Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5744

राष्ट्रपती राजवटीची कुणकुण लागताच शरद पवार मातोश्रीवर; संजय राऊत म्हणतात..

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. पवार ठाकरे भेट हि अतिशय गुप्तपणे पार पडली आणि त्यांच्यात २ तास चर्चा झाली अशी माहिती आज समोर आली आहे.

राष्ट्रपती राजवटीची कुणकुण लागताच पवार मातोश्रीवर गेले असल्याचे बोलले जात होते. भाजप नेते नारायण राणे यांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राज्यपालांना भेटून काल केली होती. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी सरकार आपला ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणार आहे. कालची शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक हि औपचारिक बैठक होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल शरद पवार यांचे मार्गदर्शन घेतले. पंतप्रधान मोदीही वेळोवेळी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत असतात. पवार हे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे त्यांची कालची भेट हि केवळ मार्गदर्शनपर चर्चा करण्यासाठी होती असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या राज्यपाल भवनाच्या भेटी मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत. तसेच विरोध पक्षीयांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर पवार ठाकरे भेटीने अनेकांना बुचकळ्यात पडले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोलापूरात कोरोनाने आज पुन्हा घेतला 7 जणांचा बळी, 25 रुग्ण वाढल्याने एकूण बाधित 608

सोलापूर प्रतिनिधी । सोलापुरात कोरोनामुळे मृत पावणार्‍या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून सोलापुरातील एकूण 58 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज नव्याने 25 रुग्ण आढळले असून सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 608 झाली आहे.

दमानी नगर परिसरातील 57 वर्षीय महिलेला 22 मे रोजी सकाळी नऊ वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सकाळी दहाच्या सुमारास उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. देगाव नाका परिसरातील गंगानगर येथील 58 वर्षीय महिलेला 22 मे रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सव्वाचारच्या सुमारास त्या महिलेचे निधन झाले आहे. रविवार पेठेतील 60 वर्षीय पुरुषाला 22 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या दिवशी सायंकाळी सात वाजता त्यांचे निधन झाले. आंबेडकर नगर परिसरातील 58 वर्षिय पुरूषाला 24 मे रोजी रात्री बाराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री पावणे एकच्या सुमारास त्यांचे निधन झाले. रविवार पेठ परिसरातील 68 वर्षे महिलेला 22 मे रोजी सकाळी 11 वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 24 मे रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले आहे. नीलम नगर परिसरातील 58 वर्षीय पुरुषाला 19 मे रोजी पहाटे सव्वा एकच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. 24 मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज परिसरातील 65 वर्षे पुरुषाला 23 मे रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 25 मे रोजी सकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले आहे.

आज नव्याने आढळलेल्या 25 रुग्णांमध्ये कुमठा नाका येथील एक पुरुष, बुधवार पेठेतील एक महिला, न्यू बुधवार पेठ येथील एक पुरुष, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय क्वॉर्टर येथील दोन पुरुष व एक महिला, भारतरत्न इंदिरा नगर येथील एक पुरुष व दोन महिला, आंबेडकर नगर एक पुरुष, कर्णिक नगर येथील एक पुरुष व एक महिला, दत्तनगर समय युक्त झोपडपट्टी येथील एक पुरुष व एक महिला, शिवगंगा मंदिर मराठा वस्ती परिसरातील दोन पुरुष व एक महिला, मार्कंडेय चौकातील एक महिला, लष्कर येथील एक महिला, अक्कलकोट रोडवरील समाधान नगर येथील एक पुरुष, जुना विडी घरकुल येथील एक महिला, साखर पेठेतील एक महिला, उत्तर कसबा येथील एक महिला, भैय्या चौकातील एक महिला, उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील एक पुरुष अशा पंचवीस जणांचा समावेश आहे. कोरोना मुक्त झालेल्या 23 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
अद्यापही चाचणीचे 194 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

साताऱ्यात कोरोनाचा फैलाव सुरुच, रुग्णसंख्या पोहचली ३३६ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

साताऱ्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या ३३६ झाली आहे. आज, सोमवारी या संख्येत २७ ची भर पडली असून रविवारी ३०९ वर असलेला आकडा आज रात्री १० पर्यंत ३३६ वर स्थिरावला आहे. वाई तालुक्यातील जांभळी गावात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला आहे.

सातारा जिल्ह्यात शनिवारपासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी एकाच दिवशी सत्तरहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रविवारी या संख्येत आणखी ३१ जणांची भर पडली. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून तीन दिवसांतच १३० हून अधिक बाधित पेशंट आढळल्याने आरोग्य प्रशासनाला अधिक सतर्क व्हावं लागलं आहे.

दरम्यान साताऱ्यातील रुग्णांच्या वाढीमध्ये पुणे आणि मुंबईकर लोकांचं गावाकडे येणं, गावातील लोकांनी सोशल डिस्टनसिंगचं पालन न करणं ही कारणं समोर येत आहेत. दरम्यान येत्या काही ३ दिवसांत सुरुवातीच्या काळात उपचार घेणारे ३० रुग्ण बरे होतील. रुग्णांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला आता चांगलीच कंबर कसावी लागणार आहे.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सलमानने लॉन्च केला त्याचा पर्सनल केअर ब्रँड FRSH, करणार सॅनिटायझर्सची विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने लॉकडाऊन दरम्यान एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. बिझनेस वेंचर येथे सलमान खानने FRSH ब्रँड अंतर्गत सॅनिटायझर्स लॉन्च केले आहेत. त्याने २४ मे रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावर आपला हा नवीन सौंदर्य आणि पर्सनल केअर ब्रँड FRSH लॉन्च केल्याची माहिती शेअर केली.

सोशल मीडियाद्वारे शेअर केली माहितीः
अभिनेता सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नुकतीच एक घोषणा केली आहे ज्याच्या एक शेअर करताना त्याने सांगितले की, “मी माझा नवीन ग्रूमिंग आणि पर्सनल केअर ब्रँड एफआरएसएच बाजारात आणतो आहे. हा तुमचा, माझा, आपला ब्रँड आहे जो तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट प्रॉडक्ट्स बनवेल. सध्या सॅनिटायझर्स आले आहेत, जे तुम्हांला येथे मिळतील … तेव्हा ट्राय करा. “

 

सलमानने व्हिडिओमध्ये सांगितली ही गोष्ट:
सलमान खानने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की,’ याआधी तो डीओडोरंट्स आणण्याचे प्लँनिंग करत होता,मात्र सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन त्यांने सॅनिटायझर्स आणण्याचे ठरविले. सलमानने काही दिवसांनंतर डीओडोरंट्स, बॉडी वाइप्स आणि परफ्यूम सारख्या इतर अनेक उत्पादनांचीही ओळख करून देणार असल्याचे सांगितले. माजी टेनिसपटू महेश भूपतीचा ब्युटी ब्रँड स्केनशियल्स याच्याबरोबर ज्वॉइंट वेंचर म्हणून सलमानने FRSH ची सुरुवात केली आहे.

अशा असतील किमती :
सलमान खानच्या फ्रेश वर्ल्डच्या अहवालानुसार १०० मिली सॅनिटायझरची किंमत रुपये ५०, तर ५०० मिलीची किंमत ही २५० रुपये आहे. त्याच वेळी, १०० मिली कॉम्बोच्या १० बाटल्यांची किंमत ही ४०० रुपये इतकी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

श्रीलंकेच्या ‘या’ क्रिकेटपटूला ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली झाली अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेच्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शेहान मदुशनकाला हेरॉइन हा मादक पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मदुशनकाने हॅटट्रिक केली होती. दंडाधिकाऱ्यांनी या २५ वर्षीय खेळाडूला दोन आठवड्यांसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की,’रविवारी त्याला पनाला शहरातून ताब्यात घेण्यात आले असता, त्याच्याकडे दोन ग्रॅमपेक्षा जास्त हिरॉईन सापडली होती. कोरोना विषाणूमुळे देशव्यापी लॉकडाउन सुरु असताना जेव्हा मधुशनका गाडी चालवत जात होता तेव्हा त्यालापोलिसांकडून थांबविण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्याबरोबर गाडीत आणखीही एक व्यक्ती होती.

जानेवारी २०१८ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या वन डे सामन्यात मदुशनकाने हॅटट्रिक घेतली होती. यावर्षी याच संघाविरूद्ध त्याने दोन टी -२० चे सामनेही खेळले होते मात्र त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे तो अजूनपर्यंत कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

वाढत्या गर्मीनं विदर्भ बेजार; अकोल्यात 47.4 अंश तापमानाची नोंद

अकोला । एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे विदर्भातील लोकं हैराण झाले आहेत. विदर्भात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात आज 47.4 ऐवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे तापमान सहन होण्यापलीकडे वाढत चालले आहे. विदर्भात गेल्या दिवसापासून पारा ९६ अंश सेल्सिअसच्या खाली आला नाही आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे आधीच घरात कोंडलेल्या लोकांना वाढत्या तापमानाबरोबर गर्मीने बेजार करून सोडलं आहे. वाढत जाणारं तापमानामुळे लोकं वैतागले आहेत.

विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली शहर
नागपूर – 47.0
अकोला – 47.4
अमरावती – 46.0
चंद्रपूर – 46.8
गोंदिया – 45.8
वर्धा – 46.0

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

रोहित शर्माचे संघातील पुनरागमन होणार कठीण ! सराव सुरू करण्यापूर्वी द्यावी लागेल फिटनेस टेस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली असतानाच क्रिकेट विश्वासही त्याची झळ बसलेली आहे. या धोकादायक साथीमुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प झाले आहे आणि यामुळे क्रिकेटर्स घरातच दोन महिने बसून आहेत. जरी आता खेळाडूंनी आउटडोर ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र भारतीय संघात पुन्हा परतण्यासाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्माला फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. वास्तविक, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतण्याची तयारी करत होता. मात्र कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला ते शक्य होऊ शकलेले नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर आपण संघात परतण्यास तयार असल्याचे रोहितने नुकतेच म्हटले आहे.

न्यूझीलंड दौर्‍यावर जखमी
रोहितला फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडच्या दौर्‍यावर दुखापत झाली होती त्यामुळे त्याला दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले. त्यांनी ला लिगाच्या फेसबुक पेजवर लिहिले की, ‘लॉकडाउनपूर्वी मी संघात परत यायला मी पूर्णपणे तयार होतो. संपूर्ण आठवडाभर माझी फिटनेस टेस्ट होणार होती, मात्र नंतर लॉकडाउन सुरु झाले आणि आता मला पुन्हा नव्याने फिटनेस द्यावी लागेल. तो म्हणाला,’ की सर्व काही उघडल्यानंतर मला एनसीएमध्ये जाऊन फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. केवळ ती टेस्ट पास केल्यावरच मी भारतीय संघासह सराव करण्यास सक्षम होऊ शकेन. महाराष्ट्र सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय वैयक्तिक सराव करण्यास परवानगी दिली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टी -२० मालिकेच्या पाचव्या सामन्यात विराट कोहली ऐवजी कर्णधारपद सांभाळणारा रोहित शर्मा शेवटच्या टी -२० सामन्यात जखमी झाला होता. रोहित शर्मा भारतीय डावाच्या १७ व्या षटकात दुखापतग्रस्त झाला. रोहित शर्माने सोधीच्या चेंडूवर षटकार ठोकताच त्याच्या मांडीचे स्नायू खेचले गेले. या सामन्यात तो ६० धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर रिटायर्ड हर्ट झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात दिवसभरात सापडले २ हजार ४३६ नवे कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ५२ हजार ६६७ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज २४३६ नविन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर ११८६ कोरोनाबाधित रुग्णांना आज घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आज ११८६ कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक ९०० रुग्ण मुंबई मंडळात सोडण्यात आले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ५०१, ठाणे ३३७, पालघर १६, रायगड ४६, नाशिक ४, जळगाव, ३, पुणे १०९, सोलापूर २, कोल्हापूर ३, सांगली ३, रत्नागिरी ९, औरंगाबाद ९४, जालना २, हिंगोली १, लातूर १०, उस्मानाबाद २, अकोला १७, अमरावती ४ आणि नागपूर २३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ७८ हजार ५५५ नमुन्यांपैकी ५२ हजार ६६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३० हजार २४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ४७९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

तर दुसरीकडे राज्यात ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून राज्यात एकूण मृतांची संख्या १६९५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे  शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापूरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ४२ पुरुष तर १८ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २७  रुग्ण आहेत तर २९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ४७ जणांमध्ये ( ७८ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३१,९७२ (१०२६)
ठाणे: ४५७ (४)
ठाणे मनपा: २७३९ (३८)
नवी मुंबई मनपा: २०६८ (३२)
कल्याण डोंबिवली मनपा: ९४१ (८)
उल्हासनगर मनपा: १८० (३)
भिवंडी निजामपूर मनपा: ९८ (३)
मीरा भाईंदर मनपा: ४७५ (५)
पालघर:१२० (३)
वसई विरार मनपा: ५९७ (१५)
रायगड: ४३१ (५)
पनवेल मनपा: ३६० (१२)
ठाणे मंडळ एकूण: ४०,४३८ (११५४)

नाशिक: १२३
नाशिक मनपा: १२९ (२)
मालेगाव मनपा: ७२१ (४४)
अहमदनगर: ५७ (५)
अहमदनगर मनपा: २०
धुळे: २३ (३)
धुळे मनपा: ९५ (६)
जळगाव: ३०१ (३६)
जळगाव मनपा: ११७ (५)
नंदूरबार: ३२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १६१८ (१०३)

पुणे: ३६० (७)
पुणे मनपा: ५३१९ (२६०)
पिंपरी चिंचवड मनपा: ३१७ (७)
सोलापूर: २४ (२)
सोलापूर मनपा:५९९ (४०)
सातारा: ३१४ (५)
पुणे मंडळ एकूण: ६९३३ (३२१)

कोल्हापूर:२४४ (१)
कोल्हापूर मनपा: २३
सांगली: ७२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: १६७ (४)
कोल्हापूर मंडळ एकूण: ५२७ (६)

औरंगाबाद:२६
औरंगाबाद मनपा: १२६३ (४८)
जालना: ६३
हिंगोली: १३२
परभणी: १८ (१)
परभणी मनपा: ६
औरंगाबाद मंडळ एकूण: १५०८ (४९)

लातूर: ७४ (३)
लातूर मनपा: ८
उस्मानाबाद: ३७
बीड: ३२
नांदेड: १५
नांदेड मनपा: ८३ (५)
लातूर मंडळ एकूण: २४९ (८)

अकोला: ३६ (२)
अकोला मनपा: ३८४ (१५)
अमरावती: १५ (२)
अमरावती मनपा: १६७ (१२)
यवतमाळ: ११५
बुलढाणा:४१ (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:७६६ (३४)

नागपूर: ७
नागपूर मनपा: ४६८ (७)
वर्धा: ६ (१)
भंडारा: १४
गोंदिया: ४३
चंद्रपूर: १५
चंद्रपूर मनपा: ९
गडचिरोली: १५
नागपूर मंडळ एकूण: ५७७ (८)

इतर राज्ये: ५१ (१२)
एकूण: ५२ हजार ६६७ (१६९५)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आयपीएल २०२० ची मोठी बातमी, आयपीएल ‘या’ दिवसापासून सुरू होऊ शकते ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयला आपली सर्वात मोठी स्पर्धा आणि जगातील सर्वात मोठी लीग असलेली आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब करावी लागली. मात्र, आयपीएल आयोजित करण्याच्या शक्यतेने पुन्हा जोर धरला आहे. सध्याच्या कोरोनाच्या या वाईट काळात क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी अशी आहे की, ‘ बीसीसीआय २५ सप्टेंबरपासून आयपीएलचे १३ वे सत्र आयोजित करण्याचा विचार करीत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार ही स्पर्धा १ नोव्हेंबरपर्यंत चालू शकते. मात्र, जेव्हा कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे कमी होतील तेव्हाच हे सर्व शक्य होईल.

सप्टेंबरमध्ये आयपीएल होणार ?
क्रीडा मंत्रालयाने स्टेडियम आणि क्रीडा संकुलात खेळाडूंना ट्रेंनिंग सुरु करण्याची परवानगी दिलेली आहे. हि परवानगी मिळताच आयपीएल सुरु करण्याबाबत विचार सुरू झाला. एका अहवालानुसार बीसीसीआयकडून २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान आयपीएल आयोजित करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे. एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने असेही म्हटले आहे की, आयपीएल आयोजित करण्याच्या पुढील रणनीतीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. हे लक्षात घेऊनच पुढील धोरणे बनविली जात आहेत. एका बातमी अशीहि आहे की यामध्ये परदेशी खेळाडूंचा मुद्दादेखील या रणनीतीमध्ये सामील आहे.

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की,’ बहुतेक फ्रँचायझींना परदेशी खेळाडूंसह आयपीएल खेळायचे असते. यावर चेन्नई सुपरकिंग्जने उघडपणे आपले मत दिले होते. चेन्नईच्या एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने असे म्हटले होते की,’ जर विदेशी खेळाडू लीगमध्ये सामिल झाले नाहीत तर आयपीएलकडे दुसरी विजय हजारे ट्रॉफी म्हणून पहिले जाईल. मात्र, शेवटी सर्व काही कोरोना विषाणूच्या बाबत येऊन थांबते. जर कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे थांबली नाहीत तर ही लीग रद्द करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चीनने दिली ऑस्ट्रेलियाला धमकी; अमेरिकेला साथ दिली तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनच्या राष्ट्रीय माध्यमांनी ऑस्ट्रेलियाला धमकी दिली आहे की,’ जर त्यांनी अमेरिकेला व्यापार युद्धात साथ दिली तर त्यांच्यासाठी ते खूप वेदनादायक ठरेल. ऑस्ट्रेलियाने अमेरिकेला पाठिंबा दिल्यास त्यांना बरेच नुकसान सोसावे लागेल, अशी धमकीवजा समज चीनने दिला आहे.

अमेरिकेने शुक्रवारी जाहीर केले की,’ ते ३३ चिनी कंपन्यांवर बंदी घालणार आहे. यानंतर चिनी राष्ट्रीय माध्यमांनी या निर्णयाला दोन देशांदरम्यानच्या शीत युद्धाची सुरुवात असे म्हटले आहे.

ग्लोबल टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखात असे म्हटले गेले आहे की,’ ऑस्ट्रेलियाने भारताप्रमाणेच गप्प रहावे आणि दोन्ही देशांचे नुकसान होऊ नये म्हणून या संपूर्ण वादापासून दूर राहिले पाहिजे . अमेरिकेपेक्षा चीनच्या धमक्यांमुळे ऑस्ट्रेलियाला अधिक नुकसान होईल. तसेच चीन अमेरिकेपेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक कडक शिक्षा देऊ शकतो, असेही या लेखात म्हटले आहे. कारण ते ऑस्ट्रेलियावर आर्थिकदृष्ट्या कमीच अवलंबून आहेत.

अमेरिका चीनच्या निर्यातीसाठी अव्वल क्रमांकाची बाजारपेठ आहे तर ऑस्ट्रेलिया यासाठी १४ व्या क्रमांकावर आहे. या लेखात असेही म्हटले आहे की,’ चीन आणि अमेरिका यांच्यात चालू असलेल्या कोल्डवारमध्ये वॉशिंग्टनला पाठिंबा दिला तर ऑस्ट्रेलियाला धडा शिकविण्यास चीन अधिक आनंद होईल. याचा सहज अर्थ असा आहे की ऑस्ट्रेलियाला अमेरिकेपेक्षा जास्त त्रास होईल.

कोरोना विषाणूच्या संसर्गासाठी ऑस्ट्रेलियाने चीनला दोष दिला. आपल्या संपादकीय लेखात त्यांनी असे म्हटले आहे की,’ ट्रम्प प्रशासन कोरोना विषाणूचा सामना करण्यास अपयशी ठरत आहे आणि लोकांचे लक्ष त्यापासून दूर करण्यासाठी ते चीनला दोष देतात. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा हा जवळपास १ लाखांवर पोहोचला आहे. या राजकीय षडयंत्रात अडकण्यासाठी इतर देशांना, विशेषत: ऑस्ट्रेलियाला गरज नाही, असेही या लेखात म्हटले आहे.

गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या आंतरराष्ट्रीय तपासणीच्या अमेरिकेच्या दाव्याचे समर्थन केले आणि त्यासाठी चीनला दोषी ठरवले. त्यानंतर चीनने ऑस्ट्रेलियावर हल्ले करण्यास सुरवात केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.