Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5748

जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येताना… राज यांचे योगींना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई । यापुढे महाराष्ट्राला किंवा इतर राज्यांना उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. योगी यांनी या नव्या नियमांसंदर्भातील माहिती पत्रकारांशी बोलताना दिली होती. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या पोस्टमधून यासंदर्भात आपले मत मांडताना राज म्हणाले, “उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं,” असं म्हटलं आहे.

याचबरोबर योगी यांनी दिलेल्या इशाऱ्यावर राज यांनी महाराष्ट्र सरकारलाही सल्ला दिला आहे. “महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा,” असं राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.facebook.com/RajThackeray/posts/814573852407099

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश असलेले धोरण तयार करणार असल्याचे सांगितले आहे. “कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल. आमच्या परवानगीशिवाय त्यांना राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती योगी यांनी दिली. योगी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

ईदनिमित्त सलमान चाहत्यांना देणार एक विशेष सरप्राईज,रिलीज होणार नवीन गाणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी ईदच्या निमित्ताने सुपरस्टार सलमान खान आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या प्रदर्शनातून चाहत्यांना मेजवानी देत असतो. २००९पासून तो ‘वॉन्टेड’, ‘दबंग’, ‘सुलतान’, ‘बजरंगी भाईजान’ यासारख्या चित्रपटांद्वारे ईदवर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे. यावर्षीदेखील तो आपला बहुप्रतिक्षित ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे, ज्यामध्ये दिशा पटानी आणि रणदीप हूडादेखील दिसणार आहेत. पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे यंदाच्या ईदमध्ये त्याचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहू शकणार नाहीत. पण या ईदवर सलमान आपल्या चाहत्यांना निराश मात्र करणार नाही.

तो आपल्या चाहत्यांसाठी ‘सलमान खान एंटरटेनमेंट’ ही परंपरा कायम ठेवेल. यावर्षी लॉकडाऊनमुळे या दबंगचा एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही, मात्र आपली तारीख लक्षात ठेऊन उद्या ईदच्या दिवशी तो चाआपल्या हत्यांसाठी एक खास गाणे प्रदर्शित करणार आहे. निःसंशय, सलमानच्या सर्व चाहत्यांसाठी तो एक अविस्मरणीय क्षण असेल.

 

यापूर्वीही सलमानने लॉकडाउन दरम्यान ‘प्यार करोना’ आणि ‘तेरे बिना’ या नावाची दोन गाणी नुकतीच आपल्या चॅनेलवर रिलीज केली होती.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

आता परभणीमध्येच कोरोना संशयीत रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरु

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे |

कोरोना रुग्ण स्वॅब तपासणी संदर्भात जिल्ह्यासाठी चांगली बातमी असून आता रुग्ण तपासणी अहवाल प्रतीक्षेची गरज भासणार नसून जिल्ह्याच्या ठिकाणी आता तपासणी लॅब सुरू करण्यात आली आहे. परभणी जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या पुढाकारातुन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिसोदीया पॅथोलॉजी लॅब यांच्या सहकार्याने रविवार दि. २४ मे रोजी कोरोना संशयीत रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरु करण्यात आली आहे.

पूर्वी रुग्ण तपासणी अहवाल येण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी लागत होता. हे सर्व अहवाल पुणे व नांदेड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत होते. दरम्यान सद्यस्थितीत आजपर्यत जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह संख्या ३६ वर पोहचली आहे.रुग्णापैकी एक उपचारामुळे कोरोनामुक्त झाला आहे तर एकाचा मृत्यू झालाय.

रविवार दि. २४ मे रोजी कोरोना विषाणु संदर्भात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयात पूर्वीचे १ हजार ८३६ व रविवारी दाखल ५४ असे एकुण १ हजार ८९० संशयीत व्यक्तींची नोंद झालेली होती. दरम्यान यापैकी उशीरा १४ जनांचे स्वॅब अहवाल नांदेड येथील प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आले आहेत असे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गुजरात म्हणजे ‘टायटॅनिकचं’ बुडणारं जहाज; उच्च न्यायालयाचे रुपाणी सरकावर ताशेरे

अहमदाबाद । देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने देशात गंभीर परिस्थिती तयार आहे. त्यातच महाराष्ट्रामागोमाग गुजरातमध्येही कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. याच परिस्थितीत आता अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयातील दुरावस्था पाहता गुजरात उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यातील कोरोना नियंत्रणासोबतच रुग्णांना उपचार मिळण्याविषयीची जनहित याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणी करतेवेळी न्यायालयाकडून राज्यातील परिस्थितीची तुलना ही बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी करण्यात आली.

न्यायमूर्ती जे.पी. परडीवाला आणि आय.जे वोरा यांच्या खंडपीठानं विजय रुपाणींच्या नेतृत्त्वाखालील सरकारला याविषयीचे खडे बोल सुनावत परिस्थिती अत्यंत वाईट आणि वेदनादायी असल्याचं मत मांडलं. सिव्हिल रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणं अपेक्षित असतं. पण, इथे मात्र परिस्थिती ही एखाद्या अंधारकोठडी किंवा त्याहूनही वाईट स्तरावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. दुर्दैवानं गरिब आणि निराधारांकडे कोणताही पर्याय नसल्यामुळं त्यांना यावरच अवलंबून राहावं लागतं, असा सूर न्यायालयाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात आळवण्यात आला.

रुग्णालयातील अवस्था अतिशय दयनीय असून, ती कोणा एका अंधारकोठडीपेक्षा वेगळी नाही किंबहुना परिस्थिती त्याहूनही वाईट आहे या शब्दांत उच्च न्यायालयानं राज्य शासनाचा खरपुस समाचार घेतला आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या निरिक्षणानंतर शनिवारी याबाबचा अहवाल देण्यात आला होता. शुक्रवारपर्यंत अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा ३७७ वर पोहोचला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

शरद पवार राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनीच पवार यांना भेटीचे आमंत्रण दिले असल्याचे समजत आहे. पवार नुकतेच राजभवन मध्ये पोहोचले असून त्यांच्यात चर्चा आहे.

सध्या राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्ष नेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन सरकारबाबत तक्रार करताना दिसत आहेत. तसेच नुकतेच राज्यपालांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत राज्य सरकारला निर्णय घेण्याचे सुचवल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, शनिवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. आपली हि भेट सदिच्छा भेट असल्याचे राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र राऊत यांच्या राज्यपाल राजकीय वर्तुळांत मात्र उलट सुलट चर्चाना पेव फुटला होता. आता शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने सर्वांचे या भेटीत काय चर्चा होते याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

परभणीत रविवारी कोरोनाग्रस्त सापडण्याचा उच्चांक; एकाच दिवसात तब्बल १४ पॉझीटिव्ह

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

मागच्या आठवड्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन अंकी संख्येवर गेल्यानंतर काल सायंकाळी उशिरापर्यंत आकडा झपाट्याने वाढत गेला. शनिवार पर्यंत जिल्ह्यात बावीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या असताना रविवारी नांदेडहुन आलेल्या तपासणी अहवालानंतर रुग्णांची संख्या १४ ने वाढत आता ३६ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान आणखी दोनशे रुग्णांचे स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने जिल्हावाशीयांची धडधड वाढलेली आहे.

जिल्ह्यात रविवारी सायंकाळी नांदेड येथील प्रयोगशाळेतून आलेल्या कोरणा पॉझिटिव्ह अहवालाने एकच खळबळ उडाली. यावेळी जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल चौदा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात गंगाखेड तालुक्यातील ११ जणांचा समावेश असून परभणी तालुक्यात २ तर सेलू तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामध्ये परभणीतील १, माळसोन्ना मधील १,सेलू तालूक्यातील १ तर नागठाणा मध्ये ४ व माखणी गावातील सात जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मागील आठ दिवसांमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनासह जिल्हावाशीयांची चिंता वाढली आहे. त्यात हे सर्व रुग्णबाहेर जिल्ह्यातून आले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अजून प्रयोग शाळेतील २०० तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने रुग्ण संख्या आणखी वाढण्याची भीती कायम आहे.

आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग

औरंगाबाद प्रतिनिधी । ‘माझा वॉर्ड, कोरोनामुक्त वॉर्ड’ या अभियानानंतर महापालिकेने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ हे घोषवाक्य घेऊन मोबाईल अॅप तयार केले आहे. हे अॅप शनिवारपासून म्हणजेच 23 तारखेपासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, मोबाईल फोनमध्ये अॅप डाऊनलोड करून त्यात आरोग्याबद्दलची माहिती भरल्यास अवघ्या पाच मिनिटांत संबंधित व्यक्ती कोरोना संशयित आहे की नाही याची पडताळणी होते, असा दावा करण्यात आला आहे. महापालिकेने तयार केलेला राज्यात अशा प्रकारचा पहिलाच अॅप असल्याचेही सांगण्यात आले.

आरोग्याच्या दृष्टीने अॅप तयार करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेतल्यानंतर श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. नागेश डोंगरे यांच्या मदतीने ‘माझे आरोग्य माझ्या हाती’  (MHMH- Mazi Health Mazya Hati) हे हेल्थ अॅप तयार करण्यात आले. अॅपबद्दल प्रा. डोंगरे म्हणाले, की अॅपमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी, सर्दी, खोकला, ताप, रक्तदाब, मधुमेह, किडनीविकार याबद्दलची माहिती भरल्यावर काही मिनिटांत तुमचा झोन ठरवला जातो. ग्रीन झोन (सुरक्षित झोन), ऑरेंज झोन (अंडर ऑब्झर्व्हेशन) आणि रेड झोन (बाधित) अशा तीन झोनमध्ये तुम्हाला माहिती मिळते.

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार
एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात येण्यासाठी सहा ते सात दिवस लागतात; मात्र या अॅपमुळे तीन दिवसांत निदान करता येणे शक्य आहे. तसेच सेल्फ टेस्ट आणि कोरोना वॉरियर्स असे दोन भाग अॅपमध्ये करण्यात आले आहेत. सेल्फ टेस्टमध्ये स्वतः माहिती अॅपवर भरू शकतो. कंटेनमेंट भागांमध्ये कोरोना वॉरियर्सच्या माध्यमातून या अॅपच्या सहाय्याने माहिती भरून घेतली जाणार आहे. स्वतःची माहिती भरण्यासाठी ऑक्सिमीटर असणे गरजेचे आहे.

वॉररूममध्ये डेटा जमा
हे अॅप नागरिकांसाठी उपलब्ध असून, एखाद्याने माहिती भरल्यास त्यांचा डेटा महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू केलेल्या वॉररूममध्ये जमा होईल. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची माहिती महापालिकेकडे संकलित होईल, असे प्रा. डोंगरे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुण्यातील भुसार मार्केट आजपासून सुरु

पुणे प्रतिनिधी । पुणे मार्केट यार्डमधील भुसार बाजार हा संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही सुरु होता. मात्र येथील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने बाजार प्रशासनाने काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बाजार बंद ठेवण्यात आला होता. मात्र आजपासून भुसार मार्केट सुरु करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक घेऊन तातडीने बाजार सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार योग्य ती खबरदारी घेऊन सोमवार पासून भुसार मार्केट सुरु करण्यात आले आहे.

पुणे शहरात कोरोना विषाणूचे संकट गहिरे झालेले असल्यामुळे मार्केट यार्डात योग्य ती खबरदारी घेऊनच काम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देण्यात येणार असून गर्दी आटोक्यात राहण्यासाठी आवक मर्यादित ठेवण्यात येणार आहे. पुण्यातील मुख्य समजले जाणारे मार्केट यार्डातील भुसार मार्केट सुरु झाल्यामुळे पुणेकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

दरम्यान भुसार बाजारातील काही व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. यामुळेच घाबरून येथील प्रशासनाने बाजार बंद ठेवला होता. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट आदेश आल्याने त्यांनी सोमवारपासून बाजार पुन्हा सुरु केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत बाजार बंद राहता कामा नयेत अशा सूचना गेल्या आठवड्यात दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समितीचे प्रशासक आणि व्यापारी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तातडीने बाजार पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले होते.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण; उपचारांना तात्काळ सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन, पीटीआय | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठक तसेच इतर कामांसाठी अशोक चव्हाण यांचा नांदेड ते मुंबई हा प्रवास सतत सुरुच होता. या प्रवासादरम्यानच त्यांना बाधा झाल्याचं पीटीआय सूत्रांकडून समोर आलं आहे. अशोक चव्हाण हे ६१ वर्षांचे असून २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा आली होती. जवळपास २ वर्षं त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषविलं आहे.

दरम्यान याआधी राज्य मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र जितेंद्र आव्हाड या संकटातून आता सुखरुप बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा रविवारी रात्री ५० हजार २०० च्या पुढे गेला. यामधील १६३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ हजार ६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रविवारी एकाच दिवसात ३ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा ३० हजार ५०० पार गेला असून मुंबईतील मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ९८८ वर गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजार पार; दिवसभरात सापडले ३ हजार ४१ नवीन रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २३१ झाली आहे. आज ३०४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार ८६२ नमुन्यांपैकी ३ लाख १२ हजार ६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५० हजार २३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १६३५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३९, पुण्यात ६, सोलापुरात ६, औरंगाबाद शहरात ४,लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३४ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३० रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील :(कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ३०,५४२ (९८८)
ठाणे: ४२० (४)
ठाणे मनपा: २५९० (३६)
नवी मुंबई मनपा: २००७ (२९)
कल्याण डोंबिवली मनपा: ८८९ (७)
उल्हासनगर मनपा: १८९ (३)
भिवंडी निजामपूर मनपा: ८६ (३)
मीरा भाईंदर मनपा: ४६४ (५)
पालघर:११४ (३)
वसई विरार मनपा: ५६२ (१५)
रायगड: ४१२ (५)
पनवेल मनपा: ३३० (१२)
ठाणे मंडळ एकूण: ३८,५८५ (१११०)

नाशिक: ११५
नाशिक मनपा: ११० (२)
मालेगाव मनपा: ७११ (४४)
अहमदनगर: ५३ (५)
अहमदनगर मनपा: २०
धुळे: २३ (३)
धुळे मनपा: ९५ (६)
जळगाव: २९४ (३६)
जळगाव मनपा: ११७ (५)
नंदूरबार: ३२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १५७० (१०३)

पुणे: ३४० (५)
पुणे मनपा: ५०७५ (२५१)
पिंपरी चिंचवड मनपा: २६७ (७)
सोलापूर: २४ (२)
सोलापूर मनपा:५२२ (३२)
सातारा: २७९ (५)
पुणे मंडळ एकूण: ६५६२ (३०९)

कोल्हापूर:२३६ (१)
कोल्हापूर मनपा: २३
सांगली: ६९
सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: १५५ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: ५०४ (५)

औरंगाबाद:२३
औरंगाबाद मनपा: १२३३ (४६)
जालना: ५६
हिंगोली: ११२
परभणी: १७ (१)
परभणी मनपा: ५
औरंगाबाद मंडळ एकूण: १४४६ (४७)

लातूर: ६७ (३)
लातूर मनपा: ४
उस्मानाबाद: ३१
बीड: २६
नांदेड: १५
नांदेड मनपा: ८३ (५)
लातूर मंडळ एकूण: २२६ (८)

अकोला: ३६ (२)
अकोला मनपा: ३६६ (१५)
अमरावती: १३ (२)
अमरावती मनपा: १५५ (१२)
यवतमाळ: ११५
बुलढाणा:४० (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:७३३ (३४)

नागपूर: ७
नागपूर मनपा: ४६४ (७)
वर्धा: ४ (१)
भंडारा: १०
गोंदिया: ३९
चंद्रपूर: १०
चंद्रपूर मनपा: ९
गडचिरोली: १३
नागपूर मंडळ एकूण: ५५६ (८)

इतर राज्ये: ४९ (११)
एकूण: ५० हजार २३१ (१६३५)