Friday, December 26, 2025
Home Blog Page 5784

परभणीत कोरोनाचा नवीन रुग्ण; मुंबईहून आलेल्या ५० वर्षीय महिला पॉझिटिव्ह

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

परभणीकराणांसाठी धडधड वाढवणारी बातमी असुन जिंतूर येथील तीन कोरोना पॉजिटीव्ह नंतर आता परभणी शहरात आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. परभणी शहरात मुंबई येथून आलेल्या ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मुंबईहून आल्यावर सदरील महिलेची तपासणी केल्यानंतर आता या तपासणी अहवालात महिलेला कोरोना असल्याचे उघड झाले आहे. ही महिला परभणी शहरात वास्तव्यास आली होती .यादरम्यान दिलासादायक बाब अशी आहे की , ही रुग्ण महिला कोणाच्याही संपर्कात नसल्याचे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.आता जिल्ह्यात एकूण ४ रुग्ण कोरोनाग्रस्त झाले असुन सापडणारे सर्व रुग्ण हे जिल्ह्याबाहेरुन आले आहेत हे विशेष.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कुणी 5 कोटी दिलेत, कुणी 500 कोटी… आम्ही आमचं आयुष्य देतोय – मुंबई पोलीस

मुंबई । कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३० हजारच्या वर पोहोचली आहे. महाराष्ट्र पोलीस कोरोना संकटात रस्त्यावर उतरून आपली ड्युटी चोखपणे पार पाडत आहेत. मात्र अनेक पोलीस कर्मचारीही कोरोनाची शिकार झाले आहेत. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी आणि एका 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी एक भावूक ट्विट केलं आहे.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1261610230611312641

कुणी 5 कोटी दिलेत तर कोणी 500 कोटी दिलेत, आम्ही आमचं आयुष्य देतोय… अशी म्हणत मुंबई पोलिसांनी अमोल कुलकर्णी यांचा एक जुना फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अमोल कुलकर्णी या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या निधनानंतर त्यांच्या प्रोफाइलवर त्यांनीच पोस्ट केलेला हा जुना फोटो पोलिसांनी ट्विटरवरुन शेअर केलाय. खऱ्या पोलीस कर्मचारी ‘स्वत:पेक्षा कर्तव्य महत्वाचे या ध्येयानेच जीवन जगतात. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सर्वोच्च बलिदान देणारे दिवंगत एपीआय अमोल कुलकर्णी यांच्या खासगी प्रोफाइलवरील ही पोस्ट… अमोल कुलकर्णी यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना मुंबई पोलिसांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

API कुलकर्णींचा ‘तो’ फोटो नजरेपुढून जातंच नाहीय..गृहमंत्री अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट

मुंबई । कोरोना विषाणूंसोबत महाराष्ट्र पोलीस रस्त्यावर उतरून लढत आहेत. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी आणि एका 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काळ कुलकर्णी यांना आदरांजली वाहत मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला होता. आता आज देशमुख यांनी एक फोटो ट्विट करत अमोल कुलकर्णींनीचा तो फोटो नजरेपुढून जातंच नाहीय अशी एक भावनिक पोस्ट शेयर केली आहे.

कोरोना विषाणूशी लढत असताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल कुलकर्णी यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालं. या वीर योध्याला धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अमोल कुलकर्णी यांच्या आठवणी सांगताना एरवी कर्तव्याच्या बाबतीत कातळापेक्षाही कठोर असलेले त्यांचे सर्व सहकारीही कसे भावूक झाले होते, हे मी पाहिलं. या सहकाऱ्यांना धीर देत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी आणि राज्य सरकार खंबीरपणे उभं आहोत, याची ग्वाही दिली. मान्य आहे, की आज प्रसंग कठीण आहे. आज सगळे पोलीस कशा परिस्थितीत काम करत आहेत, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण विश्वास ठेवा, हेही दिवस लवकरच जातील असं देशमुख यांनी सदर पोस्ट मध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1261691469385129991

एक गोष्ट मात्र माझ्या डोळ्यांपुढून जात नाही. अमोल कुलकर्णी जेव्हा त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पहिले आजारी होते तेव्हा त्यांनी फेसबुकवर शेअर केलेली एक इमेज पहायला मिळाली ती अक्षरशः माझ्या काळजाचा ठाव घेऊन गेली. “कोणी ५ कोटी दिले तर कोणी ५०० कोटी दिले, आम्ही मात्र आमचं आयुष्य देतोय.” असं वाक्य त्यावर लिहिलेलं होतं. दुर्दैवाने त्या पोस्ट मधील हा मजकूर अमोल कुलकर्णी यांच्याबाबतीत तंतोतंत खरा ठरावा, हा नियतीचा क्रूर खेळच म्हणावा लागेल. काही का असेना पण हे सत्य पचायला खूप जड जातंय. यानिमित्ताने मी सर्व पोलिसांना आश्वस्त करतो की तुमचा जीव हा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्याची किंमत ही पैशात होऊच शकत नाही. म्हणून स्वतःची काळजी घ्या. काम करताना कशाचीही गरज पडली तर ती आपल्या वरिष्ठांनापर्यंत पोचवण्यास विसरू नका… असं म्हणत देशमुख यांनी “रक्षिण्या देशार्थ, केलास जन्म सार्थ. वीर जवान शोभलास, जावो न बलिदान व्यर्थ” असे म्हणत कुलकर्णी यांचा गौरव केला आहे.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1261610230611312641

तसेच मुंबई पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या प्रोफाइल वरील हा फोटो ट्विट करत म्हटले आहे की, “खऱ्या पोलीस कर्मचारी ‘स्वत:पेक्षा कर्तव्य महत्वाचे या ध्येयानेच जीवन जगतात. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सर्वोच्च बलिदान देणारे दिवंगत एपीआय अमोल कुलकर्णी यांच्या खासगी प्रोफाइलवरील ही पोस्ट. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच प्रार्थना.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

महाराष्ट्रातून इंदौरकडे निघालेल्या कामगार पती पत्नीला टँकरने उडवले; ४ जण ठार

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातून इंदौरच्या दिशेने पायी प्रवास करणाऱ्या कामगार पती पत्नीला आज सकाळी एका टँकरने उडवल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील बारवानी येथे हा अपघात झाला असून यात स्थलांतरी कामगार आणि त्याची पत्नी व अन्य दोघे असे एकूण चार जण जागीच ठार झाले आहेत.

देशात कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग धंदे बंद असून तळहातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गावर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शहरात हाताला काम नसल्याने आणि पोटाला घायला काही मिळत नसल्याने जगायचे कसे असा यक्ष प्रश्न या कामगाराने समोर उभा आहे. यामुळे स्थलांतरित कामगारांनी जमेल त्या मार्गाने आपल्या गावी परतण्याचा सपाट लावला आहे. मात्र यात अनेकांना प्राणाला मुकावे लागत आहे.

दरम्यान, देशात स्थलांतरित कामगारांचे अपघात सत्र सुरूच असून अनेक मजूरांचा आत्तापर्यंत यात मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू देशातील श्रीमंत लोक विमानाने घेऊन आले आणि त्याच कोरोनाने देशातील गरिबांना हजारो किलोमीटर पायी चालत गावी जायला भाग पाडले असेच काहीसे चित्र सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन; LoC वर तणावपूर्ण वातावरण

वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील डेगड सेक्टरमध्ये रविवारी (17 मे) सकाळी पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८:४० वाजता पाकिस्तानने डेगवार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचा भंग केल्याची घटना घडली.  भारतीय सैन्य पाकिस्तानला प्रत्युत्तर देत आहे.

याआधी ९ मे रोजी सुद्धा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले होते. सायंकाळी ७:३० च्या सुमारास, पाकिस्तानी सैन्याने डेगवार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू केला होता. भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने माघार घेतली होती.

दरम्यान, ८ मे रोजी, पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैन्य दलाचे किमान ३-४ सैनिक ठार झाल्याचे बोलले जात आहे. तसेच पाच इतर जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

औरंगाबादेत आज पुन्हा तब्बल ५७ नवीन कोरोनाग्रस्त; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९५८ वर

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज पुन्हा तब्बल ५७ नवीन कोरोना रुग्ण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९५८ वर पोहोचली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1) , एन सहा,सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (8), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1),सिल्क मिल कॉलनी (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), अन्य (2) तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागातील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असेही कळवण्यात आलेले आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णांची संख्या आटोक्यात यावी याकरता अनेक हॉटस्पॉट बनलेले शहरातील परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून तेथे नागरिकांना रस्त्यांवर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात आज पुन्हा ७ जण पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २५ वर

जालना प्रतिनिधी । मालेगाव येथुन परतलेल्या व भोकरदन येथे संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या चार जवानांचा, शहरातील एका खासगी दवाखान्यातील 48 वर्षीय डॉक्टर, 28 वर्षीय प्रशासकीय अधिकारी तसेच मुंबई येथुन परतलेल्या व मंठा येथील कोव्हीड सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या 26 वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल दि. 15 मे रोजी पॉझिटीव्ह प्राप्त झाला असुन सर्वांना कोव्हीड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण 1691 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 33 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 863 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 15 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1366 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -07 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 25 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1322, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 257, एकुण प्रलंबित नमुने -15 तर एकुण 830 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या – 51, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 692 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-13, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -442, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-19, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -33, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -26, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 357 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.

आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 136 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 4 हजार 386 असे एकुण 4 हजार 522 नागरिक दाखल झाले असुन या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-4441, बिहार-3009, मध्यप्रदेश-1026, राजस्थान-658, पश्चिमबंगाल – 481, झारखंड-425, यासह उर्वरित 16 राज्यातील एकुण 11076 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 5704 अशा एकुण 16780 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार-128, आंध्रप्रदेश-103, ओरिसा-113,मध्यप्रदेश-739,छत्तीसगड-10, उत्तरप्रदेश-2707, झारखंड-28,राजस्थान-140, तेलंगणा-27, हैद्राबाद-05 अशा एकुण 4 हजार नागरिकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.

कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 442 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-07, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-6, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-00,पोलीस प्रशिक्षण केंद्र-107, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-03, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-4, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -84, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -36, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे – 41, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-45, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-60,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टे क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-03, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-12 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 578 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 103 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 583 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 83 हजार 200 असा एकुण 310008 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा; दिवसभरात ३० नवीन कोरोनाग्रस्त, एकूण संख्या पोहोचली ९०० वर

औरंगाबाद । राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकदाही झपाट्याने वाढताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण ३० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९०१ वर पोहोचली आहे.

औरंगाबाद शहरात आज 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 901 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1), शंभू नगर (7), सिटी चौक (1), कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 33 पुरुष आणि 26 महिला रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राहुल नगरातील 60 वर्षीय महिलेचा 15 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने आजपर्यंत 26 रुग्णांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झालेला आहे, असेही कळवण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुणेकरांची चिंता वाढली; एकाच दिवसात सापडले तब्ब्ल २०२ कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या ३२९५ वर

पुणे । राज्यात मुंबईनंतर पुणे शहरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात तब्बल २०२ नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने आता पुणेकरांची चिंता वाढली आहे. आज दिवसभरात शहरात एकूण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका ४६ वर्षीय तृतीयपंथीयाचा समावेश आहे. ताज्याकडेवारीनुसार, पुण्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३२९५ झाली आहे. तर मृतांची संख्या १८५ झाली आहे.

तसेच आह महाराष्ट्रात १ हजार ६०६ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या ३० हजार ७६ इतकी झाली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शनिवारी राज्यात ५२४ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ७ हजार ८८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सांगली जिल्हा पुन्हा रेड झोनमध्ये, आज पुन्हा पाच जण कोरोना पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असून शनिवारी एकाच दिवशी तब्बल पाच रुग्ण आढळले. सद्यस्थितीत केळ्यात एकूण १७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा पुन्हा रेड झोन’मध्ये गेला आहे. साळशिंगे येथे गुजरातमधील अहमदाबाद मधून आलेल्या कोरोनाबाधित महिलेचा आठ वर्षाचा पुतण्या आणि त्याच्या संपर्कात आलेले भिकवडी खुर्द मधील तब्बल तीन जणांना कोरोनाची लागण झाली. एकाच गावातील तिघांना कोरोना झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुपवाड मधील लक्ष्मीनगर येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अक्टीव्ह रुग्णांची 17 झाली.

सरकारने परराज्यातून येणाऱ्या लोकांना परवागनी दिली आहे, त्यामुळे बाहेर नोकरी, व्यवसायासाठी असलेले लोक जिल्ह्यात येत आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथून खानापूर आणि तासगाव तालुक्यातील सोळा प्रवासी आले आहेत. त्यामध्ये साळशिंगे येथे पती-पत्नी आली होती. त्या दोघांना गावामध्ये होम क्वॉरंटाईन करीत त्यांची विटा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली. तीस वर्षीय महिलांमध्ये कोरोना बाबतची काही लक्षणे ग्रामीण रुग्णालयात आढळली. त्यामुळे महिला आणि तिच्या पतीला मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. तेथे कोरोना तपासणीसाठी त्या दोघांचे स्वब घेतले होते. ती महिला पॉझिटिव्ह असल्याचे 10 मे रोजी स्पष्ट झाले. मात्र त्या महिलेचा पतीची चाचणी निगेटिव्ह आला होता. सात दिवसानंतर त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 15 जणांचे स्बॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी चौदा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र आठ वर्षीय पुतण्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली.

आठ वर्षीय मुलाच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील संपर्कातील तीन जणांचा कोरोनाचा अहवाल रात्री उशिरा आला असून तिघेही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. भिकवडी खुर्दमध्ये गुजरातमधून आलेला एक जण दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांना कडेगावमध्ये संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्याचे शुक्रवारी कोणाच्या तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते त्या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.गावातील चौघांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाल्याने संपूर्ण गाव केले होते. त्यानंतर पुन्हा एकाच घरातील दोघे कोरोनाबाधित असल्याने गावामध्ये भितीचे वातावरण पसरले होते. प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.