Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5755

सातारा जिल्हा हादरला; एकाच दिवसात सापडले तब्बल ४० नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सातारा जिल्हा हादरला आहे.

ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २४१ वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी ता. पाटण येथील 27 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय युवक, मुंबई येथून प्रवास करुन आलेला बहुलेकरवाडी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, शिरताव ता. माण येथील 25 वर्षीय पुरुष, लोधवडे ता. माण येथील 67 वर्षीय पुरुष (मृत), शिरताव ता. माण येथील 28 वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण येथील निकट सहवासित 34 व 60 वर्षीय महिला, 9 वर्षाचे दोन बालके, जकातवाडी ता. सातारा येथील 27 वर्षीय पुरुष, शाहुपूरी ता. सातारा येथील 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी ता. सातारा येथील निकट सहावासित 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, घारदरे ता. खंडाळा येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी ता. खंडाळा येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली ता. कराड येथील 37 वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 10 व 8 वर्षांचे बालक, 46 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, असे एकूण 40 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मलकापूर ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 241 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 121 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 114 आहे तर मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे आमने सामने

मुंबई । संचारबंदीच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था प्रथम बंद करण्यात आल्या होत्या. मार्च पासूनचा काळ हा खरंतर परीक्षेचा काळ असतो. १० वी, १२ वी तसेच सर्व महाविद्यालयीन महत्वाच्या परीक्षा याच काळात असतात. मात्र यावर्षी कोरोनाचे राज्यावरील सावट पाहता संचारबंदी लागू केल्याने बहुतेक सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावी, बारावीसोबत महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातील असे जाहीर करण्यात आले होते. आता त्यावर विचार करावा आणि वेळ न दवडता लवकर त्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. 

दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जातील असे काही दिवसांपूर्वी सरकारने सांगितले होते. त्याचप्रमाणे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाही घेतल्या जाणार आहेत हे त्यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप त्याबाबत पुढील कोणती कारवाई झाली नाही किंवा त्या विषयावर चर्चाही झाल्या नाहीत. कोश्यारी यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधत इतर क्षेत्रातील नियम शिथिल करीत असताना मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांचे हीत  लक्षात घेऊन या विषयावर लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

दरम्यान आता हळूहळू संचारबंदीचे नियम शिथिल करीत अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील कामकाज सामाजिक अलगावचे नियम पाळून सुरु करण्याचा विचार केला जात आहे. काही ठिकाणी ते करण्यातही आले आहेत. केवळ कंटेन्मेंट झोनमधील नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर विदयार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने परीक्षा लवकर घेण्याच्या निर्णयावर विचार करण्याची गरज आहे असे राज्यपालांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

“गरिबांची अँजेलिना जोली” असं कोणी म्हणायचं तेव्हा तळपायाची आग मस्तकात जायची – ईशा गुप्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता अक्षकुमार अभिनित रुस्तम हा सिनेमा अनेक कारणांनी गाजला होता. या सिनेमातूनच इलियाना डिक्रूज लोकांना माहित झाली होती. याच सिनेमामधून आपल्या विशेष अभिनयाने लक्षात राहिलेली खलनायिका म्हणजे ईशा गुप्ता होय. सिनेमात तिने केलेली भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. आपल्या अभिनय कौशल्यासोबतच तिच्या दिसण्यामुळेही ती चर्चेत असते. हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिच्यासोबत ईशा गुप्ताची नेहमी तुलना केली जाते. तिचा चेहरा अँजेलिना जोलीशी मिळताजुळता असल्याने बऱ्याचदा तिला गरिबांची अँजेलिना जोली म्हंटले जाते. याचा सुरुवातीला प्रचंड राग यायचा असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे.

Bollywood News: Esha Gupta opens up on comparisons with Hollywood ...

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता अँजेलिना जोली या हॉलिवूड अभिनेत्रीशी तुलना केल्यामुळे त्रस्त होती असे तिने सांगितले. एका मुलाखतीत ती बोलत होती. अँजेलिना जोली माझ्यापेक्षा अधिक यशस्वी आहे. हे मला मान्यच आहे. पण म्हणून मला गरिबांची अँजेलिना जोली म्हणणे अजिबात आवडत नाही असे तिने सांगितले. ईशा गुप्ता अभिनयासोबत मॉडेलिंग सुद्धा करते.  खूप कमी काळात अगदी मोजक्या भूमिका बहरदारपणे निभावून तिने आपले एक वेगळे स्थान या इंडस्ट्रीत निर्माण केले आहे. २०१२ साली जन्नत २ या सिनेमातून तिने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने दर्जेदार सिनेमांमधून भूमिका केल्या आहेत पण रुस्तम नंतर तिची खास ओळख निर्माण झाली.

1920x1080 Esha Gupta 8 Laptop Full HD 1080P HD 4k Wallpapers ...

ईशा तिच्या हॉट सिन्स मुळे देखील बऱ्याचदा चर्चेत असते. सध्या झी ५ वर रिजेक्ट एक्स या सिरीजच्या दुसऱ्या सिजनमधल्या तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. अँजेलिना जोली शी तुलना केल्यावर पूर्वी तळपायावरची आग मस्तकात जात होती आता मी माझ्या रागावर नियंत्रण मिळविले असून राग आला तरी फारसा फरक पडू देत नसल्याचे तिने सांगितले. केवळ दिसण्यापर्यंत ठीक आहे पण दोघींच्या करिअरची तुलना करणे योग्य नाही असे ती म्हणाली. तिच्या इतर चित्रपट कारकिर्दीवरही गप्पा मारण्यात आल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आता मुंबईतही दारू मिळणार घरपोच; महापालिका आयुक्तांच्या सूचना

मुंबई । संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल करून समाजजीवन पुन्हा सुरळीत सुरु करण्याचे प्रयत्न सरकार कडून केले जात आहेत. २ संचारबंदीनंतर सरकारने काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. यामध्ये वाईन शॉप चाही समावेश होता. मात्र वाईन शॉप वर लोकांनी अव्वाच्या सव्वा गर्दी केल्याने शासनाने हा निर्णय मागे घेतला होता. आता चौथ्या संचारबंदीनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला होता. मात्र वाईन शॉप उघडण्याची परवानगी दिली नसली तरी मद्य घरपोच देण्याची परवानगी मुंबईमध्ये देण्यात आली आहे. मुंबईच्या  महापालिका आयुक्ता इकबालसिंग चहल  ही माहिती दिली आहे.

वाईन शॉप उघडण्यास परवानगी दिल्यावर सामाजिक अलगाव चे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची झुंबड जमते, म्हणूनच सामाजिक  सुरक्षेचा विचार करून मद्य घरपोच देण्याला परवानगी देण्यात आली असल्याचे चहल यांनी सांगितले आहे. पण ही विक्री करत असताना राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर कंटेन्मेंट झोनमध्ये कोणत्याच प्रकारच्या विक्री सुविधा दिल्या जाणार नाहीत हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबई मध्ये सापडले आहेत. मुंबईच्या काही भागांना पूर्णतः बंद करण्यात आले असून तिथे काटेकोरपणे संचारबंदीचे सर्व नियम पाळले जात आहेत. शासकीय यंत्रणा या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. पण हळूहळू समाजजीवन सुरळीत सुरु करण्यासाठी ज्या क्षेत्रांमध्ये संक्रमणाचा धोका नाही आहे आणि जिथे रुग्णसंख्या कमी आहे तिथे नियम शिथिल केले जात आहेत. पण सामाजिक अलगाव हा सर्वत्र पाळण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

छत्तीसगढ च्या अचनकमर व्याघ्र प्रकल्प परिसरात काळ्या बिबट्याच्या हालचाली

वृत्तसंस्था । पँथर अर्थातच वाघरू, बिबळ्या आणि महाराष्ट्रात विशेषतः बिबट्या नावाने प्रसिद्ध असणारा प्राणी होय. महाराष्ट्राच्या अनेक भागात बिबट्या दिसल्याचे वृत्त असते. मार्जर जातीतील मोठ्या प्राण्यांपैकी एक अशी याची ओळख आहे. अंगावर असणाऱ्या ठिपक्यावरून बिबट्या ओळखला जातो. मात्र यांच्यामध्ये काळा बिबट्या ही जात दुर्मिळ आहे. शरीरातील मेलॅनीन अधिक प्रमाणात असल्याने तो काळा असतो. छत्तीसगढ मधील अचनकमर व्याघ्र प्रकल्प परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये २५ मार्च पासून २५ एप्रिल च्या दरम्यान काळया बिबट्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत.

मार्जर जातीतील अतिशय हुशार आणि चपळ प्राणी म्हणून याची ख्याती आहे. हा प्राणी फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. त्याच्या शरीराच्या रंगामुळे जंगलात सुरक्षित राहण्यास त्याला मदत होते. तो एकांतात राहणारा आणि रात्रीची जीवनशैली जगणारा प्राणी आहे. तो निर्भय आणि शक्तिशाली प्राणी आहेच पण त्याच्या वेगामुळेही तो प्रसिद्ध आहे. काळ्या पँथरचा रंग काळा असला तरी जवळून पाहिल्यास त्याच्या शरीरावर ठिपके दिसून येतात.

दाट जंगलामध्ये राहणारा काळा बिबट्या भारतात प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात तसेच आसाममध्ये आढळतात. नेपाळ मध्येही यांचे वास्तव्य आहे. दक्षिण आफ्रिकेतील माउंट केनियाच्या जंगलांमध्येही काळा बिबट्या आढळतो.

सावकारीच्या जाचातून शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ।

मिरज तालुक्यातील कदमवाडी येथील संजय कदम या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहा शेजारी शेतीच्या औषधाची बाटली आढळून आली होती. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली होती. संजय कदम यांची पत्नी जयश्री कदम यांनी माझे पती सावकारीच्या जाचातून त्यांनी औषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असून अजिज शेख या सावकाराच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

संजय कदम यांची पत्नी श्रीमती जयश्री कदम यांनी अजिज शेख यांच्या विरोधात सावकारी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. अजित शेख हा सावकारी व्यवसाय करीत असून अनेक ठिकाणी अशा पध्दतीने अनेकांची लुबाडणूक केली असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्याच्या विरोधात सांगलीमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाचे संकट देशभरात असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावकारीतून पैसे देवून त्यांची जमीन बळकविण्याऱ्या सावकाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. सावकारीतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे. सावकाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी मिरज पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे यांनी केली आहे.

Sangli

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गावाकडे जाण्याची मिळाली परवानगी पण हर्षवायुने गेला जीव

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ।

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत … अन गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळाली पण एका परप्रांतीय यंत्रमाग कामगाराला मृत्यूनेच कवटाळल्याची धक्कादायक घडली. उत्तर प्रदेशातील रामसखा सत्तन मौर्य असे या दुुर्दैवी परप्रांतीय यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे विटा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर येथील 55 वर्षीय रामसखा सत्तर मौर्य हे यंत्रमाग कामगार म्हणून गेल्या अनेक वर्षभरापासून विटयातील मुंढेमळा येथे कामास आहेत. लॉकडॉनमुळे ते विट्यात अडकून पडले होते. त्यांचे कुटुंबिय उत्तरप्रदेश येथे आहे. ते गावी जाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. पण प्रशासनाकडून रितसर परवानगी मिळत नव्हती. त्यांनी गेल्या आठवड्यात विटा येथील तहसील कार्यालयात प्रवासाच्या ऑनलाईन पाससाठी अर्ज केला होता. आज गुुरूवारी सकाळी त्यांना विटा येथील तहसील कार्यालयातून फोन आला होता.

तुमची गावाकडे जाण्याची व्यवस्था झाली आहे. तुम्ही उद्या सकाळी 1१० वाजता विटा बसस्थानकातून मिरजसाठी एसटी आहे. तुम्ही आवरून या. मिरजेतून आपल्या गावी उत्तरप्रदेशकडे जाण्यासाठी ट्रेनची सोय आहे. त्यात तुमचे तिकीट आहे. ही बातमी फोनवर ऐकल्यावर रामसखा यांना अत्यानंद झाला. ते येथील मुंढेमळ्यातील परिसरात राहणार्या मित्राला ही आनंदवार्ता सांगण्यासाठी पळतच सुटले. परंतु वाटेतच ते चक्कर येऊन पडले. त्यांना तेथील सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी त्यांना तातडीने विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Sangli

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबईतल्या धारावीतून इस्लामपूर मध्ये २१ जण आले विना परवाना; सांगलीत खळबळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ।

सर्वात हॉट स्पॉट असलेल्या धारावी मुंबई येथून इस्लामपूर शहरात चौघे जण छुप्या पध्दतीने दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाला माहिती मिळताच चौकशी केली असतां अजून १६ जण आल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. यातील काही जण सांगली येथे नातेवाईकांकडे जाणार होते. हे सर्वजण एकत्रित बसने आल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांना आरोग्य विभागाने मिरज येथे पाठवले आहे. विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी सुरेखा दशरथ कोंचीकोरवी व शिवराज दशरथ कोंचीकोरवीयांच्यावर इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, धारावीतून खासगी बस कोणत्याही परवानगी शिवाय सांगली जिल्हयाच्या हद्दीत आल्याने कासेगाव चेक पोस्ट येथे अडवण्यात आली. परवाना नसल्याने ती गाडी पुन्हा महामार्गावरून परत धारावीला रवाना केली गेली. अन् हीच संधी साधत सर्व जण थोड्या अंतरावर रस्त्यावर उतरले. यातील चार जण इस्लामपुरात दाखल झाले तर उर्वरित 16 जण कासेगाव पासून कराड रस्त्यावर सेवा रस्त्यावर बसून होते. संबंधितांची नगरपरिषदेमार्फत खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. इस्लामपूर शहरातील माकडवाले वसाहतीमध्ये धारावी मुंबई येथील नागरिक अनाधिकृतपणे आल्याची माहिती नगरपालिका हेल्पलाईनला मिळाली. त्यानुसार तातडीने मुख्याधिकारी प्रज्ञा पवार व आपत्कालीन पथकाने वसाहतीमधील घरांची तपासणी केली असता एका घरामध्ये दुपारी 12 वाजता चार जण आल्याचे आढळले. तातडीने शासनाचा आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन यांना कळविण्यात आले. त्यानुसार तातडीने चौघांनाही आरोग्य विभाग पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेले. तसेच संबंधित घरातील सदस्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

ताब्यात घेतलेल्या चौघांकडून 21 जण काल रात्री 10 वाजता खाजगी बसने धारावी मुंबई येथून इस्लामपूर व सांगली येथे येण्यासाठी प्रवासाला निघाल्याचे धक्कादायक माहिती मिळाली. त्यांच्याजवळ अधिकृत पास नसल्याने कासेगाव चेक नाक्यावरून ही बस धारावी मुंबई येथे परत पाठविली असता थोड्या अंतरावर यातील सर्व नागरिक उतरले. सदर 21 पैकी 4 जण आडमार्गाने इस्लामपूर शहरामध्ये त्यांचे नातेवाईकांच्या घरी आले असल्याचे स्पष्ट झाले. धारावीहून आलेले उर्वरित 16 नागरिक कासेगांवनजीक महामार्गावर असल्याची माहिती मिळाली. हेे नागरिक छुप्या मार्गाने इस्लामपूर शहरामध्ये येऊ नयेत याबाबत अधिकची चौकशी करण्यासाठी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, उपमुमुख्याधिकारी प्रमिला माने, साहेबराव जाधव, अनिकेत हेंद्रे यांच्यासह आपत्कालीन पथक कासेगांव येथे गेले. ही माहिती कासेगांवचे स.पो.नि.सोमनाथ वाघ यांना दिली. प्रांताधिकारी नागेश पाटील यांना कळवल्यावर त्यांनी कासेगावचे वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेत पुढील सर्व कार्यवाही तातडीने करण्यासाठी आरोग्य व पोलीस यंत्रणेस सूचना दिल्या. त्यानुसार सर्व नागरिकांची प्राथमिक तपासणी होऊन कासेगांव आरोग्य विभागाने त्यांना मिरजेला पाठवले आहे.

दरम्यान, धारावीतून आलेल्या २१ जणांपैकी 16 नागरिक कासेगाव येथे ताब्यात घेतले आहेत. तर इस्लामपूर शहरामध्ये 4 नागरिक आले होते. असे एकूण 20 जण आढळून आले. त्यांचे बरोबर आलेला 16 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. तो कुठे गेला आहे याबाबत माहिती नसल्याचे इतरानी सांगितल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. धारावीतील 21 जण इस्लामपूर व सांगलीकडे येण्यासाठी बुधवारी रात्री निघाले. गुरूवारी सकाळी त्यांनी सांगली जिल्हयाच्या हद्दीत प्रवेश केला. मुंबई ते कासेगाव चेक पोस्ट पर्यत तब्बल चार जिल्हयांच्या सीमा ओलांडून बस आली. या बसला कोणत्याही जिल्ह्याच्या सीमेवर कसे तपासले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Sangli

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यात दिवसभरात २ हजार ९४० नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ५८ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे. आज २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ८५७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२ हजार ५८३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३० हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ३२ हजार ७७७ नमुन्यांपैकी २ लाख ८८ हजार १९५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ४४ हजार ५८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ६९ हजार २७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २८ हजार ४३० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १५१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये २७, पुण्यात ९, जळगावमध्ये ८, सोलापूरात ५, वसई विरारमध्ये ३, औरंगाबाद शहरात ३, साताऱ्यात २, मालेगाव १, ठाणे १, कल्याण डोंबिवली १, उल्हासनगर १, पनवेल १ तर नागपूर शहरात १ मृत्यू झाले आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३७ पुरुष तर २६ महिला आहेत. आज झालेल्या ६३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २८ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४६ जणांमध्ये (७३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २७,२५१ (९०९)
ठाणे: ३६६ (४)
ठाणे मनपा: २२३४ (३३)
नवी मुंबई मनपा: १७७६ (२९)
कल्याण डोंबिवली मनपा: ७२७ (७)
उल्हासनगर मनपा: १४४ (३)
भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)
मीरा भाईंदर मनपा: ३८८ (४)
पालघर:१०७ (३)
वसई विरार मनपा: ४५१ (१४)
रायगड: २९९ (५)
पनवेल मनपा: २८२ (१२)
ठाणे मंडळ एकूण: ३४,१०७ (१०२७)

नाशिक: ११५
नाशिक मनपा: ९३ (२)
मालेगाव मनपा: ७१० (४४)
अहमदनगर: ४९ (५)
अहमदनगर मनपा: २२
धुळे: १७ (३)
धुळे मनपा: ८० (६)
जळगाव: २८६ (३६)
जळगाव मनपा: १०९ (५)
नंदूरबार: ३२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १५१३ (१०३)

पुणे: २८३ (५)
पुणे मनपा: ४४९९ (२३१)
पिंपरी चिंचवड मनपा: २११ (७)
सोलापूर: १० (१)
सोलापूर मनपा:५२२ (३२)
सातारा: २०४ (४)
पुणे मडळ एकूण: ५७२९ (२८०)

कोल्हापूर:१७५ (१)
कोल्हापूर मनपा: २०
सांगली: ६२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: १३५ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४११ (५)

औरंगाबाद:२२
औरंगाबाद मनपा: ११६५ (४२)
जालना: ४६
हिंगोली: ११२
परभणी: १७ (१)
परभणी मनपा: ५
औरंगाबाद मंडळ एकूण: १३६७ (४३)

लातूर: ५८ (२)
लातूर मनपा: ३
उस्मानाबाद: २६
बीड: २६
नांदेड: १५
नांदेड मनपा: ८३ (४)
लातूर मंडळ एकूण: २११ (६)

अकोला: ३१ (२)
अकोला मनपा: ३३६ (१५)
अमरावती: ९ (२
अमरावती मनपा: १३६ (१२)
यवतमाळ: ११३
बुलढाणा:३९ (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:६७२ (३४)

नागपूर: ३
नागपूर मनपा: ४५७ (७)
वर्धा: ३ (१)
भंडारा: ९
गोंदिया: २८
चंद्रपूर: ८
चंद्रपूर मनपा: ७
गडचिरोली: ९
नागपूर मंडळ एकूण: ५२४ (८)

इतर राज्ये: ४८ (११)
एकूण: ४४ हजार ५८२ (१५१७)

महापुरा प्रमाणे कोरोनाच्या संकटात आमदार गाडगीळ झाले गायब

 सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ।

कोरोनाच्या संकटात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते व पदाधिकारी नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. मात्र सत्ता गेल्याचे पोटशूळ उठलेल्या भाजप पक्षाला आहे. आमदार गाडगीळ यांनी कोरोना संकटाच्या काळात किती गरजूंना अन्नछत्र सुरू केले? व्यापारपेठ सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले? ते स्वत: ‘क्वारंटाईन’ होते. त्यांच्यात हिम्मत असेल तर कोरोना संकटात कोणी काय काम केले हे एका व्यासपीठावर येऊन मांडावे, असे आव्हान कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आमदार गाडगीळ यांना दिले. पृथ्वीराज पाटील म्हणाले, देशात भाजपचे सरकार आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घालावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात केली होती. तरी देखील परदेशी नागरिकांवर बंदी घातली नाही. विमानसेवा सुरू ठेवली. त्यामुळे देशात कोरोनाचा फैलाव झाला.

मुख्यमंत्र्यांचे राज्यात काम चांगले आहे. मात्र भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन पुकारले आहे. स्थानिक आमदार गाडगीळ यांनी महाविकास आघाडीवर टीका करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. आज कोरोनाचे संकट आले असताना लोकप्रतिनिधींनी घरी न बसता रस्त्यावर उतरून काम करावे अशी नागरिकांची अपेक्षा असताना आमदार गाडगीळ जास्तीत जास्त क्वारंटाईनच राहिले आहेत. ‘ग्रीन झोन’ जाहीर झाल्यानंतर मात्र हॉस्पिटलला भेट देत माहिती घेण्याचे नाटक करत आहेत.

जिल्ह्यात रूग्ण सापडल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून मिरजेतील रूग्णालयाला का त्यांनी भेट दिली नाही? असा सवाल पाटील यांनी केला. ते पुढे म्हणाले, महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांचे नगरसेवक कोरोनाच्या संकटात कोठेच दिसत नाहीत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक रस्त्यावर उतरून काम करत आहेत. जनतेच्या मदतीसाठी ते कोठेच दिसत नाहीत. राज्यातील सत्ता गेल्याचे त्यांना दु:ख झाल्याचे दिसून येते. त्यांनी कोठे अन्नछत्र उघडले नाही की पदरमोड केली नाही. चार गावात मदत केल्याचे केवळ सोपस्कार पार पाडले. स्वत:चे एक दुकान फक्त सुरू ठेवले होते, असा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी केला.

Sangli

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.