Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5767

रियल माद्रिदच्या माजी प्रशिक्षकाचा दावा,” रोनाल्डोला पार्टी करणे आणि दारू पिणे खूप आवडते”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल माद्रिदचे माजी प्रशिक्षक फॅब्रिओ कॅपेल्लो म्हणाले की,”माझ्या कोचिंग करियरमध्ये ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो एक हुशार प्रतिभावान खेळाडू म्हणून उदयास आला.” कॅपेल्लोने असेही म्हटले आहे की.”या रोनाल्डोला पार्टी करणे आणि दारू पिणे आवडत होते . तसेच त्याच्या या आवडीमुळेच ड्रेसिंगरूममध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या.

कॅपेल्लोने स्काय स्पोर्ट्स इटालियाशी बोलताना सांगितले की, “माझ्या कोचिंग दरम्यान तो एक हुशार प्रतिभावन खेळाडू बनला होता. परंतु त्याच वेळी माझ्यासाठी तो ड्रेसिंग रूममध्ये सर्वाधिक समस्या निर्माण करणारा एक खेळाडूही होता. तो सतत पार्ट्या करायचा.”

त्यांनी पुढे सांगितले की, “एकदा (रूद) व्हॅन निस्टेलरॉय मला म्हणाला, कोच मला ड्रेसिंग रूममध्ये दारूचा वास येतोय. रोनाल्डो नंतर इंटर मिलान या टीमकडून खेळण्यास गेला आणि आम्ही जिंकण्यास सुरवात केली. पण जर आपण प्रतिभेबद्दल बोललो तर तो खूपच मोठा प्रतिभावान खेळाडू होता . त्याच्यात अलौकिक बुद्धिमत्ता होती यात शंकाच नाही. “

तत्पूर्वी, टॉटेनहॅमचे हॉस्टपरचे कोच जोस मॉरिन्हो म्हणाले की,” रोनाल्डो एक उत्तम खेळाडू आहे. रोनाल्डोने ब्राझीलकडून फुटबॉलचे ९८ सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने ६२ गोल केले आहेत. ब्राझीलसाठी तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.

It must be boring to hear I am the REAL Ronaldo': Brazil legend ...

मात्र, ब्राझील दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा रोनाल्डो त्यावेळी जेव्हा पाच महिन्यांत दोनदा गुडघ्याच्या दुखापतीने ग्रस्त झाला तेव्हा तो त्याच्या कारकीर्दीमध्ये अव्व्ल स्थानी होता. यावेळी तो इंटर मिलानकडून खेळत होता. या दुखापतीतून सावरण्यास त्याला सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागला आणि २००२ वर्ल्ड कपच्या अगदी थोडे दिवस आधीच त्याने ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. या विश्वचषकात त्याने एकूण आठ गोल नोंदवून आपल्या ब्राझील संघाला विजयी होण्यास मदत केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

घराच्या वाटणीवरून चुलत्याकडून पुतण्याचा कोयत्याने खून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |

तासगाव तालुक्यातील कुमठे येथे घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात पुतण्याने चुलत्याचा कोयत्याने गळ्यावर वार करून खून केला. भीमराव नेताजी गाडे असे मयताचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री अकराच्या दरम्यान घडला. याप्रकरणी पुतण्या रोहित ऊर्फ बाला गजानन गाडे याच्याविरूद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तासगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली.

कुमठे येथील भीमराव तुकाराम गाडे आणि रोहित गजानन गाडे या चुलते आणि पुतण्यामध्ये घराच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद होता. त्यातून नेहमी त्यांच्यात अनेकदा भांडण व बाचाबाची होत होती. गावातील लोकांकडून त्यांना अनेकदा समजावले होते. तरीही त्यांच्यात अनेकदा खटके उडत. सोमवारी दुपारी घरात रोहित झोपला होता. यावेळी लहान मुले दंगा करून झोप मोड करत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. हा वाद रोहितच्या डोक्यात चांगलाच बसला. त्यानं काटा काढायचा विचार केला. वादावादी नंतर रात्री भीमराव गाडे यांना घरातल्यानी समाज मंदिरात झोपायला पाठवले.

रात्री साडेअकराच्या दरम्यान वडिलांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आम्ही दरवाजाकडे गेलो असता दरवाजास बाहेरून कडी घातली होती. आम्ही खिडकीतून पाहिले असता तो वडिलांवर कोयत्याने वार करत होता. आम्ही आरडाओरडा केल्यानंतर माणसे गोळा होत लखन कुरणे याने घराची कडी काढली. तोवर लोक गोळा झाल्याने रोहितने पळ काढला. त्यांच्या गळ्यावर, हनुवटी, दंड, हातावर व मानेवर कोयत्याने जबरी वार केल्याने त्यातून रक्त येत होते. जखमी अवस्थेत भिमराव यांना सांगली येथे शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. तेव्हा भीमराव यांचा मृत्यू झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

बालिश बुद्धीच्या निलेश राणेंना ‘हिजडा’ शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ‘गुलाल तिकडे चांगभलं’ या नियमाने आपली राजकीय वाटचाल चालू ठेवणाऱ्या नारायण राणे आणि त्यांच्या दोन चिरंजीवांना सध्या सोशल मीडियात चर्चेत राहण्याची नवनवीन कारणं मिळाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने हीन पातळीवरील टीका करण्यात राणे पुत्र आघाडीवर आहेत. शरद पवारांनी साखर कारखान्याबाबत नरेंद्र मोदींना केलेल्या सुचनेनंतरही निलेश राणे यांनी ट्विट करुन शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर रोहित पवारांनी कोंबडी प्रकरणाचा दाखला दिल्यानंतर निलेश राणे यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा एकदा एका वेगळ्या वादाचं लक्ष निलेश राणे बनले आहेत.

एका ट्विटमधून त्यांनी प्राजक्त तनपुरे या राष्ट्रवादीच्या राहुरीतील आमदारांवर टीका केली आहे. विद्यमान नगरविकास, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी कल्याण आणि ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांच्यावर टीका करताना त्यांनी हिजडा या शब्दाचा उच्चार केला आहे.

त्यांच्या या टीकेला पुण्यातील सामाजिक कार्यकर्ती सारंग पुणेकर हिने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

जर हिजडा शब्दाचा अर्थ माहीत नसेल इतिहास माहीत नसेल तर मी सांगते पण आपली बालिश बुद्धी जगाला दाखवू नका, जेंव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरावैरा पळत ना तशीच काही तुमची गत झालीये, तोंडाला आळा घाला हिजडा शब्द काढा नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल.

सारंग पुणेकर

सारंगच्या या ट्विटला नेटकऱ्यांनीही उचलून धरलं असून काहीही बरळणाऱ्या निलेश राणेंना सारंगने लावलेली ही सणसणीत चपराक समजली जात आहे. हिजडा समुदायाचा अपमान करणारं हे ट्विट असून ते मागे घेण्याच्या सूचना सारंगने केल्या आहेत. सारंग ही सध्या पुण्यातच लॉकडाऊनमुळे हाल होत असलेल्या लोकांसाठी काम करत असून विविध सामाजिक प्रश्नांवर ती नेहमीच संविधानिक मार्गाने व्यक्त होत असते. आता या प्रकारानंतर निलेश राणे तो शब्द ट्विटमधून काढून माफी मागणार का? याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

जळगाव जिल्ह्यात आज 13 कोरोनाग्रस्तांची भर, बाधितांची संख्या 331, आतापर्यंत 110 कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 88 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी 75 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक,  तर जळगाव शहारातील शिवाजीनगर व इतर परिसरातील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 331 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही वाढत जात असून ती काळ 300 पार गेली. त्यामुळे जिल्ह्यावासीयांच्या चिंतेत चांगलीच वाढ झाली आहे. दररोज जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रुग्ण संख्या ही मिळतच आहे.

मात्र या बरोबरच जळगाव जिल्ह्यावासीयांसाठी आनंदाची गोष्ट आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे शतक झाले आहे. आतापर्यंत 110 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये 78 अमळनेरचे, भुसावळचे 9, जळगावचे 8, पाचोराचे 13 तर चोपडा व बाहेरील जिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश. मात करणाऱ्या रुग्णांमध्ये एक वर्षाच्या बालकापासून ते 70 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.


लॉकडाऊनमध्ये अनुष्का शर्माच्या घरात घुसला डायनोसॉर; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात बहुतेक लोक आपापल्या घरातच कैद झालेले आहेत. या अशा लॉकडाऊनच्या काळात मात्र बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घरात ‘डायनासोर’ शिरला. या अभिनेत्रीने डायनासोरचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. आता आपण विचार करत असाल की हे असे कसे घडले ? तर त्याचे झाले असे की, हा ‘डायनासोर’ अनुष्काच्या घरात दाखल झाला आहे हे नक्की, पण हा ‘डायनासोर’ दुसरा कोणीही नसून हा तिचा पती विराट हा आहे.


View this post on Instagram

 

I spotted …. A Dinosaur on the loose ????????????????????????

A post shared by ɐɯɹɐɥS ɐʞɥsnu∀ (@anushkasharma) on May 19, 2020 at 11:57pm PDT

 

अनुष्का आणि विराट हे सध्या त्यांच्या घरीच क्वारंटाइन आहेत. यादरम्यान दोघेही खूप मजा करत आहेत. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात विराट कोहली गुप्तपणे खोलीतून जाताना दिसत आहेत. अनुष्काने यावेळी विराटला ‘डायनासोर’ असे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये विराटही ‘डायनासोर’ सारखे फिरत आणि ओरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना या अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी एक’ डायनासोर ‘स्पॉट केला. अनुष्काच्या या व्हिडिओवर कमेंट करताना बर्‍याच लोकांनी विराटला फनी म्हंटले आहे.

 

 

यापूर्वीही अनुष्काने विराटसोबतच एक व्हिडिओ शेअर केला होता जो जोरदार व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये अनुष्का अगदी टपोरी स्टाईलमध्ये विराटला आवाज देताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये अनुष्का विराटला आवाज देताना म्हणते की … ‘कोहली कोहली .. आय कोहली चौकार मारून दाखव ना ?’. अनुष्काच्या या गंमतीवर विराट काही बोलत नाही, फक्त एक विचित्र लुक देतो. दोघांचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

कराड तालुक्यात ४ नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील रुग्णसंख्या १५० वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात आज पुन्हा ४ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असलेल्या चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असलेले म्हासोली ता. कराड येथील 40 वर्षीय निकट सहवासित पुरुष, मुंबई येथून प्रवास करुन आलेला इंदोली ता. कराड येथील एक 39 वर्षीय पुरुष व ठाणे येथून प्रवास करुन आलेले भारेवाडी ता. कराड येथील पती – पत्नी वय वर्षे 52 व 43 अशा एकूण 4 जणांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याचे गडीकर यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १७० झाली असून यापैकी एकट्या कराड तालुक्यात एकूण ११० कोरोना रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या ६९ इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 3 रुग्ण आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सारा अली खानने शेअर केला कॉलेजचा ‘हा’ फोटो; वरुणने केलं ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने नुकतेच अभिनेत्री सारा अली खानला ट्रोल केले आहे. वास्तविक, वरुणने साराच्या अलीकडेच शेअर केलेल्या फोटोवर कमेंट केली आहे. ही कमेंट साराच्या ग्रेजुएशनच्या दिवसांतली आहे. साराने मंगळवारी इन्स्टाग्रामवर तिच्या ग्रेजुएशन दिवसांतले बरेच फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री सारा अली खान ४ वर्षांपूर्वीच कोलंबिया विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. तिची ही छायाचित्रे वरुणने धवनने शोधून काढली आहेत.

 

वरुणने यावर कमेंट करताना लिहिले की,’ तुझे आतापर्यंतचे सर्वात चांगले शेअर केलेले छायाचित्र.’ वरुणच्या या कमेंटवर सुमारे ११ हजार लाईक्स आल्या आहेत. साराची ही छायाचित्रे शेअर करताना फोटोच्या केप्शनमध्ये तिने कॅप्शन लिहिले,” १९ मे २०१६ रोजी… कधीकधी असे वाटते की तो एक क्षण होता आणि कधीकधी ते एका वेगळ्या जगासारखे भासते. या कॅप्शनसह साराने हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे.

 


View this post on Instagram

 

Sex on fire ????

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on May 19, 2020 at 7:57am PDT

 

वरुणने त्याचा एक मोनोक्रोम फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो कॅमेऱ्याकडे पाहताना दिसत आहे. फोटोमध्ये वरुण पांढर्‍या टी-शर्टमध्ये दिसला आहे आणि त्याने त्यावर जॅकेट घातलेले आहे. या फोटोमध्ये वरुण खूपच हँडसम दिसत आहे. या अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांमध्ये कुली नंबर १ बद्दल बरीच चर्चा आहे. हा चित्रपट गोविंदन या साऊथ इंडिअन मूव्हीचा रिमेक आहे ज्यामध्ये सारा अली खान करिश्मा कपूरची भूमिका साकारत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

रेशन कार्ड नसलं तरी राज्य शासन गरिबांना ५ किलो तांदूळ देणार- छगन भुजबळ

मुंबई । कोरोना व्हायरस आणि लॉकडाउन अशा दुहेरी संकटात हातावर पोट भरणाऱ्या समाजातील एका मोठ्या वर्गापुढे जगण्याचं मोठं संकट आहे. एकीकडे हाताला काम नाही तर दुसरीकडं काही जणांकडे सरकारी मदत घेण्यासाठी शासन दफ्तरी नोंद नाही. अशा वेळी गरिबांवर उपासमारीची वेळ आली असतांना राज्य सरकारकडून आता रेशन कार्ड नसणाऱ्यांनाही अन्नधान्याचा पुरवठा केला जाणार आहे. कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड नसलेल्यांना राज्यात मोफत ५ किलो तांदूळ वाटण्यात येणार आहेत अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

अन्नधान्य पुरवठ्यासाठी कोणी अर्ज केला आहे, कोणाचा अर्ज प्रलंबित आहे किंवा असे केसरी कार्डधारक ज्यांना तांदूळही मिळत नव्हते अशा सर्वांची तहसीलदार पातळीवर यादी तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणाही छगन भुजबळ यांनी केली आहे केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे आता ही सुविधा राज्यातही उपलब्ध झाली असून नागरिकांनी याबाबत प्रशासनाची संपर्क केल्यास ते मिळू शकणार असून, आता सर्व पीडित लोकांना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही काहीतरी अन्नधान्य पुरवठा द्या अशी जी विनंती केंद्र सरकारला आपण केली होती, त्या धर्तीवर आता जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा लोकांना देण्याचे आदेश आले आहेत, असं भुजबळ म्हणाले. ट्विट करतही त्यांनी याबाबतची माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

जॉन्सन अँड जॉन्सन चा मोठा निर्णय; ‘या’ दोन देशात बेबी पावडरची विक्री केली बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जॉन्सन अँड जॉन्सन या प्रसिद्ध कंपनीने आपले लोकप्रिय उत्पादन असलेल्या जॉन्सन बेबी पावडरची अमेरिका आणि कॅनडामध्ये विक्री बंद करण्याची घोषणा नुकतीच केली आहे.

कंपनीने त्यांच्या उत्पादनांमध्ये एस्बेस्टोसची भेसळ केल्याप्रकरणी हजारो खटले दाखल झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. जॉन्सनच्या बेबी पावडरमुळे कर्करोग झाला असा दावा करत अनेक ग्राहकांनी जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीविरूद्ध १६,००० हून अधिक तक्रारी दाखल केल्या आहेत.

जॉन्सन अँड जॉन्सन यांनी याबाबत माहिती देत म्हटले आहे की,’ ग्राहकांच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे आणि जॉन्सन बेबी पावडर विषयीची चुकीची माहिती पसरल्यामुळे उत्तर अमेरिकेमध्ये या उत्पादनांची मागणी घटते आहे.

या खटल्याच्या संदर्भात कंपनीला वकीलांच्या वतीने वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना साथीच्या या काळात ग्राहक उत्पादनांचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या हालचालीचा हा भाग असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

एका अहवालानुसार, जॉन्सन अँड जॉन्सन यांनी असे नमूद केले आहे की,’ येत्या काही महिन्यांमध्ये यामुळे आमच्या उत्पादनांची विक्री कमी होईल. मात्र किरकोळ विक्रेते हे सध्या या उत्पादनांची विक्री सुरूच ठेवतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

काश्मीरमध्ये बीएसएफच्या पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला; २ जवान शहीद

श्रीनगर । जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या पंदाच भागात सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) पथकावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात बीएसएफचे २ जवान शहीद झाले. तर या हल्ल्यात जखमी झालेल्या इतर जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात भारतीय जवान गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांची हत्यारे दहशतवाद्यांनी पळवल्याचेही वृत्त मिळत आहे.

या हल्ल्याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाच्या ३७ बटालियन गस्त घालून परतत असताना दहशतवाद्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला अचानक झाल्याने जवानांना सावरण्यासाठी जराही वेळ मिळू शकला नाही. या हल्ल्यानंतर इतर जवान आणि स्थानिक लोकांनी तातडीने जखमी जवानांना नजिकच्या रुग्णालयात नेले.

दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एकूण ७ जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ७ जवानांपैकी २ जवान गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना स्किम्स सौरा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तेथे हलवताना ते वाटेतच शहीद झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”