महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण; उपचारांना तात्काळ सुरुवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन, पीटीआय | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठक तसेच इतर कामांसाठी अशोक चव्हाण यांचा नांदेड ते मुंबई हा प्रवास सतत सुरुच होता. या प्रवासादरम्यानच त्यांना बाधा झाल्याचं पीटीआय सूत्रांकडून समोर आलं आहे. अशोक चव्हाण हे ६१ वर्षांचे असून २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा आली होती. जवळपास २ वर्षं त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषविलं आहे.

दरम्यान याआधी राज्य मंत्रिमंडळातील जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र जितेंद्र आव्हाड या संकटातून आता सुखरुप बाहेर पडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा रविवारी रात्री ५० हजार २०० च्या पुढे गेला. यामधील १६३५ रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ हजार ६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रविवारी एकाच दिवसात ३ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा ३० हजार ५०० पार गेला असून मुंबईतील मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ९८८ वर गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment