Sunday, December 28, 2025
Home Blog Page 5747

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन आठवड्यांपासून विविध आजारांशी झगडत असलेले तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे सोमवारी निधन झाले. बलबीर यांच्या पश्चात त्यांची मुलगी सुशबीर आणि तीन मुले कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर असा परिवार आहे. मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक अभिजीत सिंग यांनी प्रेस ट्रस्टला सांगितले की,” सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. ” नंतर त्यांची नात कबीर हिने दिलेल्या एका संदेशात म्हणाली, “नानाजीचे सकाळी निधन झाले.”

बलबीर सिनिअर येथे ८ मे रोजी दाखल झाले होते. १८ मे पासून तो अर्ध जाणीव अवस्थेत होते आणि त्याच्या मेंदूत रक्ताची गुठळी जमली होती. तसेच फुफ्फुसात निमोनिया आणि तीव्र तापा आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

८ मे रोजी बलबीर सिनिअर यांची प्रकृती खालावली तेव्हा त्यांना सेक्टर-३६ मधील त्यांच्या घराजवळील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. ७ मेच्या रात्री बलबीर सीनियर यांना तीव्र ताप आला होता. याआधी त्यांच्या कुटूंबाने त्यांना घरीच स्पंज बाथ दिला पण जेव्हा त्यांची प्रकृती सुधारली नाही तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यूमोनियामुळे रुग्णालयात जवळपास १०८ दिवस घालवल्यानंतर बलबीर सिनिअर यांना गेल्या वर्षी जानेवारीत पीजीआयएमआरमधून डिस्चार्ज मिळाला होता.

सिनिअर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील १६ महान ऑलिम्पियनपैकी बलबीर हे आपल्या देशातील एक महान खेळाडू होते. हेलसिंकी ऑलिम्पिकमधील (१९५२) फायनलमध्ये नेदरलँड्सविरुद्ध त्यांनी केलेला पाच गोलचा विक्रम आजही कायम आहे. १९५७ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. बलबीर सिनिअर यांनी लंडन (१९४८), हेलसिंकी (१९५२) आणि मेलबर्न (१९५६) या तीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदके जिंकली. १९७५ मध्ये ते विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय संघाचे व्यवस्थापकही होते.

गेल्या दोन वर्षांत त्यांना चौथ्यांदा रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले गेले. गेल्या वर्षीही जानेवारीत ते फुफ्फुसांच्या न्यूमोनियामुळे तीन महिन्यांपर्यंत रूग्णालयात होते. आपल्या कौशल्याने मेजर ध्यानचंद यांच्या समतुल्य असे म्हटले जाणारे बलबीर सिनिअर आझाद हे भारतातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक होते. ते आणि मेजर ध्यानचंद कधी एकत्र खेळू शकले नाहीत, पण ते भारतीय हॉकीची शान होते, ज्यांनी संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली. १९२४ मध्ये पंजाबमधील हरिपूर खालसा गावात जन्मलेल्या बलबीर सिनिअर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी दीर्घकाळापासून होते आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशात उष्णतेची लहर; हवामान खात्याकडून ‘या’ राज्यांना रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली । यंदाच्या उन्हाळ्याच्या मौसमात देशाला सध्या ऊन्हाची चांगलीच झळ बसत असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजधानी दिल्लीमध्ये उन्हाच्या झळा बसत असून येथील तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळपासून उन्हाचे चटके लागायला सुरवात होते. त्याचप्रमाणे देशातील अन्य भागांमध्ये देखील उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उत्तर भारतात पुढील ३ दिवस तीव्र तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार काही जागांवर तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता आहे. तापमानाचा वाढता पारा पाहता हवामान खात्यानं अनेक ठिकाणी रेड अलर्ट देखील जारी केला आहे.

सोमवारी दिल्ली, पजांब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढील ३ दिवस अधिक गर्मी वाढेल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या राज्यातील लोकांना सावध राहण्याचा इशारा सरकारने दिला आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी मध्य तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण होवू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

तुम्ही राज्य सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना दम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला आवश्यक रेल्वे पुरविल्या नाहीत असा दावा केला होता. या विधानाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटर द्वारे उत्तर दिले होते. त्यांनी ट्विट द्वारे सोमवारच्या १२५ रेल्वेची आवश्यक माहिती देण्याची मागणी ट्विटर वरून केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्विटरवरून चांगलाच दम भरला आहे. आता यादी कसली मागता आहात? आपण राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहात हे विसरू नका अशा शब्दांत त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना दम भरला आहे.

गोयल यांनी जवळपास ६ ट्विट केले आहेत ज्यामध्ये ठरलेल्या १२५ रेल्वेतील प्रवाशांच्या यादीची मागणी केली आहे. ते ठराविक अंतराने ट्विटर वरून यादी मागत होते. मध्यरात्री २ वाजता आलेल्या यादीनुसार केवळ ४६ रेल्वेची यादी मिळाली असून त्यापैकी ५ रेल्वे पश्चिम बंगाल आणि ओडिसा इथे जाणाऱ्या आहेत ज्या Amphan चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. इतर प्रवाशांची यादी कुठे आहे. अशी विचारणा त्यांनी ट्विट द्वारे केली होती. आम्ही १२५ रेल्वे ठरविल्या होती त्यातील केवळ ४१ रेल्वेच्या प्रवाशाची यादी मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते.

 

यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी १४ मे २०२० रोजी सुटलेल्या नागपूर उधमपूर रेल्वेच्या साठी कोणती यादी घेतली होती असा करारा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच आधी रेल्वे आणि मग माणसे जमा करण्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतलेत सांगाल काय? असाही प्रश्न त्यांनी केला आहे. पियुष गोयल यांच्या सततच्या ट्विट मुळे राऊत चांगलेच भडकले असल्याचे दिसून येते आहे. दरम्यान १२५ रेल्वेचा तपशील मागत असताना आम्ही रात्रभर रेल्वेच्या उपलब्धतेसाठी काम करत असल्याचे ट्विट गोयल यांनी केले होते.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ठाकरे सरकारवर ताशेरे ओढणार्‍या योगी आदित्यनाथांना रोहित पवारांचे सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच ट्विटर वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथापि महाराष्ट्राच्या आघाडी सरकारला दूषणे दिली आहेत. योगी यांनी महाराष्ट्र सरकारवर कामगारांचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांना काम न देऊन सर्व काही सोडून जाण्यास भाग पाडले असे त्यांनी म्हंटले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटला सणसणीत प्रत्युत्तर देत महाराष्ट्र सरकारने उत्तरप्रदेश मधील कामगारांना कशाप्रकारे सहकार्य केले आहे हे सांगितले आहे.

‘महाराष्ट्रासाठी आपला घाम गाळलेल्या कामगारांसोबत शिवसेना-काँग्रेस सरकारने केवळ छळ केला आहे. संचारबंदीत त्यांच्यासोबत विश्वासघात केला आणि त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देऊन घरी जाण्यास भाग पाडले. या अमानवीय व्यवहारासाठी मानवता उद्धव ठाकरे यांना कधीच माफ करणार नाही’ असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटला उत्तर देत आघाडी सरकारने सीएम फंडातील पैसे खर्च करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याचे रोहित पवार यांनी ट्विट द्वारे सांगतिले आहे. तसेच आता त्यांच्या योग्य वैद्यकीय तपासण्या करून त्यांना नोकरी देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले आहे.

सोबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांनी केलेले आरोप खोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. या व्हिडिओमध्ये एक कामगार महाराष्ट्रातील लोकांनी आम्हांला अन्नपाणी दिले काळजी घेतली मात्र उत्तरप्रदेशमध्ये अन्नपाणी काहीच मिळत नसून गावेच्या गावे रिकामी करून लोक निघून जात असल्याचे सांगत आहे. या ट्विटद्वारे आता उत्तरप्रदेश सरकारने या घरी आलेल्या श्रमिकांची काळजी घेतली पाहिजे. असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

Netflix ची नवीन ग्राहकांसाठी ‘हि’ खास ऑफर; बेसिक आणि स्टॅण्डर्ड प्लॅन होणार मोफत अपग्रेड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची भारतातली वाढती लोकप्रियता आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यात चढाओढ सुरु आहे. यामुळे या क्षेत्रातील बड्या कंपन्याही आता विविध स्कीम्सच्या माध्यमातून नवीन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्ट्रीमिंगच्या बाबतीत, जगातील नंबर एकची कंपनी असलेल्या नेटफ्लिक्सने आता भारतात नवीन ग्राहकांसाठी काही खास ऑफर दिलेल्या आहेत.

नेटफ्लिक्सने आपल्या ग्राहकांसाठी ‘प्लॅन अपग्रेड’ स्कीम सुरू केली आहे. या अंतर्गत, कोणताही ग्राहक बेसिक किंवा स्टॅण्डर्ड प्लॅन घेईल, त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय या प्लॅनचा लाभ दिला जाईल.

बेसिक आणि स्टॅण्डर्ड प्लॅनसाठी स्कीम
नेटफ्लिक्सची बेसिक, स्टॅण्डर्ड आणि प्रीमियम हे तीन प्लॅन आहेत. या तीनही प्लॅनमध्ये वेगवेगळ्या सुविधा आहेत. अशा परिस्थितीत जर एखादा ग्राहक ४९९ रुपयांची बेसिक मेंबरशिप घेत असेल तर नेटफ्लिक्स त्याला स्टॅण्डर्ड मेंबरशिप (दरमहा ६९९ रुपये) मध्ये रुपांतरित केले जाईल.

त्याचप्रमाणे, ६९९ रुपयांच्या स्टॅण्डर्ड मेंबरशिपसह सुरु होणार्‍या ग्राहकांना ७९९ रुपयांच्या प्रीमियम प्लॅनवर ऑटो-अपग्रेड केले जाईल. प्रीमियम मेंबरशिपमध्ये,यूजरला एकाचवेळी ४ स्क्रीनसह अल्ट्रा एचडी कॉन्टेंटची सुविधा मिळते.

मात्र, ही सुविधा केवळ नवीन मेंबरशिप घेणार्‍या ग्राहकांना दिली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त, मेंबर्सना ३० दिवसांच्या अपग्रेड केलेल्या प्लॅनचाही लाभ घेता येईल.

३० दिवसांनंतर जुन्या प्लॅनकडे परत
मात्र, ३० दिवसांची मुदत पूर्ण झाल्यावर नेटफ्लिक्स आपल्या मेंबर्सना अपग्रेड केलेला प्लॅन सुरू ठेवू इच्छित आहे की नाही ते विचारेल. जर एखादा मेंबर हे सुरू ठेवू इच्छित असेल तर येथून पुढे त्याला त्याची वास्तविक किंमत मोजावी लागेल. जर कोणाला हे सुरू ठेवायचे नसेल तर तो आपल्या जुन्या प्लॅनकडे परत जाईल.

गॅझेट्स ३६० ने नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, “नेटफ्लिक्सचा आनंद घेता यावी यासाठी कंपनी भारतात नवीन मेंबर्सना जोडण्यासाठी एक वेगळी मार्केटिंग प्रमोशन रणनीति राबवित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Video: भूकंपाचे हादरे बसत असताना सुद्धा ‘या’ पंतप्रधान मुलाखात देतच राहिल्या

वेलिंग्टन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साऱ्या जगासमोर गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वागण्याबोलण्याने आदर्श प्रस्थापित करणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचण्याविषयीच्या चर्चेबाबतच कारण म्हणजे भूकंप. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या एका मुलाखतीदरम्यान, भूकंप आलेला असताना यावेळी जेसिंडा त्यावरची प्रतिक्रिया अनेकांनाच आश्चर्यचकित करून टाकणारी आहे.

न्यूजहबचे सूत्रसंचालक रायन ब्रिज यांना मध्येच थांबवत त्यांनी वेलिंग्टनच्या परिसरात काय होत होतं याविषयी सांगितलं. ‘रायन, इथे भूकंप येत आहे. थोडासा हादरा बसत आहे’, आपल्या आजूबाजूला पाहत पंतप्रधानांचे हे उद्गार अनेकांच्या भुवया उंचावून गेले. सूत्रसंचालकांना आपण असणाऱ्या खोलीमधील वस्तू हलताना दिसत असल्याचं सांगणाऱ्या या पंतप्रधानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत होत आहे.

सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देशातील अनेक नागरिकांना भूकंपाचा हादरा जाणवला. हा हादरा इतका ताकदीचा होता की, मांडणीतील समानही खाली पडलं. दरम्यान, मुलाखतीदरम्यानच भूकंप अल्यामुळे त्याविषयी माहिती देत तो थांबल्यानंतरही जेसिंडा यांनी वृत्तनिवेदकांना याबाबत सूचित केल्याचं पाहायला मिळालं.

न्यूझीलंड हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. त्यामुळं केव्हा केव्हा इथे येणाऱ्या भूकंपांना शेईक आईल्स म्हणूनही संबोधलं जातं. अमिरिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भूगर्भशास्त्र अहवालानुसार सोमवारी पॅसिफिक महासागरात ५.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता. वेलिंग्टनपासून हे ठिकाण जवळपास १०० किलोमीटरच्या अंतरावर होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन, मराठी मातीतील रांगडा गडी काळाच्या पडद्याआड

टीम हॅलो महाराष्ट्र | गावाकडची माणसं चित्रपटात दिसलं की एकदम भारी फीलिंग वाटतं. या माणसांचं बोलणंही इतकं सडेतोड आणि रांगडं असतं की चित्रपट किंवा मालिकांमध्ये असणारी त्यांची छोटी भूमिकादेखील कायमची लक्षात राहून जाते. वयाच्या साठीनंतर महत्त्वाच्या चित्रपटांत मिळालेल्या छोट्या भूमिका दमदारपणे करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या म्हातारबाबांचं म्हणजेच रामचंद्र धुमाळ यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं, ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांमार्फत देण्यात आली.

मराठी चित्रपट आणि हिंदी वेबसिरीज मधून त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. फँड्रीमधील जब्याचे आजोबा, सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेचा बाप, सैराटमधील परशाचे आजोबा, ख्वाडामधील रांगडा मेंढपाळ, म्होरक्या चित्रपटातील मार्गदर्शक गावकरी अशा अनेक भूमिकांनी रामचंद्र धुमाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. माणसांत मिसळणारा माणूस अशी रामचंद्र धुमाळ यांची ख्याती होती. भूमिकेला न्याय देताना तरुणांना लाजवेल अशा प्रकारचं काम रामचंद्र धुमाळ यांनी केलं. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊनमुळे जीव वाचले नाहीत तर जीव गेले, नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचे खळबळजनक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात पसरलेला कोरोना विषाणू सर्वांमध्ये भीती निर्माण करत आहे. इटलीमधील त्याचे तांडव बघून हळूहळू अनेक देशांनी संचारबंदी लागू केली. आतापर्यंत जगभरात ५५,०३,४५९ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी ३, ४६, ७७४ मृत्यू झाले आहेत. तर २३,०३,६३१ रुग्ण बरे झाले आहेत. जगात अनेक ठिकाणी अजून संचारबंदी आहे. तर काही ठिकाणी हळूहळू नियम शिथिल केले जात आहेत. अशावेळी २०१३ चे रसायनशास्त्रातले नोबेल विजेते प्रा. मायकल लेविट यांनी संचारबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे विधान केले आहे. प्रा. नील फर्ग्युसन यांनी सुचविलेल्या संचारबंदीच्या मॉडेलमुळे १० ते १२ पट अधिक प्रमाणात मृत्यू झाल्याचे त्यांनी म्हण्टले आहे. जेपी मॉर्गन यांनी दिलेल्या अहवालानुसार “संचारबंदीमुळे साथीला अटकाव बसण्याऐवजी लाखो लोकांचा रोजगार नष्ट झाला असल्याचा” दावा त्यांनी केला आहे.

ते म्हणतात, संचारबंदीमुळे कुणाचे जीव वाचले नाहीत. याउलट कदाचित जीव गेले आहेत, संचारबंदीमुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कदाचित कमी झाले असेल पण कौटुंबिक अत्याचार, घटस्फोट, मद्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आणि आपल्याकडे असेही लोक आहेत ज्यांच्यावर इतर परिस्थितीत उपचार केले गेले नाहीत. लेविट यांना २०१३ मध्ये “जटिल रासायनिक प्रणालीसाठी मल्टिस्केल मॉडेल विकसित केल्याबद्दल” नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांचे असेही म्हणणे आहे की सरकारने लोकांना मास्क लावण्यास प्रोत्साहित केले पाहिजे तसेच सामाजिक अलगाव सारख्या इतर उपायांचा शोध लावला पाहिजे. ते असेही म्हणाले की, संचारबंदी काढून टाकल्यानंतर विषाणूची त्याची स्वतःची गतिशीलता असल्याचे सूचित होते. जी बऱ्याचदा संचारबंदीच्या उपायांशी विसंगत असते. याचा प्रत्यय डेन्मार्क मध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. तेथील शाळा, शॉपिग मॉल सुरु केल्यानंतर संक्रमणाचा दर कमी झाल्याचे दिसून आले तर जर्मनी मधील संचारबंदीचे नियम शिथिल केल्यानंतर संक्रमण १ % नी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

प्रा. लेविट म्हणाले, “नेते घाबरून गेले , लोक घाबरून गेले त्यामुळे चर्चेचा प्रचंड अभाव दिसून आला. ते साथीचे रोग तज्ञ् नाहीत मात्र चीनमध्ये या संकटाची सुरुवात झाल्यावरच केवळ आकड्यांच्या आधारावर स्वतःच्या अभ्यासातून त्यांनी पुढील पर्यायी भविष्यवाणी केली होती. संचारबंदी प्रभावी होऊ शकेल हे मान्य करत असताना ते असेही म्हणतात की, हे सर्व काही मध्ययुगीन काळासारखे सुरु आहेत. साथीचे रोग तज्ञ त्यांच्या दाव्यांची अतिशोयोक्ती करतात. आणि त्यामुळे लोक त्यांचे ऐकण्याची शक्यता असते. ते म्हणाले की त्याच क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञ देखील म्हणतात प्रा. फर्ग्युसन यांचे काम सत्यापित करू शकत नाहीत. इतर प्रतिस्पर्धी शास्त्रज्ञांनी काही मॉडेल सुचविले होते, जे भिन्न परिणाम दाखवितात. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुढील २-३ दिवस तापमानात होणार वाढ ; २९ मे पासून पाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २ ते ३ दिवसांत हवेतील उष्णता प्रचंड वाढणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तर पॅरा आणखीनच वाढेल. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २९ मेनंतरच उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक विशेष मेट्रोलॉजिकल सेंटरचे प्रमुख राजेंद्रकुमार गेन्नामनी म्हणाले की,’ भारतात गेल्या २ दिवसात यावर्षीच्या सर्वांत जास्त ४७.६ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. ते म्हणाले की,’२८ मेपासून हीटवेव्ह कमी होण्यास सुरवात होतील, कारण त्यानंतर देशातील उत्तर भागात जोरदार वारे वाहू लागतील. २९ मे पासून, पाऊसही सुरू होईल आणि त्यामुळे तापमान हे ४० डिग्री सेल्सियस पर्यंत खाली घसरेल. नैऋत्य मॉन्सून हा १ जून ते ५ जून या काळात केरळ किनारपट्टीवर धडकेल आणि १५ जून ते २० जून दरम्यान तो मुंबईत पोहोचेल.

 

दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीच्या सर्व भागात तापमान हे सुमारे ४५–४६ डिग्री आहे. भारत, राजस्थान, चूरू आणि पिलानी येथे देशात सर्वाधिक ४७.६ अंश तापमान नोंदले गेले आहे. हवामान खात्याने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की,’ येत्या पाच दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ तसेच तेलंगणा या काही भागात जोरदार गरम वारे वाहतील. त्यामुळे तापमानात आणखीनच वाढ होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

धोक्याची घंटा! कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत १० व्या स्थानी

नवी दिल्ली । भारतात कोरोनाच्या साथीला रोखण्यात अजूनही यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, काल रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या स्थानी पोहोचला आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या ४ हजारावर पोहोचली आहे. यामुळे अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान नंतर आता १० व्या क्रमांकावर भारत पोहोचला आहे. भारतात सध्या ७५ हजार ७०० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्सनंतर पाचव्या क्रमांकावर आहे. जगभरात सध्या करोनाचे एकूण २८ लाख सक्रिय रुग्ण असून एकट्या अमेरिकेत ही संख्या ११ लाख आहे.

गेल्या २४ तासात भारतात ६५६६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एका दिवसात मिळालेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर १५३ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात महाराष्ट्र अजूनही पहिल्या क्रमांकावर असून ३०४१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईत १७२५ नवे रुग्ण मिळाले आहेत. याचसोबत राज्याने कोरोना रुग्णांचा ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात ५८ नव्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १६३५ झाली आहे. तामिळनाडूत ७६५ नवे रुग्ण सापडले असून रुग्णसंख्या १६ हजार २७७ झाली आहे. आठ रुग्णांच्या मृत्यूसोबत मृतांची संख्या ११२ झाली आहे.

तर पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत २०८ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासोबत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६७७ झाली असून २७२ मृतांची नोंद झाली आहे. करोनाचा फटका बसलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये गुजरातचाही क्रमांक असून ३९४ नवे रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या १४,०६३ वर पोहोचली असून मृतांच्या संख्या ८५८ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”