Friday, December 26, 2025
Home Blog Page 5786

जेवणासाठी घरी आमंत्रित केलेल्या सचिनचा डाएट पाहून अवाक झाला होता बांगलादेशचा ‘हा’ खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर मैदानात फलंदाजीसाठी यायचा तेव्हा लोक फक्त त्यालाच पहायचे. इतकेच नाही तर सचिन आउट झाला कि लोक स्टेडियम सोडून घरी परतायचे. सचिनची अशी क्रेझ केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातही दिसून आली. म्हणूनच आजही लोक त्याला क्रिकेटचा देव म्हणतात. असंच काहीसं एका बांगलादेशी क्रिकेटपटूंनेही केले आहे. ज्याचे छायाचित्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आणि अवघ्या काही वेळातच ते व्हायरलही झाले.

वास्तविक बांगलादेशचा खेळाडू असलेल्या मोहम्मद अश्रफूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटपटू होण्यापूर्वी बॉल बॉय म्हणून काम केले होते. सचिनला पहिल्यांदा त्याने बांगलादेशातील बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियमवर खेळताना पाहिले आणि त्यावेळी त्याच्याबरोबर फोटोही काढला. बऱ्याच वर्षानंतर अश्रफूलने तो फोटो तेंडुलकरला दाखवला तेव्हा तो फोटो पाहून मास्टर ब्लास्टर आश्चर्यचकित झाला. अश्रफूलने तो संपूर्ण किस्सा युट्यूब थेट व्हिडिओवर शेअर केला आहे .

बांगलादेशचा खेळाडू असलेल्या अश्रफूलने सचिनसह त्याच्या घरी पार्टीमध्ये हरभजन सिंग आणि तत्कालीन मुंबई इंडियन्सचे व्हिडिओ विश्लेषक यांनाही बोलावले होते. त्यावेळी सचिन अश्रफूलच्या घरी जसे जेवत होता ते पाहून या अश्रफूलला आश्चर्यच वाटले. त्याला असे वाटत होते की सचिन आपल्या वैयक्तिक आयुष्यात कमी खात असेल आणि तंदुरुस्तीवर अधिक भर देत असेल. मात्र अश्रफूल म्हणाला की त्याच्या आईने पुलाव, रोटी, भात, मासे, भाज्या, दही आणि मिठाई बनवले होते आणि सचिनने हे सर्व अगदी दाबून खाल्ले.

Ashraful surprised to see Sachin eating 'so much'

तो म्हणाला, ‘माझ्यावर विश्वास ठेवा की, माझ्या आईने जे जेवण बनवले होते, सचिनने सर्व काही खाल्ले. त्याने भरपूर दही आणि मिठाई देखील खाल्ली. तुम्ही इतके कसे खाऊ शकतो हे मी त्यांना विचारू शकलो नाही. ‘ अश्रफूलने सांगितले की एकदा सचिन स्वत:च म्हणाला होता, ‘मी बहुतेक वेळा कमीच खातो, मी बर्‍याच वेळा भाज्या खातो, परंतु जेव्हा कधी मला वाटते तेव्हा मी मनापासून जेवतो.’

अश्रफूलने बांगलादेशकडून एकूण १७७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्याच्या खात्यात ३४९८ धावा आणि १८ विकेटही जमा आहेत. अशरफुलने आतापर्यंत ६१ कसोटी सामने आणि २९ आंतरराष्ट्रीय टी -२० सामनेही खेळले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रोहित तुला साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली..मतदार संघावर लक्ष दे – निलेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. निलेश राणे यांनी शरद पवारांनी साखर उद्योगांबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्यावरून राणे यांनी ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार यांनी साहेबांनी कुकुटपालनाचीही मागणी केल्याचं ट्विट करत राणे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता निलेश राणे यांनी पुन्हा एक ट्विट करून रोहित तुला साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली..मतदार संघावर लक्ष दे असं म्हटलं आहे.

मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे असं म्हणत राणे यांनी पवार यांना चिमटा काढला आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी असं म्हणत राणे यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.

दरम्यान सर्वप्रथम, निलेश राणे यांनी साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर ऑडिट झालंच पाहिजे अशी मागणी केली होती. तसेच साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या साखर उद्योगाबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या पत्रावर टीका केली होती. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी राणे यांना जोरदार प्रत्युत्तर देत साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी. असे म्हटले होते.

‘माफ करा तुमची सायकल चोरतोय’; लॉकडाऊनमुळं चोरी करण्यास भाग पडलेल्या मजुराची चिट्ठी

राजस्थान, भरतपूर । लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांमध्ये उपासमारीमुळे देशाच्या शहरी भागांतील लाखो मजुरांनी ग्रामीण भागात स्थलांतर केले आहे. हातचा रोजगार गमावलेल्या स्थलांतरित मजुरांचे कळप शहरातून आपापल्या राज्यात जमेल त्या मार्गाने परत जाताना दिसत आहेत. वाहतुकीची साधन आणि खिशात पैसे नसल्यानं या मजुरांची पायपीट आणि त्यांच्यावर ओढावणाऱ्या दुर्दैवी प्रसंगांच्या अनेक करून कहाण्या सध्या ऐकायला मिळत आहेत. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात काम करणाऱ्या एका स्थलांतरित मजुराचा किस्साही असाच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील राराह गावात राहणाऱ्या साहेब सिंह यांची सायकल सोमवारी रात्री चोरीला गेली. दुसऱ्या दिवशी घराच्या व्हरांड्यात त्यांना एक चिठ्ठी सापडली.

मोहम्मद इक्बाल या स्थलांतरित मजुराने या चिठ्ठीत मी तुमची सायकल चोरली आहे, अशी कबुली दिली. मोहम्मद इक्बालला उत्तर प्रदेशमधील बरेली येथे जायचे होते. त्यासाठी त्याने सायकल चोरल्याचे सांगितले. यासाठी त्याने सायकलच्या मालकाची माफीही मागितली आहे. मोहम्मद इक्बाल याने पत्रात म्हटले आहे की, मी मजूर आहे, मजबूर आहे. मी तुमचा गुन्हेगार आहे. तुमची सायकल घेऊन जात आहे. मला माफ करा. मला बरेलीपर्यंत जायचे आहे. माझ्याकडे कोणतेही साधन नाही आणि माझा मुलगा अपंग आहे, असे मोहम्मद याने पत्रात लिहले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटकरी दुःख व्यक्त करत आहेत.

हीच ती चिठ्ठी-

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

विधानपरिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती, उलट मला नको, असं म्हणालो होतो- विनोद तावडे

मुंबई । विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली असली तरी उमेदवारीच्या मुदद्यावरून भाजपमध्ये सुरू झालेली धुसफूस कायम आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, राम शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. खडसे यांनी तर आपल्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे,पंकजा मुंडे या सर्वांची विधानपरिषदेसाठी नाव फायनल झाली असताना राज्यातील नैत्रुत्वाने केंद्रात कुरापती करून आमची टिकत कापली असल्याचा आरोप केला होता. खडसेंच्या या आरोपानंतर बावनकुळे यांनी फारकत घेत मी उमेदवारी मागितलीच नव्हती असं म्हणत आधी काढता पाय घेतला होता. तर आता त्यांच्यापाठोपाठ राजकीय वर्तुळातील चर्चेत उमेदवारीची इच्छा बाळगून असलेले विनोद तावडे यांनी आपण उमदेवारी मागितली नसल्याच सांगत पक्षाची नाराजी ओढवून न घेणंच पसंत केलं आहे. तावडे यांनी एका न्यूज वेबसाइटशी बोलताना त्यांची भूमिका मांडली.

‘विधानसभेसाठी मला तिकीट नाकारण्यात आलं होतं हे खरं आहे. पण विधान परिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती. उलट मला नको, असं मीच सांगितलं होतं. त्यामुळं माझ्या नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असा खुलासा भाजपचे नेते व माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी खडसे, मुंडे यांच्या नाराजीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. ‘एकनाथ खडसे यांना विधान परिषदेच्या तिकिटाची अपेक्षा होती. त्यामुळं त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. मात्र, तिकीट नाकारलं म्हणजे पक्षानं सर्वस्वी दूर केलं असं होत नाही. एकनाथ खडसे किंवा पंकजाताई यांच्या कामाबद्दल भाजपच्या नेतृत्वाला आदरच आहे. त्यांना आज ना उद्या संधी मिळेल,’ असं तावडे म्हणाले.

‘विधानसभेच्या असेल किंवा आता विधान परिषदेच्या उमदेवारीबद्दल जे काही निर्णय झाले, ते भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेले आहेत. खरंतर फडणवीस व चंद्रकांत पाटील हे आम्हाला तिकीट मिळावं म्हणून आग्रही होते. मात्र, केंद्रीय संसदीय मंडळानं वेगळा निर्णय घेतला. त्यामुळं त्या दोघांनी मिळून आमचं तिकीट कापलं असं वाटत नाही,’ असं तावडे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Tour of Duty च्या अंतर्गत सैन्यात तीन वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर आनंद महिंद्रा देणार नोकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की त्यांचा उद्योग समूह अशा तरुणांना नोकरी देण्याबाबत विचार करेल जे की भारतीय सैन्याच्या प्रस्तावित “टूर ऑफ ड्यूटी” कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांचा सैनिकी कार्यकाळ पूर्ण करून येतील. महिंद्रा यांनी भारतीय लष्कराला ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. ते म्हणाले,’मला नुकतेच कळाले आहे की भारतीय सैन्य ‘टूर ऑफ ड्यूटी’ या एका उत्तम ऑफरचा विचार करत आहे. याअंतर्गत तीन वर्षांसाठी भारतातील तरूण तसेच तंदुरुस्त नागरिकांना सैनिक आणि अधिकारी या नात्याने सैन्यात काम करण्याचा अनुभव घेता येईल. मला वाटते की हा ‘टूर ऑफ ड्यूटी’ कार्यक्रम ग्रेजुएट्ससाठी एक चांगला पर्याय ठरेल. खरं तर, भारतीय सैन्यात निवड आणि प्रशिक्षण या दोन्हीच्या कडक मानदंडांमुळे महिंद्रा ग्रुपला त्यांच्या उमेदवारीचा विचार करण्यास आनंदच होईल.

Mahindra Group to work on building solutions to aid migrant ...

लष्कराच्या मुख्यालयात या ‘टूर ऑफ ड्यूटी’च्या प्रस्तावावर चर्चा होत असून त्याअंतर्गत सामान्य नागरिकांना तीन वर्षांसाठी देशाची सेवा करण्याची परवानगी दिली जाईल. हा प्रस्ताव देशातील सर्वोत्तम प्रतिभा असलेल्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी म्हणून भारतीय सैन्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यासाठी सुरुवातीला चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर या चाचणीच्या आधारावर लष्कराच्या प्रस्तावात तीन वर्षांच्या मुदतीसाठी १०० अधिकारी आणि एक हजार कर्मचार्‍यांचा समावेश करण्याविषयी सुचविले गेले आहे. सध्या भारतीय सैन्यात सर्वात कमी कालावधी हा शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अंतर्गत १० वर्षांचा आहे.

तरुणांना अधिक आकर्षित करण्यासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा देखील बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराला अधिकाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे आणि लवकरात लवकर त्यांना यावर मात करायची आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशनने कमीतकमी सेवा कालावधी हा पाच वर्षांपासून सुरू केला, परंतु नंतर तो अधिक आकर्षक बनविण्यासाठी १० वर्षांपर्यंत वाढविण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनामध्ये महाबळेश्वर नगरपालीकेची डागडुजी सुरु

महाबळेश्वर प्रतिनीधी । जगभर कोव्हीड १९ यासंसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देशभर व राज्यभर लाॅकडाऊन सुरु आहे मात्र महाबळेश्वर नगरपालीकेला याच कोणतच गांभीर्य नसुन राजेरोसपणे कोटी रुपायाचा चुराडा करत महाबळेश्वर नगरपालीकेच डागडुजीच काम जोरात सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेकडून नगरपालीकेच्या कारभाराबाबात आश्चर्य व्यक्त होत आहे. महाबळेश्वर नगरपालीकेच डागडुजीच काम जुने असुन देखील कोरोनाच्या पाश्वभुमीकेवर जिल्हाअधिकार्याचा बांधकाम सुरु ठेवण्याच्या आदेश आहे की नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे.

गत काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर नगरपालीकेच्या सभागृहाचे पीओपी छत चालु सभेत पडल्यामुळे महाबळेश्वर नगरपालीकेकडुन अंदाजे 1.75 कोटी रुपायाचे अंदाजपत्रक तयार करुन टप्याटप्यामध्ये कामाला शुभारंभ करण्यात आला. मात्र भारतभर लाॅकडाऊन व राज्यभर गत पन्नास दिवसापासुन कोरोना विरोधात लढाई सुरु झाली असताना सर्व प्रशासन कोरोना विरोधात लढाई करत असताना महाबळेश्वर नगरपालीकेकडुन कोरोना लढाईत देखील इमारतींचे बाधकाम सुरु ठेवल्याने सर्वसामान्यानमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या लढाईत राज्य लढत असताना फक्त शासकीय कामांना शासनाने परवानगी दिली असताना . महाबळेश्वर नगरपालीकेच कोटी रुपायाचा डागडुजी इतकी महत्वाची आहे का ? असा खरमरीत प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे . कोरोना विरोधात लढताना प्रशासन रुग्ना साठी हाॅस्पिटल , व्हेन्टीलेटर , रुग्नानकरीता बेडची सोय करत आहे . मात्र महाबळेश्वर नगरपालीकेला याच कोणतच गांभीर्य नाही .

नाहीतर..सचिन डबल सेंचुरी करूच नसता शकला; डेल स्टेनचा ग्वालियर वन-डेबाबत अजब खुलासा

वृत्तसंस्था । ग्वालियरच्या मैदानात २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यात सचिन तेंडुलकरने डबल सेंचुरी मारत एक पराक्रम केला होता. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात डबल सेंचुरी करणार सचिन हा पहिला खेळाडू ठरला होता. वन-डेमध्ये डबल सेंचुरी करणं तोपर्यन्त अशक्य असंच मानलं जात होत. पण मास्टर ब्लास्टर सचिननं डबल सेंचुरी पूर्ण करताना आफ्रिकन गोलंदजांची अक्षरशः धुलाई केली होती. सचिनची ती इनिंग कोणाही भारतीय किंवा जगातील कुठलाही क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. मात्र, सचिनच्या याच खेळीवर त्या सामन्यात सचिनकडून सपाटून मार झालेल्या आफ्रिकी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने एक अजब दावा केला आहे. डेल स्टेनने केलेल्या दाव्यानुसार या सामन्यात स्टेनने सचिननला द्विशतकाआधी काही धावा असताना बाद केलं होता, मात्र पंच इयन गुल्ड यांनी सचिनला नॉटआऊट घोषित करत जीवदान दिलं.

डेल स्टेन Sky Sports वाहिनीच्या पॉडकास्टमध्ये या सामन्याविषयी बोलताना तो म्हणाला, “ग्वालियारच्या सामन्यात सचिनने आमच्याविरुद्ध पहिल्यांदा वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं. या सामन्यात मला आठवतंय सचिन १९०+ वर खेळत असताना मी त्याला पायचीत पकडलं होतं. मी सचिनविरोधात जोरदार अपीलही केलं, पण पंच इयन गुल्ड यांनी माझं अपील फेटाळून लावलं.

तो पुढे म्हणाला, ” सचिनला नॉटआऊट दिल्यानंतर मी गुल्ड, यांना तूम्ही आऊट का दिलं नाहीत असं विचारलं…त्यावेळी गुल्ड यांच्या चेहऱ्यावर….मित्रा आजुबाजूला बघ, आता मी सचिनला आऊट दिलं तर मी हॉटेलवर पोहचू शकणार नाही असे भाव होते.” सचिनच्या द्विशतकी खेळाच्या जोरावर भारताने या सामन्यात ३ गड्यांच्या मोबदल्यात ४०१ धावांचा पल्ला गाठला होता. दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पेलवलं नाही, १५३ धावांनी भारतीय संघाने या सामन्यात विजय मिळवला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

वेश्याव्यवसाय बंद ठेवले तर भारतात कोरोनाचा प्रसार रोखता येईल – रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी भारत सरकारला रेड लाईट परिसर बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जर लस तयार होईपर्यंत भारताने आपली रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवली तर कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकेल तसेच नवीन संसर्गाची संख्या ही ७२ टक्क्यांनी कमी होऊ शकेल. .

येल स्कूल ऑफ मेडिसिनसह अमेरिकेच्या संशोधकांच्या पथकाने असे म्हटले आहे की लॉकडाउनमध्ये देण्यात आलेल्या सूट नंतर ही रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवल्यास भारत कोविड -१९ ने होणाऱ्या संभाव्य मृत्यूंचे प्रमाण हे ६३ टक्क्यांनी कमी करू शकेल. जोपर्यंत कोरोनावरची लस तयार होत नाही किंवा त्याचावरील प्रभावी उपचार समोर येत नाही तोपर्यंत ही रेड लाइट क्षेत्रे बंद राहिल्यास भारतात नवीन संक्रमणाचा धोका कमी होईल. त्यामुळे त्यांनी ही रेड लाईट क्षेत्रे बराच काळ बंद ठेवण्याची शिफारस केली आहे.

या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे पाऊल उचलण्यामुळे भारतात ४५ दिवसांतच ७२ टक्के संसर्गाची प्रकरणे कमी होतील. भारत सध्या लॉकडाऊन ४.० च्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि यामुळे भारत सरकारला सार्वजनिक आरोग्य तसेच अर्थव्यवस्थेचे नियोजन व अंमलबजावणी करण्यास अधिक वेळ मिळेल. या अहवालानुसार, लॉकडाऊन संपल्यानंतरच्या पहिल्या ६० दिवसांत होणाऱ्या मृत्यूची संख्या ६३ टक्क्यांनी कमी होईल.

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) नुसार भारतात या व्यवसायात सुमारे ६३७५०० महिला असून रोज सुमारे ५ लाख ग्राहक या रेड लाईट भागात येतात. कोविड -१९ चा संसर्ग या रेड लाईट भागात झपाट्याने पसरेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या व्यवसायात सोशल डिस्टंसिंग पाळले जाऊ शकत नाही, यामुळे संसर्ग वेगाने पसरण्याचा धोका असेल. हे संक्रमित ग्राहक देशातील इतर कोट्यावधी लोकांना देखील संक्रमित करु शकतात. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतरही ही क्षेत्रे बंद न केल्यास, ते कोरोना संसर्गाचे मोठ्या प्रमाणात हॉट स्पॉट बनतील. जर रेड लाईट क्षेत्रे बंद ठेवली तर कोविड -१९ ची प्रकरणे वाढण्यास अटकाव होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

परभणी जिल्ह्यात कोरोनानंतर सारीचे नवे संकट; पन्नास वर्षीय मजुराचा मृत्यू

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पाठोपाठ आता नवीन संकट उभे राहिले असून शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालेला मजुर व्यक्ती आज सकाळी सारी रोगाने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

गंगाखेड परभणी रस्त्याचे काम करणारा एक पन्नास वर्षीय मजूर व्यक्ती ताप येत असल्याचे लक्षण असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील असोलेशन वार्ड मध्ये उपचार घेत होता .उपचारा दरम्यान आज सकाळी आठ वाजता त्याचा मृत्यू झालाय. सदर व्यक्तीचा मृत्यू सारी रोगाचा जिल्ह्यातील पहिला बळी असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सदर घटनेमुळे जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. गंगाखेड तालुक्यातील महातपुरी फाट्यावर हा व्यक्ती वास्तव्यास असल्याचे माहिती मिळत आहे. त्याच्यासोबत इतरही सात जण काम करत होते ,अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे त्या सातही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. संपर्कातील आणखी १३ व्यक्तींना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून
सांगण्यात आले आहे.

कोरोनामुळे बळी गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना मिळणार नोकरी

मुंबई । मुंबईतील बेस्ट परिवहन प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्टकडून नोकरी देण्यात येणार आहे. बेस्टमध्ये कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असूनही बेस्ट कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा किंवा मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत किंवा विमा दिला जात नाही. यासाठी बेस्ट संयुक्त कृती समितीनं सोमवारपासून बेस्ट कामगारांना कामावर न येण्याचे आवाहन केले होते. कृती समितीच्या या इशाऱ्यानंतर बेस्ट प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत हा निर्णय घेतला आहे.

बेस्ट कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांची सेवा करत आहेत. यामध्ये अनेक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काहींचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकून मृत पावलेल्या बेस्ट कर्मचा-यांच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्या सेवेत रुजू करून घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत ४ मृत बेस्ट कर्मचा-यांच्या नातेवाईकांस नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. आतापर्यंत कोरोनामुळं ७ बेस्ट कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”