Monday, December 29, 2025
Home Blog Page 5724

बापरे! परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत तालुक्यात ही शिरकाव !

परभणी प्रतीनिधी । गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यात आज सकाळी व सायंकाळी आलेल्या स्वॅब तपासणी अहवालापैकी सात जणांना कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना मुक्त असलेल्या तालुक्या पैकी मानवत तालुक्यात ही त्याचा शिरकाव झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील पाठवण्यात आलेल्या ३७ अहवाला पैकी जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे या गावातील वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता .आज सायंकाळी ८७ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून ,त्यामध्ये पूर्णा तालुक्यात २ ,गंगाखेड तालुक्यात १, सेलू तालुक्यात एक मध्ये २ तर आतापर्यंत कोरोना संसर्गा पासून सुरक्षित असलेल्या तालुक्यांपैकी असणाऱ्या मानवत तालुक्यातही ही कोरोणा रुग्ण सापडल्याने जिल्हावाशीयांचे टेंशन वाढले आहे.

दरम्यान परभणी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज आलेल्या पॉझिटिव्ह अहवालानंतर ७४ वर गेली आहे. असे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कापूस विकेना! कर्ज कसे फेडणार? विवंचनेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली आहे .घरचा कापूस ऑनलाइन नोंदणी करूनही घरातच पडून आहे, बँकेचे कर्ज डोक्यावर आहे, ते कसं फेडणार या चिंतेत परभणीत एका तरुण शेतकऱ्यांने मृत्यूला कवटाळल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे.

जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सावळी गावांमध्ये राहणारा तरुण शेतकरी राजेभाऊ ज्ञानोबा काळे (वय २५) याने टोकाची भूमिका घेत जीवन यात्रा संपवल्याची घटना शुक्रवार २९मे रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. मयत शेतकऱ्याच्या नावे सावळी गावातील गट क्रमांक पंधरा मध्ये ५६ गुंठे एवढी शेती असून मोठ्या भावाच्या नावे दहा एकर शेती आहे. या सर्व शेतातील कापूस विक्री विना घरात पडून आहे. शासकीय खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सदरील शेतकऱ्यांनी केली होती .दरम्यान खरीप हंगाम अगदी तोंडावर आलाय .घरात कापूस पडून आहे. डोक्यावर बँकेचे कर्ज आता बी भरणं कसे करायचे? मागील काही दिवसापासून याच विवंचनेत हा शेतकरी असल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी मयत शेतकऱ्याने त्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे .परंतु कापूस खरेदी केंद्रावर घेण्यात येणाऱ्या वाहनावरून ,ही खरेदी आणखी किती महिने चालणार? असा प्रश्न तयार झाला आहे .त्यात पावसाळा एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या मोसमात कापूस खरेदी होणार की नाही ?अशी चिंता सर्व शेतकऱ्यांना लागून राहिले आहे . दिरंगाईने होणाऱ्या कापूस खरेदी मुळेच आज एका शेतकऱ्यांचा बळी गेला !अशी चर्चा जिल्ह्यात होताना दिसून येत आहे. दरम्यान या तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्ये प्रकरणी मानवत पोलिस स्टेशनला आकस्मित मुत्युची नोंद करण्यात आलीयं .पुढील तपास पोलिस नाईक, एस.एन.आबुज करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य रेषेखाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे पंतप्रधान ली किंग यांनी गुरुवारी सांगितले की,’ त्यांच्या देशात ६० दशलक्षाहून अधिक गरीब लोक असून त्यांचे मासिक उत्पन्न हे फक्त एक हजार युआन म्हणजेच सुमारे १४० डॉलर्स इतके आहे आहे. ते म्हणाले की,’ कोरोना विषाणूच्या साथीने या लोकांची अवस्था अधिकच खराब झाली आहे. वार्षिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना ली म्हणाले, ‘चीनचे दरडोई उत्पन्न ३०,००० युआन किंवा ४,१९३ डॉलर आहे. मात्र, यापैकी ६०० दशलक्षाहून अधिक लोक असे आहेत की, ज्यांचे मासिक सरासरी उत्पन्न हे केवळ एक हजार युआन किंवा सुमारे १४० डॉलर्स आहे. हे उत्पन्न चीनमधील शहरात घर भाड्याने घेण्यासाठी देखील पुरेसे नाही. “

ते म्हणाले की कोविड -१९ च्या परिणामामुळे अनेक कुटुंबांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ली म्हणाले की, चीन आता दारिद्र्य निर्मूलन करण्याच्या कठीण कार्याला आव्हान देत आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या आधी, चीनमधील सुमारे पाच दशलक्ष लोक अधिकृत दारिद्र्य रेषेखालील जगत होते. या साथीच्या परिणामामुळे बर्‍याच लोका आता दारिद्र्य रेषेच्या खाली खेचले गेले आहे. ली म्हणाले, “यंदा आम्ही निर्धारित वेळेत दारिद्र्य करण्याचा संकल्प केला आहे.

कॉम्रेड झी चिनफिंग यांच्यासमवेत चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या (सीपीसी) केंद्रीय समितीने संपूर्ण चिनी समाजासाठी उचललेले हे एक ठोस पाऊल आहे. सरकारने सांगितले की, ” यासाठी निर्वाह भत्ता आणि बेरोजगारीच्या सुविधेच्या व्याप्तीचा विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

संभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल 

सांगली प्रतिनिधी । देश कोरोनासारख्या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदीच्या नियमांचे पाल केले जात आहे. संक्रमण साखळी तोडून लवकरात लवकर सामान्य माणसाला त्यांचं दैनंदिन जीवन जगता यावं म्हणून सरकार काटेकोरपणे काही गोष्टी पाळत आहे. मात्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी या संचारबंदीचे उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातून बाहेर जात असताना परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असतानाही परवानगी न घेता सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भिडे यांनी प्रवास केला आहे. त्यांच्यावर या कारणांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे हे त्यांच्या वक्तव्यामुळे बऱ्याचदा अडचणीत आले आहेत. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलं होतात, देशाने जगाला बुद्ध दिला पण बुद्ध काहीच उपयोगाचा नाही, मनु हा संत तुकारामापेक्षाही श्रेष्ठ होता अशा त्यांच्या वक्तव्यामुळे ते बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये ते गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करायचे पण तिथे मतभेद झाल्यावर संघाशीच अनुरूप असणारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेची त्यांनी स्थापना केली होती. मिरज दंगलीमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड हे उपक्रम त्यांनीच सुरु केले आहेत.

परवानगीशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास केला म्हणून भारतीय दंड कलम १८८ अन्वये त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगलीतून कोल्हापूरला परवानगीशिवाय गेले. त्यांनी परवानगी न घेता प्रवास केल्याबाबद्दल त्यांच्यावर कोल्हापूरच्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. आपल्या वादातीत विधानांमुळे ते कायम वादात आणि चर्चेत अडकलेले असतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ३२ नवीन रुग्ण सापडले आहेत. तसेच कारी ता. सातारा येथील ५४ वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा आज मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आत्तापर्यंत जिल्ह्यात 454 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 143 रुग्ण बरे झाले आहेत. तर 295 रुग्णांवर उपचार सुरु असून 16 जणांचा मृत्यु झालेला आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारे चिंचणी ता. खटाव येथील 5 व पळशी ता. खंडाळा येथील 1 तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणाऱ्या पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील 53 वर्षीय महिला, ताम्हीणे येथील 25 वर्षीय महिला असे एकूण 8 जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. तसेच रात्री उशिरा पुन्हा २४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या २४ जणांबाबत अधिक माहिती अद्याप भेटू शकलेली नाही.

86 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 257 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्ह्यातील 86 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 24, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 26, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 93, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 42, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 30 व शिरवळ येथील 42 असे एकूण 257 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा सर्व प्रसिद्ध शो म्हणजे कौन बनेगा करोडपती होय. गेल्या कित्येक वर्षात या शोची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या शोची आणखी एक खासियत म्हणजे तळागाळातून आलेला एखादा माणूस आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडो रुपये जिंकलेल्या अनेकांची बरीच उदाहरणे या शोमधून पुढे आली आहेत.  अशाच एका विजेत्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. १९ वर्षांपूर्वी एका मुलाने कौन बनेगा करोडपती ज्युनिअर शो वयाच्या १४ व्या वर्षी जिंकला होता. आज तो मुलगा एस पी आहे आणि सेवा बजावत आहे.

१९ वर्षांपूर्वी त्याने १ कोटी रुपये जिंकले होते. २००१ मध्ये वयाच्या १४ वर्षी रवी मोहन या मुलाने आपल्या बुद्धीच्या जोरावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन कौन बनेगा करोडपती ज्युनिअर चा शो जिंकला होता. यानंतर यूपीएससी ची परीक्षा देऊन हा मुलगा आयपीएस अधिकारी झाला आहे. आता हा मुलगा रविमोहन सैनी पोरबंदर येथे एस पी म्हणून कार्यरत आहे. २०१४ मध्ये तो आयपीएस अधिकारी झाला. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन त्याने हा शो जिंकला होता. तेव्हा तो १४ वर्षाचा होता. आता तो ३३ वर्षाचा आहे.

 

रवी यांनी एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतले आहे. २०१४ तो गुजरातचा आयपीएस झाला. पोरबंदर येथे एसपी होण्याआधी तो राजकोट येथे डीसीपी होता. रविचे वडील नौसेनेत होते. बुद्धिमतेच्या जोरावर या शोमध्ये अनेकांनी पैसे जिंकले आहेत. अनेक सकारात्मक उदाहरणे या शोमधून समोर आली आहेत. रवी मोहन सैनीही त्यापैकीच एक होय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे.

ही महिला मुंबईहून निंबळक या नगर तालुक्यातील गावी आली होती.  २५ मे रोजी तिची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यामुळे तिच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. तिचे सिझेरियन करण्यात आले होते. यानंतर त्या जुळ्या मुलांची आणि तिची अशी तिघांचीही प्रकृती उत्तम होती. मात्र अचानक तब्येत बिघडल्यामुळे या महिलेला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

डिलिव्हरी नंतर काही वेळाने अचानक या महिलेची प्रकृती ढासळत गेली. या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती, असे नोडल अधिकारी डॉ बापूसाहेब गाढे यांनी सांगितले आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या रोज वाढत असून आज दिवसभरात ९ रुग्ण आढळले आहे. रुग्णांमध्ये मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११२ झाली असून ५८ रन पूर्णतः बरे झाले आहेत. १० जणांचा मृत्यू झाला आहे. ४६ जण अद्याप उपचार घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

या १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होते आहे. काही राज्यांमध्ये संख्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढतेच आहे. आसाममध्ये देखील गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आहे. देशातील एकूण १३ शहरामध्ये ७०% कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी या १३ शहरांवर केंद्र सरकारने आपले लक्ष एकवटले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी या १३ जिल्ह्यातील महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे. ते या सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलले आहेत.

या १३ शहरामध्ये मुंबई, दिल्ली/नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता/हावडा, पुणे, हैद्राबाद, ठाणे, इंदूर, जयपूर, जोधपूर, चेंगलपट्ट (तामिळनाडू), थिरुवल्लूर (तामिळनाडू) या शहरांचा समावेश आहे. या सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या शहरांसाठी सरकरने नियमावली जाहीर केली आहे. या शहरांमध्ये निश्चितता दर, मृत्यू दर, दुप्पट दर, तसेच प्रति १० लाख लोकांमागे चाचणी दर असे नियोजन या भागांसाठी करण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोन केसेसचे मॅपिंग आणि संपर्क याद्वारे निश्चित केले जावे असे सांगण्यात आले आहे. यामुळे एक भाग निश्चित करून तिथे काटेकोर संचारबंदी पाळता येईल असे केंद्र सरकारचे मत आहे.

यापुढे संचारबंदी वाढवायची की नाही यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अमित शहा यांनी सर्व राज्यांशी चर्चा केली आहे. जरी संचारबंदी वाढविण्याचा निर्णय झाला तरी मोठ्या प्रमाणात नियम शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. सरकार विशेषतः वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या शहरावर लक्ष ठेवून असेल. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता यांचा समावेश आहे.  शाळा, महाविद्यालये बंद राहतील. आंतरराष्ट्रीय विमानांवरही बंदी असेल. धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपविण्यात आला आहे. सलून उघडले असले तरी जीम आणि मॉल उघडण्याचाही निर्णय राज्य सरकरवर सोपविण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

फायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच? फैसला उद्या..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयीन परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. तशी माहितीही देण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या परीक्षा रद्द कराव्यात असा विचार सुरु आहे. अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मेच्या दरम्यान होणार होत्या. पण त्याही अद्याप सुरु झालेल्या नाहीत. या परिस्थितीत त्या परीक्षा होण्याची शक्यता खूप कमी आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेचे नेमके काय करायचे यासंदर्भात उद्या दुपारी १२:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार असल्याचे उदय सामंत यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितले आहे.

गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. परीक्षा घ्यायच्या कि नाही यासंदर्भात शासन विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करत आहे. पुणे व सोलापूर विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा घेता येतील असेही मागच्या चर्चेत सांगितले होते. मात्र इतर ११ कुलगुरूंनी घेता येणार नाहीत अशी माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी या परीक्षा रद्दव्हाव्यात आणि इथपर्यंत विद्यार्थी अभ्यास करूनच पोहोचलेले असतात. तर त्यावरूनच त्यांचे मूल्यांकन केले जावे अशी मागणी त्यांच्या ट्विटद्वारे केली आहे. कोरोनाचा सर्वत्र फैलाव पाहता आणि राज्यातील तीव्रता लक्षात घेता परीक्षा घेता येण्याची शक्यता खूपच कमी आहे.

 

उदय सामंत यांच्या या ट्विटवर विद्यार्थ्यांनी सध्या परीक्षा देण्याची मानसिकता नसल्याचे म्हंटले आहे. ही  वेळ कोरोनावर काम करण्याची आहे परीक्षा घेण्याची नाही. आम्ही परीक्षा देण्याच्या मानसिकतेत नाही आहोत. अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी परीक्षेसाठी महाविद्यायात जाणे आणि तिथे राहणे यासाठी पैसे नाहीत असेही काहींचे म्हणणे आहे. तर काहीनी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या बाजूने नक्की निर्णय घेतील अशी आशाही व्यक्त केली आहे. तर अंतिम वर्ष एटीकेटीचा पण आताच निर्णय घ्या आम्हाला परीक्षा द्यायला जबरदस्ती करू नका अशाही प्रतिक्रिया आल्या आहेत. आता उद्याच्या चर्चेत काय होते त्यावर अंतिम वर्षांच्या परीक्षेचं काय हा मुद्दा कदाचित स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मोदी देशाचे पंतप्रधान होण्याची भविष्यवाणी करणारे प्रसिद्ध ज्योतिष बेजान दारूवालांचा कोरोनानं मृत्यू

अहमदाबाद । लोकप्रिय आणि नामांकित ज्योतिष बेजान दारूवाला यांचा शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. वयाच्या ८९ व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील एका रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते आजारी होते. मागील आठवड्यात त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

गेल्या शनिवारी म्हणजेच २२ मे रोजी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, अशी माहिती त्यांचे सुपुत्र ज्योतिषी नस्तूर दारूवाला यांनी दिली. बेजन दारूवाला यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरत होत्या. नस्तूर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, बेजन दारूवाला न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे आजारी होते. शरिरातील ऑक्सिजनची पातळीही कमी झाली होती. त्यामुळे  त्यांना अहमदाबादच्या अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी बेजन दारूवाला यांच्या निधनाबाबत ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

११ जुलै १९३१ मध्ये गुजरातमध्ये एका पारसी कुटुंबात बेजान दारूवाला यांचा जन्म झाला. ते इंग्रजीचे अध्यापक होते. देशभरात अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेलं राशीभविष्य प्रसारित होत असे. बेजान दारूवाला यांनी २५ एप्रिल २००३ रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आपल्या वेबसाइटचा शुभारंभ केला. बेजान दारूवाला यांनी संजय गांधी यांच्या अपघाताची आणि २०१४ मधील पंतप्रधान मोदी यांची भविष्यवाणी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”