Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5745

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारांवर गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | जमावबंदीचे आदेश लागू असताना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येत नमाज पठण केल्याप्रकरणी विधानपरिषदेचे सदस्य असणारे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यावर आज पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तालुका आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास जिल्हाधिकारी यांनी मज्जाव केलेला आहे. दरम्यान आज मुस्लिम बांधवांचा ईद-उल-फित्र हा सण होता .जिल्ह्यात अत्यंत साध्या पद्धतीने आज हा सण साजरा करण्यात आला. पाथरी शहरा मध्येही ईदगाह मैदानावर नमाज न पठण करता घरोघरी नमाज पठण करण्यात आली.

परंतु राष्ट्रवादीचे विधानपरिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी त्यांच्या घरासमोर सोशल डिस्टन्स ठेवत पठण केलेल्या नमाज प्रकरणी त्यांच्यावर संचारबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी आज गुन्हे दाखल झाले आहेत. यावेळी इतर १२५ लोकांवर हे गुन्हे दाखल झाले असून आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राम मंदिरासाठी लॉकडाऊनमध्येही दानाचा प्रचंड ओघ सुरुच; जमा झाली ‘इतक्या’ कोटींची देणगी

अयोध्या । देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर सील करण्यात आल्या आहेत. सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे अद्याप बंद आहेत. परंतु या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात मोठी देणगी जमा झाली आहे. राम मंदिर बांधकामासाठी लॉकडाऊन दरम्यान 4 कोटी 60 लाखांची देणगी जमा झाली आहे.

देश-विदेशातील विविध देणगीदारांनी ही रक्कम राम मंदिर बांधण्यासाठी, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा केली आहे. यासंदर्भात राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, पैशाअभावी राम मंदिर बांधण्यात कोणताही अडथळा येऊ नये आणि भव्य, दिव्य असं राम मंदिर बांधणे ही भाविकांची इच्छा आहे. म्हणूनच भक्त सतत दान देत आहेत.

राम मंदिराचे पुजारी म्हणाले की, ट्रस्ट खात्यातील देणगीची रक्कम सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे राम मंदिरासंदर्भात दिलेल्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला मंदिराच्या बांधकामासाठी विश्वस्त स्थापन करण्यास सांगितले होते. कोर्टाच्या निर्देशानुसार सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. हा ट्रस्ट मंदिर बांधकामाची जबाबदारी सांभाळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशात मागील 24 तासांत 6 हजार 977 नवे करोनाग्रस्त, 154 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत देशभरात 6 हजार 977 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा मानला जात आहे. यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील तब्बल 1 लाख 38 हजार 845 पैकी 77 हजार 103 करोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उपाचारानंतर आतापर्यंत 57 हजार 720 रुग्णालायतून सुट्टी देण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 4 हजार 021 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दरम्यान,कोरोनाबाधित एकूण रुग्णांपैकी देशातील चाळीस टक्केपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत.

सोमवारी पहाटेपर्यंत देशात बरे होणाऱ्यांची संख्या 41.28% आहे. मात्र, तरीही भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत १० व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मुंबईवरून प्रवास करून आलेल्या एका कोरोना बाधितासह एका अनुमानिताचा सातार्‍यात मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आज वाई तालुक्यातील आसले येथील 70 वर्षीय मधुमेह असलेल्या कालच कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई तालुक्यातील जांभळेवाडी येथील 52 वर्षीय मधुमेह असलेल्या पुरुषाचा मृत्यू झाला असून कोरोना अनुमानित म्हणून त्याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

मृत्यू झालेले दोघेही मुंबईवरुन प्रवास करुन आलेले होते. त्यांना मधुमेह व श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 184 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 64, वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुगणालय कराड येथील 55, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 48 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 5 अशा एकूण 184 अनुमानित नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.

देशात कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट वाढला; 41 टक्क्याहून अधिक रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून सोमवारी पहाटेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या एक लाख 38 हजारांवर पोहोचली आहे. परंतु, या सर्वांमध्ये देशातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे, ही एक दिलासाची बातमी आहे. आतापर्यंत देशात सुमारे चाळीस टक्क्यांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रुग्ण 138845 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 77103 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यत 57720 रुग्ण हे बरे झाले असून 4021 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार देशात कोरोनावर मात करून बरे झालेल्या लोकांची संख्या सतत वाढत आहे आणि आता ती 60 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी देशातील चाळीस टक्केपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. सोमवारी पहाटेपर्यंत देशात बरे होणाऱ्यांची संख्या 41.28% आहे. जगाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारत सध्या रिकव्हरीच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावर आहे. परंतु, अशा देशांमध्येही भारताचा समावेश आहे जेथे रूग्णांचा वेग झपाट्याने वाढत आहे.

जर आपण देशातील पहिल्या पाच सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले्या राज्यांविषयी चर्चा केली तर इथेही रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही दिवसांत, देशात दररोज 2500 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. पहिल्या 5 राज्यांपैकी सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये 14600, तामिळनाडूत 8324, दिल्लीत 6540,गुजरातमध्ये 6412, तर राजस्थानमध्ये 3848 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. या पाच पाच राज्यांव्यतिरिक्त केरळ, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांतही बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे देशात अशी अनेक रुग्ण समोर आले आहेत ज्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत किंवा काही प्रमाणात लक्षणे आढळले आहेत. अशा परिस्थितीत काही दिवस उपचार व काळजी घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बरी होत असल्याचे दिसते, जे देशासाठी दिलासा देणारी बातमी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा! राज्यपालांच्या भेटीनंतर नारायण राणेंची मागणी

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांचा राजभवनाला भेटी देण्याचा सिलसिला सुरुच आहे. आज सकाळची शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज दुपारी नारायण राणेंनी राजभवनाला हजेरी लावली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून नारायण राणे थेट प्रसार माध्यमांना सामोरे गेले. यावेळी कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झालं आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही उपाययोजना नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय सेवा, रूग्णालय लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत नारायण राणे यांनी मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. राज्यपालांनी परिस्थिती हाताळण्यासाठी सूचना द्याव्यात. राज्यातील सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

राज्यात अनेकांनी उपासमार होत नाहीत. रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. ही परिस्थिती सरकारला हाताळता आलेली नाही, असा आरोप नारायण राणेंनी केला. राज्याला आतापर्यंत केंद्र सरकारने भरपूर मदत केली. मात्र तरीही राज्यातील नेते केंद्र सरकारवर नुसती टीका करत आहेत. सरकारी यंत्रणा कशी हाताळावी हे ज्यांना कळतं त्यांनी करावं, मात्र तसं केलं जात नाही. नाचता येईना, अंगण वाकडे अशी महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती आहे, असा टोला नारायण राणेंनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशात लवकरच 4 लसींचं वैद्यकीय परीक्षण घेतलं जाणार- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

मुंबई । कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जगभरातील कोरोना बाधित देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. अशातच देशात 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच वैद्यकीय परीक्षण (क्लिनिकल ट्रायल) घेतलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्या सोशल मीडियावरून साधलेल्या ऑनलाईन संवादात बोलताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ‘संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारी रोखण्यासाठी लस विकसित करत आहे. लस तयार करण्यासाठी 100 हून अधिक जण काम करत असून विविध टप्प्यांवर काम केलं जात आहे. जागतिक आरोग्य संघटना या प्रयत्नांसाठी मदत करत आहे. ‘भारतातही कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु असून अनेक वैज्ञानिक सक्रियरित्या काम करत आहेत. आपल्या देशात 14 ठिकाणी काम सुरु असून विविध टप्प्यांमध्ये हे संशोधन केलं जात आहे.’ असंही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे. तसेच जे कोणी लस शोधण्यासाठी काम करत आहेत. त्यांना आर्थिक मदत आणि नियमांनुसार, परवानगी देण्यात येणार आहे. 14 ठिकाणी कोरोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी 4 लसींचं लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार आहे.’ अशी माहिती त्यांनी डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यात मागील 24 तासात 51 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या 1809

मुंबई । संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताच असून कोरोनाने खाकी वर्दीतील योध्यांवर सुद्धा आपला हल्ला केला आहे. गेल्या 24 तासात 51 पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या 1809 वर पोहोचली आहे. या 1809 पोलिसांमध्ये 194 पोलीस अधिकारी आहेत आणि 1615 पोलीस कर्मचारी आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 18 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 678 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार पोहोचला आहे. तर आज एकाच दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आहेत. राज्यात काल 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. अशारीतीने राज्याचा कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.

दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 1635 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पियुषजी, आडमुठेपणा सोडून सहकार्य करा! रेल्वेमंत्र्यांना थोरातांचा सबुरीचा सल्ला

मुंबई । स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील महाविकास आघाडीतील नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात ट्वीटर वॉर पाहायला मिळतं आहे. दरम्यान आता या ट्विटर वॉरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एंट्री मारली आहे. ”परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन रेल्वे मंत्रालय पुरवत नाही. हे सत्य स्वीकारून या मजुरांना मदत करण्याऐवजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यां ट्वीटरवरून आक्रस्ताळेपणा करत आहेत हे दुर्देवी आहे. त्यांनी ही आडमुठी भूमिका सोडून सहकार्य करावे” असा सबुरीचा सल्ला थोरात यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला आहे.

”महाराष्ट्राला 157 ट्रेनची आवश्यकता आहे, त्यातील 115 मुंबईत अपेक्षित आहेत. यापूर्वी रेल्वे उद्या किती ट्रेन देणार आहे हे कळवायचे आणि आम्ही त्यांना यादी द्यायचो. सध्या ईदचा सण असल्याने अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात आहेत त्यामुळे पियुष गोयल यांनी थोडे सबुरीने घ्यावे.” असंही थोरात यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र सरकारने मजुरांशी अमानवीय व्यवहार केल्याच्या आरोपाची थोरात यांनी चांगलाच समाचार घेतला. ”उत्तर प्रदेशातले सत्ताधारी रोजगार निर्माण करू शकले नाहीत म्हणून तिथले लोक महाराष्ट्रात येतात. आई सांभाळत नाही म्हणून मावशीकडे येतात. दोन महिने त्यांच्याकडे काम, पैसा नसताना मावशीने त्यांना व्यवस्थित सांभाळले. हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समजून घ्यावे,” अशी समज थोरात यांनी आदित्यनाथ यांना दिली.

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात पोहचणाऱ्या मजुरांचे होत असलेल्या हलांवरून थोरात यांनी योगींना खडे बोल सुनावले. ”लॉकडाऊनमध्ये २ महिने महाराष्ट्र शासनाने लाखो स्थलांतरित मजूरांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सांभाळले. त्यांनी घरी जायची इच्छा व्यक्त केल्याने मोफत प्रवासाची व्यवस्था केली. रेल्वेतून जाताना त्यांना जेवणाचा डबा, पाणी देतोय, त्यांना सन्मानाने पाठवतोय, मात्र उत्तर प्रदेशात पोहोचल्यावर त्यांचे जे हाल होत आहेत त्याकडे  योगी आदित्यनाथ यांनी लक्ष द्यावं ”,उगाच टीका करू नये असे देखील थोरात म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

भूकंपादरम्यानही टीव्ही चॅनलला मुलाखत देत राहिल्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान,पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सकाळी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न एका दूरचित्रवाहिनीला लाईव्ह इंटरव्यू देत होत्या. हा इंटरव्यू सुरु असताना तिथे अचानक भूकंपाचे धक्के जाणवू लागले. मात्र , तरीही त्यांनी आपला इंटरव्यू पुढे सुरूच ठेवला. राजधानी वेलिंग्टनमधील संसद कॉम्प्लेक्समध्ये काय चालले आहे याची माहिती देण्यासाठी आर्डर्न यांनी मुलाखतकार रायन ब्रिजला अडवले. आर्डर्न म्हणाल्या, “रायन येथे भूकंप आला आहे आणि आत्ताच आपल्याला एक मोठा धक्का जाणवला आहे.” त्यानंतर खोलीत उजवीकडे-डावीकडे पाहत आर्डर्न म्हणाल्या, “आपण माझ्या मागे हालत असलेल्या वस्तू पाहू शकता.”

न्यूझीलंड हा देश पॅसिफिक महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’ क्षेत्रात येतो आणि येथे वारंवार येणाऱ्या भूकंपांमुळे ते एक अस्थिर बेट म्हणूनही ओळखले जाते. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार सोमवारी सकाळी आलेल्या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल एवढी होती आणि त्याचा केंद्रबिंदू हा ईशान्य वेलिंग्टनपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर समुद्राच्या खोलीवर होता. मात्र,यामुळे जीवित किंवा मालमत्तेचे कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. आर्डर्न यांनी आपली मुलाखत सुरू ठेवली आणि मुलाखतकाराला सांगितले की,’ भूकंप आता कमी झाला आहे.’ यावर तो म्हणाला, “मी ठीक आहे रायन. माझ्या डोक्यावर असलेल्या दिव्यांची आता हालचाल थांबली आहे, मला वाटते की, मी आता एका भक्कम ढाच्याखाली बसलेली आहे. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.