Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5831

राज्यात दिवसभरात तब्ब्ल १ हजार २३३ नवीन रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या १६ हजार ७५८ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. आज १२३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०९४ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ९० हजार ८७९ नमुन्यांपैकी १ लाख ७३ हजार ८३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १६ हजार ७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ११ हजार ११२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील २५, पुण्यातील ३, अकोला शहरात ३, जळगाव शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३४ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १८ रुग्ण आहेत तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: १०,७१४ (४१२)
ठाणे: ८६ (२)
ठाणे मनपा: ५४३ (८)
नवी मुंबई मनपा: ५१९ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २४७ (३)
उल्हासनगर मनपा: १३
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १८७ (२)
पालघर: ३६ (१)
वसई विरार मनपा: १७५ (४)
रायगड: ६० (१)
पनवेल मनपा: ११५ (२)
ठाणे मंडळ एकूण: १२,७१६ (४४१)

नाशिक: २४
नाशिक मनपा: ४८
मालेगाव मनपा: ३९१ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ५१ (११)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ६३२ (३१)

पुणे: १०३ (४)
पुणे मनपा: १८६१ (११५)
पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १६९ (८)
सातारा: ८९ (२)
पुणे मंडळ एकूण: २३५१ (१३२)

कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ४ (१)
रत्नागिरी: १६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (४)

औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३७० (११)
जालना: ८
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४४१ (१२)

लातूर: १९ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २८ (२)
लातूर मंडळ एकूण: ५४ (३)

अकोला: ८ (१)
अकोला मनपा: ७५ (८)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ६९ (९)
यवतमाळ: ९२
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २७६ (२०)

नागपूर: २
नागपूर मनपा: १८० (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: १८८ (२)

इतर राज्ये: ३२ (६)
एकूण: १६ हजार ७८५ (६५१)

(टीप – ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड१९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आय सी एम आर टेस्ट आय डी १२८०७४१ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

धक्कादायक! मुंबईच्या ‘या’ मोठ्या दवाखान्यात डेड बाॅडींसोबत झोपतायत रुग्ण

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नुकतेच राज्य सरकार मुंबई येथे १००० बेडची व्यवस्था असणारे रुग्णालय उभारत असल्याचेही बोलले जात आहे. अशात आता मुंबईच्या सायन हाॅस्पिटलमध्ये डॅड बाॅडींच्या सोबत रुग्णांना झोपावे लागत असल्याची तक्रार भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर करुन रुग्णांना डॅड बाॅडींसोबत झोपायला लागत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यात खाजगी डाॅक्टरांनी आपली प्रेक्टिस बंद केल्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात अधिकाधिक ICU बेड्स उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र आता राणे यांनी शेयर केलेल्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर त्याचा मोठा ताण पडलेला आहे. सरकारी पातळीवर याआधी आरोग्यावर मोठा खर्च न केल्याने त्याचा फटका आता आपल्या सर्वांना बसल आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता आरोग्य व्यवस्था अजून मजबूत करणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.

मुंबईहून आलेला ट्रकचालक निघाला कोरोना पॉझिटिव्ह, सांगलीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मुंबई येथे ट्रकचालक म्हणून काम करणारा एकजण ट्रकमधून इस्लामपूरमध्ये आला होता. त्यानंतर टँकरमधून कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील त्याच्या गावी जात असताना मुंबई येथून आल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. आरोग्य तपासणीमध्ये तो संशयित वाटल्याने ताबडतोब त्याला मिरजेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांगलीची अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता आठवर पोहोचली आहे.

कर्नाळ येथील कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेल्या बेडग व बुधगाव येथील नऊजणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर निगडी येथील बाराजणांचे दुसरे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. मुंबई येथून आल्याने सदर व्यक्तीची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. यावेळी या व्यक्तीची लक्षणे कोरोना संशयित वाटल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी पाठविले. या ठिकाणी असणाऱ्या डॉ. सतीश कोळेकर यांनी त्या व्यक्तीला कवठेमंकाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ डी आर पाटील यांच्याकडे संदर्भित केले.

दरम्यान, त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेची संपर्क केला असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेद्वारे सदर व्यक्तीला मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले. काल या व्यक्तीचा स्वाब घेण्यात आला होता. आज त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून सदर व्यक्ती कोरोणा बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे. या व्यक्तीला त्याच्या गावाकडे जाऊ न देता रस्त्यातच त्याची तपासणी केल्याने पुढील अनर्थ टळला. आरोग्य यंत्रणेने केलेल्या तत्पर हालचालींबद्दल जिल्हाधिकारी डॉ .अभिजीत चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये ;पोलिसांवर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

बुलडाणा प्रतिनिधी । बुलडाण्यातील कंटेन्मेट झोनमध्ये सोमवारी रात्री पोलिसावर हल्ला करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघे फरार आहेत. पोलिसांवरील या हल्ल्याचा शहरात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

शहरातील कंटेन्मेट झोनमधील मस्जिद परिसरात मास्क का लावला नाही, असे विचारणाऱ्या कर्तव्यावरील पोलिस कर्मचारी राजेश निकाळजे यांना पाच ते सहा जणांनी मारहाण केली. यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जावेद खान याच्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, जावेद खानसह तीन आरोपींना अटक करण्यात आली. यातील एक आरोपी माजी नगरसेवकाचा भाऊ असल्याचे कळते. बुलडाणा शहरात करोनाबाधित रुग्ण सापडल्याने तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, नागरिक विनाकारण बाहेर पडू नयेत यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

म्हणून ‘त्या’ कोरोना बाधित रुग्णावर दाखल करण्यात आला गुन्हा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सातारा येथे आजीच्या अंत्यविधीसाठी जाऊन आल्यानंतर कर्नाळ येथील एका ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्या तो व्यक्ती सातारा येथून आल्यानंतर त्याला १४ दिवसांच्या होम कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून तो बाहेर फिरत होता. त्याला वारंवार सांगूनही तो ऐकत नसल्याने त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कर्नाळ गावच्या तलाठी सौ. प्रगल्भा अजित कल्लणावर यांनी दिली आहे.

कोतीज येथील त्या मुंबईच्या कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. कर्नाळमधील सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकाचे निधन झाले होते. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी तो साताऱ्याला गेला होता. त्यावेळी त्यांचे काही नातेवाईक मुंबईहून आले होते त्याच्या संपर्कात कर्नाळमधील ती व्यक्ती आली होती. सातारा मधील त्या ठिकाणच्या काही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे त्या नंतर स्पष्ट झाले. याबाबतची माहिती सातारा जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आली होती. सांगली जिल्हा प्रशासनाला ती माहिती मिळतात तात्काळ करणार मध्ये आरोग्य यंत्रणेने धाव घेतली संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. यावरून कर्नाळ येथील त्या इसमाचे स्वाब घेतले होते. त्या व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल रविवारी संध्याकाळी पॉझिटिव आला. हा व्यक्ती सातारा येथून आल्यानंतर त्याला १४ दिवसांच्या होम कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते.

मात्र, तो कोरोना बाधित घरात न बसता वारंवार बाहेर, कर्नाळ गावातून फिरत होता. त्याला प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगूनही तो घरात बसत नव्हता. सदरची घटना हि २० एप्रिल ते २ मे या दरम्यान घडली. ३ मे रोजी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच खळबळ उडाली होती. या कोरोना बाधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तसेच संचारबंदी कलम १८८, २६९, २७१, २९० या अंतर्गत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कर्नाळ गावच्या तलाठी सौ. प्रगल्भा अजित कल्लणावर यांनी दिली आहे.

विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडे, म्हणाल्या..

मुंबई । येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. या निवडणूकीचे आता वारे संपूर्ण राजकीय वर्तुळात वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ९ जागांपैकी भाजप ४ जागांवर निवडणूक लढवत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील मेळाव्यात पक्षाच्या कोअर कमिटीचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर संधी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात असली तरी पंकजा मुंडे यांनी मात्र गोष्टीच खंडन केलं आहे.

https://hellomaharashtra.in/maharashtra-news/msrtc-st-to-provide-transport-facility-for-all-those-who-stuck-in-other-places-and-wished-to-go-home-within-the-state-amid-coronavirus-outbreak/

पंकजा मुंडे यांच्याकडून परळी तहसीलमधून कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे. त्यामुळे त्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पंकजा यांची उमेदवारी निश्चित असल्याच्या चर्चेला उधाण आलं असताना पंकजा यांनी ट्विटरवर याबाबत खुलासा केला आहे.“कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधनामुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहेत. माझ्या ई-मेल वरून माझ्या पीएने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला. त्यानंतर तो कोणीतरी व्हायरल केला. बातमी झाल्यावर मला याची कल्पना आली, स्पष्ट करत आहे,” असं ट्विट करुन पंकजा मुंडे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विधानपरिषद ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपा ३ ते ४ जागा जिंकू शकते. यासाठी पक्षाने ओबीसी गटातील प्रभावी नेत्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे संकेत आहेत. पंकजा मुंडे यांच्याकडून उमेदवारी भरण्यासाठी परळी तहसील कार्यालयातून आवश्यक कागदपत्रे मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपापासून दुरावलेल्या ओबीसी समूहाला जोडण्यासाठी पंकज यांच्याकडे काही दिवसातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही दिले जाण्याची शक्यता समर्थकातून व्यक्त केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्यातही घरवापसी, एसटीच्या १० हजार बस मोफत धावणार

मुंबई | मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या सर्वांच्या घरवापसीसाठी तब्बल १० हजार एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही सेवा मोफत देण्यात येणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

लाँकडाऊन व संचारबंदीमुळे अनेक लोक घरापासून दूरवर अन्य जिल्ह्यात वा शहरात वेगवेगळ्या कारणांनी अडकले आहेत. यात विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यातही मुंबई, पुण्यासारख्या महानगरांत हजारोंच्या संख्येने लोक अडकले आहेत. या सर्वांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी सरकारने एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत या सर्वांना त्यांच्या जिल्ह्यात सोडले जाणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

या सर्वांसाठी १० हजार एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रवासखर्चाचा हा भार मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.लोकांना घरी सोडण्यासाठी लागणाऱ्या बसेस उपलब्ध करून देण्यास परिवहन मंत्र्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे यात आता कोणतीही आडकाठी नाही. सर्वांना सुरक्षितपणे घरी पोहचवण्याचा आमचा प्रयत्न राहिल,असेही वडेट्टीवार म्हणाले.

गुड न्यूज! राज्यात २ दिवसांत ७०० कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत जवळपास ७०० पेक्षा अधिक रुग्ण कोरोना आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० आणि ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सलग दोन दिवस इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सव्वा महिन्यात २८१९ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारणत: मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडणं सुरू करण्यात आलं आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या दोन दिवसात राज्यात सर्वाधिक मुंबईतील ४६० रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यापाठोपाठ पुणे मंडळातील २१३ रुग्णांना बरं करून घरी पाठविण्यात आलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सार्वजिनक वाहतूक सुरु करणार पण… – नितीन गडकरी

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळं केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून या काळात संपूर्ण देशात सार्वजिनक वाहतूक सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, भविष्यकाळात अटी व शर्थींसह सार्वजिनक वाहतूक सुविधा सुरु करण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचं मत केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत असतांना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये बोलत असताना गडकरी यांनी या लढाईत आपण सर्वांनी एकत्र येऊन लढल्यास नक्की यशस्वी होऊ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक वाहतूक आणि महामार्ग खुले केल्यानंतर लोकांमध्ये आत्मविश्वास येईल असा अंदाज आहे असंही ते म्हणाले. सध्या लॉकडाउन काळात सर्व राज्यांच्या सीमा बंद असून फक्त सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. सर्व राज्य इतर राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना घरी आणण्यासाठी विशेष बस गाड्या चालवत आहे.

दरम्यान, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंजाब सरकारनं ८० ट्रॅव्हल्सच्या मदतीनं ४ हजार नागरिकांना परत राज्यात नेले. त्याठिकाणी या यात्रेकरूंची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल ७९५ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. २८ एप्रिल रोजी पंजाबमधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५१० पर्यंत होती. मात्र, अचानक आठशे रुग्ण वाढल्यानं पंजाबमधील रुग्णांची १२३२ वर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अखेर जावळी तालुका झाला कोरोनामुक्त; सर्व ६ रुग्ण झाले ठणठणीत बरे

मेढा प्रतिनीधी । छत्रपती शिवरायांनी जावलीच्या खोऱ्याला जिंकण्यासाठी संघर्ष केला होता. स्वराज्यात छत्रपतीच्या जावलीची संघर्षांची किर्ती अजरामर असताना ट्रॅव्हलहीस्ट्रीतुन जावली तालुक्यांतील निझरे व म्हाते मुह्रा येथे सहा रुग्न कोव्हीड १९ यासंसर्ग रोगाचे सापडले होते. मात्र छत्रपतींच्या जावलीने हा संघर्ष शेवटपर्यंत सोडला नाही. सातारा जिल्हाअधिकारी शेखर सिंह यांचे मायक्रो प्लॅनिंगमुळे तसेच महसुल विभाग व आरोग्य विभागाने शर्थीचे प्रयत्न केले म्हणुन जावली तालुक्यांतील सहाहि रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असुन जावली तालुका कोरोनामुक्त झाला आहे.

जावली तालुक्यांतील निझरे गावामध्ये मुबईच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीमधुन येवुन ठेपलेल्या कोरोनाबाधित मुबंईकरामुळे कडेकपारीत वसलेल्या जावलीला कोरोनाचा वास लागला. मात्र सातारा जिल्हाअधिकारी शेखर सिंग यांनी ताबडतोब बाधित रुग्नाच्या गावाला भेट दिली. मायक्रो प्लाॅनिग करत तहसिलदार शरद पाटील आरोग्य अधिकारी मोहीते यांनी जिल्हाअधिकारी शेखर सिंह याच्यामार्गदर्शनाखाली गावामधेच वैद्यकीय टीम रुजु केली. कोव्हीड १९ यासंसर्गरोगाच्या विरोधातील सर्व मोर्च्यानवर लढाई करत गावामधेच महसुल व आरोग्य विभागाने निझरे गावात तळ ठोकला. डोळ्यात तेल घालत सर्व चैाकशी पुर्ण करत हाय रिस्क मघील ११० लोकांच्या कोरोना टेस्ट आरोग्य विभीगाकडुन घेण्यात आल्या. मात्र जावलीत कडेकपारीतील लोकांचे नशीब बलवत्तर कोन्हीही पाॅजिटीव्ह आले नाही आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.

मात्र सर्व हाय रिस्क रिपोर्ट निगेटीव्ह येवुन देखील प्रशासनाला निझरे, म्हाते मुर्हा येथील कोरोनाची साखळी तुटने महत्वीची होती. याबाबत निझरे व पंचक्राशीतील गांवानी लाॅकडाऊन पुर्णपणे पाळत प्रशासनाला मदत केली. कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळवले. जावली तालुक्यांतील गत १५ दिवसाच एक देखील रुग्ण जावलीत कोव्हीड १९ रुग्णाचा आढळला नाही. आरोग्य व महसुल प्रशासनाचे केलेल्या कोरोना विरोधातील सुक्ष्म व्यवस्थापन जिल्हाअधिकारी शेखर सिंग याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल.

एकीकडे महसुल व आरोग्य विभाग प्रयत्नाची पराकाष्ठा जावलीकरीता करत असताना .जिल्ह्यांच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी देखील स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक निलकंठ राठोड याच्याकडे दिलेली जवाबदारी लीलया पार पाडली. प्रशासनाबरोबर सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेद्रराजे जावलीच्या परीस्थीतीचा आढावा घेत लागेल ती मदत प्रशासनाला करत सर्व अधिकार्याच्या संपर्कात रहात परीस्थीती अचुक माहीती ठेवत होते. जावली तालुक्यांला आलेले यश प्रशासनाच्या मेहनत व अचुक घेतलेल्या निर्णयांनी जावलीतील सहा रुग्न कोरोनामुक्त होवुन बाहेर पडले हे मात्र निश्चित