Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5764

कोरोनाचा शोध घेण्यासाठी ‘हे’ स्मार्ट हेल्मेट तयार; संपूर्ण शरीर होणार स्कॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी जगभरात आधुनिक साधने वापरली जात आहेत. अशातच इटलीमध्ये कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर सुरू झाला आहे. या स्मार्ट हेल्मेटमध्ये कॅमेरा आणि थर्मल स्क्रिनर बसविण्यात आले आहेत.

स्मार्ट हेल्मेट कोरोना विषाणूची तपासणी करेल
रोम विमानतळावरील प्रवाशांना या स्मार्ट हेल्मेटच्या तपासणीतून जावे लागेल. कोरोना विषाणूचा संसर्ग शोधण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. या आधुनिक उपकरणाद्वारे विमानतळावरील प्रवाशांचे आणि कर्मचार्‍यांचे तापमान तपासले जाईल. त्यातील कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर प्रवाशांच्या शरीराच्या तापमानातील चढउताराची नोंद घेतील. सुरक्षा अधिकारी हे स्मार्ट हेल्मेट घालून विमानतळावर लोकांना स्कॅन करतील. हे हेल्मेट त्याच्या आसपास हजर असलेल्या लोकांचा चेहरा स्कॅन करेल. तसेच, सात मीटर अंतरावर उपस्थित असलेल्या व्यक्तीचे तापमान देखील सांगेल. हे हेल्मेट प्रवाशांच्या डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सम्पूर्ण शरीराचे स्कॅन करेल.

७ मीटरच्या परिघात असलेल्या रुग्णांस ओळखले जाईल
असे स्मार्ट हेल्मेट तंत्रज्ञान वापरणारे रोम हे युरोपमधील पहिलेच शहर बनले आहे. मात्र , यापूर्वीही, संयुक्त अरब अमिराती आणि चीनमध्ये यांसारख्या आधुनिक डिव्हाइसचा वापर केला गेला आहे. अधिकाऱ्यांना अशी आशा आहे की या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवासी त्यांच्या घरी सुखरुप आणि आरामात जाऊ शकतील. हवाई मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे शरीर गरम किंवा ताप असल्यास त्यांना उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पुढच्या महिन्यापासून रोम विमानतळावरून बरीच उड्डाणे सुरू होणार आहेत. या स्मार्ट हेल्मेटची रचना इटली आणि चीनमधील काही अभियंत्यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Gold Price Today | सोन्या चांदीचे दर आज पुन्हा पडले; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी वायदे बाजारात सोन्या-चांदीचे भाव पुन्हा घसरले आहेत. ५ जून २०२०रोजीच्या, एमसीएक्स एक्सचेंजमधील सोन्याचे वायदे भाव गुरुवारी २५६ रुपयांनी घसरून ४६,८७५ रुपयांवर आले होते. त्याचबरोबर गुरुवारी सकाळी एमसीएक्सवरील पाच ऑगस्ट २०२० च्या वायदे भाव हा ०.०१ टक्क्यांनी किंवा १४९ रुपयांनी घसरून ४७,१९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

गुरुवारी सकाळी ग्लोबल स्पॉट आणि फ्युचर्सच्या किंमतीही खाली आलेल्या आहेत. गुरुवारी स्थानिक वायदे बाजारात चांदीच्या किमतीतही घसरण दिसून आली आहे. गुरुवारी सकाळी एमसीएक्सवर ३ जुलै २०२० रोजीचा चांदीचा वायदा हा १.४३ टक्क्यांनी किंवा ७०३ रुपयांनी घसरून ४८,३५५ रुपये प्रतिकिलो राहिला.

आंतरराष्ट्रीय स्तराविषयी बोलतांना येथेही गुरुवारी सकाळी सोन्याचे वायदा व स्पॉट किंमती खाली घसरल्या आहेत. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी सोन्याचे जागतिक वायद्याचे दर ०.५० टक्क्यांनी किंवा ८.८० डॉलरनर घसरून ते १७४३.३० डॉलर प्रति औंस झाले. त्याचबरोबर सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत ०.४१ टक्क्यांनी किंवा ७.०९ डॉलरने घसरून १ ७४१.०९ डॉलर प्रति औंसवर बंद झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतींबद्दल बोलतांना, चांदीच्या जागतिक आणि फ्युचर्सच्या किंमतींमध्ये गुरुवारी सकाळी घट दिसून आली. गुरुवारी सकाळी जागतिक स्तरावरील चांदीचे दर १.९२ टक्क्यांनी किंवा ०.३४ डॉलर घसरुन प्रति औंस १७.२२ डॉलरवर बंद झाला. त्याचबरोबर चांदीचा जागतिक वायदा भाव गुरुवारी कॉमेक्सवर १.६४ टक्क्यांनी किंवा ०.३० डॉलर घसरुन प्रति औंस १७.७४ डॉलरवर व्यापार करीत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘त्या’ सॅनिटरी पॅडवरून आदित्य ठाकरेंवर मनसेची जोरदार टीका

मुंबई । कोरोना संकटाच्या काळात वेगवेगळ्या पातळीवर गरजू नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंच वाटप करत मदत केली जात आहे. शिवसेनेकडूनही मुंबईत गरजूंना वस्तूंचं वाटप करण्यात येत आहे. मात्र, वस्तूंचं वाटप करतांना शिवसेनवर आता एका गोष्टींवरून टीकेचा भडीमार होत आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील एका परिसरात शिवसेनेकडून महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आलं. जवळपास ५०० सॅनिटरी पॅड्सची पाकिट सदर परिसरात वाटण्यात आली. या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटावर आदित्य ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता. यावरूनच आता शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मनसेच्या संदीप देशपांडेंनी कोरोना संकटाच्या परिस्थितीतही शिवसेना जाहिरातबाजी करत असल्याची सडकून टीका केली आहे.

मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून ‘कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको. आधीच फोटो छापले होते का?’ असा सवाल ट्विटरच्या माध्यमातूनशिवसेनेला केला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचा कहर जास्त आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणं सील करण्यात आली आहेत. महिलांना कंन्टेन्मेंट झोनमधून बाहेर पडणं कठीण आहे. म्हणून अनेक संस्था, राजकीय पक्ष पुढे येऊन मदत करत आहेत. मात्र ही मदत करत असताना राजकीय पक्ष मदत केल्याची जाहिरात करताना दिसत आहेत. दरम्यान, मदत म्हणून वाटल्या गेलेल्या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटावर आदित्य ठाकरेंचा फोटो झळकल्यानं त्यांच्यावर आता टीका होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मंत्र्यांना ‘हिजडा’ संबोधणाऱ्या निलेश राणेंनी तृतीयपंथीयांची माफी मागावी- प्रकाश आंबेडकर

मुंबई । निलेश राणेने एका मंत्र्याला बोलताना जो शब्द वापरला आहे तो मागे घ्यावा आणि समस्त तृतीयपंथ समाजाची माफी मागावी असं म्हणत त्यांच्या क्तव्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर यांनी केला. शिवाय वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथी समूहाच्या बाजूने उभे असल्याचे ही त्यांनी सांगितलं. माणूस म्हणून कोणालाही हिणवण्याचा अधिकार नाही. तृतीयपंथी हे देखील माणूसच आहेत, त्यांचाही स्वीकार केला गेला पाहिजे. राजकीय नेतेमंडळींना तरी किमान याचं भान असावं अशा शब्दांत आंबेडकर यांनी निलेश राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर त्यांचा खरपूस समाचार घेतला. गुंडगिरी प्रवृत्तीची माणसं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्यांना सामाजिक भान राहत नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी निलेश राणे यांना खडे बोल सुनावले.

काय आहे नेमकं प्रकरण
गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे यांचा एका राज्यमंत्र्यांसमवेत सोशल मीडियावर राजकीय कारणावरुन वाद घालत आहेत. यादरम्यानच राणे यांनी ट्विटर अकाउंटवरून तृतीयपंथी समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने उल्लेख करत समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या. कोणीतरी ‘हिजडा’ राज्यमंत्री आहे, ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले अशा शब्दांत त्यांनी हे ट्विट केलं होतं. निलेश राणे यांच्या या बेताल वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

निलेश राणेंवर गुन्हा दाखल
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हिजडा शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करून तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखविल्या आहेत. त्याविरोधात 499, 501 अन्वये अब्रूनुकसान आणि मानहानीचा गुन्हा जळगाव जिल्ह्यातील फैजपुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. निलेश राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता तृतीयपंथी समाजाला हिणवणारे बेताल वक्तव्य केले. हे अशोभनीय व तृतीयपंथी समुदायाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारे असल्याचे तक्रारदार शमीभा पाटील यांनी म्हटले होते. 2014 च्या दीर्घ अहवालाअंती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकारी यांनी तृतीयपंथी अर्थात सांस्कृतिक ओळख हिजडा असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून तृतीयपंथी मान्यता दिलेली असल्याचेही शमीभा पाटील यांनी नमूद केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मुंबई येथून परतलेल्या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह, जालना जिल्ह्यात रुग्ण संख्या 44

जालना प्रतिनिधी । मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालन्यात पोहचलेल्या दोन भावांसह एकाच्या पत्नीचा अशा तीन जणांचे अहवाल काल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून आता जालना जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 44 वर पोहचली असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

जालना तालुक्यातील वडगाव वखारी येथील मूळ रहिवाशी असलेले दोन भाऊ आणि या दोघांपैकी एकाची पत्नी असे तीन जण मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. सदर तिघेही आता वखारी वडगाव येथे गेलेले नाहीत.मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालना येथे परतल्यानंतर हे तिघेही सिद्धेश्वर पिंपळगाव ता.अंबड येथे गेले असल्याची माहिती या सूत्रांनी दिली. तेथे गेल्यानंतर तिघांनाही खोकला आणि ताप आल्याने हे तिघेही अंबड येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले होते.

अंबड येथून या तिघांना जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल बुधवारी रात्री उशिरा या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून जालना जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 44 वर पोहचली असल्याने जिल्हा वासीयांच्या चिंतेत वाढ होत चालली आहे

फडणवीस राजभवनातच एक रूम का नाही घेत? हसन मुश्रिफांचा टोला

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारविरोधात राज्यपालांकडे वारंवार तक्रारी घेऊन राजभवनावर जाणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टोला हाणला आहे. ‘फडणवीस यांना मलबार हिलवरून राजभवनावर जायला वेळ लागतो. त्यामुळं त्यांनी राजभवनावरच एखादी रूम घ्यावी,’ असा उपरोधिक सल्ला मुश्रीफ यांनी फडणवीसांना दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुश्रीफ आज जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर टीका केली.

मागील काही दिवसांपासून फडणवीस वारंवार राजभवनवर हजेरी लावून राज्यपालांशी चर्चा करत आहेत. राज्यपालांकडे राज्य सरकारच्या तक्रारी करत आहेत. मंगळवारी देखील फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन कोरोनाची परिस्थिती हाताळायला राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी बैठक बोलावली. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे.

फक्त राजकारणापायी केंद्र सरकारनं लॉकडाऊन उशिरा लागू केलं
‘मध्य प्रदेशातील राजकारणापायी केंद्र सरकारनं देशातील लॉकडाऊन लांबवलं. राज्य सरकारनं धोका ओळखून अधिवेशन गुंडाळलं. मात्र, लोकसभेचं अधिवेशन सुरूच होतं. या काळात सुमारे ३५ लाख लोक विमानानं भारतात आले. ते मुंबई, दिल्ली, अहमदाबाद अशा सर्वच ठिकाणी गेले. त्या ३५ लाख लोकांना वेळीच क्वारंटाइन केलं असतं तर १३५ कोटी लोकांना घरात बसावं लागलं नसतं,’ असं मुश्रीफ म्हणाले.

भाजप सदस्यांना निधी दिला जाईल, पण त्याचे प्रमाण थोडे कमी असेल
ग्रामविकास विभागाचा निधी देताना भाजपच्या सदस्यांना कमी निधी दिल्याचा आरोप होत असल्याबद्दल मुश्रीफ म्हणाले ‘गेल्या पाच वर्षांत हे आम्ही भाजपकडूनच शिकलो आहोत. त्यांचंच अनुकरण आम्ही करत आहोत. माजी अर्थमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघातील आकडे पाहिले तर ते स्पष्ट होईल. भाजप सदस्यांना निधी दिला जाईल, पण त्याचे प्रमाण थोडे कमी असेल. झुकतं माप आघाडीच्या सदस्यांनाच राहील’ असं मुश्रीफ म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

ए रोहितदादा, आमच्या गावातून पण कोरोना घालव ना..!! चिमुकलीचं रोहित पवारांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात अनेक योध्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत कोरोनाशी लढाई यशस्वी केली. डॉक्टर, पोलीस, इतर आरोग्यसेवक आणि सामान्य नागरिकसुद्धा या लढाईत प्राणप्रणाने लढत आहेत. कोरोनामुक्तीचा वेगळा पॅटर्न विविध लोकप्रतिनिधी आपापल्या भागात राबवत आहेत. अशाच एका अनोख्या पॅटर्नची गरज आपल्या गावात असल्याची गरज एका चिमुकलीने बोलून दाखवली आहे. मृण्मयी विकास म्हस्के असं बीडमधील आष्टी तालुक्यातील आष्टा गावात राहणाऱ्या या चिमुकलीचं नाव आहे. मृण्मयी सध्या चौथीत शिकत असून तिने आपल्या हाताने आमदार रोहित पवार यांना पत्र लिहीत अनोखी मागणी केली आहे.

“प्रिय रोहितदादा, तुम्ही जामखेडमधून जसा कोरोना घालवला तसा आष्टीमधून पण घालवा ना..” अशी भाबडी मागणी मृण्मयीने रोहित पवारांकडे केली आहे. यात पुढे मृण्मयीने आपल्या वडिलांशी झालेल्या संवादाचा दाखला दिला आहे. तिने वडिलांना विचारलं, “पप्पा, प्रत्येकजण कुणाला तरी घाबरत असतो, तसा कोरोनापण कुणालातरी घाबरत असेलच ना? यावर विकास म्हस्के यांनी “कोरोना रोहितदादाला, डॉक्टरांना आणि पोलिसांना घाबरतो” असं उत्तर दिलं.

रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यानंतर प्रशासन पातळीवर कठोर अंमलबजावणी केल्याने इथला कोरोना नियंत्रणात आला. त्याचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवत मृण्मयीने अनोखी मागणी रोहित पवार यांच्याकडे केली आहे. आता ही मागणी रोहित पवार मनावर घेणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चला मास्कसहित हसुया, कोरोनाची लढाई जिंकूया 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना संक्रमणाचे सावट पसरलेले आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझर ने हात धुण्याची आणि मास्क वापरण्याची जागृती केली जात आहे. विविध वेशभूषा करून कलाकृतींच्या माध्यमातून मास्क वापरण्याची सध्याची आवश्यकता सांगितली जात आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या या युद्धात मास्क हे एक प्रमुख शस्त्र बनले आहे. न्यूयार्कमधील निडर मुलीचा पुतळा,  तैवानमधील कन्फ्यूशिअस पुतळा, जीनिव्हाच्या किनाऱ्यावरचा फ्रिडी मर्क्युरीचा पुतळा आणि इंग्लड मधील राणी व्हिक्टोरियाचा पुतळा काही दिवसांपासून या सर्वांमध्ये एक सामान्य गोष्ट आहे. ती म्हणजे या सर्व पुतळ्यांना मास्क लावण्यात आले आहेत.

Anyone checked on how Mary Richards is doing? | Star Tribune

जगभरात विविध ठिकाणी मास्क हे कोरोनाची लढाई जिंकण्याचे एक शक्तिशाली शस्त्र आहे आणि ते असेल तरच आपण हसू शकू असा संदेश दिला जात आहे. जोपर्यंत आपण शत्रूचा पूर्णतः नायनाट करणार नाही तोपर्यंत आपण हार मानणार नाही असेच जणू सर्वजण सांगत आहेत. काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे ही फॅशन बनली होती पण आता ती सर्वात महत्वाची गरज बनली आहे. त्यामुळे जगभरात मास्क बनविण्यात लोक व्यस्त झाले आहेत. अशीच काही उदाहरणे नुकतीच पाहण्यात आले. बँकॉक मधील एका मंदिरात नृत्याच्या वेळी थाय नृत्यांगनांनी नृत्य सादरीकरणाच्या वेळी मास्क लावला होता. शांघाय बॅलेट कंपनीतील नर्तक मास्क लावून प्रशिक्षण देत होता. ब्राझीलचा फॅशन फोटोग्राफर मर्सिओ रॉड्रिग्ज टाकाऊ पासून टिकावू मास्क बनवतो आहे.

Chicago's Art Institute lion's face masks stolen

New normal: Pandemic has statues wearing face masks too | AccuWeather

एकूणच चित्र पाहता कोरोना विषाणूची लढाई लढण्यासाठी आणि ती जिंकण्यासाठी जगभरातील लोक एकवटले आहेत. आणि मास्कच्या पाठीमागे असणाऱ्या हास्यातील आत्मविश्वासाने ही लढाई जिंकेपर्यँत हार न मानण्याचे सर्वानी ठरविले आहे. अशा प्रकारे विविध माध्यमातून लोकांना आपण एकत्र असल्याची आणि एकमेकांच्या साथीने एकत्र ही लढाई जिंकण्याची ग्वाहीच दिली जात आहे.

US hits 1 million coronavirus cases - CNET

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना संकटातही भारतातील ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार चक्क ‘बोनस’

नवी दिल्ली । कोरोनामुळं तयार झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सगळ्याच कॉर्पोरेट कंपन्या आता वेतन कपात आणि कर्मचारी कपात करत असताना कर्मचारी बोनस आणि पगारवाढीची अपेक्षाही करू शकत नाहीत. पण एचसीएल टेक यासाठी अपवाद ठरली आहे. एचसीएल टेक्नोलॉजीसने आपल्या दीड लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. शिवाय कंपनीकडून गेल्या वर्षीच्या कामाचा बोनसही दिला जाणार असून कर्मचारी कपात होणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. कर्मचाऱ्यांनी गेल्या १२ महिन्यात केलेल्या कष्टाचं फळ त्यांना देणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. यापूर्वीही कंपनीने अशीच वचनबद्धता जोपासली असून आताही जोपासली जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.

एचसीएल टेक्नोलॉजीज ही देशातील सर्वात मोठी तिसरी सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी आहे. या कंपनीचं मुख्यालय दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये आहे. कोरोनाचा कंपनीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. पण या संकटाला तोंड देण्याची तयारी कंपनीने केली आहे. वार्षिक पगारवाढ ही जूनच्या अखेर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एचसीएल टेकचे एचआर प्रमुख आप्पाराव व्हीव्ही यांनी दिली आहे. वेतन कपात किंवा बोनस न देणे हे प्रकार होणार नाहीत, असंही कंपनीने सांगितलं आहे. कंपनी जो बोनस देते, तो कर्मचाऱ्यांनी गेल्या १२ महिन्यात जे परिश्रम केले आहेत, त्याचा मोबदला असतो आणि आपली वचनबद्धता आपण जोपासली पाहिजे यावर आमचा विश्वास आहे. २००८ ची जागतिक मंदी असो किंवा इतर संकट असो, एचसीएलने कधीही कर्मचाऱ्यांच्या वेतनाला धक्का लागू दिला नाही. हाच विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असं अप्पाराव म्हणाले.

कोरोनाच्या संकटात सुद्धा एचसीएल टेक कंपनीने नोकर भरती थांबवली नाही आहे. कंपनीने अगोदरच १५ हजार फ्रेशर्सना नोकरीची ऑफर दिली होती. हे सर्व जॉब देणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. करोना संकटामुळे एकही प्रोजेक्ट रद्द झालेला नाही. पण नवीन प्रोजेक्टच्या कामाला मात्र विलंब झाला आहे. पण यातही अनेक चांगल्या गोष्टींकडे आम्ही पाहत आहोत. त्यामुळे जिथे आवश्यकता आहे तिथे आम्ही नोकर भरतीही करत आहोत, असंही आप्पाराव यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मॅच फिक्सिंगनंतर सौरव गांगुलीने टीम इंडियाचे चित्रच बदलले – नासिर हुसेन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याची गणना भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. सन २००० मधील मॅच फिक्सिंग घोटाळ्याने जागतिक क्रिकेटमध्ये भारताची प्रतिमा डागाळली होती, त्यानंतर सौरव गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि प्रतिमा सुधारली. त्याच्या नेतृत्वात भारताने देशात आणि परदेशातही शानदार विजय मिळवले.

ज्या पद्धतीने सौरव गांगुलीने स्वतःची टीम तयार केली आणि तरुण खेळाडूंना संगत घेऊन परदेशी भूमीवर झेंडा फडकावला ते कॊतुकास्पद होते. गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००२ मध्ये श्रीलंकेबरोबर संयुक्तपणे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती तसेच २००३ च्या वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती.

सौरव गांगुलीच्या कर्णधारपदाचे आता इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन याने कौतुक केले आहे. नासिर हुसेन यांनी दादाने भारतीय संघाचे चित्र कसे बदलले याबद्दल सांगितले. हुसेन यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी भारतीय संघ सर्वोत्कृष्ट खेळाडूंसह एक ‘चांगली टीम’ असायचा, परंतु गांगुलीने या संघाला एक ‘कठीण टीम’ बनवले.

Harsha Bhogle recalls Natwest 2002 final

हर्षा भोगलेबरोबर झालेल्या लाइव सेशनमध्ये बोलताना हुसेन म्हणाला, “सौरव गांगुलीच्या आधी भारत एक चांगला संघ होता. या संघात अझर, जवागल श्रीनाथ सारखे महान खेळाडू होते. पण गांगुलीने या संघाला कठीण संघ बनविला.”त्याचबरोबर भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलताना हुसेन म्हणाला की,’ कोहलीने भारतीय संघाला तंदुरुस्त आणि जिंकण्याची मानसिकता दिली.

Where are they now: India's 2002 Natwest Series final winning team

हुसेन म्हणाला, “रेड बॉल क्रिकेटमध्ये बर्‍याच गोष्टींवर काम करावे लागते. मला वाटते विराट कोहली ज्या पद्धतीने संघ हाताळत आहे, टीममध्ये फिटनेसची संस्कृती तसेच जिंकण्याची मानसिकता सर्व कोहलीमुळेच आहे.”या चॅट दरम्यान हुसेनने न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसनला त्याचा आवडता कर्णधार म्हणून निवडले आणि इंग्लंडचा कर्णधार इओन मॉर्गनला व्हाईट बॉल क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवडले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.