Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5766

काय WhatsApp वर डिलीट केलेला मेसेज वाचता येतो! वापरा ही ट्रिक

मुंबई । WhatsApp युजर्सची चॅटिंग आणखी मजेदार करण्यासाठी कंपनी एकापेक्षा एक फीचर देते. जगभरात २०० कोटी हून अधिक युजर्स असलेले WhatsApp हे जगातील नंबर वन मेसेजिंग अप आहे. त्याच कारण म्हणजे WhatsAppचे सहज वापरता येणारे फीचर्स. असंच एक फिचर म्हणजे चॅटिंग करतांना युजरने चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करता येणे. डिलीट झालेले मेसेज ग्रुप किंवा पर्सनल चॅटवरून गायब होतात. अनेकदा चॅटिंग करताना समोरील व्यक्ती काही टाईप करते आणि तुम्ही वाचण्याच्या आधी पटकन डिलीट करते. आणि तुम्ही जेव्हा चाट उघडता त्यावेळी मेसेज डिलीटेड असं नोटिफिकेशन चॅट बॉक्समध्ये तुम्हाला दिसताच का बरं तिनं किंवा त्यानं मेसेज डिलीड केला असेल या विचारात तुमच्या डोक्याचा भुगा होतो. परंतु, आता हे डिलीटेड मेसेजेस तुम्ही एक खास ट्रिक वापरून वाचू शकता. तुम्ही म्हणाल ते कसं तर खालील स्टेप्स फॉलो करा आणि स्वतःच अनुभव घ्या!

डिलिट झालेले मेसेज वाचण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
व्हॉट्सअप चॅट मधून डिलीट झालेले मेसेज वाचण्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉयड स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. जर अँड्रॉयड स्मार्टफोन युजर आहात तर या स्टेप्सच्या माध्यमातून तुम्ही सहज डिलीट झालेले मेसेज वाचू शकता.

१. सर्वात आधी आपल्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोरमधून WhatsRemoved+ एप डाउनलोड करा.

२. डाऊनलोड केल्यानंतर अपला सर्व एक्सेस द्या. जे ते मागत आहेत.

३. परमिशन दिल्यानंतर अपमध्ये पुन्हा जा.

४. या ठिकाणी त्या अपसंबंधी विचारले जाईल. ज्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सेव्ह करायचे आहे किंवा अॅपमध्ये बदल करायचा आहे.

५. अॅप्सच्या यादीत व्हॉट्सअपची निवड करा.

६. पुढील स्क्रीनवर Allow टॅप करा आणि Yes, Save Files ला सिलेक्ट करा. असे केल्यानंतर अॅपची सेटिंग पूर्ण होईल. व हे वापरासाठी तयार होईल.

७. यानंतर व्हॉट्सअपवर सर्व नोटिफिकेशनसोबत डिलीट झालेले मेसेज या ठिकाणी सेव्ह केलेले मिळतील.

८. डिलीट मेसेज पाहण्यासाठी तुम्हाला केवळ या अपला ओपन करून टॉप बारमध्ये व्हॉट्सअप सिलेक्ट करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअप मध्ये डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी ही एक खास ट्रिक आहे. या अपमध्ये येत असलेल्या जाहिरातीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु, जर तुम्ही या सेवेसाठी १०० रुपये मोजल्यास तुम्हाला या जाहिरातीचा त्रास होणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’

चिंताजनक! भारत कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये इटलीच्याही पुढे

नवी दिल्ली । जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. या विषाणूने आपले हातपाय संपूर्ण जगात परसरवले आहेत. अनेक देश कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयन्त करत आहेत. पण कोरोनाचा वाढता संसर्ग त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू देत नाही आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी ही संख्या आता कोरोना साथीनं बेजार झालेल्या देशांच्या तुलनेत आणखी वाढण्याच्या दिशेनं जात आहे. कारण कोरोनाच्या सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेमध्ये भारतानं आता इटलीलाही मागे टाकलं आहे. भारतात सध्या ६३ हजार १७० पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहे. कोरोना व्हायरसशी निगडीत रिअल टाईम डेटा मिळवणाऱ्या ‘वर्ल्डोमिटर्स’ या बेवसाईटच्या डेटावरून ही माहिती समोर आली आहे.

इटलीमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ३२ हजार ३३० जणांना मृत्यू झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या २ लाख २५ हजारांपेक्षाही अधिक आहे. तर भारतात आतापर्यंत १ लाख ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच देशात दररोज ५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. चीनननंतर सर्वाधित कोरोना व्हायरसचा प्रभाव हा इटलीवर पडला होता.

कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या दृष्टीनं पाहिलं तर अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्स या देशांमध्येच भारतापेक्षा सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. अमेरिकेत सध्या ११ लाखांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर रशियात २ लाख २० हजार, ब्राझिलमध्ये १ लाख ५७ हजार आणि फ्रान्समध्ये ९० हजार अ‍ॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भारतात २४ तासांत 5 हजार 609 नवे कोरोनाचे रुग्ण, 132 मृत्यू

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील २४ तासांचा कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास कोरोनाबाधितांची संख्येत पाहिजे तशी घाट अजूनही होताना दिसत नाही आहे. मागील २४ तासात देशात तब्बल 5 हजार 609 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर भारतात कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी आधीच १ लाखांचा टप्पा गाठला आहे.

देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 1 लाख 12 हजार 359 वर पोहचली आहे. या मध्ये सध्या उपचार सुरू असलेले 63 हजार 624 रुग्ण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या 3 हजार 435 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यता आलेली आहे. जगभरात अन्य देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्राला यश आल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बुधवारी केला गेला. एक लाख लोकसंख्येमागे जगभरात 62.3 करोना रुग्ण आढळले पण भारतात ही संख्या केवळ 7.9 इतकीच होती, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

भारतात वैद्यकीय हाताळणी प्रभावीपणे केली जात असल्याने एक लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण फक्त 0.2 टक्के आहे. जगभरातील सरासरी4.2 टक्के असल्याचे अग्रवाल म्हणाले. उपचार होत असलेल्या रुग्णांपैकी 2.9 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज असून 3 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. 0.45 रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

नरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं ‘वाटोळं’ करणारी ठरेल, कारण..

थर्ड अँगल | असीम अली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते कारणीभूत असणाऱ्या त्रासासाठी कोणत्याही प्रकारची राजकीय राजकीय किंमत मोजावी लागणार नाही. ते अगदी इराणच्या अली खामेनेई सारखे आहेत.  अनेकांना आश्चर्य वाटते आहे की, मोदींनी त्यांच्या आत्मनिर्भर भारत भाषणात स्थलांतरित कामगारांचे संकट आणि गमावलेल्या नोकऱ्यांबद्दल काहीच कबुली दिली नाही. तरीही त्यांच्याविषयी कोणताच राग नाही आहे. जर ते एक सामान्य राजकारणी असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आतापर्यंत किमान बिंदूवर जाऊन पोहोचली असती. एका सर्वेक्षणानुसार तीन पैकी दोन भारतीयांना २४ मार्च रोजी घोषित झालेल्या संचारबंदीमुळे नोकरी गमवावी लागली आहे. दोन महिन्याहून अधिक काळ सुरु असणाऱ्या या संचारबंदीमध्ये स्थलांतरितांच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकार नेत्रदीपकपणे अपयशी ठरले आहे. संचारबंदी सुरु झाल्यापासून अर्ध्या भारतीयांच्या कुटुंबातील जेवणात कमतरता आली आहे. तरीही, मोदींवर कोणत्याच प्रकारचा राग दिसून येत नाही आहे, ते पूर्वी इतकेच लोकप्रिय आहेत ही आश्चर्याची बाब आहे. अनेकांना आश्चर्य वाटते की, १२ मे रोजी जेव्हा पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले होते, तेव्हा त्यांनी स्थलांतरितांच्या संकटाबद्दल एकदाही उल्लेख केला नाही किंवा त्यांना सहानुभूतीही दिली नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणातील नोकऱ्यांचा तोटा, जीवनावश्यक वस्तूंची कमतरता अगदी या उदासीन वातावरणाचाही उल्लेख केला नाही. अगदी २०१६ साली केलेल्या नोटबंदीनंतर झालेल्या आजिविकेच्या नाशानंतर जसे ते काहीच बोलले नव्हते तशा परिस्थितीत कोणताच राजकारणी नेता टिकला नसता. अनेक त्रासाच्या कारणांमध्ये मोदींना कोणतीच राजकीय किंमत मोजावी लागत नाही, असे कसे? आणि लोकांच्या त्रासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करूनही लोकांमध्ये त्यांची प्रतिमा गर्विष्ठ, केवळ क्रूर अशी कशी होत नाही? 

मोदी त्यांच्या साध्या राजकीय विश्लेषणात गोंधळ घालतात कारण त्यांचे आवाहन केवळ राजकीय नसते. त्यांचे आवाहन हे मेसिऍनिक संदर्भासारखे अर्ध- धार्मिक असते. राजकीय शास्त्रज्ञ Morris Jones भारतीय राजकारणाला “saintly idiom” म्हणून संबोधतात. मोदी एम.के गांधींसारखे असेच प्रतिनिधित्व करतात. ते स्वतःचे वर्णन कुटुंब आणि भौतिक सुखापासून दूर असणारा फकीर म्हणून करतात, जे भारताचे केवळ राजकीयच नाही तर सामाजिक, नैतिक आणि अध्यात्मिक नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणी आहेत. म्हणूनच ते अनुसरण नाही तर भक्ती निर्माण करतात. आणि ही भक्तीच ते नेतृत्व करत असलेल्या सरकारची प्रतिरक्षित (Immune) आहे.    

लोकांचा त्रास मोदींवरील विश्वासाची चाचणी आहे 
जेव्हा तुम्ही दुःखात असता, तेव्हा तुम्ही मसीहाला काढून टाकत नाही अगदी जसे देवाला काढून टाकत नाही. तुम्ही तुमचा विश्वास दुप्पट करता कारण देव तुम्हाला सांगतो की  तुम्ही जे सहन करत आहात ते एका उच्च कारणासाठी आणि तिथपर्यंत तरून जाण्याचा मार्ग काटेरी आहे आणि याचे मार्गदर्शन केवळ देवच तुम्हाला करू शकतो. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा उल्लेख करताना ते म्हणाले होते. ही एका मोठ्या कारणासाठीची तपस्या आहे, अगदी नोटबंदीच्या वेळी जसे ते ‘भ्रष्टाचाराच्या विरोधातील यज्ञ’ असे म्हणाले होते. १४ एप्रिल जेव्हा संचारबंदी वाढविण्याची घोषणा त्यांनी केली तेव्हाही त्यांनी त्याग, तपस्या अशा अध्यात्मिक शब्दांचा वापर केला होता. गांधींनी लोकांना त्याग आणि आत्मशुद्धीकरणातून स्वातंत्र्य मिळेल असे सांगितले होते. जे सत्याग्रहाचे मूळ होते. मोदींनी लोकांना सांगितले की, ते त्यांच्या त्याग आणि तपश्चर्येवर स्वयंनिर्भर भारत अर्थात आत्मनिर्भर भारत बनवतील. म्हणूनच त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात भारताच्या प्राचीन महानतेच्या अभिवादनाने केली. एका विशिष्ट नैतिक विश्वात मोदी मसीहा आहेत. या विश्वात भारत महान होता, मग आपल्याकडे १२०० वर्षांची गुलामी आली होती, (त्यांच्या शब्दात स्वातंत्र्योत्तर मानसिक गुलामी सहित) मोदी येऊन पुन्हा आपल्याला महानतेकडे घेऊन जाईपर्यंत. दुसऱ्या संरचनेत इतर जागतिक नेते त्याचे उपाय समोर ठेवत आहेत, पण आपल्याकडे कोरोना विषाणू हे संकट नाही तर आतापर्यंतचे नुकसान भरून काढण्याचा मार्ग आहे, ही भारताला पुन्हा नव्याने महान बनविण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाला पूर्णत्वास नेण्याची एक संधी आहे. पण त्यांना बिनशर्त विश्वास हवा आहे. या चौकटीत लोकांना होणारा त्रास हा नोटबंदीप्रमाणेच मोदींवरच्या विश्वासाची परीक्षा आहे. देशातील लोकांचा देशावरचा आणि मोदींच्या नेतृत्वावरचा विश्वास बरेच लोक या विश्वासावर टिकून राहतात, निराश होण्याऐवजी ते या दुःखाला अर्थ देतात, हे अवास्तव नाही. मोदी त्यांना क्षुल्लक गोष्टी, अत्यंत दुखी अस्तित्व ओलांडून पलीकडे जाण्याचे आणि स्वतःपेक्षा मोठ्या अशा कार्याचा भाग होण्याचे आवाहन करतात. दुःख विश्वासाला मजबूत करते कमकुवत नाही. कारण याच वेळी आपल्याला त्याची जास्त गरज असते. हा विश्वास नुकताच थाळी, दिवे सारख्या चष्म्यांनी पवित्र विधींमध्ये केला होता. ज्यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. मोदींनी लोकांना सात शपथांचे ही पालन करण्यास सांगितले, ज्यामध्ये वृद्धांची काळजी घेणे, गरीब लोकांची काळजी घेणे आणि तुमच्या कामगारांसोबत दयाळूपणे वागणे यांचा समावेश होता. त्यासोबतच त्यांनी त्यांचा योगा करतानाचा ऍनिमेटेड व्हिडिओ ही प्रसारित केला जो लाखो लोकांनी पहिला. याद्वारे ते भारताच्या बाबतीत त्यांच्या मनात असणाऱ्या सामाजिक, नैतिक आणि अध्यात्मिक नेतृत्वाच्या दाव्यांना आणखी दृढ करत होते. 

मदत उपाय हे परोपकार आहेत 
अशाचप्रकारे मोदी त्यांची भाषणे साक्षात्काराच्या वलयाभोवती गुंडाळतात. इतर लोकशाही नेते जे संकटकाळात लोकांच्या समस्या समजून घ्यायला रोज बोलतात त्यांच्यासारखे मोदी रोज बोलत नाहीत. ते काही आठवड्यातून एकदाच संवाद साधतात. ते लोकांना नव्या साक्षात्काराची वाट बघू देतात, म्हणूनच ते एक-दोन दिवस आधी ते घोषणा करतात. ही पोकळी वन्य अनुमानांनी भरली जाते, एखाद्या कल्पित देवाची प्रार्थना केल्यासारखे लोक त्यांच्या इच्छा आणि आशा व्यक्त करतात. मग ठरलेल्या वेळात ते प्रकट होतात. त्यांची भाषणे प्रवचनाचा भाग, ईश्वरी आज्ञेचा भाग आहेत. अनेकदा भाषणांच्या मध्ये एखादी घोषणा असते जी धक्कादायक अथवा चकाकीत असते. उत्तेजित आर्थिक पॅकेज जे इतर जागतिक नेत्यांनी संकटकाळात उपाय म्हणून जाहीर केले ते मोदींनी असे प्रकट केले जणू सत्य साई बाबांनी सोन्याचे अंडे दिले आहे. “२० लाख कोटी रुपये” असे ते वारंवार सांगत राहिले आणि पॅकेजच्या प्रमाणात आपल्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करू पाहत राहिले. त्यांनी त्याला मोदी पॅकेज म्हंटले नव्हते, (हे नामांकन मृगजळाप्रमाणे माध्यमांसाठी सोडले गेले होते) पण त्यांनी ते असे सादर केले जणू काही वैयक्तिक परोपकार करत आहेत. आणि लोकांच्या कल्पनाही करू शकणार नाहीत असे काहीतरी मोठे देत आहेत. “मोदी पॅकेज हे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेइतके/ त्यापेक्षा मोठे आहे” अशी ओरड त्यांच्या मुख्य प्रवाहातील माध्यमांनी आणि सोशल मीडियावरील प्रसारकांनी सुरु केली. असे निष्पन्न झाले की वास्तविक वित्तीय पॅकेज हे इतर देशांच्या मानदंडाद्वारे किंवा भारतीय गरजेनुसारही मुख्यतः सरकारी थकबाकी आणि सुरक्षित कर्जे यांच्यासहित काही लाख कोटींचेच आहे.गुजरातमधील त्यांच्या काळात परिपूर्णरित्या केलेली ही त्यांची जुनी युक्ती आहे. जेव्हा त्यांनी व्हायब्रंट गुजरात समिटखाली लाखो कोटींच्या गुंतवणुकीची आकडेवारी सांगितली होती, पण प्रत्यक्षात मात्र कित्येक सामान्य सामंजस्य करार करण्यात आले होते. पण मोदी एखाद्या धार्मिक व्यक्तीप्रमाणे केवळ भव्य आणि प्रतिकात्मक गोष्टींवरच बोलतात. 

मंत्री जबाबदार असतील मोदी नाही –
त्यांच्या “आत्मनिर्भर भारत” या दृष्टीकोनाची जाणीव करून देणासाठी धोरणांच्या आखणीचे काम अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मोदी कोणतीच धोरणे जाहीर करत नाहीत किंवा विशिष्ट तपशिलांमध्ये जात नाहीत कारण ते त्या धोरणांसाठी लोकांकडून न्यायनिवाडा करून घेऊ इच्छित नाहीत. पण त्यांच्या दूरदृष्टीसाठी ते तत्पर असतात. जेव्हा धोरणे अपेक्षेपेक्षा कमी होतात तेव्हा त्या उणिवा आणि अपयशांमध्ये त्यांचे मंत्री कमी पडतात. जेव्हा स्थलांतरित कामगारांकडून रेल्वेच्या प्रवासासाठी तिकीट शुल्क आकारले जाते तेव्हा ती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची चूक असते. अगदी उजव्या विचारसरणीचे लोक निर्मला सीतारमण यांना दोषी ठरवितात जसे त्यांच्या पूर्वी असणाऱ्या अरुण जेटलींना दोषी धरत होते आणि केवळ ते अपयशी झाले म्हणून नाही तर मोदींना अपयशी केले म्हणून दोष देतात. मोदींचे मंत्री मानव आहेत आणि चुका करतात म्हणून ते जबाबदार आहेत याउलट मोदी कधीही चुका ना करणारे आणि कशासही जबाबदार नसणारे असे दैवी व्यक्तित्व आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यासारखी मोदी यांनी स्वतःची एक टोकाची भूमिका घेतली आहे. जे आणखी एक दिव्य मार्गदर्शक, कधीही न चुकणारे नेते आहेत, ज्यांनी  सर्व सरकारी उपायांवर अंतिम मत मांडले आहे, देशाची राजकीय दिशा निश्चित केली आहे, देशाची नैतिक मूल्ये संस्कारित आणि प्रतिबिंबित केली आहेत, पण सरकारच्या अपयशासाठी राजकीय उत्तरदायित्व अधिक वरचढ आहे. जे त्यांच्या अधीन असलेल्या निवडून आलेल्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहे. 
मोदी कधीकधी गुप्त मतदानाच्या इथे लोकशाही कायदेशीरपणा मिळवतात, पण निवडणुकीच्या काळात हा संदिग्ध कायदेशीरपणा असतो. जो त्यांना पत्रकार परिषद, पारदर्शकता, लोकशाहीच्या मन वळविण्याचा, छाननी करण्याच्या सर्व प्रक्रियांच्या वरचढ बनवतो ज्याला ते मूकसंमती देत बेफिकिरीने दुर्लक्ष करतात. ते स्थलांतरित आणि गरीब लोकांच्या हाल-अपेष्टांकडे दुर्लक्ष करतात कारण ते कोणत्याच दोष, कमकुवतपणा आणि उपेक्षेला स्वतःला जबाबदार मानू शकत नाहीत. त्यांच्या अर्ध धार्मिक आवाहनाचा मुख्य गाभा म्हणजे ते कधीच चूक असू शकत नाहीत. जरी तुम्हाला त्यांच्या योजना समजल्या नाहीत तरी तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. खरंतर त्या योजना न समजलेल्याच खूप चांगल्या आहेत कारण त्या एखाद्या धार्मिक नेत्यामध्ये दर्शविली जाणारी दुर्गम संदिग्धता आणि गूढता अधिक सखोल करतात. म्हणूनच वास्तविक खूप कमी प्रमाणात संवाद करतात त्याऐवजी प्रवचनातून उपदेश देत असतात. अगदी एखाद्या सरकारी योजनेचे स्पेलिंग लावतानाही मोदी मंत्र जप किंवा त्याच्याशी संबंधित अक्षरे लावतात. त्यांनी देऊ केलेल्या गोष्टी अनिश्चितच नाहीत तर त्या मिळण्याची कोणतीच वेळ नाही आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवायचा.

“हिंदू” धर्म गाभा आहे – मोदींचे हे अर्ध-धार्मिक आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) त्यांच्या दशकांच्या प्रचाराद्वारे सक्षम केले आहे. या प्रचाराने हिंदूंच्या धर्माचा वापर “राष्ट्रीय उपासना” स्थापित भाजपा-आरएसएस ला बहिष्कृत करू पाहणाऱ्या, मतभेद निर्माण करणाऱ्या, निंदा स्थापित करणाऱ्या विरोधकांच्या विरोधाना निंदनीय तसेच नैतिक-राष्ट्रीय समाजातील विरोधकांना राष्ट्र-विरोधी म्हणून घोषित करण्यासाठी केला आहे. मोदींनी स्वतःला भारताच्या या धार्मिक संकल्पनेच्या दंतकथेत मोठ्या प्रमाणात लोकांच्या सहमतीने राष्ट्रीय मसीहा म्हणून घातले आहे. याचा परिणाम म्हणजे ही अशी लोकशाही ज्यामध्ये एका नेत्याकडे सर्व शक्ती असूनही देशाला एका विनाशकारी संकटाचा सामना करावा लागतो आहे. आणि जो वास्तविकतेला उत्तर देण्यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही आहे. वास्तविक जगात जीएसटी आणि नोटबंदीच्या चक्रव्यूहात अडकलेली आपली अर्थव्यवस्था एका विनाशकारी झटक्यातून जात आहे ज्याचे परिणाम दशकांपर्यंत टिकून राहू शकतील. उपासमारीमुळे होणाऱ्या मृत्यूंची याआधीच नोंद झाली आहे आणि कदाचित इथून पुढे ती केली जाणार नाही. परंतु त्या नवीन राष्ट्रीय श्रद्धेतील काहीसे अफू आपल्याकडे आहेत आणि आपण सातत्याने त्या “आत्म-निर्भर” भारताच्या दिशेने चाललो आहोत. जर खरोखरच मोदी खोटारडे संदेष्टा (भविष्यकथन करणारा) आहेत तर त्यांनी नरकाकडे जाणारा मार्ग प्रकाशित केला आहे तोही अत्यंत तेजस्वी प्रकाशात. 

लेखक पॉलिसी रिसर्च सेंटर, दिल्ली येथे संशोधन सहकारी आहेत. ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9561190500

 

राज्यात दिवसभरात सापडले २ हजार २५० नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ३९ हजार २९७ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ०७ हजार ७२ नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ७७५जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३९ हजार २९७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ०४ हजार ६९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ७५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १३९० झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, पुण्यात १३, नवी मुंबईमध्ये ३, पिंपरी- चिंचवड -२, सोलापूरात २, उल्हासनगरमध्ये २, तर औरंगाबाद शहरात २ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४६ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३२ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ६५ रुग्णांपैकी ४८ जणांमध्ये (७४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २४,११८ (८४१)
ठाणे: ३०९ (४)
ठाणे मनपा: १८६५ (३३)
नवी मुंबई मनपा: १५९३ (२७)
कल्याण डोंबिवली मनपा: ६१२ (६)
उल्हासनगर मनपा: १३०
भिवंडी निजामपूर मनपा: ७४ (३)
मीरा भाईंदर मनपा: ३१७ (४)
पालघर:६८ (३)
वसई विरार मनपा: ४०७ (११)
रायगड: २७९ (५)
पनवेल मनपा: २५३ (११)
ठाणे मंडळ एकूण: ३०,०२५ (९५०)

नाशिक: १०५
नाशिक मनपा: ८२ (२)
मालेगाव मनपा: ६८१ (३४)
अहमदनगर: ४६ (५)
अहमदनगर मनपा: १८
धुळे: १३ (३)
धुळे मनपा: ७१ (६)
जळगाव: २३३ (२९)
जळगाव मनपा: ७० (४)
नंदूरबार: २५ (२)
नाशिक मंडळ एकूण: १३४४ (८५)

पुणे: २३५ (५)
पुणे मनपा: ४०४९ (२१५)
पिंपरी चिंचवड मनपा: १९३ (६)
सोलापूर: १० (१)
सोलापूर मनपा:४९५ (२६)
सातारा: १७० (२)
पुणे मंडळ एकूण: ५१५२ (२५५)

कोल्हापूर:१२० (१)
कोल्हापूर मनपा: १९
सांगली: ४९
सांगली मिरज कुपवाड मनपा: ८ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: ११६ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: ३२२ (५)

औरंगाबाद:१६
औरंगाबाद मनपा: १०६६ (३६)
जालना: ३८
हिंगोली: १०७
परभणी: ६ (१)
परभणी मनपा: ३
औरंगाबाद मंडळ एकूण: १२३६ (३७)

लातूर: ४७ (२)
लातूर मनपा: ३
उस्मानाबाद: ११
बीड: ५
नांदेड: ९
नांदेड मनपा: ७१ (४)
लातूर मंडळ एकूण: १४६ (६)

अकोला: २९ (२)
अकोला मनपा: २८१ (१५)
अमरावती: ८ (२)
अमरावती मनपा: ११५ (१२)
यवतमाळ: १०२
बुलढाणा:३४ (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:५७७ (३४)

नागपूर: २
नागपूर मनपा: ४२१ (६)
वर्धा: ३ (१)
भंडारा: ७
गोंदिया: ३
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ६
नागपूर मंडळ एकूण: ४४७ (७)

इतर राज्ये: ४८ (११)
एकूण: ३९ हजार २९७ (१३९०)

सांगली जिल्ह्यात आणखी ६ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ६२ वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यात मागील २४ तासात ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईस्थित पंचवीस वर्षीय गरोदर महिलेचा पती व सासरे या दोघांना कोरोनाची लागण झाली. शिराळा तालुक्यातील रेड येथील मुंबईहून आलेल्या महिलेच्या पतीस कोरोनाची लागण झाली आहे. आटपाडी तालुक्यात मुंबईतून आलेले गोंदीरा येथील ६० वर्षीय पुरुष तर पिंपरी बुद्रुकमध्ये तीस वर्षीय तरुणाला तसेच मिरज भारत नगर हाडको कॉलनीतील ३० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुखे यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 62 झाली असली तरी सद्यस्थितीत 23 रुग्ण मिरजेत उपचार घेेत आहेत.

शिराळा तालुक्यात मुंबईहून आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त महिला आपल्या पती व दोन मुलासह मुंबईहुन 17 मे रोजी रेड येथे आली होती. त्यावेळी त्यांना जिल्हापरिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना जिल्हापरिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते.
सोमवारी त्या पती पत्नीला ताप आल्याने व घशात दुखत असल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्यांची कोरोनाची चाचणी केली असता सादर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पतीचा अहवाल बुधवारी आला आहे. त्यांच्या दोन मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
बाधित दाम्पत्याची मुले शिराळ्यात क्वारंटाइन त्या पती पत्नीला ताप आल्याने दोन मुलांसह मिरज येथे नेण्यात आले होते. मुलांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शिराळा येथे संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. निगडीच्या दोघांना, अंत्री खुर्दच्या एकास व रेडच्या दोघांना अशी मुंबईहून आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. निगडी मुंबईहून आलेली युवती व तिच्या चुलतीचा उपचारा नंतर अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाची लागण झाल्याची संख्या सात झाली आहे. त्या पैकी निगडीच्या त्या दोघी कोरोनामुक्त झाल्या आहेत. अंत्री येथील पाच जणांचे व रेड येथील तीन जणांचे असे एकूण आठ जणांचे स्कॅबचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कडेगाव तालुक्यातील सोहोलीत मुंबईस्थित पंचवीस वर्षीय गरोदर महिलेस कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापाठोपाठ आता त्या महिलेच्या संपर्कातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील चौघेजण मूळगावी सोहोली येथे रविवारी रोजी रात्री दाखल झाले होते. आरोग्य विभागाने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पती, सासू, सासरे आणि भावजय यांना कडेगाव संस्थात्मक विलगीकरणात दाखल केले होते. यापैकी पती आणि सासर्‍याचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

आटपाडी तालुक्यातील दोघांना कोरोना आटपाडी तालुक्यातील गोंदी रा येथे मुंबईहून आलेल्या 60 वर्षीय इसम संशयित असल्याने त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे मुंबईमधून आलेला तीस वर्षीय तरुणही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दरम्यान आटपाडी तालुक्यात दोन दिवसात तीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मिरजेत पुन्हा रुग्ण आढळला मिरज शहरातील होळी कट्टा येथील एक महिला बुधवारी कोरोनामुक्त झाली असताना त्याच दिवशी भारत नगर हडको कॉलनी मधील तीस वर्षे महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. उपचाराखालील 23 रुग्णांपैकी आज आणखी 4 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने उपचाराखालील रुग्णांची संख्या आता २३ झाली आहे

कराड तालुक्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात जिल्हयात १५ नवीन कोरोनाग्रस्त, संख्या १८१ वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोनाच्या धास्तीने सातारा जिल्ह्यातील नागरिाकंची झोप उडाली असतानाच बुधवारी रात्री आणखी 11 रूग्ण वाढल्याने काळजात धस्स झाले. रात्री 8 वाजता कराड तालुकयातील चार तर रात्री उशिरा जिल्ह्यातील आणखी 11 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.  यामुळे बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 15 रुग्ण वाढले आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील भरेवाडीतील दोन, म्हासोलीतील एक व इंदोलीतील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या धक्क्यातून तालुका सावरत असतानाच पुन्हा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील 11 रूग्णांची भर पडली. माण तालुक्यातील परतवडी येथील 1, खटाव तालुक्यातील गादेवाडीतील 2 फलटण 1, खंडाळा 1 , कराड तालुक्यातील 4 व उर्वरित दोन अन्य तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परजिल्ह्यातून आलेले नागरिक तसेच बाधितांच्या निकट सहावासातील लोकामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.

आज नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे पुण्या-मुंबईहून प्रवास करून आलेल्यांपैकी आहेत. कराड तालुक्यात वनवासमाची गाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. आता म्हासोली या गावातही मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आज दिवसभरात कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील तब्बल २३ कोरोनाग्रस्तांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १८१ झाली असून जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या ८० इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 98 आहे तर मृत्यु झालेले 3 रुग्ण आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

१ जून पासून धावणाऱ्या ‘या’ २०० रेल्वेगाड्यांचे उद्यापासून बुकिंग सुरु – भारत सरकार

Indian Railway

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात रेल्वेसेवा सुरळीत सुरु करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. १ जून पासून धावणाऱ्या २०० रेल्वे गाड्यांची यादी आज भारत सरकार कडून जाहीर करण्यात अली असून त्याचे बुकिंग उद्या २१ मे पासून सुरु होणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

भारतीय रेल्वे २०० पेसेंजर रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी सोडणार असून १ जूनपासून त्या धावणार आहेत. सदर २०० पेसेंजर गाड्यांची यादी आज भारत सरकारकडून जाहीर करण्यात आली असून २१ मे पासून यासाठीचे ऑनलाईन बुकिंग सुरु होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सोलापुरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, चौदा रुग्ण वाढले, एकूण बाधित 470

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर परिसरातील तीन जणांचा आज कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 470 त्र एकूण मृत व्यक्तींची संख्या 33 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  आज मयत झालेली पहिली व्यक्ती साई बाबा चौक परिसरातील 74 वर्षाचे पुरुष असून 18 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता त्यांचे निधन झाले.

मयत झालेली दुसरी व्यक्ती अशोक चौक परिसरातील असून 77 वर्षाची पुरुष असून 13 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय मध्ये सारीच्या उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. 15 मे रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून 19 मे रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाले आहे. मयत झालेली तिसरी व्यक्ती शनिवार पेठ परिसरातील 64 वर्षाची महिला असून पाच मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. 19 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले आहे.

आज नव्याने आढळलेल्या 14 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये पोलीस मुख्यालय शेजारील भगवान नगर मधील दोन महिला, साईबाबा चौकातील एक पुरुष व दोन महिला, बापुजी नगर येथील एक पुरुष, अशोक चौकातील एक महिला, रामवाडी येथील एक पुरुष, दक्षिण सदर बझार येथील एक महिला, सलगर वस्ती येथील एक पुरुष, कुमठा नाका येथील एक पुरुष, भारतरत्न इंदिरा नगर येथील दोन पुरुष, जुना विडी घरकुल येथील एक महिला यांचा समावेश आहे. आज दिवसभरात कोरोना चाचणीचे 219 अहवाल प्राप्त झाले असून 205 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या सात जणांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

हिंगणगाव येथे पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

सांगली  प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे | 

कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगांव येथे विहीरीत पोहायला शिकायला गेलेला शाळकरी मुलगा श्रेयस प्रकाश कुलकर्णी याचा पाठीवर बांधलेली टायर ट्यूब निसटल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर सांगलीच्या बचाव पथकाने मृतदेह काढला.ही घटना मंगळवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. श्रेयस व त्याचे गावातील तीन चार मित्र अग्रणी नदीच्या काठावरील पिंटू पाटील यांच्या विहीरीत पोहायला गेले होते.इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकणारा श्रेयस हा नुकताच पोहायला शिकत होता.

सकाळी पाठीला टायर ट्यूब बांधून तो विहीरीत उतरला परंतु काही क्षणांतच पाठीला बांधलेली ट्यूब निसटली गेली.व तो बुडू लागलात विहीरीत पोहणारे त्याचे तीन चार मित्रांनी वाचवायचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. सदरची माहिती समजताच सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील व गावकरी विहीरीजवळ गोळा झाले. विहीरीत ५० ते ६० फूटपाणी होते. दोन तीन तास शोधूनही मृतदेह सापडला नाही.अखेर हिंगणगांवचे माजी उपसरपंच अनंत पाटील यांनी प्रयत्न करून त्यांच्या परिचयातील सांगली येथील बचाव पथकाला बोलावले.

कवठेमहांकाळचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.त्यावेळी काही तरूणानी विहीरीत बुडून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला आहे.सांगली येथील आयुश हेल्थ केअरच्या बचाव पथकातील तीन चार जवानांनी तीन चार तास पाण्यात बुडून शोध घेतला.बचाव पथकाच्या जवानांनी चार तास अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.