Friday, December 26, 2025
Home Blog Page 5783

विराटबरोबर क्रिकेट खेळताना दिसली अनुष्का शर्मा, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे दोघेही सोशल मीडियावर सतत त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले असतात. आता दोघांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये विराट आपली पत्नी अनुष्कासोबत क्रिकेटचा सराव करत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

वास्तविक हा व्हिडिओ विराट आणि अनुष्काच्या घरातील टेरेसवरचा आहे, ज्यामध्ये हे जोडपे क्रिकेट खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वीरर्ष नावाच्या एका युझरने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहु शकतो की पहिले विराट अनुष्कासाठी बॉलिंग करत आहे आणि त्यानंतर अनुष्का बॉलिंग करताना दिसली. या दोघांच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे.

View this post on Instagram

Putting in the work is a way of life and not a requirement of profession. Choice is yours.

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on May 15, 2020 at 8:36am PDT

यापूर्वी विराटने आपल्या फिटनेस ट्रेनिंगचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. यात, तो रनिंग करत आहे आणि पाठीमागे म्युझिक चालू आहे. या व्हिडिओसह विराटने असे कॅप्शन लिहिले आहे की, “स्वत: ला कामात व्यस्त ठेवणे हे प्रत्येकासाठी जगण्याचा मार्ग असू शकतो, परंतु प्रत्येक प्रोफेशनलने हे केलेच पाहिजे असे नाही.चॉईस तुमची आहे.”

 

अलीकडेच अनुष्का शर्मा प्रॉडक्शन हाऊसची वेब साइट ‘पाताल लोक’ अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली आहे. विराटनेही या वेब सिरीजचे कौतुक केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाआहे, ज्यामध्ये त्याच्या समोर लॅपटॉप उघडलेला दिसत आहे आणि स्क्रीनवर पॉज मोडवर ‘पाताल लोक’ वेब सिरीज असे नाव दिसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोविड-१९ च्या महामारीच्या दरम्यान सुरू झाली जर्मन फुटबॉल लीग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू या साथीच्या पार्श्वभूमीवर,कालपासून जर्मन फुटबॉल लीगची सुरुवात झाली. यामध्ये खेळविण्यात आलेली लढत हि जर्मनीच्या रिकाम्या स्टेडियममध्ये झाली. जेव्हा ही लीग सुरू झाली तेव्हा स्टेडियममध्ये पूर्णपणे वेगळेच दृश्य पहायला मिळाले.

कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरातील सर्व खेळ स्थगित करण्यात आलेले आहेत. परंतु खेळ पुन्हा सुरु करण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू होती. मात्र काल, जर्मनीमधील जर्मन फुटबॉल लीग ही रिकाम्या स्टेडियममध्ये सुरू झाली. जेव्हा ही लीग सुरू झाली तेव्हा स्टेडियममध्ये वेगळेच दृश्य होते. ना तिथे प्रेक्षकांचा ओरडण्याचा आवाज आला ना कुठले बँड बाज्याचा. ऐकू येत होता तो फक्त खेळाडूंचा आणि रेफरीच्या शिट्ट्यांचा आवाज.

Free Daily Football Predictions | German Bundesliga - SBAT

कोरोना महामारीच्या दरम्यान सुरू होणारी ही पहिलीच युरोपियन लीग आहे. या सामन्यात बरुसिया डार्टमंडचा सामना स्थानिक प्रतिस्पर्धी ‘शल्के ०४’ ने केला. साधारण दिवसात ही लीग पाहण्यासाठी जवळपास ८२,००० लोक येत असत. परंतु यावेळी असा आदेश देण्यात आला आहे की फक्त दोन्ही संघांचे खेळाडू, त्यांचे सपोर्ट स्टाफ, मीडिया कर्मचारी आणि काही अधिकारी एकत्रितपणे मिळून ३२२ लोकांपेक्षा जास्त नसावेत.

इतर दिवसांमध्ये जेव्हा एखादा गोल केलला जातो किंवा एखादा संघ जिंकतो तेव्हा सहसा खेळाडू मिठी मारून किंवा एकमेंकांशी हात मिळवून आनंद साजरा करत असत,मात्र या सामन्यात आनंद साजरा करण्याची पध्द्त पूर्णपणे वेगळी होती. खेळाडू फक्त एकमेकांना टक्कर देऊन सेलिब्रेट करत होते. या लीग दरम्यान खाली बसलेल्या खेळाडूंनी मास्क घातलेले होते. कोविड १९ मुळे सर्व खेळाडूंची आवश्यक खबरदारी घेत चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर, प्रत्येकाला स्वतंत्र राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सोशल डिस्टंसिंगमुळे सपोर्ट स्टाफ तसेच खेळाडू हा वेगवेगळ्या बसेसमध्ये आले.

या सामन्यात बरुसिया डार्टमंडने शॅल्के क्लबला ४-० ने मात दिली, सामना सुरू झाल्यापासून बरुसिया डार्टमंडच्या संघावर विरोधी संघाने पूर्णपणे वर्चस्व राखले होते. या विजयानंतर डार्टमंड आता बायर्न म्यूनिचपेक्षा एक गुण मागे आहे.

Bundesliga is back: Dortmund star Haaland 'not surprised' to score ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चिनी राजदूताचा इस्राईलमध्ये संशयास्पद मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्राईलमधील नवीन सरकारच्या शपथविधीच्या अवघ्या काही तास आधीच, एका चिनी राजदूताचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. चिनी राजदूत डु वेई यांचा मृतदेह हर्टझलिया येथील त्यांच्या घरात सापडला आहे.

इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची पुष्टी केली आहे. इस्त्रायली माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ही घटना उघडकीस आल्यापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

लष्कराच्या रेडिओद्वारे सांगण्यात येत आहे की डु वेई या राजदूताच्या घरात हिंसाचाराची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. तपास अधिकाऱ्यांना असा संशय आहे की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालेला असू शकतो.

दरम्यान, इस्राईली परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक युवल रोटेम यांनी चिनी कुलगुरू देई यूमिंग यांच्याशी बोलून त्यांना शोक संदेश पाठविला. रोटेम यांनी म्हटले आहे की इस्राईली परराष्ट्र मंत्रालय यासाठी सर्व प्रकारच्या मदतीसाठी तयार आहे. असे म्हटले जात आहे की इस्राईली मध्ये चीनचे राजदूत डू वेई बेडवरच मृत अवस्थेत आढळून आले आहेत. झोपेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

५८ वर्षीय डु वेई यांनी फेब्रुवारीमध्ये इस्रायलमध्ये चिनी राजदूत म्हणून पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते युक्रेनमध्ये चीनचे राजदूत होते. डु वे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्याचे कुटुंब इस्राएलमध्ये नव्हते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना रुग्णांना घेऊन निघालेले विमान ब्राझीलमध्ये कोसळले; ४ जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलच्या सिएरा राज्यात शुक्रवारी रात्री कोरोना विषाणूची लागण झालेल्या डॉक्टरांना घेऊन जाणारे एक छोटे विमान कोसळले. त्यामधून प्रवास करत असलेल्या सर्व ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जी -१ या ऑनलाइन न्यूज साइटने अग्निशमन दलाच्या हवाल्याने सांगितले की या आजारी डॉक्टरांना पियाऊ येथील आईसीयूमध्ये नेले जात होते. यामध्ये वैमानिकांबरोबरच रुग्णांवर उपचार करणारे २ डॉक्टरही होते.

ब्राझीलमध्ये २.३ दशलक्षाहून अधिक संसर्गग्रस्त आहेत
सिएरा अग्निशमन विभाग आणि साओ बर्नार्डो नगरपालिकेने या संदर्भात आणखी कोणतीही माहिती दिलेली नाही. ब्राझील जगातील कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक पीडित असलेल्या देशांपैकी एक आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे येथे १५.५ हजाराहून अधिक लोकांचा बळी गेलेला आहे. येथे संक्रमित झालेल्यांची एकूण संख्या ही २.३ लाखांवर गेली आहे आणि या दृष्टीने ती जगभरात पाचव्या क्रमांकावर आहे. असेही एक वृत्त आहे की या विषाणूमुळे ब्राझीलमधील आरोग्य यंत्रणा गंभीरपणे कोसळली आहे, अशा परिस्थितीत हा अपघात म्हणजे एक मोठा धक्काच मानला जात आहे. .

देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
ब्राझीलसाठी दिलासादायक फक्त एकच गोष्ट ही आहे की आजपर्यंत ८९,६७२ लोकं या आजारातून बरे झालेले आहेत आणि आता तेथे १२८,१७७ सक्रिय प्रकरणे आहेत. यातील ८,३१८ लोकांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे समजते. या साथीच्या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यास अपयशी ठरल्यामुळे ब्राझीलचे आरोग्यमंत्री नेल्सन टीच यांना राजीनामा द्यावा लागला आहे. एका महिन्यातली ही दुसरी वेळ आहे जेव्हा देशाचे आरोग्यमंत्री बदलले गेले आहेत. यापूर्वी, आरोग्यमंत्री हेन्रिक मंडेटा यांना अध्यक्ष झेरी बोलसोनारो यांनी या पदावरून काढून टाकले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सचिनने डोळ्यांवर पट्टी बांधून केलं युवराजचं हे चॅलेंज ब्रेक; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आपापल्या घरी कैद झाला आहे. यामध्ये वेळ घालवण्यासाठी लोक ऑनलाईन सोशल मीडियावर बऱ्याच ऍक्टिव्हिटी करताना दिसतात. यावेळी अनेक सिनेस्टार्स तसेच क्रिकेटपटूही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यावेळेस काही क्रिकेटर्स हे एकमेकांना मोटिव्हेट करण्यासाठी चॅलेंज देत आहेत. असेच एक चॅलेंज युवराज सिंगने सचिन तेंडुलकरलाही दिले होते. जे या मास्टर ब्लास्टरने तोडून उलट त्यालाच एक नवीन चॅलेंज दिले.

सचिनने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिनने डोळ्यावर पट्टी बांधलेली असून बॅटच्या काठावरुन बॉल उडवत असल्याचे दिसत आहे.

व्हिडिओ पोस्ट करत सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर लिहिले,” युवी तू खूप सोपा टास्क दिलास. चल तर मग मी तुला एक छोटासा अवघड ऑप्शन देत आहे. तू मला नॉमिनेट केलेस, आता मी तुला नॉमिनेट करतोय माझ्या मित्रा.”

सचिनच्या या व्हिडिओवर युवराजसिंगची प्रतिक्रिया खूपच मजेशीर होती. युवराजने लिहिले की, “मला माहित होते की मी एका चुकीच्या दिग्गजाला चॅलेंज देत आहे. आता यासाठी मला आणखी एक आठवडा लागू शकेल.”

काही दिवसांपूर्वीच युवराजने त्याच्या बॅटने चेंडूला मारतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. असे करत असताना युवीने सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि हरभजन यांना चॅलेंज दिले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

बराक ओबामांनी कोरोना पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी कोरोना विषाणूशी संबंधित काही अधिकाऱ्यांवर टीका केली आणि म्हटले की,” या साथीच्या रोगावरून असे दिसून येते की, येथे बरेच अधिकारी असे आहेत जे आपण प्रभारी असल्याचे दाखवतही नाहीत.”

‘हिस्टोरिकली ब्लॅक कॉलेजिस अँड युनिव्हर्सिटीज’च्या दोन तासांचा कार्यक्रम “शो मी योर वॉक” मध्ये ओबामा यांनी हे सांगितले. हा शो यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर प्रसारित झाला.

ते म्हणाले, “या साथीने अनेक महत्वाच्या गोष्टींवरून पडदा पूर्णपणे काढून टाकला आहे. येथे अनेक प्रभारी अधिकाऱ्यांना माहित आहे की ते काय करीत आहेत. तसेच त्यांच्यापैकी बरेचसे आपण प्रभारी असल्याचे भासवत देखील नाहीत. कोरोनाचा समाजावर चुकीचा परिणाम झालाय “. अशी टीका करताना ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा इतर कोणत्याही फेडरल तसेच राज्य अधिकाऱ्याचे नाव मात्र घेतलेले नाही.

फेब्रुवारी महिन्यात जॉर्जियातील रहदारीच्या रस्त्यावर जॉगिंग करताना अहमद आर्बरी (२५) यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या घटनेचा उल्लेखही या माजी राष्ट्राध्यक्षांनीही यावेळी केला.

ते म्हणाले, “कोविड -१९ चा आमच्या समाजावर झालेला विसंगत परिणाम आम्हाला दिसतोय. आपण पाहिले आहे की, जेव्हा एखादा काळा माणूस फिरायला जातो तेव्हा काही लोकांना असे वाटते की ते त्या व्यक्तीला रोखू शकतील आणि जर त्याने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर ते त्याला थेट गोळी घालू शकतील.”

या साथीच्या रोगाचा सर्वाधिक परिणाम हा अमेरिकेमध्ये झालेला पहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाव्हायरसची ४७ लाखाहून अधिक प्रकरणे आढळली आहेत, त्यापैकी १.५ लाखाहून अधिक प्रकरणे ही एकट्या अमेरिकेतून समोर आली आहेत. या देशात आतापर्यंत ९० हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याच वेळी इथे ३ लाखाहून अधिक लोक बरे देखील झालेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

प्रत्येक चक्रीवादळाचं नाव विचित्र का असतं? जाणून घ्या कसे ठेवले जातात चक्रीवादळांची नावे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशाच्या किनारपट्टी भागात अम्फान चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने आधीच वर्तविली आहे. गेल्या काही तासांत तर या अम्फान चक्रीवादळाने एक भयंकर वळण घेतले आहे. दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीपासून उत्तर-पश्चिमोत्तर भागाकडे या चक्रीवादळाने ताशी सहा किलोमीटर वेगाने वाटचाल केली आहे. त्याच वेळी, येत्या १२ तासांत हे चक्रीवादळ अधिक तीव्र होऊ शकते, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याने अलीकडेच चक्रीवादळांच्या १६९ नवीन नावांची यादी जाहीर केली आहे, जी भविष्यात बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्रात येऊ शकतात. जगभरातील महासागरांत येणाऱ्या चक्रीवादळांना क्षेत्रीय विशेष हवामान विभाग आणि ट्रॉपिकल साइक्लोन वॉर्निंग सेंटरतर्फे नावे दिली जातात.

जगात सध्या सहा प्रादेशिक विशेष हवामान खाती (एक भारतातील) आणि पाच ट्रॉपिकल साइक्लोन वॉर्निंग सेंटर आहेत. प्रादेशिक विशेष हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर हिंद महासागरात येणाऱ्या चक्रीवादळाला नाव एका प्रक्रियेद्वारे दिले जाते. हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रात येतात. चक्रीवादळ येण्यापूर्वी हवामान विभाग आसपासच्या १२ देशांना याविषयीची माहिती देतो.

The Amphan Cyclone will begin today - Tamilnadu will experience ...

चक्रीवादळाला नाव कसे ठेवले जाते ?
२००० साली मध्ये काही देशांनी जागतिक हवामान विभाग किंवा संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगासाठी आशिया आणि पॅसिफिक नावाचा एक गट स्थापन केला होता. या गटात बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश आहे.

यावेळी या देशांच्या गटाने असे ठरवले की कोणत्याही चक्रीवादळाचे नाव त्याच्या उत्पत्ती वाल्या प्रदेशाच्या नावावर असेल. प्रत्येक देश आपल्याकडून १ ट्रॉपिकल चक्रीवादळ पॅनेल सुचवितो. २०१८ मध्ये या गटात इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या आणखी पाच देशांचा समावेश करण्यात आला.

हवामान खात्याने ही यादी गेल्या महिन्यातच एप्रिलमध्ये जाहीर केली होती, म्हणजे  यामध्ये १३ देशांच्या १३ सूचनांचा समावेश होता. या नव्या यादीमध्ये चक्रीवादळ अम्फानचाही समावेश आहे कारण याआधीच्या यादीमध्ये हे नाव वापरलेले नव्हते.

IMD Releases New List of Upcoming Cyclone Names Over North Indian ...

चक्रीवादळाला नाव देणे महत्वाचे का आहे ?
चक्रीवादळाचे नाव ठेवल्याने लोकांना त्याला लक्षात ठेवणे सोपे जाते. याशिवाय वैज्ञानिक, मीडिया आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या संस्थांना देखील या नावाने मदत होते. नाव ठेवल्याचा देखील एक फायदा आहे की यामुळे चक्रीवादळाला ओळखणे सोपे जाते. चक्रीवादळाला नाव दिल्याने लोकांमध्ये जागरूकता तसेच धोक्याच्या तयारीसाठीचे इशारे देणेही सुलभ होते. एकाच भागात चक्रीवादळ येताना भिन्न नावे ठेवल्यास उडणाऱ्या गोंधळाच्या परिस्थतीची भीतीही यामुळे दूर होते.

चक्रीवादळाला नाव देण्यासाठी कोणती मार्गदर्शक तत्त्वे आहेत ?
चक्रीवादळाला नाव देण्यासाठी काही नियम बनविण्यात आले आहेत, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास, ट्रॉपिकल साइक्लोन वॉर्निंग पॅनेल हे देशांनी दिलेली नावे स्वीकारत नाही.

कोणती मार्गदर्शक तत्त्वे आहेत ?
चक्रीवादळाचे प्रस्तावित नाव राजकारण, राजकीय विचारसरणी, धर्म, संस्कृती याविषयी निष्पक्ष असले पाहिजे.
प्रस्तावित नाव असे असावे की ज्यामुळे जगातील कोणत्याही समुदायाच्या भावना दुखू नयेत.
प्रस्तावित नाव असभ्य किंवा अमानुष असू नये.
हे नाव लहान, उच्चारायला सोपे असावे आणि कोणत्याही सदस्याच्या मूलभूत भावनांना इजा पोहोचू नये.
नावात आठ अक्षरांची कमाल मर्यादा असावी.
नाव व्हॉईस ओव्हरमध्ये रेकॉर्ड करून किंवा योग्य उच्चारणासह पाठविले जावे.

Cyclone Vayu: Gujarat schools closed till June 15 | Gujarat News ...

भारताने प्रस्तावित केलेली नावे कोणती आहेत ?
भारताकडून नव्या यादीमध्ये चक्रीवादळाची १३ नावे प्रस्तावित केली गेली आहेत. भारताने दिलेली काही नावे सर्वसामान्यांनी सुचविलेली आहेत. ट्रॉपिकल साइक्लोन पॅनेलला नाव देण्यापूर्वी या नावांचा आढावा घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाने एक समिती स्थापन केली आहे.

भारताने दिलेली १३ नावे पुढीप्रमाणे आहेत:
गति
तेज
मुरासू
आग
व्योम
झार
प्रवाह
नीर
प्रभंजन
घुरनी
अंबुद
जलधि
वेग

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोनियाजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आम्हाला एकटं पाडू नका..!! – निर्मला सीतारामन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात जगभरातील सर्वच राजकारण्यांचा कस लागला आहे. अनेक देशांचे प्रमुख हे नक्की काय करायचंय, लॉकडाऊन ठेवायचा की नाही, कामगारांचं जगणं कसं वाचवायचं या विचारात आहेत. भारतातील सत्ताधारी भाजप सरकारपुढेही हा प्रश्न आहेच. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारतासाठी’ २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज नुकतंच जाहीर करण्यात आलं. या पॅकेजची विस्ताराने माहिती देत असताना आज झालेल्या पाचव्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर हात जोडले.

स्थलांतरित आणि इतर कामगारांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी आम्हांला विरोधी पक्षांच्या मदतीची आवश्यकता आहे. या प्रश्नावर आमच्यावर टीका करण्याआधी आमच्याशी बोला, आपण मिळुन या प्रश्नावर मार्ग काढू अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोनिया गांधी यांना केली. या प्रश्नावर काँग्रेस पक्षाकडून विविध उपाययोजना माध्यमांद्वारे सांगितल्या जात आहेत. विविध अर्थतज्ञ आणि पत्रकार लोकांशी संवाद साधणाऱ्या राहुल गांधी यांनी शनिवारीच दिल्लीतील रस्त्यांवर बसलेल्या मजुरांना भेट देऊन या प्रश्नाचं गांभीर्य सरकारपुढे मांडलं होतं. यालाच आज सीतारामन यांनी उत्तर दिलं आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1260895626465665025?s=19

मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी भावनिक होण्याचं भाजप नेत्यांचं अस्त्र जुनंच आहे. देशप्रेमाच्या नावाखाली अशी अनेक आवाहनं जनतेलाही करण्यात आली होतीच. आता या विनंतीवर सोनिया गांधी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं रंजक ठरेल.

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला; मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

मुंबई । राज्यातील लॉकडाऊन ३१ मार्च च्या मध्यरात्री पर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1261927931657351169

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवल्याचा अध्यादेश जारी केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं. त्यानुसार आज लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबतचे नवे नियम अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबतच्या केंद्राच्या गाईडलाइन न आल्याने राज्यातील नवी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल माहिती दिलेली नाही. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पृथ्वीराज बाबा तुम्ही फक्त काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे सांगा..कोण रोखतयं बघूच – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणार्‍या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आजीवन बंदी घालण्यात आल्याचे वृत्त होते. चव्हाण यांनी देवस्थानांकडील सोने कर्जरुपाने घेऊन कोरोनाविरोधातील लढाई लढावी असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर समाजातील काही जणांकडून त्याला विरोध करत चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आता चव्हाण यांची बाजू घेत भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई पुढे आल्या असून पृथ्वीराज बाबा काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे फक्त सांगा..कोण रोखतयं ते बघूच असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कोणी जर आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांना आणि त्यांच्या परिवारांना काहीही कारण नसताना आजीवन बंदी घातली असे सांगत असेल, धमकी देत असेल तर मला त्यांना एवढेच सांगायचं की आपला देश संविधानानुसार चालतो. या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, आणि “आम्ही बंदी घातली असे सांगून मंदिर तुमच्या मालकीचे आहे असे समजू नका”… मंदिर हे सर्व भक्तांचे असते आणि हे शिवशंकराचे मंदिर आहे असे म्हटले आहे. आज देव मुर्तीस्वरूपात आहे. जर देव खरोखरच जिवंत स्वरूपात असता तर मंदिरात बंदी घालणार्यांना नक्कीच शिक्षा दिली असती असं मत देसाई यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, देवाला सगळे भक्त समान असतात. केवळ राजकारण म्हणून एखाद्याला मंदिरात बंदी असं कोणी जर म्हणत असेल तर “पृथ्वीराज बाबा तुम्हाला कधी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जायचे फक्त सांगा ही तृप्ती देसाई तुम्हाला त्या मंदिरात तुमच्या कुटुंबासह घेऊन जाईल..कोण रोखतयं ते बघूच.” कोणी आवाज उठवला तर तो दाबण्याचे षड्यंत्र सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही असे म्हणत देसाई यांनी इशारा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.