Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5756

दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला 

नागपूर प्रतिनिधी । दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला असल्याने त्यांना जामिनावर मुक्त करून हैद्राबादला घरी जाण्याची परवानगी द्यावी असा अर्ज त्यांनी केला होता.  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा अर्ज फेटाळला असून त्या परिसरातील संचारबंदी संपल्यानंतर तसेच तो परिसर कंटेन्मेंट झोनमधून मुक्त झाल्यानंतर तुम्ही पुन्हा जमीन अर्ज करू शकता असे सांगितले आहे. साईबाबा यांनी आपल्या तब्येतीसोबत कॅन्सरग्रस्त आईला भेटण्यासाठी घरी जाण्याची परवानगी द्यावी असा अर्ज केला होता.

त्यांच्यावरील केसची सुरुवात २०१३ पासून झाली होती. मे २०१४ मध्ये त्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. जून २०१५ मध्ये वैद्यकीय कारणांसाठी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. जुलै मध्ये त्यांना घरी सोडण्यात आले होते. डिसेंबर मध्ये ते पुन्हा तुरुंगात गेले आणि पुन्हा जामिनावर एप्रिल २०१६ मध्ये बाहेर आले. २०१७ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. साईबाबा यांनी छत्तीसगड मधील सलवा जुडुम मिलिशिया च्या विरोधात व्यापक मोहीम राबविली होती तसेच याआधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने मध्य भारतात माओवाद्यांविरोधात राबविलेल्या ऑपरेशन ग्रीन हंट या मोहिमेच्या मानवाधिकारांचे उल्लंघन केले होते.

 

दरम्यान गडचिरोली पोलिसांनी त्यांच्यावर नक्षलवाद्यांसोबत संपर्क असल्याचे आरोप  केले होते.  २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या हक्क तज्ज्ञांनीही भारताला त्यांना मुक्त करण्याची विनंती केली होती. गडचिरोली पोलिसांनी त्यांच्या नक्षलवादी संपर्काचा दावा केल्यावर २०१४ च्या मे मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यावर २०१७ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. व्हीलचेअरवर असणाऱ्या साईबाबा यांना बरेच गंभीर आजार आहेत. तसेच तुरुंगात पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य बिघडत असल्याचेही सांगण्यात आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई |

कोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिकात्मक कापसाची गादी करत या गादीला काळा कपडा गुंडाळून त्यावर मुख्यमंत्री सह मंत्र्यांचे नाव लिहत ती गाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिली

विदर्भातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी मंदावली आहे. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे तर कर्ज वितरण सुद्धा बंद आहे अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे हे समजत नाही,शरद पवारांनी साखरीसाठी पॅकेज मागितले मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजची घोषणा व मागणी केली नाही तर असंघटित कामगारावर उपासमार आली त्यांच्यावर देखील सरकारचे लक्ष नाही त्यामुळे या झोपलेल्या सरकारच्या मंत्र्यांनी आता झोपूनच रहावे त्यासाठी आम्ही कापुसाची गादी त्यांनी भेट देत आहे असे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र सरकार कोरोना वर उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाही त्यामुळे तो हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले आहे. शरद पवारांनी साखरेवर पंकज मागितलं पण ते कधीही कापसावर बोलत नाहीत. आज असंघटित कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोलापुरात एकाच दिवशी कोरोनाने घेतला ६ जणांचा बळी, बाधितांची संख्या ५१६ वर

सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यापासून आज सर्वाधिक सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरातील एकूण चाळीस जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 28 जण नवीन कोरोना बाधित आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज मयत झालेल्या सहा व्यक्तींमध्ये पहिली व्यक्ती सांगोला तालुक्यातील पाचेगाव परिसरातील असून 64 वर्षांचे पुरुष आहेत. 18 मे रोजी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 20 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांचे निधन झाले.

कुर्बान हुसेन नगर परिसरातील 58 वर्षाच्या पुरुषाला 18 मे रोजी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी दुपारी चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. तेलंगी पाछा पेठ परिसरातील 72 वर्षाच्या पुरुषाला 17 मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी रात्री आठ वाजता त्यांचे निधन झाले आहे. सलगर वस्ती (देगाव रोड) परिसरातील 55 वर्षाच्या पुरुषाला 18 मे रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 20 मे रोजी रात्री साडेसात वाजता त्यांचे निधन झाले आहे. मराठा वस्ती (भवानी पेठ) परिसरातील 58 वर्षीय महिला उपचारासाठी 16 मे रोजी मार्कंडेय रुग्णालयात स्वतःच्या दाखल झाल्या होत्या. उपचारादरम्यान 20 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. जुळे सोलापुरातील सिद्धेश्वर नगर परिसरातील 46 वर्षीय पुरुषाला 14 मे रोजी कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले आहे.

आज नव्याने आढळलेल्या 28 रुग्णांमध्ये नइ जिंदगी परिसरातील एक महिला, कुमठा नाका येथील एक पुरुष व एक महिला, निलम नगर येथील तीन पुरुष व सहा महिला, नइ जिंदगी येथील शोभादेवी नगर मधील एक महिला, बुधवार पेठ मिलिंदनगर येथील एक पुरुष, एमआयडीसीतील शिवशरण नगर मधील एक महिला, सातरस्ता येथील एक पुरुष, लोकमान्य नगर येथील तीन महिला, पुना नाका येथील एक पुरुष, मुरारजी पेठ येथील दोन पुरुष व एक महिला, जगदंबा नगर येथील एक पुरुष, हैदराबाद रोड येथील एक पुरुष, पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील एक पुरुष, भवानी पेठेतील (मराठा वस्ती) येथील एक महिला, कर्णिक नगर येथील एक पुरुषाचा समावेश आहे. अद्यापही 159 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या 14 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Solapur

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली तरुणीचा सामूहिक बलात्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाची तपासणी करण्याच्या बहाण्याने एका ३६ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. रतनगड शासकीय रुग्णालयात झालेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात महिलेने गुरुवारी रतनगड पोलिस ठाण्यात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हावडा येथील रहिवासी असलेली ही महिला आपल्या सासरी डीडवाना येथे पायीच चालत जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाटेत ती एका ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने रतनगडला पोहोचली, पण त्या भागात हावडा येथे जाण्याचे कोणतेही साधन तिला सापडले नाही, त्यानंतर ती स्टेशन रोडवरील रेन बसेराजवळ आली जिथे काही साधूंनी तिला जेवण देखील दिले.

कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली सामूहिक बलात्कार
यादरम्यान, मुश्ताक आणि त्रिलोक तिच्याकडे आले आणि रुग्णालयाच्या आवारात असलेल्या दुधाच्या डेअरीमागे तिला झोपण्यास जागा दिली. त्यानंतर २० मे च्या दिवशी सकाळी ते दोघे पुन्हा तिथे आले आणि म्हणाले की,’ तुझी कोरोनाची टेस्ट करावी लागेल. त्यांनी मग तिला त्या रुग्णालयाच्या शौचालयामागे असलेल्या एका जागेत नेले जिथे या दोघांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्येच बांधलेल्या सुलभ कॉम्प्लेक्समध्ये महिलेला स्नान करण्यास आणले गेले, तेव्हा त्या संकुलात काम करणाऱ्या कर्मचार्‍याने देखील तिच्याबरोबर अश्लील कृत्य केले.

या घटनेनंतर रतनगड येथील विजय नायक नावाचा एक युवक या महिलेला भेटला जो तिला पोलिस ठाण्यात घेऊन आला. येथे सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. डीएसपी प्यारेलाल मीणा यांनी सांगितले की, तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत
डीएसपी प्यारेलाल मीणा यांनी सांगितले की, ‘ही महिला पश्चिम बंगालची रहिवासी आहे. तिचे सासरे हे डीडवानामध्ये आहे. ती पश्चिम बंगालला जात होती आणि पायीच येथे आली. रेल्वे स्टेशनवर, तिला २ किंवा ३ मुले भेटली ज्यांनी तिला कोरोना स्क्रिनिंग करण्यास सांगितले. ते त्या महिलेला तपासणीच्या बहाण्याने शौचालयाजवळील झुडुपाजवळ घेऊन गेले. या महिलेने सांगितले की ‘दोन मुलांनी माझ्यावर बलात्कार केला आणि एकाने छेडछाड केली. यामुळे तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे ज्यानंतर सर्व काही समोर येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुणे शहरात कोरोनाचा कहर सुरूच; दिवसभरात सापडले २९१ कोरोनाग्रस्त, १४ जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । कोरोना विषाणूने शहरात थैमान घातले आहे. आज दिवसभरात पुणे शहरात एकूण २९१ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तसेच आज १४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात १ हजार ७३५ स्वॅब टेस्ट नोंदवल्या गेल्या आहेत. आजवरची ही एका दिवसातील सर्वाधिक आकडेवारी आहे. यात २९१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर पुणे शहराची एकूण स्वॅब टेस्ट संख्या ३८ हजार ७७० इतकी झाली आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दिवसभरात घरी सोडलेले रुग्णांची संख्या १८९ असून बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे एकूण रुग्ण २३७१ झाले आहेत. आज दिवसभरातील एकूण मृत्यू १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत पुण्यातील एकूण मृत्यू २४२ आहेत. शहारतील एकूण गंभीर रुग्णांची संख्या १६८असून ४९ जण व्हेंटिलेटर वर आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४३९८ वर पोहोचली आहे. यातील ७८६ ॲक्टिव्ह रुग्ण संख्याआहे.

दरम्यान, आज राज्यात तब्बल २ हजार ९४० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर सापडलेल्या कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत आज सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत राज्यात एकूण ४४ हजार ५८२ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरु होणार; मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

मुंबई  । कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी जास्तीत सुरक्षा पाळली जात आहे. इतर व्यावसायांच्या बंदी सोबत चित्रपट, मालिका व्यवसायही या काळात बंद आहेत. त्यामुळे अनेक मालिकांचे जुने भागच दाखविले जात आहेत. तर सिनेमांचे शुटिंगही रखडले आहे. मात्र आता लॉकडाऊन ४ मध्ये संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल केले जात आहेत. ज्याद्वारे टप्प्याटप्प्याने सर्व उद्योग व्यवसाय करण्याचा विचार राज्य प्रशासन करत आहे. त्यासंबंधातील ऑनलाईन बैठकाही घेतल्या जात आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय प्रसारण फाउंडेशन (Indian Broadcasting Foundation) ऑनलाईन बैठक घघेतली यामध्ये त्यांनी सामाजिक अलगाव चे नियम पाळून पुन्हा शूटिंग सुरु करण्याचा विचार करू असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज चित्रपट निर्माते, नाट्य व मालिका निर्माते तसेच कलाकारांशी संवाद साधला. त्यांनी सामाजिक अलगाव तसेच इतर नियमांचे सक्त पालन करून मर्यादित प्रमाणात पुन्हा चित्रीकरण सुरु करता येऊ शकत असल्याचा निश्चित आराखडा दिल्यास आपण त्यावर विचार करू असे सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र मोठे आहे. हजारो लोक या क्षेत्राशी जोडलेले आहेत. पण कोरोनामुळे त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण महाराष्ट्र सरकार त्यांच्या सोबत आहे. आणि कलाकारांच्या उदरनिर्वाहाचा पूर्णतः विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले. मर्यादित प्रमाणात चित्रीकरण करण्याबरोबरच फिल्मसिटीमधील चित्रीकरण सुरु करता येईल का याचाही विचार करू असे ते म्हणाले.

 

ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये सर्व काळजी घेऊन चित्रीकरण सुरु करता येईल. पण चित्रीकरण स्थळे कंटेन्मेंट झोन मध्ये नाहीत ना याचीही दक्षता घेतली जाईल. चित्रीकरण समुहातील लोक, त्यांची राहण्याची- जेवणाची सोय या गोष्टीदेखील विचारात घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. मनोरंजन क्षेत्र हे केवळ करमणूक नसून प्रबोधनही करत असते. बऱ्याचदा अनेक चांगले संदेश दिले जात असतात. म्हणूनच हे क्षेत्र महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. या काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि हवी ती मदत करू असा विश्वास सर्वानी मुख्यमंत्र्यांना दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

अर्जुन कपूरने विराटला विचारलेल्या प्रश्नाला कतरिना ने दिले ‘हे’ उत्तर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्वच भारतीय घरी बसून आहेत. सतत आपल्या शूटिंग आणि इतर कामात व्यस्त असणारे कलाकार, सेलिब्रिटीही घरी बसून आहेत. या काळात ते त्यांच्या शूटिंग सहित अनेक गोष्टींचे फोटो, व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली आणि त्याची सेलिब्रिटी पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या अंगणातच क्रिकेट खेळण्याचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनतर त्याच्याशी संबंधित एक व्हिडीओ अभिनेता अर्जुन कपूर याने त्याच्या इंस्टाग्राम वरून शेअर केला होता. त्यात त्याने विराट ला टॅग करून थे तुझ्याशी संबंधित आहे ना? असा प्रश्न विचारला होता. त्यावर विराट आधी कतरिनाने माझ्याशी संबंधित आहे अशी कमेंट केली आहे.

अर्जुन कपूर ने शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये एका माणसाने हळूच गोलंदाजी केली आहे. त्यानंतर चेंडू स्टंटपर्यंत पोहोचायच्या आधी त्याने बॅट हातात घेत फलंदाजी केली आहे. लगेच फटकावलेला स्वतःच अडवून स्वतःच नॉन स्ट्राईकवरील स्टंपवर फेकला. या दरम्यान, धाव घेणाऱ्या रनरची भूमिकादेखील त्याने स्वतःच पार पाडली. स्वतःच विकेटसाठी अपील पण केले आहे. असा हा एकट्या माणसाचा व्हिडीओ शेअर करून त्याने विराट ला टॅग केले होते. पण क्रिकेटवर विशेष प्रेम असणारी कतरीना कैफला क्रिकेटची किती आठवण येत आहे. ते तिने तिच्या कमेंट मधून सांगितले आहे.


View this post on Instagram

 

All cricket lovers right now? ???? @virat.kohli do you relate??

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on May 20, 2020 at 1:29am PDT

कतरिनाचे क्रिकेट प्रेम आपल्याला नवीन नाही. टायगर जिंदा है च्या शूटिंगच्या दरम्यान तिने खेळलेला क्रिकेटचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. एकूणच या सेलिब्रिटींना संचारबंदीत घरी बसून आपापल्या घरी क्षेत्रातील कामाची आठवण येत असल्याचे दिसून येत आहे. या काळात अनुष्का शर्मा विराट सोबत सतत काही व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. सर्वच सेलिब्रिटी त्यांचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गोदावरीच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू ; परभणीतील दुर्देवी घटना

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे |

परभणी जिल्ह्यातील गोदावरी पात्रात मध्ये आज झालेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये हे दोघा बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे ही दुर्घटना घडली आहे .

मर्डसगाव येथील दोन बालके सकाळी अकराच्या सुमारास गोदावरी पात्रातील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कृषी पंपाच्या पाणी उपसण्यासाठी खोदण्यात आलेल्या नदीपात्रातील खड्ड्यातील पाण्यामध्ये दोघा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृतांमध्ये  आशिष भिकू साळवे वय 12 आणि मेहुल सुधाकर लोखंडे वय 8 या दोन मुलांचा समावेश आहे.

खड्ड्यात पडत असताना नदीपात्रात खेळत असणाऱ्या इतर मुलांनी त्यांना पाहिले होते .यावेळी खूप वेळ झाला तरी डोहात पडलेले दोघे वर येत नसल्याने घाबरून जात उपस्थित मुलांनी गावकऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. सदर ठिकाणी गावकरी पोहोचेपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. मयत आशिष हा सातव्या वर्गात शिकत होता तर मेहुल हा चौथ्या वर्गात शिकत होता . या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

महाराष्ट्रात एमबीए सीईटीचा निकाल उद्या; उदय सामंत याची घोषणा

मुंबई । महाराष्ट्रातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल शनिवारी २३ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केलंय की, ‘MAH – MBA /MMS CET 2020 ही परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला १,१०,६३१ उमेदवार बसले होते. या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक- २३ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल.’ MAH-MBA/MMS CET 2020 परीक्षेचा निकाल आधी ३१ मार्च रोजी जाहीर होणार होता. मात्र राज्याच्या सीईटी कक्षाने हा निकाल लांबणीवर टाकला होता. १४ आणि १५ मार्च २०२० या दोन दिवशी ही परीक्षआ घेण्यात आली. ही संगणक आधारित परीक्षा होती.

इथे पहा निकाल
निकाल शनिवारी २२ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यानंतर विद्यार्थी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतील. cetcell.mahacet.org हे सीईटी कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. परीक्षानिहाय स्कोअर आणि एकूण स्कोअर दोन अंकी डेसिमल पॉइंट्समध्ये विद्यार्थ्यांना मिळेल. राज्यातील सर्व शासकीय व्यवस्थापन संस्था, विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग, विनाअनुदानित व्यवस्थापन संस्था आदींच्या प्रवेशांसाठी या सीईटीचे गुण ग्राह्य धरण्यात येतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

१६.८४ लाख करदात्यांना २६ हजार २४२ करोड रुपयांचे आयकर रिफंड मिळाले माघारी – आयकर विभाग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर विभागाने शुक्रवारी एप्रिलपासून सुमारे १६.८४ लाख करदात्यांना २६,२४२ कोटी रुपयांचा प्राप्तिकर रिफंड केल्याचे जाहीर केले आहे. कोरोना विषाणूच्या या संकटात लोकं आणि कंपन्यांना तत्काळ लिक्विडिटी देण्यासाठी कर विभागाने ही रिफंड प्रक्रिया तातडीने जारी केला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अहवाल दिला की,’ १ एप्रिल ते २१ मे दरम्यान सुमारे १६,८४,२९८ करदात्यांना आयकर रिफंड मिळाला आहे.

सीबीडीटीने एक निवेदन देताना असे म्हंटले आहे की, ‘१६,८४,२९८ करदात्यांना सुमारे १५,८१,९०६ कोटी रुपये प्राप्तिकर रिफंड मिळालेला आहे आणि ११,६१० कोटी रुपयांचे कॉर्पोरेट टॅक्स रिफंड १,०२,३९२ निर्धारकांना मिळाला आहे. गेल्या आठवड्यात आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केलेल्या घोषणेनंतर या रिफंडच्या प्रक्रियेस वेग आला आहे.

अर्थमंत्री म्हणाल्या होत्या की, ‘आम्ही रिफंड देण्यास उशीर करत नाही आहोत. आम्ही ते तातडीने देऊ, कारण अद्यापही लोकांना लिक्विडिटीची आवश्यकता आहे. सीबीडीटीने म्हटले आहे की,’१६ मे रोजी पूर्ण झालेल्या आठवड्यात त्यांनी ३७५३१ निर्धारकांना सुमारे २०५०.६१ कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली होती. तसेच २,८७८ कॉर्पोरेट कर निर्धारकांना ८६७.६२ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे.

सीबीडीटीने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘२१ मे रोजी पूर्ण झालेल्या आठवड्यात म्हणजेच १७ ते २१ मे दरम्यान २,६७२.९७ कोटी रुपयांचे रिफंडस मंजूर करण्यात आले आहेत. यासह ट्रस्ट, एमएसएमई, मालकी, भागीदारीसह ३३७७४ कॉर्पोरेट निर्धारकांना सुमारे ६७१४.३४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अशाप्रकारे १,५६,५३८ कर निर्धारकांना रिफंड म्हणून एकूण ९३८७.३१ कोटी रुपये दिले गेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.