Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5740

पाकिस्तान विमान अपघाताबाबत मोठा खुलासा, पायलटने दिलेल्या तीन इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) च्या क्रॅश एअरक्राफ्टच्या पायलटने विमान लँडिंग करण्यापूर्वी विमानाचा वेग आणि उंची याबद्दल हवाई वाहतूक नियंत्रकांनी दिलेल्या तीन इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले होते. सोमवारी मिळालेल्या एका अहवालात ही माहिती समोर आली आहे. नॅशनल एव्हिएशन कंपनीचे विमान पीके-८३००३ शुक्रवारी दुर्घटनाग्रस्त झाले, त्यात ९७ लोकं ठार तर दोन लोक हे अगदी चमत्कारीकरित्या बचावले आहेत. हा अपघात देशाच्या इतिहासातील सर्वात दुःखद अपघात ठरला आहे.

जियो न्यूजने एटीसीच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की,’ लाहोरहून कराचीकडे येणारे एअरबस ए -३२० विमान जीना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जमिनीपासून ७,००० फूटांऐवजी १०,००० फूट उंचीवर १५ नॉटिकल मैलांवर उड्डाण करीत होते. तेव्हा एटीसीने पायलटला विमानाची उंची कमी करण्याचा पहिला इशारा दिला. त्यात पायलटने खाली येण्याऐवजी आपण आहे तिथेच समाधानी असल्याचे सांगितले. जेव्हा विमान विमानतळापासून अवघ्या १० नॉटिकल मैलांवर होते तेव्हा विमान ३,००० फूटांऐवजी ७,००० फूट उंचीवर होते.

एटीसीने विमानाची उंची कमी करण्यासाठी पायलटला दुसरा इशारा दिला. मात्र, पायलटने पुन्हा सांगितले की, या उंचीविषयी तो समाधानी आहे तसेच परिस्थिती हाताळेल आणि तो विमान खाली उतरवण्यास तयार आहे. अहवालात असे सांगितले गेले आहे की,’ या विमानाला दोन तास ३४ मिनिटांपर्यंत उड्डाण करण्यासाठी पुरेसे इंधन होते, तर विमानाची एकूण वेळ एक तास ३३ मिनिटांवर नोंदविण्यात आली.

हा अपघात पायलटच्या चुकीमुळे कि तांत्रिक अडचणींमुळे झाला हे शोधण्याचा प्रयत्न पाकिस्तानी अधिकारी करीत आहेत. देशाच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने (सीएए) तयार केलेल्या अहवालानुसार, विमान उतरवण्याच्या पायलटच्या पहिल्या प्रयत्नात विमानाच्या इंजिनने धावपट्टीवर तीन वेळा जोरदार धडक दिली त्यावेळी तज्ज्ञांना तिथून आगीच्या ठिणग्या उडलेल्या दिसल्या. अहवालात असे नमूद केले आहे की,’ विमान लँडिंग करण्याच्या पहिल्या अपयशी प्रयत्नात जेव्हा विमानाने जमिनीवर धडक दिली तेव्हा इंजिनच्या तेलाचा टँक आणि इंधन पंप खराब झाले असेल आणि मग त्यातून इंधन गळती झाली असावी, ज्यामुळे विमानास सुरक्षित पातळीवर उचलण्यासाठी आवश्यक असणारी ताकद आणि वेग मिळाला नसेल. त्यात असेही म्हटले आहे की जेव्हा विमान लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तेव्हा वैमानिकाने स्वतःहूनच पुन्हा एक चक्कर मारण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळी एटीसीला लँडिंग गीअर कार्यरत नसल्याची माहिती मिळाली.

अहवालानुसार, “एअर ट्रॅफिक कंट्रोलरने पायलटला विमानास ३,००० फूट उंचीवर नेण्याची सूचना केली, परंतु तो केवळ १,८०० फूटांपर्यंतच नेऊ शकला. जेव्हा कॉकपिटला ३,००० फूटांवर हलविण्याची आठवण केली तेव्हा पहिला अधिकारी म्हणाला, “आम्ही प्रयत्न करीत आहोत.” डॉन वृत्तपत्राने असे वृत्त देत म्हटले की,’ वैमानिकाने यानंतर लवकरच दोन इंजिन काम करत नसल्याची बातमी दिली. आणि तो त्याचे क्रॅश लँडिंग करणार असल्याचे सांगितले. उपलब्ध असलेल्या दोन धावपट्ट्यांपैकी एकावर उतरण्यासाठी नियंत्रकाने पीआयए विमानास मंजुरी दिली होती, परंतु पायलटकडून तसे करण्यास धोका असल्याचे सूचित केले जात होते. तज्ञांच्या मते, विमान योग्य त्या उंचीवर न पोहोचणे हे इंजिन कार्यरत नसल्याचे दर्शवते. त्यानंतर विमान एका बाजूला झुकले आणि अचानक कोसळले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

फडणवीस खोटं बोलत आहेत; केंद्रानं एक नवा पैसा दिला नाही- वडेट्टीवार

मुंबई । कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा धादांत खोटा आहे. केंद्राने एक नवा पैसा दिला नसून फडणवीस खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करित आहेत अशी टिका आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. आज नियोजन भवन येथे पत्रकारपरिषदेत वडेट्टीवार यांनी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली.

फडणवीस खोटं बोला, नेटाने बोला या युक्तीचा अवलंब करित असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. केंद्र सरकारने कोव्हीडसाठी स्वतंत्र असा कुठलाही निधी दिला नाही. विरोधी पक्ष नेते फडणवीस खोट बोलून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. केंद्राने दरवर्षी प्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठी २०२०-२१ साठी ४२९६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील ४० टक्के निधी म्हणजे १७१८.४० कोटींचा निधी हा राज्य आपत्ती व्यवस्थापन व रिसपॉन्ससाठी आहे. त्यानुसार सरकार राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी हा निधी खर्च करतो. या निधीत ७५ टक्के निधी हा केंद्र सरकारचा आहे. या निधीतून पहिला हप्ता १६११ कोटी इतका निधी राज्य सरकारला मिळाला आहे. मात्र, त्यातील २०२०-२१ यावर्षी ३५ टक्के निधी म्हणजेच ६०१ कोटी इतका निधी कोव्हीड कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे असं वेडिट्टीवर यांनी सांगितलं.

राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर ही परवानगी मिळाली आहे. यातून कोरोनासाठी राज्य सरकारने आतापर्यंत १७१ कोटीचा निधी वितरीत केला आहे. तर १५६ कोटींचा निधी मंजूर करण्यास राज्य कार्यकारी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. येत्या एक दोन दिवसात हा निधी दिला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्याने कोरोनासाठी आतापर्यंत एकूण ३२७ कोटी मंजूर केले आहेत अशी माहिती वेडिट्टीवर यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पाकिस्तानी वंशाच्या व्यक्तीकडून इंग्लंडमधील गुरूद्वारामध्ये तोडफोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडमधील डर्बी येथील गुरुद्वारा येथे तोडफोडीची घटना उघडकीस आली आहे. तोडफोड करणारा आरोपी हा पाकिस्तानी मूळचा आहे. त्याला लगेच अटक करण्यात आली आहे. या तोडफोडीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. डर्बीचे गुरू अर्जुन देव जी या गुरुद्वारामध्ये तोडफोड करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे, मात्र अटक होण्यापूर्वी त्याने गुरुद्वारामध्ये प्रचंड गोंधळ घालून तोडफोड केली.

सोमवारी सकाळी तोडफोड झाल्यानंतर जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा गुरुद्वाराच्या दारात त्यांना एक चिठ्ठी सापडली. इंग्रजीत लिहिलेली ही चिठ्ठी काश्मीरविषयी होती, ज्यात असे लिहिले होते की, “काश्मीरमधील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा अन्यथा सर्वत्र अशीच परिस्थिती उद्भवतील”. या चिठ्ठी मध्ये एक फोन नंबरही लिहिलेला होता. या तोडफोडीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून यात आरोपी पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजम्यामध्ये दिसला आहे.

आरोपीने गुरुद्वाराच्या काचेच्या खिडक्या तोडल्या. इंग्लंडमधील या घृणास्पद घटनेनंतर शीख समुदायामध्ये प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत ट्विट केले आहे की, “मानवतेला टिकवून ठेवण्यासाठी अशी असहिष्णुता आणि द्वेष संपलाच पाहिजे. विशेषत: जेव्हा जग एका अभूतपूर्व संकटाने ग्रस्त आहे.”

अकाली नेते आणि दिल्ली गुरुद्वारा शीख व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना इंग्लंडमधील शिखांविरूद्धच्या या द्वेषाच्या गुन्ह्याचा मुद्दा उपस्थित करण्याचे आवाहन केले आहे.

मात्र, इंग्लंडमध्ये शिखांच्या अशा धार्मिक स्थळाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने या हल्ल्यानंतर गुरुद्वाराच्या सुरक्षेत वाढ केली असून अशी कोणतीही घटना यापुढे होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मागील ५ वर्ष राज्याला कर्जबाजारी करणाऱ्यांनी, कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये- नवाब मलिक

मुंबई । राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे ज्यांनी उद्योग केला, त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये. त्यांच्या सल्ल्याची महाविकास आघाडी सरकारला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला 28 हजार कोटी रुपये दिले म्हणून सांगितलं. विविध योजनांसाठी पैसा द्यावा लागतो आणि ते बंधनकारक असते. दिलेले पैसे नवीन योजनेसाठी खर्च करत नाही. पॅकेज दिले हे चुकीचे आहे. त्याचा फायदा राज्यसरकारला झालेला नाही. बंधनकारक पैसे सरकारला आणि जनतेला दिले आहेत. महाराष्ट्राने दीड लाख कोटीचे कर्ज काढले पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस देत आहेत. लोकं जगात, देशात, महाराष्ट्रात कर्ज काढण्यासाठी उत्सुक आहेत. तो त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालेल, असा टोलाही नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

याचबरोबर आम्ही महाराष्ट्राचे सरकार अस्थिर करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. परंतु महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होऊच शकत नाही. तिन्ही पक्ष भक्कमपणे सरकार चालवत आहेत. हे पण खरे आहे की, दिल्लीपासून महाराष्ट्रातील भाजपाचे लोक हे सरकार पडणार आहे. आम्ही सरकार बनवणार आहोत. राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी अफवा पसरवण्याचे काम केलं जात आहे. परंतु हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. महाविकास आघाडी सरकार एकजुटीने काम करत आहे. भाजपाने कितीही अफवा पसरवल्या तरी सरकार स्थिर राहणार आहे, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोना तर केवळ हिमनगाचे टोक, जगाला यापेक्षाही भयानक रोगांना सामोरे जावे लागेल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील वटवाघळावर संशोधन करणाऱ्या ‘बॅट वुमन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शी झेंगली यांनी तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनीला नुकत्याच काही मुलाखती दिल्या आहेत त्यांनी कोरोना विषाणू हा तर हिमनगाचे केवळ एक टोक आहे. असे असंख्य विषाणू असण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये आपले थैमान घालत असलेला कोरोना हा एकमेव विषाणू नाही तर असे असंख्य विषाणू असू शकतात. आपण वेळेत संशोधन केले नाही तर जगाला यापेक्षाही भयानक रोगांना सामोरे जावे लागेल असे त्यांनी सांगितले आहे. त्या चीनमधील वुहान विषाणू संस्थेच्या उपसंचालक आहेत. गेले अनेक वर्षे त्या वटवाघळावर संशोधन करीत आहेत.

विषाणूच्या संशोधनामध्ये शास्त्रज्ञ आणि सरकार यांच्यामध्ये पारदर्शकता असणे खूप गरजेचे आहे. आणि आपल्याकडे ती नाही हे खूप खेदजनक आहे असे त्या म्हणाल्या. जर पुढे येणाऱ्या महामाऱ्यांपासून वाचायचे असेल तर आपल्याला अधिक प्रगतपणे वन्यप्राण्यांमध्ये आढळणाऱ्या या विषाणूंचा शोध लावला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी असेही सांगितले की त्या प्रयोगशाळेत ज्या जनुकीय गोष्टींवर काम करत आहेत त्याचा आणि कोरोना विषाणूचा काहीही संबंध नाही. “मी शपथ घेऊन सांगते की या विषाणूच्या प्रादुर्भावामध्ये माझा काहीही हात नाही” अशा आशयाची एक पोस्ट त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर टाकली आहे. अशाच एका दुसऱ्या मुलाखतीत वुहान विषाणू संस्थेच्या संचालकांनी विषाणू टोपीतून सुटला ही शुद्ध बनावटगिरी असल्याचे म्हंटले आहे.

अनेक वर्षांपासून वुहान विषाणू संस्था विषाणूच्या संशोधनामध्ये काम करते आहे. २००३ मधील SARS विषाणूनंतर वटवाघळावर संशोधन करण्यात आले आणि २०१३ मध्ये झेंगली यांनी त्यास सुरुवात केली होती. त्यांना SARS – COV-2 सारखे ९६.२% विषाणू वटवाघळामध्ये असल्याचे सापडले होते आणि २०१५ मध्ये त्यांनी जगाला वटवाघळांमधून SARS सारखा विषाणू मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती.  शी काम करत असलेली प्रयोगशाळाच या विषाणूचा स्रोत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. त्यावर शी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुणे विद्यापीठ चौकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय 

पुणे । पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाण पूल पाडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यासोबतच इथे एक दुमजली पूल देखील बांधण्यात येणार आहे. शासनाने हे पूल उभारण्यासाठी टाटा- सिमेन्स कंपन्यांसोबत करार करण्याचीही परवानगी दिली आहे. पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणास (पीएमआरडीए) मिळालेल्या या पर्वांगीमुळे लवकरच हे पूल पाडण्यात येतील हे स्पष्ट झाले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्प सुरु करण्यासाठी हे दोन पूल अडथळा ठरत होते म्हणून पीएमआरडीए ने हे पूल पडण्याचा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठविला होता. तसेच हे पूल पुणे महानगरपालिकेने बांधले असल्याने महापालिका प्रशासनाकडेही तसा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने हे पूल पाडण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. हे पूल संचारबंदीच्या काळात पडण्याची परवानगी द्यावी अशीही विनंती करण्यात आली आहे.

महापालिकेकडून पूल पाडण्यासाठी “ना हरकत प्रमाणपत्र” मिळणे खूप गरजेचे असल्यानेच तसा प्रस्ताव महानगरपालिकेकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान पुण्यात मेट्रोचे काम सुरु आहे. काही ठिकाणी हे काम रखडलेले आहे. त्यापैकीच एक हे दोन पूल होते. शासनाकडून सकारात्मक निर्णय आल्याने लवकरच हे पूल; पाडण्याची प्रक्रिया पीएमआरडीए सुरु करण्याची शक्यता आहे. लवकरच तेथील दुमजली पूलाचेही काम सुरु होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारतातील कोरोनाचा मृत्यू दर जगातील देशांच्या तुलनेत सर्वात कमी- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली । भारतातील कोरोनामुळे मृत्यू पावण्याचा दर हा जगातील देशांच्या तुलनेत सर्वात कमी असून हे आपल्याला लॉकडाउन, चाचण्या आणि रुग्णांना वेळेवर देण्यात आलेल्या उपचारांमुळे साध्य झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले आहे. एकूण लोकसंख्येच्या दर १ लाखामागे ०.३ टक्के इतकाच मृत्यूदर राखण्यात भारताला यश आले आहे. मात्र, दुसरीकडे जगातील देशांचा सरासरी मृत्यूदर हा ४.४ टक्के इतका आहे असं अग्रवाल यांनी सांगितले.

जगातील काही देशांमध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे ८१.२ इतक्या मृत्यूंची नोंद झाल्याचेही ते म्हणाले. हे आपल्याला लॉकडाउन, चाचण्या आणि रुग्णांना वेळेवर देण्यात आलेल्या उपचारांमुळे साध्य झाल्याचे अग्रवाल म्हणाले. लॉकडाउन, कंटेनमेंट आणि नियमांमुळे आपल्याला करोनाच्या संसर्गाची साखली तोडता आली असेही ते पुढे म्हणाले. करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचेही दिसत नसल्याचे ते म्हणाले.

भारतातील कोरोना संसर्गाची स्थिती सुधारच असून जगाच्या तुलनेत मृत्यूचा दरही कमी असल्याचे अग्रवाल यांनी यापूर्वीही सांगितले होते. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांपैकी ६० हजार ४९० रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. तसेच रग्ण बरे होण्याच्या दरातही सुधारणा झाली असून सध्या हा दर ४१.६१ इतका आहे. देशातील मृत्यूदर जगाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे आणि सध्या तो २.८७ टक्के इतका असल्याचेही अग्रवाल म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘द कपिल शर्मा शो’मध्ये नवज्योतसिंग सिद्धूच्या बदलीबद्दल पहिल्यांदा बोलली अर्चना पूरन सिंह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ने छोट्या पडद्यावर पुन्हा पुनरागमन केले आहे. शोच्या पहिल्या एपिसोड नंतरच टीआरपीच्या लिस्टमध्ये या शो ने पहिले स्थान मिळवले आहे. कपिल शर्माचा कार्यक्रम तोच आहे मात्र आता अर्चना पूरन सिंग ही जजच्या खुर्चीवर बसलेली दिसते. या शोमध्ये नवज्योतसिंग सिद्धू आपल्या शायरीतून सर्वांची मने जिंकत होता. असे बरेच लोक आहेत ज्यांना अजूनही नवज्योतसिंग सिद्धूने या शोमध्ये परत यावं अशी इच्छा आहे. मस्करीमध्ये सर्वजण म्हणतात की,’ अर्चनाने सिद्धू साहेबांची खुर्ची काढून घेतली आहे. पण यामागील सत्य काय आहे, हे मात्र फक्त अर्चना पूरनसिंग यांनाच माहिती आहे.

 टेली चक्करच्या एका वृत्तानुसार, अर्चना पूरन सिंह ही नुकतीच इंस्टाग्रामवर लाईव्ह आली होती. तेव्हा ती म्हणाली – मला समजते की सिद्धूचे बरेच फॅन्स आहेत आणि मला काहीच हरकत नाही. माझ्यासाठी हा हा एक जॉब आहे आणि मी त्यांची खुर्ची घेतलेली नाही. तसेच आणखी गोष्ट मला सांगायची आहे की, या शो मध्ये कपिल नेहमी म्हणतो की तुम्ही सिद्धूची चेअर घेतली आहे. जर कपिल सीरियस असता तर मी त्यावर हसले असते का किंवा त्याने त्याविषयी विनोद केला असता का?. हे दोन्ही खरे आणि मजेशीर आहे. ऑडियन्सना ते समजते किंवा ते सत्यापासून इतके दूर आहेत की ते हास्यास्पद आहे.

 


View this post on Instagram

 

Jus for #fun guys ???? #navjotsinghsidhu @archanapuransingh #comedy #fun #laughter #thekapilsharmashow #tkss ????????????

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on Oct 1, 2019 at 1:44am PDT

 

अर्चना पुढे म्हणाली – तर ही ती लाईन आहे जी तो नेहमी स्ट्राइक करतो, मात्र ते खरं नाही आहे. म्हणूनच त्यावर मी हसू शकते. मी सिद्धूला चांगले ओळखते आणि मी यापूर्वीही या शोमध्ये माझ्या डॉली की डोली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यावेळी मी सिद्धूला भेटले होते.

 

नवजोतसिंग सिद्धू यांना पुलवामा हल्ल्याच्या वेळी कॉन्ट्रा-स्टेटमेंट दिल्यामुळे शोमधून काढून टाकले गेले. लॉकडाऊनमुळे सध्या या कार्यक्रमाचे शूटिंग थांबलेले आहे.

 


View this post on Instagram

 

@kapilsharma Thankyou for giving me so much Instagram content ???????? and…. you sing like a dream????

A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh) on Apr 9, 2020 at 4:35am PDT

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पुण्यातील खवय्यांसाठी खुशखबर! वैशाली हॉटेल झाले सुरु

पुणे । कोरोनाचे संकट त्यात संचारबंदी या दोन्ही परस्परावलंबी गोष्टींमुळे पुण्यातील खवय्यांना स्वतःच्या जिभेवर खूपच ताबा ठेवावा लागला आहे. बऱ्यचदा घरी कितीही चमचमीत खाल्ले तरी काही ठराविक ठिकाणची चव त्याला येत नाही. आणि तसा फील सुद्धा नाही. असेच एक ठिकाण म्हणजे फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरचे वैशाली हॉटेल होय. कित्येक पुणेकरांची सुरुवात या हॉटेलमधील जिन्नस खाऊन होत असते. सोबतीला एखादा मित्र असतोच. पण या संचारबंदीमुळे ही सगळी मजा बऱ्याच दिवसात पुणेकरांना अनुभवता आली नाही. पण आता किमान वैशालीच्या पदार्थांची चव पुणेकरांना नक्की घेता येणार आहे. कारण वैशाली पुन्हा सुरु झाले आहे.

काही दिवस मात्र आपल्याला सकाळी ८ ते सायंकाळी ६ एवढ्याच वेळात येथील पदार्थांचा लाभ मिळणार आहे. आणि काही मोजकेच पदार्थ ज्यामध्ये बटाटा वडा, व्हेज कटलेट, साबुदाणा वडा, उत्तपा यांचा समावेश आहे, यांचाच आस्वाद घेता येणार आहे. तसेच काही दिवस केवळ पार्सल सुविधा उपलब्ध असणार आहे. वैशाली हॉटेल सुरु झाल्यावर इथल्या रसिक चाहत्यांनी गर्दीही केली मात्र परिस्थिती पाहता हॉटेल व्यवस्थापनाने आणि चाहत्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत मास्क व हॅण्डगल्व्ह्ज वापरून पुण्यातील या खवय्यांची सेवा सुरु ठेवली आहे.

गेल्या २ महिन्यांपासून पुण्यातील जवळपास सर्वच हॉटेल बंद आहेत. संचारबंदीचे नियम जसजसे शिथिल होत आहेत तसतसे हळूहळू काही व्यवसाय नव्याने सुरु होत आहेत, पण विषाणूचा धोका अद्याप पूर्णतः तळलेला नाही म्हणून सर्वानीच काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्याचे पालन वैशाली हॉटेल च्या व्यवस्थापनाकडून केले जात आहे. कोणत्याच प्रकारची गर्दी होऊ नये म्हणूनच पार्सल सुविधा सुरु करण्यात आली आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना संकटामध्ये CAAविरोधी आंदोलकांना अटक; जावेद अख्तर यांची गृह मंत्रालयावर टीका

मुंबई । एकीकडे देशातील नागरिक आणि सरकार कोरोनानं त्रस्त असताना, दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलकांना अटक करण्यावरून लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयावर निशाणा साधला आहे. ‘देश करोना आणि त्याच्याशी निगडीत समस्यांशी झुंजत असताना गृह मंत्रालय सीएए विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात व्यग्र आहे’ असं ट्विट करत जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयावर ताशेरे ओढलेत.

देशभरात करोना संक्रमणाचे १ लाख ४५ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लाखो स्थलांतरीत मजूर आजही रस्त्यावरून चालत जाताना दिसत आहेत. परंतु, या दरम्यान फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या जाफराबाद भागात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील (CAA) आंदोलनात सहभाग घेणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे याचवरून जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयाच्या कार्यशैलीवर रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, मागच्या शनिवारीही सीएए विरुद्ध आंदोलन करणाऱ्या जवाहर लाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय अनेक कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांचीही धरपकड सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”