Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5830

…तर नाईलाजाने देशभरात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल ; WHO भारताला इशारा

नवी दिल्ली | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व देशांनी काळजी घेण्याची गरज आहे. आता त्यांनी जर पूर्वकळजी घेतली नाही तर परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात लॉकडाउन करावा लागेल. असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉक डाऊन अनेक देश शिथील करताना दिसत आहेत. त्यावर टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी पूर्वीप्रमाणे सगळं काही सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे. असही त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की निर्बंध शिथील झाल्यानंतरही लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणाही यासाठी तयार असली पाहिजे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, आपण घाबरुन जगू शकत नाही, पण त्याचवेळी तयार राहणं गरजेचं आहे. आपण एकीकडे या महामारीशी लढा देत असताना दुसरीकडे अशा साथींचा सामना कऱण्याची तयारीही केली पाहिजे. असही त्यांनी सांगितलं.

व्हॅट्सअप लवकरच डिजिटल पेमेंट ऍप लाँच करणार

बेंगळुरू । दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून चाचणी प्रक्रियेच्या टप्प्यावर असणाऱ्या व्हॉट्सअपच्या डिजिटल पेमेंट सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. चालू महिन्याच्या अखेरीस ही सेवा सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. यूपीआय आधारित या सेवेच्या पहिल्या टप्प्यात केवळ एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व अॅक्सिस बँकेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंट व रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना मिळाली होती. त्यानंतर यूपीआय आधारित अनेक पेमेंट सेवा सुरू झाल्या. देशभरात व्हॉट्सअपचे मोठ्या प्रमाणावर यूजर असल्याने या मंचानेही पेमेंट सेवा देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेच्या संबंधित नियमांचे पालन करण्याची हमी व्हॉट्सअपकडून दिली न गेल्याने त्यास मंजुरी मिळाली नाही. मात्र, आता ही सेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व अॅक्सिस बँकेच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. तर, नंतरच्या टप्प्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचाही समावेश करण्यात येईल.

डेटाचे काय?
भारतातील डिजिटल पेमेंट व्यवहारातून निर्माण होणारा डेटा हा भारतातच जतन करायला हवा या आशयाच्या मार्गदर्शक सूचना रिझर्व्ह बँकेने एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध केल्या होत्या. व्हॉट्सअपचा या गोष्टीस विरोध असल्याने त्यांना अद्याप पेमेंट सेवेचा परवाना देण्यात आलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

विशाखापट्टणममध्ये विषारी वायू गळती; ८ मृत्युमुखी, ५०० जणांना बाधा

विशाखापट्टणम । भोपाळ विषारी वायू गळतीची घटना भारतातील सर्वात भीषण आणि विदारक घटनांपैकी एक. आज त्याच घटनेची पुनरावृत्ती आंध्रप्रदेशमध्ये पाहायला मिळाली. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे आज (गुरुवारी) पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडोजण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत. एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे.

LG Polymers Gas Leakage: 8 Dead, 1,000 Reportedly Sick After Gas ...

मृतांमध्ये ८ वर्षांच्या एका मुलीसह दोन जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एकूण ५००० जणांना या गॅस गळतीची बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी २० जण गंभीर आहेत. या विषारी वायूच्या गळतीमुळे तीन किमीच्या परिसरावर परिणाम झाला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विषारी वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशम विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत.

Gas leak at chemical plant in Visakhapatnam: 6 dead, many ...

जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी (डीएमएचओ) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विषारी वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांमध्ये जळजळ व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. यानंतर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशम विभागाचे वाहन, रुग्णवाहिका व पोलीस दाखल झाले आहेत.

Vizag gas leak: What is styrene and how does it affect the body ...

हीच ती वायूगळती झालेली कंपनी
एल. जी. पॉलीमर्स इंडस्ट्रीची स्थापना सन १९६१ मध्ये हिंदुस्तान पॉलीमर्स या नावाने झाली. ही कंपनी पॉलिस्टायरेन आणि त्याचे को-पॉलिमर्सची निर्मिती करते. सन १९७८ मध्ये यूबी ग्रुपच्या मॅकडॉव्हल अॅण्ड कंपनी लिमिटेडमध्ये हिंदुस्तान पोलिमर्सचे विलिनीकरण झाले. त्यानंतर ही कंपनी एल.जी. पॉलिमर्स इंडस्ट्री या नावाने ओळखू लागली.

Vizag LG Polymers Gas leak: 10 dead, over 5,000 fall sick after ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन 17 रुग्ण ; रुग्णांची एकूण संख्या पोहचली 373 वर

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोनाचे नवीन 17 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 373 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन कोरोना चाचणी वाढवत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 17 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 373 झाली आहे. यातील 11 जणांचे मृत्यू झाले असुन 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये 10 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून सांगण्यात आले. या 17 ऋग्णापैकी पुंडलिक नगर (5), हमालवाडी (4), कटकट गेट (3) रेल्वे स्टेशन (1) जयभीम नगर (2) कीलेअर्क (2) या परीसरातील आहेत.

शहरात दररोज २० पेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असल्यामुळे दिवसागणिक करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

[स्पर्धा परीक्षा] नवीन पदभरती – ‘शासन निर्णय आणि आपण…’              

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) वा इतर सरळ सेवा भरतीची तयारी करत असलेल्या आणि विशेषतः आपल्या स्वप्नपूर्ती साठी अन्य गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवत आलेल्या विद्यार्थी मित्र-मैत्रीणींना मनापासून विनंती करायची आहे की, करोना पार्श्वभूमी वरती राज्याच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात जो शासन निर्णय आला आहे; त्यातील मुद्दा क्रमांक १४ तील ‘नवीन पद भरती करू नये’ या शब्द प्रयोगाने कृपया विचलित होवू नका.

अगोदरच करोना महामारीने तुमच्या संयमाची परीक्षा  घेतली आहे, त्यात आता हे प्रकरण. धक्का बसणे स्वाभाविक आहे. मात्र सर्वत्र व्हायरल झालेल्या त्या ‘पीडीफ’मुळे/शासन निर्णयामुळे जर तुम्ही व्हायबल होणार असाल आणि अभ्यास सोडून त्याची खातरजमा करण्याच्या पाठीमागे लागणार असाल, तर मग तुम्ही तुमच्या ध्येयापासून नक्कीच विचलित होत आहात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या 2020 च्या परीक्षा होणारच. त्या होणार नाही असे कोणीच म्हटलेले नसताना उगीच तारे तोडणे आपले काम नव्हे. अशा काळात विचलित झालात तर मात्र याची जबर किंमत तुम्हाला नक्कीच मोजावी लागेल. करोना दणका देणार हे मी “स्वत:ला एक झटका द्या” या लेखात अगदी शेवटी सांगितले होते.(लेख टेलग्राम वर उपलब्ध आहे) करोना नंतर पद भरती वर संक्रांत येणारच नाही याची शाश्वती कोण देणार असा तो उल्लेख होता.

आगामी परिस्थितीमधून आपल्या हे निदर्शनास येवू शकते. मात्र आत्ताची प्रक्रिया थांबवली जाईल अशी शक्यता फार कमी वाटते. ते काही ही असो. आजच्या घडीला आपण मी तयारी सोडून देतोय असं म्हणू शकतो का..? फक्त चर्चेने प्रश्न सुटत नसतो. त्यामुळे आपल्या हाती कार्यरत राहणे हेच आहे. माझ्या संपर्कात असे काही कॅलिबर असणारे विद्यार्थी आहेत की, त्या पदभरती आदेशामुळे त्यांच्यात बिलकुल फरक पडलेला नाही. रिझल्ट देणारा व न देणारा यांच्यात इथेच फरक कळतो. अशा लोकांचा अभ्यास  सुद्धा चेक करावा लागत नाही. सलाम आहे त्यांना.

ध्येयाप्रती निष्ठा असणे व कोणत्याही, कसल्याही परिस्थितीत अविचल राहणे हे यांचे लक्षण अशा काळात प्रकर्षाने जाणवते. शेवटी इतकेच सांगेन की काल ज्या तडफेने, तत्परतेने कृती करत होता तीच तडफ आजही जपा. सोशल मीडिया (त्यात टेलिग्राम देखील आलेच) पासून स्वत:ला अलिप्त ठेवा. आपल्या अभ्यासावर टिकून रहा. आपला विजय इथेच आहे. यश अशाच छोट्या छोट्या कृतीतून आकाराला येत असते हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.

मिथुन पवार,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक,
8275933320.
Telegram:  t.me/mithunpawar

“वाधवान हाऊसची” CBI कडून झाली तपासणी

सातारा प्रतिनिधी | उद्योगपती असलेल्या वाधवान बंधूंना सीबीआयने चौकशीसाठी महाबळेश्वरला आणले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास वाधवान बंधुच्या उपस्थितीत त्यांच्या बंगल्याची सीबीआयच्या पथकाने पाच तास तपासणी केली.

वाधवान बंधूना गेल्या २६ एप्रिल रोजी सीबीआयने महाबळेश्वर येथून ताब्यात घेतले होते. काल पुन्हा सीबीआयने त्यांना महाबळेश्वर येथील बंगल्यावर चौकशीसाठी आणल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत. काही महत्वाच्या माहिती नंतर सीबीआयची टीम महाबळेश्वरहुन वाधवान बंधुंना पुन्हा मुंबईला घेऊन गेले.

दरम्यान वाधवान कुटुंब हे लॉक डाऊन असताना महाबळेश्र्वर येथील त्यांच्या वाधवान हाऊसवर पोहचले होते. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यावर त्यांच्यवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आल होत. त्यांची चौकशी आता सिबिआयकडे सोपवण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात आणखी ३ जण कोरोना पोझिटिव्ह; एकुण रुग्णसंख्या ९५ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी कराड येथे २ तर सातारा इथे १ असे एकुण ३ जणांचे कोविड १९ अहवाल पोझिटिव्ह आले आहे. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षीय पुरुष तर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारी ७० वर्षीय महिला अशा एकूण ३ निकट सहवासितांचा अहवाल कोरोना (कोविड-१९) बाधित आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

https://hellomaharashtra.in/maharashtra-news/how-karad-corona-patients-reached-upto-57-karad-corona-news/

ताज्या आकडेवारीनुसार आता सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या ९५ वर पोहोचली आहे. यातील तब्बल ७२ कोरोनाग्रस्त हे एकट्या कराड तालुक्यात आहेत. मागील काही दिवसांत रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. कराड तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट बनला असून रुग्णांच्या संख्यात वाढ सुरुच आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सर्व सहा कोरोना रुग्णांना काल दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जावळी तालुका कोरोना मुक्त झाला आहे. मात्र कराड तालुक्यातील रुग्णांची संख्या थांबायचे नाव घेत नसल्याने जिल्हा प्रशासनालाही घाम फुटला आहे. 

२३ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील १, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील ११, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील १ व उपजिल्हा रुग्णालय,फलटण येथील १० असे एकूण २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

१३० जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
६ मे रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 7, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 102, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे २१ असे एकूण १३० जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- ७९, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- १४, कोरोना बाधित मृत्यु- २ तसेच जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- ९५इतकी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सरकार दारुशिवाय चालणार नाही??; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं

जावे त्यांच्या गावा | मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या उपायुक्ततेची, त्याच्याशी निगडीत भावनांची क्रोनॉलोजी समजून सांगण्याचं काम लोकमित्र संजय सोनटक्के यांनी त्यांच्या निरीक्षणातून केलेलं आहे. पटलं तर घ्या..!! या न्यायाने वाचकांपर्यंत त्यांच्या भावना पोहचवत आहोत. [लेखामध्ये त्यांनी उल्लेख केलेला मदिरा हा शब्द दारु (मद्य) अशा अर्थाने आहे.]

दारुविक्रीचा सावळा गोंधळ का? – मदिरेबाबत सर्वोत्तम साहित्यिक स्तरावर भाष्य गालिबच्या मांडणीत दिसते. हरीवंशराय बच्चन यांच्या अजरामर ‘मधुशाला’ने मदिरा आणि मदिरालयाची प्रतिकं वापरून एक वेगळेच विश्व आपल्यासमोर उभे केले आहे. पण यापलीकडेही मदिरेचे वेगळे वास्तव आहेच. सोमरस, व्होडका, रम, बियर, व्हिस्की, वाईन, दारू अशा भिन्न नावाने प्रसिद्ध असलेली मदिरा कायमच बदनाम राहिली आहे. आताही मदिरा विक्रीचे व्यवस्थापन ढासळल्याने गोंधळ उडून कोरोना संकट वाढेल अशी शंका उपस्थित होत आहे. अगदी असाच गोंधळ किराणा आणि भाजीपाला बाजारात देखील दिसतोय. त्यामुळे मदिरा किंवा अन्य वस्तू विक्री वितरणात व्यवस्थात्मक सभ्यता लोक पाळणार की नाही हा प्रश्न आहे. आतापर्यंतचा गोंधळ पाहता समाज आणि शासनाला व्यवस्थापनाचे आणखी कठोर आणि अचूक निर्णय घ्यावेच लागतील, अन्यथा खूप मोठा काळ लॉकडाऊन वाढून आर्थिक आणि अन्य व्यवस्था कमकुवत होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. हा गोंधळ टाळला पाहिजे.

आता कोरोना संकटकाळात मदिरेची विक्री सुरू केल्याने गोंधळ आणि चर्चा होणे स्वाभाविक होते. दारुप्रेमी विरुद्ध दारुविरोधी असा एकूण लढा आता सुरु झाला आहे. सहजपणे या मदिरेचा आर्थिक लेखाजोखा गुगलवर तपासला असता असे लक्षात आले की, २०१४ ते २०१९ या आर्थिक काळात तब्बल ३० हजार ३३१ कोटी रूपये कररुपाने भारतातील शासकीय खजिन्यात जमा झाले आहेत. या संपूर्ण रकमेतील ४५१८ कोटी रुपये (वार्षिक – ९०० कोटी रुपये) एवढा वाटा महाराष्ट्राचा आहे. दारुविक्रीचा कर जमा करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हे आर्थिक वास्तव कानडोळा करण्याइतपत नक्कीच नाही. या महसूलावर पाणी सोडून जगण्याची समाजाची आणि शासनाची प्रामाणिक इच्छा आहे का? या महसूलावर पाणी सोडत, मदिरा निर्मिती आणि मदिरेचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे का? याचाही प्रमाणिकपणे विचार करायला पाहिजे. आपण महाराष्ट्रापुरता विचार केल्यास वार्षिक 900 कोटी रुपयांचा महसूल तुटवडा आपण कसा भरुन काढणार आहोत ? आपल्याजवळ इतर पर्यायी आर्थिक नियोजन आहे का? राज्यातील असे कुठले खर्च आहेत की जे कमी केले म्हणजे हा महसूल तुटवडा राज्य सहन करू शकेल? आणि सध्याच्या कोरोना संकटात ते शक्य आहे का? याचा वास्तविक विचार केला पाहिजे.

महसूल प्रश्नाने दारुला तारले? – मदिरेबाबतची चर्चा अतिशय दांभिकतेतून सुरू असल्याचे दिसते. रोखठोक भूमिका घेण्याची सरकारमधील किंवा सरकारबाहेरील कुणाचीही तयारी नाही. समर्थन करणाऱ्यांचा मुख्य मुद्दा प्रामुख्याने महसूल हाच आहे. जो वर उल्लेख केलेल्या आकडेवारीत अगदी स्पष्ट दिसतो. याउलट विरोध करणाऱ्यांचा मुद्दा अनिती, हिंसाचार, गरीब कुटुंबातील आर्थिक आणि इतर नुकसान हा आहे. अर्थात देशाला महसूल मिळावा एवढ्या उदात्त भावनेने कुणीही मदिरेचीचव घेत नाही हेही स्पष्ट आहे. ज्यांना मदिरा प्राशन आवडते,आनंद मिळतो, काही फायदा वाटतो किंवा सांस्कृतिक जीवनातील भाग आहे म्हणून गेली हजारो वर्षे स्री-पुरुष मदिरा घेताना दिसतात. मोहाची दारु कीती आरोग्यदायी अशाही चर्चा अनेक लोकांकडून होत असतात. तांदळाची बियर ही नॉर्थ इस्टमध्ये नाष्ट्यातील प्रमुख घटक आहे. तिकडे स्थानिक परंपरागत पद्धतीने ती बनवून स्त्री आणि पुरुष, दोघेही पितात. मदिरा पिण्यासाठी तुम्ही पुरुषच असायला हवं असं बिल्कुल नाही. मदिरा पिण्याची पद्धत, कारणे, किती आणि कशी प्यायची याची मोजमाप सर्वत्र वेगवेगळी दिसतात. अनेक ठिकाणी धार्मिक समारंभाचा प्रतिष्ठित भाग मदिरा आहे. कुणाला लिमिटेड मदिरा आरोग्यासाठी चांगली वाटते म्हणून पितात. मदिरा कुठलाही सामाजिक, धार्मिक, आर्थिक, जातीय असा भेदभाव करीत नाही. तरीही झोपडपट्टीतील मजूर हा बेवडा ठरतो तर उच्चस्तरीय ड्रिंक्स घेणारा कूल ठरतो.

नैतिक – अनैतिकतेच्या चौकटी – मदिरेला स्वतः कसली नैतिकता आणि अनैतिकता आहे ? मदिरेचा संबंध नैतिक – अनैतिकतेशी अजिबात नाही. या तर मानवी संकल्पना आहेत आणि स्थळकाळानुसार भिन्न आहेत. तरीही आपल्याकडे मदिरा पिणारा अनैतिक असं ठामपणे शिक्कामोर्तब झाले आहे. मग अनेक क्षेत्रातील (कुठलेही क्षेत्र अपवाद नाही) अनेक मान्यवर/सामान्य नागरिक (स्री पुरुष) जेव्हा समारंभ पूर्वक/आपापल्या घरात किंवा अन्यत्र मदिरेचे सेवन करतात त्या करोडो लोकांना आपण अनैतिक घोषित करणार का ? आणि जे मदिरेचे सेवन करीत नाहीत त्या सर्वांना नैतिक म्हणावं, हाच आपला विचार आहे का ? (हिटलरने आयुष्यात मदिरापान केले नव्हते) म्हणजे मदिरेबाबतची नेमकी भुमिका काय घ्यायची हे एकदा गांभीर्याने ठरविले पाहिजे.

प्रश्न मदिरेमुळे आहे की मदिरा पिऊन गोंधळ आणि हिंसाचार करणाऱ्यांमुळे आहे ?
कौटुंबिक हिंसाचारात मदिरेला दोषी धरले जाते पण ते अर्धसत्य वाटते. अगदी मदिरेला स्पर्श न करणाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक आणि अन्य हिंसाचार केलेला दिसतो. अगदी नैतिकचे ढोल पिटणाऱ्यांनी कौटुंबीक आणि अन्य हिंसाचार केलेला दिसतो. कौटुंबिक हिंसाचारात कुटुंबाचा बळी जाऊन, नुकसान होते हे मात्र सत्य आहे. परंतु सरसकट आपण मदिरेला जबाबदार धरले तर अशा केसमधील निदान आणि उपाययोजना चुकू शकतात. असो हा स्वतंत्र विषय ठरू शकतो. आणि यावर भरपूर चर्चा झाल्या आहेत. मदिरेच्या आहारी गेलेला आणि कौटुंबीक हिंसाचार घडलेल्या केसमधे मदिरेला मधे न घेता विचार केला तर, मदिरा हे लक्षण दिसले तरी मूळ कारण वेगळीच असतात. त्याचे समाधान शोधल्यावर प्रश्नांची सोडवणूक काही मिनिटांत झाल्याचं पाहायला मिळालं.. अर्थात अशा बाबतीत अतिशय संयमाने समुपदेशन करावे लागते. मदिरा पिणारी व्यक्ती हिंसक आणि न पिणारी अहिंसक असे आपण ठामपणे म्हणू शकतो काय ? (जगातील कुठलीही हिंसा वाईटच शारीरिक असो की मानसिक). असो, आता मदिरेबाबतची भुमिका न घेता जी दांभिक चर्चा सुरू आहे त्याचे काय? अतिरेकाची सवय लागलेल्या समाजात अशीच चर्चा होणे अपेक्षित आहे. अनेक विषयांवर ती अशीच दांभिकतेतून होत राहते. मग ती चर्चा कधी कधी मांसाहार करणाऱ्यांना आरोपी करते. कधी फॅशनेबल कपडे घालून फिरणाऱ्या स्त्रियांना आणि प्रेम करणाऱ्या लोकांना आरोपी ठरवण्याचा ट्रेंड आहे. अगदी निसर्गोपचारात साखर विष आहे असे म्हटले जाते. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक हा वाईटच असतो मग ती गोष्ट कितीही चांगली असली तरीही.

अशा समाजात आपल्याला आता मदिरेबाबत रोखठोक भुमिका घेता येईल काय ? संपूर्ण देशातील मदिरालय आणि मदिरेची निर्मिती स्थळ (पारंपरिक आणि कारखाने) बंद करता येतील काय ? कारण कुठल्याही एका जिल्ह्यातील किंवा राज्यातील मदिरा बंदी करून हा प्रश्न आणि त्यामुळे निर्माण होणारी समस्या सुटणार नाही हे आता सिद्ध झालं आहे. बंदीच्या ठिकाणी बाहेरून मदिरा येते हा अनेकांना अनुभव आहे. यासंदर्भात गुजरात आणि गोवा असा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे.

थोडं लाईटली घ्या ना..!! – मदिरा चांगली की वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ती घ्यायची की नाही हाही वैयक्तिक प्रश्न. पण मदिरेचा आधार घेऊन कुठलाही हिंसाचार किंवा गोंधळ करणे, गुन्हा करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही. कारण त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होऊन वातावरण बिघडते हे मान्यच करावं लागेल. मदिरा स्वतः हे बोलणार नाहीच, मदिरेला भावना नाहीत, मदिरा असो किंवा अन्य काही, आपला विवेक हरवतो तेव्हा कौटुंबिक हिंसाचार, दंगली, जागतिक युद्ध असे महाभयंकर प्रकार घडून येतात. मुळ प्रश्न उपस्थित होतो की ,आम्हाला नक्की कसा समाज हवा ? आदर्शवादी की विवेकी ? समाज मदिरामुक्त असावा की हिंसाचार मुक्त ? याचाही गांभीर्याने विचार व्हावा. विवेकाने निर्णय घेणारी, वागणारी व्यक्ती आणि समाज असावा असे मला वाटते. मदिरा चांगली की वाईट त्याचे फायदे आणि तोटे मदिरा समर्थक आणि विरोधक कोरोना संकटाआधी देखील मांडत होते आणि पुढेही मांडत राहतील . आता धोरणकर्त्या मंडळींनी योग्य निर्णय घ्यावा हीच अपेक्षा.

विशेष सूचना – हा लेख मदिरेचे समर्थन करण्यासाठी किंवा विरोधात मत व्यक्त करण्यासाठी नाही. यात लेखकाला दिसलेली वास्तविक निरीक्षणं आहेत. त्यामुळे लेखकाचं मत हेच अंतिम सत्य नाही. मात्र लेखकाने मदिरा प्रश्नाची चर्चा विवेकाने व्हावी या हेतूनेच सदर लेख लिहिला आहे.

लोकमित्र संजय सोनटक्के हे विवेकवादी विचारांचे समर्थक असून लोक सहजीवन मिशनचे संस्थापक आहेत. मानवी नातेसंबंधांवर, ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या जीवनशैलीवर ते काम करतात. त्यांना चहाची आणि शायरीची विशेष आवड आहे. संवादातून प्रश्न सुटतात या विचाराने ते समुपदेशनाचं कामही करतात. त्यांचा संपर्क क्रमांक – 9822469495

कोरोना | माध्यमांनी ‘मोठा’ आणि लोकांच्या वागण्याने ‘भयानक’ केलेला विषाणू

थर्ड अँगल | कोरोनाला आपण अवास्तव महत्व दिल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे. निरंजन घाटे हे त्यातीलच एक नाव. भारतासारख्या देशात कोरोनापेक्षा गंभीर आजार आहेत. पण त्याच्या जागरुकतेबाबत कधी एवढं गांभीर्य दाखवलं जात नाही असं घाटे यांचं म्हणणं आहे. शिस्त ही फक्त लॉकडाऊनमध्ये पाळायची गोष्ट नाही, ती सातत्यपूर्ण अंगी बनवण्याची गोष्ट असल्याचं घाटे सर परखडपणे मांडतात. सध्या कोरोनाव्हायरसच्या एकूण वातावरणात एक अनुभवी विज्ञान अभ्यासक आणि लेखक म्हणून निरंजन घाटे यांच्या मनात काय विचार आहेत, हे वाचकांपर्यंत पोहचवत आहोत.

कोरोनाच्या पलीकडचं ‘आपलं रोजचं जग काय सांगतं?’ सध्या जगात कोरोना विषाणूजन्य रोगाची साथ पसरली आहे. त्यासंबंधीच्या बातम्या ज्या पद्धतीने दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरून देण्यात येत आहेत त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. त्यामुळे इथे वृत्तपत्र वितरणावर बंदी घातली जाण्याच्या आधी वृत्तपत्रांमधून आलेली आकडेवारी देत आहे. भारतात दरवर्षी ४ लाख लोक विविध प्रकारच्या कर्करोगांना बळी पडतात; तर दरवर्षी ८ लाख लोक क्षयरोगाचे बळी ठरतात. जगात दरवर्षी हिपॅटायटीस-सी या व्याधीची १७ कोटी लोकांना लागण होते आणि साडेतीन कोटी लोक ह्या व्याधीला बळी पडतात. इबोलाने आफ्रिकेत थैमान मांडले तेव्हा मृतांची संख्या ६० लाखांहून अधिक होती. सध्या कोरोनाने मरणाऱ्या लोकांत कॉकेशियन वंशाच्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. याचे कारण जी मानवी शाखा युरोपमध्ये गेली ती परिस्थिनुरूप बदलली. गोरा वर्ण, तांबडे केस ही त्यांची वैशिष्ट्ये ठरली. त्यांनी वेळोवेळी इतर वर्णांच्या लोकांना युरोपमध्ये येण्यापासून रोखले. ज्यूंना त्रास दिला. पंधराव्या शतकात स्पेनमधून मूरिश (इस्लामी) आणि ज्यूंना वेचून हाकलून दिले. त्यामुळे तिथले जननिक आदानप्रदान थांबले. चीनमध्येही तेच घडले. पंधराव्या शतकानंतर चीनने जगाशी संपर्क बंद केला. त्याआधीही चीनी लोकांचा जगाशी संपर्क नव्हताच. त्यामुळे चीनमध्येही जननिक आदानप्रदान नव्हते. त्यामुळे त्यांच्यात ही रोगप्रतिकारशक्ती मर्यादित प्रमाणात राहिली. जगात इतरत्र त्या मानाने मोठ्या प्रमाणात जननिक आदानप्रदान म्हणजे रोटीबेटी व्यवहार होत राहिले. माया संस्कृतीचा नाश अशाचप्रकारे जगाशी फटकून राहिल्यामुळे झाला, असे मानवशास्त्रज्ञ म्हणतात. 

हे वास्तव कोण लक्षात घेणार ? – सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ५० टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील २ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. त्यामुळे ८० टक्केपेक्षा थोडे जास्तच रुग्ण हे सहा वर्षाखालील किंवा साठ वर्षावरील असतात. एकूण मृतांचे सरासरी वय हे सत्तर वर्षांपेक्षा थोडे जास्तच असते. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर साडेसात अब्ज लोकसंख्येत २ लाख जणांचा मृत्यू ह्याची टक्केवारी किती? भारताची लोकसंख्या १ अब्ज ३० कोटी असावी. त्यात २००० मृत्यू सुद्धा झालेले नाहीत. दहा हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. ‘पुण्यात आज दोन मृत्यू’ अशी ब्रेकिंग न्यूज देताना पुण्यात एकूण मृत्यू किती याचे आकडे कधीच सांगितले जात नाहीत. भारतात एकूण कोरोना बाधितांमध्ये या कोरोना बाधितांचा आर्थिक स्तर कधी सांगितला जात नाही. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हात जोडून सामाजिक अंतर पाळा, चेहऱ्यावर आवरण असल्याशिवाय बाहेर पडू नका, उगीचच कामाशिवाय बाहेर पडू नका असे सांगत असतांना जे तथाकथित सुशिक्षित घराबाहेर पडतात, त्यांना पकडून महिनाभर विलगीकरण कक्षात टाकायला हवे, आणि मोठ्या रकमेचा दंड करावा इतकी चीड आता या लोकांनी आणली आहे. लॉकडाऊन वाढवून काही साध्य होईल का? हाही प्रश्न आहेच. कारण लॉकडाऊन उठल्यावर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येतील आणि कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिल्यावर कुत्रे जसे उलटून चावते, तशी परिस्थिती होईल. 

रोग पसरण्यामागचं विज्ञान, त्यावरील तत्कालीन प्रतिक्रिया आणि पूर्वानुभव – इथे आणखी एक गोष्टही महत्वाची आहे, ती म्हणजे ‘हर्ड इम्युनिटी’. ही दोन प्रकारची असते. जननिक प्रतिक्षमता आणि जातीय प्रतिक्षमता म्हणजे जेनेटिक इम्युनिटी आणि स्पेसीज इम्युनिटी. इम्युनिटी सिस्टिमला पारिभाषिक शब्द प्रतिक्षमता प्रणाली असा आहे. हर्ड इम्यूनिटीला आपण सार्वजनिक प्रतिक्षमता म्हणजे रोगप्रतिकारक्षमता असे म्हणू शकतो. जेनेटिक म्हणजे जननिक प्रतिक्षमता ही अनुवंशिक असते. प्रत्येक प्राण्याला त्याच्या आईवडिलांकडून ती प्राप्त होते. कुठलीही व्यक्ती ही सर्व रोगांशी लढू शकत नाही. अनुवंशिकतेमुळे तिला काही रोगजंतूंशी सामना करता येतो. इतर रोगजंतू विरुद्धची प्रतिक्षमता तिला स्वतःच मिळवावी लागते. प्राणिजातीची म्हणजे ‘स्पेसीज हर्ड इम्युनिटी’ म्हणजे एखाद्या प्राणिजातीची प्रतिक्षमता. कुठल्याही प्राणी जातीतील सर्वच प्राण्यांमध्ये एखाद्या रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता असत नाही तर त्या प्राण्यांपैकी ५० ते ६० टक्के प्राण्यातच ती असते. हे असे का आणि ह्या प्रतिक्षमतेची साथीच्या रोगाविरुद्ध लढण्यात कशी मदत होते, हे कोडेच आहे. ते सुटेल असा ह्या क्षेत्रातील संशोधकांना विश्वास वाटतो. आपण साथीचे रोग पसरविणाऱ्या अनेक सूक्ष्मजीवांवर काही प्रमाणात मात केली, तरी हिवताप, क्षय आणि अल्सर या सूक्ष्मजीवांनी आपल्या प्रयत्नांना दाद दिलेली नाही. कुष्ठरोगावरही आपण मात करू शकलेलो नाही. विषाणूजन्य आजारांना तर आपण आळा घालू शकत नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. हेलिकोबॅक्टर पायलोरी ह्या रोगजंतूमुळे अल्सर होतो. सुमारे दीड लाख वर्षांपासून म्हणजे आपली मानवजात अस्तित्त्वात यायच्या आधीपासून अल्सर आपल्या पूर्वजांना सतावत आला आहे. हिवताप गेली किमान दहा हजार वर्षे माणसाला छळतो आहे. माणूस सुमारे १ लाख तीस हजार वर्षांपूर्वी कातडी गुंडाळून अंग झाकू लागला ही बाब पिसू आणि माणसाचा जननिक अभ्यास करून मानवशास्त्रज्ञांनी शोधून काढली. हे कसे शक्य झाले? परोपजीवी मग ते कीटक असोत सूक्ष्मजीव असोत किंवा विषाणू असोत त्यांच्यात आणि माणसामध्ये डीएनए आणि आरएनए रेणूंची देवाणघेवाण होते. माणसातील सहाव्या गुणसूत्रावरील प्रथिन रेणूंचा अभ्यास करून हे स्पष्ट होते. मानवी उत्क्रांतीला ह्या देवाणघेवाणीचा हातभार लागला, असेही मानव शास्त्रज्ञ म्हणतात. हिवतापाचे आणि मानवाचे साहचर्य असेच शोधून काढण्यात आले. हिवतापाचे संक्रमण कसे होते हे शोधून काढले गेले त्याला शंभराहून अधिक वर्षे होऊन गेली.

आजही भारतात आणि अमेरिकेतसुद्धा हिवतापाने मरणाऱ्यांची संख्या काही लाखात आहे. विषाणूजन्य आजारात फ्लूने वेळोवेळी थैमान घातले आहे. स्पॅनिश फ्लूने १९१८ साली दीड ते दोन कोटी लोकांना यमसदनात पाठवले. १९५७ च्या साथीनेही जगभर १ कोटीहून अधिक बळी घेतले. तेव्हा ‘ब्रेकिंग न्यूज’ हा प्रकार नसल्यामुळे फारसा गाजावाजा न होता, त्या आल्या आणि गेल्या. हे सगळे अशासाठी सांगितले की जिवाणू, विषाणू, कीटक आणि इतरही जीवांवर आपण कधीच पूर्णपणे मात करू शकलेलो नाही. यातले बरेच परोपजीवी हे सतत उत्परिवर्तित होत असतात. प्रतिजैविकांना दाद न देणारे सूक्ष्मजीव आणि विषाणू बरेच आहेत तर डीडीटी आणि इतर कीटक नाशकांना पचवणाऱ्या कीटकांची संख्याही कमी नाही, हे लक्षात घ्यायला हवे. एखाद्या प्राणिजातीची संख्या जेवढी जास्त तेवढा या परोपजीवींना उत्परिवर्तित व्हायला वाव अधिक. त्यामुळेच माणसाला बाधणाऱ्या रोगकारकांचे प्रमाणही जास्त. कोरोनाचे आत्ताच उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊन दहा प्रकार झाले आहेत. कुठल्यातरी वाहिनीने त्यांना ब्रेकिंग न्यूजमध्ये ‘कोरोनाचे दशावतार’ असे म्हंटले. हे अवतार आणखीही वाढू शकतात हे लक्षात घ्यायला हवे. तसेच हे लक्षात ठेवून कोरोनाच्या साथीला तोंड द्यायला हवे. 

रोखठोक | हे कटू असलं तरी सत्यच आहे – जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढून एकूण मानवी लोकसंख्येच्या सुमारे ३५% झाली आहे. मीही त्यातलाच. यातले ६० टक्क्याहून अधिक लोक एकतर अकार्यक्षम आहेत; किंवा कसलाही उद्योग नसलेले आहेत. त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा भार दुसऱ्यावर असतो. दुसऱ्या टोकाला अज्ञान वयाच्या आणि कायद्याने सज्ञान पण बेकार अशा व्यक्तींची संख्याही ३५% एवढी आहे. साथीच्या रोगांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि सहा वर्षाखालील मुले मरण्याचे प्रमाण सुमारे ८० ते ८५% एवढे असते; पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्याकाळी साथीच्या रोगांमुळे लोकसंख्या नियंत्रण होत असे. आता चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंब शहरातून दिसते. उपभोग संस्कृतीत आईवडिलांना बरेचदा वृद्धाश्रमात टाकले जाते किंवा घराबाहेर हाकलून दिले जाते. अशावेळी काहीजणांना न्यायालयात जाऊन दाद मागता येते पण बऱ्याच जणांना असे काही करता येते हे माहित नसते. ज्या तीस टक्के लोकांना उरलेले सत्तर टक्के पोसावे लागतात, त्यांचे ही भवितव्य फारसे आशादायक नसते. मोठाल्या सदनिकेत किंवा बंगल्यात म्हातारा- म्हातारी दोघे किंवा काही वेळा एकटेच असतात. मुले परदेशात असतात. काही वेळा आई-वडील गेलेत, हे दोन तीन दिवसांनी लक्षात येते. ही  परिस्थिती रोज वृत्तपत्रातून वाचायला मिळते. अशा परिस्थितीत साथीचे रोग परवडतात; असेच म्हणावे लागेल. त्यात अकार्यक्षम आणि अनिर्मितीक्षम लोक कमी होतील. ‘जातस्यहि ध्रुवोर्म्रत्यु’ म्हणत वाढलेल्या भारतीय समाजात, असे लोक ‘औषधं जान्हवी तो यम् वैयो नारायणो हरित’ हे विसरून नव्वदीत डॉक्टरांना वारेमाप पैसा देऊन महागड्या शस्त्रक्रिया करून घेतात, हेही अनाकलनीय ठरते. विल्यम रुडिमन यांच्या मते जेव्हा जेव्हा पृथ्वीवर साथीच्या रोगांनी  थैमान मांडले आणि त्यात मोठ्या संख्येने माणसांचे बळी घेतले, तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या जलवायुमानावर (क्लायमेट) त्याचा परिणाम झाला.

गेल्या दोन हजार वर्षांत अधूनमधून कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण एकदम सरासरी पेक्षा कमी झाले. ह्यासाठी नैसर्गिक कारणे जबाबदार असावीत असे मानण्यात येत होते; पण जेव्हा मानवी लोकसंख्या रोगांच्या साथींमुळे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली तेव्हा तेव्हा शेती कमी प्रमाणात होऊ लागली. मोकळ्या पडलेल्या शेतजमिनींच्या जागी जंगले वाढू लागली. जंगले वाढल्यावर वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण कमी झाले. रुडिमननी अशी काही उदाहरणे दिलेली आहेत. इ.स. ५४० च्या सुमारास अनेक रोगांच्या साथींनी मानवी लोकसंख्या एकदम कमी झाली. त्याच प्रमाणे १४ व्या शतकातही कॉलराच्या साथीने मानवी लोकसंख्या कमी झाली. त्यातच आशिया चेंगीजखानाने मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला. ह्यामुळे जगाची लोकसंख्या तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी झाली, असा अंदाज बांधता येतो. पंधराव्या-सोळाव्या शतकात युरोपी लोकांनी अमेरिकेत नवे रोग नेले. त्यामुळे अमेरिकेच्या दोन्ही भूखंडातील स्थानिकांची संख्या नव्वद टक्क्यांनी कमी झाली असावी. ह्या प्रत्येक वेळी त्या त्या भूभागात स्थानिक स्वरूपाची हिमयुगे अवतरली. एक प्रकारे पृथ्वीच्या वातावरणाचे संतुलन साधण्याचा हा निसर्गाचा प्रयत्न असावा, असे रुडिमन यांना वाटते. त्यांच्या प्लोज, प्लेग्ज अँड पेट्रोलियम ह्या २००५ सालच्या ग्रंथात त्यांचे हे विचार विस्तृतपणे मांडण्यात आलेले आहेत. ह्यासंबंधी कुणाला अधिक वाचन करायचे असेल तर ‘सायंटिफिक अमेरिकन’ ह्या मासिकाचे मानवी उत्क्रांती संबंधीचे खास विशेषांक वाचावेत. त्यातही गॅरिस्टिक्स यांचे लेख उल्लेखनीय आहेत. ‘ट्रेसेस ऑफ या डिस्टंट पास्ट’ हा लेख ह्या संदर्भात विशेष माहितीप्रद आहे. तसेच ‘ब्लॅक डेथ’ ह्या पुस्तकातही बरीच माहिती मिळते. ‘द प्लेग्ज’ हे साथीच्या रोगांसंबंधीचे ख्रिस्तोफर विल्सचे पुस्तक ही ह्या संबंधीची बरीच माहीती देते. युरोपातून कुणाकुणाला कसे आणि कधी हाकलले गेले ह्याची माहीती ‘द वर्ल्डली गुड्स’ ह्या लिझाजार्डीनच्या पुस्तकात सविस्तर देण्यात आली आहे.

निरंजन घाटे हे विज्ञानलेखक असून त्यांना भरपूर वाचन, चिंतन आणि लिखाणाची आवड आहे. विज्ञान सोप्या भाषेत समजावता यावं म्हणून त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात मनसोक्त काम केलं आहे. आपल्या प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9561190500

बाल पोर्नोग्राफीविरोधी गृहखात्याचे ऑपरेशन ब्लॅकफेस; लवकरच गुन्हेगारांना करणार गजाआड

मुंबई । जानेवारीच्या मध्यापासून ऑपरेशन ब्लॅकफेस या मोहिमेअंतर्गत आम्ही बाल पोर्नोग्राफीत अडकलेले, तसेच बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे, त्याचप्रमाणे बाल पोर्नोग्राफीच्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींवर नजर ठेवून आहोत. महाराष्ट्र सायबर विभाग ही कारवाई करत आहे. बाल पोर्नोग्राफी ही समाजाला लागलेली एक कीड आहे. अतिशय विकृत आणि किळसवाणा असलेला हा प्रकार.. याच्या विरोधात गृह विभाग अतिशय कठोर पाऊल उचलत असून हे विकृत आता यापुढे जास्त काळ मोकळे राहणार नाहीत. यांच्यावर आमची नजर असून लवकरच हे गुन्हेगार आपल्याला गजाआड म्हणजे तुरुंगात गेलेले पाहायला मिळतील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

गृह खात्याची जबाबदारी माझ्याकडे आल्यापासून मी सातत्याने बैठका घेऊन, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून गुन्हेगारीच्या विरोधात कशाप्रकारे आपणास कठोर कार्यवाही करता येईल याची माहिती घेत होतो. आढावा घेत होतो. चर्चेतूनच महत्त्वाची ऑपरेशन ब्लॅकफेस ही नवी मोहीम उदयास आली. जानेवारीच्या मध्यापासून या मोहिमेअंतर्गत आम्ही बाल पोर्नोग्राफीत अडकलेले, तसेच बालकांवर लैंगिक अत्याचार करणारे, त्याच प्रमाणे बाल पोर्नोग्राफीच्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींवर नजर ठेवून आहोत. महाराष्ट्र सायबर विभाग ही कारवाई करत आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मी ११ मार्च २० रोजी ऑपरेशन ब्लॅकफेस संदर्भात माहिती दिलेली आहेच अशी देशमुख यांनी यावेळी सांगितले.

१३५ गुन्हे ४८ व्यक्तींना अटक
आतापर्यंत १३५ गुन्हे रजिस्टर झाले असून ४८ व्यक्तींना भा.दं.वि. कलम २९२ सह कलम १४,१५ पोस्को व ६७,६७ अ,६७ ब आय.टी. अॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आलेली आहे. या १३५ प्रकरणांपैकी एक अकोला येथील आहे (आयपीसी कलम. २९२); ४२ पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, परभणी, पुणे, नागपूर (पॉस्को) आणि ९२ मुंबई, कोल्हापूर, अमरावती, अहमदनगर, रायगड, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, गोंदिया, बीड, भंडारा, परभणी, नंदुरबार, चंद्रपूर, लातूर, ठाणे ग्रामीण, अमरावती ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, हिंगोली, नवी मुंबई, धुळे, पालघर, नाशिक ग्रामीण, जालना, वाशिम, सातारा, जळगाव, पुणे ग्रामीण, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, ठाणे, सांगली, रत्नागिरी, यवतमाळ आणि लातूर (आयटी कायदा) असे आहेत.

योग्य अंमलबजावणी
ऑपरेशन ब्लॅकफेसचे जे धोरण आम्ही ठरवले आहे, त्याची योग्य अंमलबजावणी आता होत आहे. महाराष्ट्र सायबर गुन्हे विभाग हे धोरण व्यवस्थित राबवित आहे. आमचा सायबर विभाग २४ तास कार्यरत असून, अत्यंत मेहनतीने व कुशलतेने त्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नजर ठेवून त्यांच्याविरुद्ध कारवाई केलेली आहे.

मी महाराष्ट्र सायबर विभागाचे याबाबत अभिनंदन करतो, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अथवा बाल पोर्नोग्राफी संदर्भात मोठी वाढ झालेली आहे. त्या विरोधात हा विभाग कार्यरत आहे. आपल्याला माहिती आहे की, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींचा मुलगा भुवन रिभू यांच्या इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन फंड (आयसीपीएफ) ने केलेल्या संशोधनात “चाइल्ड पॉर्न”, “सेक्सी चाइल्ड” आणि “टीन सेक्स व्हिडिओ” याकडे कल असून याबाबतच्या सर्चच्या मागणीत जोरदार वाढ झाली आहे असे ताज्या आकडेवारीत निदर्शनास आले आहे. नवी दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, इंदौर व १०० भारतीय शहरांमधील ट्रेंड मॅप करणाऱ्या “बाल लैंगिक अत्याचार सामग्री” या नावाच्या अहवालात लॉकडाऊन पूर्वीच्या तुलनेत भारताच्या पोर्नहबवरील वाहतुकीत ९५% वाढ झाली आहे.

लॉकडाऊन काळातील सावधानता
गृहमंत्री म्हणून मला याची जाणीव आहे की, लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या मुलांसाठी हा मोठा धोका बनू शकेल. लॉकडाऊन कालावधीत वाढत्या प्रमाणात बाल बलात्कारी, चाईल्ड पॉर्न व्यसनी ऑनलाईन येत आहेत. तर दुसरीकडे या काळात मुलं घरबसल्या इंटरनेटचा वापर खेळण्याकरीता, ऑनलाईन वर्ग व मित्र, मैत्रीणींशी गप्पा मारण्यासाठी करत आहेत. याचा फायदा गुन्हेगार सायबर-ट्रॅफिकिंग, ग्रूमिंग (एखाद्या मुलाशी अथवा कधीकधी कुटुंबाशी मैत्री करुन, मुलांचा विश्वास संपादन करून लैंगिक शोषण), इत्यादी गोष्टींसाठी करू शकतात. पालकांनी म्हणूनच सावध राहिलं पाहिज, असे आवाहन मी आपल्या राज्यातील पालकांना करतो.

महाराष्ट्र सायबर विभाग नोडल अधिकारी
नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी नेमले आहेत. महाराष्ट्रात महाराष्ट्र सायबर विभाग नोडल अधिकारी आहे.

“यूएस-आधारित एनजीओ – नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लोइज्ड चिल्ड्रन” जे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून बाल पोर्नोग्राफीच्या आयएसपी पत्त्याचा मागोवा ठेवत एन.सी.आर.बी.ला ॲलर्ट करतं. त्यानंतर ब्युरो पुढील कार्यवाहीसाठी नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधतं. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर सविस्तर समन्वयाने व केंद्रित कृतीमुळे चाईल्ड पॉर्नोग्राफीचा नायनाट करु, असा मला विश्वास आहे.

आपल्या राज्यात कोठेही अशी बाल पोर्नोग्राफी अथवा बाल लैंगिक अत्याचाराची घटना घडू नये पण दुर्दैवाने जर ती घडली तर स्थानिक पोलिस तसेच महाराष्ट्र सायबर सेलशी त्वरित संपर्क करा. तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही संपर्क करून माहिती द्यावी.