Friday, December 26, 2025
Home Blog Page 5775

स्थलांतरित कामगारांसाठीच्या सरकारी उपाययोजनांवर अनुभव सिन्हा नाराज, म्हणतात..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संचारबंदीच्या बऱ्याच कालावधीनंतर भारतीय सरकारने श्रमिक रेल्वेची व्यवस्था करून कामगारांच्या घरी परतण्याची सोय केली आहे. देशातील विविध राज्यातील स्थलांतरित कामगारांमध्ये आपापल्या घरी नीट पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे. सरकारचे आपल्याकडे उशिरा का असेना पण लक्ष गेले आहे याचे काही प्रमाणात समाधान त्यांच्यामध्ये दिसून येते आहे. पण या सुविधा कितपत कामगारांपर्यंत पोहोचत आहेत हा एक मोठा आणि रहस्यमय प्रश्न आहे.

एकीकडे कामगारांनी भरलेल्या रेल्वेचे फोटो आहेत तर एकीकडे अजूनही पायपीट करणाऱ्या मजुरांना होणाऱ्या मारहाणीचे व्हिडीओ आहेत. एकीकडे रेल्वे बुकिंगसाठी हजारोंच्या संख्येने जमा झालेले कामगार आहेत तर दुसरीकडे आमच्यासारख्या कामगारांच्या मृत्यूंचे फोटो आदरणीय पंतप्रधानांपर्यंत पोहोचत आहेत का? असे प्रश्न विचारणारे आणि रस्त्यावर सरकारच्या मदतीची वाट बघणारे कामगार आहेत. कामगारांमध्ये सरकारची इतकी दहशत निर्माण झाली आहे की, आता ते आपल्या गावी परतायलाही घाबरत आहेत. 

संचारबंदीच्या या काळात या स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी आतापर्यंत कितीवेळा आपल्या आदरणीय मंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे? आपले कामगार मंत्री कोण आहेत? आपले आरोग्य मंत्री शेवटी केव्हा पत्रकार परिषदेत बोलले होते. असे अनेक प्रश्न चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा सातत्याने आपल्या ट्विटर हॅन्डल वरून विचारत आहेत. पर्यायाने काही मार्मिक टोलेही देत आहेत. भारत सरकारच्या इतर मंत्र्यांनी केवळ एकाच माणसावर सर्व काम न सोपवता थोडे काम स्वतःही केले पाहिजे आणि पंतप्रधानांच्या डोक्यावरचे ओझे थोडे हलके केले पाहिजे असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यात ते म्हणतात की दूरदर्शनवरील घोषणांसहित सर्व कामे एकाच माणसाने करणे अन्यायकारक आहे. 

सरकारच्या उपाययोजना घोषित होऊनही कशा पद्धतीने कामगार असहाय होत आहेत आणि निराशेला बळी पडत आहेत. याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनुभव सिन्हा हे जाणते सिनेमा निर्माते आहेत. तसेच विविध घटनांवर ते सातत्याने आपल्या ट्विटर अकॉउंट वरून व्यक्त होत असतात.

”जमलं तर एक पत्र राज्य सरकारला पण लिहा!” फडणवीसांनी हाणला पवारांना उपरोधक टोला

मुंबई  । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अन्य क्षेत्रांबरोबरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यस्थेलामोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना निवदेन देत केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान, आपल्या मागण्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांबाबतचं निवेदन सादर केलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी आजच्या राज्यपाल भेटीचा तपशील देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. पवार वारंवार केंद्रातील मोदी सरकारला पत्रं लिहून विविध मागण्या करत आहेत. बाराबलुतेदार आणि शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करण्यासाठी त्यांनी एखादं पत्रं राज्य सरकारलाही लिहावं, असा टोला फडणवीस यांनी त्यांना लगावला. कशा प्रकारे त्यांनी गरीबांना मदत केली पाहिजे. तसंच दुकानदारांना, फुटपाथवर बसणाऱ्यांना, छोट्या उद्योगांना कशाप्रकारे मदत केली पाहिजे याविषयी त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहावं, असंही ते म्हणाले. राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात नाहीत, केवळ राजकारण सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार पंतप्रधान मोदींना राज्यातील परिस्थितीबाबत अवगत करून देत केंद्राकडे मदतीची मागणी करत आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन करणार काल आणखी एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. लॉकडाउनचा आर्थिक फटका शेती क्षेत्राला सुद्धा बसला आहे. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत असंही शरद पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानंतरही त्यामध्ये शेतकऱ्यांबाबत म्हणाव्या तशा काही ठोस तरतुदी नाहीत असं म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून च आज फडणवीस यांनी पवार यांना लक्ष केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दमलेल्या आईला उचलून घेत त्याने चालायला सुरुवात केली आणि..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या लाख पार करून गेली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या पाहता चिंतेचे वातावरण निर्माण आहे. तर उन्हातून आपल्या गावी, आपल्या घरी पोहोचू पाहणाऱ्या कामगार वर्गाची ही दयनीय अवस्था होते आहे. या संकटकाळात आपल्या कुटुंबासोबत हे स्थलांतरित कामगार जीवाचे रान करीत आहेत. पाठयपुस्तकातील श्रावण बाळाची कथा जवळपास सगळ्यांनीच वाचली, ऐकली असेल. ज्यामध्ये आपल्या वृद्ध आईवडिलांना खांद्यावर घेऊन जाणारा श्रावणबाळ हा एक आदर्श मुलगा मानला जातो. सद्यस्थितीही याहून काही वेगळी नाही. कित्येक कामगार आपल्या लहान मुलांसोबत आपल्या वृद्ध आईवडिलांना सोबत घेऊन कधी भर पावसात तरी कधी रणरणत्या उन्हात प्रवास करत आहेत. 

श्रावणबाळाच्या गोष्टीची आठवण येण्यासारखेच एक छायाचित्र योगिता भयाणा यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून शेअर केले आहे. या छायाचित्राविषयी अधिक माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता हा मुलगा पुण्याहून बनारसला निघाल्याचं समजत आहे. भर उन्हात आपल्या वृद्ध आईसोबत आपल्या गावी पायपीट करत निघालेल्या एका मुलाचे हे चित्र कामगारांच्या भयाण स्थितीचे वर्णन करते आहे. चालून चालून दमलेल्या आपल्या आईला उचलून हा मुलगा प्रवास करताना दिसतो आहे. या ट्विटवर अनेकजण व्यक्त होत आहेत. अशी अवस्था याआधी कधीच झाली नव्हती. इतके असहाय कधी वाटले नव्हते. इथेच आपले सरकार नापास झाले आहे. अशा प्रतिसादासोबत या मुलाचे कौतुकही केले जात आहे. आपल्या आईच्या वेदना मुलालाच समजू शकतात. तुझ्या धैर्याला सलाम अशा शब्दांतून या मुलाचे कौतुक केले जात आहे. 

Covid -१९ ची वाढती रुग्णसंख्या आणि देशातील स्थलांतरित कामगारांची ही अवस्था खूपच धक्कादायक असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र सरकारनेही मोदी सरकारप्रमाणे पॅकेज जाहीर करावं – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

मुंबई | देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी ज्या प्रकारे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे तसेच राज्य सरकारनेदेखील पॅकेज जाहीर केले पाहिजे अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कोरोना संकटाचा सामना ज्या पद्धतीने राज्य सरकारने करायला हवाय त्या पद्धतीने सध्याचे सरकार करताना दिसत नाहीये. त्यामुळे देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. तसेच कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत. विशेषतः मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा प्रमुख शहरांत कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांना उपचार देखील मिळत नाहीयेत अशी परिक्षिती आहे. एकीकडे कोरोना रुग्ण वाढतायत तर दुसरीकडे शेतकऱ्यांची परिस्थिती बिघडत चालली आहे. अजूनही शेतकऱ्यांचा शेत माल घरी पडलेला आहे. राज्य सरकारने अजूनही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केलेला नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

बारा बलुतेदारांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. देशात केंद्र सरकारने मोठे पंकज जाहीर केले आहे. तसेच विविध राज्यांनीही कोरोना विरोधात लढण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केलेले आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप असे कोणतेही पॅकेज जाहीर केलेलं नाही. त्यामुळे आमची अशी मागणी आहे कि महाराष्ट्र सरकारने देखील पॅकेज दिले पाहिजे. विशेषतः बाराबलुतेदारांना पॅकेज दिले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असे फडणवीस यांनी सांगितले.

भारत-चीन सिमेवर तणावपूर्ण वातावरण

नवी दिल्ली । लडाखमध्ये पॅनगॉंग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैनिक परस्परांना भिडले होते. या घटनेनंतर भारत-चीन सिमेवर तणावपूर्ण वातावरण कायम आहे. सीमा भागात नेहमीच आपले वर्चस्व दाखवण्याचा चीनचा प्रयत्न असतो. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये भारतीय सैन्याने अतिरिक्त तुकडया तैनात केल्या आहेत. तर चीनने सुद्धा आपल्या अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

लडाखमधील डेमचॉक, चुमार, दौलत बेग ओल्डी आणि गालवान व्हॅली या भागामध्ये सैन्य तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. गालवान व्हॅली या भागातही आता चीनकडून आव्हान देण्यात येत आहे. गालवान नदीजवळ चिनी सैन्याने तंबू उभारुन बांधकाम सुरु केले होते. त्याला भारतीय सैन्याकडून आव्हान देण्यात आले असे भारतीय लष्करातील सूत्रांनी सांगितले.

भारत-चीन सीमेवर तणाव वाढण्याच्या घटना
पॅनगॉँग टीएसओ सेक्टरमध्ये ५-६ मे रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. त्यामुळे तयार झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने तिथे अतिरिक्त तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. २०१३ साली एप्रिल-मे महिन्यात डीबीओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरा-समोर आले होते. २१ दिवस दोन्ही देशांचे सैनिक परस्परासमोर उभे ठाकले होते. चीनने भारताच्या हद्दीत १९ किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केल्यामुळे त्यावेळी संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. २०१८ साली डेमचॉकमध्ये सुद्धा तंबू ठोकण्यासाठी चीनचे सैन्य ३०० ते ४०० मीटर आत आले होते. त्यावेळी सुद्धा भारतीय सैन्याने त्यांना आव्हान दिले होते.

चीनला उत्तर देण्यासाठी लडाखमध्ये अतिरिक्त भारतीय सैन्याच्या तुकड्या तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमावर्ती भागात चीन नेहमीच आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला उत्तर म्हणून भारतीय सैन्याने लडाखमध्ये अतिरिक्त तुकडया तैनात केल्या आहेत. येथील सीमावाद कायम असलेल्या पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सैन्याच्या अतिरिक्त तुकडया तैनात केलेल्या आहेत. ५-६ मे रोजी पॅनगॉंग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक उडाली होती. या आधी सुद्धा या भागामध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अनेक वेळा चकमकी झाल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाकडून या संबधीची बातमी देण्यात आलेली आहे.

डेमचॉक, चुमार, दौलत बेग ओल्डी आणि गालवान व्हॅली या भागामध्ये सैन्याच्या अतिरिक्त तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. गालवान व्हॅली या भागातही आता चीनकडून आव्हान देण्यात येत आहे. गालवान नदीजवळ चिनी सैन्याने तंबू उभारुन बांधकाम सुरु केले होते. त्याला भारतीय सैन्याकडून आव्हान देण्यात आले असे भारतीय लष्करातील सूत्रांनी सांगितले.

पॅनगॉँग टीएसओ सेक्टरमध्ये ५-६ मे रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी दोन्ही बाजूचे अनेक सैनिक घायाळ झालेले होते. त्यामुळे तेथे अतिरिक्त तुकडया तैनात करण्यात आलेल्या आहेत. २०१३ साली देखील एप्रिल-मे महिन्यात डीबीओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरा-समोर आले होते. त्यावेळी तब्ब्ल २१ दिवस या दोन्ही देशांचे सैनिक परस्परासमोर उभे ठाकले होते. चीनने यावेळी भारताच्या हद्दीत सुमारे १९ किलोमीटर आतपर्यंत घुसखोरी केल्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. २०१८ साली डेमचॉकमध्ये सुद्धा तंबू ठोकण्यासाठी चीनचे सैन्य ३०० ते ४०० मीटर आत आले होते. मात्र त्यावेळी सुद्धा भारतीय सैन्याने त्यांना आव्हान दिऊन माघारी पिटाळण्यात यश मिळवले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

तालिबानने काश्मीरप्रश्नी घेतलेल्या ‘या’ भूमिकेमुळे पाकिस्तानला झटका ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तालिबानने नुकतेच जाहीर केले आहे की,’ यापुढे काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये (पाकिस्तान पुरस्कृत) अजिबात सहभागी होणार नाही. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये आम्ही आता हस्तक्षेप करणार नाही.’ काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत दहशतवादाला तालिबान पाठिंबा देणार, असे दावे सध्याला सोशल मीडियावरुन करण्यात येत होते. मात्र तालिबानने हे सर्व दावे सोमवारी फेटाळून लावले आहेत. तालिबानने अशी भूमिका घेणे हा पाकिस्तानसाठी एक मोठा झटका असल्याचे म्हंटले जात आहे. कारण तालिबान आणि पाकिस्तान या दोहोंमध्ये अनेक वर्षांपासून मैत्रीचे चांगले संबंध आहेत. अफगाणिस्तानात दहशतवाद पसरवण्यासाठी तालिबानचा वापर पाकिस्तानने नेहमीच केलेला आहे. हिंदुस्थान टाइम्सने याबाबतचे अधिकृत वृत्त दिले आहे.

“तालिबान आता काश्मीरमधल्या जिहादमध्ये सहभागी होणार, हे मीडियामध्ये आलेली बातमी निराधार आणि चुकीची आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. दुसऱ्या देशांच्या अंतर्गत विषयांमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही” असे सुहैल शाहीन याने सांगितले. तो अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता आहे.

‘जोपर्यंत काश्मीर वादावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत भारताशी मैत्री होऊ शकत नाही’ असे तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहीदने म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर काश्मीरसंबंधी मोठया प्रमाणावर पोस्ट व्हयरल होत असल्याचे सोशल मीडिया मॉनिटर करणाऱ्या टीमच्या लक्षात आले. त्या पार्श्वभूमीवर आता तालिबानच्या प्रवक्त्यानेच या वृत्ताचे खंडन केले आहे.

Taliban official says group spoke with US official - Kashmir Pen

मीडियामध्ये प्रसिद्ध झालेलं हे वृत्त आणि त्यामुळे सोशल मीडियावर सुरु असलेली चर्चा यामुळे तालिबानची भारताबद्दलची भूमिका बदलली आहे का? हे जाणून घेण्यात आले. त्यासाठी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यानंतर तालिबानकडून अधिकृतपणे हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काबूल आणि दिल्लीतील राजनैतिक अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे . सोशल मीडियावरील पोस्ट या फेक असून तालिबानने अशी कुठलीही भूमिका घेतलेली नाही असे स्पष्ट करण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

यवतमाळमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात, ४ ठार तर २४ जखमी

यवतमाळ । महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसेन सोलापूरहून झारखंडला निघालेल्या स्थलांतरीत मजुरांच्या बसला आज पहाटे यवतमाळमध्ये अपघात झाला. या भीषण अपघातात ४ मजूर जागीच ठार, तर २४ जखमी झाले आहेत. जखमींना अर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नजिक कोळणव येथे आज पहाटे साडे चारच्या सुमारास मजुरांच्या बसचा अपघात झाला. ही बस सोलापूरहून झारखंड राज्याकडे निघाली होती. बसमध्ये एकूण ३२ मजूर होते. नागपूरच्या दिशेनं जात असताना समोरून आलेल्या भरधाव ट्रकनं बसला धडक दिली. यात ४ जण जागीच ठार झाले. तर, २४ जखमी झाले. हा अपघात नेमका कशामुळं झाला हे कळू शकलेलं नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून स्थलांतरीत मजुरांचे हाल सुरूच आहेत. हातचे काम गेल्यानं अनेक मजूर कामगार आता गावाकडे पलायन करायला विवश झाले आहेत. केंद्र सरकारनं प्रवासाची मुभा देऊन सुद्धा प्रशासन यंत्रणा तोकडी पडत असल्याचा फटका मजुरांना बसला आहे. त्यामुळं अनेकांनी पायी चालत घर गाठण्याचा प्रयत्न केला होता. या प्रवासातही अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला होता. औरंगाबादमध्ये अलीकडेच रेल्वे रुळावरून गावी निघालेल्या १६ मजुरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येनं गाठला १ लाखांचा टप्पा; पटकावलं ११ स्थान

नवी दिल्ली । कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, कोरोना संकटादरम्यान ५५ दिवसांच्या लॉकडाऊनंतरही संक्रमितांच्या आकड्यात सतत लक्षणीय वाढ होताना दिसून आली आहे. देशात आता कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांच्यावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे एक लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातील ११ वा देश बनला आहे. कोरोनाचा फैलावर रोखण्यात अपयश येत असल्यामुळे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. असे असताना सोमवारी रात्री १० वाजेनंतर कोरोना बाधितांचा आकडा हा जवळपास १ लाख ३२८ च्या घरात पोहोचला आहे. ३९ हजार २३३ जण बरे झाले आहेत तर ३१५६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

१ लाखांचा टप्पा गाठलेले देश
जगातील करोनाबाधितांच्या आकड्यावर नजर टाकली असता, सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिका अजूनही आघाडीवर आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत १५ लाख ५० हजार २९४ रुग्ण आढळलेत तर ९१ हजार ९८१ जणांचा मृत्यू झालाय. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियात २ लाख ९० हजार ६७८ रुग्ण आहेत तर २ हजार ७२२ रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यानंतर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर स्पेन असून तेथे २७८२८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटन चौथ्या क्रमांकावर असून २५५३६८ लोकांना बाधा झाली असून १६,८५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाचव्या क्रमांकावर ब्राझील, सहाव्या क्रमांकावर इटली, फ्रान्स सातव्या क्रमांकावर, जर्मनी आठव्या, तुर्की नवव्या तर इराण दहाव्या क्रमांकावर आहे. तर भारत अकराव्या क्रमांकावर आहे. मात्र, ज्या देशातून याचा प्रसार झाला तो चीन मात्र, १३ व्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये करोनाबाधितांची एकूण संख्या ८२ हजार ९६० वर आहे. इथं ४ हजार ६३४ जणांनी आत्तापर्यंत प्राण गमावलेत. इथं ७८ हजार २४१ रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर सध्या केवळ ८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

परभणी दोन दिवसात दोन कोरोना बाधीत रुग्ण सापडले

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

ग्रामीण व शहरी भागात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने परभणीकरांची धडधड वाढली आहे. दोन्ही रुग्णांचे स्वॅब पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्ण सापडलेले गाव व परिसर सील करण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सदरील महिला सोनपेठ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरील महिला काही दिवसांपूर्वी मुंबई येथून शेळगाव या गावी राहण्यासाठी आली होती. सदरील महिलेला कोरोना संसर्गाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आता या गावांमध्ये तीन दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे व गाव सील करण्यात आले आहे.

आज सकाळी परभणीतील साखला भाग परिसरामध्ये पुणे येथुन आल्यानंतर राहणाऱ्या तरुणाचा स्वॅब तपासणी अहवाल, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी मनपाला दिले आहेत. याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या आठ झाली असून पैकी एका महिला रुग्णाचा मृत्यू नांदेड येथे उपचार घेत असताना झाला असून दुसरा रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. आता हे सहा रुग्ण शासकीय दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत.

दरम्यान जिल्हात सोमवार दि. १८ मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्वीचे १३६९ व काल दाखल ४० अशा एकूण १४०९ संशयित रुग्णांची नोंद झाली असुन काल सायंकाळपर्यंत ४३ जणांचे तपासणी अहवाल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.