Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5741

भाजपमध्ये सत्तेसाठी हपापलेली माणसे; महाराष्ट्रातील सरकार स्थिर – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

भाजपामध्ये सत्तेसाठी हपालेली माणसे असुन महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. मात्र भाजपामधूनच सरकार अस्थिर व राष्ट्रपती राजवटीच्या बातम्या सोडल्या जात आहेत अशी टिका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्या राज्यात कोरोना टेस्ट च होत नाहीत ती राज्ये आम्हाला सांगणार का महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या जास्त म्हणून असा प्रतिप्रश्न करत चव्हाण यांनी यावेळी भाजपावर हल्ला बोल करत योगी आदित्यनाथांनाही टोला लगावला.

देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणेसाठी केंद्र सरकारने रोख पैसे ओतावे लागतील. लोकांना विश्वासात घेऊन पैसे खर्च करावे लागतील. मात्र ही मानसिकता सरकारची दिसत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटत नसलेचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कर्ज काढून काही होणार नाही. इतर देश काय करत आहेत हे आपण पाहायला पाहिजे. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन हे देश काय करत आहेत हे आपण पहिले पाहिजे असाही चव्हाण यांनी म्हटले आहे.

आज लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे. लोकांचे रोजगार वाचवणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी जे काही अस्त्र वापरता येईल ते अस्त्र आपण वापरले पाहिजे असं चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच राज्यपाल हे मोठे पद आहे. त्यांचे भुमिकेबाबत अपप्रचार जास्त होत असलेचे सांगत राज्यात राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता चव्हाण यांनी यावेळी धुडकावून लावली.

केंद्राने राज्य सरकारला २८ हजार १०४ कोटींचा निधी दिला; फडणवीसांचा दावा

मुंबई । केंद्राने राज्य सरकारला आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारला केंद्र सरकारनेच मदत केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. निधी देऊनही केंद्राने काहीही दिलं नाही असं भासवलं जातं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे, केंद्राने सर्व राज्यांना मदत केली आहे. राज्यात खोटा प्रचार केला जात असून अन्यायाचं वातावरण तयार केलं जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाच्या या परिस्थितीत केंद्राकडून वेगवेगळ्या मार्गाने मदत होत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

केंद्राकडून गरिबांना स्वस्त धान्याचा पुरवठा केला जात आहे. केंद्राने 4 हजार 592 कोटींचं धान्य दिलं. मजूर छावण्यांसाठी केंद्राने पैसे दिले आहेत. उज्वला योजने अंतर्गत एक हजार 625 कोटी रुपये किंमतीचे सिलेंडर मोफत देण्यात आले. 600 श्रमिक रेल्वे सोडल्या, एका रेल्वेचा खर्च 50 लाख रुपये आहे, श्रमिक रेल्वेसाठी जवळपास 300 कोटी दिले आहेत. केंद्राने 28 हजार 104 कोटींची मदत राज्याला केली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

शेतमालसाठी केंद्राने 9069 कोटी रुपये राज्याला दिले आहेत. पीपीई कीट, मास्क, रेशन, प्रवासी मजूरांचा खर्च, शेतमाल खरेदी खर्च, कापूस खरेदीसाठी अशा अनेक गोष्टींसाठी केंद्राकडून मदत होत आहे. जीएसटीसंदर्भात मनात येतील ते आकडे दिले जात असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.केंद्र सरकारने GDPच्या 5 टक्के कर्ज घेता येईल असा निर्णय घेतला. यामुळे राज्याला एक लाख 60 हजार कोटी कर्ज घेता येऊ शकतं. राज्य सरकारने बोल्ड पावले उचलली पाहिजेत, असंही फडणवीस म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊन नंतर रश्मी देसाई ‘नागीन ४’ मध्ये नाही दिसणार; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिग बॉस १३ मुळे चर्चेत आलेल्या रश्मी देसाई हिला नंतर ‘नागीन ४’ या मालिकेमध्ये भूमिका मिळाली. रश्मी देसाईने या सीरियलमध्ये ती साकारत असलेल्या व्यक्तिरेखा शालाकाचा पहिला लूकही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. मात्र, आता तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ती अशी की या लॉकडाऊननंतर रश्मी देसाई यापुढे नागिन -४ चा भाग असणार नाही.

होय मिळालेल्या एका वृत्तानुसार, लॉकडाऊनमुळे शूटिंग थांबली आहे. तसेच या शोच्या शूटिंग आणि कथेला बराच ब्रेक लागला आहे आणि यामुळे शूटिंग सुरू झाल्यानंतर ‘नागीन ४’ या शोच्या मेकर्सने स्टोरीमध्ये थोडा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत रश्मी देसाईची भूमिका फार जुनी नाही आहे, म्हणून निर्माता ही भूमिका बंद करण्याचा विचार करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, चॅनलने नुकतीच नागिन -४ च्या निर्मात्यांची आणि संपूर्ण कलाकारांची एक बैठक घेतली. यानंतर रश्मी देसाईला सांगण्यात आले की या शोमध्ये तिच्या शालाकाच्या भूमिकेचा विस्तार यापुढे केला जाणार नाही. आता चॅनेल आणि शोचे निर्माते या शोच्या बजटमध्ये कमी करत आहेत आणि रश्मी देसाई त्यांच्यासाठी ती एक अतिशय महागडी रिसोर्स ठरत आहे. ती या मालिकेसाठी मोठी फी पण घेते. ज्यामुळे आता तिचे पात्र या मालिके मधून काढून टाकले जात आहे.

लॉकडाउनच्या अगदी आधीपर्यंत रश्मी या शोचा एक भाग होती. या शोमध्ये रश्मी व्यतिरिक्त निया शर्मा, सयंतनी घोष, चमेली भसीन आणि विजयेंद्र कुमेरिया मुख्य भूमिकेत होते. रश्मी देसाईने याबाबत अजुनपर्यन्त कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज तिन्ही सेना प्रमुखांसोबत आणि चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल विपिन रावत यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यामध्ये लद्दाखमधील लाइन ऑफ अक्चुअल कंट्रोलवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावावर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार संरक्षणमंत्री यांना चीनला लागून असलेल्या सीमा कशा प्रकारे मजबूत केल्या जात आहेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या भागात सुरु असलेले सीमेपर्यंत रस्ता बनवण्याचं काम सुरुच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लद्दाखसह अनेक भागात चीनशी जोडलेल्या सीमा भागात सध्या चीनी सैनिक आणि भारतीय सैनिकांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. भारताने पँगोंग त्सो आणि गलवान घाटीमध्ये मोठ्या प्रमाणात सैनिक वाढवले आहेत. या दोन्ही वाद सुरु असलेल्या भागात चीनच्या सैन्याने 2 ते अडीच हजार सैन्य वाढवलं आहे.

चिनी सैन्यांकडून तैनात करण्यात आलेली सैनिकांची संख्या पाहता आता भारताने ही या भागात सैन्य वाढवलं आहे. भारताने रोडवे आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने ए ग्रिम भागात अधिक सैन्य पाठवले आहे. लद्दाखमध्ये भारताने गस्त वाढवली आहे. तसेच, गेल्या काही वर्षांत चीनने अतिक्रमण केलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील सीमावर्ती भागातही गस्त घातली जात आहे. सिक्कीम सेक्टरमध्ये ही सैनिक वाढवण्यात आले आहेत. चिनी सैन्याकडून कोणतीही घुसखोरी रोखण्यासाठी सैनिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चीनने आपले सैन्य वाहतूक करण्यासाठी आणि भारतीय सीमेजवळील गालवण भागात वस्तू पुरवण्यासाठी अनेक रस्ते बांधले आहेत. हे लक्षात घेता भारताने देखील या भागातील सीमेपर्यंत जाण्यासाठी रस्ते बांधणीच्या कामांना वेग दिला होता, यावर चीनने आक्षेप घेतला आहे. दोन्ही सैन्याकडून पेट्रोलिंगही वाढविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पूर्व लद्दाख आणि सिक्कीमच्या नाकूला सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सलीम खान यांनी यावर्षी सलमानशिवाय साजरी केली ईद,एकमेकांना फोनवरूनच दिल्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा पूर्ण वर्षातील एक खास काळ असतो. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि आपल्या मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी तो चित्रपट प्रदर्शित करण्याबरोबरचबॉलिवूड अभिनेता सलमान खानसाठी ईद हा वर्षाचा खास काळ आहे. तो दरवर्षी हा सण कुटुंब आणि मित्रांसह साजरा करतो. ईदच्या निमित्ताने दरवर्षी चित्रपट प्रदर्शित करण्याबरोबरच तो आपल्या गॅलेक्सी होमच्या बाहेर आपल्या चाहत्यांनाही भेटण्यास येतो. पण यंदा सलमान आपल्या घराऐवजी पनवेलमधील आपल्या फार्महाऊसमध्ये आहे. सलमानचे वडील सलीम खान मुंबईतील वांद्रे येथील घरात लॉकडाउनमध्ये होते. त्यांनी सांगितले की,’ यावर्षी त्यांनी या उत्सवात काही विशेष असे केले नाही.’

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सलीम खानने सलमान खानशिवाय ईद साजरी केल्या विषयी सांगितले. ते म्हणाले – तो तेथे बराच वेळ घालवत आहे. मी त्याच्याशी फोनवर बोललो आणि ईदसाठी शुभेछयाही दिल्या. आम्ही फोनद्वारे एकमेकांशी संपर्कात राहतो आणि दररोज फोनवर बोलतो.

सलीम खान पुढे म्हणाले – जेव्हा मी सलमानला ईद साजरी करण्यासाठी काही खास पदार्थ बनवत असल्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला- “मुळीच नाही, फक्त रेग्युलर जेवण तयार केले जात आहे.”

ईदच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन गाणे रिलीज केले आहे. सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ हा यावर्षी ईदला रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही. मात्र त्याने चाहत्यांना नाराज केले नाही आणि आपले ‘भाई भाई’ हे गाणे रिलीज केले.

 

सोशल मीडियावर हे गाणे शेअर करताना सलमान खानने लिहिले- ‘मी तुमच्या सर्वांसाठी काहीतरी बनवले आहे. कसे वाटले ते पाहून सांगा. आपणा सर्वांना ईद मुबारक.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पानपट्टी चोर काम कर जा; निलेश राणेंनी पाणीपुरवठा मंत्र्यांना सुनावले 

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । नारायण राणे यांचे सेनेशी पूर्वीपासूनच नाते आहे. सेनेमुळेच ते मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावर आले. असे विधान पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राणेंनी भेट घेतली त्यावेळी गुलाबरावांनी हे विधान केले होते. या विधानाला उत्तर देत आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये निलेश राणे यांनी त्यांनी पानपट्टी चोर जा काम कर असे उत्तर दिले आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी तसे ट्विट केले आहे.

“गुलाबराव आमचे घर बघा आणि घराबाहेरचा रस्ता पण बघा. आमच्या घरा बाहेरचा रस्ता पण तुमच्या टकल्या पेक्षा चकाचक आहे, मग कळेल रस्त्यावर कोण. आमचा वॉचमन पण तुझ्या पेक्षा शिकलेला आणि रुबाबदार आहे. पानपट्टी चोर काम कर जा. ” अशा शब्दात निलेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले आहे. निलेश राणे त्यांची विशिष्ट भाषाशैली आणि स्पष्टवक्तेपणा याच्यामुळे चांगलेच चर्चेत राहत असतात. गुलाबराव पाटील यांनाही त्यांनी त्यांच्या विशेष शब्दात सुनावल्याचे दिसून येते.

 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच कोरोना संकटात सरकार अपयशी झाले आहे म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती. याबद्दल गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी वरील विधान केले होते. त्याबरोबर हि आपत्ती सर्वत्र आली आहे मग उत्तरप्रदेश, गुजरात आणि दिल्ली इथेही राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे असे ते म्हणाले होते. नारायण राणे यांनी सेनेनेच रस्त्यावर आणले होते. याला निलेश राणे यांनी करकरीत उत्तर दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबईत आरोग्य सेवेचे तीन तेरा; राणे बंधूनी शेअर केले ‘हे’ दोन फोटो 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल चढविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही वादालाही बळी पडत आहेत. मात्र ते सातत्याने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून आघाडीसारकारविरोधात बोलत आहेत. नुकताच नितेश राणे यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातील मृतदेहांचा फोटो शेअर केला आहे तर निलेश राणे यांनी बीएमसी च्या आगरीपाडाच्या आयसोलेशन विभागात पुरविल्या जाणाऱ्या जेवणाचा फोटो शेअर केला आहे.

मुंबईच्या केईएम रुग्णालयात मुतदेह वार्डातच ठेवून इतर रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याच पार्श्वभूमीवर आज नितेश राणे यांनी केईएम रुग्णालयातील रुग्णालयातील परिसरात दोन्ही बाजूला एका ओळीत ठेवलेल्या मृतदेहांचा फोटो शेअर केला आहे. तर निलेश राणे यांनी जेवणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सरकार सर्व सुविधा पुरवत असल्याचे सांगत आहे तर हे काय आहे? असे काहींनी म्हंटले आहे तर काहींनी हे जेवण मुंबईचे पालकमंत्री, उपनगर पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाठवून द्यावे, म्हणजे रुग्ण कोणते पंच पक्वान्न खात आहेत याचा अंदाज येईल असे म्हंटले आहे.

 

दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु व्हावी आणि रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावी म्हणून नारायण राणे यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली आहे. राणेंचे संपूर्ण कुटुंबच सरकारवर तुटून पडल्याचे दिसून येते आहे. आता या ट्विट ना आघाडी सरकारकडून काय उत्तर दिले जाईल. हेही महत्वाचे असणार आहे. एकूणच राज्यातील सरकार या संकटकाळात उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरत असल्याचे सतत दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राज्यात राष्ट्रपती राजवटीवरून भाजपमध्येच मतभेद; राणेंनी डागली मुनगंटीवारांवर तोफ, म्हणाले..

मुंबई । राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांनी केलेली मागणी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. भाजपची ती अधिकृत मागणी नाही,’ अशी भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मांडली होती. राणेंच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून भाजपनं हात झटकल्यानं पक्षातील मतभेद असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, मुनगंटीवारांचे म्हणणं भाजपचे खासदार नारायण राणे यांनी चांगलचं मनाला लावून घेतलं असून त्याबद्दल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणेंनी आपले सडेतोड मत मांडले.

‘राज्यपालांकडं जाताना मी त्याची पूर्वकल्पना प्रदेशाध्यक्षांना व फडणवीसांना दिली होती. मुनगंटीवारांना विचारलं नाही. कुणीही मला काही सांगितलं नाही. भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलो नव्हतो. ते सीनिअर नेते असतील तर मीही माजी मुख्यमंत्री आहे,’ असं असा टोला राणेंनी सुधीर मुनगंटीवारांना हाणला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘राष्ट्रपती राजवटीबद्दल पक्षाचं मत काय आहे ते प्रदेशाध्यक्ष मांडतील. मी माझं मत मांडलं. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज अडीच ते तीन हजारांनी वाढतेय. मुंबईत आतापर्यंत हजारच्या वर मृत्यू झालेत. लोकांचे जीव वाचवण्यात हे सरकार अपयशी ठरतंय हे मी राज्यपालांच्या निदर्शनास आणलं आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. परिस्थिती पाहूनच मी ही मागणी केलीय. मुनगंटीवारांनी मृतांचे आकडे पाहावेत आणि मग बोलावं,’ असा खोचक सल्ला सुद्धा राणे यांनी मुनगंटीवारांना दिला.

संजय राऊत केंद्र सरकारचे सल्लागार आहेत का?
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची तर आधी गुजरातमध्ये लावावी लागेल असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राणे यांनी समाचार घेतला. ‘संजय राऊत हे बेताल आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही बोलण्याची गरज नाही. ते केंद्र सरकारचे सल्लागार आहेत का? कुठल्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे सांगण्याचं काम राऊतांना दिलंय का? केंद्र सरकार ते ठरवेल. राष्ट्रपती राजवटीला ते एवढे का घाबरतात?,’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

म्हशीला लाथ मारणे या तरुणांना पडले चांगलेच महागात, पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये म्हशींची शर्यत सुरू होती. यानंतर, आणखी एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे, जो पाहिल्यावर आपल्याला आपले हसु रोखता येणे अवघड होईल आणि हसताना आपण फक्त असेच म्हणाल की,’जशास तसे.’ या व्हिडिओमध्ये एका म्हशीला लाथ मारणे हे एका तरूणाला चांगलेच महागात पडले हे दिसून येते.

या व्हिडिओत दोन तरुण त्यांच्या बाईक वरून जात असल्याचे दिसत आहे. त्यावेळी काही म्हशीना रस्त्यावर बांधले गेले असल्याचे दिसून येत आहे. यापैकी एक म्हैस ही रस्त्यावर उभी आहे. या बाईकवरील तरूणांना पुढे जाण्यासाठी पुरेशी जागा आहे तरीदेखील ते या म्हशीला उगाचच डिवचतात. बाईक म्हशीजवळ आल्यावर बाईकच्या मागील बाजूस बसलेला एक तरुण त्या म्हशीला जोरात लाथ मारतो आणि तेवढ्यातच तो आपला तोल गमावतो आणि एक झटका बसून जोरात खाली पडतो. त्याचवेळी दुसर्‍या युवकाचा देखील तोल बिघडतो आणि तो समोरच्या खांबाला आपली बाईक ठोकतो. या दोन्ही तरुणांना दुखापत होते.

वन सेवा अधिका-यांनी शेअर केला व्हिडिओ
हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडिया ट्विटरवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे – “कर्मासाठी काही मेन्यू नसतो. आपण जसे करतो तसेच भरतो. आणि जेव्हा कर्माचे फळ हे लगेच मिळते तेव्हा…”

हा व्हिडिओ ७१ हजार लोकांनी पाहिला आहे
हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सुमारे ७१ हजार लोकांनी पाहिला आहे आणि ६,००० हून अधिक लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. त्याच वेळी १६०० लोकांनी याला रीट्वीट देखील केले आहे. २०० लोकांनी यावर कमेंट केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

MHT-CET 2020 परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी १ जूनपर्यंत मुदतवाढ

मुंबई । MHT-CET 2020 परीक्षेसाठी अजूनही अर्ज न केलेल्या विद्यार्थांना महाराष्ट्र राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिलासा दिला आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्याने विद्यार्थी आणि पालकांनी नव्याने नोंदणी करण्याची आणि अपूर्ण अर्ज भरण्याची संधी देण्याची विनंती सीईटी सेलकडे केली होती. याची दखल घेत सीईटी सेलने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची अखेरची संधी दिली असून, विद्यार्थ्यांना १ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने अनेक अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी होणारी एमएचटी सीईटीही पुढे ढकलली आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनाकडून होत होती. ज्या विद्यार्थ्यांनी ७ मार्चपर्यंत अपूर्ण अर्ज भरले होते. अशा सहा हजार ४१८ विद्यार्थ्यांना आता अर्ज पूर्ण भरून शुल्क भरण्याची संधी यापूर्वी सीईटी सेलने दिली होती. यासाठी २३ मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

मात्र, या काळात ऑनलाइन शुल्क भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता आणखी मुदत वाढ देण्यात आली आहे. यानुसार २६ मे ते १ जून या कालावधीत विद्यार्थांना अर्ज भरता येईल. अर्ज भरण्याबाबतची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”