Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 5806

राज्यात ‘या’ तारखेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी

मुंबई । राज्यात दारुविक्री सुरु असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये १४ मेपासून दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईसह दारुविक्री बंद असलेल्या ठिकाणीदारूची होम डिलिव्हरी मिळणार नाही. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यात दारुविक्री सुरु आहे तिथे रांगेत उभे राहण्यासोबत दारू घरपोचही केली जाईल.

दारूची होम डिलिव्हरी कशी करायची याचे नियोजन वाईन शॉप्सनी करायचे आहे. ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल. तसेच दारु घरपोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैदयकीय चाचणी करून त्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क आणि गॉगल वापरणे बंधनकारक असेल.जे दुकानमालक उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधतील, त्यांनाच परवानगी दिली जाईल. तसंच संबंधित डिलिव्हरी बॉयला विभागाकडून ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यालाच दारूची वाहतूक करता येणार आहे.

यापूर्वी राज्य सरकारने रेड झोनमधील दारुची दुकानेही उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, मुंबई आमि पुण्यासारख्या शहरांमध्ये दारु खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. यावेळी तळीरामांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले होते. त्यामुळे सरकारने रेड झोनमध्ये अवघ्या काही तासांत पुन्हा कडक निर्बंध लादले गेले होते.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

..म्हणून ऐनवेळी भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी चौथा उमेदवार बदलला

मुंबई । पक्षात नव्यानं सामील झालेल्यांना विधानपरिषद निवडणुकीची उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर होता. ही नाराजी काही प्रमाणात दूर करण्यासाठी भाजपने मागील आठवड्यात अर्ज दाखल केलेले डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन काल अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांचा अर्ज कायम ठेवला आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी ऐनवेळी चौथा उमेदवार बदलल्यानं रमेश कराड आता भाजपचे चौथे उमेदवार असतील. रमेश कराड हे लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (11 मे) शेवटचा दिवस होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबतच भाजपकडून रमेश कराड यांनीही उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. रमेश कराड यांनी अचानक मुंबईत येऊन अर्ज भरल्याने त्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार की डमी म्हणून वापर होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु भाजपने अचानक डॉ. अजित गोपछडे यांच्याऐवजी रमेश कराड यांना आपला अधिकृत उमेदवार केलं.

मागील आठवड्यामध्ये भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे या चार उमेदवारांची विधानपरिषद निवडणुकीसाठी नावे जाहीर केली होती. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे हे चार अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्ट झाले होते. मात्र काल अचानक भाजपकडून रमेश कराड आणि संदीप लेले यांचे अर्ज दाखल करण्यात आले. याआधी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांपैकी एखादा अर्ज बाद झाला तर अडचण नको त्यामुळे म्हणून खबरदारी म्हणून काल दोन अर्ज भरण्यात आले होते. लेले आणि कराड यांचे अर्ज डमी असतील, आणि या दोघांचे अर्ज मागे घेतले जातील अशी काल चर्चा होती.

मात्र आज अर्ज छाननीनंतर भाजपने रमेश कराड यांच्याऐवजी दोन अर्ज डमी असत डॉ. अजित गोपछडे आणि संदीप लेले यांचा अर्ज मागे घेऊन धक्कातंत्राचा अवलंब केला. या धक्कातंत्रा मागेही काही कारणं दडलेली आहेत. एकतर नुकतेच पक्षात आलेले रणजितसिंह मोहिते पाटील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात भुमिका घेणारे गोपीचंद पडाळकर यांना उमेदवारी देताना पक्षातील इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांना डावललं होतं. पंकजा मुंडे यांना डावलल्याने त्या स्वत: नाराज होत्याच. मात्र वंजारी समाजही भाजपवर प्रचंड नाराज होता. वंजारी समाजाची नाराजी दूर करण्यासाठीच पक्षाने वंजारी समाजाचे रमेश कराड यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

कोण आहेत रमेश कराड?
रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत.
रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.
लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला.

...आणि असे झाले रमेश कराड विधान परिषदेचे आमदार

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लाॅकडाऊनमध्ये तुम्हीपण घेऊ शकता मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा; मिळेल ३.७५ लाखांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनने ग्रस्त झाल्यानंतर आपापल्या गावात पोहोचलेल्या बर्‍याच तरुणांना यापुढे शहरात यायचे नाहीये आणि म्हणूनच ते खेड्यांमध्येच आपल्यासाठी योग्य असा रोजगार शोधत आहेत. अशाच तरूणांसाठी मोदी सरकारची सेल्फ हेल्थ कार्ड बनवण्याच्या योजनेचा उपयोग झाला आहे. या योजनेद्वारे गाव पातळीवर एक मिनी सेल्फ टेस्टिंग लॅब स्थापित करुनही उत्पन्न मिळू शकते. यामुळे भारतातील अनेक ग्रामीण तरुणांना रोजगार मिळू शकेल. ही लॅब तयार करण्यासाठी ५ लाख रुपये खर्च येतो, म्हणजे सरकार यातील ७५ टक्के रक्कम देते ती म्हणजे ३.७५ लाख रुपये.

सध्या देशात असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या तुलनेत अशा लॅब फारच कमी आहेत. त्यामुळे यामध्ये रोजगाराची मोठी संधी उपलब्ध आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या या योजनेंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील ग्रामीण तरुण यासाठी पात्र आहेत. हेच अ‍ॅग्री क्लिनिक, तसेच अ‍ॅग्रीकल्चरल एंटरप्रेन्योर ट्रेनिंग विथ मॅट्रिक विथ सायन्स यामध्ये द्वितीय श्रेणीने पास झालेले तरुण यासाठी अर्ज करू शकतात.

Soil Health Card helps in Increasing Productivity - SmartAgriPost ...

या योजनेंतर्गत प्रत्येक २ वर्षानंतर राज्य सरकारकडून मातीची स्थिती नियमितपणे मोजली जाते जेणेकरून त्यास शेतातील पौष्टिकतेची कमतरता ओळखता येतील आणि त्यामध्ये सुधारणा करता येईल. मातीचे सॅम्पलिंग, चाचणी आणि सॉईल हेल्थ कार्ड देण्यासाठी सरकारकडून ३०० प्रति नमुना देण्यात येत आहे. माती तपासणीअभावी किती प्रमाणात खत घालावे हे शेतकर्‍यांना माहिती नसते. यामुळे खत अधिक होते आणि उत्पादनही चांगले होत नाही
.

आपल्याला कोठे संपर्क साधावा लागेल
जिल्हा, कृषी उपसंचालक, सहसंचालक किंवा त्यांच्या कार्यालयात तरुण, शेतकरी किंवा लॅब बनविण्यास इच्छुक असलेल्या इतर संस्था इथे आपला प्रस्ताव देऊ शकता. यासाठीची माहिती तुम्हाला agricoop.nic.in या वेबसाइटवर किंवा soilhealth.dac.gov.in इथे मिळू शकेल. तसेच किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर संपर्क साधूनही अधिकची माहिती मिळू शकते.

सरकार जे पैसे देईल त्यापैकी अडीच लाख रुपये हे प्रयोगशाळा चालविण्यासाठी टेस्टिंग मशीन, रसायने व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केले जातील. तर संगणक, प्रिंटर, स्कॅनर, जीपीएस खरेदीवर उर्वरित एक लाख रुपये खर्च केले जातील.

pib] Soil Health Cards (SHC) for optimal utilization of ...

प्रयोगशाळांना मोठी मागणी आहे
देशात ७९४९ लहान-मोठ्या लॅब आहेत, जे शेतकरी आणि शेतीनुसार अपुरी असल्याचे म्हणता येईल. सरकारने आणखी १०,८४५ प्रयोगशाळांना मान्यता दिली आहे. राष्ट्रीय शेतकरी महासंघाचे संस्थापक सदस्य विनोद आनंद म्हणतात की, देशभरात १.४५ कोटी शेतकरी कुटुंबे आहेत. अशा परिस्थितीत,इतक्या कमी लॅब काम करू शकणार नाहीत. भारतात जवळपास ६.५ लाख गावे आहेत. अशा परिस्थितीत सध्याची संख्या पाहिल्यास ८२ गावामागे एक प्रयोगशाळा आहे. म्हणून या वेळी किमान २ लाख लॅबची गरज आहे. या लॅब कमी असल्यामुळे येथे मातीची तपासणी योग्य प्रकारे केली जात नाही.

लॅब दोन प्रकारे सुरू होऊ शकते
लोक जसे स्वतःच्या शरीराची तपासणी करतात तशीच आपल्या शेतातील मातीचीही चाचपणी व्हावी यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे शेतातील मातीची सुपीकता खराब होणार नाही. सॉईल टेस्टिंग लॅब या दोन प्रकारे सुरू केल्या जाऊ शकतात. पहिल्या पद्धतीमध्ये दुकान भाड्याने देऊन लॅब उघडता येते. याशिवाय इतरही काही लॅब आहेत ज्या हलविल्या जाऊ शकतात. त्याला मोबाईल टेस्टिंग लॅब असे म्हणतात.

Soil Health Card scheme Current Affairs Insight

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

SBI ने ग्राहकांनी दिली फ्राॅड बाबत वाॅर्निंग; पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सांगितल्या ‘या’ टिप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या साथीच्या काळात, ऑनलाइन फसवणूक, एटीएम आणि बँकिंग घोटाळ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडेच एटीएम क्लोनिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. हे लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना चेतावणी देत एटीएम कार्डधारकांना क्लोनिंग फ्रॉड्स पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयने एटीएममधून पैसे काढताना क्लोनिंग फ्रॉड ची माहिती कशी द्यावी आणि ते कसे टाळावे तसेच त्याचा रिपोर्ट कसा द्यावा हे सांगितले आहे.

एटीएम कार्ड क्लोनिंग अशा प्रकारे होते
पूर्वी सामान्य कॉलद्वारे फसवणूक केली जात होती, परंतु आता डेटा चोरी करून खात्यातून पैसे काढले जात आहे. आता हे चोर हाय-टेक होऊन त्यांनी कार्ड्सचे क्लोनिंग करणे सुरू केले आहे. अशावेळी एटीएम कार्ड लोकांच्या खिशातच असते आणि हे चोर मात्र खात्यातून एटीएम कार्ड द्वारे पैसे काधून पसार होतात. क्लोनिंगद्वारे आपल्या एटीएम कार्डची संपूर्ण माहिती चोरली जाते आणि त्याचे डुप्लिकेट कार्ड बनविले जाते. म्हणून एटीएम वापरताना दुसर्‍या हाताने लपवून पिन घाला.

 

फसवणूकीबद्दल तक्रार कशी करावी
फसवणूकी नंतरच्या ३ वर्किंग दिवसात आपण रिफंड क्लेम करु शकता. फ्रॉड रिपोर्ट देण्यासाठी आपण Problem असे टाईप करून ९२१२५००८८८ वर पाठवू शकता. याशिवाय आपण कस्टमर केअरवर कॉल करून किंवा @SBICard_Connect हँडलवर ट्विटरवर जाऊनही आपली तक्रार दाखल करू शकता.

बँकेचा दोष असल्यासच पूर्ण रिफंड
एसबीआयच्या चुकांमुळे जर फसवणूक झाली असेल आणि त्याची बँकेकडे नोंद झाली नसेल तरच बँक संपूर्ण रक्कम परत करेल. ग्राहकाचे दुर्लक्षामुळे झालेल्या चुकीचा रिफंड मिळणार नाही.

Madam, don't send us to insolvency court, firms tell SBI - The ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

एकेकाळी फडणवीसांची शिफारस मीच केली होती, त्याचीच आज शिक्षा भोगतोय- एकनाथ खडसे

जळगाव । भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या राज्यातील पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशा वेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस मीच केली होती त्याचीच आज शिक्षा मी भोगतोय, अशी खदखद प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. भूतकाळात विधानसभेचा विरोधी पक्षनेता असताना मीच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस केली होती. आपल्या नावाची शिफारस करावी म्हणून फडणवीस महिनाभर माझ्या बंगल्यावर चकरा मारत होते. त्या माझ्या शिफारशीची शिक्षा आज मी भोगतोय, अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली.

आम्हाला डावलून इतर निष्ठावंतांना तिकीट दिलं असतं तर समजू शकलो असतो, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांसाठी ज्या मेघा कुलकर्णींनी आमदारकीची सीट सोडली. त्यांना तरी विधानपरिषदेचं तिकीट द्यायला हवं होतं ना? असा सवाल करत हा सर्व प्रकार पक्षश्रेष्ठींना सांगणार आहे असं खडसे म्हणाले. त्यांच्याकडून समाधान नाही झालं तर पुढचा निर्णय घेईल. पण पक्षश्रेष्ठींच्या कानावर ही बाब टाकल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. माझा पत्ता कट होण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा काहीही संबंध नाही. राज्यातील नेत्यांनीच पत्ता कट केला आहे. राज्यातील नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाकडे माझ्याविरोधात विषपेरणी केली आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण संपर्क होत नाही. माझा काय दोष आहे? मी काय चूक केली? असं मला फडणवीसांना विचारायचं आहे. माझी जर काही चूक असेल तर माफी मागायलाही तयार आहे, असंही ते म्हणाले.

हे सर्व पूर्वनियोजित होतं
याचबरोबर संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या तिघांचीही नावे फायनल झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात इतरांचीच नावं जाहीर करण्यात आली. ज्यांची नावं जाहीर केली, ते मुंबईत फॉर्म भरण्यासाठी आले कसे? हे सर्व पूर्वनियोजित होतं. आम्हाला केवळ मूर्ख बनवण्यात आलं, असा संताप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.

काँग्रेसची ऑफर
विधान परिषदेसाठी मला काँग्रेसने ऑफर दिली होती असा . माझ्यासाठी भाजपमधील ७-८ आमदार क्रॉस व्होटिंगही करायला तयार होते. पण वेळ फार कमी होता. त्यामुळे मी काँग्रेसला नकार दिला, असं सांगतानाच करोनाचं संकट टळल्यानंतर माझ्या १७-१८ समर्थक आमदारांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

SBI च्या ग्राहकांना झटका; आजपासून घटले FD चे व्याजदर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या मुदत ठेवी (एफडी) चे व्याज दर कमी केले आहेत. एसबीआयने ३ वर्षांच्या कालावधीतील एफडी वर ०.२० टक्के व्याज दर कमी केलेले आहेत. आजपासूनच नवीन दर लागू झाले आहेत. तथापि, बँकेने एफडी व्याज दर ३ वर्षे ते १० वर्षे असलेल्या एफडीचे व्याजदर बदललेले नाहीत. बँकेने नुकतेच एक निवेदन जारी केले त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की’ सिस्टम आणि बँकेची तरलता लक्षात घेऊन आम्ही ३ वर्षांच्या कालावधीसाठी रिटेल टर्म डिपॉजिट्स रेट च्या दरात कपात करीत आहोत.

एसबीआय एफडी दरांचे नवीन दर
१२ मेपासून एबीआयच्या निश्चित ठेवीवरील नवीन व्याजदर असे असतील,७ ते ४५ दिवसांनी मिळणारे एफडी व्याज हे ३.३ टक्के असेल. त्याचबरोबर ४६ ते १७९ दिवसांच्या एफडीवर ४.३ टक्के आणि १८० ते २१० दिवसांच्या एफडीवर ४.८ टक्के व्याज दर असेल. याशिवाय २११ दिवस ते १ वर्षाच्या कालावधीपर्यंत एफडीवर ८.८ टक्के , १ ते २ वर्षासाठी ५.५ टक्के आणि २ ते ५ वर्षांसाठी ५.५ टक्के उपलब्ध असतील. तथापि,३ वर्ष ते १० वर्षांसाथीचा एफडी व्याजदर ५.७ टक्के राहील.

ज्येष्ठ नागरिकांचे एसबीआय एफडी दर-

>> ७ ते ४५ दिवस – ३.८%

>> ४६ ते १७९ दिवस – ४.८%

>> १८० ते २१० दिवस – ५.३%

>> २११ दिवस ते १ वर्षापर्यंत – ५.३%

>> १ ते २ वर्षे – ६%

>> २ ते ३ वर्षे – ६%

>> ३ ते ५ वर्षे – ६.२%

>> ५ ते १० वर्षे – ६.५%

 

SBI Wecare Deposit योजना-
यासह एसबीआयने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘SBI Wecare Deposit’ योजना आणली आहे. त्याअंतर्गत जर एखादा ज्येष्ठ नागरिक एसबीआयमध्ये फिक्स्ड डिपॉजिट ठेवत असेल तर त्यांना ०.३० टक्के जादा व्याज दिले जाईल. तथापि, बँकेने यासाठी काही अटीदेखील ठेवल्या आहेत.

‘SBI Wecare Deposit’वर जास्त व्याजाचा लाभ फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच देण्यात येईल, ज्यांनी बँकेत एफडी केली आहे ते ५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असेल. त्याच वेळी, यासाठीची दुसरी अट अशी आहे की याचा फायदा घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पूर्वी बँकेत एफडी करावी लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सिक्कीम हा भारताचा भाग नाही असे म्हणणार्‍या चीनी मेजरला भारतीय लष्कराच्या तरुण लेफ्टनंटनं एका बुक्कीत पाडलं जमिनीवर !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर सिक्कीममधील नकुला येथील मोगुथांग येथे भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यात नुकतीच एक चकमक झाली. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये एकच हाणामारी झाली. ‘द क्विंट’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या वेळी भारतीय सैन्य दलाच्या एका तरूण लेफ्टनंटने चीनच्या पीपल्स लिबरेशन ऑफ आर्मी (पीएलए) च्या मेजरला इतक्या जोराने ठोसा लगावला की त्याच्या नाकातून रक्तच येऊ लागले.

‘हे सिक्कीम तुमचे नाही’
हा तरुण अधिकारी भारतीय सैन्याच्या इन्फंट्री युनिटमध्ये तैनात आहे. या लेफ्टनंटने गेल्याच आठवड्यात चीनी सैन्याला मुगुथांगमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावर चिनी सैन्यप्रमुख या लेफ्टनंटवर ओरडले की, “ही सिक्कीम तुमची भूमी नाहीये, ती भारताची सीमा नाहीये.ताबडतोब परत जा.’ यावर त्या तरुण लेफ्टनंटला राग अनावर झाला. तो त्या चिनी मेजरवर पुन्हा ओरडला आणि तो म्हणाला, ‘काय ?सिक्कीम आमची सीमा नाही ? आपण काय बडबड करत आहात? यावर, पीएलएचा मेजर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याजवळ गेला, जो एक कॅप्टन होता. दरम्यान, हा लेफ्टनंट चिनी मेजरच्या जवळ आला आणि त्याने त्याला एक जोरदार ठोसा मारला.

पंच खाऊन जमिनीवर पडला चिनी मेजर
या भारतीय लेफ्टनंटच्या एका ठोस्यातच तो चिनी मेजर खाली पडला. ज्याच्यावर नाव लिहिले होते तो त्याचा बॅजसुद्धा बाजूला पडला. नंतर या लेफ्टनंटच्या उर्वरित लेफ्टनंटनी त्यांना मागे खेचले. वेबसाइटनुसार, या भारतीय लेफ्टनंटचे संपूर्ण कुटुंब हे भारतीय सैन्यात सेवा बजावत आहेत. त्याचे आजोबा रॉयल व त्यानंतर भारतीय वायुसेनेचे एजंट आहेत, तर त्याचे वडील सध्या भारतीय सैन्य दलात कर्नल आहेत. जर स्त्रोतांचा विश्वास धरला तर या लेफ्टनंटच्या शौर्यामुळे भारतीय सैन्य भलतेच प्रभावित झाले आहे परंतु या तरूण अधिकाऱ्यावर मोठी भांडणे करण्यासाठी उकसवल्या प्रकऱणी दोषी धरण्यात आले आहे. भारतीय सेना प्रमुख जनरल एमएम नरवणे यांनीही या आपल्या लेफ्टनंटला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लेफ्टनंटला त्याच्या कृत्याबद्दल दु: ख झालेले नाही
सोबत असलेले सीनियर ऑफिसर या भांडणात लेफ्टनंटला दोषी असल्याचे सांगत असतानाच वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर मात्र या लेफ्टनंटच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आहेत. त्याचबरोबर कोलकाता आणि सुकाना येथील हेडक्‍वार्टरमध्ये या लेफ्टनंटला सन्मानित करण्याची तयारीही सुरू केली आहे. खराब हवामानामुळे सीनियर कमांडर्स सध्या मुगुथांगला पोहोचू शकत नाहीयेत. दुसरीकडे, लेफ्टनंटला लेफ्टनंटला त्याच्या या कृत्याबद्दल कसलेही दु: ख झालेले नाही आहे. तथापि, तो थोडा निराश जरूर झाला आहे कारण त्याला आता या फ्रंट लोकेशन वरून हटवण्यात आले आहे.

सहकारी जवान बोलत आहे – चांगलाच धडा शिकवला
या लेफ्टनंटचे मात्र त्याचे सहकारी जवान कौतुक करीत आहेत आणि त्यांनी ‘चिनीना योग्य धडा शिकवला’ असं म्हणत त्याचा आनंद व्यक्त केला आहे. एका सीनियर ऑफिसर नुसार हा लेफ्टनंट त्याच्या सैन्यासाठी एखाद्या हिरोपेक्षा कमी नाहीये. ते म्हणतात की तरुण अधिकारी अंगाने खूप बारीक पण अतिशय तापट आहेत. भारतीय सैन्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी चिनी सैनिकांशी झालेल्या हाणामारीची पुष्टी केली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

तब्बल ५० दिवसानंतर मारुती सुझुकी तयार करणार पहिली गाडी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रातील उत्पादन बंद होते. यात चार चाकी गाड्यांचा देखील समावेश होता. आता मारूतीने ५० दिवसानंतर पहिली गाडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या चारचाकी गाड्यांची निर्मिती करणाऱ्या मारुती सुझुकी इंडियाने आपल्या मानेसर येथील कारखान्यातून निर्मितीचे काम सुरू केले आहे.

कंपनीने आजच हरियाणातील या कारखान्यातून कामकाज सुरू केले. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे येथील काम गेल्या ५०हून अधिक दिवसांपासून बंद होते. कंपनीने मानेसर आणि ग्रुरूग्राम येथील कारखान्यातील उत्पादन २२ मार्चपासून बंद केले होते. मारूती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी सांगितले की, मानेसर येथील प्रकल्पातून उत्पादन सुरू झाले आहे. आज मंगळवारी पहिली गाडी तयार होईल. सध्या ७५ टक्के कर्मचाऱ्यांसह एका शिफ्टमध्ये काम केले जात आहे.

दरम्यान कारखान्यात पूर्ण क्षमतेने कामकाज कधी सुरू होईल याबाबत विचारले असता. भार्गव म्हणाले, त्या बाबतचा निर्णय सरकारवर अवलंबून असेल. दोन्ही शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी, कर्मचारी संख्या वाढ आणि सप्लाय चेन कधीपर्यंत सुरू होते त्यावर गोष्टी ठरतील. गुरूग्राम प्रकल्पातील काम सुरू होईल पण त्याला अद्याप वेळ असल्याचे भार्गव यांनी सांगितले. मारूतीने काही वाहनांच्या उत्पादनाबरोबरच आपली वाहन विक्रीची शोरूम देखील उघडली आहेत. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलत दिल्यानंतर मारूतीने १ हजार ६५० गाड्यांची डिलिव्हरी केली. तर कंपनीने उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नव्या ५५० गाड्यांचे बुकिंग झाले आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अन.. ‘त्या’ प्रश्नावर ट्रम्प संतापले; पत्रकार परिषदेतून घेतला काढता पाय

वृत्तसंस्था । अमेरिकेत करोनाचा संसर्ग थैमान घालत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील चर्चेत आहेत. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एका आशियाई महिला पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांना संताप अनावर झाला व “हा प्रश्न मला नाही, तर चीनला विचारा,” असं म्हणत पत्रकाराच्या प्रश्नावर भडकून ट्रम्प पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेले.

अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजला आहे. अमेरिकेत करोनामुळे प्राण गमावलेल्या नागरिकांची संख्या ८० हजारांहून अधिक झाली आहे. अशा वेळी अमेरिकेतील कोरोना परिस्थितीसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. व्हाईट हाऊसमधील रोझ गार्डनमध्ये ही पत्रकार परिषद झाली. यावेळी ‘कोरोना चाचण्या करण्यात जगात अमेरिका आघाडीवर’ अशा ओळी असलेलं एक बॅनर ट्रम्प यांच्या मागे लावण्यात आलं होतं. यावेळी सीबीएस न्यूजच्या आशियाई महिला पत्रकार वेईजिया जियांग यांनी ट्रम्प यांना या बॅनरवरील ओळीवरूनचं प्रश्न विचारला.

”अमेरिकेत ८० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाल्यानंतरही लस चाचणीला आपण जागतिक स्पर्धा म्हणून पाहत आहात का?,” असा थेट प्रश्न जियांग यांनी ट्रम्प यांना विचारला. त्याला ट्रम्प यांनी उत्तर देताना चीनलाच विचारा असे तिरकस उत्तर दिले. त्यानंतर ट्रम्प पुढील प्रश्नाकडे वळणार असताना जियांग यांनी मला तुम्ही विशेष उल्लेखून असं उत्तर देत आहात, का असा प्रतिप्रश्न केला. त्यावर आपण सगळ्यांनाच उत्तर दिले असून जे मला वाईट प्रश्न विचारतात त्यांनाही माझे हेच उत्तर असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकार परिषदतेतून काढता पाय घेतला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्रकारांमध्ये होणारे वाद नवीन नाहीत. याआधीदेखील डोनाल्ड ट्रम्प यांचे पत्रकारांसोबत वाद झाले आहेत. काही वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या वाद-प्रतिवादाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

२६ वर्षांचा डाॅक्टर ते हिज्बुल कमांडर; जाणुन घ्या हे कसं झालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या आठवड्यात, बरीच झुंज दिल्यानंतर अखेर सुरक्षा दलांना हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नाईकूचा खात्मा करण्यात यश आले. बुरहान वानीनंतर नायकू हा काश्मीर खोऱ्यातील तरुणांसाठी पोस्टर बॉय बनला होता, दहशतवादी कारवायांमुळे त्याच्यवर १२ लाख रुपयांचे बक्षीस ही ठेवण्यात आले होते.याच नायकूच्या निर्मूलनानंतर आता गाझी याला हिज्बुलची कमांड मिळाली आहे. या दहशतवादी संघटनेचा नेता म्हणून निवडल्या गेलेल्या अवघ्या २६ वर्षांच्या या दहशतवाद्यात असे आहे तरी काय ? ते जाणून घेऊयात.

नायकूप्रमाणेच तोही काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील आहे. गाझी इथल्या मलंगपोरा गावात लहानाचा मोठा झाला, इतर मुलांप्रमाणेच त्यांचेही बालपण अगदी सामान्य होतं. पुलवामा येथून बायोमेडिकलमध्ये डिप्लोमा केल्यानंतर, गाझी श्रीनगरला आला आणि त्याने श्रीनगरमधीलच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरवात केली. यावेळी त्याची भेट रियाज नायकूशी झाली.

येथूनच गाझीने कट्टरपंथाच्या मार्गावर जाण्यास सुरुवात केली. असा विश्वास आहे की यानंतर लवकरच त्याने आपले काम सोडले आणि पूर्णपणे दहशतवादाचा मार्ग स्वीकारला. नायकू याच्याप्रमाणेच तोही एक फुटीरतावादी आणि पाकिस्तानचा कट्टर समर्थक होता. काही दिवसातच गाझीने दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, कुलगाम आणि शोपियान जिल्ह्यांत दहशतवादाचा झेंडा फडकविला. तो येथील तरुणांना शिक्षण तसेच नोकरी सोडून कट्टरपंथाचा मार्ग अवलंबण्याचा सल्ला देत असत.

हिज्बुलमध्ये नवीन भरती करण्यासाठी आणि त्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीनेही गाझी खूप सक्रिय होता. हे लोक कमाईसाठी (terror-financing module) अफूची लागवड आणि तस्करीसारखी कामं करायचे. या कामांमध्येही हा तरुण गाझी सतत पुढे काम करत असायचा. लवकरच त्याला हिज्बुलमधील त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांपेक्षा अधिक मानाचे स्थान दिले जाऊ लागले. बरं, यामागे आणखी एक कारण होते ते म्हणजे कि त्याने आपल्या बायोमेडिकलच्या अभ्यासादरम्यान जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत प्रशिक्षणही घेतले होते. जे की जखमी दहशतवाद्यांच्या उपचारासाठी त्याचे हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले होते.त्यामुळेच संघटनेची लोकं त्याला डॉ सैफ असे म्हणू लागले.

विशेष दहशतवादी अभियानासाठी जोमाने आणि रागाने भरलेल्या या नवीन भरती केलेल्या तरुणांना नायकूने प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण संपल्यानंतर गाझी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचताच त्याची दहशत तिथे लवकरच पसरली. यामुळेच त्याला काश्मीरमधील ‘ए ’ श्रेणी दहशतवाद्याचा दर्जा मिळाला आहे. दहशत पसरविण्याच्या प्रकाराने भारतीय सैन्य या दहशतवादी लोकांना अनेक श्रेणी मध्ये ठेवतात. या श्रेणी ए ++, ए + आणि ए या श्रेणी आहेत. यामध्ये ते दहशतवादी सामील आहेत, ज्यांच्या कृतीमुळे सर्वांमध्ये भरपूर दहशत पसरते.

त्याशिवाय येथे बी ++ आणि बी + श्रेणी देखील आहेत ज्यात तुलनेने किंचित कमी भयानक दहशतवाद्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त,आणखी एक श्रेणी देखील आहे, ज्यामध्ये नवीनच भरती केलेले युवक सहसा हिज्बुलमध्ये सामील झालेले आहेत असे येतात. तसेच, पुलवामा येथे सीआरपीएफच्या पथकावर हल्ला करणारा आदिल अहमद दार हा सी वर्ग दहशतवादी होता, ज्याचा कोणताही मोठा रेकॉर्ड नव्हता पण त्यानंतरही त्याने केलेल्या हल्ल्यात ४० भारतीय सैनिक ठार झाले होते.

भारतीय सैन्याबरोबरील चकमकीत नायकूच्या झालेल्या मृत्यूनंतर या हिज्बुल संघटनेने ६ मे रोजी शोकसभेचे आयोजन केले होते. त्याचबरोबर, गाझी हैदरला जम्मू-काश्मीरचा नवीन ऑपरेशनल चीफ कमांडर बनविण्याची घोषणा केली गेली. यासह २६ वर्षांचा हा दहशतवादीही आता भारतीय सैन्याच्या निशाण्यावर आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.