सातारा जिल्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि रुग्णालयातील अनुमानितांचे रिपोर्ट आले असून आज पुन्हा ३१ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीवर यांनी दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधित रुग्णसंख्या ३०९ वर पोहोचली आहे.
शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ७७ नवीन कोरोनाग्रस्त सापडले होते. त्यानंतर नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते. आता आज पुन्हा ३१ रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले आहे. जिल्ह्यात पाटण तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोना ग्रामिण भागात पसरु लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आज नव्याने सापडले रुग्ण हे पुण्या मुंबईहून प्रवास करुन आलेले आहेत. तसेच बाहेरुन प्रवास करुन आलेल्यांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी होम क्वारंटाईनमध्ये राहताना नियमांची कडक अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”
कोरोनाबाधित रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आज आणखी एक थक्क करणारी यशस्वी कामगिरी करून दाखविली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल झालेल्या गलमेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथील २४ वर्षीय गर्भवती महिलेची सीझर प्रसुती करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या कोरोना पॉझिटिव्ह महिलेने आज दुपारी दीडच्या सुमारास एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, त्याचे वजन पावणे तीन किलो इतके आहे. कोरोनाच्या महाभंयकर साथीतही डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून या बाळाचा जन्म झाला असून, बाळ आणि बाळाची आई अशी दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. अशाप्रकारे कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी प्रसुती होण्याची ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना असून, कृष्णा हॉस्पिटलच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
मुंबईहून १५ दिवसांपूर्वी २४ वर्षीय गर्भवती गलमेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथे आली होती. तिच्यामध्ये ‘कोविड-१९’ची काही प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने तिला २२ मे रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी तत्काळ तिचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला. २३ मे रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ती कोरोना पॅाझिटिव्ह आढळल्याने तिच्यावर तातडीने कोरोनाच्या उपचारास प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, या गर्भवती महिलेवर स्त्री व प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. एन. एस. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. मनिषा लद्दड व डॉ. आशुतोष बहुलेकर यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र उपचार सुरू करण्यात आले.
या महिलेचा गर्भवती काळ पूर्ण झाला असल्याने आणि तिला उच्चरक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी तत्काळ तिची सिझेरियनद्वारे प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिची सिझेरियनद्वारे यशस्वीपणे प्रसुती करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती यशस्वीपणे करण्यामध्ये स्त्री व प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष बहुलेकर, डॉ. रश्मीन साहू, डॉ. चिराग शर्मा, भूलतज्ज्ञ डॉ. माया कमलाकर, डॉ. निकिता लोले, डॉ. शालू शर्मा, बालरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. वाय. क्षीरसागर, डॉ. सोहम क्षीरसागर, डॉ. साबू इब्राहीम, डॉ. सुकेश, डॉ. दुर्गाप्रसाद, नर्स जयश्री विटकर यांच्यासह अन्य निवासी डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफचा समावेश होता.
या यशाबद्दल कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी हॉस्पिटलमधील स्त्री व प्रसुतीरोग विभाग आणि बालरोग विभागातील सर्व डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे कौतुक केले आहे. दरम्यान, नवजात बालकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, त्याच्या अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”
मी मंत्री मंडळात नाही…सरकारपण आमचं नाही…हे सरकार शिवसेनेचे आहे अशा आशयाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एक क्लिप व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खुलासा केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करू नये असं मत देसाई यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील सरकार हे महाआघाडीचे आहे. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा आहे काँग्रेसचा नाही. या तीन पक्षाच्या सरकारचे नेतृत्व शिवसेना करत आहेत. तीन पक्ष मिळून आम्ही एकत्र काम करतोय त्यामुळे बाबांच्या बोलण्याचा विपर्यास काढू नये असं देसाई यांनी म्हटले आहे.
बाबांना असे म्हणायचे असेल की मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. सरकारमधला एक घटक पक्ष काँग्रेस आहे. पृथ्वीराज बाबा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या सुचनांचा, धोरणाचा, भावनाचा निश्चितपणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आम्ही आदर करत आहोत. त्यांच्या राज्याच्या तसेच जनतेच्या हिताच्या सुचना, मार्गदर्शन निश्चितपणाने आम्ही विचारात घेऊन काम करत असतो. त्यामुळे कोणीही त्यांच्या बोलण्याचा विर्यास करू नये, असेही मंत्री देसाई म्हणाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”
मी मंत्रीमंडळात नाही आहे. सरकारपण आमचं नाहीये. हे सरकार शिवसेनेचं आहे असं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारची एक आॅडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
व्हायरल आॅडिओ क्लिप मध्ये चव्हाण हे एका कार्यकर्त्याशी बोलत असल्याचे समजत आहे. काही कामानिमित्त कार्यकर्त्याने फोन केला असता मी मंत्रीमंडळात नाही. हे सरकारपण आमचे नाही. हे सरकार शिवसेनेचे सरकार आहे असं विधान चव्हाण यांनी केल्याच्या चर्चेमुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी सरकारकडे शिफारस करतो असं म्हणत चव्हाण यांनी कार्यकर्त्याची समजूत काढल्याचे आॅडिओ क्लिपमध्ये दिसत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांकडे नेतृत्व गुण नसल्याचे विधान केले होते. त्यानंतर आपण असे कोणतेही विधान केलेले नाही असं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले होते. आता या व्हायरल आॅडिओ क्लिपच्या सत्यतेबद्दलही अधिक माहिती मिळालेली नसून चव्हाण यांनी यावर अजून आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मागील आठवडाभर सोशल मीडियावर ‘नथीचा नखरा’ या कार्यक्रमाने धुराळा उडवून दिला होता. नथ घातलेले फोटो अपलोड करण्याचं चॅलेंज महिला वर्गाला दिलं जात होतं, आणि अत्र-तत्र-सर्वत्र नथच दिसत होत्या. यंदा लॉकडाऊनमुळे लोकांना म्हणावं त्या पद्धतीने लगीन सराई आणि इतर गोष्टींत वेळ देता न आल्याने नटण्या-मुरडण्याची हौस करणंही लांबच राहिलं होतं. अशात ‘नथीचा नखरा’ करण्याची संधी मिळाली आणि समस्त स्त्री वर्गाच्या जीवात जीव आला. सोशल मीडियावरच नथीविषयी उपयुक्त माहिती उपलब्द झाली. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांपर्यंत ती पोहचवत आहे.
स्त्रीसाठी आत्मसन्मानाचे एक अभूतपूर्व आभूषण म्हणजे तिची नथ. नथीशिवाय महाराष्ट्रीयन स्त्रीचा शृंगार अधुरा, नथ म्हणजे सौभाग्याचं लेणं, नथ म्हणजे स्त्रिचा आत्मसम्मान. पुढे काही नथींच्या डिझाइनची माहिती देत आहोत. पुढच्या वेळी नथ खरेदी करताना तुम्हाला या माहितीचा नक्की फायदा होईल.
१. बानू नथ – या नथ डिझाइनला महाराष्ट्राच्या टीव्ही चॅनल ‘झी मराठी’ वर प्रसारित झालेल्या प्रसिद्ध पौराणिक टीव्ही सीरियल ‘ जय मल्हार’ मधील बानू नावाच्या व्यक्तिरेखेने प्रेरित केले आहे . मालिकेत अभिनेत्री ईशा केसकर देवी भूमिका Banai – कौतुकाने म्हणतात बानू यात एक ठराविक महाराष्ट्रीयन नथ डिझाईन- अर्ध मंडळ दगड आणि मोती पंक्ति लगावली आहे. या डिझाइनपासून प्रेरित होऊन, ज्वेलर्सनी बानू नथ डिझाइनची एक मालिका सुरू केली जी आज खूप लोकप्रिय झाली आहे.
द गोल्डन बॉयतर्फे साभार
२. कारवारी नथ – कारवारी नथ महाराष्ट्र-कर्नाटक सीमांच्या संस्कृती आणि परंपरचे एक प्रतीक आहे. कारवारी हा शब्द कर्नाटक, कारवार शहरातून आला आहे म्हणूनच त्याच्या डिझाईनमध्ये थोडे दक्षिण भारतीय स्पर्श देखील आहे. सामान्यत: या नथींना दगडांनी भरलेले असते,सोन्याने मढवलेले असते आणि बसरा मोती किंवा मोत्यामध्ये विलीन केले जातात, जे दुर्मिळ आणि सुंदर आहेत.
३. पुणेरी नथ – या श्रेणीतील डिझाईन थोड्या वेगळ्या आहेत कारण बानू आणि कारवारी नथ अधिक परिपत्रक आहेत. या नथींच्या डिझाईन दोन फुलांनी भरलेल्या आहेत त्यामध्ये एक मोठे दगड आणि मोती आहेत अशा डिझाईन स्त्रियांना छान दिसतील ज्यांना गोल नाक आहे किंवा ज्यांनी आधीच खूप जड दागिने घातले आहेत.
४. बाजीराव मस्तानी नथ – नावाप्रमाणेच या नथ डिझाईन्स प्रियंका चोप्राच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या पात्र ‘काशीबाई’ पासून प्रेरित आहेत. या नथ डिझाईनसुद्धा पुणेरी नथींच्या डिझाईन प्रमाणे आहेत. मस्तानी नथ डिझाइनमध्ये अधिक रंगीबेरंगी दगड आणि डिझाइनर दगड त्याचबरोबर लाल आणि हिरव्यापेक्षा इतर रंगांचा प्रयोग करतात.
५. पेशवाई नथ – महाराष्ट्रीयन नथ परिधान केलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटातील काशिबाईच्या भूमिकेतील प्रियंका चोप्रा. महाराष्ट्रीयन महिलांमध्ये पेशवाई नथ या नावाने ओळखल्या जाणार्या नाविन्यपूर्ण डिझाइन बनवण्यास या डिझाइनर्सनी प्रेरित केले. ही नथ थोडी लहान, अधिक परिपत्रक आहेत आणि इतर पर्ल ज्वेलरी आणि कोल्हापुरी साजसह चांगली दिसते.
६. डायमंड नथ – जरी महिला सामान्यत: मोत्यासह गोल्ड-प्लेटेड मेटल नथींना प्राधान्य देतात, परंतु त्यातील नवीनतम म्हणजे डायमंड नथ. अमेरिकन हिरे किंवा वास्तविक हिरे यांनी अडकलेल्या या नथ सोन्या किंवा चांदीच्या असतात. आपण श्रीमंत नसल्यास किंवा या डिझाईन्सची हलकी आवृत्ती हवी असल्यास आपण पारदर्शक दगडांनी भरलेल्या महाराष्ट्रीयन नथींची निवड करु शकता ज्यात मोत्याची जागा दगडांनी घेतली आहे.
७. पाचू नथ – पाचू किंवा पन्ना नथ डिझाइनसुद्धा खूपच सुंदर आहेत आणि महाराष्ट्रीयन सूटदेखील अतिशय सुंदर आहेत. आपल्या नथीला रॉयल आणि वांशिक आवाहन देण्यासाठी डिझाइनमध्ये फारसा फरक पडत नाही, परंतु इतर रंगांचे खडे पन्नाने बनलेले आहेत.
नथ हा महाराष्ट्रीयन दागिन्यांचा एक अविभाज्य भाग आहे आणि आपल्या एकूणच देखावात लालित्य जोडतो पण त्यांना खरेदी करण्यापूर्वी किंवा त्यांचा शोध घेण्यापूर्वी बर्याच स्त्रियांना आश्चर्य वाटतं.. “ही सुंदर महाराष्ट्रीयन नथ घालण्यासाठी मला नाक छेदण्याची गरज आहे का?” पण, उत्तर नाही आहे. ही मोहक नथ परिधान करण्यासाठी तुम्हाला नाकाला छेद देण्याची गरज नाही, कारण आजकाल आपल्या नाकावर क्लिप – ऑन नथींच्या रूपात महाराष्ट्रीयन नथ उपलब्ध आहेत. ते हलके, परिधान करण्यास सुलभ आणि त्वचेसाठी अनुकूल आहेत.
सदर लेख सोशल मीडिया फॉरवर्ड मधून मिळाला असून यातील फोटोवर ‘द गोल्डन बॉय’ असा उल्लेख आहे. लेखाचे श्रेय त्यांच्या टीमचे आहे. धन्यवाद.
मुंबई । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास महाराष्ट्र एटीएस पथकाने शनिवारी रात्री अटक केली आहे. कामरान अमीन खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मुंबईतील चुनाभट्टी भागातून त्याला अटक करण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविण्यात आला होता. हा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मेसेज आलेल्या नम्बरचा शोध घेतला असता तो मेसेज मुंबईतून आल्याचे समोर आले. यानंतर महाराष्ट्र एटीएस पथकाने कारवाई करत आरोपीस अटक केली. महाराष्ट्र एटीएस कडून याबाबत शनिवारी कारवाई करण्यात आली.
Maharashtra Anti-Terrorism Squad (ATS) has arrested one accused Kamran Amin Khan from Chunabhatti area of Mumbai, for making a threat call to kill Uttar Pradesh CM Yogi Adityanath in a bomb blast: Maharashtra ATS.
योगी सरकारने डायल ११२ या सेवे अंतर्गत पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य सेवांशी संबंधित आकस्मिक सेवांना समाविष्ट केले गेले आहे. ही एक आपत्कालीन सेवा आहे. हा नंबर डायल केल्यावर पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य यांसारख्या सेवा अगदी काही वेळातच पुरविल्या जातात. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात योगी सरकार या क्रमांकावरून एक व्हॉट्सअॅप ग्रुप चालवत आहे, ज्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याच्या धमकीचा मेसेज पाठवण्यात आला.
वृत्तसंस्था । उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पौरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथील जंगलाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तेथील वनअधिकारी अनिता कुंवर यांनी ही माहिती दिली आहे. एकूण ५-६ हेक्टर परिसरात ही आग पसरली असून तिला विझवणे अवघड झाले आहे. त्यामुळे अधिक पथकांना बोलावण्यात आले आहे.
Uttarakhand: Forest fire broke out in Srinagar of Pauri Garhwal district today. Forest officer Anita Kunwar says, "5-6 hectares of forest have been affected. Fire could not be controlled due to wind. More teams will be called to extinguish it." pic.twitter.com/iJveQaHNK6
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तराखंड च्या काही भागांमध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये नुकसान झाले आहे. देश कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरा जात असताना अशा घटना घडणे चिंतादायक आहे. तेथील वन अधिकाऱ्यांनी प्राथमिक पातळीवर आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग विझविता आली नाही असे त्यांनी सांगितले. आणखी काही पथकांना आग विझविण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
नवी दिल्ली । सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना ५ जीबी डेटा मोफत देत आहे. हा कंपनीचा Work @ Home ब्रॉडबँड प्लान आहे. याचा फायदा ग्राहकांना कोणतेही चार्ज न देता घेती येवू शकतो. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरातून वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलने ही ऑफर आणली आहे. परंतु, बीएसएनएलच्या या ऑफरचा लाभ सध्या ज्यांच्याकडे लँडलाईन कनेक्शन आहे. अशाच युजर्संना मिळणार आहे. नवीन युजर्संना याचा फायदा मिळणार नाही.
जाणून घ्या काय आहे ऑफर
या ऑफरमध्ये ग्राहकांना ५ जीबी डेटा 10Mbps च्या स्पीडने मिळेल. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ५ जीबी डेटा संपल्यानंतर सुद्धा इंटरनेटचा वापर करता येणार आहे. हा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ती 1Mbps होईल.
कंपनीचा हा प्लान अंदमान निकोबार सह सर्वच सर्कलमध्ये लागू आहे. प्लानमध्ये कोणत्याही प्रकारचे इंन्स्टॉलेशन किंवा महिन्याला चार्ज आकारला जात नाही. ही ऑफर केवळ सध्या जे लँडलाईन युजर्स आहेत. ज्यांच्याकडे आता ब्रॉडबँड कनेक्शन नाही आहे, त्याच युजर्संना ही ऑफर मिळणार आहे.
अशी मिळवा फ्री ऑफर
कंपनीने आपल्या वेबसाईटवर ही ऑफर झळकावली आहे. या बॅनरवर लिहिलेय की, प्लानचा फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांनी टोल फ्री नंबर 18005991902, किंवा 18003451504 वर कॉल करावा लागेल. या प्लानमध्ये केवळ डेटाची सुविधा मिळते. कॉलिंगची नाही. हे या प्लानचे खास वैशिष्ट्ये आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
पुणे । महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज ४५ हजार पार झाली आहे. मुंबई पाठोपाठ पुणे जिल्हयात रुग्णांची संख्या अधिक नोंदवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात आज एकूण २०५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याबरोबरच जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ४६०३ झाली आहे. जिल्हयात केटेन्मेंट झोनसाहित इतर परिसरातही काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे. सध्या एकूण १८९२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये डॉ नायडू आणि इतर पीएमसी केंद्रे, ससून आणि काही खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आज ७ रुग्ण मृत्युमुखी पडले. मृतांची संख्या २४८ झाली आहे. आतापर्यंत २४६३ रुग्ण बरे झाले आहेत. ज्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज ११०६ समूहांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. यामध्ये ११६९६९४९ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले तर ३४५८७३७ कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. पुणे महानगर पालिकेच्या मुख्य सहायक आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती अधिकृतरीत्या त्यांच्या जिल्ह्याच्या अधिकृत ट्विटरवरून सामायिक केली आहे.
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) May 23, 2020
जिल्ह्यात कंटेन्मेंट झोनमध्ये सक्त सामाजिक अलगाव पाळला जातो आहे. तसेच इतर ठिकाणीही सामाजिक अलगाव चे नियम पाळून संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे विलगीकरण केले जात आहे. प्रशासन नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी कडक अमलबजावणी केली जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. राज्यातील काही खासगी रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांची अक्षरशः लूट चालविली आहे. भरमसाठ बिले देऊन नागरिकांचे खिसे रिकामे केले जात आहेत. संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय-उद्योग बंद आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हे आर्थिक हाल चिंताजनक आहेत. या सर्व बाबींना लक्षात घेऊन राज्य सरकारने खासगी रुग्णालयातील ८०% बेडचा चा ताबा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार या रुग्णालयांना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. ज्याने नागरिकांची लूट थांबेल.
२१ मे रोजी रात्री उशिरा देण्यात आलेल्या या निर्णयात खासगी रुग्णालयातील ८०% बेडचा ताबा राज्य सरकारकडे असेल असे सांगण्यात आले आहे. तसेच बिलाची रक्कम किती असेल याचा निर्णयही राज्य सरकार घेईल असे म्हंटले आहे.
• २० टक्के बेडसाठी दर आकारण्याचा अधिकार रुग्णालयांकडे राहणार आहे.
• निर्णयानुसार वॉर्ड, विलगीकरण बेडसाठी चार हजार रुपये आकारले जाणार आहे.
• व्हेंटिलेटरशिवाय असणाऱ्या आयसीयू बेडसाठी प्रति दिन ₹७५००
• व्हेंटिलटर सपोर्ट असणाऱ्या आयसीयू बेडसाठी प्रति दिन ₹९००० आकारले जाणार आहेत.
• याशिवाय राज्य सरकारने इतर २७० प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांसाठीचे दरही ठरवले आहेत. यामध्ये कॅन्सर उपचाराचाही समावेश आहे. यामध्ये डॉक्टरांच्या फीचाही समावेश असणार आहे. हॉस्पिटलची तयारी असेल तर ते अतिरिक्त रक्कम डॉक्टरांना देऊ शकतं.
• धर्मदाय विश्वस्तांकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व रुग्णालयांचा या निर्णयात समावेश असणार आहे.
• रुग्णालये प्रसूतीसाठी ७५ हजारापेक्षा जास्त बिल आकारु शकत नाहीत. सिझर असेल तर ८६,२५० पर्यंत बिल आकारु शकतात.
• गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी १ लाख ६० हजार रुपये, अँजिओग्राफीसाठी १२ हजारापेक्षा जास्त बिल आकारता येणार नाही. अँजिओप्लास्टी करण्यासाठी १.२ लाखांपेक्षा जास्त बिल आकारू नये असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
• दरम्यान रुग्णांवर उपचार करताना कोणता दर्जा राखला जावा हे ही आदेशात सांगण्यात आले आहे.
• रुग्णालये सरकारी नियंत्रणाखाली घेण्याबरोबरच या रुग्णालयांना अत्यावश्यक सेवा कायदाही ( मेस्माही) लागू केला जाणार आहे. परिणामी खासगी रुग्णालयांतील डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांना सेवा बंधनकारक राहणार आहे, अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.
• सरकारनेआपत्ती निवारण कायदाही लागू केला आहे. त्यामुळे सरकारचा आदेश न मानणाऱ्या खासगी रुग्णालयांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती शिंदे यांनी दिली.
• आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरानुसार हे दर निश्चित करण्यात आल्याचे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कायदादूत फेसबुक पेजवरून साभार
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.