आयपीएल २०२० ची मोठी बातमी, आयपीएल ‘या’ दिवसापासून सुरू होऊ शकते ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयला आपली सर्वात मोठी स्पर्धा आणि जगातील सर्वात मोठी लीग असलेली आयपीएल अनिश्चित काळासाठी तहकूब करावी लागली. मात्र, आयपीएल आयोजित करण्याच्या शक्यतेने पुन्हा जोर धरला आहे. सध्याच्या कोरोनाच्या या वाईट काळात क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी अशी आहे की, ‘ बीसीसीआय २५ सप्टेंबरपासून आयपीएलचे १३ वे सत्र आयोजित करण्याचा विचार करीत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार ही स्पर्धा १ नोव्हेंबरपर्यंत चालू शकते. मात्र, जेव्हा कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे कमी होतील तेव्हाच हे सर्व शक्य होईल.

सप्टेंबरमध्ये आयपीएल होणार ?
क्रीडा मंत्रालयाने स्टेडियम आणि क्रीडा संकुलात खेळाडूंना ट्रेंनिंग सुरु करण्याची परवानगी दिलेली आहे. हि परवानगी मिळताच आयपीएल सुरु करण्याबाबत विचार सुरू झाला. एका अहवालानुसार बीसीसीआयकडून २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान आयपीएल आयोजित करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे. एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने असेही म्हटले आहे की, आयपीएल आयोजित करण्याच्या पुढील रणनीतीबाबत सध्या चर्चा सुरु आहे. हे लक्षात घेऊनच पुढील धोरणे बनविली जात आहेत. एका बातमी अशीहि आहे की यामध्ये परदेशी खेळाडूंचा मुद्दादेखील या रणनीतीमध्ये सामील आहे.

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की,’ बहुतेक फ्रँचायझींना परदेशी खेळाडूंसह आयपीएल खेळायचे असते. यावर चेन्नई सुपरकिंग्जने उघडपणे आपले मत दिले होते. चेन्नईच्या एका फ्रँचायझी अधिकाऱ्याने असे म्हटले होते की,’ जर विदेशी खेळाडू लीगमध्ये सामिल झाले नाहीत तर आयपीएलकडे दुसरी विजय हजारे ट्रॉफी म्हणून पहिले जाईल. मात्र, शेवटी सर्व काही कोरोना विषाणूच्या बाबत येऊन थांबते. जर कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे थांबली नाहीत तर ही लीग रद्द करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment