

नवी दिल्ली । लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत तब्बल ७ हजार ९६४ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. शिवाय या धोकादायक विषाणूने २६५ रुग्णांचा बळी घेतला आहे. देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी आता १ लाख ७३ हजार ७६३वर पोहोचली आहे. त्यापैकी ८६ हजार ४२२ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून आतापर्यंत देशात ४ हजार ९७१ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ८२ हजार ३७० रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

शुक्रवारी देशातील मृतांची संख्या ४ हजार ७०६ ऐवढी होती. आज ती संख्या ४ हजार ९७१ पोहोचली आहे. त्यामुळे मृतांच्या आकडेवारीत भारताने आता चीनला मागे टाकले असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. रविवारी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही बाबी स्पष्ट करू शकतात अशी माहिती सुत्रांकडून देण्यात येत आहे.पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे या शहरांचा समावेश असणार आहे. शिवाय ‘इकोनॉमिक टाईम्स’नं दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागांची लॉकडाऊनमधून सुटका होऊ शकते त्या भागांमध्ये हॉटेल्स, मॉल्स आणि रेस्टॉरन्ट १ जून पासून उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

हसावं कि रडावं! माकडाने पळवले कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने, चावून फोडले देखील 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बऱ्याचदा काही ठिकाणी माकडांनी लोकांच्या हातातून खाण्याच्या वस्तू हिसकावून नेल्याच्या घटना ऐकल्या आहेत. बघितल्याही आहेत. त्यामुळे माकड दिसले की आपल्या हातातल्या वस्तू लोक लपवून ठेवतात. पूर्वी पाठ्यपुस्तकातील टोपीवाल्याची गोष्ट तर सर्वज्ञात आहे. त्यामुळे माकड कधी काय घेऊन जाईल सांगता येत नाही. आणि कधी कुणासोबत काय होईल हे ही सांगता येत नाही. पण उत्तर प्रतोद मध्ये एका माकडाने चक्क तीन कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुनेच हिसकावून पळवून नेले. ते नुसतेच पळवले नाहीत तर चावून फोडल्याची घटना घडली आहे. आधीच हा रोग संसर्गजन्य आहे त्यात तो झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठ वैद्यकीय महाविद्यालयात एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ विलगीकरण कक्षात ठेवलेल्या तीन कोरोना रुग्णांचे रक्ताचे नमुने परीक्षा नळीतून प्रयोगशाळेकडे निघाला असता, मध्येच माकडांनी हा उच्छाद घातला असल्याची माहिती मिळाली आहे. माकडांनी त्या तंत्रज्ञाच्या हातातून रुग्णांचे रक्ताचे नमुने असणाऱ्या परीक्षा नळ्या हिसकावून घेतल्या आणि धूम ठोकली. मग ते माकड झाडावर जाऊन बसले आणि इतर माकडांसोबत त्या परीक्षा नळ्या दातांनी चावून फोडल्या. याचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोक घाबरून गेले. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. के. गर्ग यांनी हे नमुने रक्ताचे होते, आणि कोरोनाचा संसर्ग रक्तापासून पसरत नाही. त्यामुळे लोकांनी घाबरू नये असे आवाहन केले आहे. तसेच अदयाप माकडांपासून संसर्ग झाल्याचा काही ठोस आधार मिळाला नसल्याने लोकांनी न घाबरता संयम ठेवावा असेही ते म्हणाले.

दरम्यान, हा इतका निष्काळजीपणा कसा घडला याबाबत चौकशी करण्याचे आदेश पप्रशासनाने दिले आहेत. ज्यांचे रक्ताचे नमुने होते, त्या कोरोनाबाधित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. रोज तपासणीसाठी त्यांचे रक्त घेतले जाते. या घटनेनंतर त्यांचे पुन्हा रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.अशी माहिती डॉ गर्ग यांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयाने माकडांच्या उच्छादाबद्दल अनेकदा वन विभागाकडे तक्रार दिली आहे. शेकडोच्या संख्येने आलेली माकडांची टोळी दरराेज महाविद्यालयात उच्छाद मांडते आहे. पण वन विभागाने कारवाई केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टला राज्य सरकारची मान्यता

पुणे । महापालिकेच्या माध्यमातून कैलासवासी मा. पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. या महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन व्हावे अशी संकल्पना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ते स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मांडली होती. त्यांनी विविध पातळ्यांवर त्याचा पाठपुरावाही केला होता. आता या संकल्पनेला राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे. त्यासंदर्भात झालेल्या बैठकीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी या महाविद्यालयाला राज्य सरकारच्या मान्यतेनंतर पुढील कारवाई लवकरच सुरु करण्यात येईल असे सांगितले आहे. ट्रस्ट स्थापन करण्याच्या दृष्टीने महापालिकेत बैठक घेण्यात आली. आणि पुढील कार्यवाही वेगाने व्हावी यासाठी सूचना देण्यात आल्या. महाविद्यालयाच्या संदर्भातील सर्व विभागांच्या तांत्रिक बाजूंचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यायोगे संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

 

या बैठकीसाठी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, राजेंद्र मुठे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्यप्रमुख डॉ रामचंद्र हंकारे, भवन रचना मुख्य अभियंता लंके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती त्यांनी ट्विटमधून दिली आहे. मोहोळ यांनी महाविद्यालयाला मान्यता व निधी उपलब्ध करून दिला होता. डॉ नायडू सांसर्गिक रुग्णालय परिसर भागात १० एकर परिसरात हे रुग्णालय बांधले जाणार आहे. गेल्यावर्षी मुख्यसभेत २८ ऑगस्ट ला महाविद्यालयाला मान्यता मिळाली होती. काही तांत्रिक मान्यता घेऊन पुढच्या वर्षी जून मध्ये महाविद्यालय सुरु करण्याचा मानस असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

माझा मृत्यू झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबादच्या कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावई हर्षवर्धन जाधव केलेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. मला त्रास दिल्यास मी आत्महत्या कारेन अशी धमकी त्यांनी दानवे यांना दिली आहे. प्रापर्टीवरून वाद झाल्याचे या व्हिडिओतून वरकरणी दिसून येत आहे. या व्हिडिओतून हर्षवर्धन जाधव यांच्यावर काही आरोपही केले आहेत. मला तुमच्या मुलीशी संसार करायचा नाही असेही ते म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना हिचे पती हर्षवर्धन जाधव यांनी फेसबुकवरून एक व्हिडीओ सर्वत्र शेअर केला आहे. यामध्ये प्रॉपर्टीवरून त्यांना त्रास दिला जात असल्याचे वरकरणी दिसून येते आहे. मी हर्षवर्धन बंगला तुमच्या मुलीला देतो. पण जो प्लॉट आहे तो माझ्या वडिलांचा आहे. माझ्या आईचा आहे आणि तो माझ्या नावावर आहे जो मी देणार नाही असे ते म्हणाले आहेत. तुम्ही प्रापर्टीसाठी काहीही करू शकाल असेही ते म्हणतात. ते म्हणाले आहेत, “२०,००० कोटींची प्रॉपर्टी आहे पण १० कोटी तुम्ही सोडणार नाही मला माहित आहे.” मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर तुमचे रेकॉर्डिंग सर्वत्र व्हायरल होईल असा दमही त्यांनी दिला आहे.

हर्षवर्धन यांनी मी आता कोचीन ला जात आहे मला काही त्रास दिला तर मी सायनाईडच्या पिल्स माझ्यासोबत ठेवल्या आहेत अशी धमकी दिली आहे. तसेच माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर तुम्ही जबाबदार असाल असा इशाराही दिला. तुम्ही काहीही कराल कारण तुम्ही गुंड प्रवृत्तीचेच आहात असा आरोप त्यांनी केला आहे. तुमच्या मुलीला काही राजकीय मदत लागली तर मी करेन मात्र इथून पुढे तिच्याशी संसार मी करू शकणार नाही असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Lockdown 5.0 | पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांना मिळणार सूट? 

वृत्तसंस्था । देशातील चौथ्या टप्प्यातील संचारबंदी ३१ मे  रोजी संपत आहे. यापुढे संचारबंदी उठवली जाणार नसली तरी काही नियम शिथिल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार मुख्यत्वे देशातील १३ शहरांवर जिथे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून आहे. केंद्र सरकारला संचारबंदीमुळे घसरलेल्या अर्थव्यववस्थेला पुन्हा उभी करण्यासाठी काही राज्यांनी पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगांना शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या सूचनांचा विचार करते आहे.

केरळ, गोवा, पॉंडिचेरी यासारख्या काही राज्य आई संघराज्याची अर्थव्यवस्था ही पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच उत्तर-पूर्व काही भागातील काही राज्ये ही पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहेत. मात्र अद्याप या उद्योगांना संचारबंदीच्या नियमांमधून शिथिलता मिळाली नाही आहे. केंद्र सरकार संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारंटस, बीच सुरु करण्याचा विचार करते आहे. राज्यांमधील आर्थिक हालचाली सुरु करण्याचा सरकार विचार करते आहे. या राज्यांनी सरकारकडे या उद्योगांवरील नियम शिथिल करून सर्व काळजी घेऊन पुन्हा हे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. पर्यटकांना सामाजिक विलगीकरण बंधनकारक करून, त्यांच्या संख्येवर मर्यादा घालून तसेच सामाजिक अलगावचे सर्व नियम पाळून पुन्हा व्यवसाय सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती.

 

या राज्यांनी ते त्यांची आसनक्षमता कमी (५०%) करून हॉटेल सुरु करू शकतील असे सांगितले आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे सह्रतिक तापमान तपासले जाईल व आरोग्य सेतू ऍप सर्वाना बंधनकारक केले जाईल असे त्यांनी सांगितले आहे. या माध्यमातून अर्थव्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल असेही या राज्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला सकारात्मक रित्या पुढे घेऊन जाण्यासाठी पुढील विचार करीत आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर बोलल्याची माहिती आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबाबत वरीलप्रमाणे चर्चा केली आहे. तर गोव्यातील काही जीमही पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. दरम्यान जून मध्ये बेंगलोर मधील हॉटेल सुरु होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

छत्तीसगड मधील सुरक्षा दलांच्या कॅम्प मध्ये जवानाकडून आपल्याच साथीदारांवर गोळीबार; २ जवानांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील अमदाई व्हॅली कॅम्पमध्ये छत्तीसगड सशस्त्र दलाच्या जवानांमध्ये वाद झाला. या वेळी एका जवानाने गोळीबार केला. या घटनेत सीएएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. आमदाई व्हॅली कॅम्पमध्ये सैनिकांमध्ये भांडणे झाली. यावेळी झालेल्या हाणामारीत एका जवानानं आपल्या साथीदारांवर गोळीबार केला. सीएएफ ९ या बटालियनच्या जवानाने गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे.

या गोळीबारात दोन जवान ठार झालेत तर एक जवान जखमी झाला आहे. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. हे चोथेडोंगर पोलिस ठाण्याचे प्रकरण आहे. गोळीबार करणाऱ्या या आरोपी जवानचे नाव घनश्याम कुमेती असल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी या गोळीबारात रामेश्वर साहू आणि बिन्तेश्वर साहनी हे दोघे जवान ठार झालेत तर लच्छू राम जखमी झाले आहेत. या जखमी जवानला रायपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चोथेडोंगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी या आरोपी जवानला अटक केली आहे. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी या प्रकरणाची खातरजमा केली आहे. सीएफ -९ या बटालियन डी कंपनीच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी या आरोपी जवानने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला.

या घटनेआधीही सुमारे ६ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना ओरछाच्या काडेनर येथील आयटीबीपीच्या छावणीत घडली होती. त्यावेळीही एका जवानाने त्याच्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात ६ सैनिक ठार झाले तर गोळीबार केल्यावर आरोपी जवानने स्वत:वरही गोळी झडून घेतली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अभिमानास्पद! मेजर सुमन गवानी बनली UN कडून सन्मानित होणारी पहिली आर्मी अधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सैन्यात मेजर असलेल्या सुमन गवानी यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यूएन) वतीने प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यूएनचे महासंचालक अँटोनिया गुतारेशे यांनी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मेजर सुमन यांना हा पुरस्कार इंटरनेशनल डे ऑफ यूनाइटेड नेशंस पीसकीपर्स निमित्त देण्यात आला. लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

२०१८ ते २०१९ दरम्यान सुदानमध्ये पोस्टिंग
मेजर सुमन गवाणी यांनी दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अभियानात (यूएनएमआयएस) काम केले आहे. सन २०१९ पर्यंत तिला येथे पोस्ट केले गेले होते. शुक्रवारी न्यूयॉर्कमधील यूएनच्या मुख्यालयात आयोजित एका ऑनलाइन समारंभात या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. मेजर सुमन व्यतिरिक्त ब्राझिलियन नेव्ही अधिकारी कार्ला मॉन्टरिओ डी कॅस्ट्रो अराझो यांनाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यूएनच्या वतीने हा सन्मान मिळाल्यानंतर मेजर सुमन म्हणाल्या, ‘ काम, पद किंवा रँक काहीही असो, मात्र शांतिदूत म्हणून आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या कामात महिला आणि पुरुष या सर्वांचे विचार आणि दृष्टीकोन समानपणे समाविष्ट करा. ‘ मेजर सुमन नोव्हेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ पर्यंत युएनएमआयएस मध्ये सैन्य निरीक्षक म्हणून तैनात होत्या.

मेजर सुमन यांना हा सन्मान का देण्यात आला
मिशनमध्ये लष्करी निरीक्षकांसह लैंगिक हिंसाचाराविरूद्धच्या मोहिमेतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा गौरव झाला आहे. यासह, लैंगिक समस्यांकडे लक्ष देण्याची त्यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. पहिल्यांदाच भारतीय सैन्याच्या एखाद्या अधिकाऱ्याला यूएनच्या या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे की, “या अधिकाऱ्याने लिंग संतुलन राखण्यासाठी लष्करी गस्तीत सहभागी होण्यास प्रोत्साहित केले; फील्‍डवरील कठीण परिस्थितीतही ती आपल्या कर्तव्यापासून मागे हटली नाही,”. सैन्याच्या वतीने असे सांगितले जात आहे की,’ मेजर सुमनची निवड नैरोबीतील यूएनच्या वेगवेगळ्या मंचांवर लैंगिक हिंसाचाराशी संबंधित ट्रेनिंग कार्यक्रमांसाठी झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ममता दीदींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमध्ये १ जूनपासून धार्मिक स्थळं होणार खुली

कोलकाता । येत्या 31 मे रोजी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, देशातील कोरोनाग्रस्तांचे वाढत प्रमाण पाहता लॉकडाऊन आणखी काही आठवडे वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा वेळी पश्चिम बंगालमध्ये 1 जूनपासून सर्व धार्मिक स्थळं खुली केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

त्याशिवाय पश्चिम बंगालमध्ये 8 जूनपासून सर्व सरकारी आणि खासगी ऑफिसेस खुली करण्यात येणार आहेत. 1 जूनपासून चहा आणि जूट कंपन्या 100 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये अनेक नियम शिथिल केले जाणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींशी लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्याआधी अमित शाह यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 मेनंतर लॉकडाऊन 2 आठवड्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”