Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5746

जुलै मध्ये लॉन्च होणार सरकारची हि नवी स्कीम; लाखो रुपये कमावण्याची संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत ईटीएफ बाँड जुलैमध्ये पुन्हा आपले दार उघडणार आहे. म्युच्युअल फंडासहित बऱ्याच गुंतवणूकदारांना ईटीएफ बद्दल फारसे समजत नाही. ईटीएफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड हे शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हे सहसा एका विशिष्ट इंडेक्सचा ट्रॅक ठेवतात.  ईटीएफ हे म्युच्युअल फंडासारखेच असतात. मात्र, या दोघांमधील मुख्य फरक हा आहे की, ईटीएफ हे केवळ स्टॉक एक्सचेंजमधूनच खरेदी किंवा विकले जाऊ शकतात. ज्याप्रकारे आपण शेअर्स खरेदी करतो. त्याच प्रकारे आपण एक्सचेंजच्या ट्रेडिंगच्या तासांमध्ये ईटीएफ देखील खरेदी करू शकता. हेच कारण आहे की, आम्ही त्यांच्याबद्दल काही बेसिक गोष्टी सांगणार आहोत.

Bharat Bond ETF anchor investor quota subscribed 1.7 times

एडलवाइज अ‍ॅसेट मॅनेजमेंटने जुलैमध्ये भारत बॉन्ड ईटीएफचा दुसरा हप्ता सुरू करण्याची घोषणा केली आहे. याच्या दुसर्‍या हप्त्यात नवीन भारत बाँड ईटीएफच्या दोन सीरीज असतील. याची मॅच्युरिटी अनुक्रमे एप्रिल २०२५ आणि एप्रिल २०३१ असेल. ज्या गुंतवणूकदारांकडे डिमॅट खाते नाही तेदेखील या समान मॅच्युरिटीवाल्या ‘भारत बॉन्ड फंड्स ऑफ फंड्स ‘ (एफओएफ) मध्ये गुंतवणूक करू शकतील.

भारत बॉन्ड ईटीएफ प्रोग्रामही भारत सरकारची एक स्कीम आहे जी, डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक अ‍ॅसेट मॅनेजमेंटने सुरू केली आहे आणि नंतर एडेलविस अ‍ॅसेट मॅनेजमेंटला या उत्पादनाच्या डिझाईन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली. ईटीएफच्या दोन नवीन सीरिजच्या लॉन्च नंतर, एडलवाइज म्युच्युअल फंडाने बाजारातून १४,००० कोटी रुपये उभे करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

एडलवाइज अ‍ॅसेट मॅनेजमेंटने सांगितले की,’ या इश्यू द्वारे बाजारपेठेच्या मागणीवर आधारित ११,००० कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य आहे. याद्वारे जमा होणारी रक्कम केवळ ३,००० कोटी रुपये इतकी असेल. परंतु यावेळी गुंतवणूकदारांकडून जास्त प्रतिसाद मिळाल्यास ती वाढवून १४,००० कोटी रुपये इतकी केले जाऊ शकते.

कर कसा आकारला जाणार ?
या बाँड ईटीएफवर डेट म्युच्युअल फंडाप्रमाणेच कर आकारला जातो. म्हणजेच जर गुंतवणूक तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवली तर इंडेक्सेशन बेनिफिटसह २० टक्के कर भरावा लागेल. जो की तीन वर्षांच्या पर्यायात तुम्हाला जवळपास ६.३ टक्के रिटर्न मिळेल. त्याचबरोबर १० वर्षांच्या पर्यायात ७ टक्के व्याज दिले जाईल.

किती नफा होईल ?
समजा जर तुम्ही भारत बाँड ईटीएफमध्ये एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यावर ७.५८ टक्क्याने रिटर्न मिळेल, तर १० वर्षांत तुमचे पैसे वाढून २.०७ लाख रुपये होतील. यावर कर म्हणून ७,८३६ रुपये भरावे लागतील. यामध्ये, आपल्याला १.९९ लाख रुपये मिळतील.

किमान गुंतवणूकीची आवश्यकता किती आहे ?
किमान गुंतवणूकदार भारत बॉन्ड ईटीएफमध्ये एक हजार रुपयांची गुंतवणूक करु शकतात. यानंतर आपण १,००० रुपयांच्या मल्टीपलवर गुंतवणूक करू शकता.

तेथे एक्झिट लोड असेल का ?
अ‍ॅलॉटमेंट झाल्यापासून ३० दिवस पूर्ण झाल्यावर किंवा त्याआधीच्या गुंतवणूकीवर ०.१० % एक्झिट लोड लागू असेल. मात्र ,३० दिवस पूर्ण झाल्यानंतर रिडेम्प्शन किंवा स्विच करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी त्यात विशेष काय आहे ?
हे ईटीएफ व्यवस्थापित करण्यासाठी एडलवाइज एएमसी जबाबदार आहे. या फंडासाठी ‘फंड ऑफ फंड’ (एफओएफ) देखील लॉन्च केले आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना सामान्य म्युच्युअल फंडाप्रमाणे गुंतवणूक करण्याची मुभा मिळेल. छोट्या गुंतवणूकदारांसाठी ही एफओएफ सोयीच्या आणि लिक्विडिटीच्या बाबतीत अधिक चांगली आहे.

याची तुलना अन्य उत्पादनांशी केली जाऊ शकते ?
भारत बाँड ईटीएफचा कालावधी २०२३ आणि २०३० इतका आहे. या संदर्भात, याची तुलना निश्चित फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन आणि बँकिंग आणि पीएसयू फंडांशी करता येईल. डेट म्युच्युअल फंडांच्या तुलनेत बाँड ईटीएफची कॉस्ट खूपच कमी असते.

या कंपन्यांचा सहभाग असेल
बाँड ईटीएफ निफ्टी इंडिया बाँड इंडेक्समध्ये गुंतवणूक करते. यात एएए रेट केलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे ज्यामध्ये एक्झिम बँक, एचपीसीएल, हडको, आयआरएफसी, नाबार्ड, एनएचएआय, एनएचपीसी, एनटीपीसी, पीएफसी, एनपीसीआयएल, पॉवर ग्रिड, आरईसी आणि सिडबी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारत बाँड ईटीएफच्या पहिल्या टप्प्यात १२,४०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम ही यशस्वीरित्या जमा करण्यात आली.

इंडिया बाँड ईटीएफ कार्यक्रमात गुंतवणूकदारांचा सहभाग आणि एक्सचेंजमध्ये चांगली लिक्विडिटी दिसून येते. फंड हाऊसने सांगितले की,’ बिड-डेस्क स्प्रेड (खरेदी-विक्री किंमतीतील फरक) ५ ते १० बीपीएसच्या रेंजमध्ये राहिला आहे. या ईटीएफमधील डेली अ‍ॅवरेज ट्रेडिंग व्हॅल्यू ही ३ ते ३.५ कोटी रुपयांपर्यंत झाली आहे, ज्यामुळे हे भारतातील लिक्विड ईटीएफपैकी एक बनले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

दणका! वाधवान पिता-पुत्रांना कोर्टाने अंतरिम जामीन नाकारला

मुंबई । पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाधवान पिता-पुत्राचा अंतरिम जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे वाधवान पिता-पुत्रांसाठी हा मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे. न्यायामूर्ती पी. राजवैद्य यांच्या न्यायालयात आज ही तातडीची सुनावणी झाली.

राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे दोघेही पिता-पुत्र पीएमसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी पीएमएलए कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, आर्थर रोड तुरुंगात कोरोनाची लागण झालेले कैदी वाढत असून आम्हाला विविध प्रकारचे आजार आहेत आणि त्यामुळे आम्हाला धोका वाढत आहे. त्यामुळे अंतरिम जामीन देण्यात यावा, असे या दोघांनीही कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटलं होतं. मात्र, कोर्टाने या दोघांचीही विनंती अमान्य करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

मार्च महिन्यातही वाधवान पिता-पुत्रांनी कोरोनाचं कारण पुढे करत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी मॅजिस्ट्रेट कोर्टाने जामीनही दिला होता. मात्र, त्यानंतर ईओडब्ल्यूने या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आदेशला स्थगितीही देण्यात आली होती. त्यानंतर वाधवान पिता-पुत्रांनी आज पुन्हा कोरोनाचं कारण पुढे करत अंतरिम जामीन मागितला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पियुषजी, राज्यसभेत तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना टोला

मुंबई । स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून सुरु झालेल्या श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कालपासून ट्विटर वॉर सुरु आहे. या शाब्दिक लढाईत आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर ट्विटरवर निशाणा साधला आहे. ‘पियुषजी, राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका’ असा चिमटा राऊत यांनी पियुष गोयल यांना लगावला. तसेच १४ मे रोजी रेल्वेकडून चालवण्यात आलेल्या नागपुर-उधमपूर ट्रेनच्या विलंबावरूनही राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना लक्ष्य केले.

पियुषजी,१४ मे २०ला सुटलेल्या नागपुर – ऊधमपुर ट्रेन साठी कोठली यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? आता मग यादी कसली मागताय? राज्यसभेत आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय हे विसरू नका” असा टोला राऊत यांनी पियुष गोयल यांना लगावला आहे. १४ मे रोजी चालवण्यात आलेली नागपुर- उधमपूर ट्रेन तब्बल नऊ तास उशीरा आली होती. त्यामुळे या ट्रेनला उधमपूरमध्ये जाण्यासही विलंब लागला होता. या सगळ्यामुळे ट्रेन सुटण्याच्या वेळेत स्टेशनवर आलेल्या मजुरांची मोठी गैरसोय झाली होती यावरच राऊत यांनी रेल्वेमंत्री गोयल यांच्यावर निशाणा साधला. 

दरम्यान, संजय राऊत यांनी कालही पियुष गोयल यांच्यावर बोचरी टीका केली होती. महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

२० वर्षीय नवविवाहितेसोबत सासऱ्याने केली जबरदस्ती; सुनेनं बनवला व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरर गावात पाच महिन्यांपूर्वीच लग्न करून आलेल्या नवविवाहित वधूवर तिच्या सासऱ्यानेच जबरदस्ती केली. जेव्हा या नवविवाहित वधूने तिच्या सासूला याबद्दल सांगितले तेव्हा सासूने तिला गप्प रहायला सांगितले. पहिल्यांदा तिच्या नवऱ्याचा तिच्यावर विश्वासच बसला नव्हता. नंतर त्याने सांगितले की, जर ते पुन्हा असे काही करत असतील तर मोबाइलवरून त्याचा व्हिडिओ बनव. दुसर्‍याच दिवशी जेव्हा तिच्या सासऱ्याने पुन्हा तिच्यावर जबरदस्ती केली तेव्हा त्या वधूने मोबाईलवर काढलेला व्हिडिओ पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी आरोपी सासर्‍याविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली.

पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत, २० वर्षीय नवविवाहित मुलीने १९ डिसेंबर २०१९ रोजी तिचे लग्न झाल्याचे म्हटले आहे. लग्नानंतर तीन दिवसांनी तिच्या सासऱ्याने तिचा विनयभंग केला आणि तिच्याशी अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने तिच्या नवऱ्याला याबद्दल सांगितले तेव्हा त्याने तिलाच फटकारले. दोन महिन्यांनंतर तिच्या सासऱ्याने पुन्हा तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर जेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने या सर्व गोष्टी आपल्या नवऱ्याला सांगितल्या.

२३ मे रोजी रात्री ती घरी एकटीच होती, तिचा नवरा कामावर गेला होता. त्यवेळी सासऱ्याने तिच्या खोलीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. सकाळी तिने आपल्या सासूला याबद्दल सांगितले, तेव्हा सासूने तिला गप्प राहण्यास सांगितले. जेव्हा या नवविवाहित महिलेने झालेली घटना आपल्या पतीला सांगितली, तेव्हा त्याला पहिल्यांदा विश्वासच बसला नव्हता. मग यावर तो म्हणाला की,”आज रात्री मी घरी येणार नाही. आजही त्याचे वडील तिच्याबरोबर जबरदस्ती करायला आले तर त्याचा मोबाईल वरून व्हिडिओ बनव.”

नवविवाहितेने अगदी असेच केले आणि व्हिडिओ बनविण्यासाठी मोबाइल आपल्या खोलीत लपविला. रात्री, जेव्हा सासरा तिच्या खोलीत आला आणि पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा हे सर्व त्या लपवलेल्या फोनमध्ये रेकॉर्ड केले गेले. यांनतर तिने सकाळी ही सर्व गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली. तो मोबाइल व्हिडिओ पोलिसांना देऊन सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर पीडित मुलीच्या सासर्‍याविरूद्ध कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एएसआय बलविंदर कौर यांनी सांगितले की, ‘आरोपी हा सध्या फरार असून पीडितेची वैद्यकीय चाचणी सोमवारी करण्यात आली आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अरे बापरे बाप! जगातील सर्वात खोल सोन्याच्या खाणीत पोहोचला ‘कोरोना’

वृत्तसंस्था । जगभरातील बहुसंख्य देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावला आहे. या देशात कोरोनाने निवांतपणे हातपाय पसरले आहेत. तेही इतके की जगातील सर्वात खोल असलेल्या सोन्याच्या खाणीत या चिवट कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील या खाणीत काम करणाऱ्या १६४ कामगारांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

‘पोनेन्ग’ ही सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरातील दक्षिण-पश्चिम भागात आहे. या खाणीतील सोने काढण्याचे हक्क अँग्लोगोल्ड आशांती कंपनीला देण्यात आले आहेत. पृथ्वीतळापासून खाली ४ किमी खोल अंतरावर ही खाण आहे. जगातील सर्वात खोल खाण म्हणून या खाणीची ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोनेन्ग सोन्याच्या खाणीतील कामगार कोरोनाग्रस्त झाल्यानं या खाणीतील काम अनिश्चितकाळासाठी बंद करण्यात आले आहे.
एंग्लोगोल्ड अशांती या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात एकाला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ६५० कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १६४ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी अनेकांमध्ये लक्षण दिसून आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. एक महिन्याच्या लॉकडाउनंतर मागील महिन्यातच खाण काम सुरू झाले होते. या कालावधीत सर्व सोन्याच्या खाणीदेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. मे महिन्याच्या सुरुवातीला कामगार संघटनांनी कोर्टात कामगार सुरक्षांबाबत दाखल केलेला खटला जिंकला होता. त्यानंतर सरकारने कामगारांना आवश्यक सुरक्षा उपकरणे देण्याबाबतचे निर्देश दिले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या आयातीत १०० % घट; जाणून घ्या काय होणार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याची आयात एप्रिलमध्ये सलग पाचव्या महिन्यात घटली आहे. कोविड -१९ च्या संसर्गामुळे सध्या सुरु असलेल्या जागतिक लॉकडाऊनमुळे ते १०० टक्क्यांनी घसरून २.८३ लाख डॉलरवर गेली. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१९ मध्ये ते ३९.७ अब्ज डॉलर्स इतके होते. सोन्याची आयात घसरल्याने देशाची व्यापारातील तूट कमी होण्यास मदत झाली. एप्रिलमध्ये देशाची व्यापारातील तूट ही ६.८ अब्ज डॉलर्स इतकी होती, जी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये १५.३३ अब्ज डॉलर्स होती. डिसेंबरपासून देशात सोन्याच्या आयातीत घट होते आहे. भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सोन्याची आयात करणारा देश आहे.

दरवर्षी ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते
देशात दरवर्षी सुमारे ८०० ते ९०० टन सोन्याची आयात केली जाते. एप्रिलमध्ये देशातून रत्ने व दागिन्यांची निर्यात ९८.७४ टक्क्यांनी घसरून ३.६ करोड डॉलर्स इतकी राहिली. देशाची सोन्याची आयात आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये १४.२३ टक्क्यांनी घसरून २८.२ अब्ज डॉलरवर गेली आहे, जे कि २०१८-१९ मध्ये ३२.९१ डॉलर्स इतकी होती. सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या चालू खात्यातील तूटीवर मोठा ताण येणार आहे. चालू खात्यातील तूट म्हणजे देशातील परकीय भांडवलाच्या येण्या आणि जाण्यातील फरक.

मार्चमध्ये भारताने किती सोन्याची आयात केली ?
भारत सोन्याची आयात करणारा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात केवळ २५ टन सोन्याची आयात करण्यात आली. गेल्या वर्षी याच काळात ते ९३.२५ टन होते.

सोन्याची किंमत ५३ हजारांपर्यंत पोहोचू शकते
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की जागतिक परिस्थिती लक्षात घेता येत्या काही महिन्यांत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकेल. आंतरराष्ट्रीय बाजारात ही किंमत प्रति औंस २,००० डॉलरच्या पातळीवर पोहोचू शकते. मात्र, त्यात सुधारणाही दिसेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

इतिहासात पहिल्यांदाच टाटा समूहावर आली ‘ही’ वेळ

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर केल्यापासून सर्व उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी टाटा समूहाने इतिहासात प्रथमच टाटा सन्सचे चेअरमन आणि सहायक कंपनीचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)यांच्या पगारात  जवळजवळ २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबर व्यवहारात स्पष्टता आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

टाटा सन्स समूहातील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात जास्त फायदा मिळवून देणारी कंपनी टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस (TCS)ने सर्वात प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथ यांच्या पगारात कपात करण्याची घोषणा केली. तर इंडिया हॉटेल्सने याआधीच सांगितले की ते वरिष्ठांच्या या तिमाहीतील पगाराचा एक भाग कंपनीला झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून देणार आहेत. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा इंटरनॅशनल, टाटा कॅपिटल तसेच वोल्टास या सर्व कंपन्यांचे सीईओ आणि एमडी देखील कमी पगार घेणार आहेत. चालू आर्थिक वर्षात या कंपन्यांच्या बोनसमध्ये देखील कपात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टाटा समूहाच्या इतिहासात असे कधीच झाले नाही. यावेळी व्यवसाय वाचवण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे, असे टाटा ग्रुपमधील एका सीईओने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. टाटा समूहाची संस्कृती आहे की शक्य असेल तिथपर्यंत कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे. टाटा समूहाच्या आधी देशातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा आणि सीईओ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. पण टाटाने आतापर्यंत कर्मचारी कपात केलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कर्तव्यावर असणार्‍या कोरोना योध्दा डाॅक्टरचा कोरोना अहवाल पोझीटीव्ह

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्हा रुग्णालय येथे कर्तव्यावर असणार्‍या कोरोना योध्दा डाॅक्टरांचा कोरोना अहवाल सकारात्मक आलेला आहे. मात्र संबंधीत डाॅ. हे मागील १५ दीवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातच कर्तव्यावर होते. संबंधीत कोरोना योध्दा डाॅ. हे अचलपुर तालूक्यातील असल्याची माहीती असून मात्र हे डाॅ. मागील १५ दीवसांपेक्षा जास्त काळापासून त्यांच्या गावी आलेच नासल्याची माहीती ऊपवीभागीय अधिकारी यांनी दीली.

कोणीही पॅनीक होऊ नये जि डाॅक्टर व्यक्ती कोरोना पाॅझीटीव्ह आहे. त्यांचेवर ऊपचार सुरू आहेत. त्या मागील १५ दीवसांपासून अमरावती येथेच कर्तव्यावर होते. यादरम्यान त्यांचा कोरोनाचा अहवाल पाॅझीटीव्ह आलेला असुन सदर कर्तव्यदक्ष डाॅ. हे अचलपुर परतवाडा या गावामधे आलेले नाहीत त्यामूळे कोणिही कोणत्याही अफवा चुकीची माहीती पसरवून जनतेला भयभित करू नये. मात्र खबरदारी म्हणून प्रत्येकाने सोशल अंतर ठेवून व्यवहार करावा. मास्क लावूनच घराबाहेर पडावे असे आवाहन अचलपुरचे ऊपवीभागीय अमरावती संदीपकूमार अपार यांनी जनतेला केलेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लज्जास्पद! क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहितेसोबत पोलिसाचे गैरवर्तन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये नवविवाहित मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. ही महिला आपल्या पतीसह दिल्लीहून किच्छा येथे परत आली होती. तेथे त्यांना पुलभट्टा परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. हे प्रकरण वाढल्याचे पाहून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत पोलिस उपअधीक्षक सुरजितसिंग म्हणाले की, ‘ या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यावर तहरीरच्या आधारे गुन्हा दाखल करण्यासाठी कारवाई केली जात आहे.’

काय आहे हे संपूर्ण प्रकरण
किच्छाच्या पुलभट्टा भागातील सूरजमल संस्थेत क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. दिल्लीहून परत आलेल्या या नव्या जोडप्यासही येथे ठेवण्यात होते. त्यावेळी ड्युटीवर असलेला एक पोलिस कर्मचारी दारूच्या नशेत या नवदांपत्याकडे पोहोचला आणि त्यानंतर तो त्या नवविवाहितेचा हाथ पकडून तिला खालच्या मजल्यावरील खोलीत घेऊन येऊ लागला. जेव्हा नवरा-बायकोने त्याला विरोध केला, तेव्हा तो कर्मचारी म्हणाला की,’ स्त्रियांसाठी खाली राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे, तेव्हा तिला माझ्याबरोबर खाली यावे लागेल. जेव्हा त्या नवविवाहितेने तेथे जाण्यास नकार दिला, तेव्हा आरोपी पोलिसाने त्या महिलेवर हल्ला करुन तिचे कपडे फाडले. पोलिस कर्मचाऱ्याच्या या कृत्याला घाबरून संबंधित महिलेने तेथून पळ काढला आणि तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला.

पोलिस कर्मचारी निलंबित , कारवाई केली जाणार
या प्रकरणात किच्छाचे आमदार राजेश शुक्ला यांनी आक्षेप घेत म्हटले की,’ या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. त्यांनी पीडितेच्या कुटूंबाला आश्वासन देत या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. त्याचवेळी, पोलिस उपअधीक्षक सुरजित सिंह म्हणाले की, ‘ या आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला बरखास्त करण्यात आले आहे. त्याच्यावर तहरीरच्या आधारे गुन्हा नोंदविण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अमेरिकेने पाकिस्तानला ईदनिमित्त दिली ‘ही’ मोठी भेट

वृत्तसंस्था । अमेरिकेने पाकिस्तानला ईदनिमित्त मोठी भेट दिली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका पाकिस्तानला ६० लाख डॉलरची मदत करणार आहे. या मदतीमुळे पाकिस्तान कोरोनाविरोधात अधिक मजबुतीनं लढणार असल्याचे अमेरिकेच्या राजदूतांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान जगाकडे मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला अमेरिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.

पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत पॉल जोन्स यांनी ईदनिमित्त पाकिस्तानमधील नागरिकांना शुभेच्छा देताना अमेरिका पाकिस्तानला ६० लाख डॉलरची मदत करणार असल्याचे सांगितले. ही रक्कम कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या सेवेत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयोगात आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आरोग्य केंद्रात, रुग्णालयात करोनाचा प्रादुर्भाव होणार नसल्याची अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्त परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी मोबाइल लॅब तयार करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”