Friday, December 26, 2025
Home Blog Page 5782

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलांना अटक; तहसीलदारांना मारहाण करणे पडले महागात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

विटा तहसिलदार ऋषिकेश शेळके याना माराहाण प्रकरणी केल्या प्रकानी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार सुभाष पाटील व त्याचा साथीदार सागर श्रीमंत सुरवसे यांना सापळा रचून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने आज ताब्यात घेऊन त्यांना विटा पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.

20200518_110849.gif

वाळूचा दंड कमी कमी कला नाही याचा राग मनात धरून कुस्तीच्या मैदानात स्वतःचा वेगळं अस्तित्व निर्माण करून नावलौकिक करणारे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आणि त्यांचा साथीदार सागर सुरवसे या दोघांनी संगनमताने विटा तहसिलदार ऑफीस समोर तहसिलदार ऋषिकेश शेळके याच्या शासकिय कामात अडथळा निर्माण करुन त्यांना माराहाण केली होती. या प्रमाणी दोघांच्या वर्ती गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्या पासून से दोघे संशयित आरोपी फरारी होते.

आरोपींना अटक करणेचे अनुषंगाने पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले याचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली होती. आज हे पथक विटा आणि आटपाडी भागात फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना खास बातमीदारमार्फत माहीती मिळाली कि, दिघंची ते पंढरपुर रोड परीसरात फरारी संशयित आरोपी चंद्रहार पाटील आणि त्यांचा साथीदार सागर हे येणार आहे. मिळालेल्या माहीती प्रमाणे पोलीस पथकाने सापळा रचुन चंद्रहार पाटील आणि त्याचा साथीदार सागर सुरवसे यास दोघाना त्याब्यात घेऊन पुढील तपासाकरीता विटा पोलीस ठाणेच्या हवाला करण्यात आले.

सदर कारवाई मा पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदशानाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, प्रदीप चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरोबा नरळे, पोलीस नाईक संदीप गुरव ,सागर लवटे, सदीप नलावडे, अनिल कोळेकर, उदय साळुखे, संदीप पाटील, राहुल जाधव, अजय बेंदरे, प्रशांत माळी सागर टिंगरे आणि चालक शंकर पाटील यांनी सहभाग घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Lockdown 4.0 | काय सुरु आणि काय बंद राहणार? पहा केंद्राची नवी नियमावली

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली । देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. केंद्राकडून याबाबत नवीन नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसंच कॉलेज, शाळा, सिनेमागृह, धार्मिक प्रार्थनास्थळंदेखील बंदच राहणार आहेत. राजकीय कार्यक्रमांवरील बंदीही कायम राहणार आहे. आंतरराज्य तसंच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त एअर अॅम्ब्युलन्सला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहममंत्रालयाने नियमावलीत हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हाय रिस्क असणाऱ्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनचं कठोरपणे पालन केलं जाणार आहे.

https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/maharashtra-reported-2347-new-corona-cases-today/

कोणत्या गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत ?
– आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा
– मेट्रो सेवा
– शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. ऑनलाइन शिकवणीला परवानगी
– हॉटेल, रेस्तराँ बंद राहणार
– चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जीम, पूल, पार्क, बार बंद राहणार
– सामाजिक, धार्मिक कार्यक्रमावंर बंदी कायम
– सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं बंद राहणार आहेत
– ६५ हून जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक, व्याधी असणारे, गरोदर महिला, १० वर्षापेक्षा लहान मुलांनी घरातच थांबावं.

कोणत्या गोष्टींना परवानगी –
– बस किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या आतंरराज्य प्रवासाला परवानगी. यावेळी दोन्ही राज्यांनी एकमेकांची संमती घेणं आवश्यक असणार आहे.
– कंटेनमेंट झोनला यामधून वगळण्यात आलेलं आहे.

कंटेनमेंट, बफर, रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी नियमावली –
– झोनप्रमाणे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि स्वातंत्र्य राज्यांना देण्यात आलं आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत अनेक राज्यांनी तशी मागणी केली होती.
– रेड, ऑरेंज, कंटेननेंट आणि बफर झोनचं सीमांकन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यावेळी केंद्राच्या नियमावलींची दखल घेणं गरजेचं आहे
– कंटेनमेंट झोनमध्ये फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.
– मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, घरोघरी जाऊन पाहणी गरजेचं
– रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. फक्त जीवनाश्यक गोष्टींना परवानगी असेल.
– कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी ठरवून दिलेल्या वेळेत सर्व दुकानं आणि मॉल सुरु करण्याची परवानगी.
– स्थानिक प्रशासनाने कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी दुकानं आणि मार्केट ठरलेल्या वेळेतच सुरु राहतील याची काळजी घ्यावी.
– सर्व दुकानांनी ग्राहकांमध्ये सहा फूटांचं अंतर राहील याची काळजी घ्यावी. एका वेळी दुकानावर पाचपेक्षा जास्त ग्राहकांना परवानगी नसावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशातील लोकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला; केंद्राची नवीन नियमावली जाहीर

नवी दिल्ली । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात घोषित केलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्यापासून सुरू होतोय. हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत असेल, अशी माहिती केंद्र सरकारने दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली होती. त्यांनतर लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीय.

https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/lockdown-4-0-central-government-new-rule-and-regulations/

लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा नव्या स्वरूपाचा आणि नवीन नियमावलीनुसार लागू केला जाईल. यासाठी राज्यांकडून सूचना मागवण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनात म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेट राजीव गौबा हे आज रात्री ९ वाजता राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नवीन दिशानिर्देश किंवा नियमावली जारी करण्यात आली आहे.

लॉकडाऊन 4.0 च्या नव्या नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा-कॉलेज बंदच राहणार आहे. तसेच मेट्रो-लोकल सेवाही बंदच राहणार असेही यात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आता देशात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन व्यतिरिक्त बफर आणि कंटेन्मेंट झोन असे पाच झोन असतील.

काही तासातच रौद्ररूप घेऊ शकते अम्फान चक्रीवादळ; ओडिशात रेड अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगालच्या उपसागरात येणारे चक्रीवादळ अम्फान हे अनेक राज्यांमध्ये धोका निर्माण करू शकते असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. आयएमडीने याबाबत म्हटले आहे की,’ यावेळी देशात वेस्‍टर्न डिस्टरबन्स एक्टिव आहे, यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही हवामान खराब होऊ शकते.

ओडिशा आणि बंगालमध्ये रेड अलर्ट जाहीर
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरातून चक्रीवादळ ‘अम्फान’ पुढील १२ तासांत धोकादायक रूप धारण करू शकेल, ‘आयएमडीने म्हटलं आहे की,’दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात पुढच्या १२ तासांत हे ‘अम्फान चक्रीवादळ ‘ वेगाने सरकेल आणि म्हणून ओडिशा आणि बंगालमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे.

ओडिशामध्ये एनडीआरएफची १० पथके तैनात आहेत ओडिशाच्या बालासोर, भद्रक, केंद्रापाडा, पुरी, जगतसिंगपूर, जाजपूर आणि मयूरभंज जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) १० पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच ७ पथके कटकमध्ये तर ३ पथके एनडीआरएफ बीएन मुंडाली येथे तैनात आहेत. २० मे रोजी चक्रीवादळ रूप धारण करील भुवनेश्वर येथील हवामान विभाग म्हणाले की,’२० मे रोजी दुपारच्या दरम्यान ‘अम्फान’ चक्रीवादळ हे पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशातील हटिया बेटच्या मध्यभागी भयानक रूप धारण करेल. या चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये मुसळधार पाऊस होईल आणि जोरदार वारे वाहतील.

ओडिशा सरकारने दिला इशारा
इतकेच नाही तर ओडिशा सरकारने मच्छिमारांना बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेस आणि समुद्राच्या दक्षिणेकडे जाऊ नये असा सल्ला दिला आहे, तसेच समुद्राच्या या भागात गेलेल्या मच्छिमारांनाही त्वरित परत येण्यास सांगितले गेले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले- जीवितहानी होऊ देणार नाही
बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्री वादळासाठी ओडिशा सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या चक्रीवादळामुळे राज्यात कोणातीही जीवितहानी होणार नाही याची खात्री करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

स्पेनमध्ये तब्ब्ल दोन महिन्यानंतर शंभरहून कमी मृत्यूंची नोंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था तसेच आरोग्य यंत्रणाही त्यामुळे ढासळल्या आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, चीन हे कोरोनाने सर्वाधिक बाधित देश आहेत. या कोरोनाच्या संसर्गाचा फटका बसलेल्या स्पेनमधून तब्ब्ल दोन महिन्यानंतर एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या बातमीमध्ये स्पेनमध्ये मृतांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती देण्यात आली असून गेल्या २४ तासांत फक्त ८७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. स्पेनमध्ये मागील दोन महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसांत शंभराहून कमी लोकांचा मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये करोनाने अक्षरशः थैमान घातले होते. आशियामधील चीननंतर इटली आणि स्पेन या युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरू होता. स्पेन आणि इटली हे कोरोनाच्या संसर्गाचे मुख्य केंद्र झाले होते. आता, स्पेनमध्ये कोरोनाचा जोर ओसरत असल्याचे चित्र दिसत आहे. स्पेनमध्ये काल शनिवारी फक्त १०४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर, शुक्रवारी १३८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

स्पेनमध्ये आतापर्यन्त सुमारे दोन लाख ७७ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तसेच २७ हजार ६५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक लाख ९५ हजार जणांनी कोरोनाच्या संसर्गावर मात केली आहे. स्पेनमध्ये कोरोनाच्या थैमानामुळे सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्बंधात थोडी शिथिलता देण्यात आलेली आहे.

दरम्यान, रशियात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी तेथे कोरोनाची बाधा झालेले सुमारे ९२०० नवीन रुग्ण आढळून आलेत. रशियात आतापर्यंत दोन लाख ८१ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे १४ मार्च रोजी स्पेनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनामुक्तीच्या दिशेने निघालेल्या कराडमध्ये पुन्हा ४ नवीन कोरोनाग्रस्त; ९ वर्षांची मुलगीही पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील म्हासोलीतील बाधिताच्या सहवासातील 60 व 33 वर्षीय तसेच मलकापूरातील 9 वर्षाची मुलगी आणि गुजरातमधून आलेल्या कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथील 29 वर्षीय युवकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. सोमवारी सकाळी जिल्ह्यातून चार रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने कोरोना मुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 66 इतकी झाली होती. हा दिलासा मिळत असतानाच सायंकाळी आणखी 4 जणांचे अहवाल बाधित आले आहेत.

Satara

कराड तालुक्यातील म्हासोलीतील पुणे येथून प्रवास करून आलेल्या बाधिताच्या सानिध्यात आलेल्या 60 व 33 वर्षीय तसेच मलकूपरामधील 9 वर्षाच्या मुलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.

कराड तालुक्यातील रुग्ण संख्या 94 झाली आहे यापैकी, कृष्णा हॉस्पिटल कराड येथून 30, उपजिल्हा रुग्णालय कराड येथून 4 तर सह्याद्री हॉस्पिटल कराड येथून 21 रुग्ण असे एकूण 55 रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 133 झाली असून या पैकी कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 66 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अबब !! चक्क पंतप्रधानांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या रेस्टॉरंटमध्ये नेते मंडळीनी स्टार्सनी तसेच व्हीआयपींनी हजेरी लावावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. त्यांच्यासाठी काही खास आदरातिथ्याचे आयोजनही केले जाते. मात्र, एका देशात एका रेस्टॉरंटमध्ये चक्क देशाच्या पंतप्रधानांनाच प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे घडले न्यूझीलंड या देशामध्ये. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांना राजधानी वेलिंग्टनमधील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी चक्क प्रवेश नाकारण्यात आला.

त्याचे झाले असे की न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणावर शिथिल करण्यात आले आहे. मात्र यानंतरही काही नियमांसह रेस्टॉरंटस सुरू करण्यात आली आहेत. रेस्टॉरंटमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात येत असून, येथे दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर राखणे आवश्यकच आहे. त्यानुसार अनेक रेस्टॉरंटमधल्या बैठक व्यवस्थेतही बदल करण्यात आलेले आहेत. अलीकडेच न्यूझीलंडच्या पंतप्रधान अर्डर्न आणि त्यांचा प्रियकर क्लार्क गेफोर्ड हे ‘ऑलिव्ह’ रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टसाठी गेले होते. मात्र, रेस्टॉरंटमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आत सोडण्यात आले नाही. यानंतर पंतप्रधानांनीही रेस्टॉरंटजवळ सामान्य लोकांप्रमाणेच उभे राहून जागा मोकळी होण्याची वाट पाहिली, असे त्यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

Trevor Hancock: New Zealand leads the way by focusing on quality ...

न्यूझीलंडमध्ये या लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्यावर कारवाई देखील केली होती. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालेल्या काही मोजक्याच देशांमध्ये न्यूझीलंड या देशाचा समावेश होतो. न्यूझीलंडमध्ये आतापर्यन्त १४९९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद असून त्यामुळे २१ जणांचा मृत्यू झाला. तर, १४३३ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून सध्या फक्त ४५ जणांवर उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोने झाले स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ दिसून आलेली आहे. आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ही १० ग्रॅम साठी ७४५ रुपयांनी वाढून ४७,०६७ रुपये इतकी झाली. त्याचवेळी चांदीचा दर हा प्रति किलो ४५०३५ रुपये इतका झाला. एका दिवसापूर्वीच चांदीची किंमतही ४२,९८५ रुपये प्रतिकिलो होती, जी आता प्रति किलोस २०५० रुपयांनी वाढली आहे.

gold-bar

आज भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढल्याचे दिसून आले.जागोजागी जोरदार मागणी असल्याने तसेच सट्टेबाजांनी नवीन सौदे खरेदी केल्यामुळे फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत २१७ रुपयांनी वाढ होऊन ते ४६,८७१ रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. जून डिलीव्हरीसाठीचा सोन्याचा भाव २१७ रुपयांनी किंवा ०.४७ टक्क्यांनी वाढून ४६,८७१ रुपये प्रति दहा ग्राम झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये १३,१७४ या लॉटसाठी उलाढाल झाली. तर ऑगस्टमधील डिलीव्हरीसाठीचा सोन्याचा भाव २१० रुपयांनी किंवा ०.४५ टक्क्यांनी वाढून ४७,०५४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ८,८५२ या लॉटसाठी उलाढाल झाली.

gold-3

कोव्हिड-१९ या आजाराच्या विरोधात जगातील सर्व नेते अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रोत्साहनपर पॅकेज देऊन एकत्र आले असले तरी दीर्घकालीन आर्थिक मंदीचे मोठे सावट आज कमोडिटीज मार्केटवर दिसून आले. मागील आठवड्यात सोन्याच्या किंमती स्थिर होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजना जाहीर केल्या. यामुळे बाजारपेठेला प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच सुरक्षित मालमत्तेकडे गुंतवणूकादारांना ओढा कमी करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलली गेली.

कोरोनाच्या साथीमुळे आतापर्यंत २० लाखांहून अधिक नागरिक संसर्गग्रस्त असून दिड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भांडवली बाजारातील अनिश्चितता सोन्यात तेजी निर्माण करण्यास कारणीभूत ठरली. जगभरातील आर्थिक घडामोडी लवकरच सुरू होतील, या आशेने गुंतवणूकदार सोन्याची गुंतवणूक कमी करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शाहरुख खान या लॉकडाऊनमधून काय शिकला ? पोस्ट शेअर करून चाहत्यांना सांगितले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचा किंग शाहरुख खान लोकांना सतत कोरोना विषाणूबद्दल जागरूक राहण्यास सांगत ​​आहे. यासह, तो आपल्या चाहत्यांना त्यापासून दूर राहण्याचा सल्लाही देत ​​आहे. अलीकडेच शाहरुखचा त्याच्या मुलगा अबरामसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो अब्रामबरोबर गाताना आणि नाचताना दिसला आहे. आता किंग खानने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून शिकलेल्या धड्यांविषयी लिहिले आहे.

शाहरुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या एका सेल्फीसह एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने या लॉकडाउनने आपल्याला काय शिकवले आहे याबद्दल सर्वांना सांगितले आहे. शाहरुखने इन्स्टाग्रामवर त्याने शिकलेले ५ धडे शेअर केले आहेत. या अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

शाहरुखने यात लिहिले आहे की,” आपण बऱ्याच दिवसांपासून आपल्या इच्छांची पूर्तता न करता जगतो आहोत, पण आता आपल्याला कळले आहे की ते इतके महत्त्वाचे कधीच नव्हते. आता हे समजले आहे की आपल्याला आपल्या जवळ जास्त लोकांची गरज नाहीये, तर अशा लोकांची गरज आहे ज्यांच्याशी तुम्ही या लॉकडाऊनमध्ये बोलू शकता. आता जर वेळ पुन्हा थांबला तर त्या सर्व खोट्या असुरक्षितता विसरून आयुष्य जगा आणि ज्यांच्याबरोबर कधी भांडला आहात त्यांच्याबरोबर हसा. या सर्वांच्या शेवटी, प्रेम हे नेहमीच जिवंतच असेल, काहीही झाले तरी त्याची किंमत कधीही कमी होणार नाही.


View this post on Instagram

 

Lockdown lessons…

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on May 15, 2020 at 11:39am PDT

 

त्याच वेळी, कोविड -१९ बरोबर सुरू असलेल्या या युद्धाला हातभार लावण्यासाठी नुकताच बॉलिवूडने फेसबुकवर लाईव्ह कॉन्सर्ट केली होती. ‘आय फॉर इंडिया’ या कॉन्सर्टमध्ये सुमारे ८५ भारतीय आणि जागतिक स्टार्सचे गायन, कविता पाठ, वादन आणि खासगी मेसेजेस प्रसारित करण्यात आले. या कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानने गायलेले गाणे लोकांनी खूपच पसंत केले. यामध्ये त्याला त्याचा धाकटा मुलगा अबराम खान याने देखील साथ दिली होती. यावेळी चाहत्यांना या बापलेकाची गोंडस जोडी खूपच आवडली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीरचं प्रत्युत्तर; म्हणाला ७० वर्षांपासून तुम्ही भीक मागताय…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची जीभच घसरली. मात्र त्यानंतर लगेच गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. इंडिया टुडेशी बोलताना हरभजनसिंग म्हणाला की,” या शाहिद आफ्रिदीने आपल्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही म्हंटले आहे ते स्वीकारण्यासारखे नाहीये. यावेळी आफ्रिदीने आपली सीमा ओलांडली आहे.

वास्तविक आफ्रिदी काश्मीर प्रश्नावर बोलताना पंतप्रधान मोदींवर सतत आपला निशाणा साधत आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो मोदींवर आक्षेपार्ह कमेंट देताना दिसत आहेत. त्याच्या या विधानानंतर गंभीर आणि हरभजन यांनी त्याला योग्य उत्तर दिले. आफ्रिदी म्हणाला होता की,” कोरोनापेक्षाही मोठा आजार पीएम मोदींच्या मनात आहे आणि ते धर्मांधतेने आजारी आहेत.

हरभजन सहित गौतम गंभीरनेही आफ्रिदीला उत्तर देताना लिहिले की.” आफ्रिदी , इम्रान खान आणि बाजवा यांसारखे जोकर लोक पाकिस्तानी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी भारत आणि आमच्या पंतप्रधानांविरूद्ध विष पेरू शकतात, पण जजमेंट डेपर्यंत तुम्हांला काश्मीर मिळणार नाही. गंभीर पुढे म्हणाला की, शाहिद आफ्रिदी या १६ वर्षाच्या व्यक्तीचे म्हणणे आहे की,” सात लाख पाकिस्तानी सैन्याच्या मागे २० करोड लोक उभे आहेत, तरीही ७० वर्षांपासून ते काश्मीरसाठी भीक मागत आहेत. गंभीरने शाहिद आफ्रिदीला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशची आठवण करुन दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.