Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5763

गुड न्यूज! ‘या’ जिल्ह्यांत उद्यापासून एसटी प्रवाशांच्या सेवेत रूजू होणार; ‘हे’ असतील नियम

मुंबई । संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारी ‘लालपरी’ म्हणजेच आपली एसटी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रूजू होत आहे. रेडझोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर भागात तब्बल दोन महिन्यांनंतर उद्या शुक्रवारपासून जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरू होत आहे. कोरोना साथीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागांमध्ये काही अटीशर्तींच्या अधीन राहून उद्या दि. २२ मे पासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.

राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू आहे. तेव्हापासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरातील अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बससेवा संपूर्ण बंद आहे. परंतु, आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये काही नियमअटी घालून एसटी महामंडळाला केवळ जिल्हा-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गांवर उद्यापासून एसटी बससेवा सुरू होत आहे, असे परब यांनी स्पष्ट केले. या बससेवेसाठी नियमावली तयार करण्यात आली असून त्याचा तपशीलही परब यांनी दिला. अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहनही अनिल परब यांनी केले आहे.

प्रवास करण्याआधी हे नियम लक्षात घ्या!
१. जिल्हा-अंतर्गत सकाळी ७.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत ही बस सेवा सुरू राहील.
२. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.
३. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
४. जेष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )
५. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
६. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मोहनलाल यांनी केली ‘दृश्यम २’ चित्रपटाची घोषणा; टिझर रिलीज

मुंबई । दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार मोहनलाल आज आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. केरळमध्ये आपल्या कुटुंबासोबत त्यांनी आपला वाढदिवस वाढदिवस साजरा केला. शिवाय आपल्या जन्म दिवसाचे औचित्य साधत त्यांनी चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. मोहनलाल यांनी आपल्या २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ‘दृश्यम २’ चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित केलं आहे. या चित्रपटाचा टीझर २० सेकेंदांचा आहे.

एंटनी पेरुमबवूर हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत तर दिग्दर्शक जेथु जोसफ यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी असणार आहे. मोहनलाल यांनी चित्रपटाचा टीझर ट्विटरच्या माध्यमातून प्रदर्शित केला आहे. सोशल मीडियावर हा टीझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘दृश्यम २’ चित्रपटामध्ये मोहनलाल जोर्गेकुटी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. आपल्या मुलीने केलेल्या खूणाचं रहस्य लपवण्याचे काम त्यांनी या चित्रपटात केले आहे. महत्वाचं म्हणजे सरकारकडून परवानगी मिळताच चित्रपटाची शुटिंग सुरू करण्यात येणार आहे.

२०१३ साली मल्याळी भाषेत प्रदर्शित झालेल्या मोहनलाल यांचा ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या सिनेमाच्या गूढ, रंजक कथानकामुळे बॉलीवूडमध्ये निशिकांत कामत या दिग्दर्शकानं अजय देवगणला कास्ट करत ‘दृश्यम’ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला होता. हा रिमेकला सुद्धा उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, या चित्रपटाचा सिक्वलची घोषणा झाल्यावर केवळ दक्षिण भारतच नव्हे तर उत्तर भारतात सुद्धा या चित्रपटाची उत्सुकता दर्शकांना लागली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

…म्हणून अजित पवारांनी केलं होत बंड! चेकमेट पुस्तकातून धक्कादायक खुलासा

मुंबई । गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि राज्यात भाजप-शिवसेनाच्या युतीला बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत मोठा कलह होऊन अखेर युती तुटली आणि महाविकासआघाडी जन्माला आली. पण या दरम्यान महाराष्ट्राने मोठा सत्तासंघर्ष पाहिला. या सत्तासंघर्षातील एक महत्वाचं प्रकरण म्हणजे, महाविकासआघाडीच्या बैठकांवर बैठका सुरु असताना अजित पवार अचानक भाजपच्या गोटात सामील होणं.

संपूर्ण महाराष्ट्राला खडबुडून जागी करणारी ती सकाळ लक्षात आहे. ज्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला होता.राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येऊन ६ महिने उलटले तरी पण अनेकांच्या मनात एक प्रश्न अजूनही घर करुन आहे की, अजित पवारांनी का त्यावेळी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती.

अजित पवार यांनी बंड का केले? हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे. पण पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या चेकमेट पुस्तकात त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पुस्तकात असं म्हटलं आहे की, शिवसेनेसोबत वाटाघाडी सुरु असताना सुप्रिया सुळे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद तर जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्याचं ठरलं. त्यानंतर अजित पवारांच्या मनात चलबिचल सुरु झाली. त्यामुळे नाराज झालेले अजितदादा बैठकीतून निघून गेले. आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अजित पवारांनी सर्वांना धक्का देण्याचं ठरवलं.

२२ नोव्हेंबरच्या रात्री बैठकीतून अजित पवार बाहेर पडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोफिटल हॉटेलमध्ये चर्चा झाली. अजित पवार 38 आमदार फोडण्याच्या तयारीत होते. महत्त्वाचं म्हणजे ही सगळी माहिती सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांना देखील माहित होता. ३८ पैकी २० जणांना मंत्रिपद देण्याची चर्चा ही झाली होती. पण शरद पवारांना याबाबत काहीच माहित नव्हते. पण सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही. बहुमत नसल्यामुळे दोघांनी राजीनामा दिला. पण नंतर पुन्हा अजितदादा यांना महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कोरोना पार्श्वभुमीवर पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

पुणे । देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तुलनेने महाराष्ट्रातील रुग्ण अधिक वाढत आहेत. त्यातही पुणे, मुंबई या दोन शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. पुणे शहरात रोज मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे स्वॅब तपासणीचे अहवाल उशीरा येत आहेत. म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाला पुण्यात आणखी एक स्वॅब चाचणी केंद्र वाढवावे अशा विनंतीचे पत्र लिहिले आहे. त्यांनी या केंद्राची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

सद्यस्थितीला पुण्यात एनआयव्ही मध्ये स्वॅब तपासले जात आहेत. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात स्वॅब संकलन केले जात आहे. मात्र यंत्रणेवर त्याचा ताण येतो आहे. आलेल्या स्वॅबपैकी सर्व स्वॅबचे अहवाल वेळेवर येत नसल्याने आता स्वॅब संकलनही कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह लोक नकळत सगळीकडे वावरत राहिले तर मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढण्याचा वेगळाच धोका आहे. म्हणूनच यंत्रणेवरचा ताण कमी करण्यासाठी पुण्यात आणखी एक स्वॅब चाचणी केंद्र उभारण्याची आवश्यक्ता असल्याचे मोहोळ यांनी या पत्रात लिहिले आहे.

संचारबंदी हा संक्रमण टाळण्याचा कायमचा उपाय नसला तरी स्वॅब संकलन आणि त्याचे अहवाल वेळेवर आले नाहीत तर सकारात्मक रुग्णांची नेमकी संख्या कळणार नाही. यातून संक्रमणाला अटकाव घालणे अवधड होईल. चाचणी क्षमता वाढविल्याने प्रशासनाला त्याची मदतच होईल. नाहीतर शहरातील विषाणू संक्रमणावर नियंत्रण करण्याची प्रक्रिया किती लांबेल सांगता येणार नाही. म्हणूनच चाचणी केंद्र वाढवून स्वॅब संकलन वाढविल्यास विलगीकरणाची प्रक्रिया ही सुलभ होईल असे मोहोळ यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

प्रधानमंत्री वय वंदन योजनेचा विस्तार, जाणून घ्या गुंतवणूक आणि पेंशनचे नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान वय वंदना योजना किंवा पीएमव्हीव्हीवायची मुदत ही पुढील ३ वर्षांसाठी वाढविण्यात आलेली आहे. ही योजना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने नुकताच हा निर्णय घेतला आहे. पीएमव्हीव्हीवाय ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी त्यांना किमान पेंशनची हमी देते. पीएमव्हीव्हीवाय योजनेंतर्गत किमान पेंशन (वर्षासाठी) १००० रुपये दरमहा मिळण्यासाठी १,६२,१६२ रुपयांपर्यंतची किमान गुंतवणूक सुधारित केली गेली आहे.

पीएमव्हीव्हीवायची सुरूवात २०१७ मध्ये झाली होती
ही योजना २०१७ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत एलआयसीचा लाभ ऑनलाइन किंवा ऑफलाइन गुंतवणूकीद्वारे घेता येईल. ही योजना केवळ ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठीच आहे.

यासाठीच कालावधी वाढवल्यानंतर, ज्येष्ठ नागरिकांना आता आणखी तीन वर्षे मिळत आहेत ज्यामध्ये त्यांना या योजनेत गुंतवणूक करून बँकांकडून अधिक व्याज मिळू शकेल. या योजनेंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ७.४ टक्के परतावा मिळण्याची हमी देण्यात येईल आणि ती दर वर्षी निश्चित केली जाईल.

आता किती गुंतवणूक करू शकता
प्रधानमंत्री वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) या योजनेंतर्गत आपल्याला जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या पॉलिसीचा कालावधी हा १० वर्षांचा आहे. नवीन नियमांनुसार किमान गुंतवणूकीची रक्कम वाढवून १,५६,६५८ रुपये करण्यात आली असून यामुळे वर्षाला १२,००० रुपये पेन्शन मिळणार आहे. त्याचबरोबर दरमहा किमान १००० रुपयांच्या पेन्शनसाठी १,६२,१६२ रुपयांची गुंतवणूक निश्चित केली गेली आहे.

आताच्या हिशेबानुसार मिळणार पेन्शन
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ही योजना ७.४ % वर्षाकाठी परतावा देईल. या योजनेतील गुंतवणूकीवर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा किमान पेंशन १,००० मिळू शकते तर जास्तीत जास्त पेन्शनची रक्कम दरमहा १०,००० पर्यंत मर्यादित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अम्फान वादळाचा पश्चिम बंगालला जबरदस्त तडाखा; आतापर्यंत ७२ जणांच्या मृत्यूची नोंद

वृत्तसंस्था । बुधवारी पश्चिम बंगालला धडकलेल्या अम्फान चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा पश्चिम बंगाल राज्याला बसला आहे. राज्यात अम्फान चक्रीवदाळामुळे आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यूची नोंद झाल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही माहिती दिली. अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणाही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली.

अम्फान या चक्रीवादळाला कोरोना विषाणूपेक्षाही भयानक असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. आतापर्यंत इतकं भयानक चक्रीवादळ मी कधीही पाहिलं नव्हते, असेही त्या म्हणाल्या. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाडे पडल्यामुळे झाला आहे. ओडिशामध्येही तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्यात बचाव कार्य सुरु आहे. तसेच बांगलादेशमध्ये या चक्रीवादळामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. पश्चिम बंगालमधील दिघा येथे वादळाने भरतीच्या मोठ्या लाटा आल्या. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा, जगतसिंहपूर, कटक, केंद्रपारा, जाजपूर, गंजम, भद्रक, बालासोर येथे मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता जमिनीला स्पर्श केला, त्यानंतरच्या झंझावातात अनेक झाडे, घरे उन्मळून पडली असून विद्युत खांबही कोसळले आहेत.

सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवले असून वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाला. पश्चिम बंगालमध्ये उद्या दुपापर्यंत वाऱ्याचा वेग कायम राहणार आहे. अम्फान वादळाचा फटका नंतर आसाम व मेघालयालाही बसू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

शिवसेना नेत्याची गोळी झाडून हत्या; उत्तर प्रदेशातील घटना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे शिवसेनेचे नेते अनुराग शर्मा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रात्री उशिरा अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अनुराग शर्मा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनुराग शर्मा हे शिवसेनेचे माजी जिल्हा संयोजकही होते. त्यांच्या पत्नी या भाजपच्या सदस्या आहेत.

अनुराग शर्मा यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ माजवला. यावेळी तोडफोड देखील झाली. रामपूर नगरपालिकेच्या प्रभाग ४ मधील नगरसेविका शालिनी शर्मा यांचे पती अनुराग शर्मा यांना ज्वाला नगरमध्ये अज्ञात इसमांनी गोळ्या घालून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. अनुराग शर्मा यांच्यावर डझनभराहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

अनुराग शर्मा यांच्यावर खून आणि दरोड्यासह सुमारे तीन डझन गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे. हिस्ट्रीशीटर असूनही ते राजकारणात खूप सक्रिय होते. त्यांच्या पत्नी अनेक वेळा त्यांच्या प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत.

मुरादाबाद झोनचे आयजी रमीत शर्मा यांनीही लगेच घटनास्थळ गाठले आणि जिल्हा रुग्णालयात जाऊन कुटुंबियांची पाहणी केली. या खुनाचा लवकरात लवकर खुलासा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. एसपी रामपूर शगुन गौतम यांनी सांगितले कि, ‘अनुराग शर्मा हे आपल्या स्कूटीवरून घरी जात होते,तेव्हा दोन गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुलवामा पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर; दहशतवादी हल्ल्यात १ पोलीस शहीद तर १ जखमी

श्रीनगर । काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. पण दुसरीकडे दहशतवाद्यांचे सुरक्षा दलांवर हल्लेही वाढले आहेत. पुलवामात सलग दुसऱ्या दिवशी जवानांवर हल्ला झाला आहे. पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या एका टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं सांगण्यात येतं आहे. यात एक पोलीस शहीद झाला. तर १ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतं आहे. यानंतर जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुलवामातील प्रिचूमध्ये आज दुपारी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकावर हा हल्ला करण्यात आला. यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन जवान जखमी झाले. यातील एक जवान शहीद झालाय. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवली. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

पुलवामात आज सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दलांवर हल्ला झाला आहे. श्रीनगरच्या बाहेरील परीसरात असाच हल्ला झाला. यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले. यानंतर दहशतवादी जवानांची शस्त्र हिसाकून पळाले. सुरक्षेसाठी तैनात असलेले हे दोन जवान दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी दिली.आजही जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत लोलाब येथील जंगलात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना पकडलं. हे तिन्ही दहशतवादी लश्कर ए तोयबाशी संबंधित आहेत. तिघांकडून शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

आईला भेटण्यासाठी १४०० किमी ड्राइव्ह करत मुंबईहून दिल्लीला पोहोचली ‘हि’ बॉलिवूड अभिनेत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे देशात बर्‍याच दिवसांपासून लॉकडाउन सुरु आहे. अशा परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे हे एका आव्हानापेक्षा काही कमी नाही. पण हे असे असूनही अभिनेत्री स्वरा भास्करने या सुरु असलेल्या लॉकडाउन दरम्यान १४०० किमीचे अंतर कापले आहे, तेही रस्त्याने. या अभिनेत्रीने नुकताच मुंबई ते दिल्ली हा प्रवास केला आहे.

स्वराने मुंबईहून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला
अभिनेत्री स्वरा भास्करची आई जखमी झाली आहे. तिच्या आईच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे स्वराला तिच्या आईबद्दल फारच काळजी वाटू लागली होती आणि तिला आपल्या आईला दिल्लीमध्ये असे एकटं सोडता आलं नाही. म्हणून या अभिनेत्रीने अगदी घाईघाईनेच मुंबईहून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे जाण्यापूर्वी तिने प्रशासनाकडून प्रत्येक प्रकारची परवानगी घेतली होती. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच तिने मुंबई ते दिल्लीचा प्रवास केला. आता ही अभिनेत्री आपल्या आईसमवेत दिल्लीत आहे. स्वराने तिचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.


View this post on Instagram

 

Face sans make up. Hair sans extensions. Life sans regrets. Me as me. #me #selfpotrait

A post shared by Swara Bhasker (@reallyswara) on May 19, 2020 at 1:57pm PDT

 

ती प्रत्येक विषयावर अविचारीपणे बोलते
स्वरा भास्कर ही अशा काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहे जी आपले विचार मुक्तपणे व्यक्त करत असते. ती कोणत्याही विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. अलीकडेच तिने टिक टॉक वर देखील चांगळीच शाळा घेतली होती. महिलांविरूद्ध काही आक्षेपार्ह व्हिडिओ टिक टॉकवर दाखविल्याबद्दल स्वराने आपला संताप व्यक्त केला होता.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पुढील ३ महिने इतके असेल विमान प्रवास भाडं; केंद्रानं केले किमान आणि कमाल तिकीट दर निश्चित

नवी दिल्ली । विमान प्रवासासाठी पुढचे तीन महिने किमान आणि कमाल तिकिट दर निश्चित करण्यात आल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. येत्या २५ मेपासून देशांतर्गत विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे एसओपी म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्या, ज्यात तिकीट दरांचाही समावेश होता. विमान उड्डाणांचं सात श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आलं असून मुंबई ते दिल्ली हे भाडं ३ हजार ५०० रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत असेल पुरी यांनी स्पष्ट केलं. २४ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे दर निश्चित असतील असंही पुरी यांनी सांगितलं. देशांतर्गत विमान प्रवासासाठी ही दरनिश्चिती करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आतापर्यंत विमान कंपन्यांकडून किमान ते कमाल तिकीट दर संबंधित वेबसाइटवर दाखवला जायचा. पण आता विमान तिकीट परवडणारं असावं, त्यामुळे किमान आणि कमाल तिकीट निश्चित करण्यात आल्याचं हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. दिल्ली ते मुंबईसाठी किमान तिकीट दर ३५०० ते कमाल तिकीट १० हजार रुपयांपर्यंत असेल. मेट्रो ते मेट्रो शहराच्या प्रवासासाठी २०२० च्या उन्हाळ्यातील वेळापत्रकानुसार एक तृतीयांश म्हणजेच ३३.३३ टक्के विमानांना परवानगी देण्यात आली आहे. तर मेट्रो ते नॉन मेट्रो किंवा या उलट उड्डाणे १०० पेक्षा जास्त आहेत.

दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांचा मेट्रो शहरांमध्ये समावेश होतो. विमान प्रवासाच्या अंतराचे वर्गीकरण ७ प्रकारांमध्ये करण्यात आलं आहे. यामध्ये ०-३० मिनिट, ३०-६० मिनिट, ६०-९० मिनिट, ९०-१२० मिनिट, १२०-१५० मिनिट, १५०-१८० मिनिट आणि १८० ते २१० मिनिट असं हे वर्गीकरण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”