Thursday, December 25, 2025
Home Blog Page 5787

आत्मनिर्भरतेसाठी भारत ‘या’ ८ औद्योगिक क्षेत्रांत करणार मूलभूत बदलांची सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी मूलभूत बदल करण्याचा संकल्प आज केंद्र सरकारने बोलून दाखवला. उद्योगांसाठी ५००० एकर जमीन देण्यासोबतच विशेष पॅकेज देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी आज केली. यासाठी ८ क्षेत्रांमध्ये मूलभूत बदल करावे लागतील असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

१) कोळसा – कोळसा उत्पादन आणि पुरवठ्यामध्ये भारताला खूप काही करण्यासारखं असून कोळशाची आवश्यक तेवढीच आयात करावी हा विचार आता केला असल्याचं सीतारामन यांच्याकडून सांगण्यात आलं.

२) खनिज – कोळसा क्षेत्रातील क्षेत्रातील सरकारची मक्तेदारी आता संपुष्टात आली असून खनिज क्षेत्रातील मूलभूत बदलांसाठी ५०० मायनींग ब्लॉक उपलब्ध करुन देण्यासोबतच कोळसा आणि बॉक्साईटच्या स्वतंत्र लिलाव प्रक्रिया होणार असल्याचं यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

३) संरक्षण क्षेत्र – मेक इन इंडिया अंतर्गत बाहेरील देशांकडून होणारी संरक्षणात्मक सामग्रीची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढीला चालना द्यायचा निर्धार अर्थमंत्र्यांनी बोलून दाखवला. जी संरक्षण साधनं आपण आयात करायची नाहीत, त्याची एक यादीच बनवणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. याशिवाय संरक्षण क्षेत्रातील उत्पादनासाठी देशांतर्गत असणारी थेट परकीय गुंतवणूक ४९ टक्क्यांवरुन ७४ टक्क्यांवर नेण्यात येईल असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

४) हवाई उड्डाण सामग्री, विमानबांधणी उद्योग देशांतर्गत हवाई बंधनं शिथिल करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. देशातील कंपन्या तोट्यात येऊ नयेत यासाठी विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. या उद्योगातून वार्षिक १ हजार करोड रुपयांचा नफा होईल असं अर्थमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे ३ नवीन विमानतळांवर विमानांच्या दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च करण्यात येणार आहे.

५) MRO, टेरिफमधील सवलती – https://twitter.com/ANI/status/1261618989110718465?s=19

६) वीज उत्पादन आणि वितारणातील खाजगीकरण – https://twitter.com/ANI/status/1261620324212199425?s=19

७) अंतरिक्ष उद्योग – https://twitter.com/ANI/status/1261621753098366977?s=19

८) अणूऊर्जा उद्योग, एअरक्राफ्ट उद्योग https://twitter.com/ANI/status/1261623003235794945?s=19

आत्मनिर्भर म्हणजे भारताचं स्वतःचं सक्षमीकरण, दुसऱ्यांवर बहिष्कार नव्हे – निर्मला सीतारमन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आत्मनिर्भर भारताचा अर्थ इतरांना कमी लेखणे असा नसून स्वतःच अधिक सक्षम होण्याचा आहे. भारत स्वतःच्या कृतीने स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम होईल अशा अर्थाचा विचार नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचं २० लाख कोटी रुपयांच्या चौथ्या पत्रकार परिषदेतील विश्लेषणात निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचनात्मक बदलासाठी काही धोरणे आखली असून त्याचीच अंमलबजावणी करणे हे येत्या काळातील उद्दिष्ट असेल असं सीतारामन पुढे म्हणाल्या.

भारताला जागतिक आव्हानं पेलता येण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धेसाठी तयार राहणं गरजेचं असून या क्षेत्रातील सुधारणांसाठी भारतीयांनी सज्ज रहावं असं नरेंद्र मोदींनाही वाटत आहे. याद्वारे गुंतवणूक आणि रोजगार क्षेत्रातील काम करत असताना मूलभूत बदल करावे लागतील असंही सीतारामन पुढे म्हणाल्या.

भारत-नेपाळमध्ये लिपूलेख पासवरून तणाव, लष्करप्रमुखांचा चीनने फूस लावल्याचा केला इशारा

वृत्तसंस्था । भारताने नेपाळच्या सीमेलगत लिपूलेख पासपर्यंत रस्ता बांधला आहे. दरम्यान, भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या या मार्गावर आता नेपाळने आक्षेप घेतला आहे. ‘नेपाळने कुणाच्यातरी सांगण्यावरुन हा आक्षेप घेतलाय’ असे लष्करप्रमुख एम.एम.नरवणे शुक्रवारी म्हणाले. मनोहर पर्रिकर इन्स्टिटय़ूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनलिसिसने आयोजित केलेल्या वेब संवादामध्ये ते बोलत होते. यावेळी लिपूलेख पासच्या रस्त्यावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. त्यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.

नेपाळच्या या आक्षेपामागे चीन असल्याचे संकेत त्यांनी दिले. “नेपाळच्या राजदूताने काली नदीच्या पूर्वेकडचा भाग त्यांचा आहे असं म्हटलं आहे. खरंतर त्यामुळे वादाचा विषयच नाहीय कारण आपण रास्ता नदीच्या पश्चिमेकडे बांधला आहे. त्यामुळे ते आंदोलन कशासाठी करतायत ते समजत नाही आहे. यापूर्वी कधी यावरुन वाद झाले नाहीयत” असे नरवणे म्हणाले. मात्र, ‘नेपाळने कोणाच्यातरी सांगण्यावरुन आक्षेप घेतला असावा, ती शक्यता जास्त दिसतेय’ असे नरवणे यांनी म्हटलं.

राजनीतिक पाऊल उचलण्याचा नेपाळचा इशारा
लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळचे अविभाज्य अंग असून ते परत मिळवण्यासाठी राजनैतिक पावलं उचलू’ असा इशारा नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्या देवी भंडारी यांनी दिला आहे.संसदेत आपल्या सरकारची धोरण आणि कार्यक्रम मांडताना त्यांनी नवीन नकाशा जारी करुन लिपूलेख, कालापानी, लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये दाखवू असं विद्या देवी भंडारी यांनी म्हटलं आहे.

लिपूलेख पर्यंत जाणार हा रास्ता का आहे भारतासाठी महत्वाचा?
उत्तराखंडच्या घाटियाबागढ ते लिपूलेख असा हा ८० किलोमीटरचा मार्ग ८ मे रोजी सुरु झाला. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा मार्ग आहे. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे. मात्र याच रस्त्यावरून आता भारत आणि नेपाळमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पंतप्रधान जनधन योजनेचे अनेक फायदे; फ्रि मध्ये मिळतो इन्श्युरन्स मात्र करावे लागेल ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान जन धन योजना देशभरातील सर्व कुटुंबांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरू केली गेली आहे. ज्याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला बँकेत खाते उघडण्याची संधी देण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. मात्र, याची प्रत्यक्ष सुरूवात ही २८ ऑगस्ट २०१४ रोजी झाली होती. या योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडण्यापासून वंचित असलेल्या लाखो लोकांनी विविध बँकांमध्ये आपली खाती उघडली. या खातेदारांना आता त्याचा लाभही मिळत आहे. सरकारी योजनांमधील पैसा थेट त्यांच्या जनधन खात्यामध्ये जमा केला जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नुकत्याच राबविण्यात येत असलेल्या लॉकडाऊन दरम्यान, सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कोट्यावधी महिलांच्या खात्यात तीन महिन्यांकरिता ५००-५०० रुपये जमा करत आहे. याचा थेट फायदा गरिबांना होत आहे. याशिवाय जन धन खाते उघडणाऱ्यांना मोफत जीवन विमा आणि अपघात विमा संरक्षणही मिळणार आहे. परंतु यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. नाहीतर, आपल्याला याचा लाभ मिळणार नाही.

pradhan mantri jan dhan yojana know how you can transfer your old ...

जन धन खात्यास हे विमा संरक्षण मोफत मिळते
सर्व खातेधारकांना जन धन योजनेंतर्गत दोन लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण मिळते. रुपे डेबिट कार्डवरील या मोफत अपघाती विम्याची मर्यादासुद्धा दोन लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. यापूर्वी एक लाख रुपयांचा अपघाती विमा मिळण्याची सुविधा होती.

जनधन खात्यावर ३०,००० रुपयांचे जीवन विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. जीवन विमा खातेधारकाच्या मृत्यूच्या वेळी, विम्याचे पैसे हे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिले जातात. मात्र या विनामूल्य विमा संरक्षणासाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे

आपण पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत खाते उघडल्यास सुमारे ९० दिवसांपर्यंत या खात्यामधून व्यवहार करणे आवश्यक आहे. जन धन विमा नियमांनुसार, अपघात होण्यापूर्वी ९० दिवसांपूर्वी आपल्या खात्यातून काही व्यवहार होणे आवश्यक आहे. बँक खाते, एटीएम, ई-कॉमर्स किंवा पॉईंट ऑफ सेल इत्यांदीशी व्यवहार करणे आवश्यक आहेत.

Pradhan Mantri Jan Dhan Yojana helps raise women's ownership of ...

इतरही काही फायदे
रूपे डेबिट कार्ड सुविधाही मिळेल. हे जन धन खाते कोणत्याही बँकेत उघडता येते. यासाठी कोणतीही मिनिमम मंथली बॅलेन्सची आवश्यकता नाही. व्याज दर हा इतर बँकांमधील बचत खात्याच्या व्याज दराइतकाच आहे.

ओव्हरड्राफ्टचीही सुविधा
या जन धन योजनेंतर्गत आपल्याला ओव्हरड्राफ्टही मिळू शकतो. हे जन धन खाते उघडल्यानंतर ६ महिन्यांनी आपल्याला हा लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट मर्यादेची मर्यादा पूर्वी ५,००० रुपये निश्चित करण्यात आली होती. नंतर मात्र ती दहा हजार रुपये करण्यात आली. आता जनधन खातेधारक वयाच्या ६५ वर्षांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा घेऊ शकतात, पूर्वी ही वयोमर्यादा १८ ते ६० वर्षे होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना संकटात १६ मे ला अम्फान चक्रिवादळाचे संकट; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याने १६ मे रोजी संध्याकाळी नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीने म्हटले आहे की दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. त्यामुळे पुढील १२ तासांत ते ऍक्टिव्ह बनेल, म्हणूनच १६ मे रोजी संध्याकाळी ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. थायलंडने दिलेल्या या वादळाचे नाव अम्फान असे आहे.

किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळ येण्याची भीती
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, कमी दाबामुळे १८ मे रोजी ओडिशाच्या किनारपट्टी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९ मे आणि २० मे रोजी पश्चिम बंगालमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये मोसमी वारे आणि वातावरणीय परिस्थिती अनुकूल दिसत आहेत, त्यामुळे येत्या २४ तासांत १६ मेच्या संध्याकाळपर्यंत दक्षिण-मध्य आणि लगतच्या पश्चिम बंगाल उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार होईल.

महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी याबाबत माहिती दिली
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, जर हे वादळ विकसित झाले तर ते पहिले उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेने १७ मे रोजी जाईल आणि त्यानंतर ते उत्तर-पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, हे ‘चक्रीवादळ’ पावसाच्या प्रगतीस मदत करेल. हे अम्फान चक्रीवादळ या वर्षातळे पहिले ‘चक्रीवादळ ‘असेल.

 

आठ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आयएमडीने आठ राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला असून मच्छीमारांना बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेस तसेच समुद्राच्या दक्षिणेस जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्राच्या या भागांत मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनाही लगेच परतण्यास सांगण्यात आले आहे.

 

केरळमध्ये बर्‍याच ठिकाणी ‘यलो अलर्ट’ जारी केला
भारतीय हवामान खात्याने केरळ तसेच दिल्ली, एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, अशा अनेक ठिकाणी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, उत्तर ओडिशा, अंदमान आणि निकोबार, जम्मू-काश्मीर, लडाख, राजस्थान, आंध्र प्रदेश किनारपट्टी तसेच तमिळनाडू येथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १६ मे रोजी संध्याकाळी ५५ ते ६५ कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता सांगितली आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

युरोपातील ‘हा’ देश आता कोरोनामुक्त; जिंकली कोरोनाची लढाई

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. अशातच एक युरोपीय देश कोरोनामुक्त झाला आहे. युरोपातील एक देश कोरोनामुक्त झाला आहे. युरोपातील देश स्लोवेनिया सरकारने घोषणा केली आहे की, ‘देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला आहे. तसेच त्यांना विशिष्ट आरोग्यासंदर्भातील उपाययोजनांची आवश्यकता नाही.’ असं करणारा स्लोवेनिया युरोपातील पहिला देश आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन आठवड्यांमध्ये येथे दरदिवशी सातपेक्षा कमी नवीन रुग्ण समोर येत आहे. पंतप्रधान जनेज जनसा यांनी 14 मे रोजी संसदेत सांगितलं की, ‘स्लोवेनिया मागील दोन महिन्यांपासून महामारीचा सामना करत आहे. परंतु, आज स्लोवेनियाची स्थिती युरोपमध्ये सर्वात चांगली आहे.’

स्लोवेनिया देशातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १४ दिवसांपासून याठिकाणी ७ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळलेले नाहीत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे लक्षात येताच लादण्यात आलेले काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. शेजारील ऑस्ट्रिया, इटली आणि हंगरी येथून स्लोवेनियाला जाण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. स्लोवेनियाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता इतर युरोपीय संघाच्या इतर देशांतील लोकांना स्लोवेनिया येण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यांना ७ दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार नाही.पण जे नागरिक युरोपीय संघातील नाहीत त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येईल असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढे सरकारने सांगितले की, विदेशी नागरिक, ज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसतील, त्यांना आता देशात येण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

स्लोवेनियामध्ये 12 मार्च रोजी महामारी घोषित करण्यात आली आहे. येथे जवळपास 20 लाख लोक राहतात. इटली, ऑस्ट्रिया, हंगरी आणि क्रोएशिया शेजारील देशात आहेत. स्लोवेनियामध्ये आतापर्यंत 1464 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 103 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; भिडे गुरुजींच्या संदर्भामुळे खळबळ

ठाणे । राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सदर धमकीवजा संदेशामध्ये संभाजी भिडे गुरुजींचा संदर्भ असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी स्वतः याबाबत एक ट्विट रिट्विट करून माहिती दिली आहे. भिडे गुरुजी आणि मंडळी वाट बघत आहेत तुमची, बाहेर निघू नका घराच्या आता असे म्हणत शाश्वत फडणीस नावाच्या एका ट्विटर हँडल वरून आव्हाड यांना धमकीवजा सूचना केल्याचा स्क्रीनशॉट आव्हाड यांनी रिट्विट केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव आशिष मेटे यांनी याबाबत ट्विट केले आहे. हॅलो महाराष्ट्राने आव्हाड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता मागील काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांना अशा प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सांगण्यात आले. तसेच सध्या व्हायरल होत असलेल्या एक स्क्रीनशॉट मध्ये शाश्वत फडणीस नावाच्या एका ट्विटर हँडल वरून जितेंद्र आवाहाडांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलीस तक्रार करण्याची प्रक्रिया सुरु असून आव्हाड यांना भिडे गुरुजींच्या समर्थकांकडून भीती असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सदर ट्विट केलेल्या व्यक्तीने आपले अकाउंट आता बंद केले असल्याचे समजत आहे. मात्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून सदर ट्विटर हँडेलचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सदरील व्यक्तीस एखाद्या कटाची माहिती असू शकते तेव्हा त्याला अटक करून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पगार घेणार्‍या कर्मचार्‍यांनाही मिळणार TDS मध्ये २५ सूट? सरकार म्हणते..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या संकटाच्या काळात भारत सरकारने सर्वसमावेशक करात २५% कपात करण्याची घोषणा केली आहे. सॅलरी वाल्या लोकांना मात्र हा नियम लागू होणार नाही आहे. ही माहिती देताना वित्त सचिव अजय भूषण पांडे म्हणाले की, सरकारने वेतन विभागात टीडीएस कमी केलेला नाही आहे. जर असे केले गेले असेल तर वर्षाच्या अखेरीस (रिटर्न भरताना) सॅलरी वाल्याना अधिक कर आणि व्याज द्यावे लागेल.

टीडीएस कमी करण्याची आणि टीसीएएस दरावर २५% कपात करण्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सुधारित दराला अधिसूचित केले. हे दर १४ मे २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीसाठी लागू होतील. सीतारामण यांनी कंपन्या आणि करदात्यांना या देशव्यापी लॉकडाऊनमुळे झालेल्या परिणामातून दिलासा देताना सांगितले की टीडीएस / टीसीएस कमी केल्यास लोकांची सुमारे ५०,००० कोटी रुपयांची बचत होईल.

नॉन-सॅलरीड पेमेंटसाठीसुद्धा २५% कपात केली गेली आहे. एफडीचे व्याज आणि डेव्हिडंड पेमेंट हे नॉन-सॅलरीड पेमेंटमध्ये येते. अशा उत्पन्नामध्ये आपोआपच टीडीएस वजा केला जातो.

आता एफडीवर बँकेकडून मिळणाऱ्या व्याजावर १० % ऐवजी ७.५% टीडीएस वजा केला जाईल. त्याचप्रमाणे एका महिन्यात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त भाडे देणाऱ्या भाडेकरूंना ५ टक्क्यांऐवजी ३.७५ टक्के दराने टीडीएस भरावा लागणार आहे. जर एखादी व्यक्ती मर्यादेपेक्षा जास्त पैसे कमवत असेल तर त्यातून काही रकमेची कपात केली जाते. कर म्हणून वजा केलेल्या या रकमेला टीडीएस असे म्हणतात.

पेमेंट देण्याच्या वेळी, पेमेंट देणारा ते कापून घेतो. टीडीएस सहसा वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्त्रोतांवर वजा केला जातो. यामध्ये पगार, गुंतवणूकीवर मिळालेले व्याज, प्रोफेशनल फी, कमिशन, ब्रोकरेज इ.चा समावेश होतो .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुण्यात मे अखेरपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा सुमारे ५ हजारांपर्यंत जाईल- महापालिका आयुक्त

पुणे । पुणे शहर कोरोना विषाणूच्या विळख्यातून कधी मुक्त होईल असा प्रश्न पडत असताना शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. मागील १५ दिवसांत शहरात आढळणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ती मे अखेरपर्यंत ९ हजाराहून अधिक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सध्या कोरोनाबाधित आणि डिस्चार्ज रुग्णांची संख्या लक्षात घेता मे अखेरपर्यंत ही रुग्णसंख्या सुमारे ५ हजारांपर्यंत असेल, अशी शक्यता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.

महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात कालपर्यंत ३ हजार ९३ इतकी रुग्णसंख्या होती. यांपैकी १ हजार ६३० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या पुणे शहरातील अनेक रूग्णालयात ५० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे मे अखेरपर्यंत शहरात ५ हजार रुग्ण असतील अशी शक्यता आयुक्त शेखर गायकवाड व्यक्त केली.

दिलासादायक बाब म्हणजे, येणाऱ्या काही दिवसात शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या जरी वाढत राहिली तरी त्या प्रमाणात बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक राहणार आहे. ही बाब आपल्या सर्वांच्या दृष्टीने समाधानाची आहे. दरम्यान, कालपर्यंत जिल्ह्यात १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी आपल्या सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचेही आयुक्त गायकवाड यांनी नमूद केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाउन ४.० ची कधीही होऊ शकते घोषणा; गृहमंत्रालयाकडून जारी होईल नवी गाईडलाईन

नवी दिल्ली । देशातल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ तारखेला म्हणजे रविवारी संपत आहे. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह मंत्रालय त्याबाबत निर्देश जाहीर करणार आहे. मात्र, ही घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. चौथा लॉकडाऊन हा आत्तापर्यंत जाहीर झालेल्या तिनही लॉकडाऊनपेक्षा वेगळा असेल, याचे संकेत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दिले होते. त्यानुसार लॉकडाउन ४.० ची घोषणा कधीही होऊ जाऊ शकते. लॉकडाउनचा पुढील टप्पा ३१ मे पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या पुढच्या टप्प्यात बरीच सूट मिळण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिवसभर विविध बैठका घेतल्या. लॉकडाऊन ४.० संदर्भात या बैठका झाल्या. शुक्रवारी नॉर्थ ब्लॉकमध्ये अमित शाह तब्बल पाच तास उपस्थित होते. या सर्व बैठकांना त्यांच्यासह गृहसचिव अजय भल्लाही उपस्थित होते. त्यामुळं लॉकडाउन ४.० ची घोषणा कधीही होऊ शकते. दरम्यान, चौथ्या लॉकडाऊनमध्ये संपूर्णपणे नवे नियम असतील असं पंतप्रधानांनी नुकतंच जाहीर केले होते. याआधी लॉकडाउनचा पहिला टप्पा हा २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान जाहीर करण्यात आला होता. नंतर ही मुदत ३ मेपर्यंत वाढविण्यात आली. त्यातही वाढ करत लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे पर्यंत वाढविण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”